Skip to main content

बरसणाऱ्या सरी|

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 16/09/2022 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
नभावरची साय ऊतू ऊतू जाई, गंधवेडी अवनी बहरली रानो वनी||१|| फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती ||२|| भिरभिरणाऱ्या अंगणात फडफडती भिंगोरी पंखात बरसणाऱ्या सरी धारा काळजाचा गार निवारा||३|| -भक्ती
लेखनविषय:

वाचने 2447
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

सुरेख!

फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती.
वरील ओळींना 'पैकीच्या पैकी' गुण दिले आहेत. लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे

Q १६ सप्टेंबर ना.धो.महानोर यांचा वाढदिवस! सुंदर पाऊस पडत होता. अजिंठा,जैत रे जैतमधील गाणे! अप्रतिम!मराठी भाषेला निसर्गावेळा मुक्त बहाल करणारा आवडता कवी!