Skip to main content
लेखक Deepak Pawar यांनी सोमवार, 05/12/2022 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
उडून गंध चालल्या फुलास वाटते तसे कसे सुने - सुने उदास वाटते. कधी वसंत येईल, बहरेन मी पुन्हा झडून पान चालल्या तरुस वाटते. पवन तुला करीत स्पर्श जातसे अता दरवळला चहूकडे सुवास वाटते. कशास जन्म हा जगून काढला इथे उगाच का असे - तसे मनास वाटते. निघून चाललीस तू इथून ज्या क्षणी तिथेच संपला असे प्रवास वाटते. दीपक पवार.
लेखनविषय:

वाचने 2546
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

चांगला प्रयत्न. कल्पना चांगल्या. पहिल्या ओळीत खडा लागल्यासारखं होतंय. जरा बदल झाला तर पहावा. तसंच मीटरही थोडं अजून कडक सांभाळायला हवं, गझल लिहिणार असाल तर. नाहीतर जरा इकडे तिकडे चालतं. पुलेशु.