Skip to main content

चक्रव्युह

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 27/05/2022 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा :- तेच तेच पुन्हा पुन्हा http://misalpav.com/node/50115 शशक २०२२ मधली ही गोष्ट वाचली आणि पुन्हा एकदा विचार करू लागलो. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला ठाऊक असूनही त्या मार्गाकडे पावले का बरे वळत नाहीत? पुन्हा पुन्हा फिरून याच पिंजर्यात अडकावेसे का बरे वाटते? असा विचार करत असतानाच कानावर अरुण दातेंचा आवाज आला आणि मग जे सुचले ते पटकन लिहून काढले

चक्रव्युह

भोग हे भोगून संपवायचे नाहीतर चक्रात अडकायचे स्वप्नात गुरफटून रहाणे टाळती का बरं शहाणे? अनुभव त्यांचे ऐकायचे मोजून श्वासाची खोली आवर मनास घाली स्वत:ला आतुन बघायचे थरारे मनाची पाती, कंपने शरीरा वरती मनाने स्थिर राहायचे माझ्याया मनाच्या पाशी करुणा दाटो जराशी पसायदान हे मागायचे पैजारबुवा,
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3145
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

हे मस्त जमलंय! क्लास! आवडले!! :-)

माझ्याया मनाच्या पाशी करुणा दाटो जराशी हे आवडले

व्वा, सुंदरच !

💓

शेवटीचे कडवे .... एक नंबर !

थरारे मनाची पाती, कंपने शरीरा वरती मनाने स्थिर राहायचे
क्या बात!! विडंबने कमी करुन असं जास्त लिहित चला!

सुरेख.