मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनर्थशास्त्र

एक माणूस बनेल काढून..................

पगला गजोधर ·
लेखनविषय:
काव्यरस
एक माणूस बनेल काढून डोम्बिविलीत पोहचला बघता बघता रस्त्यावरी दुकान टाकून वसला. छंद जीवाला एकच लागे खुर्ची वरीला हक्क हा गाजे शिव्याशाप तो भाषणामधूनी आकांड तांडव ते दैनंदिनी किन्तु हातचा राखून गणित चुकले नजर चकवून बहुमत हुकले तरी उसने आवसान काउंटरवरुनी परी हळूच पाही मान वळवूनी इकडे तिकडे बघून झाले निकाल सगळे येऊन गेले भान आले, बाहेर आला.... लोकांनी विचारल्यावरी म्हणाला … आमची दोस्तीदुष्मनी सबकुछ मिलीजुली असते …… सेटलमेंट होत असेल तर पायवाटही खुली असते … एक माणूस बनेल काढून वांद्र्याबाहेर पडला हरवलेले सत्तेचे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .

चकती वाचे

निनाद ·
लेखनविषय:
अनंतवर्ती अनभिसंहित अनमोल माहिती चकती वाचे अनापरीवर्तक अनालेखित पंक्ती अनुज्ञापन अनुक्रिया अनुदेशन ही पद्धती अनुनयी अनुमोदनात अनेकोत्तरी रीती अन्योन्य धारिता क्षीणनकारी अन्वस्ती अनेकोत्तरी अन्वस्तीय धागे तरी भीती अपच्छेद अपरा अनुरूपता असे अवनति अनुवाद असे अप्रारुपी शोधू तरी किती अवरक्त विदा अवरोधितात का भिंती अवश्लेष्मल तरी अवाढव्य असे माहिती (पैसा ताईंनी आठवण करून दिली... त्यामुळे भोगा आय मिन वाचा! :) )

पटली तर पळवा

पाटीलअमित ·
लेखनविषय:
काव्यरस
पूर्व प्रकाशित http://kahihikasehi.blogspot.com/2015/10/blog-post_17.html मूळ कविता http://www.misalpav.com/node/३३१७६ लोकसंखेच्या प्रमाणात जास्त वाढले नर मुलगी मागताच मुलीचा बाप विचारतो घर जबरदस्तीने हाकलतो काय ,बाप कधी संग मारतो आपल्या पायावरती ,कुर्हाड नीट धर यंदा लग्न करू नको,फुकट कांदा पोहे खा गोरी किवा काळी ,पटव आणि पळवून कर चढाच बोहल्यावर निग्रहाने ,बाकी बघू मग कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर मांडवातले मान पान ,कुठे कोण वर्ज्य लग्न करूनच मर पण जिवंत पाणी मर किती झगडणार बायकोशी ,बस इतके ठराव रोज वाढणाऱ्या दादागिरीस , ’अभय’ असेल तर अमित पाटील

मळली तर वाळवा

पगला गजोधर ·
लेखनविषय:
काव्यरस
(प्रेरणा : सांगायलाच पाहिजे का ? ) रस्त्यांवरच्या डबक्यांपासून जरा जपून फिर भिजेल विजार खाशी तुझी, ढळता लक्ष्य जर जबरदस्तीने उडतात काय, शिंतोडे कधी सांग तूच आपल्या पाटलुनीला, नीट पोटरीवरी धर यंदा रस्त्यात हाकू नकोस, बीआरटी लेनमध्ये ने कामी येई अश्यावेळी, मधला डांबरी थर सुटच फुल्टू वेगाने तू, बाकी बघू मग कोण सापडे मामाला आणि, कोण निसटे भुर्र किती मळणार रे तूझी, ओली विजार आज मळली तर वाळवणे, हेच तुझे कार्यालयीन काज

दयेच्या छावण्या

शिव कन्या ·
पाणी पितो ती नदी आमची नाही अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत! युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या यातलं काहीच आमचं नाही! नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत! ती रासवट आहेत, मारतात, मरतात तलवारीने गळे चिरतात, रक्ताच्या कुर्बान्या देतात महाहिंसक माणसं! त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो....... पण तुमच्यात आलो म्हणजे तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही! एक काम कर

"हाय"कू

नाखु ·

"हाय"कू

"हाय"कू हा प्रकार समजवण्याचा नाही समजण्याचा आहे. लेखक मकदूरांना त्यांचे प्रेरणास्थान श्री श्री श्री श्री आत्मुदा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे).यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला. पुणे प्रांतीही त्यांना केलेली आर्त विनवणी दुर्लक्षली गेली आणि आम्हाला अंगठा दाखविला. ( त्या अंगठ्याला चुना होता असे वल्लींचा अंदाज आहे, त्या मुळे तो अंगठा आमच्या विनवणीसाठी ठेंगा म्हणून होता का चैतन्यचूर्ण करामत हे कळाले नाही.

जुळयांचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

नाखु ·

जुळयाचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

जुळे १: सासं नसूनही तबला तू सकल मिपाचा झमेला तू धाग्यवरील सैरभैर (चि)चुंद्र अन्... सुप्त बोक्याची जागा तू मोकळाढाकळा रांगडा तू रे सुमडीत सोपान डोम ही तू ज्वर धाग्याचे आरोळी कधी तू कधी फसलेली चारोळी तू मिपात असूनही..

बैसलो होतो पानटपरीवर

भैड्या ·
बैसलो होतो पानटपरीवर उगाच फुंकित बिड्या, करीत खेळ आगिशी पेटविल्या अनंत काड्या ऊठुन बैसलो घेतला दगड टाकिला पत्र्यावरी आवाज जाहले शेजारचे कुत्रे पळता भुई थोडी. धाप लागिली घाम फुटला नरड्यात माझ्या कोरड. हाड कुत्र्या छौ साल्या बंद कर तुझी ती ओरड. झाड दिसले चढलो वरती बैसलोय मटकुळं करून. बैसलयं खाली बघतयं वरी कुत्रं खाकरून. एक थेरीडा बघुन प्रसंग गेलाय बावचळुन. हासडुनी शिव्या मजला गेला कुत्र्याला घेऊन. रोखुन मज दाखवा कुणी चालिलो मी अड्ड्यावर. चार शिपुरडे नेई मजला पुन्हा टपरीवर. क्रमश:

रंगल्या रात्री अश्या

भैड्या ·
रंगल्या रात्री अश्या गोलघुमट टक्कल जश्या तो विजेचा खांब तरर्राट उभा असा या सडकेच्या तोंडावरती देऊन टाक भसाभसा दुरून पहा ते कुत्रे सांडांच्या खांद्यावरचे लावलाय लळा तु त्यास आज असा कसा? बुंगाट ढेकर देऊन ऊठ त्या पानावरुन घेऊन जा घागरी अनं हलव तो हापसा आम्ही सुर्याची लेकरे कोवळ्या ऊन्हात निपजितो अन घेऊन या घागरी आज सकाळीच हापसितो दे दे मला तो बंजरखंड मशेरी त्यावर मी भाजितो आज सकाळी टकलावर हात मी फिरवितो