मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दयेच्या छावण्या

शिव कन्या · · जे न देखे रवी...
पाणी पितो ती नदी आमची नाही अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत! युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या यातलं काहीच आमचं नाही! नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत! ती रासवट आहेत, मारतात, मरतात तलवारीने गळे चिरतात, रक्ताच्या कुर्बान्या देतात महाहिंसक माणसं! त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो....... पण तुमच्यात आलो म्हणजे तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही! एक काम करा कि साहेब! ते जे No Man's Land म्हणता ना ते द्या आम्हाला! आमची घरं आम्ही थाटू आमच्या नद्या आम्ही खणू आमची शेती आम्ही करू! ह्या ह्या, माहितीय साहेब! तुम्ही नाहीच म्हणणार... आम्ही बेघर परागंदा नाही राहिलो, तर तुमच्या दयेच्य छावण्या, तुम्ही तरी कुठं उभारणार म्हणा! असो..... चालू द्या.

वाचने 3221 वाचनखूण प्रतिक्रिया 5