चकती वाचे
अनंतवर्ती अनभिसंहित अनमोल माहिती
चकती वाचे अनापरीवर्तक अनालेखित पंक्ती
अनुज्ञापन अनुक्रिया अनुदेशन ही पद्धती
अनुनयी अनुमोदनात अनेकोत्तरी रीती
अन्योन्य धारिता क्षीणनकारी अन्वस्ती
अनेकोत्तरी अन्वस्तीय धागे तरी भीती
अपच्छेद अपरा अनुरूपता असे अवनति
अनुवाद असे अप्रारुपी शोधू तरी किती
अवरक्त विदा अवरोधितात का भिंती
अवश्लेष्मल तरी अवाढव्य असे माहिती
(पैसा ताईंनी आठवण करून दिली... त्यामुळे भोगा आय मिन वाचा! :) )
वाचने
5373
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
भोगली…आय मीन वाचली!
मस्तच!
अवश्लेष्मल तरी अवाढव्य असे माहितीहे आवडले! ह्यावरून काहीतरी सुचले आहे! घेऊन येईन कधीतरी नंतर! ;-) Sandy
तुम्हांला जालिंदर जलालाबादी भेटले का?
या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे.
In reply to या विषयावर... by चाणक्य
चर्चा करण्यासारखे काय आहे हो? चर्चा करायला घाबरतो हो मी.
हवे तर एखादे उत्तर टाका... ते अजून आवडेल. ;)
=))
या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!!
अवांतरः वाचली का? चला पैसे वाचले!
अब्बब
अवघड आहे अगदी
आस्वादक आखु
आत्मुदांच्या ओळखीचा
निनाद,
तुमची हार्डडिस्कवरची कविता मस्तंच आहे! थोडी विस्कटून घ्यायचा प्रयत्न केला.
------------------- प्रयत्नसीमा ------------------
अनंतवर्ती = भरपूर सेक्टर्स असलेली
अनभिसंहित = ? अनफॉर्मॅटेड ? अनपार्टिशन्ड ? अनइंडेक्स्ड ?
अनमोल माहिती = तेच
चकती वाचे = तेच
अनापरीवर्तक = ?
अनालेखित पंक्ती = नॉन इंडेक्स्ड डेटा लाईन्स
अनुज्ञापन अनुक्रिया अनुदेशन ही पद्धती = ? रीडिंग च्यानेल ?
अनुनयी अनुमोदनात अनेकोत्तरी रीती = ? ब्लॉक रीडिंग ?
अन्योन्य धारिता = युनिक फाईल
क्षीणनकारी अन्वस्ती = ?
अनेकोत्तरी अन्वस्तीय धागे = ? मल्टिपल रीडंडंट च्यानेल ?
तरी भीती = तेच
अपच्छेद = फ्रॅगमेंटेशन
अपरा अनुरूपता = रीडंडन्सी
असे अवनति = तेच
अनुवाद असे अप्रारुपी = ? फाईल अॅलोकेशन टेबलची कॉपी ?
शोधू तरी किती = तेच
अवरक्त विदा = मेमरी लीक
अवरोधितात का भिंती = तेच
अवश्लेष्मल = ? अनऑर्गनाईझ्ड ? गार्बेज हीप ?
तरी अवाढव्य असे माहिती = तेच
------------------- प्रयत्नसीमा ------------------
चुकलंमाकलं सांभाळून घ्या आणि यत्न गोड मानून घ्या. पूर्ण स्पष्टीकरण वाचायला आवडेल! :-)
आ.न.,
-गा.पै.
In reply to जाम आवडली :-) by गामा पैलवान
लै भारी!
In reply to जाम आवडली :-) by गामा पैलवान
आता कसं!
निनादराव शरदिनीतैंचे नजदिकी रिश्तेदार वगैरे आहेत काय?
गामाजी आपण ग्रेट आहात!
नमस्कार स्विकारावा :)
निनादराव लै दिवसांनी लिहिते झाले. :)
अनादि मी अनंत मी!
संपूर्ण संभ्रम.
अपितु आवडेश.
निनाद आणि गामा _/\_
अगम्य अगृभित अननुभाऊक "शब्द" असे लिहिती
अकिंचिज्न आम्ही अचंड आणिक अकुंठ अमुची मती
In reply to अगम्य अगृभित अननुभाऊक "शब्द" by चुकलामाकला
चुकलामाकला,
आवडले आहे... अजून यायला हवे होते.
मस्तच!