गाजर -खोबऱ्याचे लाडू (carrot coconut ladoo)

आरोही's picture
आरोही in पाककृती
19 Nov 2014 - 1:42 pm

साहित्य : गाजर अर्धा किलो ,डेसिकेटेड कोकोनट १ वाटी ,साखर अर्धी वाटी ,condensed milk अर्धी वाटी ,मिल्क पावडर २० ग्राम,साजूक तूप ३ चमचे सजावटी साठी बदाम .

कृती :
सर्व प्रथम गाजर धुवून ,त्याची साले काढून ,किसून घ्यावे .
एका कढाई मध्ये साजूक तूप घालून त्यात गाजराचा कीस टाकावा .
थोडा रंग बदले पर्यंत परतावा ,साधारण ५ मिनिटे .
नंतर त्यात condensed milk आणि साखर टाकून परतावे २ मी .परतावे मिश्रण थोडे पातळ होईल ते घट्ट होईपर्यंत परतावे आणि शिजू द्यावे ..
मिश्रण शिजत आले आहे आहे असे वाटले कि त्यात डेसिकेटेड कोकोनट टाकावे ,अजून २ मी .परतून
आच बंद करून मिश्रण गार होण्यासाठी एका ताटात काढावे .
मिश्रण चांगले गार झाले कि त्यात मिल्क पावडर टाकुन एकजीव करावे आणि त्याचे लाडू वळून हवे तसे सजवावे . वर बदामाचे काप लावावेत .

1

साखर किवा c.मिल्क आपापल्या आवडीप्रमाणे कमीजास्त करता येईल .
डेसिकेटेड कोकोनट अजून उरले असल्यास त्यात ते लाडू घोळवून घ्यावेत .इ
मी हा पदार्थ लेकाच्या शाळेतील स्पर्धेसाठी केला असल्याने जरा वेगळ्या रीतीने सजवला आहे .आणि येथे द्यायचे नक्की नसल्याने जास्त फोटो नाही काढले ..
नेहमीच्या गाजर हलव्या पेक्षा थोडी वेगळी पण छान पण वेगळी चव सगळ्यांना आवडतेच . *smile*

2

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

19 Nov 2014 - 1:44 pm | पिलीयन रायडर

अप्रतिम!!! नक्की करुन पहाणार!

कंजूस's picture

19 Nov 2014 - 1:45 pm | कंजूस

छान.

मस्त गं..करून पाहीन नक्की..प्रेसेंतातियो
presentation अप्रतिम..

प्यारे१'s picture

19 Nov 2014 - 1:56 pm | प्यारे१

*clapping*

*good*

मस्त गं.छान सोपी पाकृ आहे.

हाण तेच्या मारी. वेगळीच अन मस्ताड पाकृ आहे. अन मुख्य म्ह. सोपी. मस्तच!

त्रिवेणी's picture

19 Nov 2014 - 2:35 pm | त्रिवेणी

छान रेसीपी.
खुप दिवसांनी रेसीपी आली तुझी.

स्नेहल महेश's picture

19 Nov 2014 - 3:18 pm | स्नेहल महेश

नक्की करुन पहाणार!

मधुरा देशपांडे's picture

19 Nov 2014 - 4:25 pm | मधुरा देशपांडे

सोप्पी पाकृ आणि मस्त सादरीकरण. :)

हा लाडूंचा प्रकार पहिल्यांदाच बघतिये. सजावट छान झालीये.

सस्नेह's picture

19 Nov 2014 - 4:51 pm | सस्नेह

सुरेख सजावट.
पाकृहि मस्त सोपी आहे.

स्पंदना's picture

19 Nov 2014 - 5:24 pm | स्पंदना

गुडी गुडी!
गोंडस दिसताहेत लाडू!! बर्फात पाय पसरुन बसलेल्या स्नोमन सारखे.

जुइ's picture

19 Nov 2014 - 6:51 pm | जुइ

:)

आनन्दिता's picture

19 Nov 2014 - 7:15 pm | आनन्दिता

शेकोटी ला आलेले लाडू आवडले!

स्वाती दिनेश's picture

19 Nov 2014 - 8:44 pm | स्वाती दिनेश

लाडू छानच दिसत आहेत्,आवडले.
स्वाती

रुपी's picture

19 Nov 2014 - 11:17 pm | रुपी

खोबरं घातलेला गाजर हलवा खाल्ला आहे. छान लागतो. ही लाडूही छानच असणार!

सादरीकरण अप्रतिम, आणि त्यावर खूपच मेहनत घेतली आहे तुम्ही. त्यामानाने फोटो तितका चांगला नाही आला.

पैसा's picture

19 Nov 2014 - 11:27 pm | पैसा

पाकृ आणि त्याचे सादरीकरण मस्तच झालंय!

श्रीरंग_जोशी's picture

19 Nov 2014 - 11:41 pm | श्रीरंग_जोशी

गाजराचा हलवा अन खोबरे असलेले लाडू खूप आवडतात.

ही पाकृ रोचक आहे. कल्पक सादरीकरण आवडले.

मुक्त विहारि's picture

20 Nov 2014 - 1:53 am | मुक्त विहारि

+१

मदनबाण's picture

20 Nov 2014 - 9:38 am | मदनबाण

किती गोड... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }

सादरीकरणा साठी आपला सलाम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2014 - 10:20 am | डॉ सुहास म्हात्रे

फोटो पाहून ते लाडू आताच गट्टम करून टाकावेसे वाटतात !

इशा१२३'s picture

20 Nov 2014 - 1:28 pm | इशा१२३

मस्त फोटो आणि सादरिकरण.

सविता००१'s picture

20 Nov 2014 - 2:32 pm | सविता००१

छान फोटो आणि पाकॄ.

अरे वा.. छान आहे पाकृ. ते स्नो मॅन पण खुप आवडले. :)

सोप्पी पाकृ आणि सुरेख मांडणी!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Nov 2014 - 3:29 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आवडले.
(लाडू वळणारी)माई

छानच फोटो आणि सादरीकरण...स्नोमॅन क्युटच दिसतात :)