बदाम एक्का

टक्कू's picture
टक्कू in पाककृती
22 Nov 2014 - 1:53 pm

खूप दिवसांपासून नवीन पदार्थ करण्याचे डोक्यात घोळत होते. आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो पदार्थ बनवला आणि झक्कास जमून आला. त्याला आम्ही नाव दिले बदाम एक्का. हा पदार्थ heavy duty dessert या विभागात मोडेल. तर पाहूया त्याची कृती.

साहित्य: (१० जणांसाठी)

४ वाट्या बदामाची भरड
पाउण वाटी तूप
पाव वाटी खवा /मावा
दीड वाटी milk powder
सव्वा वाटी साखर
२ वाट्या दूध
२ चमचे वेलची पूड

कृती:

१. प्रथम बदाम कढई मध्ये किंवा microwave मध्ये हलकेसे भाजून घ्यावेत. गार झाल्यावर mixer वर त्याची जाड भरड करावी.
२. कढई मध्ये तूप गरम करावे व त्यावर बदाम भरड घालून मंद आचेवर भाजावे. भरड खमंग भाजली की त्यात खवा घालावा व ५-७ मिनिटे मिश्रण भाजावे.
३. नंतर या मिश्रणामध्ये milk powder आणि दूध घालून छान एकत्र करून घ्यावे.
४. ३-४ मिनिटांनी त्यात साखर घालावी व मिश्रण ढवळत राहावे.
५. सर्वात शेवटी gas बंद करून वेलची पूड घालावी.

बदाम एक्का आस्वाद घेण्यास तयार आहे.

काही महत्वाचे:
१. gas नेहमी मंद आचेवर ठेवावा आणि मिश्रण सतत ढवळत राहावे. नाहीतर ते करपेल.
२. बदाम आणि खवा व्यवस्थित भाजून घ्यावा म्हणजे खमंगपणा येतो.
३. दूध आपल्याला हव्या त्या consistency नुसार कमी जास्त करावे. सैलसर हवी असल्यास दूध थोडे वाढवावे.

माझ्या ब्लॉगवरच्या या रेसिपीचा दुवा

a
s
c
aa
eee

प्रतिक्रिया

एस's picture

22 Nov 2014 - 2:18 pm | एस

नंतर किती दिवस जॉगिंग ट्रॅकवर घाम गाळावा लागेल बरं? ;-)

मस्त वाटतंय डेझर्ट बाकी! बदाम पचण्याच्या दृष्टीने आधी रात्रभर पाण्यात/दुधात भिजवावे का?

कवितानागेश's picture

23 Nov 2014 - 3:54 pm | कवितानागेश

भिजले तर ते भरड वाटले जाणार नाहीत. कोरडे भाजले तरी जरा हलके होतील.
बदाम हलवा/ अक्रोड हलवा साधारण असाच बनावतात ना?

खतरनाक आहे. मला एक वाटी जरी खाल्ला, तरी पचेल की नाही शंका आहे.. खरोखर हेवी ड्यूटी आहे..

- पिंगू

मुक्त विहारि's picture

23 Nov 2014 - 2:04 am | मुक्त विहारि

नक्कीच करून बघीन.

hitesh's picture

23 Nov 2014 - 5:28 am | hitesh

हेवी ..

Maharani's picture

23 Nov 2014 - 1:40 pm | Maharani

मस्त डिश..खरोखर heavy duty आहे..

पैसा's picture

23 Nov 2014 - 8:35 pm | पैसा

मस्त दिसतंय! बघूनच पोट भरलं!

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2014 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

मदनबाण's picture

24 Nov 2014 - 10:35 am | मदनबाण

फोटो ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods

बघूनच समाधान मानावं !! :)

टक्कू's picture

25 Nov 2014 - 12:43 pm | टक्कू

बदाम भिजवून घेतले तर चांगलंच!
heavy duty item आहे खरा. त्यामुळे अर्धी वाटीच्या वर खाऊ शकत नाही. अर्थात एका वेळी ;)

लीमाउजेट अक्रोड हलवा साधारण असाच बनवतात. माझ्या ब्लोग वरची लिंक पाहा.
http://www.takkuuu.blogspot.in/2014/03/blog-post.html
धन्यू.

वेल्लाभट's picture

25 Nov 2014 - 2:50 pm | वेल्लाभट

हा मिपाच्या वाङमयातील नवीन शब्द म्हणावा का?
धन्स च्या जातकुळीतला?