फोडणीचे खमंग डोसे

जागु's picture
जागु in पाककृती
5 Dec 2014 - 3:47 pm

मिठ
१ वाटी तांदळाचे पिठ
अर्धी वाटी रवा
पाऊणवाटी दही
फोडणीसाठी :
१ चमचा राई/मोहरी
१ चमचा जीरं
२ मिरच्यांचे तुकडे
थोड कढीपत्ता
फोडणीच्या गरजेनुसार तेल

पाककृती:
१) प्रथम तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ एकत्र करून घ्यावे.
२) डोश्याला लागेल एवढे पाणी टाकून पिठ पातळ करून घ्यावे.
३) वरील फोडणी करून ह्या पातळ पिठावर टाकून १० मिनीटे झाकून ठेवावे.

४) आता नॉनस्टीक पॅनवर डोशाचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने परतवून डोसे बनवून घ्यावेत.

हे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा.

अधिक टिपा:
फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.
दही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.
तेल वाटत तेवढ जास्त होत नाही. फ्रायपॅनला नाही लावले तरी चालेल तेल.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

5 Dec 2014 - 3:50 pm | मदनबाण

डोसा का धिरडं म्हणावं ? या बाबतीत जरा कणफ्युज झालो आहे ! बाकी पाकॄ झकास !
आणि मी पहिला बरं का ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)

अनुप ढेरे's picture

5 Dec 2014 - 4:08 pm | अनुप ढेरे

डोसा माझ्या माहितीप्रमाणे आंबवलेला असतो. आणि धिरडं नाही.

मदनबाण's picture

5 Dec 2014 - 4:20 pm | मदनबाण

ओह्ह...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 12:25 am | मुक्त विहारि

चण्याच्या डाळीच्या पीठाची, धिरडी बनवल्या जातात.

पण ही एका विशिष्ट वेळेलाच अप्रतिम लागतात.

एखाद इंग्लिश नाव देउन टाका (हहाहा...)

कविता१९७८'s picture

5 Dec 2014 - 3:53 pm | कविता१९७८

मस्तच

तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ यान्चे प्रमाण???

राहिलेच. कट झाले. इथे पुन्हा संपादीत करायची सोय नाही. आता मी इथे लिहीते. प्लिज जे बदल करू शकतात त्यांनी मुळ धाग्यात करून द्या.

१ वाटी तांदळाचे पिठ
अर्धी वाटी रवा
पाऊणवाटी दही

रुस्तम's picture

5 Dec 2014 - 4:40 pm | रुस्तम

धन्यवाद... जागु ताई...

सविता००१'s picture

5 Dec 2014 - 4:32 pm | सविता००१

तू प्रमाण दिलं नाहीस चुकून तरी बाउल मध्ये घेतलेले पदार्थ किती ते सहज कळताहेत :)

जागु's picture

5 Dec 2014 - 4:51 pm | जागु

धन्स सविता.

बॅटमॅन's picture

5 Dec 2014 - 5:03 pm | बॅटमॅन

मस्त प्रकार आहे!

यासोबत टोम्याटो चटणी लै जबराट लागेल असे आपले एक वैयक्तिक मत. खोबरेवाली अन टोम्याटोवाली अशा दोन्ही चटण्या लै जबर्‍या.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2014 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा

@यासोबत टोम्याटो चटणी लै जबराट लागेल >>> +++१११

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 12:23 am | मुक्त विहारि

डोसे आणि टोमॅटो+कांदा+हिरव्या मिरच्या+थोडेसे किसलेले आले+मिरपूड+आणि जहाल तिखट, अप्रतिम कॉम्बिनेशन.

आम्ही याला रवा उत्तपा म्हणतो. नावे वेगळी असली तरी चव छान असते यात वाद नाही. ;)
फोटू आवडले जागुतै!

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2014 - 5:39 pm | प्रभाकर पेठकर

ह्म्म्म! हे झटपट डोसे करून पाहिले/खाल्ले पाहिजेत.

जाळी आलेली बघून दिल गार्डन गार्डन हो गया !! ;)

शेखर बी.'s picture

6 Dec 2014 - 12:00 pm | शेखर बी.

हा हा हा!!

जागु ताईंकडुन चक्क शाकाहारी पाककृती ;)
दह्यामुळे माझ्यासाठी बाद :(

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 12:19 am | मुक्त विहारि

दह्याच्या जागी ताक घाला.

हाकानाका.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 12:23 am | मुक्त विहारि

मस्त

शेखर बी.'s picture

6 Dec 2014 - 12:03 pm | शेखर बी.

धिरड असो कि उत्तपा की दोसा..भरि जमलय..!!

पिशी अबोली's picture

6 Dec 2014 - 12:05 pm | पिशी अबोली

डोश्याला लागेल एवढे पाणी

हे प्रमाण नवशिक्यांचा घात करतं हा सततचा स्वानुभव.. ;)
डोश्यांच्या आकारात तव्यावरून यशस्वीपणे खाली आल्यावर सुंदरच लागत असणार हे..

एस's picture

9 Dec 2014 - 11:48 am | एस

जागुताईंच्या रेशिपीच्या जोरावर कुटुंबासमोर फुशारकी मारली. शेवटी डोसे काही जमेनात तेव्हा एसओएस मॅसेज पाठवावाच लागला. मग उरलेले डोसे आयते बनवून मिळाले, पण परत असला काही उद्योग करायचा नाही अशी तंबीपण!

काय जागुताई!!!

तुम्ही नॉनस्टीक पॅन वापरलात की साधा? मी बर्‍याचदा करते पण नाही फसत.

झाकण दिले होते ना पिठ टाकल्या टाकल्या तव्यावर?

बॅटमॅन's picture

9 Dec 2014 - 4:35 pm | बॅटमॅन

हा हा हा, सर्व नवशिक्या स्वयंपाक्यांच्या मनातले बोललात. =))

(नव'थरथर' स्वयंपाकी) बॅटमॅन.

दिपक.कुवेत's picture

7 Dec 2014 - 2:16 pm | दिपक.कुवेत

करुन बघायला हवेत.

विजय पिंपळापुरे's picture

8 Dec 2014 - 4:11 pm | विजय पिंपळापुरे

मी असेच घावन बनवतो. त्यात ७०% रवा व बाकी इतर पीठ [ ज्वारी, बाजरी, तांदूळ, बेसन, कणीक] घालतो. त्यात बारीक कांदा, हिरवी मिरचा बारीक चिरून टाकतो. चवी साठी जिरे टाकतो.

बाळ सप्रे's picture

9 Dec 2014 - 4:33 pm | बाळ सप्रे

हेच काँबिनेशन ३-४ तास आंबवून ठेवल्यावर डोसे केल्यास त्याला रवा डोसा म्हणतात..