मी स्वप्न पाहत नाही

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
25 Apr 2018 - 6:36 pm

मी स्वप्न पाहत नाही

कारण , मला ते पडत नाही

नेहेमी ठरवतो आज झोपल्यावर स्वप्न बघायचे

काहीतरी वेगळंच बनायचे

मी पडतो , लकटतो त्या पलंगावर

विचार हाच असतो , कि आज स्वप्न बघायचे

डोळे काही मिटत नसतात

स्वप्न कुठले बघायचे नि कसे ?

याचेच विचार मनात घोळत असतात

हळूहळू झापड यायला लागते

डोळे जड होत जातात , निद्रादेवी प्रसन्न होते

मिट्ट काळोख , कसलीही आठवण नाही , कसलीच साठवण नाही

डोळे उघडतात , पण तोंडावर पाणी शिंपडून

पुन्हा एक तासभर पलंगावर तस्साच पडून राहतो

काही स्वप्न पडलं का ? ते आठवून पाहतो

आजूबाजूच्या लोकांना हि गोष्ट न्यारी वाटते

आजही मला माझ्या स्वप्नाची पाटी कोरीच वाटते

घेतले मी नाना वैद्यांचे सल्ले

वेडा समजून त्यांनी मलाच हाकलले

गुरुजनांत, एक सज्जन मला पुन्हा भेटले

त्यांनी यामागचे मर्म उघडले

करीत नाहीस कधीही तू कशाचीही चिंता

क्षणात सोडवी मळाप्रमाणे तू व्यापाचा गुंता

प्रश्नास सदैव तू उत्तरावरच ढकलले

हेच कारण असे इथे कि आजवर स्वप्न तुला ना पडले

मिळत नसते अशी कधीही कुणालाही भेट

जो निष्काम सेवा करतो त्यालाच मिळते थेट

मागू नको तू देवापाशी कधीही स्वप्नाचा तो ठेवा

निद्रेचा तू भोग घेत जा , समजून अनमोल मेवा

{{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}

अदभूतअविश्वसनीयमाझी कवितामार्गदर्शनरतीबाच्या कविताधोरणमांडणीजीवनमानराहणीगुंतवणूक

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

25 Apr 2018 - 8:33 pm | श्वेता२४

<मिळत नसते अशी कधीही कुणालाही भेट
जो निष्काम सेवा करतो त्यालाच मिळते थेटcode>
स्वतः ची पाठ थोपटून घेता की राव तुम्ही

खिलजि's picture

26 Apr 2018 - 5:28 pm | खिलजि

मला खरंच स्वप्न का पडत नाही हा मोठा यक्ष प्रश्न सध्या माझ्यासमोर आहे . मी सध्या त्याचे उत्तर शोधतोय पण अजून काही सापडले नाही आहे .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

चित्रगुप्त's picture

27 Apr 2018 - 5:23 am | चित्रगुप्त

मी स्वप्न पाहत नाही... कारण , मला ते पडत नाही

-- भाग्यवान आहात.

मागू नको तू देवापाशी कधीही स्वप्नाचा तो ठेवा .... निद्रेचा तू भोग घेत जा , समजून अनमोल मेवा

.... अगदी बरोबर.

धन्यवाद चित्रगुप्त साहेब .

पद्मावति's picture

30 Apr 2018 - 6:27 pm | पद्मावति

कविता आवडली. वेगळा विचार जरा हटके.

खिलजि's picture

2 May 2018 - 1:11 pm | खिलजि

धन्यवाद पद्मावती ताई

सिद्धेश्वर विलास पाटणकर