मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो
मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!
मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या
मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!
रोज ढळतो अन् उगवतो..मी न झालो सूर्यही
मंदिरा-गाभारची मी,नित्य समई जाहलो!
चंद्रभागा अमृताची वाहते येथे सदा...
मी विठू-नामात न्हाती,टाळ-चिपळी जाहलो!
लाभली आहे दिशाही या प्रवासाला अता
मी जसा या पालखीचा एक भोई जाहलो!
मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो...
—सत्यजित
प्रतिक्रिया
20 Jun 2017 - 12:58 am | रुपी
छान रचना.
फक्त या पंक्तींचा अर्थ बाकी रचनेत संदर्भ मला समजला नाही..
"मी लपंडावात माझे राज्य केले खालसा
मीच पहिली,मीच दुसरी,मीच तिसरी जाहलो!"
20 Jun 2017 - 8:12 am | प्राची अश्विनी
क्या बात!
रुपीनी उल्लेख केलेल्या शेराचा अर्थ मलाही नाही समजला.
21 Jun 2017 - 12:14 am | सत्यजित...
'काफिया' अर्थात गझलेच्या शेरांतील 'यमक' साधणारा शब्द!
उदा.नवीन,दीन,लीन,मलीन ई. काफियांचा विचार केला असता,यांत एक समान स्वरचिन्ह (अलामत),'ई'+ न =ईन असा एकसमान उच्चार होतो आहे! थोडक्यात, काफियांमध्ये केवळ अलामतच यमक साधत असते,ते स्वर-काफिये!
('अ'कारान्त स्वरकाफिया मात्र गझलेत वापरत नाहीत!)
उदा.वरील रचनेतील, वारी,पंक्ती,ओवी ई. काफियांमध्ये, केवळ शेवटचा 'ई' हा स्वरच यमक साधतो आहे!
21 Jun 2017 - 12:22 am | सत्यजित...
धन्यवाद रुपी,प्राची अश्विनी!
रुपी यांनी उल्लेखिलेल्या शेराबद्दल...
गझलेचा प्रत्येक शेर स्वतंत्रपणे वाचला जावा असे अपेक्षित असले तरीही,वरील शेर,ईतर शेरांनी साधलेल्या एका समेस तोडतो आहे असे मलाही वाटलेले! हा शेर या गझलेत देवू नये असाच विचार होता,मात्र गझल पोस्ट करताना,तो खोडायचा राहून गेला!
21 Jun 2017 - 9:24 am | अनन्त्_यात्री
...पुनरागमन, अनेक दिवसा॑च्या प्रतीक्षेन॑तर !
22 Jun 2017 - 6:24 pm | पद्मावति
अतिशय सुरेख!
23 Jun 2017 - 12:41 am | सत्यजित...
मनःपूर्वक धन्यवाद अनंत_यात्रीजी,पद्मावतीजी!
23 Jun 2017 - 7:47 pm | धर्मराजमुटके
प्रत्यक्ष तुका ना मी पाहिला होता ना ऐकला होता
मात्र विष्णुपंत पागनीसांचा 'संत तुकाराम' मी पाहिला होता
'प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर' या वचनाचा अर्थ तेव्हाच मी जाणिला होता
27 Jun 2017 - 11:09 pm | सत्यजित...
धन्यवाद!
28 Jun 2017 - 4:04 pm | जगप्रवासी
सुंदर
2 Jul 2017 - 12:36 am | सत्यजित...
धन्यवाद जगप्रवासी!
1 Jul 2020 - 4:05 am | सत्यजित...
आज आषाढी एकादशी!