मी आज केलेला व्यायाम...!!

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
2 Nov 2016 - 5:16 pm

.

नमस्कार,

गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.

व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.

व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.

आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.

मग... आज किती व्यायाम केला..?

**************************************************************

काही डिस्क्लेमर्स.

१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.

२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.

३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)

**************************************************************

टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)

क्रीडाविचारअनुभव

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2016 - 5:22 pm | टवाळ कार्टा

मी आज १ तास शवासन केले

पक्षी's picture

2 Nov 2016 - 6:02 pm | पक्षी

त्यात काय विशेष ...

मी रोज किमान 10 तास तरी शवासन करतो

केडी's picture

2 Nov 2016 - 5:24 pm | केडी

आज जिम मध्ये लेग वर्कआऊट केले। सध्या सायकल सर्व्हिसिंग ला दिली आहे, सायकलिंग सुरु केले की इथे टाकेन
__/\__
इतरांच्या व्यायाम संबंधी जोरदार नोंदी च्या प्रतीक्षेत. नक्कीच मोटिव्हेशनल ठरेल हा धागा

डॉ श्रीहास's picture

2 Nov 2016 - 5:48 pm | डॉ श्रीहास

`

आठवड्याचे कमीत कमी तीन दिवस (४५ मिनिटे प्रतिदिन) स्विमिंग!!

पाटीलभाऊ's picture

2 Nov 2016 - 5:34 pm | पाटीलभाऊ

मी रोज(वीकांत वगळून) 12 सूर्यनमस्कार, थोडा व्यायाम (जोर बैठका, डीप्स, ऍब्स वगैरे..) आणि अर्धा-पाऊण तास 10-12 प्रकारची योगासने करतो.
सध्या संध्याकाळी धावायला देखील सुरुवात केली आहे.
भारतात परतल्यावर सायकल चालविण्याचाही विचार आहे.

रविवारची सुट्टी सत्कारणी लागली. प्रशांतमालकांसोबत केलेली शहरातील राईड.

.

डॉ श्रीहास's picture

2 Nov 2016 - 5:43 pm | डॉ श्रीहास

चालु द्या जोरात .

तुम्ही इतकं सायकलिंग आवडीने करता त्याचं कौतुक वाटतं.
पुण्यात बर्‍याचदा सकाळच्या वेळी ओळीने आणि नित्यनेमाने सायकल चालवणारे दिसतात. पण सायकलिंगसारखा व्यायाम नियमित करुनही एक विशिष्ट अ‍ॅथलेटिक लूक, म्हणजे बघून ही व्यक्ती निदान काहीतरी व्यायाम करत असावी असं वाटत नाही. बर्‍याच लोकांची सुटलेली पोटं तिंबलेल्या कणकेसारखी कमरेवरुन खाली ओघळण्याच्या बेतात असतात.

इतकं सगळं करुनही शष्प फरक न पडण्यामागे काय कारण असावं?

सायकलिंगसारखा व्यायाम नियमित करुनही एक विशिष्ट अ‍ॅथलेटिक लूक, म्हणजे बघून ही व्यक्ती निदान काहीतरी व्यायाम करत असावी असं वाटत नाही. बर्‍याच लोकांची सुटलेली पोटं तिंबलेल्या कणकेसारखी कमरेवरुन खाली ओघळण्याच्या बेतात असतात.

हे वर्णन तंतोतंत मला लागू पडते. :p

याला अनेक कारणे आहेत. एक म्हणजे सायकल चालवणे हा फक्त लोअर बॉडीचा व्यायाम आहे. वरच्या शरीराला फारसे कष्ट पडत नाहीत. सोबत पळणे, जिम वगैरे गोष्टीही आवश्यक आहेत. (अधिक माहिती तज्ञ लोक देतीलच)

दुसरे म्हणजे खाण्यावर कंट्रोल हवा. तसा अनेक जणांचा नसतो (माझा तर आजिबात नाहीये) त्यामुळे जळालेल्या कॅलरीच्या तुलनेत पोटात भरलेल्या कॅलरी जास्त असतात आणि पोट वगैरे कमी होत नाही.

बाकी फायदा म्हणाल तर सायकलिंग मुळे स्टॅमिना (दमसास) भरपूर वाढतो. सध्याची प्रगती म्हणजे आजिबात न थांबता किमान दोन ते अडीच तास आमच्या स्किलसेटचे बॅडमिंटन सलग खेळू शकतो.

डॉ श्रीहास's picture

2 Nov 2016 - 10:06 pm | डॉ श्रीहास

सायकलींग हा लो इन्टेन्सिटी म्हणजे कमी तीव्रतेचा व्यायाम आहे, पळणे किंवा वेगानी चालणे ह्यांच्या तुलनेचा व्यायाम हवा असेल तर तिप्पट अंतर सायकलींग करावे लागते... त्याशिवाय सायकलींग मध्ये अॅब्स किंवा कोअर स्ट्रेन्थ अत्यावशक आहे कारण कुठल्याही व्यायामप्रकारामधे ताकद निर्माण करणे (पावर जनरेशन) हे पोटाच्या स्नायुंमुळे होतं.... म्हणुनच सीट अप्स, क्रंचेस,प्लॅक्स आणि सूर्यनमस्कार/जोर फारच महत्वाचे ठरतात.

पोट मोठं असण्याचं महत्वाचे कारण म्हणजे पोटाच्य स्नायुंचा टोन कमी असणे, प्रेग्नसीनंतर स्रियांना ह्याचा जास्त त्रास जाणवतो.

डॉ श्रीहास's picture

2 Nov 2016 - 10:24 pm | डॉ श्रीहास

सुटलेली पोटं,अवाढव्य वाढलेली शरीरं अशी लोकं व्यायाम करतांना दिसताहेत म्हणजे चांगली गोष्टच नाही का ?

अॅथलेटीक लुक्सवाले दिसतं असले तर त्यांच्यातील अनेकजण ह्या सुटलेल्या पोटासाठी नियमीत व्यायाम करुन इथपत पोहोचलेले असतात....

माझंच उदाहरण देतो ९० किलोच्या आसपास रेंगाळणारं शरीर घेऊन ४-५ किमी अंतर सायकलींग करणं नकोसं व्हायचं, पण जसं सायकलींग आवडतं गेलं तसं १००+ किमी ४.१० तासात करु शकतोय , २१ किमी ३.३० तासात चालु शकतो... वजन ८७-८८ किलो आहे पण मसल्स टोन्ड झालेत,काॅन्फीडन्स वाढला,पोश्चर सुधारलं....

सुटलेली पोटं,अवाढव्य वाढलेली शरीरं अशी लोकं व्यायाम करतांना दिसताहेत म्हणजे चांगली गोष्टच नाही का ?

अर्थातच चांगलं आहे. मला असा प्रश्न पडला होता की इतकं करुन सगळं जसंच्या तसं कसं काय!! त्याची थोड्या फार प्रमाणात उत्तरं मिळाली आहेत.

डॉ श्रीहास's picture

3 Nov 2016 - 6:19 am | डॉ श्रीहास

वजन कमी करण्यासाठी सायकलींग करणार असाल तर फार अवघड जाईल बरं.... डिप्रेस नाही करणार पण सत्य सांगतो , बरेचदा हे प्रश्न विचारले गेलेत कि वजनासाठी काय करु ? सायकलींग चांगलं की चालणं/पळणं की पोहोणं ?

ह्यावर माझा अनुभव (उत्तर नाही) ; ट्रेडमील घेतलं तर फार महागाचा कपडे वाळत घालायचा स्टॅंड होतो, वर्षभराची मेंबरशिप म्हणजे जिम किंवा स्विमिंगपुल ला दिलेलं डोनेशन !!

मग काय करावं बरं ?
ह्याच उत्तर ( जे मला सापडलयं) असं आहे कि तुम्हाला जे आवडेल , जे झेपेल आणि तुम्ही नियमीत करू शकाल असं काहीही करा मग ते चालणं,पळणं किंवा पोहोणं/ जिमला जाणं असं काहीही असु द्या रोज किमान ५०-५५ मिनीटे सलग आठवड्याला ५ दिवसतरी केलं पाहीजे
.... माझं सायकलींग ही माझी स्ट्रेन्थ आहे (माझी कमजोरीपण) कारण ते मला फार फार चांगल जमतय ( कंपेरींग करू नका कोणाशीसुध्दा अगदी स्वत:शी पण) चालायला पण आवडतं , पोहोण्यापेक्षा डुंबायला आवडेल पण पळायचं म्हणालो तर नकोसा होतो जीव ( नियमीत पळणाऱ्यांबद्दल नितांत आदर आहे मला _/\_ )

चालण्या पळण्यापेक्षा स्विमिंग आणि सायकलींग चा महत्वाचा फायदा असा आहे कि तुमचं वजन जरी जास्त असलं तरी सांध्यावर/ जाॅईन्ट्स वर फारसा भार येत नाही !! पण ह्या गोष्टींसाठी पैसे थोडे जास्त लागतील ( खर्च नाही म्हणायचं , ती गुंतवणुक आहे स्वत:साठी)....

अजून लिहीण्याचा यत्न करणार आहे जसे प्रश्न येतील किंवा काही सुचेल किंवा आठवेल .....

अप्पा जोगळेकर's picture

3 Nov 2016 - 10:52 am | अप्पा जोगळेकर

पोहून वजन वाढते. कारण घाम येत नाही पण दुप्पट भूक लागते.
-दररोज २ किमी पोहणारा एक्स स्विमर

वेल्लाभट's picture

3 Nov 2016 - 12:03 pm | वेल्लाभट

माझ्या अल्पमतिनुसार सांगतो
घाम येणं = वजन कमी होणं असं नाही
पोहताना आलेला घाम तुम्हाला दिसत नसावा इतकंच.
वेट लॉस आणि फॅट लॉस दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
फॅट लॉस चं बघावं, वेट लॉस चं नव्हे. वजन आपोआप रेग्युलेट होतं.
मसल गेन = फॅट लॉस हे ढोबळ समीकरण असतं. तेंव्हा पोहण्याला असं डिसकाउंट करू नका असं म्हणेन.

डॉ श्रीहास's picture

3 Nov 2016 - 12:08 pm | डॉ श्रीहास

२ किमी रोज पोहोता .... नमस्कार घ्या आमचा, खाण्याबद्दल बोलणं हा आमचा प्रांत नाही !!

पोहून वजन वाढते. कारण घाम येत नाही पण दुप्पट भूक लागते.
-दररोज २ किमी पोहणारा एक्स स्विमर

दोन किमी पोहत असाल तर साष्टांगच नमस्कार. मला वाटतं पोहून भूक लागते, पण ती दुप्पट वैगरे नसते. आल्यावर खायला काहीतरी तयार लागतं. त्यावर उपाय म्हणून मी ओट्स आणून ठेवले आहे. फायबर असल्याने, पोट पण भरतं. देशी उपाय हवा असेल तर भाकरी बेस्ट!! भूक लागते हे मान्य पण आपण भूक लागल्यावर काय खातो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. वर म्हणल्याप्रमाणे वाढत्या वजनात मसल्स वेट वाढत असेल तर चांगलंच आहे, फॅट प्रमाणाबाहेर असेल तर काय खातोय ते महत्त्वाचं.

ते दुप्पट भूक बर्‍याचदा सायकॉलॉजिकल असतं. चारचौघांनी सांगितलेलं असतं घाम येत नाही म्हणून दुप्पट भूक लागते. आपण ते ऐकतो, भूक लागली आहे म्हणून खात सुटतो. खाण्याचा स्पीड कमी केला की आपसूक कमी खाल्लं जातं.

अप्पा जोगळेकर's picture

3 Nov 2016 - 5:57 pm | अप्पा जोगळेकर

नाही. चारचैघांनी कशाला सांगायला पाहिजे. खरच लागते भयंकर भूक.
केळी बेस्ट वाटताट. बाकी ते मसल वेट वगैरे ठीक आहे. पण गुडघ्यावर भार वाढणारच ना.

विंजिनेर's picture

5 Nov 2016 - 7:09 am | विंजिनेर

देशी उपाय हवा असेल तर भाकरी बेस्ट!! भूक लागते हे मान्य पण आपण भूक लागल्यावर काय खातो हेही तितकंच महत्त्वाचं असतं.

व्यायाम झाल्यावर ३० मि. आत १५०-२०० कॅलरी पोटात जाणे रिकव्हरीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असते. त्यात सायकलिंग/धावणे असेल तर क्षार (पॉटॅशियम, सोडीयम इ.) जे घामावाटे जातात ते भरून काढणे सुद्धा आवश्यक असते.

अनेक सोपे पर्याय उपल्ब्ध आहेत. विकतचे/घरगूती - ज्याच्या त्याच्या वकूब्/आवडीप्रमाणे
माझे काही लाडके पर्याय खालील प्रमाणे.
०. एखादे फळ + ब्रेड/बेगल + क्रिम चीज लावून
१. मिल्क चॉकोलेट - १-२ टी स्पू मिल्क चॉकॉलेट + १ ग्लास दूध
२. पीनट-बटर (म्हणजे दाण्याचा कूट )-जॅम+१/२ केळे चकत्या करून + २ स्लाईस ब्रेड (पांढरा/ब्राऊन कुठलाही)
३. १ कप दूध+ओटमील+कुठले तरी फळ+ २ चमचे साखर - २ ते ५ मि. शिजवून
४. १ कप ताक+ओटमील शिजवलेले, चवीला आलं किसून, मीठ, वर मिरची, जिरे/मोहोरीची फोडणी
५. "गू" एनर्जी न्युट्रीशन - हे अंमळ महाग असते पण घरगुती पाकृ एकदम सोपी असते आणि १/१० किंमतीत. टाकेन बोर्डावर कधीतरी
अजून आठवले तर टाकतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Nov 2016 - 7:17 am | कैलासवासी सोन्याबापु

कायतरी देशी घाटी सुचवा ना देवा, गावठाणात मिळेल असे पोषण ! ते बेगल अन क्रीमचीज वगैरे थाट आमच्याकडे असण्याची शक्यता बरीच कमी आहे, रिकव्हरी करता एखाद अंडे उकडून खाल्ल्यास कसे?

विंजिनेर's picture

5 Nov 2016 - 7:32 am | विंजिनेर

बेगल सोडून सोडा हो. साधं अमूल चीज स्प्रेड + ब्रेड तर मिळतोच की आपल्याकडे. पर्याय सुचवण्याचा मुख्य उद्देश खाण्यात/तयार करण्यात सहजता आणि झटपटपणा हा होता - म्हणजे कसे की ५-७ मि. तयार करून व्यायामाच्या झो़ळीत टाकलं, व्यायाम झाला की तिथेच पटकन खाल्लं की झालं.

आणि देशी-विदेशी असं काही नसतं - एकास चार या प्रमाणात प्रोटीन-कार्बोहायड्ट्रेट्स असतील आणि साधारण २०० कॅ. मिळतील असा कुठलाही पर्याय चालतो - दूध-भाकरी पासून क्रीम चीज-बेगल पर्यंत काहीही. शिवाय क्षार सुद्धा भरून आले की बोनस. केळं बेस्ट त्या साठी.

फक्त अंड म्हणजे कार्बस मिळणार नाही - ब्रेड्/भाकरी/पोळीबरोबर चालू शकेल

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Nov 2016 - 8:37 am | कैलासवासी सोन्याबापु

ज्जे बात !! लै आभार सर :) रियली अपरिशिएटेड

प्रोटीन साठी व्हे प्रोटीन शेक किंवा प्रोटीन बार खावा. व्यायामानंतर बॉडी कॅटॅबॉलिक स्टेट मधे असते आणि अर्ध्या तासाच्या आत क्वालिटी प्रोटीन शरीरात जाणं अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून व्हे प्रोटीन नाहीच तर मग अंडी, दही, ताक, पीनट बटर, सोयाबिनचं काहीही इत्यादी पर्याय सुचवेन

व्हे प्रोटीन नाहीच तर मग अंडी, दही, ताक, पीनट बटर, सोयाबिनचं काहीही इत्यादी पर्याय सुचवेन बरोबर
एक विशेष सूचना -- ज्यांना व्यायाम वजन कमी करण्यासाठी करायचा आहे त्यांनी व्यायामानंतर फक्त लिंबू सरबत, मसाला घातलेले ताक किंवा तत्सम द्रव पदार्थच घ्यावा. अन्यथा जेवढ्या कॅलरी जाळल्या तेवढ्याच तुम्ही खाण्यातून घेतल्या तर वजन कमी कसे होणार?
ज्यांना व्यायाम शरीर पिळदार करायचे आहे त्यांनी प्रथिनयुक्त आहार घ्यावा यासाठी साधा सोपा आहार म्हणजे १ ग्लास दूध(हवा तर बोर्नव्हिटा/ दुधाचा मसाला घालून) किंवा २ अंडी आणि एक पोळी घ्यावी.
मुद्दाम व्हे प्रोटीन इ महागडे पदार्थ( ४००० रुपये किलो) घेण्याची गरज नाही. अशा गोष्टींचे समर्थन बहुसंख्य व्यायाम मंदिरे, जिमचे इन्स्ट्रक्टर करीत असतात. त्याचा मूळ दुधाच्या प्रथिनापेक्षा "फार जास्त" फायदा होतो असे नाही.
( मुळात चीज बनवताना खाली राहिलेल्या( निरुपयोगी) द्रवातून व्हे प्रोटीन वेगळे काढून त्याची चौपट किमतीने विक्री करणे ही एक विपणनाची ( मार्केटिंग)क्लुप्ती आहे आपल्याला परवडत असेल तर घ्या.
प्राणिजन्य प्रथिन १ ग्राम हे १ ग्राम असते मग ते दुधातून असो कि अंड्यातून व मटण चिकन मधून अथवा व्हे प्रोटीन मधून -- गुणात्मक दृष्ट्या तेवढेच चांगले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2016 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>एक विशेष सूचना -- ज्यांना व्यायाम वजन कमी करण्यासाठी करायचा आहे त्यांनी व्यायामानंतर फक्त लिंबू सरबत, मसाला घातलेले ताक किंवा तत्सम द्रव पदार्थच घ्यावा. अन्यथा जेवढ्या कॅलरी जाळल्या तेवढ्याच तुम्ही खाण्यातून घेतल्या तर वजन कमी कसे होणार?

फिरून आणि खेळून आलो की भूक लागत होती आणि मी भरपेट हादडतोय, थांबवावं लागतं. लिंबूशरबतावर यावं लागतं....! आभारी आहे डॉक्टर साहेब. _/\_

-दिलीप बिरुटे

वेल्लाभट's picture

5 Nov 2016 - 9:27 pm | वेल्लाभट

As you are losing weight, your body loses both muscle and fat. During this process it is especially important that you continue to eat enough protein in your diet. Having adequate protein coming in from your food fuels fat burning while preserving calorie-burning lean muscle.

पण शेवटी डॉक्टर म्हणतील ते 'खरे'

डॉक साहेब, तुम्ही म्हणताय त्यातून तुम्हाला प्रथिने मिळतात, परंतु कमी.
तीन मुद्दे मांडतो, अजून चर्चा करायला आवडेल..
१. ज्याला muscular body बनवायची आहे (बऱ्यापैकी पिळदार)त्याला भरपूर प्रथिने लागतात...
एक प्रमाण bodybulding साठी मानल्या जाते कि तुमच्या वजन जेवढे पौंडस आहे तेवढे ग्रॅम्स प्रथिने खाल्ल्या गेली पाहिजेत... उदा 70kg माणसाचे अंदाजे पौंडस मध्ये वजन = 70x2.2... एवढे ग्रॅम्स प्रथिने
100ml दुधात साधारणपणे 3gm प्रथिने असतात,
1 पूर्ण अंड्यात साधारण 5 गम प्रथिने...
म्हणजे भरपूर प्रथिने घेण्यासाठी खूप प्रमाणात खायला हवे.
तुमचे पोट तेवढे चांगले पाहिजे :)
------------
2.प्रथिन दर्जा:
प्रथिने हे जवळपास 19 अमिनो ऍसिड ने बनलेले असतात..
जेवढे जास्ती प्रकारचे अमिनो ऍसिड तितके चांगला प्रथिन दर्जा...
अमिनो ऍसिड पण 2 प्रकारचे असतात...
1. Essential आणि 2. नॉन essential
आपले शरीर सर्व प्रकारचे अमिनो नाही बनवू शकत..
काही बाहेरून येणे आवश्यक असते...म्हणून त्यांना essential amino ऍसिड म्हणतात(तुम्हाला बाहेरून घ्यावे लागतात)
अंडे हा फार उत्कृष्ट प्रथिने source आहे.
सर्व प्रकारचे nonveg हे चांगले दर्जा चे प्रथिन असतात...
शाकाहारी लोकांना मात्र चांगले प्रथिने घेण्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागतो.
बहुतेक सगळ्या शाकाहारी पदार्थांमध्ये सर्व अमिनो ऍसिडस् एकत्र नसतात.कुठे या प्रकारचे नसतात तर दुसऱ्यात त्या प्रकारचे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ एकत्र करून खाणे फायद्याचे असते (mixture ऑ प्रोटेइन्स डाळ, दूध, ड्राय fruits वगरे)...
दोन्ही case मध्ये खूप प्रथिने साठी खूप जास्ती खावे लागणार..
---–-------------------
3.प्रथिने चा पचन
Whey प्रोटीन शरीरात अतिशय लौकर शोषले जाऊन muscle ना इन्स्टंट पोचवले जातात. म्हणून व्यायाम झाल्यावर आणि सकाळी उठल्या वर लगेच घेतले जातात...

whey protein अतिशय उपयोगी आणि महत्वपूर्ण आहेत...
अर्थात पूर्ण अन्ना पासून पण सर्व काही मिळवता येते पण माझ्यामते त्याला वेळ, कूकिंग चे efforts वगरे भरपूर द्यावे लागेल (माझे मत)

Ps: माझा वैद्यकीय पेशाशी दुरुनही संबंध नाही.
वरची माहिती मी इंटरनेट, जिम instructor, जिम मित्रांशी गप्पांमधून मिळवलेली. मी स्वतः whey घेतो आणि मला फायदा झाला

John McClain's picture

6 Nov 2016 - 10:42 pm | John McClain

धन्यवाद!
250ml दूध मध्ये aprox 9gm प्रथिने असतात आणि जवळपास तेवढ्याच प्रमाणाच्या whey मध्ये (1 scoop आणि 250ml पाणि) यात जवळपास 25 ते 30gm प्रथिने असतात.
म्हणजे कमी जागेत जास्ती प्रथिने बसतायेत.
किंवा तेवढे जास्ती प्रथिने मिळवण्यासाठी जवळजवळ 1 लिटर दूध घ्यावे लागेल.
दुसरी गोष्ट म्हणजे दूध मध्ये 80℅ प्रथिने हे casein असते आणि 20℅ whey... थोडक्यात बोलायचं तर whey हे तुरंत काम करणारे प्रथिन आहे तर casein हे खूप हळू...
अजून एक म्हणजे खूप साऱ्या लोकांना(esp एवढी मोठी मात्रा... आणि सगळ्यांना नाही) दूध पचत नाही (एक तर पॉट खराब होणे किंवा low absorbtion ratio) कारण दूध मध्ये असलेले lactose.
Whey मध्ये तुम्ही lactase(दूध पचायला लागणारे enzyme) घटक असलेले तुम्ही घेऊ शकता.
सामिष आहार मध्ये तुम्हाला भरपूर प्रथिने मिळतात आणि तेही उत्कृष्ट दर्जाचे. पण त्यासोबत इतर हि खिप काही मिळते :)

तुमच्या आणि इतरांसोबत चर्चा साठी उत्सुक आहे.
कारण वैद्यकीय/जीवशास्त्र चा कधी संबंध नाही आला

-डॉक च्या पोष्टिंचा पंखा :)

सुबोध खरे's picture

7 Nov 2016 - 10:33 am | सुबोध खरे

जॉन साहेब
माणसाची प्रथिनांची गरज साधारण १ ग्रॅम / किलोग्रॅम (वजन आहे). म्हणजेच सत्तर किलो वजनाच्या माणसाला ७० ग्राम प्रथिनांची गरज रोज पडते.
एक ग्लास दुधात( १२ रुपये) एक अंडे फोडून( ५ रुपये) तुम्ही प्यायला तर त्याचा खर्च १७ रुपये होईल. यात त्याला १४ ग्रॅम प्रथिने मिळतील. हे दिवसात दोन वेळेस केले तर २८ ग्रॅम प्रथिने मिळतील. त्याच्या बाकीच्या आहारातून त्याला अधिक प्रथिने मिळताच असतात.उदा गव्हात १२ % प्रथिने असतात. म्हणजे १०० ग्राम मध्ये अधिक १२ ग्राम प्रथिने मिळतील. शिवाय जर १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ले( १०-१२ रुपये) तर अधिक २५ ग्रॅम प्रथिने मिळतील.( परवडत असेल तर बदाम खा) एवढाच आहार त्याच्या प्रथिनांची गरज पूर्ण करण्यास पुरेसा आहे.
५० ग्रॅम व्हे प्रोटिन्स आपल्याला २०० रुपयाला पडतात.
आता हनुमान व्यायामशाळेत वर्षाला ५०० रुपये भरून आपण व्यायाम करायचा कि तळवलकर मध्ये रुपये १८,०००/- फक्त हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
माझा डॉक्टर म्हणून सल्ला देण्याच्या मागे एक विशिष्ट हेतू असतो तो म्हणजे घरात असलेल्या सध्या सोप्या वस्तूंचा वापर करून किंवा आपली जीवनशैली फारशी न बदलता जेवढा फायदा मिळवता येईल तितका चांगला. कारण असा सल्ला पाळला जाण्याची शक्यता जास्त असते.
उदा. ९० टक्के लोकांची व्यायामासाठी आणलेली नवी कोरी सायकल ३ महिन्यानंतर धूळ खात पडलेली आणि एक वर्षानंतर गंजून चाललेली दिसते. त्यामुळे मी प्रथम मित्राकडून उधार किंवा सेकंड हॅन्ड सायकल विकत घेऊन व्यायाम चालू करा सांगतो

John McClain's picture

7 Nov 2016 - 10:51 pm | John McClain

सर जी,
साधारण माणसाच्या प्रथिनांची गरज खूप कमी असते.
साधारण 60gm ते 70gm पुरेसे असू शकतात.
त्यातही त्यांच्या दर्जा बद्दल हि एवढ्या कडक constraints नसावेत.
मी कमावलेल्या(bodybuilding) किंवा खूप जास्ती athletic ऍक्टिव्हिटी (जिथे कमी वेळात प्रचंड ताकद लागते जसे NBA बास्केटबॉल किंवा crossfit वगरे)लोकांना लागणाऱ्या प्रथिने जे कि ग्राम प्रति वजन पौंडस मध्ये लागू शकते/आहे त्यासाठी whey खूप फायदेशीर आहे म्हणत होतो.
असो, खूप लेखाच्या मुद्यापासून खूप भटकायला होत आहे वाटतंय...
अमिनो ऍसिडस् बद्दल हि विचारात घ्यायला हवे कि शाकाहारी लोकांच्या (साधारण व्यक्तींच्या नाही) अहराबद्दल
पुढे कुठे विषय निघाल्यास आणखी चर्चा करू :)
धन्यवाद

स्थितप्रज्ञ's picture

10 Nov 2016 - 6:09 am | स्थितप्रज्ञ

स्पॉट ऑन लिहिलेत डॉक्टर.
हल्लीच्या लुटालुटीच्या जमान्यात असा प्रामाणिक सल्ला मिळणे अवघड झाले आहे.
शतशः _/\_

अप्पा जोगळेकर's picture

10 Nov 2016 - 11:49 pm | अप्पा जोगळेकर

डॉक्टर, दुधात अंडे फोडून ते खाणे म्हणजे कच्चेच झाले. असे कच्चे अंडे किती लोकांना पचेल. मला तरी हे पहिलवानाचे अन्न वाटते.
त्यापेक्षा १०० ग्राम मसूर डाळीचे वरण खाणे (यात २९ ग्राम प्रोटीन असते असे वाचले. सत्यता ठाऊक नाही) किंवा तूरडाळीचे वरण खाणे किंवा जास्त मूगडाळ, कमी तांदूळ अशी खिचडी हे जास्त सोपे वाटते. मुख्य म्हणजे हे सामान्य माणसाचे अन्न वाटते. उग्र वासचे कच्चे अंडे किती लोक खातील ?
मसूर डाळ ८५ रुपये किलो म्हणजे ८.५ रुपये १०० ग्राम आहे. तूर डाळ १२३ रुपये किलो म्हणजे (१२.३ रुपये १०० ग्राम आहे). मूगडाळ पण ९० दीतच असेल.
बाकी व्हे प्रोटीन वगैरे एलाईट क्लासचे अन्न आहे हे पटले.

धोणी's picture

11 Nov 2016 - 11:59 am | धोणी

लोल आप्प्पा रोक्स

सुबोध खरे's picture

11 Nov 2016 - 12:13 pm | सुबोध खरे

अगदी बरोबर
परंतु अनेक लोकांचा असा गैरसमज आहे कि "फक्त" प्राणिजन्य प्रोटीन हे चांगले असते. पण जर तुम्ही दोन ग्लास दुध घेत असाल तर अधिक मात्रेत डाळी किंवा शेंगदाणे खाणे हे कमी पैशात जास्त प्रमाणात प्रथिने देणारे आहे.

वेल्लाभट's picture

11 Nov 2016 - 1:03 pm | वेल्लाभट

एग्ग प्रोटीन इज वन ऑफ द हायेस्ट क्वालिटी प्रोटीन्स अव्हेलेबल. इव्हन मोअर दॅन मीट. इसेन्शियल अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्स प्रोफाईलबद्दल काय सांगाल?
शाकाहारातले प्रथिनस्त्रोत निरुपयुक्त आहेत असं नाही, पण प्राणिजन्य (इथे मी अंड्यांबद्दल बोलतो) (त्या खालोखाल मासे, मग पुढे चिकन व सर्वात खाली रेड मीट) प्रथिन हे शाकाहारापेक्षा अधिक उच्च प्रतीचं असतं असं 'मानलं' गेलेलं आहे.

अप्पा जोगळेकर's picture

11 Nov 2016 - 1:49 pm | अप्पा जोगळेकर

हायेस्ट क्वालिटी म्हणजे काय ? म्हणजे ७० ग्राम शाकाहारी प्रोतीन पेक्षा ७० ग्राम मांसाहारी किंवा एग प्रोटीन चांगले असे आहे का ?
माझ्या मते प्रथिनांची उपयुक्तता लक्षात घेताना पचनाची सुलभता आणि इटेबिलिटी (म्हणजे कच्चे अंडे हे उग्र वासामुळे इटेबल नाही माझ्या मते. काही पहिलवान खातात तो वेगळा भाग आहे. ) यांचा विचार केला जावा. उद्या गवत खाणे फायदेशीर आहे असे कळले तर आपण गवत खाऊ शकत नाही.
शिवाय भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात मांस किंवा अंडे दररोज खाणे पचनाच्या द्रूष्टीने किती संयुक्तिक आहे ? हे मी सामान्य माणसाच्या बाबतीत बोलत आहे. पहिल्वान किंवा अ‍ॅथलीटची गरज वेगळी असू शकते.

वेल्लाभट's picture

11 Nov 2016 - 2:31 pm | वेल्लाभट

इटेबिलिटी हा सब्जेक्टिव्ह निकष आहे. कित्येक जण पालेभाज्या उत्तम असून खात नाहीत. डॉक्टरांनी गोड खाऊ नका म्हटलं की ते ईटेबल असूनही टाळतात. लेट्स नॉट गेट इन्टू दॅट.

एक असतं कंप्लीट प्रोटीन. ते म्हणजे काय? A complete protein (or whole protein) is a source of protein that contains an adequate proportion of all nine of the essential amino acids necessary for the dietary needs of humans or other animals.

प्रोटीनची क्वालिटी मोजण्याचे दोन निकष आहेत सर्वसाधारणपणे. एक बायोलॉजिकल व्हॅल्यू व दुसरा Protein Digestibility Corrected Amino Acid Score (PDCAAS). बायोलॉजिकल व्हॅल्यू ची विकी व्याख्या अशी आहे: Biological value (BV) is a measure of the proportion of absorbed protein from a food which becomes incorporated into the proteins of the organism's body. It captures how readily the digested protein can be used in protein synthesis in the cells of the organism. Proteins are the major source of nitrogen in food. BV assumes protein is the only source of nitrogen and measures the proportion of this nitrogen absorbed by the body which is then excreted. The remainder must have been incorporated into the proteins of the organisms body. A ratio of nitrogen incorporated into the body over nitrogen absorbed gives a measure of protein "usability" – the BV.

BV नुसार प्रोटीनच्या क्वालिटीची क्रमवारी अशी:
Eggs (whole) 100
Eggs (whites) 88
Chicken / Turkey 79
Fish 70
Lean Beef 69
Cow's Milk 60
Unpolished Rice 59
Brown Rice 57
White Rice 56
Peanuts 55
Peas 55
Whole Wheat 49
Soy beans 47
Whole-grain Wheat 44
Peanuts 43
Corn 36
Dry Beans 34
White Potato 34
आणि म्हणूनच अंड्यातलं प्रोटीन हे मीटपेक्षाही सरस मानलं गेलंय.

बाकी डॉक्टर त्यांच्या बाजूने खुलासा करतीलच योग्यायोग्यतेचा.

वामन देशमुख's picture

11 Nov 2016 - 2:45 pm | वामन देशमुख

अंडं कच्चं खावं की उकडलेले, आइ मीन, स्नायूवर्धनासाठी अधिक चांगलं कोणतं?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2016 - 5:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उकडलेलं चांगलं चवीष्ट लागतं. कच्चं अंडं माय गॉड.

-दिलीप बिरुटे

पद्मावति's picture

16 Nov 2016 - 11:28 pm | पद्मावति

अंडं दुधात टाकलं आणि जोडीला वनीला इसेन्स टाकला की जरा बरं लागतं. कोणे एके काळी सकाळी मी ग्लास भर थंड दूध, एक केळ, चमचा भर सातुचे पीठ, मध, वॅनिला इसेन्स आणि अंडं असे ब्लेण्डर मधे टाकून शेक प्यायची ब्रेकफास्ट ला. सवय झाली की अजिबात वास येत नाही. अतिशय पौष्टिक ब्रेकफास्ट. पुढचे चार पाच तास भूकही लागत नाही.
पण पुढे मी गरोदर असतांना मला डॉक्टरनी सांगितलं की रॉ गोष्टी खाणे साधारणपणे टाळा. तेव्हापासून रॉ एग बंद झालं ते झालंच.

पद्मावति's picture

5 Nov 2016 - 2:16 pm | पद्मावति

बेगल आणि चीज़, पीनिट बटर म्हणजे खूप जास्ती कार्ब्स आणि फॅट नाही का होणार?
तुम्ही सांगितल्याप्रमाणे अंडं आणि पोळी मस्तं. मी उकडलेलं अंडं बरोबर एखादं लो कार्ब, होल ग्रेन क्रॅकर खाते.

विंजिनेर's picture

5 Nov 2016 - 9:20 pm | विंजिनेर

खूप जास्ती कार्ब्स आणि फॅट नाही का होणार?

आहार केव्हाही व्यायामच्या प्रमाणातच असावा. शिवाय व्यायाम करण्यामागचा उद्देश काय आहे - वजन कमी करणे/फिटनेस वाढवणे (जसे धावणे किंवा बाईक रेसच्या टायमिंग टार्गेट साधणे)/अजून काही हे लक्षात घेणे महत्वाचे असते.

तुम्ही १ किमी रमत गमत चालला (~१५० कॅलरीस) किंवा आयर्नमॅन ट्रायथलॉन पूर्ण केले (१०,०००+ कॅलरीस) त्या प्रमाणात तुम्ही पीनट बटर्/क्रीम चीज खाल्लं तर फरक पडणारच. नाही का? एका बाजूला केवळ चालल्याचा "व्यायाम" केल्यानंतर २०० कॅलरी रिकव्हरी स्नॅक म्ह्णजे व्यायामाचा उपयोग शून्य. दुसर्‍या बाजूला आयर्नमॅन पुर्ण केल्यावर तुम्ही काहीही आणि कितीही खाल्ले तरी तुम्ही कॅलरी डेफिसीटमधेच राहाल.

असो. मी आधीच्या प्रतिसादातच लिहायला हवं होतं. मी वर दिलेला १५०-२०० रिकव्हरी स्नॅकचा हिशोब साधारण ६०० कॅलरी ५० मिनीटात खर्च केल्यानंतर खाण्याबद्दल होता.

विंजीनेर, प्रतिसाद पटला तुमचा. मी खूप लाइट व्यायाम करत असल्यामुळे मला तो आहार खूप जास्ती वाटला होता. पण तुम्ही सांगत्ाय त्याप्रमाणे आहार व्यायामाच्या प्रमाणात असावा.

झेन's picture

3 Nov 2016 - 12:00 pm | झेन

"पळायचं म्हणालो तर नकोसा होतो जीव ( नियमीत पळणाऱ्यांबद्दल नितांत आदर आहे मला _/\_ )" +१०००००० अहो एक सेकंद दचकलो मनातले विचार पण हॅक होतात का काय असं वाटलं

पाटीलभाऊ's picture

2 Nov 2016 - 5:56 pm | पाटीलभाऊ

कधीतरी भविष्यात आपल्यासोबत सायकल राईड करण्याचा योग्य जुळून येवो.

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2016 - 3:02 pm | टवाळ कार्टा

सायकलवरुन जास्तीत जास्त ४८ किमीप्रता या वेगाने जाणे चांगले????

इतका वेग एखाद्या उतारावरच जमतो आणि त्यातही वळणावळणाचे उतार असतील तर वेग आणखी कमी होतो.

डॉ श्रीहास's picture

2 Nov 2016 - 5:42 pm | डॉ श्रीहास

सायकलींगला थोडी विश्रांती आहे सध्या त्यामुळे भरपुर चालतोय सध्या; ८ किमी ताशी ६.२ च्या वेगानी ...
सायकलींग ला वापरले जाणारे स्नायु आणि चालण्या पळण्याचे वेगवेगळे असतात पण ऐकामेकांना पुरक म्हणुन अश्या प्रकारे क्राॅसट्रेनींग चा नक्कीच फायदा दिसतो.

डॉ श्रीहास's picture

2 Nov 2016 - 6:47 pm | डॉ श्रीहास

हे आजचं वाॅकींग..।
..

वामन देशमुख's picture

2 Nov 2016 - 5:49 pm | वामन देशमुख

मी आज सलग आठ किमी चाललो. लागलेला वेळ ७२ मिनिटे.
रोज (आठवड्याला ४-५ वेळा) सरासरी ६ किमी चालतो. सोबत माझा सख्खा मित्र असतो. रोजच्यापेक्षा आज वेगळ्या रस्त्यावर गेलो आणि मग एक दीर्घ वळण घेऊन आलो.

शक्य असेल तर हे सगळे एखादे app वापरून रेकॉर्ड करून ठेवा. महिन्याच्या शेवटी आपण कमावलेली संपत्ती बघून अभिमान वाटतो. :)

वामन देशमुख's picture

5 Nov 2016 - 4:28 pm | वामन देशमुख

हो, नक्कीच करीन.

स्वगतः लवकरच साइकलिंग सुरु करावी म्हणतोय...

देशपांडेमामा's picture

2 Nov 2016 - 6:01 pm | देशपांडेमामा

आज २७ कि.मी. सायकल चालवली

देश

वेल्लाभट's picture

2 Nov 2016 - 6:03 pm | वेल्लाभट

पण माझ्याबाबतच्या उल्लेखातला नियमित जिम हा संदर्भ सध्या अवैध झालेला आहे हे खेदाने नमूद करतो. जिम सुटून काही महिने होऊन गेलेत. प्रापंचिक व्यापामुळे, आणि कार्यालयीन + प्रवासाच्या वेळांमुळे जिमला जाणं होत नाही. घरी जमेल तसा जमेल तितका व्यायाम करतो ज्यात जोर, बैठका, डिप्स, लंजेस इत्यादी फ्रीवेट व्यायामप्रकार होतात. सध्या रोज दोन-एक किमी धावणं दिनचर्येत अंतर्भूत केलेलं आहे. एकूणच नियमित आणि व्यायाम हे दोनही शब्द मला या मिनिटाला लागू होत नाहीयेत. पुन्हा एक दिवस नक्की वेळ मिळायला लागेल असा विश्वास आहे.

तरी, केलेला व्यायाम इथे टाकण्यात येईल. धाग्याला शुभेच्छा.

रोज ५ कीमी भरभर चालणे. २ कीमी पळणे. बाकी इतर वायाम पण करतोच. ४ महिने जिम बंद होती. ढेरी दिसायली थोडीथडी. पळणे वाढवले. गायब झाली. आता जिम चालू कालपासून.
जेवणाकडे दुर्लक्षामुळे वजन मात्र घटायलेय. :( खाणे वाढवले पैजे.

भाऊ.. एखाद्या app वर ट्रॅक करा सगळे.

प्रशांत मालकांना विचारा त्यांचे ऑक्टोबर महिन्यात किती किमी सायकलिंग झाले ते.

अभ्या..'s picture

3 Nov 2016 - 12:41 am | अभ्या..

नको. अ‍ॅप बिप काय नको.
मस्त हेडफोनावर गाणे लावायचे आन पळत सुटायचे.
बॉडी बोलती आपला व्यायाम. ;)
लै झाले की बास कर म्हणती.

प्रशांत's picture

3 Nov 2016 - 10:54 am | प्रशांत

अभ्या दादा तु अस ठरवल का कोणी काहि सांगितले की तस करायच नाहि.
एकदा strava वापरुन बघ. नाहि आवडल त्र तर कड्क काढुन टाकता येते. ;)

अ‍ॅप वापरण्याचे काहि तोटे नाहित रे

पशाभाव, अ‍ॅप गंडॅक्स, सोबत फोन पण गंडॅक्स. :(
आता नवीन फोन घेतल्यावर करु.

प्रशांत's picture

3 Nov 2016 - 10:59 am | प्रशांत

मागच्या महिन्यात ८३२ किमि सायकल चालवली.

मी strava वापरतो.
.

मोदक's picture

3 Nov 2016 - 11:00 am | मोदक

फोटो दिसत नाही.

दाते प्रसाद's picture

3 Nov 2016 - 11:39 am | दाते प्रसाद

मालक, दंडवत स्वीकारा ___/\___

पक्षी's picture

2 Nov 2016 - 6:13 pm | पक्षी

मी नियमित जिम, म्हणजेच कार्डिओ आणि वेट ट्रैनिंग करायचो. पण वर वेल्लाभट ह्यांनी सांगितल्या प्रमाणे प्रापंचिक व्यापामुळे, आणि कार्यालयीन + प्रवासाच्या वेळांमुळे जिमला जाणं होत नाही. तरी घरी कुठल्या प्रकारचा व्यायाम करू शकतो आणि कुठल्या क्रमाने

आज सकाळी ३ मैल म्हणजे ५ कि मी पळालो. साधारण ३० मिनिट्स लागले. वेळ कमी जास्त होताच राहतो . सध्या गुढगा दुखी ने त्रस्त आहे म्हणून जास्त पळत नाही . एरवी दार रविवार १२ ते १५ कि मी पाळतो . मध्ये अधे २१ कि मी चे पाळणे केले आहे . छान वाटते.

एकदा आठवड्यात दोनदा पाळलेली आसलो कि मग खाण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागत नाही .

गेल्या तीन वर्षात ढेरी खालावली आहे . विजेरीचा साईझ पण ४ इंचाने कमी झाला आहे . आणि सगळ्यात मोठे म्हणजे काहीही कारण नसताना उगाचच फुशारकी मारत फिरता येते. "तुम्ही पाळायला जाता" याचे लोकांनाच कौतुक जास्त असते.

असो

आणखीन बढाया नको . येथे खूप सारे पुण्यात्मे आहेत . माझा काय निभाव लागणार बुआ

विदेशी

विजेरीचा = बॅटरीचा/टॉर्चचा

विजारीचा= पँटचा

जौद्याहो सूड भाऊ . कुठे उगाच किस काढत बसता . भावना पोहोचल्या कि नाही तेवढे सांगा . साईझ नेमका कशाचा कमी झाला ह्याचे कोणाला पडले आहे येथे?

विदेशी

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Nov 2016 - 8:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

कठीण आहे आमचे असले धागे वाचून, धागाकरत्याचा तीव्र णिशेड! :( :'(

अमर विश्वास's picture

2 Nov 2016 - 8:57 pm | अमर विश्वास

आजचा व्यायाम

5 किमी पळणे (32 मिनिटे)
अप्पर बॉडी एक्सरसाइस : Circuit ट्रेनिंग : 3 सेट
फुल बॉडी स्ट्रेचिंग

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Nov 2016 - 9:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

सर्किट ट्रेनिंग __/\__

काहीतरी केले पाहिजे. :-(

बादवे, तुम्ही तो फोटो टाकला आहे तो कोणत्या अॅप चा आहे?

स्पोर्ट्स ट्रॅकर नामक अँड्रॉईड अ‍ॅप आहे.

मी तुम्हाला मागे एकदा या सगळ्या अ‍ॅप बद्दल लिहायचे कबुल केले होते ते लक्षात आहे. या आठवड्यात नक्की लिहितो. :)

(स्ट्रावा माझ्या फोन वर क्रॅश होते.)

सत्याचे प्रयोग's picture

2 Nov 2016 - 9:23 pm | सत्याचे प्रयोग

सध्या दिवाळी निमित्त गावी असल्यानी व्यायाम बंद आहे मस्त ७-८ वाजेपर्यंत गोधडीत ताणुन द्यायची.
चाकरीला शहरात आलो की मात्र ६ किमी चालणे, ३० मि. प्राणायाम, थोडंसं वर्क आऊट, कधीतरी वेताळ टेकडी पुणे, असे चालू असते.
आणि थोडे अॅप विषयी
ENDOMONDO (हे अॅपचे नाव आहे) घ्या. जबरा अॅप आहे. तुम्ही जो काही व्यायाम कराल याचे सखोल विश्लेषण मिळते. उदा. किती अंतर पळाला, किती उंच किती खाली. किती कॅलरी खर्च झाली, किती पाणी प्यावे लागेल इ. इ.
आणि तुम्हाला CHALLENGE पण मिळते व्यायामाचे तसेच तुम्हीही CHALLENGE देवू शकता आणि हे सर्व ONLINE एकमेकांना कळू शकते.

John McClain's picture

2 Nov 2016 - 9:44 pm | John McClain

काल लेग day होता...
हेवी (माझ्या परीने ) squats, lunges, curles न presses...
आज सकाळी एक दीड तास नेट प्रॅक्टिस क्रिकेट ची...
आत्ता वातावरण टाईट :)...
Cardio होत नाही राव..
पळणे किंवा सायकल चा वेळ, स्टॅमिना कसा वाढवावा?
खेळताना काही जाणवत नाही पण नुसतं पळणे नाही होत. काही टिप्स? ☺

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Nov 2016 - 10:29 pm | माम्लेदारचा पन्खा

उगाच काहीतरी लांबड लावली आहे ;-)

पाळण्याचा स्टॅमिना वाढवायचा सर्वोत्तम मार्ग
एका आठवड्यात
इंटर्वल ट्रेनिंग :
4+4 मिनिटांचा एक असे चार राउंड (एकूण 32 मिनिटे) : 2 दिवस
लेग्स एक्सररसाइज़ : 2 दिवस
कार्डीयो (45 मिनिट : साइकल / क्रॉस जॉगर) एक दिवस

महत्वाचे :
वॉर्म अप आणि कूल डाउन विसरू नका
स्ट्रेचिंग रोज,,,
दोन दिवस अप्पर बॉडी करू शकता..

असे 4 आठवडे करा .. फरक ज़ाणवेल

प्रशांत's picture

5 Nov 2016 - 9:09 am | प्रशांत

इंटर्वल ट्रेनिंग

???
जरा विस्कटुन सांगा ना

पद्मावति's picture

2 Nov 2016 - 10:36 pm | पद्मावति

मस्तं धागा.
मी आठवड्यात निदान तीन दिवस Elliptical अर्धा तास आणि वेट्स.
पण वेट्स अगदी बेसिक--आर्म्स, शोल्डर्स, बॅक, चेस्ट आणि लेग्स.. तेही खूप कमी वजन आणि रिपेटेशन्स :(
फक्त नियमितता नाहीये मला तो मोठा प्रॉब्लेम आहे. हा धागा वाचून खूप मोटिवेशन मिळेल. धन्यवाद.

अन्नू's picture

2 Nov 2016 - 10:49 pm | अन्नू

मी आठवीपासून रनींगला जाण्याचा प्लॅन आखतोय, पण पुर्ण होत नाही. हफ्ताभर पळतो आणि नंतर लै झोप येतीय म्हणून उद्यावर ढकलतो ते दोन वर्षांनी त्याचा दुसरा मुहूर्त येतो! तसं जीम तर काय?... बघू उद्या परवा जातो! ;)

पद्मावति's picture

2 Nov 2016 - 11:01 pm | पद्मावति

:) खरंय. व्यायामात नियमीतपणा नसणे हा क्लास्सीक प्रॉब्लेम असतो. माझंही होतं बरेच वेळा.
आठवडाभर रोज व्यायाम मग थकून पुढच्या आठवड्यात अजिबात व्यायाम नाही अस होतं बरेच वेळा किंवा उत्साहाच्या भरात एकाच दिवशी सगळ्या बॉडी पार्ट्स साठी वेट्स करायचे आणि मग अंग दुखतय म्हणून पुढचा आठवडा आराम...

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Nov 2016 - 11:08 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त कल्पना! बरीच मंडळी आहेत की सोबतीस म्ह्णजे सातत्य राहिलं!!!

गणपती नवरात्री अन दिवाळी ह्यांमुळे जीम अन एकंदरीत व्यायामाचे चांगलेच बारा वाजलेत. तरी ह्या आठवड्यापासुन कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतोय! साधारण दिवसाला ६५० ते ७०० कॅलरीज जाळण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे जर जीम मध्ये असेल तर क्रॉस ट्रेनर वर आरामात ७०० कॅलरीज बर्न होतात (हा आकडा मशीन दाखवते) तर जॉग करतांना आठेक किमी करावे लागतात.

ह्या आठवड्यात सोमवारी अन आज ८ किमी झालेत चालुन. साधारण ६५ मिनिटे लागतात. आधी एका तासात व्ह्याय्चे बरोबर पण वजन वाढल्याने बरीच अधोगती झालीये.

तरीही प्रयत्न चालुच आहेत!! फक्त रेग्युलॅरीटी आणायचीय. शिवाय सायकलीस सर्व्हीसींगलाही टाकायचेय.

विखि's picture

2 Nov 2016 - 11:16 pm | विखि

घरामधीच किरकोळ व्यायाम शाळा उभारलीत्,त्यात पूल अप्स बार, डीप्स् स्टॅड, गदा( मतकुल), दोरीच्या उड्या, एक डम्बेल एव्ढ आहे, नाईट शीफ्ट ला असल्यामूळ व्यायामाला दुपारचे १२ उजाड्तात :)
आजचा व्यायाम- ३ सेट दोरीच्या उड्या, ६ सेट पूल अप्स, ३ सेट डीप्स, घरी व्यायाम करताना जरा मर्यादा येतात, आहे त्या साधन सामग्री वरच थोडे बदल करतो. लैच हार्ड्कोर व्यायम करायचा झाल्यास उलटे जोर आनी डीप्स मारताना पोराला पाठीवर बसवतो :)

बॅटमॅन's picture

2 Nov 2016 - 11:50 pm | बॅटमॅन

मी कोडिंग केले. :(

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2016 - 12:15 am | टवाळ कार्टा

तो पण वायामच आहे, मेंदूचा आणि बोटांचा =))

टायपिंग करून बोटं शीणली की झालं...!

चित्रगुप्त's picture

3 Nov 2016 - 12:59 am | चित्रगुप्त

आज अर्धा तास सकाळी किरकोळ व्यायाम आणि दुपारी पाऊण तास सायकलस्वारी केली. सध्या सायकलस्वारीसाठी मिळालेला रस्ता खूपच सुंदर जंगलातून वळणावळणाने जाणारा वगैरे फोटोलायक आहे.

अंजनेय's picture

4 Nov 2016 - 6:06 pm | अंजनेय

फोटो टाका ना मग राव