मनाचा एकांत - रवा आणि खसखस

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
2 Sep 2016 - 11:36 pm

रवा आणि खसखस
वेगवेगळे करायची
शिक्षा भोगताना,
सूक्ष्म नजरेने,
एकाग्र चित्ताने,
वेचत राहते मन
जनामनातले साम्यभेद
तासनतास,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

शिवकन्या

कविता माझीकाणकोणमुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

रातराणी's picture

2 Sep 2016 - 11:43 pm | रातराणी

कशाला करायचा वेगळा? चिमण्यांना ठेवायचा खायला ;)

रुपी's picture

2 Sep 2016 - 11:45 pm | रुपी

छान आहे..

माझा एकांत जरा सध्या चांगला जातो यापेक्षा, पण बर्‍याच प्रमाणात हे खरे आहे.

बाकी, रवा आणि खसखस यापेक्षा राजगिरा आणि खसखस वेगळे करण्याची शिक्षा जास्त असे माझे मत ;)

नीलमोहर's picture

3 Sep 2016 - 12:05 pm | नीलमोहर

'राजगिरा आणि खसखस वेगळे करण्याची शिक्षा जास्त'

- त्यात वरई ही असली तर, संपलंच मग,

रातराणी's picture

2 Sep 2016 - 11:45 pm | रातराणी

मुक्तक आवडले हेवेसांनलगे :)

चलत मुसाफिर's picture

3 Sep 2016 - 12:29 am | चलत मुसाफिर

तसेच लाडू केले, साखर मिसळून, तर बरे नाही लागणार का? (एक पाक-अज्ञानी निरागस प्रश्न)

शिव कन्या's picture

3 Sep 2016 - 7:07 am | शिव कन्या

जरुर! स्वागत आहे.
फक्त लाडवात खसखस किती हे शुद्धीवर आल्यावर की विचारु नका!
खोडसाळ स्मायली!

अंतरा आनंद's picture

3 Sep 2016 - 8:21 am | अंतरा आनंद

फारच छान कविता. खरोखर आपण एकटं असताना वागण्यांचे गुंते मनात सोडवत असतो तेव्हा लक्षात येतं की अतिशय सुक्ष्म फरक असतो . :फार पुर्वी 'कगार' म्हणून एक मालिका लागायची. माणसाची परिस्थिती, वेळ या सगळ्याचा परिपां म्हणून घटना घडत असतात. यापैकी काही थोडंही बदललं तर एखादी आधी घटनाही भयानक स्वरूपाच्या अनेक शक्यता पोटात बाळगून असते; या थीमवर आधारीत.

आपलेच विचार काही जनातल्या समजुतींवर तर काही मनाच्या समजुतींवर आधारित असतात. त्यातला फरक ओळखत रहाणं आणि आपलं एखादं वागणं हा कुठल्या विचारांचा परिपाक होता हे समीकरण सोडवण्यात तासन तास जातात.

जव्हेरगंज's picture

3 Sep 2016 - 10:57 am | जव्हेरगंज

शीर्षक फक्त 'रवा आणि खसखस' एव्ढेच पाहीजे होत.

सध्याच्या शीर्षकामुळे शेवटचा पंच हुक्लाय.

तिमा's picture

3 Sep 2016 - 11:06 am | तिमा

एकांतात असताना काय करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एकांतात असताना लोकांचा कशाला विचार करायचा ?
फक्त आपला आणि आपल्या प्रिय व्यक्तिचा करायचा. म्हणजे लाडु आणि त्यातील बेदाणा वेगळा करायला कष्टही होणार नाहीत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Sep 2016 - 12:38 pm | ज्ञानोबाचे पैजार

खवा आणि खरवस
जेवणात एकत्र खायची
मजा लुटताना
बुभुक्षीत नजरेने,
एकाग्र चित्ताने,
वेचत राहतो मी
ताटातला कणन कण
तासनतास,
.
.
.
दुसरं काय असत
हावरटपणा म्हणजे तरी!

भीमपुत्र

पैजारबुवा,

प्रभास's picture

3 Sep 2016 - 1:21 pm | प्रभास

माऊली माऊली... __/\__

पैजारबुवांच्या प्रतिसादांचा पंखा...

पैसा's picture

3 Sep 2016 - 1:22 pm | पैसा

=))

अजया's picture

3 Sep 2016 - 2:10 pm | अजया

=)))

अविनाशकुलकर्णी's picture

3 Sep 2016 - 1:16 pm | अविनाशकुलकर्णी

गुढ...आहे

अभ्या..'s picture

3 Sep 2016 - 1:29 pm | अभ्या..

गूळ आणि खसखस
अकराच्या पटीत मोजायची
शिक्षा भोगताना,
दीनवाण्या नजरेने,
हरवलेल्या वित्ताने,
वेचत राहते मन
लग्नाआधी आणि नंतरचे साम्यभेद
तासनतास,
.
.
.
दुसरं काय असतो
अधिकमास म्हणजे तरी!

अनारसे खाताना (दाताच्या कन्या) करणारा जावई

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Sep 2016 - 2:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

अनारश्या बरोबर चांदीचे ताट नव्हते वाटत?

पैजारबुवा,

प्रभाकर पेठकर's picture

4 Sep 2016 - 11:40 am | प्रभाकर पेठकर

सतत 'जनमनातील साम्यभेद' शोधत राहिल्याने विचारांमध्ये परिपक्वता येते. हाही फायदाच आहे. मग त्याला शिक्षा का माना? शिक्षण मानूया की. (अर्थात शालेय शिक्षण ही सुद्धा एक शिक्षाच वाटायची, हिंदीत उगीच नाही त्याला 'शिक्षा' म्हणत).

छान आहे कविता
किती कमीत कमी शब्द वापरत टोकदार केलेली आहे.