काय, कधी कुठे? - अमेरिका

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in जनातलं, मनातलं
27 Aug 2016 - 6:34 pm

अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं..

तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं.

जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत.

आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली!

किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!

अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल!

धन्यवाद!

देशांतरराहती जागामाहिती

प्रतिक्रिया

जर्सी सिटी आणि न्यूयोर्क ला जाणे अजून जमले नाही पण जेंव्हा जाईन तेंव्हा हा धागा रेफर नक्की करीन.

जेवढे अमेरिकेचे उत्तर भाग माहिती आहेत, तेवढी साउथची माहिती नाही. मी पण टेनेसी ला येताना लोकांनी खूप घाबरवले होते पण एका हिलीबिली गावात ७ वर्ष काढल्यावर साध्या अमेरिकेमधली सुंदरता दिसली.

थोडे अवांतर-- मी विद्यार्थी असताना काही पैसे वाचवायचे मार्ग शोधून काढले आहेत त्याबद्दल थोडे काही (सगळे मार्ग लीगल आहेत, इललीगल पण माहिती आहेत पण कधी वापरले नाहीत.)
१) कुठल्या पण कॉलेज town मध्ये (सिराकृझ, स्टीलवाटर इ.) गेला की युनिव्हर्सिटी च्या साईट वर जाऊन लोकल discount शोधून काढायचे. खूप ठिकाणी प्रत्येक दिवस हा वेगळ्या हॉटेल साठी असतो, उदा.सोमवार- बर्गर किंग, मंगळवार - लोकल बार्बेक्यू असे अजून काही ...खूप ठिकाणी युनिव्हर्सिटी id पण लागत नाही.
२)AAA रोड assistance ची वार्षिक मेंबर बनायचे, कारवाल्यासाठी खूप उत्कृष्ट सेवा आहे. आणि त्या कार्ड वर खूप सारे इतर discounts मिळतात - रेंटल कार, six flags, hotels etc.
३)कार च्या विम्या वर तुमचे रोजचे माईलेज ५ miles पेक्षा कमी असेल तर सवलत मिळते.
४) गुडविल नावाच्या जुन्या वस्तूंच्या दुकानात खूप भारी पुस्तके (लोकांनी देऊन टाकलेली) कमी किमतीत मिळतात, फक्त दर आठवड्याला चक्कर टाकावी लागते.
५) क्रोगर मध्ये पेट्रोल टाकावे, वाल्मार्त मध्ये गाडीचे टायर घ्यावेत, लोकल मेक्यानिक शोधून काढावा. (खूप अवघड आहे ते !)

असे अजून खूप सारे मार्ग आहेत, आत्ता एवढेच आठवत आहेत. माझा फेसबुक वर एक ओपन ग्रुप आहे, त्याची लिंक पोस्टतो आहे, कुक्वील नावाच्या छोट्या गावाच्या आसपासचे मागच्या ५-६ वर्षातील फोटो आहेत, मोस्टली सगळे मोबाईलवर काढलेले आहेत आणि ओपेन ग्रुप असल्याने इतर लोकांचे पण फोटो आहेत. त्यावर टेनेसी मधले मागच्या ५-६ वर्षातील सगळे सिझन तुम्ही एकावेळी अनुभवू शकतात.

टेनसी मधली फोटोग्राफी !

लंबूटांग's picture

31 Aug 2016 - 9:03 pm | लंबूटांग

गुडविल मध्ये बाकीच्याही गोष्टी बर्‍याच स्वस्त मिळतात. मला आत्ताआत्तापर्यंत वाटायचे अश्या लोकांनी वापरलेल्या वस्तू कसल्या वापरायच्या पण अमेरिकेत बरेच लोक उगाचच सेल वर आहे म्हणून गोष्टी घेतात आणि न वापरता डोनेट करून टाकतात. पण तुम्हाला हवी तीच गोष्ट मिळेल असे काही नाही. त्यामुळे दर आठवड्याला चक्कर टाकण्याबाबत सहमत.

टायर्स साठी कॉस्को बेश्ट. पूर्वी माझ्याजवळ कॉस्को नव्हते तेव्हा tirerack नावाच्या वेबसाईट वरून टायर्स मागवून लोकल टायरशॉप मधून mounting and alignment करून जवळ्पास $३०० वाचवले होते. आणि तिथे लोकांनी स्वत:चे अनुभव टाकलेले असतात त्यामुळे तुम्ही स्नो वगैरे साठी चांगले टायर्स घेऊ शकता.

लोकल मॅकॅनिक बद्दल सहमत. मी अगदी काही महिन्यांपूर्वी पर्यंत कार डीलरशीप मध्येच जायचो. आता कारची सगळी वॉरंटी वगैरे संपल्यामुळे म्हटले लोकल ठिकाणी जाऊन बघू. अगदी चांगला अनुभव. अगदीच विश्वास नसेल तर मग midas अथवा monroe मधे गेलात तरीही काहीशे डॉलर्स वाचतात कार डीलरशीप च्या तुलनेत.

सही रे सई's picture

31 Aug 2016 - 10:25 pm | सही रे सई

गुडविल हे दुकान खरच खुप मस्त आणि स्वस्त आहे खरेदी करता. मी अत्तापर्यन्त स्वैपाक्घरातील काही भांडी आणि चहाचे कप आणले आहेत. खूप कमी किमतीत खूप छान वस्तु मिळतात. असं एखादं दुकान भारतात पण असायला हव असं वाटून गेल, जिथ वस्तू दान पण करता येतील आणि कमी किमतीत विकत पण घेता येतील.

आजून इथल्या एका गोष्टीचं मला अप्रुप वाटलं ते म्हणजे लोक सहज घरातलं फर्निचर फुकट लोकांना देऊन जातात. कधी ते घराच्या बाहेर ठेवून जातात तर कधी क्रेगलिस्ट सारख्या साईट्स वर जाहिरात टाकतात.

अंतु बर्वा's picture

12 Sep 2016 - 9:06 pm | अंतु बर्वा

AAA बद्दल सहमत. गुडविलबद्दल ठाउक नव्हतं, इथे आहे का पाहतो.
याव्यतिरिक्त, काही मोजकी चांगला कॅशब्याक देणारी क्रेडिट कार्ड हाताशी असु द्यावीत. बर्याच क्रेडिट कार्ड्सवर २ ते ३ टक्क्यांपर्यंत कॅशब्याक असतो. डिस्कवर, चेस फ्रीडम सारखी कार्डे दर तिमाहीला बदलत्या कॅटेगरीनुसार कधी रेस्टॉरंटमधे तर कधी गॅसवर ५ टक्क्यांपर्यंत कॅशब्याक देतात. पहायला कमी वाटत असले तरी थेंबे थेंबे तळे साचेचा प्रत्यय येतो. इथे क्रेडिट हिस्ट्री इतकी महत्वाची असल्याने उठसुठ क्रेडिट कार्ड काढणे चांगले नसले तरी इनस्टोर लॉयल्टी कार्ड आणी क्रेडिट कार्डात फरक असतो आणी त्याने क्रेडिट हिस्ट्रीला हानी पोहचत नाही हे लक्शात ठेउन इन
स्टोर कार्ड्सना बिचकु नये (काही अपवाद अर्थातच आहेत). तसेच बर्याच स्टोर्स मधे १५ ते २० टक्के डिस्काउंट कुपन तुमच्याकडे नसेल तरी कॅशिअरला ते अप्लाय करायची ओथोरिटी असते, पण आपण विचारल्याशिवाय करत नाहीत. अशा ठिकाणी या डिस्काउंट बद्दल विचारायला लाजु नये. अ‍ॅडिशनली एखाद्या होलसेल क्लबची मेंबरशीप घेउन ठेवावी. बल्क मधे लागणार्या बर्याच गोष्टींमधे चांगला फायदा होतो. बरेच क्लब्स सेकंडरी मेंबर अ‍ॅड करु देत असल्याने जमल्यास एखाद्या मित्रासोबत मेंबर्शीप कॉस्टही शेअर करता येइल.

अभिजीत अवलिया's picture

31 Aug 2016 - 7:27 am | अभिजीत अवलिया

हम्म
इथे ज्यांना नोकर्‍या नाहीत असे अमेरिकन काय करतात? --
काही जणांना सरकार पोसते. जे लोक त्यांच्या क्रायटेरिया मध्ये बसत नाहीत ते भीक मागतात. 'Homeless, Need Help, God Bless You' असा एक बोर्ड बनवायचा आणी फूटपाथ वर सिगारेटी फुकट बसायचे भीक मागत.

अमेरिका म्हणजे स्वर्ग असे अजिबात नाही.
मी सद्ध्या पिट्सबर्ग मध्ये आहे. संध्याकाळी तुम्ही डाउनटाऊन एरियात जाण्याची हिम्मत करू शकणार नाही. कोण कधी तुमच्याकडे काय मागेल ह्याचा नेम नाही. कुणीतरी अचानक आडवा येऊन सिगारेट किंवा लायटर मागू शकतो आणी तुमच्याकडे नसेल तर ह्या क्षुल्लक कारणासाठी जवळचे जे काही हत्यार असेल ते बाहेर काढून काहीही करू शकतो. भारतात असे होण्याची शक्यता खूप कमी, जवळपास नाहीच.

पिलीयन रायडर's picture

31 Aug 2016 - 6:39 pm | पिलीयन रायडर

हो मी म्हणलं ना.. अमेरिकेत मजा असते ही अफवा आहे. भारतात खुप सोप्प्या आहेत गोष्टी.

तुम्ही रस्त्यावरची गुंडागर्दी सांगताय. मी जिथे रहाते ती मोठी सोसायटी आहे. एकांना घरात पुरळ उठाण्याचा त्रास होऊ लागला तर पेस्ट केंट्रोल करायला मॅनेजमेंटचे लोक आले. एक स्प्रे मारला थोडासा. बिल ८५०$!!

त्यांनी जाऊन खुप बोलायचा प्रयत्न केला. पण काही फरक पडला नाही. शेवटी २ दिवसात बिल नाही भरलं तर वकिलाकडे केस जाईल अशी धमकी आली. भरले पैसे गुपचुप..

आपल्याकडेही विचित्र प्रकार होता. फ्रस्ट्रेट होतोच भारतातही.. पण मला तिथलं सगळं माहिती आहे. इथे मला काहीच माहिती नाही. आपण इथले नागरिकही नाही.

अमेरिकेत असतील काही गोष्टी अत्यंत भारी.. तरीही आपला देश तो आपला देश रे बाबा...

राघवेंद्र's picture

31 Aug 2016 - 6:54 pm | राघवेंद्र

पिरातै, इथे म्हण आहे की "अमेरिका चालू होते पेनसिल्व्हानिया राज्यापासून" न्यू यॉर्क सिटी, न्यू जर्सी ही खरी अमेरिका नाही.
बाकी लवकर कार शिका आणि जर्सी सिटी तुन बाहेर या.

पिलीयन रायडर's picture

31 Aug 2016 - 7:22 pm | पिलीयन रायडर

कार फोबिया संपला की ते ही करणारच! बाकी रेवाक्काही हेच म्हणली होती, की तू रहातेस ती काही खरी अमेरिका नाहीच! कार न येणार्‍यांसाठी बरीये खोटी अमेरिका =))

स्रुजा's picture

31 Aug 2016 - 8:57 pm | स्रुजा

लोल..

इथे कार चालवायला काही ही कष्ट लागत नाहीत असं माझं मत झालंय. खरे स्किल्स मॅन्युअल कार चालवायला लागतात. एक त्रास होतो, तो म्हणजे रुल्स अक्षरशः घोटावे लागतात. पण ते एकदा घोटले की गाडी रस्त्यावरुन चालवण्याइतकं सोपं काम नाही. सगळा विचार त्यांनी करुन च ठेवलाय , आपण आपलं डोकं न चालवता फक्त तो फॉलो करायचा. सर्वसामान्य संकेत फॉलो करायचे की झालं. बाकी कार चालवायला ना बॅलन्स सांभाळावा लागतो ना क्लच - गीअर ची कसरत करावी लागते. त्

अनन्त अवधुत's picture

31 Aug 2016 - 11:08 pm | अनन्त अवधुत

ज्याच्या बायकोला गाडी येते तो सुखी नवरा. त्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी गाडी हाकावी लागत नाही. तिला किंवा बाळाला कुठे जायचे म्हणून ऑफिस सोडून यावे लागत नाही.
तिला पण हवी तशी गाडी चालवायला मिळते.
एकदा नियम पक्के लक्षात आले कि गाडी चालवणे सोपे आहे.

पद्मावति's picture

31 Aug 2016 - 8:17 pm | पद्मावति

न्यू यॉर्क सिटी, न्यू जर्सी ही खरी अमेरिका नाही.

+१००

मी तर जिथे जिथे राहिलोय...तीथे पेस्ट केंट्रोल आणि बाकि मेंटेनंस कम्युनिटि मॅनेजमेंटचे लोक करतात,,,

अनन्त अवधुत's picture

31 Aug 2016 - 11:10 pm | अनन्त अवधुत

माझा पण हाच अनुभव आहे.

पिवळा डांबिस's picture

31 Aug 2016 - 11:57 pm | पिवळा डांबिस

जर तुम्ही अपार्ट्मेंट भाड्याने घेतलेलं असेल तर पेस्ट कंट्रोल मॅनेजमेंट किंवा घरमालक करतो. जर तुमच्या मालकीचं असेल्,तर जरी अपार्टमेंट/ कॉन्डो असेल तरी पेस्ट कंट्रोल तुम्हाला कराव लागतं.
प्रायव्हेटली करून घ्यायचं असलं तरी बहुतेक पेस्ट कंट्रोलवाले आधी येऊन पहाणी करून खर्चाचं एस्टिमेट देतात. ते फुकट असतं. असे दोन-चार पेस्टवाले बोलावून मग त्यातला पसंत असेल/ परवडेल अशा एजन्सीकडून ते काम करून घ्यायचं असतं. एस्टिमेट असल्याने खर्चाचा आगवू अंदाज असतो. एकदम भरमसाठ बिल आलं असं सहसा होत नाही. त्यामुळे वर दिलेली घटना अविश्वसनीय जरी नसली तरी स्ट्रेन्ज वाटते आहे.
प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धती असतात. त्या अनुभवाने किंवा दुसर्‍याना सतत विचारून माहिती मिळवून आत्मसात करता येतात. त्यादृष्टीने हा धागा चांगला आहे.
बाकी एक नोकरी, जुनी का होईना एक धडकी कार, मेडिकल इनशुरन्स, आणि हो, एक सुगरण विंडियण बायको असेल तर अमेरिकेसारखं सुख नाही!!! :)

टिवटिव's picture

1 Sep 2016 - 12:45 am | टिवटिव

चोक्कस...

पिलीयन रायडर's picture

1 Sep 2016 - 12:46 am | पिलीयन रायडर

मग कोणता मेडिकल इन्शुरन्स घ्यावा, त्यात काय पहावं वगैरे सांगा की! इथे लई दणके बसु लागलेत!

टिवटिव's picture

1 Sep 2016 - 12:53 am | टिवटिव

एम्प्लोयर जो देत असेल तो घ्यावा...आणि डॉ इन नेटवर्क असेल ते पहावे. बाकि मुलाच्या सोनोग्राफिचे ३०० मीहि भरलेत :प

अभिजीत अवलिया's picture

1 Sep 2016 - 12:53 am | अभिजीत अवलिया

अमेरिकेसारखं सुख नाही!!!
--- असहमत. भूतान हा एक दुर्लक्षित गरीब देश जगातील सर्वात सुखी देश म्हणून ओळखला जातो.

भूतानचे कौतुक सांगत बसला तर 100 प्रतिसाद सोडा, सहमत म्हणायला पण कोण येणार नाही.

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 10:46 am | संदीप डांगे

+१०००

अभिजीत अवलिया's picture

1 Sep 2016 - 6:43 pm | अभिजीत अवलिया

भूतानला जायचे खूप डोक्यात बसलेय. जायलाच हवे आता एकदा का हा देश जगातला सर्वात सुखी देश आहे ते बघायला ...

पिवळा डांबिस's picture

2 Sep 2016 - 8:25 am | पिवळा डांबिस

भूतान हा एक दुर्लक्षित गरीब देश जगातील सर्वात सुखी देश म्हणून ओळखला जातो.

चला, आपण सगळे मिळून भूतानमध्येच जाऊन स्थायिक होऊयात!!!
:)

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 9:09 am | संदीप डांगे

तुम्हाला ना कुण्णाचं सुख रुचत नै बघा... आपणे सगळे तिकडे गेल्यावर सर्वात सुखी राहिल का तो? =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Aug 2016 - 9:20 pm | कैलासवासी सोन्याबापु

अमेरिकेत देशांतर्गत प्रवास करण्यासंबंधी प्रश्न इथे विचारले तर चालतील का?

बहुगुणी's picture

31 Aug 2016 - 9:22 pm | बहुगुणी

खूप जण सहर्ष मदत करतील.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Aug 2016 - 9:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

ओके. मग मला एक सांगा, लॉस एंजलीस ते फ्रीमॉंट किती अंतर असेल? बाय रोड कसे कसे जायला लागेल, कार विथ ड्रायव्हर रेण्ट केल्यास काय दर पडेल?आपल्याकडे असतात तसेच अमेरिकेत असतात का दर? म्हणजे पर किमी फिक्स दर + ड्रायव्हर भत्ता त्यात दिवसाला अमुक किमी झाले पाहिजेत वगैरे, येणार पाहुणा अमेरिकन licence बाळगत नाही म्हणून तो ड्राईव्ह करू शकणार नाहीये, ज्यांच्याकडे जातोय त्यांना सरप्राईज द्यायचे आहे, म्हणून त्यांना एअरपोर्ट वर बोलावू शकत नाही, अश्या कंडिशन आहेत.

राघवेंद्र's picture

31 Aug 2016 - 9:35 pm | राघवेंद्र

ही चायनीज कंपनी स्वस्तात बस सेवा पुरवते.
http://www.gotobus.com/fremont-to-los-angeles-bus/

तसेच उबेर हा चांगला पर्याय लोकल टॅक्सी साठी आहे.

नाटक्या's picture

1 Sep 2016 - 2:43 am | नाटक्या

फ्रिमाँटला पोहोचायला लॉस एंजलेस पासून साधारण्तः ६ तास लागावेत. मी फ्रिमाँट्मध्येच रहातो..

- नाटक्या

बहुगुणी's picture

31 Aug 2016 - 10:22 pm | बहुगुणी

हे फ्रीमाँट बे एरिया कॅलिफोर्निया मधलं आहे असं धरून चालतो आहे. (याच नावाचं छोटं गाव एक तर कॅलिफोर्नियात उत्तरेला योलो काऊंटीत नाही तर नेब्रास्का राज्यात आहे.)

ओके. मग मला एक सांगा, लॉस एंजलीस ते फ्रीमॉंट किती अंतर असेल?
३६० मैल, या अंतरासाठी साधारण साडे सहा तास लागतील ट्रॅफिक सुरळीत असेल तर.

बाय रोड कसे कसे जायला लागेल?
हा नकाशा पहा.

कार विथ ड्रायव्हर रेण्ट केल्यास काय दर पडेल?

ह्म्म! अमेरिकेत ही चैन परवडणारी नाही हो! इथे फारतर दारू पिऊन विमान उडालेल्या लोकांना बदली ड्रायव्हर देऊन ५०-१०० मैलांवर घरी पोहोचवणार्‍या कंपन्या आहेत. आणि अशा महागड्या सेवा मिळवण्यापेक्षा लॉस एंजेलिस ते सॅन होजे विमान (पुढे टॅक्सी ने फ्रीमाँट) परवडेल; अंदाजे १००-३०० डॉलर्स खर्च येईल आणि साडेतीन तास लागतील.

आपल्याकडे असतात तसेच अमेरिकेत असतात का दर?

उत्तर गैरलागू आहे कारण तुमचे परिचित ड्राईव्ह करणार नाही आहेत, तरीही तुम्ही स्वतः चालक असाल तर गाडी भाड्याने घेण्याचे दर साधारण $५० दिवसाला (इंन्शुअरंस सह) पडतो, पेट्रोल वेगळे (हा खर्च या अंतरासाठी साधारण $१०० तरी येईल).

ज्यांच्याकडे जातोय त्यांना सरप्राईज द्यायचे आहे, म्हणून त्यांना एअरपोर्ट वर बोलावू शकत नाही

मला वाटतं विमान प्रवास हाच कमी वेळाचा, कमी खर्चाचा मार्ग ठरेल (LAX-San Jose by flight San Jose-Fremont Taxi), खर्च अंदाजे $२५० च्या आसपास यावा.

दुसरा थोडा आधिक वेळ खाणारा (८-एक तास) मार्ग म्हणजे लॉस एंजेलिस विमानतळापासून युनियन स्टेशन वर शटल ने जावं ($२०), आणि तिथून आधी पॅसिफिक सर्फलाईनर या ट्रेन ने सॅन लुईस ओबिस्पो इथे आणि मग तिथून एका छोट्या बस कनेक्शन नंतर कॅपिटॉल कॉरिडॉर या ट्रेन ने सॅन होजे ट्रेन स्टेशन पर्यंत जावं (अंदाजे $१०० लवकर अ‍ॅड्व्हान्स बुकिंग केलं तर, यात मधलं बस कनेक्शन अंतर्भूत आहे). शेवटी फ्रीमाँट पर्यंत टॅक्सी ($७५!)

ग्रे हाऊंड बसने जाणं हाही एक मार्ग आहे, पण १० तास लागतील, अंदाजे $७५ सॅन होजे पर्यंत, तिथून पुढे टॅक्सी ने $७५.

राईडशेअर हा आणखी एक मार्ग आहे, पण सहप्रवासी कोण आहेत आणि वाहन कसं आहे, इंन्शुअरन्स कव्हरेज काय असेल या सगळ्या unknown गोष्टी आहेत.

तात्पर्यः विमान + घरापर्यंत टॅक्सी हा पर्याय सोपा ठरावा.

आणि एकः कुणी सांगावं, हे परिचित ज्या दिवशी लॉस एंजेलिसला पोहोचतील त्या दिवशी कुणी सहृदय मिपाकर तिथून बे एरियात जाणार असतील तर सहप्रवासाची सोय होऊ शकेल, तेंव्हा याच धाग्यात चौकशी करायला हरकत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Aug 2016 - 10:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

आपला अत्यंत आभारी आहे सर, संबंधितांस आपला हा जिव्हाळ्याचा अन अत्यंत उपयोगी सल्ला लवकरात लवकर पोचता करतो :), राघवभाऊ आपला ही आभारी आहे हो मी _/\_

सुबोध खरे's picture

1 Sep 2016 - 12:15 am | सुबोध खरे

अमेरिकेत भारतीय आभिजात संगीताचे कार्यक्रम करणारी संस्था आहे तालसाधना.
http://googleweblight.com/?lite_url=http://www.taalsadhana.com/contact-u...
सप्टेंबर मध्ये पं.जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन आहे.

पिलीयन रायडर's picture

1 Sep 2016 - 12:19 am | पिलीयन रायडर

न्यु यॉर्क आणि जर्सी ही खरी अमेरिका नाहीच असं म्हणणार्‍यांनो.. इथल्या अमेरिकन माणसांचेही हेच मत दिसते! एक अमेरिकन माणुस अबीरसोबत बस मध्ये गप्पा मारत बसला होता. तो ही त्याला हेच सांगत होता की "ही" अमेरिका काही छान नाही.. तू दुसरीकडे जा! ती फार छान अमेरिका आहे! (म्हणजे कुठे जा ते काही कळाले नाही..!)

तर आमच्यासारख्या ह्याच भागात सध्यातरी अडकलेल्यांना जरा सांगाल का की ठराविक टुरिस्ट प्लेस सोडुन आवर्जुन अमेरिकेत काय पहावे. त्यासाठी कार लागणार असेल तर मित्रमंडळी जमवता येतील. कदाचित आमचंच लायसन्स येईलही.. आणि इथे आहोतच तर चुकवु नयेत अशा जागा असतील तर जमवु काही पण..

की तुम्ही लोक इथे लॉन्ग टर्म रहाण्याच्या दृष्टीने म्हणत आहात? की सिटीतले आयुष्य, मेट्रो वगैरे काही खरी अमेरिका नाही.. अमेरिकन माणसाचे खरे आयुष्य पहायचे असेल, अनुभवायचे असेल तर सिटी बाहेर पडावे लागेल.. असे काही?

पिवळा डांबिस's picture

1 Sep 2016 - 12:35 am | पिवळा डांबिस

वणवे बघायचे असतील तर दक्षिण कॅलिफोर्निया बेष्ट!
पूर बघायचे असतील तर मग ह्यूस्टन टेक्सासला जायचं!
गोळीबार वगैरे बघायचा असल्यास डायरेक शिकागो!!
सौथिंडियात रहायचा फील घ्यायचा असेल तर बे एरिया आहेच!!
आणि माणसांचाच जर कंटाळा आला सेल तर मग मोन्टानाला पर्याय नाही!!!
:)

पिलीयन रायडर's picture

1 Sep 2016 - 12:45 am | पिलीयन रायडर

=))

आणि अमेरिकेत अजुन पोहचलोच नाही, अजुन भारतातच आहोत असं वाटुन घ्यायचं असेल तर जर्सी सिटी मध्ये!!

पद्मावति's picture

1 Sep 2016 - 12:59 am | पद्मावति

=)) +१

पिवळा डांबिस's picture

1 Sep 2016 - 12:59 am | पिवळा डांबिस

विशेषतः न्यूजॉयशीतल्या इंडियन भाजी स्टोअरमध्ये तोंडली वगैरे विकत घेतांना त्या म्हातारपणाकडे झुकलेल्या गुजराथी बायका दोन्ही कोपरांनी आपल्याला दूर ढकलतात त्या संस्कृतीला तर तोड नाही!! :)

राघवेंद्र's picture

1 Sep 2016 - 1:18 am | राघवेंद्र

पिडा काका लय भारी निरीक्षण!!!
कार भाड्याने केली की सध्या स्वामीनारायण मंदिर, रॉबिन्सविले बघायला नक्की या.

पण एक आहे हं आपल्या लोकांसाठी nj स्वर्ग से सुंदर आहे :)
काय ती तोंडली, काय ती गवार, इडल्या म्हणू नका, करंज्या म्हणू नका, पटेल म्हणू नका, पतिदार म्हणू नका...दुर्गा टेम्पल, साई टेम्पल, होळी, दिवाळी, दांडिया, गणपती...घरात फोडणी केली आणि कढीपत्ता आणायला पाच मिनिटात इंडियन स्टोर मधे जाउन येणे, घरापासून 10 मिनिटे ड्राइविंग रेडियस मधे सात आठ ग्रोसरी स्टोर्स, चार देवळे आणि असंख्य इंडियन रेस्टोरेंट्स हे फक्त आणि फक्त nj मधेच... :)

राघव म्हणताहेत त्याप्रमाणे स्वामी नारायण ला जाऊन येणे. अजुन अर्धं बांधून झालंय पण तरीही खूप सुंदर आहे. तो रॉबिन्सविल, प्लेन्सबॉरो, वेस्ट विंड्सर भाग आता एडिसन होत चाललाय. सगळं मिळतं तिथे.

लॉस एंजेलेस मध्यवर्ती ठेउन कॅलीफोर्नियात बघण्यासारखी ठीकाणे.
युनीवर्सल स्टूडिओ
डीस्ने लँड
वॉटर वर्ल्ड (सॅन दीएगो)
सॅन फ्रान्सीस्को
वेगास
ग्रँड कॅनियन
योशमाइट, रेडवूड फॉरेस्ट, मीरवूड फॉरेस्ट
लेक टाहो - स्वप्नवत
फक्त मोठे लोक -डेथ व्हॅली
अजून आठवतील तशी सांगतो.
हे सर्व करण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हींगची आवड पाहीजे कींवा सतत चार चार तास गाडी चालवण्याची तयारी पाहीजे. भाड्याची गाडी घ्या. अगदी नवीन गाडी मिळते. तुम्ही भारतात गाडी चालवली असेल तर इकडे गाडी चालवणे म्हणजे प्लेजर.

खटपट्या's picture

1 Sep 2016 - 1:31 am | खटपट्या

न्यू जर्सीमधून जवळ ठीकाणे.
स्टॅच्यू ओफ लीबर्टी
टाइम स्क्वेअर
समोरच मादाम तुसाद
बाजुलाच रेपलीज बीलीव्ह ऑर नॉट
एम्पायर स्टेट बील्डींग
सेंट्रल पार्क
जरनल स्क्वेअर ठेसनातून पाथ घेउन ३३र्ड स्ट्रीटला उतरा. बाहेर आलात की १५ मिनीटावर चालत टाइम स्क्वेअर आहे. एम्पायर स्टेट बील्डींगच्या खाली बरेच लोक न्यु योर्क दर्शन बसचे ब्रोशर घेउन उभे असतात त्यांच्या कडून ब्रोशर घेउन कधी काय बघायचे ते ठरवा..बसची ट्रीप घेउ नका. ते खूप वरवर दाखवतात.

सुबोध खरे's picture

1 Sep 2016 - 12:19 am | सुबोध खरे

https://www.facebook.com/events/280627885613577/?ti=as 4 सप्टेंबर ला हा कार्यक्रम आहे.

पिरा, जरा शांत बसलीस तरी आम्ही उपाय सुचवू शकू. ;)

राघवेंद्र's picture

1 Sep 2016 - 1:25 am | राघवेंद्र

पुढच्या आठवड्यात शाळा सुरु होत आहे तेंव्हा व्यस्त होतील.

पिलीयन रायडर's picture

1 Sep 2016 - 1:37 am | पिलीयन रायडर

हात शिवशिवत आहेत ग तोंडली आणि गवार वगैरे वाचुन! पण तू म्हणतेस तर ३.५ मिनिटं नाही देणार प्रतिसाद!

आणि "उपाय" काय??? =)) (सवय झाली रेवाक्काला आता मला सतत उपाय सुचवत रहाण्याची!!)

आनन्दिता's picture

1 Sep 2016 - 2:01 am | आनन्दिता

लोल :)

chetanlakhs's picture

1 Sep 2016 - 1:28 am | chetanlakhs

You can easily get NJ driving license using your Indian DL. Just go to Bayonne, NJ DMV (Bayonne is a small town next to Jersey City). If you have valid Indian DL, you just need to pass the written exam and they waive off your road test. Once you get any American DL, you are free to drive across America.

साध्या दुखण्यांसाठी किंवा जुन्या दुखण्याच्या दीर्घकालीन औषधांसाठी (maintenance medications for chronic illnesses) इंन्शुरंस ची मदत न घेता स्वतःच रोख पैसे देणं हे बरेचदा स्वस्त पडू शकतं.

तुमच्या राज्यात Direct Primary care Practice कुठे आहेत ते शोधून, तसंच कॅश-ओनली फार्मसीज, किंवा औषधं विकत घेण्याआधी तुलनात्मक शोध घेऊनही पैसे वाचवता येतात.

उदाहरणार्थ, न्यू जर्सी राज्यात फेअरफील्ड इथे कंटिन्युअम केअर हे वैद्यकीय सेवा केंद्र महिना १८० डॉलर्स अशा सभासदत्वामध्ये तिघांच्या साधारण आरोग्याची काळजी घेते असं वरील दुव्यावरून दिसतं.

Direct Primary care practitioner चा माझा वैयक्तिक दोन राज्यांमधला अनुभव चांगला आहे, हे डॉक्टर्स भारतातील जुन्या जनरल फिजिशियन सारखे वाटले, अनावश्यक टेस्ट्स टाळणारे आणि रास्त खर्चातच आधुनिक टेस्ट्स करणारे.

पिलीयन रायडर's picture

1 Sep 2016 - 8:18 pm | पिलीयन रायडर

राघव८२ ह्यांनी वर सांगितल्या प्रमाणे

सार्वजनिक गणेश उत्सव या वर्षी एडिसन मध्ये नसुन तो जर्सी सिटी मध्ये आहे.
स्थळ : 792 Newark Avenue, Jersey City, NJ 07306
तारीख : ५ -११ सप्टेंबर, २०१६ सकाळी १० ते रात्री १० वाजता
संदर्भ :http://www.oaktreeroad.us/edison-news-corner.html

ह्याला कुणी मिपाकर येणार आहेत का? असतील तर एक कट्टा होऊ शकतो. १०-११ च्या वीकांताला भेटता येईल. मी जवळच रहात असल्याने येऊ शकते. शिवाय इंडीयन स्ट्रीट जवळच असल्याने खादाडी सुद्धा होईलच. कुटूंबवत्सल लोकांचा आठवड्याचा बाजार होऊ शकतो!! हे ठिकाण पाथने येण्यासारखे आहे.

चित्रगुप्त's picture

2 Sep 2016 - 2:55 am | चित्रगुप्त

अगदी नवीन किंवा डोनेट केलेले उत्कृष्ट दर्जाचे फर्निचर आणि अन्य घरगुती वस्तु अल्प किमतीत मिळवण्यासाठी अमेरिकेतील अनेक शहरात असलेल्या ' हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी रिस्टोअर' च्या केंन्द्राला भेट द्या. आपल्या एरियातील केंद्र खालील दुव्यावरून हुडकू शकता:
http://www.habitat.org/restores

.
.
.

श्रीरंग_जोशी's picture

2 Sep 2016 - 8:57 am | श्रीरंग_जोशी

सक्रीय मिपाकरांच्या संख्येच्या बाबतीत भारतानंतर दुसरा क्रमांक असलेल्या अमेरिकेला मिपावर एवढा वाव मिळाल्याचे मी प्रथमच अनुभवतो आहे. याकरिता धागाकर्तीचे कितीही आभार मानले तरी ते कमीच.

मिनेसोटातल्या ट्विन सिटीजमधल्या मराठी मंडळींशी संबंधीत आगामी घडामोडी.

श्रीरंग_जोशी's picture

2 Sep 2016 - 9:00 am | श्रीरंग_जोशी

या धाग्याला भेट देणार्‍यांना खालील दुवे उपयुक्त वाटू शकतात.

पिलीयन रायडर's picture

12 Sep 2016 - 7:19 pm | पिलीयन रायडर

Ganpati

राघवेंद्र's picture

12 Sep 2016 - 7:22 pm | राघवेंद्र

आज विचारणारच होतो.

राघवेंद्र's picture

12 Sep 2016 - 7:25 pm | राघवेंद्र

edison

पिलीयन रायडर's picture

12 Sep 2016 - 7:28 pm | पिलीयन रायडर

अहा! ही पण मुर्ती खुपच मोठी आहे!!

माझ्या अपेक्षेपेक्षा खुपच जोरात झाला हो गणेशोत्सव! प्रसादाचा शिरा तर फारच अहाहा होता! =))

राघवेंद्र's picture

12 Sep 2016 - 7:33 pm | राघवेंद्र

सप्टेंबर १८ ला सुमा फूड्स ने गणपती विसर्जन Johnson Park, Grove 4, Piscataway, NJ इथे आयोजित केले आहे. अधिक माहिती व तिकिटासाठी http://www.sumafoods.com/ इथे संपर्क साधा.

अमेरिकेत पाहण्यासारख्या / चुकवू नये अशा गोष्टी मध्ये नॅशनल पार्क येतील. उदा. योसेमिटी , ग्रँड कॅनियन , यलोस्टोन, आर्चेस, ब्रायस, झायन. त्याव्यतिरिक्त सांता फे, न्यू ऑर्लीयन्स सारखी काही स्वताचे वेगळेपण जपणारी शहरे आहेत. बाकी अमेरिकेत जे टुरिस्ट स्पॉट आहेत तसे जगभर अनेक ठिकाणी आहेत.

पिलीयन रायडर's picture

21 Sep 2016 - 11:36 pm | पिलीयन रायडर

अमेरिकेतल्या लोकांनो.. एक मदत कराल का?

नवर्‍याला कुठेही जायला सध्या सुट्टीच मिळत नाहीये. मिळेल ती आता ख्रिसमस - न्यु इयर ह्याच आठवड्यात. तर फिरायला जाण्यासाठी ह्या काळात सर्वात चांगला पर्याय कोणता? मला क्रुझ काय प्रकार असतो ते ही एकदा बघायचे होते. कुणाला अनुभव आहे का?

सोबत अबीर असल्याने वेस्ट कोस्टला गेलो तरी वेगसमध्ये कसे जमवावे हा प्रश्न आहे. पण वेस्ट कोस्टही बघायची इच्छा आहे.

तर काय करावे?

पद्मावति's picture

22 Sep 2016 - 12:04 am | पद्मावति

पिरा, वेस्ट कोस्ट मस्तं आहेच पण अजुन एक ऑप्षन म्हणजे कॅरिबियन आइलॅंड्स ला जा. बहामा आणि प्यूरिटो रीको सगळ्यात जवळचे पर्याय आहेत.
बहामा ला मी कधीही गेली नाहीये पण पोर्टो रीको ला आम्ही नेहमी जायचो. मस्तं आहे. नेवर्क ते सॅन जुआन अगदी तीन तासांची फ्लाइट आहे. क्रूज़ चा मात्र अनुभव नाही मला:(

स्रुजा's picture

22 Sep 2016 - 12:08 am | स्रुजा

करिबिअन टाळा सध्या. झिका व्हायरस चा हाय अलर्ट आहे तिकडे.

पिरा एल ए वगैरे पण बघ अबीर साठी युनिव्हर्सल , डिझ्ने लँड्स वगैरे पर्याय आहेत तिथे. फ्लॉरिडा ला जाऊ शकतेस किंवा एस एफ ओ - तिथे करायला खुप काही आहे.

पद्मावति's picture

22 Sep 2016 - 12:16 am | पद्मावति

बापरे झिका :(

अनन्त अवधुत's picture

22 Sep 2016 - 2:31 am | अनन्त अवधुत

हॉलिडे सिझन मुळे विमान प्रवास (एकंदरीत कुठलाही प्रवास) महाग असतो. हवामानामुळे/ गर्दी मुळे विमान रद्द होणे, उशिरा सुटणे हे पण होते.

पूर्व किनाऱ्यावर फ्लोरिडा उत्तम पर्याय आहे आणि पश्चिमेकडे हवाई (हवाई ला कदाचित क्रूज पण मिळेल). सॅन फ्रान्सिस्को, लॉस अँजेलिस हे पण पर्याय आहेत.
लास वेगास ला लहान मुलाला घेऊन जाणे काही ठीक नाही. कारण त्याच्या मनोरंजनाचे तिथे काही नाही. आणि त्यामुळे मोठ्यांना स्वतःच्या मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता/ करता येत नाहीत. ग्रँड कॅनियॉन पण थंडी मुळे फारसा चांगला पर्याय नाही.
दक्षिणेकडे टेक्सास आहे. अरोरा बोरोलीस पाहायचे असेल तर वायव्येला अलास्का :) हे पण सुचवू शकतो.

टिवटिव's picture

22 Sep 2016 - 12:18 am | टिवटिव

डिस्ने कींवा सीवर्ल्ड ...दोन्ही ख्रिसमस - न्यु इयर सेलेब्रेशन मस्त असतात्,,आणी थंडी पण नस्ते..

रुपी's picture

22 Sep 2016 - 12:26 am | रुपी

वेगस छानच आहे, पण तिथे स्ट्रीपवर स्मोकींगचा अती त्रास आहे. डिसेंबरच्या थंडीत तर जास्तच. मोठ्यांनाही होतो, त्यामुळे लहान मुलांना आणखीच अवघड आहे असे मला वाटते.
वेस्ट कोस्टला बघण्यासारखे बरेच असले तरी मुलांना घेऊन मी स्वत:च फिरले नाहीय त्यामुळे नक्की कुठे जावेस याबद्दल फार काही सांगू नाही शकत. कट्टा मात्र नक्की करु :)
माझ्या काही मैत्रिणी मुलांबरोबर फिरताना राईस कूकर वगैरे बरोबर ठेवतात, सात-आठ दिवस बाहेर खाऊन कंटाळा येतो त्यामुळे तो चांगला पर्याय असावा.

ट्रेड मार्क's picture

22 Sep 2016 - 1:20 am | ट्रेड मार्क

वेस्ट कोस्टला जाता येईल. वेगासला लहान मुलांना घेऊन जायला काही प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. कॅसिनोमध्ये लहान मुलांना घेऊन फक्त गॅम्बलिंग एरियात जाता येत नाही पण कॅसिनोजमध्ये बाकी बघण्यासारखं बरंच आहे. मी माझ्या मुलीला ती ४ वर्षाची असताना घेऊन गेलो होतो.

नेवार्क ते वेगास फ्लाईटने तेथून कारने ग्रँड कॅन्यन आणि लॉस अँजेल्स शक्य आहे. लॉस अँजेल्समध्ये डिस्नेलॅण्डला जा. माझं वैयक्तिक मत असं आहे की युनिव्हर्सलमध्ये मोठ्यांसाठीच्या राईड्स जास्त आहेत, ज्यांना रोलर कोस्टर टाईप राईड्स आवडतात त्यांची तिथे चंगळ आहे . त्यामानाने डिस्ने लहान मुलांसाठी चांगला पर्याय आहे.

पैसे जास्त (भरपूर) खर्च करायची तयारी असेल तर LA वरून क्रूझने हवाईला जा. किंवा बहामा, प्युर्टो रिको, कॅनकून (मेक्सिको) हे पर्याय आहेतच. पण यासाठी व्हिसाची सोया करायला लागेल.

अभिजीत अवलिया's picture

22 Sep 2016 - 12:09 am | अभिजीत अवलिया

यु.के. मध्ये क्रूजचा प्रवास केला आहे. पहिल्यांदाच करत असल्याने जाताना 2-3 दा उलट्या झाल्या. येताना काही त्रास नाही झाला. लहान मुलं बरोबर असल्याने जास्त वेळेचा प्रवास करण्यापूर्वी विचार करा.

पिलीयन रायडर's picture

22 Sep 2016 - 12:49 am | पिलीयन रायडर

@स्रुजा - अरे बापरे! मग नकोच ते सध्या.

@ रुपी - राईस कुकरचा पर्याय कधी डोक्यात आलाच नाही. आणि खरंच जास्त बरं पडेल ते कदाचित. एक व्हेगस अवघड आहे लहान मुलांना घेऊन, पण अजुन काय काय करावं तिकडे आलोच तर?

@अभिजीत - मला मोशन सिकनेस आहे. अबीरलाही लहानपणी त्रास झालाय. आणि शिवाय इतके दिवस एका जहाजात नक्की काय करायचं असतं हे ही मला माहिती नाही. तेवढा इंटरेस्टींग पर्याय असेल तरच विचार करेन.

@टिवटिव - पण रांगा असतात ना मोठमोठ्या डिस्नेला? परवाच चित्रगुप्त काका वैतागले होते की उगाच पैसेकाढु प्रकार आहे आणि खुप ताटकळावं लागतं वगैरे...

अंतु बर्वा's picture

22 Sep 2016 - 1:31 am | अंतु बर्वा

लहानांच्या नजरेतला डिस्ने आणि मोठ्यांच्या नजरेतला यात फार मोठा फरक आहे. मला आणि बायकोला डिस्ने प्रचंड आवडला होता. अर्थात गर्दी, मोठमोठ्या रांगा, खुप चालायला लागणे हे प्रॉब्लेम्स आहेतच पण आपल्या परीने काही उपाय करता येतील, जसे की मोठ्या विकेंडला अशी ठिकणे टाळणे, सर्वच्या सर्व पार्क बघुन झालाच पाहिजे असा अट्टहास न धरता सिलेक्टिवली गोष्टी पाहणे. पार्क हॉपर ऑप्शनही आहेच ज्यात तुम्ही दोन पार्क एका दिवशी पाहु शकता (लहान मुलांसोबत हा ऑप्शन किती वर्काउट होइल याचा अनुभव नाही). डिस्नेच्या कॅसल समोर होणारी परेड आणि आतिषबाजी हा एक पैसावसूल आयटम आहे असं माझं मत आहे.

रुपी's picture

22 Sep 2016 - 1:39 am | रुपी

करण्यासारखं म्हणजे - डिस्नेलँड, युनिव्हर्सल स्टुडीओ, सी-वर्ल्ड, LA, San Francisco शहरांमधली आकर्षणे, मिस्टरी स्पॉट. LA चं मला फार माहीत नाही. SF मध्ये गोल्डनगेट ब्रिज, फिशरमन्स व्हार्फ, युनियन स्क्वेअर इ.इ.

डेथ व्हॅली, 17 miles drive, अल्कट्राझ मुळीच करु नका (हा माझा अनाहूत सल्ला).

खरं सांगायचं तर यातल्या (गोल्डन गेट सोडून) प्रत्येक ठिकाणाबद्दल आवर्जून जायलाच हवे किंवा जाऊन काहीच उपयोग नाही अशी वेगवेगळी मते आहेत. एगदी वेगसचंही मी तुला म्हटलंय - पण पुन्हा पहायला मिळेल न मिळेल असे वाटत असेल तर त्याला लगेच यादीतून काढून टाकू नका. डिस्ने, युनिव्हर्सल, सी-वर्ल्ड मध्ये मुले नसताना गेले होते तरी मला आवडलं. रांगा कशा मॅनेज करायच्या हे जमलं तर पैसे जास्त वाटत असले तरी वसूल करता येऊ शकतात ;) पण मुलाची उंची किती राईड्ससाठी पुरेशी आहे त्याप्रमाणे ठरवा. सकाळी लवकर गेलात आणि लोकप्रिय राईड्स आधी करुन घेतल्या तर फार ताटकळावे लागले असे वाटणार नाही. काही ठिकाणी फास्ट पासही असतात.

तुझा मुलगा किती सोशिक आहे त्यावरही बरेच अवलंबून आहे. फक्त पाहण्यासाठीच्या गोष्टींमध्ये तो फार रमणार नसेल तर काही जागा त्याच्यासाठी, काही मोठ्यांसाठी असे आलटून पालटून करु शकता.
जिथे तिकीटे आहेत त्यांचे ग्रुपॉन किंवा दुसरे काही डील्स मिळाले तर उत्तम.

जयन्त बा शिम्पि's picture

22 Sep 2016 - 7:55 pm | जयन्त बा शिम्पि

मी ही बातमी वाचली आहे फक्त. ज्याला कुणाला शक्य असेल, त्यांनी पहावे.

गोल्डन टॉयलेट सामान्य लोकांसाठी खुले
१८ कॅरेट सोने वापरून बनवलेले शौचालय

लोकसत्ता ऑनलाइन | September 16, 2016 6:45 PM

[गोल्डन टॉयलेट सामान्य लोकांसाठी खुले]
हे सोन्याचे शौचालय वापरण्यासाठी जास्त पैसेही मोजावे लागणार नाही.

सोन्याचे दागिने, सोन्याचा पुतळा, सोन्याचे दात, सोन्याची फळे असे सोन्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंबदद्दल तुम्ही ऐकले असेल पण तुम्ही सोन्याच्या शौचालयाबद्दल ऐकले आहे का ? आता आपल्याकडे सोन्याचा जाऊ दे पण साधा शौचालय तरी कोणी बांधून दिला तरी मोठी गोष्ट म्हणावी लागेल सोन्याच्या शौचालयाची गोष्ट् तर दूरच राहिली. पण सध्या सोशल मीडियावर सोन्याच्या शौचालयाची चर्चा खूपच रंगली आहे.
अमेरिकेतल्या गुगेनहेम संग्रहालयात सोन्याचा कमोड ठेवण्यात आला आहे. आता संग्रहालयात हा सोन्याचा कमोड ठेवला आहे म्हटल्यावर तो केवळ आणि केवळ बघण्यासाठी असेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. हा कमोड सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला आहे. न्यूयॉर्क शहरात हे संग्राहलय आहे. आता हे शौचालय फक्त श्रीमंत लोक वापरू शकतात अशाप्रकारचेही कोणतेच बंधन नाही. या संग्राहलयाला भेट देणारा कोणताही व्यक्ती हे सोन्याचे शौचालय वापरू शकतो. १६ सप्टेंबर म्हणजेच आजपासूनच हे शौचालय सामान्य लोकांसाठी खुले करण्यात आले आहे विशेष म्हणजे हे सोन्याचे शौचालय वापरण्यासाठी जास्त पैसेही मोजावे लागणार नाही. जो कोणी संग्रहालयाची तिकिट काढेल त्याला ते वापरायला मिळणार आहे.
या संग्रहालयाच्या चौथ्या मजल्यावरील रेस्ट रुममध्ये हा सोन्याचा कमोड ठेवण्यात आला आहे. पुरुष आणि महिला दोघेही हे शौचालय वापरू शकतात. इटलीचे प्रसिद्ध आर्टिस्ट मौरिजियो कैटिलेन यांनी हा सोन्याचा कमोड तयार केला आहे. हा कमोड तयार करण्यासाठी किती खर्च आला हे मात्र सांगितले नाही. गेल्याच महिन्यात या संग्रहालयात हा कमोड आणण्यात आला होता. परंतु, तो जोडण्यासाठी मात्र अडचणी येत होत्या.

सही रे सई's picture

22 Sep 2016 - 10:30 pm | सही रे सई

व्हरमाँट मधे फॉल पाहायला जायचे आहे. पण फॉल पाहायला जायचे म्हणजे नक्की काय असते? काही वेगळ्या जागा असतात का त्यासाठी?

स्रुजा's picture

22 Sep 2016 - 10:43 pm | स्रुजा

फॉलिएज ची वेबसाईट आहे बघ व्हर्माँ<ट राज्यासाठी. http://www.foliage-vermont.com/ आणि ते पाथ पण रेकमेंड करतात. साधारण तासा दिड तासाचा तो रस्ता असतो (लूप असतो बेसिकली) तिथे तुला सुंदर फॉल कलर्स बघायला मिळतील. बाकी रस्त्याने जाता येता तर दिसतील च एकदा व्हर्माँट मध्ये गेलीस की.

स्ट्वो मध्ये राहा असं मी सुचवेन. अप्रतिम जागा आहे. करण्याजोगं खुप काही आहे आणि. छोट्या मोठ्या हाईक्स आहेत. फॉल्स आहेत. झिप लायनिंग आहे. झालंच तर बेन अँड जेरिज ची फॅक्टरी आहे. त्याची टुअर नक्की घ्या. बर्लिंगट्न मध्ये पण सुंदर मार्केट, शिवाय रेस्टॉरंट्स उत्तम. एकुण एखादा लाँग वीकेंड साठी आदर्श जागा आहे. किती ही वेळा जा. इति व्हर्माँट जाहिरात संपन्न ;)

अभिजीत अवलिया's picture

4 Oct 2016 - 8:12 pm | अभिजीत अवलिया

हाम्रीकेतल्या मिपाकरांनो,
नायगाराला जायचे होते. इथे (पिट्सबर्ग) मध्ये कुठलीही टूर कंपनी नाही. बसने जायचे तर 2 दा बदलावी लागते आणी 3.5 तासाच्या प्रवासाला 13 तास लागतात. न्यू यॉर्कला येऊन तिथून टूरने जाणे हा एक पर्याय आहे. पण मग तेवढाच वेळा जाणार जवळपास 12 तास.
मी इथे एकदाच कार चालवली. घरापासून पिट्सबर्ग विमानतळ आणी परत. रोड साईन्स बघून बघून वैतागलो. एवढ्या 1.5 तासाच्या अनुभवावरून इथे रेंटेड कार घेऊन स्वतः चालवण्याची रिस्क घ्यावी का?

ट्रेड मार्क's picture

4 Oct 2016 - 8:36 pm | ट्रेड मार्क

कधी जाणार आहात आणि बरोबर कोण कोण आहे? भारतात गाडी चालवली आहे का आणि किती चालवली आहे?

आधी एक दिवस रेंटल कार घेऊन थोडा सराव करा. GPS घ्या एक आणि GPS बघून त्या सूचनेप्रमाणे गाडी चालवायची सवय पण करणे महत्वाचे आहे. एका दिवसात होऊन जाईल. गाडीत तुमच्या बरोबर जे कोणी असेल त्या व्यक्तीला पण GPS बघायची आणि रस्ते (मुख्यतः एक्झिट्स) बघायची थोडी तरी सवय असणे उपयुक्त ठरते.
सवय नसल्याने रेंटल कार घेताना नेहमी पूर्ण इन्शुरन्स रेंटल कंपनीकडूनच घ्यावा. थोडे पैसे जातील पण पूर्ण इन्शुरन्स असणे महत्वाचे.

रच्याकने: आता जाऊन मेड ऑफ द मिस्ट मध्ये जायला मिळेल का?

अभिजीत अवलिया's picture

4 Oct 2016 - 8:47 pm | अभिजीत अवलिया

अजून 2 जण आहेत बरोबर. त्यांनी भारतात पण कधीच चालवलेली नाही त्यामुळे प्रश्नच मिटला त्यांचा :)

मी भारतात 4 वर्षे चालवली आहे. भारतात पण प्रत्येक नियम पाळूनच चालवतो. पण इथे खूपच रोड साईन्स आहेत. रेंटल कार घेऊन सराव करायला बाजूला कुणी तरी इथे भरपूर गाडी चालवण्याचा अनुभव असलेली व्यक्ती हवी ना तीच नाहीये :(

मेड ऑफ द मिस्ट 6 नोव्हेंबर ला बंद होणार आहे. मी 26 नोव्हेंबर ला परत चाललोय आणी कदाचित परत कधीच अमेरिकेत येणार नाहीये.

ट्रेड मार्क's picture

5 Oct 2016 - 2:30 am | ट्रेड मार्क

माझा विचारण्याचा उद्देश बरोबर लहान मूल बरोबर नाही ना हा होता.

बरोबर भरपूर गाडी चालवण्याचा अनुभव असलेली व्यक्ती हवी हे वाटणं साहजिक आहे पण गरजेचं नाहीये. शहरात बऱ्याच रोड साईन्स असतात पण एकदा हायवे ला लागलात की मग फारश्या नसतात. हायवेला महत्वाचं म्हणजे तुम्ही स्पीड आणि लेन मेंटेन करू शकला पाहिजे आणि GPS दाखवेल त्याप्रमाणे गाडी चालवू शकला पाहिजे, म्हणजे एंट्री एक्झिटचं गणित जमलं पाहिजे. ते जमलं की गाडी चालवणं फारसं अवघड नाहीये. डाव्या उजव्याची अडचण होतेय का? त्यासाठी एक सोपा नियम म्हणजे चालकाच्या बाजूला मेडियन म्हणजे रस्ता दुभाजक पाहिजे हे डोक्यात ठेवायचं. तुम्ही एकदा गाडी चालवलीये त्यामुळे थोड्या सवयीने जमून जाईल.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे बाकीचे लोक्स तुम्हाला सांभाळून घेतात. म्हणजे चौकात तुम्ही कुठे जायचं याचा अंदाज घ्यायला थांबलात तरी मागचे भुंकणार नाहीत. फक्त अगदी कोणच्या जवळ गाडी न्यायची नाही (भारतातल्याप्रमाणे), चालणारे आणि सायकलवाले यांना प्रथम जाऊ द्यायचे आणि राईट ऑफ वे म्हणजे काय ते समजून घ्या.

अभिजीत अवलिया's picture

5 Oct 2016 - 7:57 pm | अभिजीत अवलिया

तुमच्या शब्दांनी धीर आलाय. :)

तसे इथे बाकीच्या लोकांचे गाडी चालवतांना निरीक्षण करून मी बऱ्याच गोष्टी शिकलोय.

अभिजीत अवलिया's picture

20 Oct 2016 - 4:44 am | अभिजीत अवलिया

धन्यवाद.10 ऑक्टोबरला रेंटल कार घेऊन falling water ह्या ठिकाणी फिरायला गेलो. एक जण ओळखीचा बाजूला बसला त्याने सर्व नियम समजावून सांगितले. मग 15-16 तारखेला नायगारा ट्रिप करून आलो. 6 जण झाले शेवटी त्यामुळे SUV भाड्याने घेतली. आदल्या दिवशी नियमांची pdf वाचून काढली ज्याचा खूप उपयोग झाला. संपूर्ण प्रवासात सुंदर फॉल कलर्स दिसले. एकंदरीत सर्व लोक वेगात पण शिस्तीत गाडी चालवत असल्याने गाडी चालवायला खूप मजा आली.
पुढच्या आठवड्यात 24-31 न्यू यॉर्क मध्ये आहे. 24-29 संध्याकाळी 5:30 नंतर आणि एक शनिवार रविवार एवढाच वेळ हाताशी असल्याने न्यू यॉर्क मधील अजिबात चुकवू नये अशा जागा सांगा.

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2016 - 5:49 am | पिलीयन रायडर

१. सेंट्रलपार्क मध्ये अजुन म्हणावा तसा फॉल मला तरी दिसला नाही, पण तरीही १००% जाच. मी सेंट्रल पार्कला ३ दा गेले आहे, पण अजुनही खुप काही पहायचे राहिले आहे. मी दर वेळी चालतच फिरल्याने फार बघणं होत नाही एका वेळेला. सिटी बँकेच्या ज्या सायकल्स मिळतात त्याने फिरलात तर जास्त पाहुन होईल, जास्त मजा येईल. मी जेवढं पाहिलं आहे त्यात म्हणाल तर वरुन खाली उतरताना "द पुल" म्हणुन एक जागा आहे, फार सुंदर आहे. ती बघा जमल्यास. कयाकिंग करता येतं. दमवणारा पण मस्त अनुभव. पिकनिक करण्यासाठी उत्तम जागा आहे सेंट्रल पार्क.

२. म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी तर आहेच. त्याला संपुर्ण एक दिवसही कमी पडतो. तेव्हा आवड असले तर इथे वेळ द्या. पण पैसा वसुल आहे हे नक्की. अत्यंत माहितीपुर्ण पण तेवढेच दमवणारे म्युझियम. सबवे दारात सोडते.

३.मग थोडं खाली उतरा आणि सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल पहा. (प हा च). डोळे दिपणे म्हणजे काय प्रकार असतो हे लक्षात येईल! त्याच्याच मागच्या ब्लॉकमध्ये सेंट बार्ट्सचे चर्च आहे. ते मात्र जुने पण अत्यंत शांत आणि सुंदर चर्च आहे. ह्या दोघांच्या जवळ रॉकफेलर सेंटर आहे. तिथे बहुदा आईस स्केटींग सुरु झालंय आता. ते ही बघुन घ्या.

४. टाईम्स स्क्वेअर तर आहेच आपला. तुम्ही शाकाहारी असाल तर मी "माओज" ही फलाफल मिळणारी जागा सुचवेन. फलाफल म्हणल्यावर रस्त्याच्या कडेला लागलेल्या गाड्या आठवतील, पण माओज ही एक सबवे सारखी चेन आहे. सेंट्रल पार्क मध्येही एक ब्रांच आहे त्यांची. स्वच्छ आणि स्वस्त. गुगल करा, सगळ्या लोकेशन्स मिळतील. पण सगळ्या अपटाऊनलाच आहेत.

५. मग अजुन थोडं खाली उतरा आणि ग्रॅण्ड सेंट्रलला जाऊन या. १०० वर्ष जुने स्टेशन आहे ते.( तिथे समोसा मिळतो छान.)

६. मग अजुन थोडंसं खाली आलात की आहेच एंपायर स्टेट बिल्डींग. ह्यावरौन आठवलं, टॉप ऑफ द रॉक (म्हणजे रॉकफेलरच्या वर) किंवा वन ऑब्झरवेटरी (वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या वर) असे दोन पर्याय आहेत तुमच्या कडे. दोन्ही उत्तम आहेत.

७. डाऊनटाऊनला वन ऑब्झरवेटरी / वर्ल्ड ट्रेड सेंटर आहेच. तिथुन वॉल स्ट्रिटवर जा. जाताना ट्रिनिटी चर्च आणि चार्जिंग बुल पाहुन घ्या. चालत चालत बॅटरी पार्कला पोहचाल. तिथुन निवांत बसुन नजारा पहा. जर्सीत लावलेलेल कोलगेटचे घड्याळ दिसेल. इथुनच लिबर्टीला जायला फेरी मिळते.

८. लिबर्टी - इथे जायला एकतर तिकिट आधीच बुक करावं लागतं. क्राऊनचं मिळणार नाही तेव्हा लिबर्टीच्या पायाशी जाता येईल फक्त. तिथुनही छान दिसतो नजारा. ह्या तिकिटात एलीस आयलंड सुद्धा दाखवतात. तिथे एक म्युझियम आहे. आम्हाला असल्या जागा आवडतात, तेव्हा लिबर्टीलाच आम्हाला जवळपास ५-६ तास लागले होते. तुम्हाला रस नसेल तर स्किप करा, वेळ वाचवा.

९. तुम्हाला लिबर्टी जवळुन पहाण्यात तितका रस नसेल तर तुम्ही समोरच्या गव्हर्नर्स आयलंडवर फेरीतुन सकाळी फुकट (किंवा दुपारी २$ मध्ये) जाऊ शकता आणि लिबर्टी पाहु शकता. पण मी म्हणेन की लिबर्टी पाहुन या जवळुन. लिबर्टी आतुन पहायलाही फार मस्त वाटतं. शेवटी ती जगातलं एक आश्चर्य आहे.

१०. ब्रुकलिन ब्रिज तर पहायचा आहेच. संध्याकाळी मस्त चालत जा इथे.

११. हायलाईन पार्क - वेळ असेल तर जा.

१२. बहुदा मुक्काम जर्सी सिटीत असेल. नसेल तर मग आधी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नव्या स्टेशनला या. उडणार्‍या हंसाच्या पंखासारख्या पांढर्‍या शुभ्र स्टेशनमध्ये फिरा. अ‍ॅपलच्या बाहेर लागलेली रांग बघा. मग पाथ पकडुन एक्सचेंज प्लेसला या. तिथे बोर्ड वॉकवर संध्याकाळी चालत जा. समोर न्यु यॉर्कची स्कायलाईन बघा. वेळ असलाच तर जिथे आम्ही कट्टा केला होता त्या न्युपोर्ट मॉलला चक्करही मारु शकता. खरेदी करायची असेल तर जवळपास सगळी फेमस दुकानं इथे आहेत. इथे चीजकेक फॅक्टरीला छान जेवण मिळतं. स्वस्त पर्याय हवा असेल तर फुड कोर्ट आहेच.

१३. वेळ असलाच तर क्विन्समध्ये फ्लशिंगला एक मंदिर आहे. तिथे डोसा फारच सुंदर मिळतो. प्लान असेल तर जर्सीत स्वामीनारायण मंदिरात जा. तिथेही चांगला डोसा आणि सांबार मिळतं असं राघव भाऊ म्हणतात. मी जाणारे.

१४. जर्सीत असाल तर इंडियन स्ट्रिटला यालच! नेमके दिवाळीत येत आहात. तिथे काही कार्यक्रम असेल का ते बघावं लागेल.

१५. जर्सी सिटीच्या वर सांगितलेल्या कोणत्याही जागी आलात तरी मला भेटुन जाऊ शकता. मी त्याच भागात रहाते. :) दिवाळी कट्टा करु आपण!

१६. खाण्याचं म्हणाल तर मला मॅग्नोलियाचा रेड व्हेल्वेट केक, चिपोतले, सेंट्रल पार्कच्या वरच्या टोकाला कॅफे अम्रिता आहे- तिथे ब्लुबेरी पॅनकेक्स, माऑजचे फलाफल, डाऊनटाऊन मध्ये El Luchador म्हणुन मॅक्सिकन मिळतं, इन्सोमेनियाच्या कुकिज, चीजकेक फॅक्टरीमध्ये काहीही, मंदिरांमधला डोसा, ईंडियन स्ट्रिटवरचं मिठास / बिर्याणी पॉट, टु बुट्सचा पिझ्झा, कॅफे ऑक्सफर्डचे सलाद इ इ खुप काही आवडतं. तुम्हाला नॉन व्हेज पर्याय हवे असतील तर नवर्‍याला विचारते.

बाकी न्यु यॉर्कही चालत फिरण्याची जागा आहे. त्यानेच ह्या शहराची खरी मजा कळते. इथे वॉकिंग टुर्सही मिळतात. फक्त तेवढा वेळ हातात हवा. नाहीच जमलं तर सबवेचा पास काढालच. तो खिशात असेल तर काही चिंता नाही. आपल्या डॅमने (ह्या नावाचा एक आयडी आहे!!) दोन दिवसात सगळं महत्वाचं सबवेने फिरुन पाहिलं होतं.

मला आठवेल तसं अजुन सांगेनच.

मिहिर's picture

20 Oct 2016 - 10:30 am | मिहिर

चांगली माहिती. माझी थोडी भर:
१. सेंट्रल पार्कमध्ये Belvedere castle व Bethesda fountain ह्याही पाहण्यासारख्या जागा आहेत. कॅसल नावावरून फार खूश होऊन जाऊ नका फक्त, त्यामानाने बारकंसं आहे ते.
२. मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स (मेट): पाहाच. हे एक संग्रहालय नसून भलीमोठी १०-१५ संग्रहालये एकत्र असल्यासारखे आहे. काही लोक आर्ट म्युझियम ऐकूनच काहीतरी हुच्चभ्रू प्रकार असेल असे धरून चालतात, पण तसे नाही. प्रत्येकाला आवडेल अशा भरपूर गोष्टी आहेत. इथे तिकीटाची सुचवलेली रक्कम २५ डॉलर म्हणतात, पण तिकीटाचे आपण हवे तितके पैसे देऊ शकतो. (पे अॅज यू विश). शुक्रवार व शनिवारी तर रात्री ९ पर्यंत उघडे असते. सेंट्रल पार्कला चिकटूनच आहे.
३. सेंट पॅट्रिक्स बघायला गेलात तर जवळच न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी आहे तीही बघून घ्या.
४. वेळ कमी असला तर लिबर्टी बेटावर जाण्याऐवजी स्टॅटन आयलंड फेरी घ्या. द. मॅनहॅटनमधील बॅटरी पार्काजवळून निघते आणि फुकट असते. गव्हर्नर बेटाच्या बोटीपेक्षा पुतळा चांगला दिसतो ह्यातून.

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2016 - 6:53 pm | पिलीयन रायडर

मेट बद्दल माझं हेच मत होतं. म्हणुन मी बिचकुन कधी गेलेच नाही. =)) आता तू म्हणतोस तर जाते.
पब्लिक लायब्ररी कशी विसरले मी?!! येस.. लिश्टीत अ‍ॅडवा हो!
स्टॅटन आयलंडची फेरी केव्हाची घ्यायची आहे. खुद्द स्टॅटन आयलंड वर काय काय अजुन पहाता येईल हे सांगशील का?

ट्रेड मार्क's picture

20 Oct 2016 - 7:35 pm | ट्रेड मार्क

पिरा बरंच हिंडलेलं दिसताय गेल्या काही दिवसात, पक्क्या न्यू यॉर्कर झालात की :)... तुम्ही बहुतेक सगळं सांगितलंच आहे.

फक्त अ अ ला काही सूचना..
न्यू यॉर्क मध्ये स्वतःची गाडी घेऊन जायचा विचारसुद्धा मनात आणू नका. पिरा म्हणल्याप्रमाणे सबवे आहेच पण काही ठिकाणी ४-५ लोक असाल तर टॅक्सी स्वस्त पडते आणि अगदी दारात सोडते. न्यू जर्सी मध्ये राहिलात तर पाथने NYC ला जायचं. NYC मध्ये हॉटेल्स बरीच महाग असल्याने जर्सी सिटीत राहणं चांगलं.

बँक ऑफ अमेरिकेचं डेबिट कार्ड असेल तर काही म्युझिअममध्ये प्रवेश फुकट असतो. तसेच इतरही बँकांचे काही ना काही असतेच. सेंट्रल पार्क खूप मोठं आहे त्यामुळे आंतरजालावर आधीच बघून ठेवा नक्की तुम्हाला काय बघायचंय.

बाकी न्यू यॉर्क मध्ये खाण्यापिण्याचं अजिबात टेन्शन नाही. तुम्हाला पाहिजे ते मिळतं. चिकन खात असाल तर रस्त्यावर चिकन ओव्हर राईस मिळतो तो मस्त असतो व्हेज असाल तर फलाफल ओव्हर राईस मिळतो. पिरा म्हणाल्या तसं MOES किंवा Chipotle आहेच.

Intrepid Museum पण मस्त आहे. म्हात्रे काकांच्या धाग्यावर याची समग्र माहिती मिळेल.

अभिजीत अवलिया's picture

20 Oct 2016 - 7:43 pm | अभिजीत अवलिया

बार्क्लेज स्ट्रीटवर राहणार आहे कंपनीच्या गेस्टहाऊस वर. त्यामुळे बरीच ठिकाणे रोज येता जाता होऊन जातील.

chipotle पिट्सबर्गमध्ये पण आहे. आवडले.

चिकन खात असाल तर रस्त्यावर चिकन ओव्हर राईस मिळतो तो मस्त --- भारतात कोंबड्या चळा चळा कापतात मी आजूबाजूला दिसलो की. :)

ट्रेड मार्क's picture

20 Oct 2016 - 7:28 pm | ट्रेड मार्क

स्वतः चालवून जाण्यात मजा असते. आता तुम्ही तुम्हाला वाटेल तेव्हा रोड ट्रिपला जाऊ शकाल.

पिलीयन रायडर's picture

4 Oct 2016 - 9:10 pm | पिलीयन रायडर

भारतातुन अमेरिकेत पार्सल पाठवायला कोणती सर्व्हिस चांगली आहे? भारतीय पोस्ट चांगलं आहे असं मागे कुठे तरी वाचलं होतं. ५ किलो वगैरे पाठवायची स्वस्तात सोय होत असेल तर चकल्या-लाडु मागविन म्हणते आईकडुन!!

रुपी's picture

4 Oct 2016 - 10:29 pm | रुपी

अगं खास दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी कुणीतरी सेवा देतात. दर किलोप्रमाणे पैसे आकारतात बहुतेक. मैत्रिणीला विचारुन सांगते.

स्रुजा's picture

4 Oct 2016 - 10:56 pm | स्रुजा

चितळे देतात ना. ऑनलाईन पण बुकिंग करता येतं. मागच्या वेळी बहिणीने एक पॅकेज (चितळ्यांकडचं नव्हतं) पाठवलं होतं. ते २ दिवसात आमच्याकडे आलं. त्यात रांगोळीचे छाप , फोल्ड केलेला कंदील, मोती चंदन, सुगंधी तेल, उटणं, ४ पणत्या आणि स ग ळा फराळ होता. चवीला उत्तम फराळ आणि अप्रतिम पॅकिंग ! फार म्हणजे फार छान वाटलेलं ते सरप्राईझ पॅकेज बघून. तुला देते मी तिला विचारुन त्यांचं नाव नंबर.

मी बर्‍याचवेळा युनिक कुरियर या पुण्यातल्या कुरियर सर्विसने वस्तु पदार्थ मागवले आहेत. कमीत कमी ८ किलो मागवावे लागतात (मग रेट चांगला मिळतो). त्यांचा माणूस घरी येऊन वस्तु पदार्थ मोजून पॅक करून घेऊन जातो. पुण्यातल्या बर्‍याच इतर कुरीयरवाल्यांपेक्षा यांचे दर कमी आणि सेवा चोख आहे.
त्यांचा फोन नंबर +९१ ९८८११३८८१४.
चितळे व इतरही काही लोक खास दिवाळी निमित्त फराळाचे कुरियर सकट पैसे घेऊन पाठवतात. कदाचित ते थोड स्वस्त पण पडत असेल. पण घरचे आईच्या हातचे पदार्थ आणि वस्तु यांची सर त्या फराळाला नाही.
कोणाला दुसरी कुठली कुरियर सेवा स्वस्त आणि मस्त माहित असेल तर जाणून घ्यायला आवडेल.

पूर्वी जल्लोश डोट कॉमवरून लोक चितळे फराळ मागवून घेत असत पण आत्ता मला त्यांचं काही सापडत नाहीये.

पिलीयन रायडर's picture

6 Oct 2016 - 2:20 am | पिलीयन रायडर

केव्हाची एक इष्टुरी सांगायची आहे!

झालं असं की माझ्या मुलाचे १० सप्टेंबरला इथल्या शाळेसाठी नाव नोंदवले. शाळेत प्रवेश मिळणार की नाही ते २ आठवड्याने कळणार होते. पण त्यांनी तिथेच सांगितले की "जिम" साठी तुम्हाला कार्डिओलॉजी क्लिअरन्स लागेल. तेव्हा कार्डिओलॉजिस्ट कडुन नोट आणा. मी तातडीने शोधाशोध सुरु केली. पण इथे डॉक्टर भेटणे इतके सोपे नाही. मला लक्षात आलं की असं लगेच कुणी सापडणार नाही तर पर्यायी व्यवस्था काय ते विचारायल हवं. म्हणुन मी त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला आणि हे सर्व सांगितलं. तिथली व्यक्ति म्हणाली की कदाचित तुम्हाला शाळेत अ‍ॅडमिशन मिळणारच नाही. कारण ह्यावेळेस खुप नावं आली आहेत. तेव्हा आत्ताच गडबड करु नका. अ‍ॅडमिशन मिळाली की त्या शाळेच्या नर्सला जाऊन भेटा आणि मार्ग काढा. म्हणुन मग आम्ही हरी हरी करत स्वस्थ बसलो!

२६ सप्टेंबरला पत्र आलं की पुढच्या सोमवार पासुन शाळेत या!

मी दुसर्‍याच दिवशी शाळेत फोन केला आणि सगळं सांगितलं. म्हणलं माझ्याकडे भारतातुन आणलेले रिपोर्ट्स आहेत. हवं असल्यास भारतातल्या डॉक्टरांकडुन तात्पुरती नोट मागवते. नर्स म्हणे शाळेत भेटायला या उद्या. मी सगळी कागदपत्र घेऊन दुसर्‍या दिवशी शाळेत. तिथे मात्र न जाणे त्या बाईला काय वाटलं, कदाचित ऑपरेशनची केस असेल म्हणुन.. पण म्हणे जोवर तुम्ही ही नोट आणत नाही, मी शाळेत ह्याला घेऊ शकत नाही. म्हणलं अहो २ दिवसात कशी मिळणार मला नोट?? आणि पहिला दिवस अनुपस्थिती असेल तर तुम्ही कॅन्सल करता अ‍ॅडमिशन. ती म्हणे तुम्ही पुन्हा शिक्षण खात्याला फोन करा. मी काही करु शकत नाही.

आम्ही युद्धपातळीवर आजुबाजुच्या हॉस्पिटल्सना फोन सुरु केले. सुमारे ५ तास आम्ही फोन करत होतो तेव्हा दुपारी ३:३० ला एन.आय.यु मध्ये लगेच पुढच्या दिवशीची वेळ मिळाली. आम्ही लगेच रिलॅक्स! पण हे होणे आमच्या नशिबातच नव्हते.. अर्ध्याच तासात त्या हॉस्पिटलचा फोन आला की आम्ही तुमचा इन्शुरन्स पाहिला. डिडक्टिबल मीट न झाल्याने उद्या तुमचा सगळा डिस्काऊंट वगैरे धरुन खर्च ३०००$ आहे. तेव्हा येताना किमान १५००$ तरी घेऊन या!!

मी तिथल्या तिथे अपॉइंटमेंट कॅन्सल केली!! म्हणलं मुलाला घरीच शिकवु. =))

मग दुसर्‍या दिवशी शिक्षण खात्यात फोन केले. शाळेत केले. माझं म्हणणं असं की शाळेत घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. असं कसं तुम्ही प्रवेश नाकारता? मी आणते ना पिडीयाट्रिशनची नोट. जरा आवाज चढलाच माझा. मग नर्स म्हणे उद्या या काय ते घेऊन. दुसर्‍या दिवशी पिडीयाट्रिशनची नोट घेऊन जायच्या आधी सहज फोन केला तर म्हणे कोण तुम्ही? नाही नाही.. आत्ता येऊ नका. आता डायरेक्ट सोमवारी पहिल्या दिवशीच भेटु!! शिक्षण खातं म्हणे बघा बुवा.. तुमची मर्जी! जायचं तर जा, नसेल तर नका जाऊ =))

खरी गम्मत आता आहे.. हे सगळं चालु असतानाच मी दोन तीन दिवसांपुर्वीच बहुगुणी काकांना व्यनि केला होता की काही करु शकता का मदत? आणि मिपामित्र युएसए च्या चेपु ग्रुपवरही काका आहेत का इथे अशी विचारणा केली होती. जी पंतांनी पाहिली होती. बहुगुणींनी व्यनि वाचुन मला संध्याकाळी फोन केला. पण तोवर ५ तास सतत फोन करुन करुन माझा फोन बंद पडला. तर त्यांनी पंताना कळवलं की पिराला म्हणाव मला फोन कर. पंतानी मला कळवलंच पण बॅकप म्हणुन स्रुजालाही कळवलं. माझा फोन सुरु झाला की धडाधड मेसेज! मी तातडीने काकांना फोन केला. त्यांनी मला डॉ. प्रियांका ह्यांचा नंबर दिला. त्यांच्याशी मी बोलले. त्या म्हणाल्या की बघते काय करता येतं ते. त्या स्वतः फ्लोरिडामध्ये असल्याने त्यांनाही इकडचे काही माहिती नव्हते. पण दुसर्‍याच दिवशी सकाळी त्यांनी मला डॉ. सुनिल सहारन (कार्डिओलॉजिस्ट) ह्यांचा मेसेज फॉर्वर्ड केला की "मी करतो मदत. हा माझा मेल आयडी. लवकरात लवकर अपॉईम्ट्मेंट देतो".

आम्ही लगेच त्यांना मेलने सर्व काही पाठवलं. त्यांनी स्वतः आम्हाला फोन केला. पैशाची काळजी करु नका म्हणे. इतके पैसे लागत नाहीत. आम्हाला तातडीने आजची वेळ दिली. आज मी त्यांना भेटुन आले. अत्यंत भारी मनुष्य आहे! व्यवस्थित तपासलं. ज्यांनी इको केला त्या डॉ. अंबिका नायर ह्यांनाही आधीच कळवुन ठेवलं होतं की असा असा एक मुलगा येतोय. त्या बाई दारात माझी वाट पहात उभ्या. त्यांनी "४५ मिनिट" इको केला!! मी आजतागायत एवढा डिट्टेल इको केलेला पाहिला नाही. बरं एवढंच नाही तर आम्ही डॉ. सुनिल ह्यांची बाहेर वाट पहात बसलो होतो तर "तुम्हाला भुक लागली असेल" म्हणुन हातात मावणार नाही इतकं काय काय खायला देऊन गेल्या!!

विचार करा.. माझी आणि बहुगुणी काकांची ओळख फक्त मिपावरची..तरी मी त्यांना विचारलं.. त्यांनी डॉ. प्रियांकांना विचारलं.. त्यांनी डॉ. इतिशा ह्यांना विचारलं.. त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला विचारलं जिचा नवरा म्हणजे डॉ. सहारन!!! आणि ह्या माणसाने आऊट ऑफ द वे जाऊन आम्हाला स्वतःहुन फोन करुन अगदी इन्शुरन्स पासुन सगळी मदत केली!

हे सगळं घडलं केवळ मिपामुळे!! आणि बहुगुणींसारख्या मिपाकरांमुळे! जियो मिपा!!

(बादवे.. मी शाळेत भांडुन भुस्क्ट पाडुन अबीरला घ्यायलाच लावलं. असं हार्ट हिस्टरी आहे म्हणुन कुणी माझ्या पोराला घरी बसवायला पाहिल तर कोण ऐकुन घेणार?!)