Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिलीयन रायडर on Sat, 08/27/2016 - 18:34
लेखनविषय (Tags)
देशांतर
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं.. तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं. जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत. आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली! किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं! अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
  • 107543 views

प्रतिक्रिया

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 08/30/2016 - 20:21

In reply to +1000 by संदीप डांगे

Permalink

हामिरिकेत मज्जा असते ही अफवा

हामिरिकेत मज्जा असते ही अफवा आहे. त्या स्कॅमचा मी बळी आहे! मेरा भारत"च" महान!
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 08/30/2016 - 20:21

In reply to +1000 by संदीप डांगे

Permalink

माझेपण दोन पैशे...

डॉलरात पैशे उधळण्यापेक्षा मायदेशातल्या कितीतरी गरजूंना त्या पैशाचा लाभ होईल असे काहीतरी काम करायचे सोडून असले रिकामे उपद्याप... वगैरे वगैरे... किंवा.. पिराकाकूंनी इंजिनीवर / पोस्ट ग्रॅड असे हुच्चभ्रू शिक्षण घेवून एका गरजूची नोकरी खाल्ली आणि आता मायदेशाला टाटा करून परप्रांतात खुशाल मजा करत आहेत... वगैरे वगैरे (मी पळतो आता..!!) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 08/30/2016 - 20:22

In reply to माझेपण दोन पैशे... by मोदक

Permalink

वेगळा धागा काढा.. आमच्या

वेगळा धागा काढा.. आमच्या चांगल्या धाग्याला दृष्ट लावु नका जळक्यांनो!
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 08/30/2016 - 20:24

In reply to वेगळा धागा काढा.. आमच्या by पिलीयन रायडर

Permalink

हिहिहि :p

हिहिहि :p
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 09/01/2016 - 19:00

In reply to वेगळा धागा काढा.. आमच्या by पिलीयन रायडर

Permalink

आय्ला !!!!

कोळश्यांनी नजर लावली तर चालेल ना?
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 08/30/2016 - 19:29

Permalink

चित्रपट ऑनलाईन वा नेट्फ्लिक्स वर मिळत असल्याने उपयोगी नसावं

पण चित्रपटांच्या डीव्हीडी मिळवण्याचा हाही एक मार्ग अमेरिकेत उपलब्ध आहे. वरील दुव्यावरून संजीव कुमारचे १५० सिनेमे उपलब्ध असावेत असं दिसतं.
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Tue, 08/30/2016 - 19:47

Permalink

नायगारा धबधबा

मी या लाँग विकांताला नायगारा धबधबा पाहायला जात आहे. कार रेंटने घेतली आहे. नायगाराच्या अगदी जवळ एका भारतीय माणसाचे घर भाड्याने घेतले आहे. नायगाराचा डिस्कव्हरी पास ज्यात ५ अ‍ॅट्रॅक्शन्स आहेत तो ऑनलाईन विकत घेणार आहे. तरी याबद्दल अधिक माहिती, उपयुक्त टिपा असतील तर त्या जाणकारांनी द्याव्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Tue, 08/30/2016 - 19:57

In reply to नायगारा धबधबा by सही रे सई

Permalink

भरपूर गर्दी असणार आपल्याच लोकांची

तेव्हा त्या तयारीने जा :). तो डिस्कव्हरी पास मीही घेतला होता. तुम्ही इतर कुठली aquariums बघितली असतील तर मग तिथले नाही बघितले तरी चालेल. अगदीच छोटेसे आहे. आमचे मेड ऑफ द मिस्ट आणि केव्ह ऑफ द विन्ड्स आणि ती मूव्ही होईपर्यंत ते डिस्कव्हरी सेंटर बंद झाले होते. भरपूर इंडियन रेस्टॉरंट्स आहेत तिथे. बाकी नायाग्रा धबधबा अतिप्रचंड आहे. मेड ऑफ द मिस्ट मधे गेल्याशिवाय कल्पना येत नाही त्याच्या आकाराची.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 08/30/2016 - 20:16

In reply to भरपूर गर्दी असणार आपल्याच लोकांची by लंबूटांग

Permalink

हेच सांगणार होतो

मेड ऑफ द मिस्ट आणि केव्ह ऑफ द विन्ड्स ही दोन प्रमुख आकर्षणं आहेत. दहा वर्षांपूर्वीचा अनुभवः एकच दिवस हाताशी असेल आणि मुलं/ वयस्कर मंडळी बरोबर असतील तर धावाधाव होते आणि बाकीच्या गोष्टींना वेळ पुरतही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Tue, 08/30/2016 - 20:44

In reply to हेच सांगणार होतो by बहुगुणी

Permalink

शुक्रवारी दुपारी निघून रात्री

शुक्रवारी दुपारी निघून रात्री पर्यंत नायगारा ला पोहोचू. शनिवार रविवार राहाणार आहोत. त्यामुळे थोडा जास्ती वेळ असेल हाताशी असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Tue, 08/30/2016 - 20:29

In reply to नायगारा धबधबा by सही रे सई

Permalink

नायगरा

कॅनडा व्हिसा असेल तर तिकडून पण बघून या. पूर्ण व्ह्यू मिळतो. अमेरिकन साईडने नायगरा अनुभवता येतो. तुमच्या अगदी जवळून पाणी प्रचंड वेगाने वाहत असते. दोन्हीची मजा वेगळी. कॅनडा साईडला गेलात आणि साहसाची आवड असेल तर तिकडे झिपलाईन करता येईल. डिस्कव्हरी पास घेतला तर बहुतेक सगळं कव्हर होईल. मेड ऑफ द मिस्ट आणि केव्ह मध्ये फोन/ कॅमेरा ओला होऊ शकतो. ते सांभाळा. जाता येता कॉर्निंग ग्लास म्युझियम बघू शकता.
  • Log in or register to post comments

Submitted by टिवटिव on Tue, 08/30/2016 - 23:01

In reply to नायगरा by ट्रेड मार्क

Permalink

वॅट्किन्स ग्लेन

वॅट्किन्स ग्लेन पण मस्त आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Wed, 08/31/2016 - 21:06

In reply to नायगरा by ट्रेड मार्क

Permalink

+१

कॉर्निंग म्युझियम ऑफ ग्लास मस्त आहे. अपस्टेट न्यु यॉर्क आणि पेनसिल्व्हेनिया मधे गेले की खरी अमेरिका दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Tue, 08/30/2016 - 22:14

In reply to नायगारा धबधबा by सही रे सई

Permalink

कॅनेडियन वीसा असल्यास नायगारा

कॅनेडियन वीसा असल्यास नायगारा ऑन द लेक ला जरूर जा. अर्धा तासाचा सुंदर ड्राइव आहे. छोटंसं पण अतिशय सुरेख गाव आहे आणि खूप छान लेक. तसेच नायगारा फॉल्स या गावात सुद्धा खूप काही करण्यासारखे आहे. खास करून मुलांसाठी. बॉटनिकल गार्डन, आकाश पाळणा, बटरफ्लाइ गार्डन. आणि एक उलटं घर पण आहे. आप्साइड डाउन असे. तिकीट घेऊन आत जाता येते. खूप मजेदार आहे. मान वरती करून छताला लावलेले सोफे, बेड्स वगैरे बघायचे. मजा येते :))
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Wed, 08/31/2016 - 01:09

In reply to कॅनेडियन वीसा असल्यास नायगारा by पद्मावति

Permalink

कॅनडा बाजूला जायचा अत्ता

कॅनडा बाजूला जायचा अत्ता विचार नाही. पण जेव्हा जाईन तेव्हा नक्की बघेन.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Wed, 08/31/2016 - 00:15

In reply to नायगारा धबधबा by सही रे सई

Permalink

नायगाराचा डिस्कव्हरी पास ज्यात ५ अ‍ॅट्रॅक्शन्स आहेत

त्याला काहीही अर्थ नाही. गर्दीमुळे तुमचे ५ अ‍ॅट्रॅक्शन्स पाहणे होणार नाहीत. लंबूटांग यांनी म्हटल्याप्रमाणे aquarium पाहण्यात काही विशेष नाही. डिस्कवरी सेंटर लवकर बंद होते. मेड ऑफ द मिस्ट आणि केव्ह ऑफ द विंडस पाहण्यातच वेळ सत्कारणी लागणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on गुरुवार, 09/22/2016 - 22:27

In reply to नायगारा धबधबा by सही रे सई

Permalink

नायगाराच्या अगदी जवळ एका

नायगाराच्या अगदी जवळ एका भारतीय माणसाचे घर भाड्याने घेतले आहे. हे घर आणि त्याचा मालक यांचा फारच चांगला अनुभव आला. त्यांच्या घरात बाकी सुविधा तर होत्याच पण घरात स्वैपाक करण्यासाठी खूपच सोय होती, अगदी कुकर पासून सर्व भांडी व जुजबी वाणसामान सुद्धा. कोणाला कधी जाऊन राहायचे असेल नायगारा मधे तर नक्की विचारा, मी माहिती देईन.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Fri, 09/23/2016 - 00:02

In reply to नायगाराच्या अगदी जवळ एका by सही रे सई

Permalink

मला व्य.नी. करा ना हि माहिती.

मला व्य.नी. करा ना हि माहिती.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 10/04/2016 - 21:07

In reply to मला व्य.नी. करा ना हि माहिती. by अभिजीत अवलिया

Permalink

मलाही व्य नी करा प्लीज

मलाही व्य नी करा प्लीज
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Wed, 10/05/2016 - 20:10

In reply to मलाही व्य नी करा प्लीज by खटपट्या

Permalink

नायगारा होम स्टे

व्य.नी. केला आहे. बाकीच्यांसाठी ही लिंक बघावी - https://www.vrbo.com/7084688ha अजून माहिती साठी मला व्यनी केलात तरी चालेल.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 08/30/2016 - 22:28

Permalink

भारतीय मनुष्याचं घर नाही पण

भारतीय मनुष्याचं घर नाही पण मोटेल एकदा अनुभवावं लागलं होतं. नायगर्‍यातच! अगदी वाईट अनुभव होता. तुम्हाला तसा न येवो. कॅनडातून नायगरा पहाच!
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Wed, 08/31/2016 - 01:10

In reply to भारतीय मनुष्याचं घर नाही पण by रेवती

Permalink

कोणतं मोटेल होत ते? आणि

कोणतं मोटेल होत ते? आणि भारतीय माणसचं नाव आठवत असेल तर सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 08/31/2016 - 01:30

In reply to कोणतं मोटेल होत ते? आणि by सही रे सई

Permalink

सॉरी हां, आठवत नाही, बारा

सॉरी हां, आठवत नाही, बारा पंध्रा वर्षे झाली, पण नंतर आणखी दोन नायगरा वार्‍या झाल्या तेंव्हा हॉटेले चांगली मिळाली. जमल्यास तुम्ही घरून एक दोन बेड शीटस घेऊन जावा. घरच्या स्लिपर्सही! (अर्थात जमल्यास)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Wed, 08/31/2016 - 01:43

In reply to सॉरी हां, आठवत नाही, बारा by रेवती

Permalink

अमेरिकन साईड ने नायगरा पाहणे

अमेरिकन साईड ने नायगरा पाहणे तितकेसे 'worth' आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Wed, 08/31/2016 - 01:57

In reply to अमेरिकन साईड ने नायगरा पाहणे by अभिजीत अवलिया

Permalink

प्रश्नच चुकीचा आहे

एकदाही पाहिलेला नसेल तर कुठल्याही साईडने पाहावाच. अमेरिकन बाजूने अनुभवता येतो... तुमच्या अगदी जवळून एवढा मोठा जलप्रपात कोसळत असतो. तर कॅनडाच्या बाजूने पूर्ण हॉर्सशूचे दर्शन होते.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 08/31/2016 - 02:03

In reply to प्रश्नच चुकीचा आहे by ट्रेड मार्क

Permalink

ओह! पण मग पहाण्यापेक्षा

ओह! पण मग पहाण्यापेक्षा अनुभवणे जास्त भारी असेल ना? कॅनडासाईडने पाण्यात नेत नाहीत का?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 09/01/2016 - 01:14

In reply to ओह! पण मग पहाण्यापेक्षा by पिलीयन रायडर

Permalink

नेतात.

नेतात.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 09/01/2016 - 01:13

In reply to अमेरिकन साईड ने नायगरा पाहणे by अभिजीत अवलिया

Permalink

ट्रे मा यांच्याशी सहमत.

ट्रे मा यांच्याशी सहमत. कनेडियन व्हिसा नसेल तर अमेरिकी बाजूने पहा. क्यानडातून पाहिल्यास जास्त चांगला दिसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अंतु बर्वा on Mon, 09/12/2016 - 19:52

In reply to ट्रे मा यांच्याशी सहमत. by रेवती

Permalink

आत्ताच कॅनडा ट्रिप करुन आलो.

आत्ताच कॅनडा ट्रिप करुन आलो. नायगारा अमेरिकन साईडने आधी पाहिला होता, या वे़ळी कनेडियन बाजुने पाहिला. मोठा विकांत असल्याने भरपुर गर्दी होती. त्यामुळे एकाही फोटोत दुसर्या कुणाचा हात, डोकं, पाय, बॅग इत्यादी न येण, ऑलमोस्ट अशक्य कोटीतली गोष्ट झाली होती :-). कॅनडा बाजुने पाहु इच्छिणार्यांसाठी: अमेरिकन बाजुच्या केव्ह ऑफ द विंड आणी तिकडच्या जर्नी बिहाईंड द फॉल्स मधे थोडा फरक आहे. अमेरिकन बाजुने केव्ह करताना जितकी मजा येते, तितकी जर्नी ला नाही असे माझे मत झाले आहे (रादर, सिटी पास नं घेता, कॅनडा बाजुने फक्त मेड ऑफ द मिस्ट करावी आणी केव्ह अमेरिकन बाजुने). बाकी टोराँटो सिटी सुद्धा छान आहे, मि एक आठवडा आधी गेल्यामुळे सध्या चालु असलेला टोराँटो फिल्म फेस्टिवल मिस झाला :(
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 09/12/2016 - 20:02

In reply to आत्ताच कॅनडा ट्रिप करुन आलो. by अंतु बर्वा

Permalink

कळवल्याबद्दल धन्यवाद.

कळवल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 08/31/2016 - 01:53

Permalink

माझ्या मुलाचा इथे एक्स रे

माझ्या मुलाचा इथे एक्स रे करावा लागला (क्षयाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने) तर त्याचे बिल ३८२$ आले आहे. पैकी डिड्क्टबिल मीट न झाल्याने ते सर्व आम्हालाच भरायचे आहे. (कोण म्हणलं रे अमेरिकेत मज्जा आहे!) माझा प्रश्न असा की एखाद्या चाचणीचे बिल किती असायला हवे हे कसे कळणार? इथे बिल येईपर्यंत नक्की किती पैसे झाले हे कळतही नाही. आपण हे बिल जास्त आहे अशी काही तक्रार करु शकतो का? की मुकाट्याने भरुन टाकायचे? (अवांतर - मागे इथे बहुदा शिल्पा ब ह्यांनी अमेरिकेत डिलीव्हरीचा खर्च ५००००$ झाला असे लिहीले होते, तेव्हा खुप जणांनी अविश्वास दाखवला होता. आता कळतय की अगदी सहज शक्य आहे...)
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Wed, 08/31/2016 - 02:12

In reply to माझ्या मुलाचा इथे एक्स रे by पिलीयन रायडर

Permalink

कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन

कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. खरं तर डॉक्टरने सांगितलेल्या Diagnostic Tests कव्हर करायला पाहिजेत. डॉक्टरकडे गेल्यावर आणि कुठल्याही ट्रीटमेंटच्या किंवा टेस्टच्या आधी तुम्ही किती खर्च येईल आणि इन्शुरन्समध्ये कव्हर होईल का ते विचारू शकता. बहुतेक इन्शुरन्स कंपन्यांच्या वेबसाईटवर एखाद्या टेस्ट/ ट्रीटमेंटसाठी किती खर्च येईल हे सांगणारे एस्टीमेटर्स असतात. इन्शुरन्स कंपनीला फोन करून पण विचारू शकता. तुम्ही जर्सी सिटी मध्ये राहत असाल तर Palisade Avenue वर North Hudson Community Hospital (नक्की नाव लक्षात नाही) तिथे जा. चांगली सेवा स्वस्तात मिळते (मिळायची.. कधी काय बदलेल सांगता येत नाही). मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्स हा अमेरिकेतला एक गंडलेला प्रकार आहे. काय वाट्टेल ती बिलं लावतात आणि ती आपल्याला भरायला लागतात. एवढं करूनही एकदम भारी सेवा मिळते असं काही नाही. माझा एक भारी अनुभव आहे... जमल्यास एखादा धागा काढून सांगीन.
  • Log in or register to post comments

Submitted by निशदे on Wed, 08/31/2016 - 03:11

In reply to कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन by ट्रेड मार्क

Permalink

+१

कोणता इन्श्युरन्स, कोणता प्लॅन(पीपीओ वगैरे), इन-नेटवर्क की आऊट ऑफ नेटवर्क डॉक्टर अशा अनेक गोष्टींवर ते ठरते. ER ला गेला असाल तर खर्च नेहेमीच जास्त येतो. तुमचा डिडक्टिबल किती आहे ते तपासून घ्या. आणि इन्श्युरन्स कंपनीला फोन करून तर घ्याच. त्यांच्याशी बोलल्यावर चार्जेस कमी केल्याची अनेक उदाहरणे माहितीतली आहेत. <माझा एक भारी अनुभव आहे... जमल्यास एखादा धागा काढून सांगीन. > नक्की काढा धागा. त्यानिमित्ताने माहिती कळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 08/31/2016 - 05:19

In reply to कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन by ट्रेड मार्क

Permalink

हो हे हॉस्पिटल पाहिले आहे.

हो हे हॉस्पिटल पाहिले आहे. कधी गरज पडली तर जाते. मला असं वाटलं होतं की Jersey city medical center हा सरकारी दवाखाना आहे आणि म्हणुन स्वस्त असेल! म्हणुन मी तिथे फारसा विचार न करता गेले! एस्टिमेटर पाहिला नव्हता. :( तुम्ही नक्की एक धागा काढा. कच्चुन शिव्या द्यायची इच्छा आहे इथल्या ह्या सिस्टिमला!!
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Wed, 08/31/2016 - 23:02

In reply to कुठला इन्शुरन्स आणि कुठला प्लॅन by ट्रेड मार्क

Permalink

नक्की काढा धागा

इथल्या वैद्यकीय सेवा (त्यात फिजिशियन, दंतवैद्य, डोळ्यांचे डॉक्टर, स्पेशालिस्ट, आणि अर्जेंट केअर) वर खूप काही बोलण्यासारखे आहे. जोडीला विमा आहेच. तुम्ही धागा काढा. 100 प्रतिसाद तर कोठे जात नाहीत :)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 08/31/2016 - 02:22

In reply to माझ्या मुलाचा इथे एक्स रे by पिलीयन रायडर

Permalink

लुबाडलं जायला भरपूर स्कोप आहे!

अमेरिकेत वैद्यकीय सेवांच्या किंमती पुरवठादारांनुसार (providers) बदलतात! "People don't realize the same procedure may vary by 500 percent or more in the same town, or even on the same block" चेस्ट एक्स रे ची साधारण किंमत खरं तर $६७ ते $६९ असायला हवी असं दिसतं :-(
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 08/31/2016 - 05:24

In reply to लुबाडलं जायला भरपूर स्कोप आहे! by बहुगुणी

Permalink

अरे! कमाल आहे!

अरे! कमाल आहे! मग आता मी तक्रार करु शकते का Jersey city medical center मध्ये? की एवढी किंमत का लावली आहे म्हणुन? बरं आणखीन रेडिओलॉजिस्ट्ने वर ७०$ चे वगळे बिल लावले आहे. आम्हाला ना तो डॉक्टर भेटला ना कधी तो एक्स रे सोडा, रिपोर्ट पाहायला मिळाला. आमच्या पिडीयाट्रिशनकडे डायरेक्ट तो रिपोर्ट आला आणि त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं. :(
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Wed, 08/31/2016 - 05:55

In reply to माझ्या मुलाचा इथे एक्स रे by पिलीयन रायडर

Permalink

अर्जेंट केअर

तुम्हाला सुदैवाने अर्जेंट केअर नामक प्रकार अनुभवायला मिळाला नाही (आणि तो मिळूही नये)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 08/31/2016 - 05:17

Permalink

सगळ्यांनाच धन्यवाद! इथे मी

सगळ्यांनाच धन्यवाद! इथे मी बरीच चौकशी केली तर बहुतेक सर्वांनाच कधी ना कधी फटका पडलेला आहे. लहान मुलाच्या तापासाठी इमर्जन्सी मध्ये गेल्याने १४००$ बिल लावले वगैरे किस्से ऐकले. मला हीच एक गोष्ट अजिबात आवडली नाही इथे. मेडिकल सारख्या गोष्टीत खरं तर माणसाला विचार न करता पटकन डॉक्टरकडे जाता यायलाच हवे. आपला देश अमेरिके एवढा विकसित नसला तरी अत्यंत परडवडेल अशी वैद्यकीय सुविधा तर देऊ शकतो. अगदी कितीही भारी दवाखान्यात गेलात तरी एवढे बिल होत नाही जेवढे अमेरिकेत साध्या तापासाठी होते. मी अजुन २-३ च डॉक्टर्स पाहिले आहेत, पण मला ते काही फार महान वाटले नाहीत. अगदीच साधारण होते. हॉस्पिटल्स सुद्धा ठिकच आहेत. इथे ज्यांना नोकर्‍या नाहीत असे अमेरिकन काय करतात? मेडीकल इन्शुरन्स नसलेल्या माणसाने काय करणे अपेक्षित आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 08/31/2016 - 07:07

Permalink

क्रूर वास्तव

इथे ज्यांना नोकर्‍या नाहीत असे अमेरिकन काय करतात? मेडीकल इन्शुरन्स नसलेल्या माणसाने काय करणे अपेक्षित आहे? आजारी न पडणे! कितीही दुष्टपणा वाटला तरी हे इथलं क्रूर वास्तव आहे! या सगळ्या अतिरेकी, अवास्तव बिलांच्या मुळाशी आहे चार्जमास्टर. २०१३ सालच्या ४ एप्रिलच्या टाईम नियतकालिकाच्या अंकात स्टीव्हन ब्रिल याने या प्रकाराची पोलखोल केली होती. हा अंक मिळवून लेख पूर्ण वाचाच! थोडक्यात, चार्जमास्टर ("hospital chargemaster" किंवा "charge description master" उर्फ CDM) एक master file असते ज्यात ५००० हून आधिक वेगवेगळ्या वैद्यकीय सेवांसाठीचे दर निश्चित केलेले असतात आणि हे दर वापरून बिलिंग केलं जातं. वास्तविक पहाता हे दर अतिरेकी चढ्या आणि अशक्य कोटीत वाटावेत इतक्या उच्च किंमतीचे ठेवलेले असतात. प्रत्येक हॉस्पिटलला आपलं वेगळ चार्जमास्टर राखण्याची कायद्याने मुभा आहे, आणि बरेचदा हा चार्जमास्टर अतिशय क्लिष्ट किंवा हॉस्पिटलच्या चीफ फायनॅन्शियल ऑफिसरलाच कळेल अशा सांकेतिक भाषेत असतो (हो, अगदी डॉक्टर्स ना देखील हा सहज कळू शकत नाही!) आणि हे अतिरेकी उच्च दर हा रेफरन्स पॉइंट धरून इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या सभासदांच्या संख्येच्या जोरावर हॉस्पिटल्सशी करार करून 'कमी' करून घेतात. आणि या अशा निगोशियेट केलेल्या दरांपैकी रुग्णाने किती आणि इंन्शुरन्स कंपन्यांनी किती भाग उचलायचा ते तुमच्या प्रिमियम प्रमाणे ठरतं. वर दिलेल्या दुव्यातूनः The impact of the chargemaster is such that those with good insurance or better access to means to afford quality healthcare pay the least for that care, whereas conversely uninsured, and others who pay out-of-pocket for healthcare pay the full chargemaster listed price for the same services. तेंव्हा - शक्यतोवर आजारीच न पडणं आणि उत्तम विमा घेणे इतकंच माणसांच्या हातात असतं! (अमेरिकेत व्हिटॅमिन्सची / सप्लीमेंट्सच्या दुकांनाची रेलचेल दिसते त्याच्या मागे ही प्रतिबंधात्मक उपाय करून आजार पण टाळणं ही प्रवृत्ती आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Wed, 08/31/2016 - 07:21

Permalink

खूप सुंदर विषयावर धागा काढला आहे !

जर्सी सिटी आणि न्यूयोर्क ला जाणे अजून जमले नाही पण जेंव्हा जाईन तेंव्हा हा धागा रेफर नक्की करीन. जेवढे अमेरिकेचे उत्तर भाग माहिती आहेत, तेवढी साउथची माहिती नाही. मी पण टेनेसी ला येताना लोकांनी खूप घाबरवले होते पण एका हिलीबिली गावात ७ वर्ष काढल्यावर साध्या अमेरिकेमधली सुंदरता दिसली. थोडे अवांतर-- मी विद्यार्थी असताना काही पैसे वाचवायचे मार्ग शोधून काढले आहेत त्याबद्दल थोडे काही (सगळे मार्ग लीगल आहेत, इललीगल पण माहिती आहेत पण कधी वापरले नाहीत.) १) कुठल्या पण कॉलेज town मध्ये (सिराकृझ, स्टीलवाटर इ.) गेला की युनिव्हर्सिटी च्या साईट वर जाऊन लोकल discount शोधून काढायचे. खूप ठिकाणी प्रत्येक दिवस हा वेगळ्या हॉटेल साठी असतो, उदा.सोमवार- बर्गर किंग, मंगळवार - लोकल बार्बेक्यू असे अजून काही ...खूप ठिकाणी युनिव्हर्सिटी id पण लागत नाही. २)AAA रोड assistance ची वार्षिक मेंबर बनायचे, कारवाल्यासाठी खूप उत्कृष्ट सेवा आहे. आणि त्या कार्ड वर खूप सारे इतर discounts मिळतात - रेंटल कार, six flags, hotels etc. ३)कार च्या विम्या वर तुमचे रोजचे माईलेज ५ miles पेक्षा कमी असेल तर सवलत मिळते. ४) गुडविल नावाच्या जुन्या वस्तूंच्या दुकानात खूप भारी पुस्तके (लोकांनी देऊन टाकलेली) कमी किमतीत मिळतात, फक्त दर आठवड्याला चक्कर टाकावी लागते. ५) क्रोगर मध्ये पेट्रोल टाकावे, वाल्मार्त मध्ये गाडीचे टायर घ्यावेत, लोकल मेक्यानिक शोधून काढावा. (खूप अवघड आहे ते !) असे अजून खूप सारे मार्ग आहेत, आत्ता एवढेच आठवत आहेत. माझा फेसबुक वर एक ओपन ग्रुप आहे, त्याची लिंक पोस्टतो आहे, कुक्वील नावाच्या छोट्या गावाच्या आसपासचे मागच्या ५-६ वर्षातील फोटो आहेत, मोस्टली सगळे मोबाईलवर काढलेले आहेत आणि ओपेन ग्रुप असल्याने इतर लोकांचे पण फोटो आहेत. त्यावर टेनेसी मधले मागच्या ५-६ वर्षातील सगळे सिझन तुम्ही एकावेळी अनुभवू शकतात. टेनसी मधली फोटोग्राफी !
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Wed, 08/31/2016 - 21:03

In reply to खूप सुंदर विषयावर धागा काढला आहे ! by जॅक डनियल्स

Permalink

+१

गुडविल मध्ये बाकीच्याही गोष्टी बर्‍याच स्वस्त मिळतात. मला आत्ताआत्तापर्यंत वाटायचे अश्या लोकांनी वापरलेल्या वस्तू कसल्या वापरायच्या पण अमेरिकेत बरेच लोक उगाचच सेल वर आहे म्हणून गोष्टी घेतात आणि न वापरता डोनेट करून टाकतात. पण तुम्हाला हवी तीच गोष्ट मिळेल असे काही नाही. त्यामुळे दर आठवड्याला चक्कर टाकण्याबाबत सहमत. टायर्स साठी कॉस्को बेश्ट. पूर्वी माझ्याजवळ कॉस्को नव्हते तेव्हा tirerack नावाच्या वेबसाईट वरून टायर्स मागवून लोकल टायरशॉप मधून mounting and alignment करून जवळ्पास $३०० वाचवले होते. आणि तिथे लोकांनी स्वत:चे अनुभव टाकलेले असतात त्यामुळे तुम्ही स्नो वगैरे साठी चांगले टायर्स घेऊ शकता. लोकल मॅकॅनिक बद्दल सहमत. मी अगदी काही महिन्यांपूर्वी पर्यंत कार डीलरशीप मध्येच जायचो. आता कारची सगळी वॉरंटी वगैरे संपल्यामुळे म्हटले लोकल ठिकाणी जाऊन बघू. अगदी चांगला अनुभव. अगदीच विश्वास नसेल तर मग midas अथवा monroe मधे गेलात तरीही काहीशे डॉलर्स वाचतात कार डीलरशीप च्या तुलनेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Wed, 08/31/2016 - 22:25

In reply to +१ by लंबूटांग

Permalink

गुडविल हे दुकान खरच खुप मस्त

गुडविल हे दुकान खरच खुप मस्त आणि स्वस्त आहे खरेदी करता. मी अत्तापर्यन्त स्वैपाक्घरातील काही भांडी आणि चहाचे कप आणले आहेत. खूप कमी किमतीत खूप छान वस्तु मिळतात. असं एखादं दुकान भारतात पण असायला हव असं वाटून गेल, जिथ वस्तू दान पण करता येतील आणि कमी किमतीत विकत पण घेता येतील. आजून इथल्या एका गोष्टीचं मला अप्रुप वाटलं ते म्हणजे लोक सहज घरातलं फर्निचर फुकट लोकांना देऊन जातात. कधी ते घराच्या बाहेर ठेवून जातात तर कधी क्रेगलिस्ट सारख्या साईट्स वर जाहिरात टाकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अंतु बर्वा on Mon, 09/12/2016 - 21:06

In reply to खूप सुंदर विषयावर धागा काढला आहे ! by जॅक डनियल्स

Permalink

AAA बद्दल सहमत. गुडविलबद्दल

AAA बद्दल सहमत. गुडविलबद्दल ठाउक नव्हतं, इथे आहे का पाहतो. याव्यतिरिक्त, काही मोजकी चांगला कॅशब्याक देणारी क्रेडिट कार्ड हाताशी असु द्यावीत. बर्याच क्रेडिट कार्ड्सवर २ ते ३ टक्क्यांपर्यंत कॅशब्याक असतो. डिस्कवर, चेस फ्रीडम सारखी कार्डे दर तिमाहीला बदलत्या कॅटेगरीनुसार कधी रेस्टॉरंटमधे तर कधी गॅसवर ५ टक्क्यांपर्यंत कॅशब्याक देतात. पहायला कमी वाटत असले तरी थेंबे थेंबे तळे साचेचा प्रत्यय येतो. इथे क्रेडिट हिस्ट्री इतकी महत्वाची असल्याने उठसुठ क्रेडिट कार्ड काढणे चांगले नसले तरी इनस्टोर लॉयल्टी कार्ड आणी क्रेडिट कार्डात फरक असतो आणी त्याने क्रेडिट हिस्ट्रीला हानी पोहचत नाही हे लक्शात ठेउन इन स्टोर कार्ड्सना बिचकु नये (काही अपवाद अर्थातच आहेत). तसेच बर्याच स्टोर्स मधे १५ ते २० टक्के डिस्काउंट कुपन तुमच्याकडे नसेल तरी कॅशिअरला ते अप्लाय करायची ओथोरिटी असते, पण आपण विचारल्याशिवाय करत नाहीत. अशा ठिकाणी या डिस्काउंट बद्दल विचारायला लाजु नये. अ‍ॅडिशनली एखाद्या होलसेल क्लबची मेंबरशीप घेउन ठेवावी. बल्क मधे लागणार्या बर्याच गोष्टींमधे चांगला फायदा होतो. बरेच क्लब्स सेकंडरी मेंबर अ‍ॅड करु देत असल्याने जमल्यास एखाद्या मित्रासोबत मेंबर्शीप कॉस्टही शेअर करता येइल.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Wed, 08/31/2016 - 07:27

Permalink

हम्म

हम्म इथे ज्यांना नोकर्‍या नाहीत असे अमेरिकन काय करतात? -- काही जणांना सरकार पोसते. जे लोक त्यांच्या क्रायटेरिया मध्ये बसत नाहीत ते भीक मागतात. 'Homeless, Need Help, God Bless You' असा एक बोर्ड बनवायचा आणी फूटपाथ वर सिगारेटी फुकट बसायचे भीक मागत. अमेरिका म्हणजे स्वर्ग असे अजिबात नाही. मी सद्ध्या पिट्सबर्ग मध्ये आहे. संध्याकाळी तुम्ही डाउनटाऊन एरियात जाण्याची हिम्मत करू शकणार नाही. कोण कधी तुमच्याकडे काय मागेल ह्याचा नेम नाही. कुणीतरी अचानक आडवा येऊन सिगारेट किंवा लायटर मागू शकतो आणी तुमच्याकडे नसेल तर ह्या क्षुल्लक कारणासाठी जवळचे जे काही हत्यार असेल ते बाहेर काढून काहीही करू शकतो. भारतात असे होण्याची शक्यता खूप कमी, जवळपास नाहीच.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 08/31/2016 - 18:39

In reply to हम्म by अभिजीत अवलिया

Permalink

हो मी म्हणलं ना.. अमेरिकेत

हो मी म्हणलं ना.. अमेरिकेत मजा असते ही अफवा आहे. भारतात खुप सोप्प्या आहेत गोष्टी. तुम्ही रस्त्यावरची गुंडागर्दी सांगताय. मी जिथे रहाते ती मोठी सोसायटी आहे. एकांना घरात पुरळ उठाण्याचा त्रास होऊ लागला तर पेस्ट केंट्रोल करायला मॅनेजमेंटचे लोक आले. एक स्प्रे मारला थोडासा. बिल ८५०$!! त्यांनी जाऊन खुप बोलायचा प्रयत्न केला. पण काही फरक पडला नाही. शेवटी २ दिवसात बिल नाही भरलं तर वकिलाकडे केस जाईल अशी धमकी आली. भरले पैसे गुपचुप.. आपल्याकडेही विचित्र प्रकार होता. फ्रस्ट्रेट होतोच भारतातही.. पण मला तिथलं सगळं माहिती आहे. इथे मला काहीच माहिती नाही. आपण इथले नागरिकही नाही. अमेरिकेत असतील काही गोष्टी अत्यंत भारी.. तरीही आपला देश तो आपला देश रे बाबा...
  • Log in or register to post comments

Submitted by राघवेंद्र on Wed, 08/31/2016 - 18:54

In reply to हो मी म्हणलं ना.. अमेरिकेत by पिलीयन रायडर

Permalink

पिरातै, इथे म्हण आहे की

पिरातै, इथे म्हण आहे की "अमेरिका चालू होते पेनसिल्व्हानिया राज्यापासून" न्यू यॉर्क सिटी, न्यू जर्सी ही खरी अमेरिका नाही. बाकी लवकर कार शिका आणि जर्सी सिटी तुन बाहेर या.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 08/31/2016 - 19:22

In reply to पिरातै, इथे म्हण आहे की by राघवेंद्र

Permalink

कार फोबिया संपला की ते ही

कार फोबिया संपला की ते ही करणारच! बाकी रेवाक्काही हेच म्हणली होती, की तू रहातेस ती काही खरी अमेरिका नाहीच! कार न येणार्‍यांसाठी बरीये खोटी अमेरिका =))
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Wed, 08/31/2016 - 20:57

In reply to कार फोबिया संपला की ते ही by पिलीयन रायडर

Permalink

लोल..

लोल.. इथे कार चालवायला काही ही कष्ट लागत नाहीत असं माझं मत झालंय. खरे स्किल्स मॅन्युअल कार चालवायला लागतात. एक त्रास होतो, तो म्हणजे रुल्स अक्षरशः घोटावे लागतात. पण ते एकदा घोटले की गाडी रस्त्यावरुन चालवण्याइतकं सोपं काम नाही. सगळा विचार त्यांनी करुन च ठेवलाय , आपण आपलं डोकं न चालवता फक्त तो फॉलो करायचा. सर्वसामान्य संकेत फॉलो करायचे की झालं. बाकी कार चालवायला ना बॅलन्स सांभाळावा लागतो ना क्लच - गीअर ची कसरत करावी लागते. त्
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Wed, 08/31/2016 - 23:08

In reply to कार फोबिया संपला की ते ही by पिलीयन रायडर

Permalink

लवकर गाडी शिका

ज्याच्या बायकोला गाडी येते तो सुखी नवरा. त्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी गाडी हाकावी लागत नाही. तिला किंवा बाळाला कुठे जायचे म्हणून ऑफिस सोडून यावे लागत नाही. तिला पण हवी तशी गाडी चालवायला मिळते. एकदा नियम पक्के लक्षात आले कि गाडी चालवणे सोपे आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com