✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काय, कधी कुठे? - अमेरिका

प
पिलीयन रायडर यांनी
Sat, 08/27/2016 - 18:34  ·  लेख
लेख
अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं.. तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं. जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत. आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली! किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं! अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल! धन्यवाद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
देशांतर
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
107543 वाचन

💬 प्रतिसाद (227)

प्रतिक्रिया

न्यू यॉर्क सिटी, न्यू जर्सी

पद्मावति
Wed, 08/31/2016 - 20:17 नवीन
न्यू यॉर्क सिटी, न्यू जर्सी ही खरी अमेरिका नाही.
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

पेस्ट केंट्रोल चे पैसे घेतले..

टिवटिव
Wed, 08/31/2016 - 22:11 नवीन
मी तर जिथे जिथे राहिलोय...तीथे पेस्ट केंट्रोल आणि बाकि मेंटेनंस कम्युनिटि मॅनेजमेंटचे लोक करतात,,,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+1

अनन्त अवधुत
Wed, 08/31/2016 - 23:10 नवीन
माझा पण हाच अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिवटिव

डिपेंन्ड्स

पिवळा डांबिस
Wed, 08/31/2016 - 23:57 नवीन
जर तुम्ही अपार्ट्मेंट भाड्याने घेतलेलं असेल तर पेस्ट कंट्रोल मॅनेजमेंट किंवा घरमालक करतो. जर तुमच्या मालकीचं असेल्,तर जरी अपार्टमेंट/ कॉन्डो असेल तरी पेस्ट कंट्रोल तुम्हाला कराव लागतं. प्रायव्हेटली करून घ्यायचं असलं तरी बहुतेक पेस्ट कंट्रोलवाले आधी येऊन पहाणी करून खर्चाचं एस्टिमेट देतात. ते फुकट असतं. असे दोन-चार पेस्टवाले बोलावून मग त्यातला पसंत असेल/ परवडेल अशा एजन्सीकडून ते काम करून घ्यायचं असतं. एस्टिमेट असल्याने खर्चाचा आगवू अंदाज असतो. एकदम भरमसाठ बिल आलं असं सहसा होत नाही. त्यामुळे वर दिलेली घटना अविश्वसनीय जरी नसली तरी स्ट्रेन्ज वाटते आहे. प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धती असतात. त्या अनुभवाने किंवा दुसर्‍याना सतत विचारून माहिती मिळवून आत्मसात करता येतात. त्यादृष्टीने हा धागा चांगला आहे. बाकी एक नोकरी, जुनी का होईना एक धडकी कार, मेडिकल इनशुरन्स, आणि हो, एक सुगरण विंडियण बायको असेल तर अमेरिकेसारखं सुख नाही!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिवटिव

चोक्कस...

टिवटिव
गुरुवार, 09/01/2016 - 00:45 नवीन
चोक्कस...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मग कोणता मेडिकल इन्शुरन्स

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 00:46 नवीन
मग कोणता मेडिकल इन्शुरन्स घ्यावा, त्यात काय पहावं वगैरे सांगा की! इथे लई दणके बसु लागलेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

एम्प्लोयर चा

टिवटिव
गुरुवार, 09/01/2016 - 00:53 नवीन
एम्प्लोयर जो देत असेल तो घ्यावा...आणि डॉ इन नेटवर्क असेल ते पहावे. बाकि मुलाच्या सोनोग्राफिचे ३०० मीहि भरलेत :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अमेरिकेसारखं सुख नाही!!!

अभिजीत अवलिया
गुरुवार, 09/01/2016 - 00:53 नवीन
अमेरिकेसारखं सुख नाही!!! --- असहमत. भूतान हा एक दुर्लक्षित गरीब देश जगातील सर्वात सुखी देश म्हणून ओळखला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

भूतानचे कौतुक सांगत बसला तर

अभ्या..
गुरुवार, 09/01/2016 - 10:42 नवीन
भूतानचे कौतुक सांगत बसला तर 100 प्रतिसाद सोडा, सहमत म्हणायला पण कोण येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

+१०००

संदीप डांगे
गुरुवार, 09/01/2016 - 10:46 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भूतानला जायचे खूप डोक्यात

अभिजीत अवलिया
गुरुवार, 09/01/2016 - 18:43 नवीन
भूतानला जायचे खूप डोक्यात बसलेय. जायलाच हवे आता एकदा का हा देश जगातला सर्वात सुखी देश आहे ते बघायला ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

फनी

पिवळा डांबिस
Fri, 09/02/2016 - 08:25 नवीन
भूतान हा एक दुर्लक्षित गरीब देश जगातील सर्वात सुखी देश म्हणून ओळखला जातो.
चला, आपण सगळे मिळून भूतानमध्येच जाऊन स्थायिक होऊयात!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

तुम्हाला ना कुण्णाचं सुख रुचत

संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 09:09 नवीन
तुम्हाला ना कुण्णाचं सुख रुचत नै बघा... आपणे सगळे तिकडे गेल्यावर सर्वात सुखी राहिल का तो? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अमेरिकेत देशांतर्गत प्रवास

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 08/31/2016 - 21:20 नवीन
अमेरिकेत देशांतर्गत प्रवास करण्यासंबंधी प्रश्न इथे विचारले तर चालतील का?
  • Log in or register to post comments

चालतील? पळतील :-)

बहुगुणी
Wed, 08/31/2016 - 21:22 नवीन
खूप जण सहर्ष मदत करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ओके. मग मला एक सांगा, लॉस

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 08/31/2016 - 21:28 नवीन
ओके. मग मला एक सांगा, लॉस एंजलीस ते फ्रीमॉंट किती अंतर असेल? बाय रोड कसे कसे जायला लागेल, कार विथ ड्रायव्हर रेण्ट केल्यास काय दर पडेल?आपल्याकडे असतात तसेच अमेरिकेत असतात का दर? म्हणजे पर किमी फिक्स दर + ड्रायव्हर भत्ता त्यात दिवसाला अमुक किमी झाले पाहिजेत वगैरे, येणार पाहुणा अमेरिकन licence बाळगत नाही म्हणून तो ड्राईव्ह करू शकणार नाहीये, ज्यांच्याकडे जातोय त्यांना सरप्राईज द्यायचे आहे, म्हणून त्यांना एअरपोर्ट वर बोलावू शकत नाही, अश्या कंडिशन आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

बापू साहेब

राघवेंद्र
Wed, 08/31/2016 - 21:35 नवीन
ही चायनीज कंपनी स्वस्तात बस सेवा पुरवते. http://www.gotobus.com/fremont-to-los-angeles-bus/ तसेच उबेर हा चांगला पर्याय लोकल टॅक्सी साठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

फ्रिमाँटला पोहोचायला लॉस

नाटक्या
गुरुवार, 09/01/2016 - 02:43 नवीन
फ्रिमाँटला पोहोचायला लॉस एंजलेस पासून साधारण्तः ६ तास लागावेत. मी फ्रिमाँट्मध्येच रहातो.. - नाटक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

लॉस एंजेलिस ते फ्रीमाँट

बहुगुणी
Wed, 08/31/2016 - 22:22 नवीन
हे फ्रीमाँट बे एरिया कॅलिफोर्निया मधलं आहे असं धरून चालतो आहे. (याच नावाचं छोटं गाव एक तर कॅलिफोर्नियात उत्तरेला योलो काऊंटीत नाही तर नेब्रास्का राज्यात आहे.) ओके. मग मला एक सांगा, लॉस एंजलीस ते फ्रीमॉंट किती अंतर असेल? ३६० मैल, या अंतरासाठी साधारण साडे सहा तास लागतील ट्रॅफिक सुरळीत असेल तर. बाय रोड कसे कसे जायला लागेल? हा नकाशा पहा. कार विथ ड्रायव्हर रेण्ट केल्यास काय दर पडेल? ह्म्म! अमेरिकेत ही चैन परवडणारी नाही हो! इथे फारतर दारू पिऊन विमान उडालेल्या लोकांना बदली ड्रायव्हर देऊन ५०-१०० मैलांवर घरी पोहोचवणार्‍या कंपन्या आहेत. आणि अशा महागड्या सेवा मिळवण्यापेक्षा लॉस एंजेलिस ते सॅन होजे विमान (पुढे टॅक्सी ने फ्रीमाँट) परवडेल; अंदाजे १००-३०० डॉलर्स खर्च येईल आणि साडेतीन तास लागतील. आपल्याकडे असतात तसेच अमेरिकेत असतात का दर? उत्तर गैरलागू आहे कारण तुमचे परिचित ड्राईव्ह करणार नाही आहेत, तरीही तुम्ही स्वतः चालक असाल तर गाडी भाड्याने घेण्याचे दर साधारण $५० दिवसाला (इंन्शुअरंस सह) पडतो, पेट्रोल वेगळे (हा खर्च या अंतरासाठी साधारण $१०० तरी येईल). ज्यांच्याकडे जातोय त्यांना सरप्राईज द्यायचे आहे, म्हणून त्यांना एअरपोर्ट वर बोलावू शकत नाही मला वाटतं विमान प्रवास हाच कमी वेळाचा, कमी खर्चाचा मार्ग ठरेल (LAX-San Jose by flight San Jose-Fremont Taxi), खर्च अंदाजे $२५० च्या आसपास यावा. दुसरा थोडा आधिक वेळ खाणारा (८-एक तास) मार्ग म्हणजे लॉस एंजेलिस विमानतळापासून युनियन स्टेशन वर शटल ने जावं ($२०), आणि तिथून आधी पॅसिफिक सर्फलाईनर या ट्रेन ने सॅन लुईस ओबिस्पो इथे आणि मग तिथून एका छोट्या बस कनेक्शन नंतर कॅपिटॉल कॉरिडॉर या ट्रेन ने सॅन होजे ट्रेन स्टेशन पर्यंत जावं (अंदाजे $१०० लवकर अ‍ॅड्व्हान्स बुकिंग केलं तर, यात मधलं बस कनेक्शन अंतर्भूत आहे). शेवटी फ्रीमाँट पर्यंत टॅक्सी ($७५!) ग्रे हाऊंड बसने जाणं हाही एक मार्ग आहे, पण १० तास लागतील, अंदाजे $७५ सॅन होजे पर्यंत, तिथून पुढे टॅक्सी ने $७५. राईडशेअर हा आणखी एक मार्ग आहे, पण सहप्रवासी कोण आहेत आणि वाहन कसं आहे, इंन्शुअरन्स कव्हरेज काय असेल या सगळ्या unknown गोष्टी आहेत. तात्पर्यः विमान + घरापर्यंत टॅक्सी हा पर्याय सोपा ठरावा. आणि एकः कुणी सांगावं, हे परिचित ज्या दिवशी लॉस एंजेलिसला पोहोचतील त्या दिवशी कुणी सहृदय मिपाकर तिथून बे एरियात जाणार असतील तर सहप्रवासाची सोय होऊ शकेल, तेंव्हा याच धाग्यात चौकशी करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

आपला अत्यंत आभारी आहे सर,

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 08/31/2016 - 22:42 नवीन
आपला अत्यंत आभारी आहे सर, संबंधितांस आपला हा जिव्हाळ्याचा अन अत्यंत उपयोगी सल्ला लवकरात लवकर पोचता करतो :), राघवभाऊ आपला ही आभारी आहे हो मी _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अमेरिकेत भारतीय आभिजात

सुबोध खरे
गुरुवार, 09/01/2016 - 00:15 नवीन
अमेरिकेत भारतीय आभिजात संगीताचे कार्यक्रम करणारी संस्था आहे तालसाधना. http://googleweblight.com/?lite_url=http://www.taalsadhana.com/contact-us&ei=YSBlGt6J&lc=en-IN&s=1&m=996&host=www.google.co.in&ts=1472668399&sig=AKOVD65FAHXchP0AgSx2oHarJ35zbn180Q सप्टेंबर मध्ये पं.जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन आहे.
  • Log in or register to post comments

न्यु यॉर्क आणि जर्सी ही खरी

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 00:19 नवीन
न्यु यॉर्क आणि जर्सी ही खरी अमेरिका नाहीच असं म्हणणार्‍यांनो.. इथल्या अमेरिकन माणसांचेही हेच मत दिसते! एक अमेरिकन माणुस अबीरसोबत बस मध्ये गप्पा मारत बसला होता. तो ही त्याला हेच सांगत होता की "ही" अमेरिका काही छान नाही.. तू दुसरीकडे जा! ती फार छान अमेरिका आहे! (म्हणजे कुठे जा ते काही कळाले नाही..!) तर आमच्यासारख्या ह्याच भागात सध्यातरी अडकलेल्यांना जरा सांगाल का की ठराविक टुरिस्ट प्लेस सोडुन आवर्जुन अमेरिकेत काय पहावे. त्यासाठी कार लागणार असेल तर मित्रमंडळी जमवता येतील. कदाचित आमचंच लायसन्स येईलही.. आणि इथे आहोतच तर चुकवु नयेत अशा जागा असतील तर जमवु काही पण.. की तुम्ही लोक इथे लॉन्ग टर्म रहाण्याच्या दृष्टीने म्हणत आहात? की सिटीतले आयुष्य, मेट्रो वगैरे काही खरी अमेरिका नाही.. अमेरिकन माणसाचे खरे आयुष्य पहायचे असेल, अनुभवायचे असेल तर सिटी बाहेर पडावे लागेल.. असे काही?
  • Log in or register to post comments

काय बघायचंय ते तर सांगा!

पिवळा डांबिस
गुरुवार, 09/01/2016 - 00:35 नवीन
वणवे बघायचे असतील तर दक्षिण कॅलिफोर्निया बेष्ट! पूर बघायचे असतील तर मग ह्यूस्टन टेक्सासला जायचं! गोळीबार वगैरे बघायचा असल्यास डायरेक शिकागो!! सौथिंडियात रहायचा फील घ्यायचा असेल तर बे एरिया आहेच!! आणि माणसांचाच जर कंटाळा आला सेल तर मग मोन्टानाला पर्याय नाही!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

=))

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 00:45 नवीन
=)) आणि अमेरिकेत अजुन पोहचलोच नाही, अजुन भारतातच आहोत असं वाटुन घ्यायचं असेल तर जर्सी सिटी मध्ये!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

=)) +१

पद्मावति
गुरुवार, 09/01/2016 - 00:59 नवीन
=)) +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

एकदम चोक्कस!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 09/01/2016 - 00:59 नवीन
विशेषतः न्यूजॉयशीतल्या इंडियन भाजी स्टोअरमध्ये तोंडली वगैरे विकत घेतांना त्या म्हातारपणाकडे झुकलेल्या गुजराथी बायका दोन्ही कोपरांनी आपल्याला दूर ढकलतात त्या संस्कृतीला तर तोड नाही!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पिडा काका लय भारी निरीक्षण!!!

राघवेंद्र
गुरुवार, 09/01/2016 - 01:18 नवीन
पिडा काका लय भारी निरीक्षण!!! कार भाड्याने केली की सध्या स्वामीनारायण मंदिर, रॉबिन्सविले बघायला नक्की या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पण एक आहे हं आपल्या लोकांसाठी

पद्मावति
गुरुवार, 09/01/2016 - 01:33 नवीन
पण एक आहे हं आपल्या लोकांसाठी nj स्वर्ग से सुंदर आहे :) काय ती तोंडली, काय ती गवार, इडल्या म्हणू नका, करंज्या म्हणू नका, पटेल म्हणू नका, पतिदार म्हणू नका...दुर्गा टेम्पल, साई टेम्पल, होळी, दिवाळी, दांडिया, गणपती...घरात फोडणी केली आणि कढीपत्ता आणायला पाच मिनिटात इंडियन स्टोर मधे जाउन येणे, घरापासून 10 मिनिटे ड्राइविंग रेडियस मधे सात आठ ग्रोसरी स्टोर्स, चार देवळे आणि असंख्य इंडियन रेस्टोरेंट्स हे फक्त आणि फक्त nj मधेच... :) राघव म्हणताहेत त्याप्रमाणे स्वामी नारायण ला जाऊन येणे. अजुन अर्धं बांधून झालंय पण तरीही खूप सुंदर आहे. तो रॉबिन्सविल, प्लेन्सबॉरो, वेस्ट विंड्सर भाग आता एडिसन होत चाललाय. सगळं मिळतं तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

लॉस एंजेलेस मध्यवर्ती ठेउन

खटपट्या
गुरुवार, 09/01/2016 - 01:23 नवीन
लॉस एंजेलेस मध्यवर्ती ठेउन कॅलीफोर्नियात बघण्यासारखी ठीकाणे. युनीवर्सल स्टूडिओ डीस्ने लँड वॉटर वर्ल्ड (सॅन दीएगो) सॅन फ्रान्सीस्को वेगास ग्रँड कॅनियन योशमाइट, रेडवूड फॉरेस्ट, मीरवूड फॉरेस्ट लेक टाहो - स्वप्नवत फक्त मोठे लोक -डेथ व्हॅली अजून आठवतील तशी सांगतो. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हींगची आवड पाहीजे कींवा सतत चार चार तास गाडी चालवण्याची तयारी पाहीजे. भाड्याची गाडी घ्या. अगदी नवीन गाडी मिळते. तुम्ही भारतात गाडी चालवली असेल तर इकडे गाडी चालवणे म्हणजे प्लेजर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

न्यू जर्सीमधून जवळ ठीकाणे.

खटपट्या
गुरुवार, 09/01/2016 - 01:31 नवीन
न्यू जर्सीमधून जवळ ठीकाणे. स्टॅच्यू ओफ लीबर्टी टाइम स्क्वेअर समोरच मादाम तुसाद बाजुलाच रेपलीज बीलीव्ह ऑर नॉट एम्पायर स्टेट बील्डींग सेंट्रल पार्क जरनल स्क्वेअर ठेसनातून पाथ घेउन ३३र्ड स्ट्रीटला उतरा. बाहेर आलात की १५ मिनीटावर चालत टाइम स्क्वेअर आहे. एम्पायर स्टेट बील्डींगच्या खाली बरेच लोक न्यु योर्क दर्शन बसचे ब्रोशर घेउन उभे असतात त्यांच्या कडून ब्रोशर घेउन कधी काय बघायचे ते ठरवा..बसची ट्रीप घेउ नका. ते खूप वरवर दाखवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

https://www.facebook.com

सुबोध खरे
गुरुवार, 09/01/2016 - 00:19 नवीन
https://www.facebook.com/events/280627885613577/?ti=as 4 सप्टेंबर ला हा कार्यक्रम आहे.
  • Log in or register to post comments

पिरा, जरा शांत बसलीस तरी

रेवती
गुरुवार, 09/01/2016 - 01:21 नवीन
पिरा, जरा शांत बसलीस तरी आम्ही उपाय सुचवू शकू. ;)
  • Log in or register to post comments

पुढच्या आठवड्यात शाळा सुरु

राघवेंद्र
गुरुवार, 09/01/2016 - 01:25 नवीन
पुढच्या आठवड्यात शाळा सुरु होत आहे तेंव्हा व्यस्त होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हात शिवशिवत आहेत ग तोंडली आणि

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 01:37 नवीन
हात शिवशिवत आहेत ग तोंडली आणि गवार वगैरे वाचुन! पण तू म्हणतेस तर ३.५ मिनिटं नाही देणार प्रतिसाद! आणि "उपाय" काय??? =)) (सवय झाली रेवाक्काला आता मला सतत उपाय सुचवत रहाण्याची!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

लोल :)

आनन्दिता
गुरुवार, 09/01/2016 - 02:01 नवीन
लोल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

Driving license

chetanlakhs
गुरुवार, 09/01/2016 - 01:28 नवीन
You can easily get NJ driving license using your Indian DL. Just go to Bayonne, NJ DMV (Bayonne is a small town next to Jersey City). If you have valid Indian DL, you just need to pass the written exam and they waive off your road test. Once you get any American DL, you are free to drive across America.
  • Log in or register to post comments

आरोग्य सेवा: इंन्शुअरंस ला काही पर्याय

बहुगुणी
गुरुवार, 09/01/2016 - 01:48 नवीन
साध्या दुखण्यांसाठी किंवा जुन्या दुखण्याच्या दीर्घकालीन औषधांसाठी (maintenance medications for chronic illnesses) इंन्शुरंस ची मदत न घेता स्वतःच रोख पैसे देणं हे बरेचदा स्वस्त पडू शकतं. तुमच्या राज्यात Direct Primary care Practice कुठे आहेत ते शोधून, तसंच कॅश-ओनली फार्मसीज, किंवा औषधं विकत घेण्याआधी तुलनात्मक शोध घेऊनही पैसे वाचवता येतात. उदाहरणार्थ, न्यू जर्सी राज्यात फेअरफील्ड इथे कंटिन्युअम केअर हे वैद्यकीय सेवा केंद्र महिना १८० डॉलर्स अशा सभासदत्वामध्ये तिघांच्या साधारण आरोग्याची काळजी घेते असं वरील दुव्यावरून दिसतं. Direct Primary care practitioner चा माझा वैयक्तिक दोन राज्यांमधला अनुभव चांगला आहे, हे डॉक्टर्स भारतातील जुन्या जनरल फिजिशियन सारखे वाटले, अनावश्यक टेस्ट्स टाळणारे आणि रास्त खर्चातच आधुनिक टेस्ट्स करणारे.
  • Log in or register to post comments

राघव८२ ह्यांनी वर सांगितल्या

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 20:18 नवीन
राघव८२ ह्यांनी वर सांगितल्या प्रमाणे
सार्वजनिक गणेश उत्सव या वर्षी एडिसन मध्ये नसुन तो जर्सी सिटी मध्ये आहे. स्थळ : 792 Newark Avenue, Jersey City, NJ 07306 तारीख : ५ -११ सप्टेंबर, २०१६ सकाळी १० ते रात्री १० वाजता संदर्भ :http://www.oaktreeroad.us/edison-news-corner.html
ह्याला कुणी मिपाकर येणार आहेत का? असतील तर एक कट्टा होऊ शकतो. १०-११ च्या वीकांताला भेटता येईल. मी जवळच रहात असल्याने येऊ शकते. शिवाय इंडीयन स्ट्रीट जवळच असल्याने खादाडी सुद्धा होईलच. कुटूंबवत्सल लोकांचा आठवड्याचा बाजार होऊ शकतो!! हे ठिकाण पाथने येण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट फर्निचर

चित्रगुप्त
Fri, 09/02/2016 - 02:55 नवीन
अगदी नवीन किंवा डोनेट केलेले उत्कृष्ट दर्जाचे फर्निचर आणि अन्य घरगुती वस्तु अल्प किमतीत मिळवण्यासाठी अमेरिकेतील अनेक शहरात असलेल्या ' हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी रिस्टोअर' च्या केंन्द्राला भेट द्या. आपल्या एरियातील केंद्र खालील दुव्यावरून हुडकू शकता: http://www.habitat.org/restores Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

धागाकर्तीचे आभार

श्रीरंग_जोशी
Fri, 09/02/2016 - 08:57 नवीन
सक्रीय मिपाकरांच्या संख्येच्या बाबतीत भारतानंतर दुसरा क्रमांक असलेल्या अमेरिकेला मिपावर एवढा वाव मिळाल्याचे मी प्रथमच अनुभवतो आहे. याकरिता धागाकर्तीचे कितीही आभार मानले तरी ते कमीच. मिनेसोटातल्या ट्विन सिटीजमधल्या मराठी मंडळींशी संबंधीत आगामी घडामोडी.
  • गणेशोत्सव (स्थापना: ४ सप्टेंबर, विसर्जन: ११ सप्टेंबर)
  • मराठी नाटक - कार्टी काळजात घुसली: ५ सप्टेंबर
  • Log in or register to post comments

काही जुने दुवे

श्रीरंग_जोशी
Fri, 09/02/2016 - 09:00 नवीन
या धाग्याला भेट देणार्‍यांना खालील दुवे उपयुक्त वाटू शकतात.
  • मदत हवी आहे
  • अमेरीकेतून भारतामध्ये नेण्यासारख्या भेटवस्तू
  • Log in or register to post comments

जर्सीचा राजा!!!

पिलीयन रायडर
Mon, 09/12/2016 - 19:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यवाद पिरातै !!!

राघवेंद्र
Mon, 09/12/2016 - 19:22 नवीन
आज विचारणारच होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

एडिसन चा राजा !!!

राघवेंद्र
Mon, 09/12/2016 - 19:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अहा! ही पण मुर्ती खुपच मोठी

पिलीयन रायडर
Mon, 09/12/2016 - 19:28 नवीन
अहा! ही पण मुर्ती खुपच मोठी आहे!! माझ्या अपेक्षेपेक्षा खुपच जोरात झाला हो गणेशोत्सव! प्रसादाचा शिरा तर फारच अहाहा होता! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

गणपती विसर्जन न

राघवेंद्र
Mon, 09/12/2016 - 19:33 नवीन
सप्टेंबर १८ ला सुमा फूड्स ने गणपती विसर्जन Johnson Park, Grove 4, Piscataway, NJ इथे आयोजित केले आहे. अधिक माहिती व तिकिटासाठी http://www.sumafoods.com/ इथे संपर्क साधा.
  • Log in or register to post comments

अमेरिकेत पाहण्यासारखे

मिसळ
Mon, 09/12/2016 - 20:24 नवीन
अमेरिकेत पाहण्यासारख्या / चुकवू नये अशा गोष्टी मध्ये नॅशनल पार्क येतील. उदा. योसेमिटी , ग्रँड कॅनियन , यलोस्टोन, आर्चेस, ब्रायस, झायन. त्याव्यतिरिक्त सांता फे, न्यू ऑर्लीयन्स सारखी काही स्वताचे वेगळेपण जपणारी शहरे आहेत. बाकी अमेरिकेत जे टुरिस्ट स्पॉट आहेत तसे जगभर अनेक ठिकाणी आहेत.
  • Log in or register to post comments

अमेरिकेतल्या लोकांनो.. एक मदत

पिलीयन रायडर
Wed, 09/21/2016 - 23:36 नवीन
अमेरिकेतल्या लोकांनो.. एक मदत कराल का? नवर्‍याला कुठेही जायला सध्या सुट्टीच मिळत नाहीये. मिळेल ती आता ख्रिसमस - न्यु इयर ह्याच आठवड्यात. तर फिरायला जाण्यासाठी ह्या काळात सर्वात चांगला पर्याय कोणता? मला क्रुझ काय प्रकार असतो ते ही एकदा बघायचे होते. कुणाला अनुभव आहे का? सोबत अबीर असल्याने वेस्ट कोस्टला गेलो तरी वेगसमध्ये कसे जमवावे हा प्रश्न आहे. पण वेस्ट कोस्टही बघायची इच्छा आहे. तर काय करावे?
  • Log in or register to post comments

पिरा, वेस्ट कोस्ट मस्तं आहेच

पद्मावति
गुरुवार, 09/22/2016 - 00:04 नवीन
पिरा, वेस्ट कोस्ट मस्तं आहेच पण अजुन एक ऑप्षन म्हणजे कॅरिबियन आइलॅंड्स ला जा. बहामा आणि प्यूरिटो रीको सगळ्यात जवळचे पर्याय आहेत. बहामा ला मी कधीही गेली नाहीये पण पोर्टो रीको ला आम्ही नेहमी जायचो. मस्तं आहे. नेवर्क ते सॅन जुआन अगदी तीन तासांची फ्लाइट आहे. क्रूज़ चा मात्र अनुभव नाही मला:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

करिबिअन टाळा सध्या. झिका

स्रुजा
गुरुवार, 09/22/2016 - 00:08 नवीन
करिबिअन टाळा सध्या. झिका व्हायरस चा हाय अलर्ट आहे तिकडे. पिरा एल ए वगैरे पण बघ अबीर साठी युनिव्हर्सल , डिझ्ने लँड्स वगैरे पर्याय आहेत तिथे. फ्लॉरिडा ला जाऊ शकतेस किंवा एस एफ ओ - तिथे करायला खुप काही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा