नमस्कार, मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी
करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख
सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर
कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघूनघ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना ?
काही प्रश्नांचे दुवे.
१) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही.
२) टंकलेखन साहाय्य
३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा
५) आपले संकेताक्षर (पासवर्ड) कसे बदलावे?
६) काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
७) वाचनखुणा कशा साठवाव्या?
८) दुवा (लिंक) कसा द्यावा.
प्रतिक्रिया
8 Aug 2015 - 7:20 pm | S Kunal
लेख डिलिट कसा करावा. याविशयी सांगावे
24 Aug 2015 - 11:26 am | harshad shah
24 Aug 2015 - 11:36 am | harshad shah
24 Aug 2015 - 11:45 am | harshad shah
24 Aug 2015 - 11:54 am | harshad shah
28 Sep 2015 - 6:49 am | श्रीकृष्ण सामंत
मला माझ्या मुळ लेखात (पोस्टमधे) काही बदल करायचा असेल किंवा संपादन करायचं असेल तसंच मी दिलेल्या प्रतिसादात संपादन करायचं असेल तर कसं करायचं.कृपाकरून समजावावं.
8 Oct 2015 - 8:08 pm | कौशिक लेले
पूर्वी मिपा वर लेखन केले होते. पण आज काही केल्या नवीन लेख कुठून लिहायचा तेच कळत नाहीये.
मग बऱ्याच वेळानी लक्षात आले की "आवागमन" मध्ये "लेखन करा" दिसतंय
त्यापेक्षा "स्वगृह" मध्येच "नवीन लिहा" असे बटण नाही का टकता येणार ?
19 Nov 2015 - 10:59 am | sangeeta Deshpande
सहजीवन
------::::::-------
"हे काय काढून बसलात आता ,"म्हणतच कावेरीबाई बाहेर आल्या. वसंतरावांनी सर्व अल्बम काढलें होते व ते प्रत्येक फोटो तल्लीन होऊन पाहत होते. वसंतरावाच्या चेहर्यावरचे समाधान पाहून त्यांना रागावणे कावेरीबाईना काही जमेना. सावकाश हात टेकवतच त्या त्यांच्या शेजारी जाऊन बसल्या. नकळतच त्याही गतस्मृतित रमून गेल्या. एक एक फोटो पाहत प्रत्येक फोटोच्या मागच्या आठवणींना उजाळा देत समाधानाने हात फिरवणे त्यांचे चालू होते.एकाएकी त्या थबकल्या.
"काय झाले ,अशी थबकलीस का? "
"काही नाही, असेच!"
"मुलांची आठवण येते. "
"हं..... "
"पुस बर ते डोळे. रडायचे कशाला. जे आहे त्यात समाधान मानायचे."
"ते खरे आहे हो पण......."
"अग पिल्लांच्या पंखात बळ आले की ते घरटे सोडणारच . हाच निसर्ग नियम आहे. त्यांना मोकळे आकाश खुणांवणारच व ते त्यास कवेत घेण्यास झेपावणारच . तुला अभिमान वाटायला हवा त्यांच्या कर्तृत्वाचा."
"अभिमान वाटतोच की. तरीही.....'
"जे नाही त्याची खंती बाळगत बसलीस की नैराश्याशिवाय काही हाती लागत नाही. जे आहे त्यात समाधान मानावे माणसाने उलट मी म्हणतो हे झाले ते बरेच झाले. "
"म्हणजे? काय म्हणायचे तुम्हाला? "
"अगं, खरच. तरूणपणी कर्तव्य ,करियर ,स्वप्नांचा पाठपुरावा करण्यातच दिवस कसे भूर्रकण उडून गेले हे कळलें देखिल नाही. शिवाय अंगात तारूण्याची मस्ती होती त्यामुळे तुझे- माझे होते.ती ओसरताच ते ही गळून पडलें व त्याची जागा 'आपलें 'नी घेतली . खर म्हणशील तर आता खर्या अर्थाने आपण 'सहजीवन' उपभोगणार आहोत. कुठल्याही इतर काळजी शिवाय एकमेकांची काळजी घेत. आवडीनिवडी जपत."
"खरे आहे तुमचे म्हणणे,पटतयं मला ."
"मग आता कुठलीही खंत मनात बाळगायची नाही," म्हणत वसंतरावांनी त्यांच्या हातावर थोपटले व त्यांच्या चेहर्याकडे बघितले. कावेरीबाईनी मुक होकार दर्शवला व दोघेही समाधानाने हसले.
संगीता देशपांडे
19 Nov 2015 - 11:01 am | sangeeta Deshpande
पडसाद
======
आज कित्येक दिवसांनी त्याला असा निवांतपणा मिळाला होता. कामाचा व्याप, त्यात फिरतीची नोकरी,त्यामुळे निवांत क्षण कमीच वाट्याला येत. मस्त आळस देऊन तो बाल्कनी मधे आला . अभावितपणे त्याची नजर सभोवर गेली. घरा पुढची बाग चागलीच बहरली होती. कामाच्या सतत विचारात असल्याने त्याचे ह्या गोष्टी कडे लक्षच गेले नव्हते. हिरवळ आणि टपोरी फूलं पाहुन मन प्रसन्न झाले. शीळ घालतच तो आता आला. स्वयंपाक घरातून बांगड्यांचा किनकिनाट आणि मस्त खमंग घमघमाट येत होता. हाॅल मधून, ती काय बनवते हे पाहण्यासाठी आत वळणार इतक्यात लगतच्या खोलीकडे त्याचे लक्ष गेलं. तो थबकला. कित्येक वर्ष तो इकडे फिरकलाच नव्हता. बायकोच करायची तिचे सर्व. तो तिच्या पोटचा असुनही काही करायला जमता नव्ते. ती खडकीच्या बाहेर एकटक बघत होती . त्यानेही बाहेर पाहिलें वठलेला बकूळ त्याच्या दृष्टिस पडला. कित्येक बहर ह्या बकूळाला आले आणि गेले . लहानपणी आपण ह्याच्या सावलीत खेळलो बागडलो मोठे झालो . आता तो वठलाय आणि नकळत आपल्या कडून दुर्लक्ष झाले. त्याच्या मनात येऊन गेले.त्या बकूळाच्या झाडाच्या ठिकाणी त्याला तिच आहे असे क्षणभर वाटले. गलबलून आले त्याला . पण संकोचाने पाऊल पुढे पडत नव्हते. तिने चाहुल लागली म्हणून पाहिले. तो दिसताच ती क्षीण हसली. त्याला त्या हास्यात कारूण्य असल्यााचा भास झाला . तो झेपावला आणि तिचा थरथरणारा हात हातात घेतला व तिला ह्रदयाशी घेतले . संकोच ,तणाव केव्हाच गळून पडला. घरातल्या सगळ्यांचे डोळे हसत होते . मनही आनंदाने भरले होते. त्याचा पडसाद म्हणून की काय वातावरण पण मस्त प्रसन्न झाले होते.
संगीता देशपांडे
19 Nov 2015 - 11:01 am | sangeeta Deshpande
पडसाद
======
आज कित्येक दिवसांनी त्याला असा निवांतपणा मिळाला होता. कामाचा व्याप, त्यात फिरतीची नोकरी,त्यामुळे निवांत क्षण कमीच वाट्याला येत. मस्त आळस देऊन तो बाल्कनी मधे आला . अभावितपणे त्याची नजर सभोवर गेली. घरा पुढची बाग चागलीच बहरली होती. कामाच्या सतत विचारात असल्याने त्याचे ह्या गोष्टी कडे लक्षच गेले नव्हते. हिरवळ आणि टपोरी फूलं पाहुन मन प्रसन्न झाले. शीळ घालतच तो आता आला. स्वयंपाक घरातून बांगड्यांचा किनकिनाट आणि मस्त खमंग घमघमाट येत होता. हाॅल मधून, ती काय बनवते हे पाहण्यासाठी आत वळणार इतक्यात लगतच्या खोलीकडे त्याचे लक्ष गेलं. तो थबकला. कित्येक वर्ष तो इकडे फिरकलाच नव्हता. बायकोच करायची तिचे सर्व. तो तिच्या पोटचा असुनही काही करायला जमता नव्ते. ती खडकीच्या बाहेर एकटक बघत होती . त्यानेही बाहेर पाहिलें वठलेला बकूळ त्याच्या दृष्टिस पडला. कित्येक बहर ह्या बकूळाला आले आणि गेले . लहानपणी आपण ह्याच्या सावलीत खेळलो बागडलो मोठे झालो . आता तो वठलाय आणि नकळत आपल्या कडून दुर्लक्ष झाले. त्याच्या मनात येऊन गेले.त्या बकूळाच्या झाडाच्या ठिकाणी त्याला तिच आहे असे क्षणभर वाटले. गलबलून आले त्याला . पण संकोचाने पाऊल पुढे पडत नव्हते. तिने चाहुल लागली म्हणून पाहिले. तो दिसताच ती क्षीण हसली. त्याला त्या हास्यात कारूण्य असल्यााचा भास झाला . तो झेपावला आणि तिचा थरथरणारा हात हातात घेतला व तिला ह्रदयाशी घेतले . संकोच ,तणाव केव्हाच गळून पडला. घरातल्या सगळ्यांचे डोळे हसत होते . मनही आनंदाने भरले होते. त्याचा पडसाद म्हणून की काय वातावरण पण मस्त प्रसन्न झाले होते.
संगीता देशपांडे
27 Nov 2015 - 11:29 am | स्मिता
logout कस करु ? basic question! :)
27 Nov 2015 - 12:34 pm | तुषार काळभोर
गमन
30 Nov 2015 - 8:15 pm | भानिम
आपलेच लेखन प्रकाशित झाल्यानंतर त्यातील काही चुका दुरुस्त कराव्याशा वाटल्यास 'एडिट' कसे करावे?
30 Nov 2015 - 8:45 pm | भानिम
आपलेच लेखन प्रकाशित झाल्यानंतर त्यातील काही चुका दुरुस्त कराव्याशा वाटल्यास कसे एडिट करावे?
16 Dec 2015 - 1:23 pm | अभिजा
मिपावर प्रकाशचित्र कोणत्या विभागात पोस्ट करायचे? कला विभाग वगैरे आहे काय? धन्यवाद!
23 Jan 2016 - 8:14 am | इनू
मला माझे मिपा सदस्यनाम बदलायचे आहे.
कसे बदलावे? तशी सोय आहे का?
6 Feb 2016 - 12:26 pm | sagarshinde
नमस्कार
मी एक ट्रेकर आहे, प्रत्यक आठवड्याच्या शेवटी मी ट्रेक ला जात असतो, त्यावेळी त्रेक्किंग दरम्यान आलेले अनुभव मला मिसळपाव मध्ये शेअर करायचे आहेत पण लिखाण कसे चालू करायचे याबद्दल मला काहीच कल्पना नाहीये, माल लिखाणाची आवड आहे. पण मिसळपाव.कॉम वरती मला लिखाण चालू करता येत नाहीये, याबाबत मला मदत व मार्गदर्शन मिळेल का ?
9 Feb 2016 - 11:28 pm | बहुगुणी
लॉगिन केल्यावर लेखन करा या टॅब वर क्लिक करा. नवीन पान उघडेल, त्यावरील भटकंती या सदरावर क्लिक करा. नवीन editor उघडेल, त्यात Title बॉक्स मध्ये शीर्षक लिहा, आणि त्या खालील Body (Edit summary) या बॉक्स मध्ये लिखाण करा. मिसळपाववर मराठीत लिहीण्यासाठी पर्याय इथे पहा.
10 Feb 2016 - 11:26 am | sagarshinde
सर मनापासून धन्यवाद
लिखाण सुरु करण्याबाबत आपण जे मार्गदर्शन केले त्याबद्दल खरच खूप आभार आणि धन्यवाद :-)
17 Feb 2016 - 7:36 pm | स्वीट टॉकर
माझा पासवर्ड नेहमीच चुकीचा आहे असा संदेश मला येतो. मग वन टाइम एन्ट्री घेऊन मी पुन्हा व्यवस्थित पासवर्ड घालतो. लॉग आउट करून लॉग इन करायचा प्रयत्न केला की पुन्हा तोच एरर संदेश! गेले चार पाच दिवस असं चाललं आहे.
पासवर्ड अति काळजीपूर्वक मी घालतो आहे हे सांगणे न लगे!
23 Feb 2016 - 1:14 pm | कुहू
कुहू
Nobody has signed this guestbook yet.
खरडवही मदे एरर येत आहे
23 Feb 2016 - 2:50 pm | श्रीगुरुजी
खरडवहीतील खरडी डीलिट करता येतील का? त्यासाठी काय करावे लागेल?
30 Mar 2016 - 2:04 pm | श्रीगुरुजी
यावर अजून कोणीच मार्गदर्शन केलेले नाही. वाट पहात आहे.
5 Mar 2016 - 3:36 pm | नाना स्कॉच
सदस्यनाम बदलायचे आहे! कसे काय करावे कोण गाइड करु शकेल
29 Mar 2016 - 9:32 pm | Gajanan Wagh
मि पा वरील प्रतिक्रिया वाचल्या थोडा आधार वाटला पण अडचणी काही कमी होत नाहीत एक एक दिवस मागे टाकत आहे
1 Apr 2016 - 1:27 pm | प्रसाद_१९८२
नमस्कार,
मी एक नविन सदस्य आहे.
मिसळपावर एकसे एक वाचनिय लेखमालिका आतापर्यंत लिहिल्या गेल्या आहेत. मात्र वाचन करण्याकरता त्या एकत्रित पणे कुठेच साठविलेल्या दिसल्या नाहित. मुख्य पानावरती 'दखल' मध्ये तेवढ्या काही लेखमालिका दिसतात.
इथे 'लेखमालिका' नावाचे नविन बटण वर देता येईल का? जेणे करुन मिसळपाव वरिल सर्व लेख मालिका एकत्रितरित्या एकाच पानावर जाऊन वाचता येतिल.
धन्यवाद.
20 Jun 2016 - 7:24 pm | Sachin Bhat
Namaskar,
Is there any searchable index available? For e.g. If I want to read the article on Greece in the Category "Bhatkanti", how do I search for it. Otherwise, I will have to go on clicking next and go through the all the pages till I am able to find the relevant articles.
Regards,
Sachin
20 Jun 2016 - 7:45 pm | तुषार काळभोर
देन सर्च इन गुगलः
site:www.misalpav.com ग्रीस
यु विल सी सम रिजल्ट्स लाईक धिस.
नाऊ, दो धिस विल कंटेन ऑल लेखण ऑन मिसळपाव.कॉम विथ द वर्ड ग्रीस इन इट, मोस्ट ऑफ द रिजल्ट्स वुड बी 'भटकंती' रिलेटेड.
होप, धिस क्लिअर्स.
22 Jun 2016 - 5:00 pm | Sachin Bhat
Pailvan,
Apla abhari aahe.
Tumchya sallya nusar mala Greece baddal mahiti milali. Me just ek udaharan ghetle hote.
When I searched for Narmada, mala direct Narmada Parikrama bhag-43 cha result milala ani tya page warati aadhichya bhaganchya links nahit.
Mhanun me vicharle hote ki searchable index aahe ka karan Google search karun havya tya link paryant pochne khup avaghad aahe.
Regards,
Sachin
9 Jul 2016 - 4:49 pm | उमेश नेने
मला प्रोफाइल नाव बदलायचंय कसे बदलू ?
11 Jul 2016 - 7:02 pm | जयन्त बा शिम्पि
माझे संकेताक्षर बदललेले नव्हते . तरी गेल्या आठवड्यात तीन वेळा , मला प्रतिक्रिया सुद्धा नोंदविता आली नाही. तीन वेळा मला अड्मिन कडे धांव घ्यावी लागली.तीन वेळा मला माझे , संकेताक्षर , नव्याने दयावे लागले. असे माझ्या बाबतीतच होते कां ? कळत नाही . कोणी खुलासा करील काय ?
14 Jul 2016 - 4:23 pm | अविनाशकुलकर्णी
आपला लेख वा प्रतीसाद एडीट वा डीलिट कसा करायचा?..
2 Aug 2016 - 11:18 pm | अमोघ शिंगोर्णीकर
काही वैयक्तीक कारणांमुळे मला माझे मिपावरचे काही लेखन डिलीट करायचे आहे. क्रुपया मार्गदर्शन करू शकाल का?
धन्यवाद,
अमोघ शिंगोर्णीकर
11 Aug 2016 - 9:44 pm | जयन्त बा शिम्पि
मी आतापावेतो फक्त प्रतिसाद्च लिहित आलो आहे. मला स्वतःला नविन धागा सुरु करावयाचा आहे , तो कसा सुरु करावा याचे मार्गदर्शन हवे आहे. क्रुपया व्यनि करावा, ही विनंती.
12 Aug 2016 - 3:50 pm | स्मिता चौगुले
माझ्या http://misalpav.com/node/36958 या धाग्यावर कधी फोटो दिसतोय कधी दिसत नाहीए , पाहता का जरा काय बिनसलय ते
23 Aug 2016 - 11:50 am | कमवू
जमले
खूप खूप धन्यवाद
26 Aug 2016 - 7:56 am | नावातकायआहे
"शोधा" नावाचा पर्याय गायब झाला आहे काय?
10 Sep 2016 - 4:48 pm | मी कोण
नविन विषय कुठे व कसा सुरु करावा? याविषयी मार्गदर्शन करा.
12 Sep 2016 - 1:50 pm | मिपापन्खा
पुण्यामध्ये एखादे स्टडी सेंटर किंवा वाचनालय शोधत आहे जिथे मी 8 ते 5 या वेळात जाऊन स्टडी करू शकेन, शांत व हवेशीर जागा असावी.
फी माफक असावी विनाशुल्क असल्यास उत्तम
कृपया सभासदांनी माहिती असेल तर सुचवावे.
19 Sep 2016 - 12:56 pm | समी
डोंबिवलीत चांगला ज्योतीषी माहित आहे का?
24 Sep 2016 - 4:36 pm | निलदिप
"शोधा" नावाचा पर्याय गायब झाला आहे काय?
30 Sep 2016 - 11:31 pm | मयुरेष
Ekada log in kelyavar log out kase karave?
Mi ६ varshani yethe yetoy aani mala thod gondhalyasarkh zalay hi site pahun. Log out cha option nahich aahe ka?
5 Oct 2016 - 9:35 am | सतोश ताइतवाले
स्पेशल कोल्हापुरी मसाला कसा बनवावा
कोणाकडे याची माहिती आहे काय
5 Oct 2016 - 9:42 am | सतोश ताइतवाले
उडत्या तबकड्या नेहमी पाश्चिमात्य देशातच का दिसतात
आपल्या भारत मध्ये कधी दिसल्याचे वाचनात आला
नाही
काय कारण असावे ,कि हा पाश्चिमात्य देश मधील लोकांना
एक प्रकारचा भ्रम कि अंधविश्वास
कि वेगळे काही
आणि भारत मध्ये प्राचीन भारतीय विज्ञान किंवा
कथा मध्ये उडत्या तबकड्यांचे काहीच तपशील कसे नाही
किंवा असेले तरी लपवले किंवा हरवले आहेत का
17 Oct 2016 - 9:37 am | सतोश ताइतवाले
मीप वर कोणते विषय मांडावे कि न मांडावे
काही मदत मिळेल काय
3 Nov 2016 - 1:16 pm | कैवल्यसिंह
मिपा वर एखादा लेख वैगरे सर्च (शोधा) करायचा आसल्यास सर्च (शोधा) कसे करावे? कारण मला सर्च (शोधा) चा ऑप्शन कुठेच दिसला नाही??..
12 Nov 2016 - 12:50 pm | जयन्त बा शिम्पि
काही लेखांच्या शेवटी नेहमीची टीप " वाचनखुणा साठवा " अशी का नसते ? कारण समजले नाही . याबाबत कोणी खुलासा देखील करीत नाही . कुणीतरी उत्तर द्या ना ! !
2 Jan 2017 - 8:07 am | श्रीकृष्ण सामंत
माझं माझ्या pc वर असलेलं "सदस्यनाम" आणि "संकेताक्षर" माझ्या tablet वर देऊन मला "सदस्य आगमन" का करता येत नाही?
आणि तसं करायचं झाल्यास काय करावं लागेल.? का माझ्या tablet वर वेगळं "सद्स्यनाम" आणि वेगळं "संकेताक्षर" द्यावं लागून मला माझ्या tablet वर आगमन करावं लागेल?
कूपया मदत करावी.
श्रीकूष्ण सामंत
2 Jan 2017 - 7:13 pm | कंजूस
श्रीकृष्ण सामंत ही समस्या या टॅबलेटवर प्रथमच येत आहे का/ नवीन टॅबलेट आहे का?
- हे सदस्य नाम कॅापी पेस्ट करून पाहा. संकेताक्षरला काही समस्या नसेल.
इतर कोणत्या वेबसाइटवर इंग्रजी/मराठी युजरनेम टाकून पाहा.
3 Jan 2017 - 7:57 am | श्रीकृष्ण सामंत
बहुतेक संकेताक्षर लिहीताना सुर्वातीचं अक्षर कॅपिटल होत असावं. होय माझी टॅबलेट नवीन आहे.
म्हणूनच प्रश्न येत होता.