वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

Primary tabs

सरपंच's picture
सरपंच in पुस्तक पान
24 Feb 2008 - 10:03 pm

नमस्कार,
मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी
करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख
सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर
कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघून
घ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना  ?

काही प्रश्नांचे दुवे.

१) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही.
२) टंकलेखन साहाय्य
३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा
५)काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
७) वाचनखुणा कशा साठवाव्या?
८) दुवा (लिंक) कसा द्यावा.

प्रतिक्रिया

साहित्य संपादक's picture

18 May 2020 - 6:17 pm | साहित्य संपादक

@Nupur Padekar,
तुम्हाला व्यनि केला आहे. पहा.

शेर भाई's picture

20 Jun 2020 - 2:20 pm | शेर भाई

मूळ नाव आणि मि पा नाव वेगवेगळे ठेवता येते का ??
उदा. माझ्या मूळ नावा ऐवजी मला "शेर भाई" नाव ठेवायचे आहे, करता येईल का??

तुषार काळभोर's picture

20 Jun 2020 - 3:29 pm | तुषार काळभोर

हॉटेलात आलेली माणसं
सध्या 6 सदस्य हजर आहेत.

पैलवान
संजय क्षीरसागर
साखरेचा दाणा
सेरू०९२७
गवि
स्वलेकर

पैलवान, गवि, साखरेचा दाणा ही खरी नावे नसावित असा अंदाज आहे. तस्मात तुम्हालाही नाव बदलून घेता यायला अडचण नसावी असा अंदाज आहे.
करायचे असेल तर प्रशांत यांना व्यनि करा.

रमेश आठवले's picture

27 Aug 2020 - 11:59 pm | रमेश आठवले

माझ्या लॅपटॉप वर मिसळपाव उघडले की सर्वात वर एक काळी पट्टी येते आणि लेखाचे नाव व त्याची लिंक हे तीच्या खाली झाकले जातात. हे कितीही आकाराचा फॉन्ट वापरला तरी जात नाही. तरी ही पट्टी दुर करता येईल का ?

चौथा कोनाडा's picture

28 Aug 2020 - 8:36 pm | चौथा कोनाडा

मलाही ही समस्या येत आहे, सध्या या त्रुटीशी तडजोड करताना तारांबळ होतेय हे खरं !
ही पट्टी दुर करता आली तर बरं होईल !

मराठी_माणूस's picture

29 Aug 2020 - 12:02 pm | मराठी_माणूस

मलाही ही समस्या येते. त्यावर तात्पुरता उपाय म्हणजे ब्राउजरच्या सगळ्यात वर ट्यॅब मधे धाग्याचे शिर्षक दिसते, तिकडे पहाणे

चौथा कोनाडा's picture

28 Aug 2020 - 8:38 pm | चौथा कोनाडा

इनस्क्रिप्ट मराठी टंकनाबद्दल उपयुक्त लेख आणि चर्चा:


इनस्क्रिप्ट टंकन

मराठी_माणूस's picture

5 Sep 2020 - 2:53 pm | मराठी_माणूस

ताज्या घडामोडी - ऑगस्ट सप्टे. २०२०

हा धागा का दिसत नाही ?

मी काही लिहू शकत नाही आहे, लिहले तर प्रकाशित होत नाही आहे.

आज सकाळी माझ्या तळ कोंकण या धाग्यावर प्रतिसाद देतांना मला खालीलप्रमाणे मेसेज आला व माझा एकच प्रतिसाद अर्धवट तीन वेळा प्रकाशित झाला. .

पाच मिनिट थांबून प्रतिसाद दिला तरी तसेच झाले.
हीच विनंती समजून सं.मं माझे शेवटचे चार प्रतिसाद उडवतील का? विनाकारण प्रतिसादांची संख्या जास्त दिसते

मिपाचं टेम्प्लेट drupal 7 वर आधारित आहे म्हणजे त्याय ही सोय आहे. राजकीय किंवा चालू घटना इत्यादी धागे अशा पद्धतीत असावेत असं मला वाटतं. नवीन प्रतिसाद वरती असे. आणि पंचवीस /- पन्नास प्रतिसादानंतरचे आपोआप रद्द अशी रचना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2021 - 11:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मॅन्युली अशी वेगवेगळ्या धाग्यांना मोड्युलमधे अशी सुविधा असते, अशी सेटींग करता येईल. पण पहिल्या धाग्यावर अडकलेले बोळे अन्य धाग्यावर येतच राहतील असे वाटते. अर्थात.मालक चालक नीलकांत आणि प्रशांतलाच त्यातले तपशील माहिती.

-दिलीप बिरुटे

गॉडजिला's picture

19 May 2021 - 12:49 pm | गॉडजिला

खरडवहीत आपण लिखाण कसे करावे ? तसेच ते लिखाण पुर्ण झाल्यावर ते नवे लेखन मधे येण्यासाठी कुथे क्लिक करावे ?

चौथा कोनाडा's picture

19 May 2021 - 1:07 pm | चौथा कोनाडा

खरडवहीतील लेखन ही त्या त्या सभासदासाठी मर्यादित असते. आपण ज्याला खरड लिहितो त्याला आणि इतर सभसदांना वाचता येते, मिपाच्या कोणत्यही साहित्य प्रकारात हे प्रकाशित होत नसते. डाव्या बाजूस खरडवही असा हिरव्या आयतातला पर्याय दिसतो तो टिचकून खरड लिहून खाली दिलेल्या "पाठवा" या आयतावर टिचकी मारावी लागेल.

मी नुकतीच तुम्हाला खरड पाठवलेली आहे. ती तुमच्या सभासदनाम पानावर "खरडवही" (माझी खरडवही ) या आयतावर टिचकवल्यावर दिसेल.

मला वाटले होते लेख इथे टाकण्यापुर्वी कच्चे लिखाण करायची काही सोय आहे की काय. आणी खरडवही वर टिचकी मारल्यावर कुठल्यातरी धाग्यावरचे प्रतिसाद मला दिसत आहेत असे वाटत होते. आता आलं लक्शात खरडवही ही एक आंतरमिपासदस्य मेसेजिंग सिस्टम आहे.

आपल्या वेळ आणी मार्गदर्शनासाठी अत्यंत धन्यवाद. _/\_

चौथा कोनाडा's picture

19 May 2021 - 1:22 pm | चौथा कोनाडा

NSMO

चौथा कोनाडा's picture

19 May 2021 - 1:24 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद _/\_
असाच लोभ असू द्यावा !

तर ती कुठल्या विभागात देऊ? कथा pdf स्वरूपात माझ्याकडे आहे. ती इथे नुसती चिकटवता येते की वेगळी टंकलिखित करावी लागेल?

कंजूस's picture

10 May 2022 - 1:26 pm | कंजूस

Pdf pages continuously copy होत नाहीत.
म्हणून
eBook converter site
https://ebook.online-convert.com/convert-to-pdf
किंवा apps वापरून epub format तयार करणे.
हे सलग कॉपी होतं.

(इंग्रजी सहज होतं. पण देवनागरीचं नेहमी होतंच असं नाही. युनिकोड वगैरे गडबड होते. तेव्हा zamzar site वापरणे. )

( 20,50 mb file size limit free देतात. )

पीडीएफ खू प मोठी असेल तर ती ब्रेक करण्यासाठी

PDF utils app वापरा.(( https://play.google.com/store/apps/details?id=pdf.shash.com.pdfutility ))

हे conversion झाले तर पुढचे काम सोपे आहे. ते लेखन कॉपी पेस्ट करणे.

सुजित जाधव's picture

19 Jun 2022 - 10:22 am | सुजित जाधव

मिपावर अनुक्रमणिका कशी तयार करायची? मार्गदर्शन करा...

कंजूस's picture

19 Jun 2022 - 12:22 pm | कंजूस

मोठा लेख असेल तर वेगवेगळ्या परिच्छेदांकडे उडी मारून जाण्यासाठी ( jump, scroll न करता) आणि परत अनुक्रमणिकेकडे परतण्यासाठी करता येते.

किती दिवस प्रयत्न करतोय माझा लेख upload होत नाही. सारखी Error येतेय. Please guide करा.

टर्मीनेटर's picture

2 Aug 2022 - 1:42 pm | टर्मीनेटर

कृपया तुमची समस्या शब्दांत मांडावी.
काय Error येतेय ते कळवलेत तर मार्गदर्शन करता येईल.

लेखात टोकेरी कंस (जे चुकीने एच टी एम एल tags समजले जातात) अथवा स्माईली असल्यास त्या काढून टाका आणि पुन्हा सबमिट बटण (प्रकाशन) दाबा.

धन्यवाद!! आपल्या सहकार्यामुळे, मी माझ्या लेखातील अनावश्यक चिन्हे दूर केली. त्यामुळे लेख लगेच प्रकाशित करू शकलो.

२) लेखाच्या शीर्षकात किंवा लेखात कुठे उगाचच ( , :, < चिन्ह आली असतील तर ती काढा.

३) खरडफळ्यावर अगोदर काही लिहिले असेल तर ते कॉपी पेस्ट न करता पुन्हा लिहा.

धन्यवाद!! आपल्या सहकार्यामुळे, मी माझ्या लेखातील अनावश्यक चिन्हे दूर केली. त्यामुळे लेख लगेच प्रकाशित करू शकलो.

किरण कुमार's picture

10 Jan 2023 - 3:25 pm | किरण कुमार

एखादा लेखन अर्धवट असताना प्रकाशीत झाले असेल तर तो धागा डीलीट कसा करावा

कर्नलतपस्वी's picture

10 Jan 2023 - 7:31 pm | कर्नलतपस्वी

पटलं नाही तर फिरकायचं(log in) नाही या व्यतिरिक्त सदस्यत्व कायमचे रद्द करायचे असेल तर काय उपाय आहे.

ना रहेगा बांस ना बजेगी बासुरी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2023 - 7:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पटलं नाही तर फिरकायचं(log in) नाही

सध्यातरी हाच उपाय दिसतो.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

10 Jan 2023 - 7:51 pm | कर्नलतपस्वी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद बिरूटे सर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2023 - 10:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्नल साहेब, मी फक्त माहिती सांगितली. आपण मात्र लिहिते राहावे. आपण चांगले लिहिता. आपलं लेखन वाचत असतो. मिपावर वेगवेगळ्या स्वभावाची माणसं इथे लिहितात प्रत्येक वेळी सर्वांशी सूर जमेल असे नसते, तेव्हा नेट डिसकनेक्ट केले की विसरुन जायचं. लिहायचं मजा करायची. मिपा इंजॉय करायचं.

व्यक्तीगत टीका कोणी केली असेल तर अशावेळी नीलकांत, प्रशांत किंवा साहित्य संपादक यांना कळवून टाकायचं. इतकेच. बाकी, काही विशेष असेल तर खरडवहीत कळवा.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

11 Jan 2023 - 10:41 am | कंजूस

पटलं नाही तर सोडायचं/फिरकायचं नाही. पण का बरं?

टर्मीनेटर's picture

11 Jan 2023 - 1:52 am | टर्मीनेटर

एक गोली एक दुश्मन असे ट्रेनिंग झालेलं असूनही कर्नलसाहेब एकंदरीत तुम्ही फारच मनावर घेतलं आहे असे दिसतंय!
होत असतात हो अनेक गोष्टी! माझ्या कोकण, तळ कोकण गोवा मालिकेचा पुढचा भाग लिहायला घेतलाय आणि त्यात अनेक सन्माननीय/पवित्र समजल्या जाणाऱ्या अशा आम्हाला शाळेपासून शिकवल्या गेलेल्या प्रोफेशन्स बद्दलचे माझे गैरसमज कसे दूर झाले ह्या बद्दलही माहिती देण्याचा विचार होता आणि त्यात सैनिकी पेशा पण समाविष्ट होता, पण तुमचा हा प्रतिसाद वाचल्या नंतर लिहिलेला तो भाग एडिट करू की काय हा प्रश्न पडलाय!

त्या दोन संतांना काय त्रास झाला हे पाहिले तर . . . .