सिंटॅक्स- मिपावरील शब्द

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
3 Dec 2013 - 5:22 pm

मिपावर प्रतिसाद देताना ठराविक शब्द वापरले जातात आणि ते पुन्हा पुन्हा वाचायला मिळतात.त्यांचा संदर्भ माहीत नसल्याने नवखा माणुस ते वाचुन प्रथम गोंधळतो,मग हळुहळु चाचपडत का होईना त्याला थोडेथोडे शब्द कळु लागतात.आणि मग तोही या दंग्यात सामील होउन जातो. मला सापडलेले काही शब्द असे

चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट)
चानचान (छानछान)
जौदे बै (जाउ दे बाई)
चेपु,तुनळी (फेसबुक,युट्युब)
जिलब्या (लेख)
पिंक (प्रतिक्रिया)
हहपुवा (हसुन हसुन पुरेवाट)
ह्घ्या (हलके घ्या)

या शिवाय काही महान लोकांच्या स्मरणार्थ चेसुगु,जीवनभौ वगैरे

तर समस्त मिपाकरांना आवाहन कि नवख्या मिपाकरांच्या सोयीसाठी असे अजुन शब्द सांगावे.

वाक्प्रचारप्रकटन

प्रतिक्रिया

चेसुगु मंजे

नवीन- तथास्तु

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Dec 2013 - 7:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

चेतन सुभाष गुगळे

बॅटमॅन's picture

3 Dec 2013 - 5:32 pm | बॅटमॅन

प्रकाटाआ= प्रतिसाद काढून टाकला आहे.

हेवेसांनल= हे वेगळे सांगणे न लगे.

खफ= खरडफळा., खव= खरडवही, व्यनि= व्यक्तिगत निरोप. अच्रत बव्लत= आचरट बावळट.

आनंदी गोपाळ's picture

5 Dec 2013 - 9:40 pm | आनंदी गोपाळ

=बॅटमॅन

बॅटमॅन's picture

6 Dec 2013 - 1:23 am | बॅटमॅन

:)

असे धागे मध्ये मध्ये येत असतात

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2013 - 5:38 pm | अत्रुप्त आत्मा

जिल्बी =))

मठ्ठा =))

मालोजीराव's picture

4 Dec 2013 - 2:37 pm | मालोजीराव

तुम्ही ताक वाले आहात याची नोंद घ्यावी :))

बॅटमॅन's picture

4 Dec 2013 - 2:43 pm | बॅटमॅन

खरे तर ताकाला जाऊन भांडे लपवणारे ;) =))

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2013 - 2:59 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/guns/machine-gun.gif बट्ट्मण्ण!@भांडे लपवणारे >>> :-/ आंsssssssssssssssss!!! :-/

बट्टमण्ण http://www.sherv.net/cm/emoticons/guns/tommy-submachine-gun.gif

बॅटमॅन's picture

6 Dec 2013 - 1:19 am | बॅटमॅन

आयो....आत्मूसच्या खास स्मायलीप्रसादाचा लाभ झाल्याने आमचे पंख अंमळ अजून फाकले आहेत ;)

विजुभाऊ's picture

3 Dec 2013 - 5:44 pm | विजुभाऊ

रच्याकने = बाय द वे
गुगलणे = शोधणे.
आंजा = आंतरजाल= इंटरनेट

रच्याकने पेक्षा मला "जाता जाता" हा शब्द जास्त योग्य वाटतो

रच्याकने म्हणजे रस्त्याच्या कडेने
बाय द वे.

असं नीट शिकवा की हो. ;)

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Dec 2013 - 2:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

आत्ता कसं नीट समजलं रच्याकने

परिंदा's picture

3 Dec 2013 - 5:46 pm | परिंदा

नथू गुग्गुळ म्हणजे काय?

मुक्त विहारि's picture

3 Dec 2013 - 9:35 pm | मुक्त विहारि

हे एक जालीम चूर्ण आहे....

सध्या गहन विचार करणारे एक जण आहेत.... ते घेत आहेत ते औषध...म्हणूनच आजकाल ते जास्त पिंका टाकत नाहीत..

ग्रेटथिन्कर's picture

3 Dec 2013 - 9:47 pm | ग्रेटथिन्कर

ते चुर्ण गोबेल्सी प्रचारकी गुढगेफीरुंसाठी आहे... नथुगुग्गुळवटी...

मुक्त विहारि's picture

3 Dec 2013 - 10:30 pm | मुक्त विहारि

आपण अद्याप न.गू. घेत नाही का?

घेत जा हो...असे मध्येच सोडू नका आणि ते पथ्याचे पण बघा जरा...

शिद's picture

3 Dec 2013 - 5:47 pm | शिद

माताय??

मी-सौरभ's picture

3 Dec 2013 - 5:50 pm | मी-सौरभ

कॉलींग बॅट्या फोर एक्ष्पेर्त चोम्मेन्त्स

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2013 - 5:57 pm | बिपिन कार्यकर्ते

माताय --- तदमाताय = च्यायला, तुझ्यायला (जनक : विजुभाऊ!)

चेसुग ---> मला नाही माहित ब्वॉ! ;)

सोत्रि's picture

3 Dec 2013 - 6:36 pm | सोत्रि

मला नाही माहित ब्वॉ!

'विठ्ठला' कोणता झेंडा घेऊ हाती....

किती तो विनय... पण ह्याला आमच्यात 'वेड पांघरुण....' असे म्हणतात बरं का! ;)

- ('विठ्ठला'चा बडवा) सोकाजी

अरे आत्ताच हजर सभासदांमध्ये दर्शन झालं होतं की... शप्पथ!
आठवण आली की हजर होईन असं आश्वासन दिलंय काय कुणास ठाऊक. ;)

नीलकांत विट्ठल अन संपादक बडवे अशी महान पदवी एकदा आम्हाला मिळाली होती. हल्ली तसे कोणी म्हणत नसल्याने प्रा. डॉ. बिरुटे मिपावर कमी प्रमाणात येऊ लागले आहेत! या आठवणीने अं.ह.झा. आणि ड्वाले पाणावले!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Dec 2013 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो ना. मीही अंमळ हळवा झालो.

आता फेसबुक वर अपडेट्स टाकणं आलं की मिपा म्हणजे कै जग नाही.
पै, तेवढं लाईक वर क्लीक करुन... दोन शब्द तिथे लिहा.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

4 Dec 2013 - 12:23 pm | यशोधरा

मी लिहू? :D

पैसा's picture

4 Dec 2013 - 12:43 pm | पैसा

चेपुवर तुम्ही कै पोस्ट केलंय ते न बघताच मी लैक करून टाकते! कल्जी नसावी!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Dec 2013 - 3:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

ते "गिधाडे" राहिले....

पैसा's picture

5 Dec 2013 - 5:02 pm | पैसा

खरंच की! आणि कसल्या कसल्या आठवणी करून दिल्यास विमे! समुद्र काय अन विहीर काय! विहिरीतले बेडूक काय! देवा रे देवा!!

जेपी's picture

3 Dec 2013 - 5:51 pm | जेपी

अरे चेसुगु मंजे काय ?

परिंदा's picture

3 Dec 2013 - 5:52 pm | परिंदा

हाकानाका?

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2013 - 5:58 pm | बिपिन कार्यकर्ते

हाय काय नाय काय

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2013 - 5:57 pm | अत्रुप्त आत्मा

गाझापट्टी =))

धान्याचे काश्मिर होणे =))

बॅटमॅन's picture

3 Dec 2013 - 6:27 pm | बॅटमॅन

धान्याचे काश्मिर होणे

कुठल्या हो कुठल्या धान्याचे काश्मीर ;)

अन इंचा-इंचाने माघार घेणे वैग्रेही त्यातच आले =))

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2013 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा

@धान्याचे काश्मीर >>> :-/ :-/ :-/ धाग्याचे काश्मिर! :p असं म्हणायचं होतं मला. :-/

चानचान (छानछान)= चूक. हे छान छानचे उपहासात्मक रुप आहे. कमीत कमी शब्दात खवचटपणा दाखवण्यासाठी याचा वापर होतो.

जिलब्या (लेख)= पुन्हा चूक. अशी कोणतीही साहित्यकृती (ज्यात लेख, काव्य, छायाचित्रे यांचा समावेश होतो) तिचा कर्ता/ कर्ती सतत, वाचकांना वीट येईस्तवर करीत/ लिहीत असेल तर त्यास जिल्बी म्हणतात.

पिंक (प्रतिक्रिया)= हे आता मी केलं ते!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Dec 2013 - 8:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

चुकीच्या दुरुस्तीबद्दल

रेवती's picture

3 Dec 2013 - 7:05 pm | रेवती

पुलेशु. हे पुढील लेखनास शुभेच्छा यासाठी असून जर लेख जिल्बीष्टाईल असेल पुवाशु. म्ह्ण्जे पुढील वाचकांस शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणी दिल्यास आनंद होऊ देऊ नका. ;) त्याचा अर्थ वेगळा आहे. थोडक्यात म्हणजे "मसणात जावा" हा अर्थ सांगतीये. उगीच रागावू नका.

आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ही सुधरला/ली नाही तर ...

मग दिवाळीच्या आणि नववर्षाच्या पण शुभेच्छा ( सौजन्य: आंनदयात्री )

एक आयडी ला आम्ही विमे होताना पाहिले ...आता तुम्ही रामे

>>एक आयडी ला आम्ही विमे होताना पाहिले...आता तुम्ही रामे
बरं आठवलं. ते विमेकाका तुमच्या नात्यात आहेत आहेत का हो रामे ?? :#

शैलेन्द्र's picture

4 Dec 2013 - 1:07 pm | शैलेन्द्र

विमेंना "काका" करणे हे ही मिपा स्टाईल

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Dec 2013 - 3:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे

जल्ला मेला, समदा मार्केट डाउन केला ना.

आनन्दिता's picture

4 Dec 2013 - 9:26 pm | आनन्दिता

काकाsssssssssssssssss.....:)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Dec 2013 - 10:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सांभाळुन.... पान पिकले तरी देठ हिरवा असु शकतो... ;-)

बॅटमॅन's picture

5 Dec 2013 - 1:02 am | बॅटमॅन

पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ;)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 1:27 am | अत्रुप्त आत्मा

यावरून,,ते पान..खरच पिकले आहे का??? ते ही ठरवा! =))

शैलेन्द्र's picture

5 Dec 2013 - 10:02 am | शैलेन्द्र

अश्लील.. अश्लील..

बाकी पान पिकलंय हे मान्य करताय का? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 10:51 am | अत्रुप्त आत्मा

@मान्य करताय का? >>> =)) शी...शी... =)) आंम्ही कसे/कशाला? मान्य करू? :p

शैलेन्द्र's picture

5 Dec 2013 - 10:57 am | शैलेन्द्र

तुमचं सोडा हो बुवा, तुमच्या पाना-फुलांच्या-देठांच्या रांगोळ्या जगप्रसिद्ध आहेत, मी काकांना विचारलेलं.. :)

मृत्युन्जय's picture

5 Dec 2013 - 11:38 am | मृत्युन्जय

तुमच्या पाना-फुलांच्या-देठांच्या रांगोळ्या जगप्रसिद्ध आहेत,

माताय निर्वाण पावलो ;)

प्यारे१'s picture

5 Dec 2013 - 12:36 pm | प्यारे१

___/\___

निर्वाण पावल्या गेले आहे =)) :yahoo: _/\_

>>तुमच्या पाना-फुलांच्या-देठांच्या रांगोळ्या जगप्रसिद्ध आहेत,
माताय !! निर्वाणच !! =))

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 7:02 pm | अत्रुप्त आत्मा

@ तुमच्या पाना-फुलांच्या-देठांच्या रांगोळ्या जगप्रसिद्ध आहेत, मी काकांना विचारलेलं.. >>> अस्सं!!! :-/

शैलेन्द्र's picture

5 Dec 2013 - 7:44 pm | शैलेन्द्र

रागावलात का? बर बर, तुमचाही देठ हिरवा बरं, चिडू नका :)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 7:50 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

सूड's picture

6 Dec 2013 - 2:10 pm | सूड

खिक्क !! =))

विमे तुंजा कंदी कांका जांला? ;)

मृत्युन्जय's picture

5 Dec 2013 - 11:39 am | मृत्युन्जय

विमे काका पहिले होते. मग ते विमे झाले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Dec 2013 - 8:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

फक्त आडनावबंधू...नात्यात नाहीत नाहीत...

बाकी >>>एक आयडी ला आम्ही विमे होताना पाहिले >>> म्हणजे काय ब्वॉ?

अहो म्हणजे विश्वनाथ मेहेंदळे ह्यांचं विमे झालं , तुम्हि राजेंद्र मेहेंदळे मग तुम्हि रामे

सचिन कुलकर्णी's picture

3 Dec 2013 - 8:09 pm | सचिन कुलकर्णी

उत्तराबद्दल आगाउ आभारी. :)

बाय डीफॉल्ट सहमत बहुतेक

विजुभाऊ's picture

3 Dec 2013 - 8:19 pm | विजुभाऊ

पूजाशी बाडीस.
मिपावरचे काही वाक्प्रचार "इनो घेणे" "फाट्यावर मारणे" " आमचा हिच्यावर भारी जीव" :-

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Dec 2013 - 8:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

म्हणजे?

लईच संदर्भ आठवताहेत विजु भौ ..

अजुन दोन

विवक्षित
हि & हि

पडत्या पावसात जर तुम्ही आतुन .........
वाश्या

मराठी_माणूस's picture

3 Dec 2013 - 8:48 pm | मराठी_माणूस

चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट)-> हे थोडे उलगडुन सांगाल का?
paste->पस्ते हे ठीक
copy->चोप्य कसे काय

सोत्रि's picture

3 Dec 2013 - 9:32 pm | सोत्रि

copy paste असे टाइप केले की चोप्य पस्ते होते.

- (टायपिस्ट) सोकाजी

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Dec 2013 - 9:02 pm | राजेंद्र मेहेंदळे

हे टाईप करुन बघा

मराठी_माणूस's picture

3 Dec 2013 - 9:28 pm | मराठी_माणूस

समजले. धन्यवाद

खटपट्या's picture

4 Dec 2013 - 11:40 am | खटपट्या

आपण चेपू वर याच नावाने आहात का ?

सोत्रि's picture

3 Dec 2013 - 9:43 pm | सोत्रि

अरेच्चा!

सर्वात महान वाक्प्रचार कोणी सांगितलेच नाहीत अजून,
१. अभ्यास वाढवा!
२. मोठे व्हा!

- (मिपाकर) सोकाजी

सुहास..'s picture

3 Dec 2013 - 10:42 pm | सुहास..

सोक्या !!
अरे ते " भरपुर कॉम्प्लॅन प्या , मोठ्ठे व्हा " असे आहे.

( नको आठवण काढुस रे प्लीज :( )

प्रचेतस's picture

3 Dec 2013 - 11:37 pm | प्रचेतस

गणेशा होणे

शेखर's picture

3 Dec 2013 - 11:46 pm | शेखर

बसवला टेंपोत हा आता पडद्याआड गेलेला एकेकाळाचा हिट शब्द होता.

मी_आहे_ना's picture

4 Dec 2013 - 12:10 pm | मी_आहे_ना

अगदी हेच टंकायला आलो होतो :)
(माझ्या अंदाजे, ते 'बशीवला' होते, बसवला नव्हे)

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2013 - 2:06 pm | टवाळ कार्टा

"टेम्प्युत बशीवला" असे आहे ते ;)

श्रीरंग_जोशी's picture

4 Dec 2013 - 12:00 am | श्रीरंग_जोशी

या विषयावरील जुने धागे

बादवे आजकाल माझा पण बरेचदा (फोटु दिसत नाहे फेम) गणेशा होतो ;-).

पिशी अबोली's picture

4 Dec 2013 - 1:18 pm | पिशी अबोली

हा मॉर्फोलॉजीतील विषय आहे हो...सिंटॅक्स नका ना म्हणू... :'(

बॅटमॅन's picture

4 Dec 2013 - 2:26 pm | बॅटमॅन

आओ हितं लोकांना लिंग्विस्टिक्सचा "यल्ल" नै येत तिथं तुमी हे असलं भयानक काय बोलू र्‍हायला आँ?

पैसा's picture

4 Dec 2013 - 3:03 pm | पैसा

तुझी बुकं न्हेऊन घाल बारा गडगड्यांच्या हिरीत! हिते काय लिंग्विस्टिक्सचा अभ्यास कराय येतो का?

बॅटमॅन's picture

4 Dec 2013 - 3:07 pm | बॅटमॅन

मुद्दा कोण काढलाय ते बघा की, आपल्या टीममधल्या बॉलरचा नोबॉल पण इग्नोर करणार तर औघड आहे बॉ. बुके कुणाची तेही बघा जरा =))

पैसा's picture

4 Dec 2013 - 3:14 pm | पैसा

तिने बिचारीने सरळ सांगितलं. यल्ल यम्म एवढी कठीण अक्षरं कशाला बोल्तोस तू? तुला तरी यल्ल काढता येतो का पाटीवर?

सर्वप्रथम: बुके आमची नाहीत त्यामुळे व्हिरीत बुके तिची घाला =)) नोबॉल तर पडलाय पण मान्य करवेना =))

बाकी पाटीपेणसल द्या, यल्ल यम्म काय क्ष्ळ त्र्प्फ ज्ग्द्ड पर्यंत सर्व अक्शरे काधुन दाखवतो.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2013 - 3:19 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यामुळे व्हिरीत बुके तिची घाला>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif अरे थांबा..थांबा वाईच! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

पैसा's picture

4 Dec 2013 - 3:22 pm | पैसा

ती पण आमीच द्याची का?

हो नैतर काय! शंका तुम्हाला आहे सबब निरसनही तुम्हीच करून घ्या =))

पैसा's picture

5 Dec 2013 - 4:36 pm | पैसा

पाटीपेणसल द्या मज आणुनी
त्यावर गिर्वीन अश्शी अक्षरे
मास्तर म्हणती कोंबड्या-पाय बरे
आणिक जुळवीन भलती गणिते
बघुनी पब्लिक बेशुद्ध पडते
पाटीपेणसल द्या मज आणुनी

उत्तम गाणे. म्याटर अजून गोळा करता आले असते पण चलेगा!