Skip to main content

सिंटॅक्स- मिपावरील शब्द

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 03/12/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर प्रतिसाद देताना ठराविक शब्द वापरले जातात आणि ते पुन्हा पुन्हा वाचायला मिळतात.त्यांचा संदर्भ माहीत नसल्याने नवखा माणुस ते वाचुन प्रथम गोंधळतो,मग हळुहळु चाचपडत का होईना त्याला थोडेथोडे शब्द कळु लागतात.आणि मग तोही या दंग्यात सामील होउन जातो. मला सापडलेले काही शब्द असे चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट) चानचान (छानछान) जौदे बै (जाउ दे बाई) चेपु,तुनळी (फेसबुक,युट्युब) जिलब्या (लेख) पिंक (प्रतिक्रिया) हहपुवा (हसुन हसुन पुरेवाट) ह्घ्या (हलके घ्या) या शिवाय काही महान लोकांच्या स्मरणार्थ चेसुगु,जीवनभौ वगैरे तर समस्त मिपाकरांना आवाहन कि नवख्या मिपाकरांच्या सोयीसाठी असे अजुन शब्द सांगावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 68934
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

प्रकाटाआ= प्रतिसाद काढून टाकला आहे. हेवेसांनल= हे वेगळे सांगणे न लगे. खफ= खरडफळा., खव= खरडवही, व्यनि= व्यक्तिगत निरोप. अच्रत बव्लत= आचरट बावळट.

In reply to by बॅटमॅन

http://www.sherv.net/cm/emoticons/guns/machine-gun.gif बट्ट्मण्ण!@भांडे लपवणारे >>> :-/ आंsssssssssssssssss!!! :-/ बट्टमण्ण http://www.sherv.net/cm/emoticons/guns/tommy-submachine-gun.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

आयो....आत्मूसच्या खास स्मायलीप्रसादाचा लाभ झाल्याने आमचे पंख अंमळ अजून फाकले आहेत ;)

In reply to by विजुभाऊ

रच्याकने म्हणजे रस्त्याच्या कडेने बाय द वे. असं नीट शिकवा की हो. ;)

In reply to by परिंदा

हे एक जालीम चूर्ण आहे.... सध्या गहन विचार करणारे एक जण आहेत.... ते घेत आहेत ते औषध...म्हणूनच आजकाल ते जास्त पिंका टाकत नाहीत..

In reply to by परिंदा

ते चुर्ण गोबेल्सी प्रचारकी गुढगेफीरुंसाठी आहे... नथुगुग्गुळवटी...

In reply to by ग्रेटथिन्कर

आपण अद्याप न.गू. घेत नाही का? घेत जा हो...असे मध्येच सोडू नका आणि ते पथ्याचे पण बघा जरा...

In reply to by मी-सौरभ

माताय --- तदमाताय = च्यायला, तुझ्यायला (जनक : विजुभाऊ!) चेसुग ---> मला नाही माहित ब्वॉ! ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मला नाही माहित ब्वॉ!
'विठ्ठला' कोणता झेंडा घेऊ हाती.... किती तो विनय... पण ह्याला आमच्यात 'वेड पांघरुण....' असे म्हणतात बरं का! ;) - ('विठ्ठला'चा बडवा) सोकाजी

In reply to by सोत्रि

अरे आत्ताच हजर सभासदांमध्ये दर्शन झालं होतं की... शप्पथ! आठवण आली की हजर होईन असं आश्वासन दिलंय काय कुणास ठाऊक. ;)

In reply to by सोत्रि

नीलकांत विट्ठल अन संपादक बडवे अशी महान पदवी एकदा आम्हाला मिळाली होती. हल्ली तसे कोणी म्हणत नसल्याने प्रा. डॉ. बिरुटे मिपावर कमी प्रमाणात येऊ लागले आहेत! या आठवणीने अं.ह.झा. आणि ड्वाले पाणावले!

In reply to by पैसा

हो ना. मीही अंमळ हळवा झालो. आता फेसबुक वर अपडेट्स टाकणं आलं की मिपा म्हणजे कै जग नाही. पै, तेवढं लाईक वर क्लीक करुन... दोन शब्द तिथे लिहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चेपुवर तुम्ही कै पोस्ट केलंय ते न बघताच मी लैक करून टाकते! कल्जी नसावी!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

खरंच की! आणि कसल्या कसल्या आठवणी करून दिल्यास विमे! समुद्र काय अन विहीर काय! विहिरीतले बेडूक काय! देवा रे देवा!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

धान्याचे काश्मिर होणे
कुठल्या हो कुठल्या धान्याचे काश्मीर ;) अन इंचा-इंचाने माघार घेणे वैग्रेही त्यातच आले =))

In reply to by बॅटमॅन

@धान्याचे काश्मीर >>> :-/ :-/ :-/ धाग्याचे काश्मिर! :p असं म्हणायचं होतं मला. :-/

चानचान (छानछान)= चूक. हे छान छानचे उपहासात्मक रुप आहे. कमीत कमी शब्दात खवचटपणा दाखवण्यासाठी याचा वापर होतो. जिलब्या (लेख)= पुन्हा चूक. अशी कोणतीही साहित्यकृती (ज्यात लेख, काव्य, छायाचित्रे यांचा समावेश होतो) तिचा कर्ता/ कर्ती सतत, वाचकांना वीट येईस्तवर करीत/ लिहीत असेल तर त्यास जिल्बी म्हणतात. पिंक (प्रतिक्रिया)= हे आता मी केलं ते!!

पुलेशु. हे पुढील लेखनास शुभेच्छा यासाठी असून जर लेख जिल्बीष्टाईल असेल पुवाशु. म्ह्ण्जे पुढील वाचकांस शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणी दिल्यास आनंद होऊ देऊ नका. ;) त्याचा अर्थ वेगळा आहे. थोडक्यात म्हणजे "मसणात जावा" हा अर्थ सांगतीये. उगीच रागावू नका.

आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ही सुधरला/ली नाही तर ... मग दिवाळीच्या आणि नववर्षाच्या पण शुभेच्छा ( सौजन्य: आंनदयात्री ) एक आयडी ला आम्ही विमे होताना पाहिले ...आता तुम्ही रामे

In reply to by सुहास..

>>एक आयडी ला आम्ही विमे होताना पाहिले...आता तुम्ही रामे बरं आठवलं. ते विमेकाका तुमच्या नात्यात आहेत आहेत का हो रामे ?? :#

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अश्लील.. अश्लील.. बाकी पान पिकलंय हे मान्य करताय का? ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं सोडा हो बुवा, तुमच्या पाना-फुलांच्या-देठांच्या रांगोळ्या जगप्रसिद्ध आहेत, मी काकांना विचारलेलं.. :)

In reply to by शैलेन्द्र

तुमच्या पाना-फुलांच्या-देठांच्या रांगोळ्या जगप्रसिद्ध आहेत, माताय निर्वाण पावलो ;)

In reply to by शैलेन्द्र

>>तुमच्या पाना-फुलांच्या-देठांच्या रांगोळ्या जगप्रसिद्ध आहेत, माताय !! निर्वाणच !! =))

In reply to by शैलेन्द्र

@ तुमच्या पाना-फुलांच्या-देठांच्या रांगोळ्या जगप्रसिद्ध आहेत, मी काकांना विचारलेलं.. >>> अस्सं!!! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

रागावलात का? बर बर, तुमचाही देठ हिरवा बरं, चिडू नका :)

फक्त आडनावबंधू...नात्यात नाहीत नाहीत... बाकी >>>एक आयडी ला आम्ही विमे होताना पाहिले >>> म्हणजे काय ब्वॉ?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अहो म्हणजे विश्वनाथ मेहेंदळे ह्यांचं विमे झालं , तुम्हि राजेंद्र मेहेंदळे मग तुम्हि रामे

पूजाशी बाडीस. मिपावरचे काही वाक्प्रचार "इनो घेणे" "फाट्यावर मारणे" " आमचा हिच्यावर भारी जीव" :-

लईच संदर्भ आठवताहेत विजु भौ .. अजुन दोन विवक्षित हि & हि पडत्या पावसात जर तुम्ही आतुन ......... वाश्या

In reply to by मराठी_माणूस

copy paste असे टाइप केले की चोप्य पस्ते होते. - (टायपिस्ट) सोकाजी