सिंटॅक्स- मिपावरील शब्द

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
3 Dec 2013 - 5:22 pm

मिपावर प्रतिसाद देताना ठराविक शब्द वापरले जातात आणि ते पुन्हा पुन्हा वाचायला मिळतात.त्यांचा संदर्भ माहीत नसल्याने नवखा माणुस ते वाचुन प्रथम गोंधळतो,मग हळुहळु चाचपडत का होईना त्याला थोडेथोडे शब्द कळु लागतात.आणि मग तोही या दंग्यात सामील होउन जातो. मला सापडलेले काही शब्द असे

चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट)
चानचान (छानछान)
जौदे बै (जाउ दे बाई)
चेपु,तुनळी (फेसबुक,युट्युब)
जिलब्या (लेख)
पिंक (प्रतिक्रिया)
हहपुवा (हसुन हसुन पुरेवाट)
ह्घ्या (हलके घ्या)

या शिवाय काही महान लोकांच्या स्मरणार्थ चेसुगु,जीवनभौ वगैरे

तर समस्त मिपाकरांना आवाहन कि नवख्या मिपाकरांच्या सोयीसाठी असे अजुन शब्द सांगावे.

वाक्प्रचारप्रकटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

5 Dec 2013 - 5:00 pm | पैसा

पाटीवरती काढीन चित्रे
पाहुनी रेघा भितात पितरे
भूगोलातील ओहोटी भरती
लिहिता पोरे हसून मरती
पाटीपेणसल द्या मज आणुनी

आज प्रतिभेच्या पर्‍ह्याला लागली कळ, काव्य बदाबदा गळं ;)

पैसा's picture

5 Dec 2013 - 5:06 pm | पैसा

ऑन डिमाण्ड! पुढची यमके तूच जुळव.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2013 - 8:35 am | अत्रुप्त आत्मा

@पाहुनी रेघा भितात पितरे>>> =))

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2013 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा

@ तुला तरी यल्ल काढता येतो का पाटीवर?>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF

पिशी अबोली's picture

6 Dec 2013 - 7:19 pm | पिशी अबोली

चालूद्या...

चील माडी अन हलके घ्या राहीला की !

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Dec 2013 - 3:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

असाही एक धागा काढावा कोणीतरी

आपुल्या सहीत हायपरलिंका , दुसर्‍यांच्या प्रोत्साहनार्थ टाकु पिंका
मराठी बांधवांच्या कौतुका , केलेचि पाहीजे !!!

क्या बात है! गिल्टी अ‍ॅज चार्जड!

शैलेन्द्र's picture

4 Dec 2013 - 4:27 pm | शैलेन्द्र

"धाग्याला/प्रतिक्रियेला पंख लागणे" हा प्रकार हल्ली फारसा दिसत नाही.

अभ्या..'s picture

4 Dec 2013 - 4:32 pm | अभ्या..

लागतेत की अजुनपन.
फ़क्त कशामुळे किंवा कुणामुळे लागले कळत नै. ;-)

प्यारे१'s picture

4 Dec 2013 - 4:35 pm | प्यारे१

ते गुन्हेगाराला मारताना सगळ्याच्या हातात दंबूका देतेत तसं हाय ते! ;)

शैलेन्द्र's picture

4 Dec 2013 - 4:46 pm | शैलेन्द्र

एक लंबर प्रतिक्रिया

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Dec 2013 - 4:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे

पंख लागतात पण त्या बद्दल शंख करणारे हल्ली दिसत नाहीत.

शैलेन्द्र's picture

4 Dec 2013 - 4:45 pm | शैलेन्द्र

बरोबर,
हल्ली अपमान एकांतात सोसायची फॅशन आलीय बहुदा..

प्यारे१'s picture

4 Dec 2013 - 4:56 pm | प्यारे१

तेचं काय्ये ना!
प्रतिसाद काढला म्हणून डोक्यातनं जातो असं नस्तं.
नि नाही काढला म्हणून डोक्यात ठेवला असं पण नस्तं.
काय बोम्बा मारायच्या?
सगळे शाणे असतात. :)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2013 - 7:28 pm | अत्रुप्त आत्मा

@हल्ली अपमान एकांतात सोसायची फॅशन आलीय बहुदा..>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-059.gif

अभ्या..'s picture

4 Dec 2013 - 7:34 pm | अभ्या..

न सोसून सांगतो कुणाला ?
दोन्ही साइडन बडवणार ह्येनीच. ;-)
बादवे ते पियूष मृदुंग दिसला नाय पून्हा :-D

बॅटमॅन's picture

4 Dec 2013 - 7:50 pm | बॅटमॅन

पियूष मृदुंग

दर वाक्याचा कॉपीराइट घेणारा जबरा माणुस व्हता राव, काय चेष्टाय व्हय? ;)

वासु's picture

5 Dec 2013 - 11:53 am | वासु

चेपु म्हणजे काय?

मृत्युन्जय's picture

5 Dec 2013 - 11:55 am | मृत्युन्जय

चेपु = चेहरा (फेस) पुस्तक (बुक) = फेसबुक

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2013 - 1:02 pm | प्रभाकर पेठकर

तुम्ही भलतेच कांही चेपू नका.

नाही, नांव 'वासू' आहे म्हणून म्हंटलं.

वासु's picture

5 Dec 2013 - 2:07 pm | वासु

तुम्ही भलतेच कांही चेपू नका.???
म्हणजे मला नाही कळाल.

अरेरे, तुम्ही चुकीचा आयडी घेतलाय. साने गुरुजी मिळतोय का बघा.

उपास's picture

6 Dec 2013 - 2:36 am | उपास

सागु :))

अरे एक वाक्प्रचार राहून गेला ना
बोळा निघणे : जनक प्रभू मास्तर

उपास's picture

6 Dec 2013 - 2:39 am | उपास

एकंदर काय, शब्द् सोयीस्कर असतिल तर प्रचलित होतात.. यातले कित्येक शब्द आता माझ्या रोजच्या वापरात यायला लागलेत... कंपू म्हणोत किंवा काही, पण ही सामायिक शब्दसंपत्तीच माणसामाणसांना जोडते.. एक संग्रह बनवून आला तर टाकतो.. हाकानाका!

उपास's picture

6 Dec 2013 - 2:54 am | उपास

तर या भाषाविकासाला हातभार लागावा म्हणून हे डॉक्युमेंट शेअर करतोय
गुगल डॉक लिंक
सध्या सगळ्यांना ओपन एडिट ठेवलय त्यामुळे तुम्हाला वेळ होत जाईल तस तसे शब्द टाकत चला.. बँट्या त्या बायकांची नावं सुद्धा टाकता आली तर बरंच!
रच्याकने,
अशा प्रकारच्या बर्याच गोष्टी गुगल डॉक्स किंवा तत्सम टूल (ड्रॉपबॉक्स) वापरुन पब्लिग्कली/ ग्रुप्मध्ये शेअर करुन ठेवता येतिल (उत्तम लेखांच्या लिंका विषयवार../ युट्युबच्या लिंका) ज्या निवांतपणे बसून वाचता येतिल.
मी स्वतः अशी एक उत्तम लिस्ट मेंटेन करतोय, जी पर्सनल आहे आणि फावल्या वेळात (एअरपोर्टवर वगैरे) काय आणि कुठे वाचू/ पाहू असा प्रश्न येत नाही!