आंतरजालावरील लघुरूपे - मदत करा.

गाभा: 

नमस्कार,
मिसळपाववरील नवीन सदस्यांसाठी उपयोगास येतील अशी मदत पाने सध्या मी बनवतोय. याच वेळी नवीन सदस्यांना जुणे सदस्यं जे लघुरूपे वापरतात त्याची एका जागी माहिती दिली तर योग्यं होईल अशी कल्पना आली. मात्र माझ्याजवळ अशी यादी तयार नाही. मला येथे तुम्हाला माहिती असेल ती मराठी आंतरजालावर वापरली जाणारी मराठी लघुरूपे द्यावीत ही विनंती.

माझे योगदान :-

प्रकाटाआ - प्रतिसाद काढून टाकला आहे.
पुलेशु - पुढील लेखनासाठी शुभेच्छा
कलोअ - कळावे लोभ असावा.

मग तुम्ही काय सुचवताय? :)

- नीलकांत

प्रतिक्रिया

चांगले मार्गदर्शन. पण मी इथे सदस्य झाल्यापासून एकदाही (मग ते स्वतंत्र लिखाणात असो वा प्रतिसादात असो) लघुरूप वापरलेले नाही. तथापि याचा अर्थ असा नव्हे की तसे रूप कुणीच कधी वापरू नये. शासन आणि मराठी साहित्य महामंडळाने 'शुद्ध' लिखाणासाठी (व्याकरणदृष्ट्याही आणि अचूकतेनेदेखील) लिहिण्यासाठी एक स्वतंत्र अशी नियमावलीही प्रसिद्ध केली आहे. जर संपादक मंडळाची इच्छा असेल तर ते नियम कधीतरी येथे धागारूपानेही देता येतील, जेणेकरून नवीन सदस्यांना 'सुंदर' मराठी लिहिण्यास (म्हणजेत इथे टंकण्यास) ते फार उपयुक्त ठरतील.

मी नोंद केले आहे वेळोवेळी की, बरेच सदस्य (त्यातल्या त्यात नूतन) फार चुकीचे मराठी टंकलेखन करतात. ते त्यांच्याकडून होते की, मुद्दाम केले जाते या संशोधनाचा विषय नसला तरी विचार करण्यासारखा आहे. कारण एखाद्या सदस्याने इथे मांडलेल्या धाग्यातील विषय जरी अभ्यासपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या चर्चा योग्य वाटला तरी त्या लिखाणातील अशुद्धतेमुळे तिकडे दुर्लक्ष केले जाते. (इतकेच काय गंभीर विषयाचीही त्यामुळे टवाळकी होत जाते). सबब, 'सवयी' नेच मराठी टंकलेखनात सफाई येऊ शकेल इतकेच म्हणू शकतो. दरम्यान टंकनाचा बोजा वाटू नये म्हणून वर श्री.नीलकांत यानी म्हटल्याप्रमाणे लिखाणात काही लघुरूपे वापरल्यास गैर नाही, पण तो नित्याच्या सवयीचा भाग बनू देऊ नका इतकीच मराठी भाषाप्रेमी म्हणून विनंती करतो.

इन्द्रा

ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. ---
ह्याचे प्रमाण किती ते माहित नसेल तर आपण स्वयंपाकघरात पाय ठेवायच्या लायकीचे नाही असे समजावे.

उदाहरणार्थः- चवीपुरते मीठ घाला, फोडणीसाठी तेल (ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स.)

चांगला आणि उपयुक्त प्रकल्प!

यामध्ये एक महत्वाचे विसरू नका: "ह.घ्या." अर्थात "हलकेच घ्या" / Take it easy! :-)

आणि त्याचे मोठे भावंड: "ह.घ्या.हे.वे.सां.न.ल." - हलकेच घ्या हे वेगळे सांगणे न लगे

आणि हो: मिपा म्हणजे मिसळपाव ;)

मला वाटायच की पु. ल. देशपांडेंसारख लिहिलय म्हणून पुलेशु...

रच्याकने म्हणजे काय?
हे मी मायबोलीवर बर्याच वेळेला पाहिल आहे.

रस्त्याच्या कडेने

by the way

हे घ्या मग ;)

चहा = ड्डीत रहा

वा वा : म्हणजे वाह वाह , स्तुती करणे वगैरे या अर्थी !

छान कल्पना आहे. बाडीस!
आयो-
परा(१), परा(२), धमु, पिडां........
आणखी पर्वा सुका पण वाचले होते.
.

तटी-
आयो- आमचेही योगदान
बाडीस- बाय डिफाल्ट सहमत
तटी- तळटीप

मला असं वाटतं की नुसती लघुरूपंच नाही, तर इथे वापरली जाणारी भाषा, शब्दप्रयोग हेही अंतर्भूत करावेत. मराठी भाषेला ही नवीन तंत्रज्ञानाने दिलेली देणगी आहे.

उदाहरणार्थ
- इनो घेणे
- ह्यापी बड्डे
.
.
.

राजेश

प्रगल्भ व्हा, हा एक हल्लीच कळलेला एक वाक्प्रचार.

वाढदिवसाच्या शुभेच्छा....
एखाद्याने पर्सनल टीका वगैरे केली असता त्यावर द्यायचा प्रतिसाद.

ही & हि = हीन आणि हिणकस

हीण आनी हिणकस असं पाहिजे.

तीनचार महिन्यांत ब-याच शंका दूर झाल्या पण मी तसा नवीन असल्याने माझ्या काही उर्वरित शंका.

कोदा, मास्तर तसेच गुरुजी ही कोणाची संबोधने आहेत?

विदा म्हणजे काय?

रिक्षा फिरवणे,बसवला टेंपोत या कल्पनांचे अर्थ काय?

डायरीचा अर्थ समझींग्ड पण सत्कार म्हणजे काय?

..अज्ञपणाबद्दल माफ़ी..

कोदा हे कुणाचे असे सम्बोधन नाही. पण हे एक आन्तर जालीय रोगचे नाव आहे. म्हणजे एखादा उगाचच माझा लेख वाचा, मला प्रतिक्रिया द्या, किंवा शायनिंग मारत असेल तर त्याला कोदा झाला असं म्हणण्यात येते. थोडक्यात, तो एक वाकप्रचार आहे.

कोदा, मास्तर तसेच गुरुजी ही कोणाची संबोधने आहेत?

पूर्वी मिपावर सदस्याला स्वतःच सदस्यनाम बदलण्याची मुभा होती. काही नांवे त्यातून प्रचलित झाली आहेत..
कोदा=कोल्हापुरी दादा=विनायक पाचलग,
मास्तर्=प्रभु मास्तर्=विनायक प्रभु
गुरूजी नव्हे हो.. गुर्जी... तर, ओरिजिनल गुर्जी/गुर्जी नं१ : राजेश घासकडवी, गुर्जी नं२: चिंतातूर जंतू..
टीपः हे ड्युप्लिकेट गुर्जी नाहीत...
आता त्यांना गुर्जी का म्हणतात याचा अभ्यास स्वतःच करा...

विदा म्हणजे काय?

इंग्रजी शब्दास मराठी प्रतिशब्दः डेटा. यावरून विदागारःडेटाबेस असाही शब्द आहे.

रिक्षा फिरवणे,बसवला टेंपोत या कल्पनांचे अर्थ काय?

मिपावरची जुनी पाने चाळून पाहिलीत तर काही अपशब्द दिसतील. त्यांची ही आधी टारझनने आणि मग त्याच्या पावलावर पाऊल टाकून इतरांनी केलेली + त्या अपशब्दांच्या जागी वापरली जाणारी ही विडंबनं आहेत. भावना पोचल्याशी मतलब... हाकानाका...

डायरीचा अर्थ समझींग्ड पण सत्कार म्हणजे काय?

सरकारनामा मध्ये करतात तोच.. फक्त इथे लेखणीने करतात....

आणि हो....रच्याकने म्हणजे रस्त्याच्या कडेने=बाय द वे...
तिथे बर्‍याचशा शब्दांचे शब्द्शः भाषांतर पाहिलेय. पण कहर म्हणजे एके ठिकाणी (हे बहुधा मनोगत असावे) लॅपटॉपसाठी 'मांडीवर'(!!!) असा शब्दप्रयोग केलेला वाचलाय..

सरकारनामा मध्ये करतात तोच.. फक्त इथे लेखणीने करतात....

काय सांगता..? हे व्याडेश्वरा...!!!

म्हणजे एखादा फक्त त्यालाच द्वयअर्थी सन्वाद समजतात किंवा करता येतात अशा भ्रमात राहीला लागला, किंवा फक्त आपण आहोत म्हणूनच जग चाललय, किंवा आपल्याला एखाद्या ओब्स्कुअर विषयाबद्द्ल (जसे की स्वतः ईन्जिनियर असताना कोम्बडी पालन ई ई) पुर्वानुभव नसताना देखील आपण त्या क्षेत्रातील तज्ञ माणसचे प्रोब्लेम्स फिक्स केले, किन्वा आपण कूलेस्ट डॅड असल्याची स्वप्ने पडू लागली कि म्हणतात .. सम्भाळ रे बाबा तुझा आज काल मास्तर होत चालला आहे.. हा ही एक वाकप्रचार असून, कुणाचेही सम्बोधन नाहे आहे.

श्री.गगनविहारी....मी स्वतः इथे नवीन होतो त्यावेळी मलाही नेमके हेच प्रश्न पडले होते, पण वेळोवेळी झालेल्या चर्चा, संवाद यातून या लघुरुपांचे 'गूढ' इथल्याच सदस्यांनी उलगडले होते :

कोदा, मास्तर तसेच गुरुजी ही कोणाची संबोधने आहेत?

~ कोदा = कोल्हापुरी दादा.....हा 'मान' श्री.विनायक पाचलग या सदस्यास त्यांच्या मिपामित्रांनी बहाल केला आहे. [श्री.पाचलग हे कोल्हापूरचे असल्याने.....मात्र ते 'दादा' कसे वा का झाले याचा विदा नाही].
मास्तर = बहुधा श्री.भडकमकर मास्तर याना उद्देश्यून असावे.
गुरुजी (किंवा प्रेमाने गुर्जी) = श्री.राजेश घासकडवी याना म्हटले जाते (माझी माहिती चुकीचीही असू शकेल, पण कित्येक वेळा श्री.घासकडवी यांचा असा उल्लेख झालेला वाचला आहे.)

विदा म्हणजे काय? = याचा अर्थ "Data".... विदा हे लघुरूप नसून संगणक भाषेत वापरण्यात येणारे नाम झाले आहे.

बसवला टेंपोत या कल्पनांचे अर्थ काय?

~ यातील 'बसवला टेंपोत' हा इथला वाक्यप्रचार असावा असे वाटत नाही. राजकीय धुमश्चक्रीत (विशेषतः साखर कारखान्याच्या निवडणूक काळात त्यावेळेपुरते एखाद्या गटाला "किडनॅप" केले जाते) धोकादायक मतदाराला आमीष दाखवून जर तो बधत नाही असे दिसले की त्याला मतदान तारखेपर्यंत 'आत' घातले जाते....याला पश्चिम महाराष्ट्रात 'बसवला टेंपोत आणि डाळला...' असे कुजबूजत म्हटले जाते.

राहिलेल्या अन्य संज्ञाबद्दलचे अर्थ जाणून घेण्यास मीही उत्सुक आहे.

इन्द्रा

>>श्री.पाचलग हे कोल्हापूरचे असल्याने.....मात्र ते 'दादा' कसे वा का झाले याचा विदा नाही

कमाल आहे , विदा नाही म्हणजे ?
विकीवर अजुन कोणी टाकले कसे नाही हे? ;-)

>>>विकीवर अजुन कोणी टाकले कसे नाही हे?

मिपाजगतात, विकी हे देखील एका जुन्याजाणत्या सदस्याचे नाव आहे. :-)

विदा म्हणजे डेटा..

हे ठीक.. पण विदा असा मूळ शब्द आहे का? जेनेसिस काय असावा या दोन अक्षरांचा?

आमचे एक काका होते, (म्हणजे इथे होते, आता नसतात(म्हणे)) त्यांच एक वाक्य सांगतो.

"विदा हा शब्द वापरणारा म्हणजे फारतर तिघातला एक" .. अर्थात जुनी गोष्ट आहे पण तुम्हाला भलत्या शब्दांच्या जन्माचे डोहाळे लागलेत म्हणुन आपली एक चिंच दीली तुम्हाला. ;-)

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बसवला टेंपोत हा इतका सरळ अर्थावरून आलेला शब्द नाहिये.
पूर्वी येथे 'बाझवला भेंXX ' (XX च्या जागी च आणी त ची रूपे घालावीत ) हा शिवी कम वाक्प्रचार सर्रास वापरात असे. त्याचे श्री . मा. टारझन यांनी सौम्य भाषेत बसवला टेंपोत हे रुप आणले.

अजून एक इथे रूळलेला वाक्प्रचार - बाजार उठला.

वेल....तुम्ही म्हणता तेही (उग्र) रूप असू शकेल टेंपोचे. पण कोल्हापूर भागात साखर कारखाना परिसरात भरत असलेल्या साप्ताहिक बाजारात टेंपोतून कोंबड्यांची आवक-जावक मोठ्या प्रमाणावर होते. व्यवहार होताना-ठरताना कित्येकदा विक्रेते, घेवारी आणि दलाल यांच्यात हाणामारीचे (कित्येकदा दिखावूदेखील) प्रसंग येतात. मग दोन कमी, दोन जास्त असे करत तो दहावीस कोंबड्यांचा पेटारा (इकडे "डालगे" म्हणतात) उचलायचे आणि आपल्या टेम्पोत टाकायचे....याला "डाळणे" म्हटले जाते. "डालगे डाळले एक्दासे, लई टिवटिवत होता लेकाचा..." अशी फुशारकीदेखील घेवारी मारतो....म्हणजे देणार्‍याच्या मनात नव्हते पण घेणार्‍याने "ट्रिक" लढवून तो व्यवहार केलाच असा याचा अर्थ. हाच वाक्यप्रचार पुढे निवडणुकींच्या गदारोळातदेखील परफेक्ट फिट बसला....म्हणजे 'अमुक एक गट बडेजाव मारत होता, पण उचलला बसवला टेम्पोत आणि डाळला...!"

इन्द्रा

केसुगुर्जींना विसरून कसे चालेल.

प्रतिसाद अवांतर होऊ नये म्हणून आमची भर

आंजा / अंजा - आंतरजाल

~ कोदा = कोल्हापुरी दादा.....हा 'मान' श्री.विनायक पाचलग या सदस्यास त्यांच्या मिपामित्रांनी बहाल केला आहे. [श्री.पाचलग हे कोल्हापूरचे असल्याने.....मात्र ते 'दादा' कसे वा का झाले याचा विदा नाही].

माझ्या माहितिनुसार कोल्हापुरी दादा हा त्यान्चा आधी आयडी होता. सो कोल्हापुरी दादा = कोदा

=)) =))

हाकानाका = आहे काsssssय आन नाही काय

हाकानाका - हाय काय नाय काय

हे बाकी छान झालं.

मी देखिल अनेक दिवस चक्रावल्यासारखे हे कोदा, विदा, पुलेशु, मास्तर, गुर्जी इ. इ. शब्द नि रिक्षा फिरवण्यासारखे भाषाप्रयोग वाचत होतो. आता बरंच काही समजायला लागल्यागत वाटतंय.

नीलकांत, गगनविहारी, मस्त कलंदर, इन्द्रा, गोगोल आदि दोस्तांना धन्यवाद!

आणखीही अशा प्रकारचे मिपा-ष्टाईल ज्ञान असेल तर मिळवण्यास उत्सुक......

आमलेट घ्या आमलेट !!

काढा शोधुन ;)

मला झोपाळ्यावाली ;) (चुचु) चा संपुर्ण विदा पाहिजे आहे ..कोणी मदत करणार का ?

प्यार्टी = पार्टी

पण विशिष्ट ठिकाणी केलेल्या पार्टीलाच 'प्यार्टी' म्हणतात. जाणकार लोक ती जागा सांगतील.

श्री श्री छो. डान्रावांना हा प्रतिसाद समर्पीत!

राको म्हणजे काय ते कळू शकेल काय?

राको = राजकिय कोलॅबोरेटर

बाकी जास्त स्पष्टीकरण देणे आमच्या पक्षशिस्तीच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकण्याची शक्यता असल्याने आम्ही इथेच पुर्णविराम देतो. ;)

- ( आद्य राको ) छोटा डॉन

धन्यवाद डॉनराव! जास्त स्पष्टीकरण देणे शक्य नसले तरी हरकत नाही, उगाच पक्षशिस्तीचा भंग होऊन छोटा डॉन चा छोटा अमर नको व्हायला. आम्हीच दिलेल्या दिशेने अभ्यास वाढवू.

ह्या सगळ्या गदारोळात 'चोप्य पस्ते' शब्द राहिला की ;)

चोप्य पस्ते = copy paste

अच्र्त ब्व्लत हे स्त्रीसुलभ शब्द राहिले का ?

काय परा... 'चोप्य पस्ते' बरोबर चोता दोन कसा काय विसरलास ?

WPTA = Wise People Think Alike ... जेव्हा दोन माणसे एकाच वेळी सारखेच मत मांडतात

आंजा - आंतरजाल (विस्तृत रूपं सुचत असली तरी गांजा हे लघुरूप मी वाचलेलं नाही)
मोठे व्हा - बऱ्यापैकी शब्दशः अर्थ, पण बुद्धीने मोठे व्हा असा प्रेमळ सल्ला. त्यामागे एक ठसका आहे. त्यासाठी आजकाल 'प्रगल्भ व्हा' हा शब्दप्रयोगही वापरता येईल
तुमचा अभ्यास अपुरा पडतोय - पुन्हा बऱ्यापैकी शब्दशः अर्थ पण ठसक्यासहित. अमुकतमुक गोष्टींचे संदर्भ तुम्हाला ठाऊक नाहीत.
विरोप - इमेलसाठी प्रतिशब्द वाचलेला आहे. कितपत प्रचलित आहे माहीत नाही.

ई-मेल = इलेक्ट्रॉनिक मेल = विद्युत पत्र = विपत्र किंवा विद्युत निरोप = विरोप
(माहीतगार)बेसनलाडू

चपला घालून चालू पडणे= सदस्यत्व रद्द करणे.

मागे ते चांदण्या देणे वगैरेपण जोरात होते. तसेच ड्व्लोले पानावले, वाढदिवसाच्या शुभेच्छा इत्यादि आहेतच.

खवउपा = खरडवही उचकपाचक: इतर सदस्यांच्या खरडवह्यांमध्ये चाललेले सुखसंवाद वाचणे व त्यातून रंजन, ज्ञान, गॉसिप आदी धनप्राप्ती करून घेणे. शक्यतो अशा मौलिक गोष्टींचा (लगेचच किंवा नंतर कधीतरी) यथायोग्य वापर करणे व त्याद्वारे आपले ज्ञान पाजळणे, इतरांना 'आमचे तुमच्यावर लक्ष आहे!' असे लक्षात आणून देणे किंवा इतरांचे रंजन करणे हेही यात बर्‍याचदा अभिप्रेत असते.
थोडक्यात, वाटून घेतल्याने ज्ञान, रंजन, व गॉसिप वृध्दिंगत होते याचा पडताळा देणे.

टीपः या दुव्यावर आज कुणाकुणाच्या खरडवह्या तेजीत आहेत ते कळते.

डायरी देणे म्हणजे काय? आणि
प्र.का.टा.आ .......... का? कोण काधुन टाकत?

हाच प्रश्न मी बर्‍याच जणांना विचारला होता....
त्याचे निरसन झाल्यावर मला कळालेले असे की....
कोणी उगाच काहीही धागे काढत असतील तर त्यांना ते सर्व इथे (मिपावर) न लिहिता इतरत्र कुठेही लिहिण्याचे आवाहन/तंबी /विनंती .(ज्या सदस्याने केलेली आहे त्यावर ह्यांचे स्वरुप अवलंबुन असते.)
तर हे इतरत्र म्हंजे डायरी.

तसेच एकच प्रतिसाद २ वेळा चुकुन तंकल्या गेला असल्यास तसे आपण (सदस्य) स्वत:च संपादित करुन टाकता येण्याची सुविधा म्हंजे प्र.का.टा.आ

हा मझ्या मीत्राचा ब्लॉग वाचा... येथे खुप आहेत..

http://snvivi.blogspot.com/

सुंदर माहीती !

!

कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी "कट्टोत्सुक" हा आणखी एक मिपा-स्पेशल शब्द जन्माला घातला आहे :-)

आणि बहुतेक "कट्ट्याला येणार, येणार" म्हणून अखेरीस न येणार्‍यांना उद्देशून असावा असा 'टांगारू' हा शब्द यशोधरा यांनी वापरलेला असावा असं दिसतं.

टंकाळा = टंकायचा कंटाळा.

हा शब्दही अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. या धाग्यावर त्याची नोंद नव्हती.

कल्जी= काळजि
क्रु=करू

ब्रे=बरे

थँक्स सारखं धन्स
आणि थँक्यू सारखं धन्यू

हे आणखी दोन शब्द.

रोफ्यालल्या गेलो आहे म्हणजे काय?

रोलिंग ऑन द फ्लोअर

चॅटींगमध्ये जे LOL, ROFL वगैरे असतं त्याचे मराठीकरण.

यावरून एक जुना प्रतिसाद आठवला.

ROFL चा फुलफॉर्म करा, ते झालं आहे.

सुतावरुन स्वर्ग गाठणार्‍यांना बॅटमॅननी "जालराजवाडे" असा लघुरुपशब्द जन्माला घातलेला आहे.

ek

दूसर्‍याच्या गल्लीत स्वतःची रिक्षा हॉर्न वाजवत फिरणे व लोकाना त्यात बसायला सांगणे

दुसर्‍याच्याधाग्यावर आपला प्रतिसाद देउन त्यात त्याच विषयाशी संबंधित स्वतःच्या एखाद्या जुन्या धाग्याची लिंक देणे व लोकाना ती वाचा असे सांगणे.

फेसबुक वर असते तशी लाइक दर्शवणारी खूण असावी.

माताय ?