ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ३)

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
13 Aug 2022 - 10:47 am

नमस्कार मंडळी,

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवीन भाग काढत आहे. नवीन प्रतिसाद लिहायचे असतील तर ते या भागात लिहावेत आणि आधीच्या भागात लिहिलेल्या प्रतिसादांना उत्तर लिहायचे असेल तरच ते त्या भागात लिहावेत ही विनंती. या महिन्यात पहिल्या दोन भागात मिपा परंपरेला अनुसरून चांगली चर्चा झाली आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार.

नितीशकुमार परत राजदबरोबर गेले तेव्हा मी त्यावेळेस चर्चेत मी म्हटले होते की समाजवादी नेते भांडण्यासाठी एकत्र येतात आणि एकत्र येण्यासाठी भांडतात. तसेच समाजवादी विचारांचे पक्ष किती वेळा एकत्र आले आणि किती वेळा तुटले याचा हिशेब ठेवणे कोणाही मर्त्य मानवाला शक्य होईल असे वाटत नाही. ते का हे या भागात इथे टाईमलाईनच्या मदतीने स्पष्ट करतो.

१९३० चे दशक: जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि आचार्य जीवतराम कृपलानी यांनी काँग्रेस अंतर्गत काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९४९: जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी काँग्रेस सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९५१: आचार्य कृपलानींनी काँग्रेस सोडून स्वत:च्या किसान मजदूर प्रजा पक्षाची स्थापना केली.
१९५२: पहिल्या लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर समाजवादी पक्ष आणि किसान मजदूर प्रजा पक्ष एकत्र येऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना
१९५५: राममनोहर लोहियांनी प्रजा समाजवादी पक्ष सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९६४: कर्पुरी ठाकूर यांनी प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडून स्वत:च्या संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना केली. जॉर्ज फर्नांडिस यांचा पण संयुक्त समाजवादी पक्षात प्रवेश
१९६७ - चरणसिंग यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून भारतीय क्रांती दलाची स्थापना केली.
१९६९ - बिजू पटनाईक यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून उत्कल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. काँग्रेस पक्षात फूट-- इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(आर) आणि मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(ओ) पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.
१९७२ - १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी एकत्र येऊन नव्या समाजवादी पक्षाची स्थापना
१९७४ - चरणसिंगांचा भारतीय क्रांतीदल, बिजू पटनाईकांचा उत्कल काँग्रेस, १९७२ मध्ये स्थापन झालेला समाजवादी पक्ष, राजाजींच्या निधनानंतर उतरणीला लागलेला मिनू मसानी-पिलू मोदींचा स्वतंत्र पक्ष आणि १९७३ मध्ये भारतीय जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर बलराज मधोक यांनी स्थापन केलेला स्वत:चा पक्ष एकत्र येऊन भारतीय लोकदल या पक्षाची स्थापना
१९७७ - जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा आणि नंदिनी सत्पथी काँग्रेसबाहेर पडून त्यांनी स्वत:चा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी हा पक्ष स्थापन केला.१९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी, भारतीय लोकदल, काँग्रेस(ओ) आणि भारतीय जनसंघ यांनी भारतीय लोकदलाच्या हलधर या चिन्हावर निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर या पक्षांचे जनता पक्ष या नव्या पक्षात विलीनीकरण.
१९७८ - शरद पवार, वायलार रवी, अंबिका सोनी आणि के.पी.उन्नीकृष्णन यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून काँग्रेस(समाजवादी) या पक्षाची स्थापना केली.
१९७९: चरणसिंग, राजनारायण इत्यादी नेत्यांनी जनता पक्ष सोडून जनता पक्ष (सेक्युलर) स्थापन केला आणि जनता पक्षाचे सरकार पाडले. चरणसिंग औटघटकेचे पंतप्रधान झाले.
१९८०- लोकसभा निवडणुकांमध्ये धुव्वा उडल्यानंतर चरणसिंग जनता पक्ष(सेक्युलर) बाहेर पडले आणि स्वत:च्या भारतीय लोकदल पक्षाची पुनर्स्थापना केली. जगजीवन राम जनता पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा काँग्रेस(जे) पक्ष स्थापन केला. जनता पक्षातून पूर्वाश्रमीचे जनसंघाचे नेते बाहेर पडून त्यांनी स्वत:च्या भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.
१९८०/१९८१: चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षातून बाहेर पडून देवीलाल यांच्या स्वत:च्या लोकदल(बी) पक्षाची स्थापना केली.
१९८७-- काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी जनमोर्चा या अराजकीय गटाची स्थापना केली. शरद पवार, अंबिका सोनी आणि वायलार रवी काँग्रेसमध्ये परतले. के.पी.उन्नीकृष्णन काँग्रेस(एस) बरोबर राहिले.
१९८८-- चरणसिंगांचा (त्यांच्या मृत्यूनंतर अजितसिंगांचा) लोकदल, देवीलालांचा लोकदल, काँग्रेस(एस), वि.प्र.सिंगांचा जनमोर्चा एकत्र येऊन जनता दलाची स्थापना.
१९८९- लोकसभा निवडणुकांनंतर जनता दलाचा गटनेता (म्हणजेच होणारा नवा पंतप्रधान) निवडायच्या वेळेस चंद्रशेखर आणि वि.प्र.सिंग हे दोन दावेदार होते. अरूण नेहरू आणि पत्रकार कुलदीप नय्यर यांना हाताशी धरून वि.प्र.सिंगांनी चंद्रशेखर यांना मात द्यायचा डाव खेळला. बैठक सुरू होताच ताबडतोब इतरांना कोणालाही बोलायची संधी न देता वि.प्र.सिंगांनी देवीलालांचे नाव नेतेपदावर सुचविले. काही क्षणातच पुढील पंतप्रधान देवीलाल असतील अशा तारा वर्तमानपत्रांच्या ऑफिसात गेल्याही होत्या. पण देवीलालांनी आपले वय ७५ उलटून गेले असल्याने इतकी मोठी जबाबदारी आपल्याला नको असे म्हटले आणि नेतेपदासाठी वि.प्र.सिंगांचे नाव सुचविले. हे सगळे चंद्रशेखरांना अंधारात ठेऊन ठरवून केले गेले होते. त्यातून चंद्रशेखर दुखावले गेले आणि ते वि.प्र.सिंगांच्या शपथविधीलाही हजर नव्हते.
१९९०- चंद्रशेखर आणि देवीलाल जनता दलाबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:च्या समाजवादी जनता दल या पक्षाची स्थापना केली. चंद्रशेखर काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले. राजस्थानात दिग्विजयसिंग (मध्यप्रदेशातील वाचाळवीर दिग्विजियसिंग वेगळे) या स्थानिक नेत्याने जनता दल सोडून स्वत:चा गट स्थापन करून भाजपबरोबर हातमिळवणी केली आणि भैरोसिंग शेखावतांचे अल्पमतातले सरकार तारले.
१९९१-- चिमणभाई पटेल यांनी समाजवादी जनता दलातून बाहेर पडून स्वत:च्या जनता दल(गुजरात) पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने आपले सरकार तारले.
१९९२- अजितसिंग जनता दलाबाहेर आणि त्यांनी स्वत:चा जनता दल(अजित) हा पक्ष स्थापन केला. मुलायमसिंग यादव समाजवादी जनता दलाबाहेर पडून त्यांनी स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली. चिमणभाई पटेल यांचा जनता द्ला(गुजरात) हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन.
१९९३-- जनता दल, समाजवादी जनता दल आणि जनता दल (अजित) यांची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका एकत्र लढवायची घोषणा. पण उत्तर प्रदेशात जोरदार पराभव झाल्यानंतर अजित सिंगांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९० मध्ये राजस्थानात भैरोसिंग शेखावतांचे सरकार तारणारे दिग्विजयसिंग काँग्रेसमध्ये गेले.
१९९४- जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार आणि रबी रे यांनी जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली. नंतर देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी पण समता पक्षात प्रवेश केला.
१९९६-- चंद्रशेखर यांनी पण समता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवली. पण निवडणुकांनंतर त्यांनी आपला समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) ची स्थापना केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी अजितसिंग काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वत:चा भारतीय किसान कामगार पक्ष स्थापन केला. निवडणुकांनंतर रामकृष्ण हेगडेंची जनता दलातून हकालपट्टी. त्यांनी स्वत:चा लोकशक्ती हा पक्ष स्थापन केला.
१९९७-- देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी समता पक्षातून बाहेर पडून स्वत:चा हरियाणा लोकदल (राष्ट्रीय) हा पक्ष स्थापन केला. या पक्षाचे नाव १९९९ मध्ये बदलून इंडिअन नॅशनल लोकदल हे झाले. नवीन पटनाईक यांनी जनता दलातून बाहेर पडून बिजू जनता दल हा पक्ष स्थापन केला.
१९९९--- उरल्यासुरल्या जनता दलात जनता दल(धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल(संयुक्त) हे दोन तुकडे पडले. देवेगौडा आणि कुमारस्वामी जनता दल(धर्मनिरपेक्ष) मध्ये तर रामविलास पासवान जनता दल(संयुक्त) मध्ये सामील. समता पक्ष आणि लोकशक्ती हे दोन पक्षही जनता दल (संयुक्त) मध्ये विलीन. १९९९ मध्ये कर्नाटकात जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल (संयुक्त) हे दोन्ही गट होते. २००५-०६ च्या दरम्यान कर्नाटकातील जनता दल (संयुक्त) पक्ष अस्तंगत झाला.
२००२-- रामविलास पासवान यांनी जनता दल(संयुक्त) सोडून आपला लोकजनशक्ती हा पक्ष स्थापन केला.
२००६-- कर्नाटकात सिध्दरामय्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) मधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले. पुढे २०१३ मध्ये ते काँग्रेसकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.
२०१४-- मोदीलाटेत सगळे पक्ष वाहून गेल्यानंतर परत एकदा जनता दलाचे पुनरूज्जिवन करायची घोषणा. पण ती प्रत्यक्षात आली नाही.
२०१७-- नितीशकुमारांनी परत एकदा भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर नाराज शरद यादवांचा अनामिक एक व्यक्ती असलेला स्वतंत्र गट.
२०२२-- नितीशकुमार यांनी परत लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली.

या सगळ्या ब्रम्हघोटाळ्यात कितीतरी मधल्या पायऱ्या मी विसरलो आहे हे नक्की. १९८०/८१ मध्ये कधीतरी देवीलालांनी चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षातून बाहेर पडून आपला लोकदल (बी) पक्ष स्थापन केला हे वर लिहिलेच आहे. १९८७ मध्ये चरणसिंगांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र अजितसिंग चरणसिंगांच्या लोकदल पक्षाचे अध्यक्ष झाले आणि तो गट लोकदल(ए) नावाने ओळखला जाऊ लागला. मुलायमसिंग यादवही त्याच पक्षात होते. चरणसिंगांनंतर पक्षाचे अध्यक्षपद आपल्याकडे येईल असे मुलायमसिंगांना वाटत होते पण अजितसिंग हे चरणसिंगांचे पुत्र असल्याने ते अनेक वर्षे अमेरिकेतले आपले वास्तव्य आणि ग्रीनकार्ड सोडून आले आणि ते अध्यक्ष बनले. अजितसिंग आणि मुलायमसिंग यादव यांचे जमायचे नाही. त्यामुळे अजितसिंगांनी मुलायमसिंगांना पक्षातून बाहेर काढले होते. हे १९८७/८८ मध्ये कधीतरी झाले. ते नक्की कधी झाले हे मला माहित नाही. हेच सगळे लोक १९८८ मध्ये जनता दलात परत एकत्र आले होते.

१९८९ च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानपदासाठी वि.प्र.सिंगांनी चंद्रशेखरांना धोबीपछाड दिला हे वर लिहिलेच आहे. त्याचा सूड मग चंद्रशेखरांनी लगेच उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री नेमताना उगवला. अजितसिंग मुख्यमंत्री व्हावेत असे वि.प्र.सिंगांना वाटत होते तर चंद्रशेखरांचे उमेदवार होते मुलायमसिंग यादव. चंद्रशेखरांचा गट भारी पडला आणि उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले. पुढे मार्च १९९० मध्ये बिहारमध्ये मुख्यमंत्री निवडायच्या वेळेस वि.प्र.सिंगांचे उमेदवार होते रामसुंदर दास तर त्यांना आव्हान दिले होते लालू यादवांनी. लालूंनी चंद्रशेखरांकडे मुख्यमंत्री व्हायला मदत मागितली तेव्हा चंद्रशेखरांनी स्वतःचा रघुनाथ झा हा उमेदवार उभा केला. तेव्हा नेतेपदासाठी आमदारांमध्ये निवडणुक झाली होती. त्या निवडणुकीत रघुनाथ झांनी रामसुंदर दासांची मते फोडून लालूंचा विजय निश्चित केला. भारतीय राजकारणातील दोन सगळ्यात घाणेरडे लोक- लालू आणि मुलायमसिंग यादव या राजकारणातून पुढे आले आहेत.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या पार्श्वभूमीवर परत नितीश आणि तेजस्वी/लालू फुटले तर अजिबात आश्चर्य वाटू नये.

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

13 Aug 2022 - 12:16 pm | क्लिंटन

समीर वानखेडे यु.पी.एस.सी ची परीक्षा पास करून मग सरकारी सेवेत दाखल झाले होते. अशा कोणाही उमेदवाराची सरकारी सेवेत दाखल करून घेण्यापूर्वी कागदपत्रे, त्यांनी केलेले दावे वगैरेंची कसून तपासणी होते आणि सगळे क्लिअर असेल तरच सरकारमध्ये जबाबदारीची पदे दिली जातात. तेव्हा त्यावेळेसच समीर वानखेंडेंचे जात प्रमाणपत्र वगैरे गोष्टींची पडताळणी झाली असेलच. केवळ नबाब मलिकांच्या आग्रहामुळे ही चौकशी परत करायची काय गरज होती हे समजले नाही.

सुक्या's picture

13 Aug 2022 - 12:34 pm | सुक्या

धन्यवाद क्लिंटन.

खुप माहीतिपुर्ण धागा सुरुवात ..

वामन देशमुख's picture

13 Aug 2022 - 1:47 pm | वामन देशमुख

इथे टाईमलाईनच्या मदतीने स्पष्ट करतो.

क्लिंटन,

समाजवाद्यांच्या एकत्र येणे दूर जाणे या स्वभावाबद्दल सर्वसाधारण माहिती होती पण हा इतका इतिहास माहीत नव्हता. हायला इथे माझी वाचताना दमछाक होते आहे तुम्हाला लिहायला किती वेळ लागला असेल!

हा धागा वाचनखूण म्हणून साठवत आहे; संदर्भ म्हणून उपयोगी पडेल.

सुबोध खरे's picture

13 Aug 2022 - 8:16 pm | सुबोध खरे

समाजवादी पक्षाबद्दल असे म्हटले जाते कि तेथे नेते फार असतात आणि अनुयायी नगण्य असतात.

आणि प्रत्येक नेता बृहस्पतीचा बाप असतो. त्यामुळे एकाचे दुसर्याशी कधीही पटत नाही. भोंगळ विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव असतो.

यात शेतकरी कामगार पक्ष सारखे साम्यवादी समाजवादी याच्या मधले अनेक शाखा पक्ष सुद्धा येऊ शकतील.

समाजवाद्यांचे वर्णन म्हणजे वैचारिक बद्धकोष्ठ आणि मौखिक हगवण असे कुणीतरी केल्याचे आठवते.

इतक्या सगळ्या समाजवाद्यांची जंत्री शोधून काढून विस्ताराने लिहिण्याच्या आपल्या चिकाटीला अक्षरशः शतशः दंडवत.

गवि's picture

13 Aug 2022 - 2:37 pm | गवि

क्लिंटन, हा अत्यंत संदर्भयुक्त मुद्देसूद लेख "ताज्या घडामोडी" या धारावाहिक सदरात आणि त्या शीर्षकाने असू नये असे वाटते. हा एक वेगळा संग्राह्य लेख एका सुसंगत शीर्षकासह प्रकाशित करावा असे वाटते. ताज्या घडामोडीही नेहमीप्रमाणे असू देत.

क्लिंटन's picture

13 Aug 2022 - 5:00 pm | क्लिंटन

हो तसे झाले आहे खरे. त्याचे झाले असे की जुन्या भागात १५०+ प्रतिसाद झाले होते आणि नवा भाग काढायचा होता. तो काढताना काहीतरी लीड द्यायला हवा तो बिहारमधील घडामोडींचा वापर करून द्यावा असे वाटले. आणि परत नितीश-तेजस्वी यांचे फाटायची शक्यता आहे हे लिहायचे होते. ते करतानाच २०१९ मध्ये भाऊ तोरसेकरांच्या जागता पहारा या ब्लॉगवर त्यांनी समाजवाद्यांवर लेख लिहिला होता त्यावर कमेंटमध्ये या सगळ्या टाईमलाईनचा उल्लेख मी केला होता हे आठवले. मग त्यात थोडे बदल करून माझाच तिकडचा प्रतिसाद इथे आणला आणि ती सगळी पार्श्वभूमी लिहिली- उद्देश हा की या पार्श्वभूमीवर नितीश- तेजस्वी परत भांडायची शक्यता आहे हे दाखवून देणे. पण ते करताना नाकापेक्षा मोती जड झाला आणि ताज्या घडामोडींपेक्षा जुन्या घडामोडींचाच धागा आहे असे वाटावे असे झाले.

सूचनेबद्दल धन्यवाद. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस त्या ब्रम्हघोटाळ्यातील विसरलेल्या पायर्‍यांसह नवीन लेख लिहेन.

श्रीगुरुजी's picture

13 Aug 2022 - 7:00 pm | श्रीगुरुजी

शिवसेनेप्रमाणे नितीशकुमार सुद्धा आपल्या राजकीय कारकीर्दीच्या अंताकडे वाटचाल करीत आहेत. २०२४ मध्ये हे दोघेही राजकारणातून पूर्ण निष्प्रभ होतील.

तुषार काळभोर's picture

13 Aug 2022 - 6:01 pm | तुषार काळभोर

चालू घडामोडी धाग्यांवर प्रतिसाद देणे टाळतो. पण वरील माहिती अत्युच्च दर्जाची असल्याने राहवले नाही.

* राष्ट्रीय जनता दलाचा उगम वरील माहितीत दिसला नाही. बिहारचे मागील तीन दशकातील राजकारण राजद आणि लालू कुटुंब यांच्या उल्लेखाशिवाय लिहिले जाऊच शकत नाही!

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Aug 2022 - 2:54 pm | ज्ञानोबाचे पैजार

काय तो अभ्यास काय ती मेमरी, काय ती टाईम लाईन, सगळं कसं ओके मधे हाय.

सरासरी ३ वर्षात एकदा या गतीने फाटाफुट होउन सुध्दा हे लोक अजुनही टिकून आहेत हे आश्र्चर्यकारक आहे.

पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

14 Aug 2022 - 12:00 am | टर्मीनेटर

+१

डँबिस००७'s picture

14 Aug 2022 - 1:20 am | डँबिस००७

10000 % सहमत !!

श्रीगुरुजी's picture

13 Aug 2022 - 3:43 pm | श्रीगुरुजी

भारतीय राजकारणातील दोन सगळ्यात घाणेरडे लोक- लालू आणि मुलायमसिंग यादव या राजकारणातून पुढे आले आहेत.

१९७७ मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मंडल आयोग नेमला. त्यांनी १९७९ मध्ये आपला अहवाल सादर केला ज्यात इतर मागासवर्गीयांना २७ टक्के राखीव जागा देण्याची सूचना होती (त्याच अहवालात मराठा मागास नाहीत असाही निष्कर्ष होता जो निष्कर्ष त्यापूर्वीच्या १९५० च्या दशकातील कालेलकर अहवालात होता व नंतर २००० च्या दशकातील बापट अहवालातही होता. परंतु मराठा मागास आहेत असा आधीच ठरविलेवा निष्कर्ष फडणवीसांनी २०१६ मध्ये नेमलेल्या गायकवाड अहवालाने काढला होता.) परंतु काही महिन्यातच इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या व त्यांनी हा अहवाल बाटलीत बंद करून घट्ट झाकण लावून टाकले.

१९८९ मध्ये वि. प्र. सिंह पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे देवीलाल व चंद्रशेखरांशी पटत नव्हते. वि. प्र. सिंह पंतप्रधान झाल्या नंतर मतभेदांमुळे ३ महिन्यातच देवीलालनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना पाठिंबा म्हणून आताचे उपराष्ट्रपती जगदीश धनकर यांनीही राजीनामा दिला होता. देवीलालांची समजूत काढल्यानंतर त्यांनी व धनकरांनी राजीनामा मागे घेतला होता.

काही महिन्यांनतर एका मुलाखतीत देवीलालनी वि. प्र. सिंहांवर बरीच ठीका करून त्यांचा कणाहीन असा उल्लेख केल्याने वि. प्र. सिंह भडकले होते. त्यावेळी इंडिया टुडेत एक व्यंगचित्र आले होते ज्यात डोळ्यांवर टोपी आलेल्या वि. प्र. सिंहांनी पाठीमागे सदऱ्याच्या कॉलरमध्ये काठी घालून ती कंबरेपाशी बाहेर आली होती व त्यामुळे पाठीला म्हणजेच कण्याला मिळून कणा ताठ राहिला आहे असे दाखवून, कोण म्हणतो मी कणाहीन आहे, असे वि. प्र. सिंह विचारताना दाखविले होते व हे व्यंगचित्र खूप गाजले होते.

त्यामुळे वि. प्र. सिंहांनी देवीलालांना मंत्रीमंडळातून काढले होते. त्याला उत्तर म्हणून देवीलालांनी दिल्लीत मोठा शेतकरी मेळावा घ्यायची घोषणा केली.

एकीकडे भाजपच्या श्रीरामजन्मभूमी शिलान्यासाची घोषणा व दुसरीकडे देवीलालांचे आव्हान आणि चंद्रशेखराची नाराजी या कात्रीत सापडलेल्या वि. प्र. सिंहांनी मंडल आयोग बाटलीतून बाहेर काढून इतर मागासवर्गीयांना २७ टक्के राखीव जागा देण्याचे जाहीर करून सर्वांना एकाच चालीत शह देण्याचा प्रयत्न केला.

बाटलीतून मंडल आयोगाबरोबरीने मुलायम, लालू, काशीराम, सीताराम केसरी, शरद यादव ही इतर मागासवर्गीय जातीतील भुते सुद्धा बाहेर आली व राजकारणात त्यांना एकदम महत्त्व प्राप्त झाले. अन्यथा त्यापूर्वी त्यांना राजकारणात फारसे महत्त्व नव्हते.

पूर्वी लिहिल्याप्रमाणे जो सत्ताधारी पक्ष राज्यात किंवा केंद्रात जात्याधारीत राखीव जागा देतो तो पक्ष पुढील निवडणुकीत सत्तेत येत नाही या सिद्धांताचा प्रारंभ मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून झाला. वि. प्र. सिंह पुढील निवडणुकीत सत्तेत आले नाहीत. त्यानंतर जयललिता, वसुंधरा राजे, गेहलोत, मनमोहन सिंग, पृथ्वीराज चव्हाण, फडणवीस यांनी तसाच निर्णय घेऊन पुढील निवडणुकीत सत्ता घालवून बसले.

क्लिंटन's picture

13 Aug 2022 - 4:53 pm | क्लिंटन

१९८९ मध्ये वि. प्र. सिंह पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे देवीलाल व चंद्रशेखरांशी पटत नव्हते. वि. प्र. सिंह पंतप्रधान झाल्या नंतर मतभेदांमुळे ३ महिन्यातच देवीलालनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना पाठिंबा म्हणून आताचे उपराष्ट्रपती जगदीश धनकर यांनीही राजीनामा दिला होता. देवीलालांची समजूत काढल्यानंतर त्यांनी व धनकरांनी राजीनामा मागे घेतला होता.

हो हे आठवत होते पण नक्की कोणत्या कारणामुळे देवीलालांनी राजीनामा दिला हे लक्षात नव्हते. आंतरजालावर शोधाशोध केल्यावर तेव्हाच्या इंडिया टुडेमधील देवीलालांची मुलाखत सापडली. त्यावरून समजते की सुरवातीला वि.प्र.सिंगांना पंतप्रधान बनवायला देवीलालांनीच मदत केली असली तरी लगेचच कुरबुरींना प्रारंभ झाला होता.

काही महिन्यांनतर एका मुलाखतीत देवीलालनी वि. प्र. सिंहांवर बरीच ठीका करून त्यांचा कणाहीन असा उल्लेख केल्याने वि. प्र. सिंह भडकले होते.

ही मुलाखत इलस्ट्रेटेड विकलीला दिली होती आणि त्या मुलाखतीत मंत्रीमंडळातील मंत्री अरूण नेहरू आणि अजितसिंगांवरही टीका होती. त्यानंतर वि.प्र.सिंगांनी देवीलालांना मंत्रीमंडळातून काढले होते.

एकीकडे भाजपच्या श्रीरामजन्मभूमी शिलान्यासाची घोषणा व दुसरीकडे देवीलालांचे आव्हान आणि चंद्रशेखराची नाराजी या कात्रीत सापडलेल्या वि. प्र. सिंहांनी मंडल आयोग बाटलीतून बाहेर काढून इतर मागासवर्गीयांना २७ टक्के राखीव जागा देण्याचे जाहीर करून सर्वांना एकाच चालीत शह देण्याचा प्रयत्न केला.

देवीलालांना मंत्रीमंडळातून काढले २-३ ऑगस्टच्या सुमारास. त्याविरोधात त्यांनी ९ ऑगस्टला ऑगस्ट क्रांतीदिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकरी मेळावा घ्यायचे जाहीर केले. देवीलालांना शेतकर्‍यांमध्ये बर्‍यापैकी पाठिंबा आहे असे वाटून वि.प्र.सिंगांनी ७ ऑगस्टला मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करायची घोषणा केली आणि त्यातून ओबीसी समाज आपल्याबरोबर येईल हे त्यांचे गणित होते. त्यावेळेस अडवाणींनी रथयात्रेची घोषणा केली नव्हती. समस्त सेक्युलर कॅम्पचा आक्षेप हाच असतो की वि.प्र.सिंगांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करायचे जाहीर केल्यानंतर मोठी व्होटबँक वि.प्र.सिंगांकडे जाईल ही शक्यता ध्यानात घेऊन मग त्याला उत्तर म्हणून अडवाणींनी हिंदुत्वाच्या नावावर सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्रा जाहीर केली. किमान टाईमलाईनचा विचार करता त्यात तथ्य वाटते.

असो. गविंनी म्हटल्याप्रमाणे हा धागा ताज्या घडामोडींपेक्षा जुन्या घडामोडी असा बनत आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Aug 2022 - 6:57 pm | श्रीगुरुजी

कृतघ्न! अपात्री दान केले असेच होते.

https://www.indiatoday.in/world/story/chinese-spy-ship-yuan-wang-to-dock...

जेम्स वांड's picture

14 Aug 2022 - 8:03 am | जेम्स वांड

विनायक मेटे ह्यांना एक्सप्रेस वे वर जबरी अपघात. गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी डोंगर कपारी वर धडकली, तूर्तास प्रकृती स्थिर, पनवेल मधील MGM रुग्णालयात Criticare युनिटमध्ये उपचार सुरू.

अशी बातमी टाईप करेपर्यंत एबिपीची बातमी आली की विनायक मेटे ह्यांचे निधन झाले आहे.

मृतात्म्यास श्रद्धांजली.

संबंधित बातमी

.

क्लिंटन's picture

14 Aug 2022 - 8:56 am | क्लिंटन

नरेंद्र दाभोलकर गेल्यावर पूर्वीपासून प्रलंबित असलेला अंधश्रध्दा आणि जादूटोणा विरोधी कायदा घाईघाईने पास करण्यात आला त्याप्रमाणे विनायक मेटे गेल्यावर घाईघाईने मराठा आरक्षण दिले गेले नाही म्हणजे मिळवली.

असो. विनायक मेटेंना श्रद्धांजली.

जेम्स वांड's picture

14 Aug 2022 - 9:11 am | जेम्स वांड

अंधश्रध्दा निर्मूलन कायदा आणि मराठा आरक्षण ह्यात तुलना कशी होणार ? काहीही काय राव !

एक कायदाच मुळात घटनासंमत तत्वांचा पुरस्कार करणारा आहे (अंधश्रध्दा निर्मूलन कायदा) अन् दुसऱ्यावर घटना खंडपीठ वगैरे सगळे बसणार

श्रीगुरुजी's picture

14 Aug 2022 - 10:53 am | श्रीगुरुजी

+ १

आता फडणवीस सत्तेत असल्याने मराठा राखीव जागा न्यायालयात मान्य होणार नाही हे माहिती असूनसुद्धा आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून मराठ्यांना भुलविण्यासाठी राखीव जागा जाहीर करतील व कोणीतरी न्यायालयात जाऊन स्थगिती येईपर्यंतच्या काळात राखीव जागांचा फायदा मराठा जातीला देऊन अराखीव वर्गावर निदान तेवढ्या काळात तरी अन्याय करतील. विनायक मेटेंना श्रद्धांजली म्हणून आम्ही राखीव जागा देतोय अशी मखलाशीही करतील.

जेम्स वांड's picture

14 Aug 2022 - 9:14 am | जेम्स वांड

नवीन धक्कादायक बातमी,

अब्जाधीश शेयर मार्केट निवेशक आणि नवीनच अकाशा एअर लाईन सुरू केलेले राकेश झुनझूनवाला ह्यांचा ६२ वर्षी अकाली मृत्यू

.

राकेश झुनझूनवाला ह्यांचा ६२ वर्षी अकाली मृत्यू ही चटका लावणारी घटना आहे ! त्यांच्या अनेक मुलाखती मी पाहिलेल्या आहेत, घरी पहिल्यांदा एसी घेतला आणि बायकोला सांगितले हे देखील त्यांच्या मुलाखतीतुन मला समजले होते. हे अत्यंत हिंदूत्ववादी व्यक्तिमत्वाचे होते हा मला त्यांचा विशेष भावलेला गुण !
त्यांना विनम्र श्रद्धांजली ! _/\_

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister

आग्या१९९०'s picture

14 Aug 2022 - 9:16 am | आग्या१९९०

एक कायदाच मुळात घटनासंमत तत्वांचा पुरस्कार करणारा आहे (अंधश्रध्दा निर्मूलन कायदा) अन् दुसऱ्यावर घटना खंडपीठ वगैरे सगळे बसणार
+१११

सुबोध खरे's picture

16 Aug 2022 - 10:29 am | सुबोध खरे

एक कायदाच मुळात घटनासंमत तत्वांचा पुरस्कार करणारा आहे

मग हा कायदा पास करण्यासाठी ६३ वर्षे कुणाची वाट पाहत होते.

हीच स्थिती सामान नागरी कायद्याची आहे. जी गोष्ट घटनेत मूलभूत आहे ती केवळ मतांच्या राजकारणासाठी ७५ वर्षे बासनात गुंडाळून ठेवलेली आहे

Article 44 in The Constitution Of India 1949
44. Uniform civil code for the citizens The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India

आग्या१९९०'s picture

16 Aug 2022 - 9:07 pm | आग्या१९९०

बहुमत असूनही ८ वर्षात का नाही पास केला समान नागरी कायदा समर्थक पक्षानी?

जेम्स वांड's picture

17 Aug 2022 - 4:47 am | जेम्स वांड

Seriously, हा प्रश्न पडलाय ?

क्लिंटन जे मला वाटते (खूपच casually) म्हणालेत की मेटे गेले म्हणून आरक्षण वाटतील, ते इतके सहज सोपे अन् कायदेशीर आहे का?? तुम्ही तर legal expert आहात ना ? स्वतःचे मॅटर लढवून जिंकलेल्या तुमच्या सारख्या माणसांकडून तरी थोडी अजून objectivity अपेक्षित असते सर. त्यामुळे अंधश्रद्धा विरोधी कायदा आणि मराठा आरक्षण हे एकाच तागडीत तोलले जाऊ शकते का ? ह्यावर आपणच नीरक्षीर विचार करा, आम्हाला काय शेवटी हो म्हणालात तर तुमचा आदर राखून मम म्हणायचे आहेच.

बाकी आपापले कल, आवडीनिवडी, अभिमान दुराभिमान आपापल्या जागी ठीकच आहे पण आम्ही सामान्य लोक तुम्हाला पेडेस्टलवर ठेवतो सर, यु आर अवर मॉरल यार्ड स्टिक...

क्लिंटन's picture

14 Aug 2022 - 9:26 am | क्लिंटन

राकेश झुनझुनवाला गेले. ते आजारी होते हे पण माहीत नव्हते. बातम्यांमध्ये थेट multi organ failure ने त्यांचे निधन झाले असे येत आहे म्हणणे निदान काही काळ ते आजारी असेल पाहिजेत. ते पण कळले नव्हते :(

राकेश झुनझुनवाला भारताचे वॉरन बफे म्हणून प्रसिद्ध होते. अलीकडेच त्यांनी आकाश एअरलाईन्स म्हणून नवीन विमानकंपनी सुरू करायची घोषणा केली होती. शेअरबाजारात fundamental analysis करून दीर्घ मुदतीसाठी शेअर विकत घेण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी विकत घेतलेले सगळे शेअर नफ्यात होते असे नाही पण जे शेअर नफ्यात होते त्यांनी अगदी दणक्यात छप्परफाड नफा दिला होता. त्यांनी टायटन कंपनीचा शेअर १९९९ च्या सुमारास विकत घेतला होता त्यात त्यांनी अगदी रेकॉर्ड नफा मिळवला.

राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली.

जेम्स वांड's picture

14 Aug 2022 - 9:36 am | जेम्स वांड

अलीकडेच त्यांनी आकाश एअरलाईन्स म्हणून नवीन विमानकंपनी सुरू करायची घोषणा केली होती.

अगदी काल का परवाच आकाशा एअरलाईनची पहिली फ्लाईट टेक ऑफ झाली होती, मुंबई अहमदाबाद मार्गावर.

जेम्स वांड's picture

14 Aug 2022 - 11:32 am | जेम्स वांड

.

काव्यात्मक वाटलं एकदम, हे predict karnara माणूस असा unpredictably गेला राव, हल्लीच्या भारतीय सरासरी आयुर्मान आकड्यांना पाहता ६२ म्हणजे काहीच नाही राव.

गामा पैलवान's picture

14 Aug 2022 - 2:39 pm | गामा पैलवान

लोकहो,


गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी डोंगर कपारी वर धडकली ....

अजित पवार गाडी कंटेनरला मागून धडकली म्हणताहेत. एकंदरीत अपघातस्थळीची चित्रं पाहता पवारांची माहिती खरी वाटते. गाडीची पुढची डावी बाजू पार चेपली आहे. गाडीची उजवी बाजू तर आजिबात अपघातग्रस्त वाटंत नाही.

पहाटे ०५०० वाजता अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका लगेच न येता तासाभराने आली हे कितपत संशयास्पद आहे ?

असो. भक्ती बर्वे याच मार्गावर अशाच एका पहाटेच्या अपघातात गेल्या होत्या ते आठवलं.

बाकी, विनायक मेटे म्हणजे कुमार केतकरांच्या ठाण्याच्या घरावर हल्ला करणारे तेच ना ?

आ.न.,
-गा.पै.

विवेकपटाईत's picture

14 Aug 2022 - 3:34 pm | विवेकपटाईत

आजकाल अधिकांश अपघात असेच होतात. सकाळच्या वेळी अत्यंत वेगाने, मोठ्या हळू चालणाऱ्या वाहनांना ओवरटेक करताना, साखर झोपेचा अमलात अंदाज चुकतो आणि अपघात होतो. आता स्वतःची चूक लपविण्यासाठी ड्रायव्हर अनर्गल आरोप करणारच. बाकी ड्राइवरला वेगाने गाडी चाविण्याचा आदेश देणारे ही मृत्यूला आमंत्रित करतात.

डँबिस००७'s picture

14 Aug 2022 - 3:42 pm | डँबिस००७

आज पाकिस्तानचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस आहे. त्या संदर्भात संयुक्त अरब अमिरातीत प्रकाशीत खलिज टाईंम्स ला स्पेशल पुरवणी दिलेली आहे.
३०-४० पानांच्या ह्या पुरवणीत विविध विषयातील पाकिस्तानच्या
अचिव्हमेंट्स बद्दल व वेगवेगळ्या विषयावरचे लेख आलेले आहेत. ह्या पुरवणीत ८५% पेक्षाजास्त जाहीराती आहेत. ह्यातले बरेच लेख बळेच लिहीलेले वाटतात. जसे की CWG मधली पाकीस्तानची नेत्रदिपक कामगीरीवरचा लेख. ७२ देशात २ सुवर्ण पदक मिळवुन पाकिस्तान १८ स्थानावर आलेला आहे. CWG 2018 मध्ये पाकिस्तान २४ स्थानी होता.
त्यात खटकणारी गोष्ट म्हणजे पाकिस्तानातील सुंदर प्रदेशाच्या ओळखी संदर्भाने आलेल्या लेखात स्कार्डु नावाच्या नितांत सुंदर प्रदेशाची ओळख करुन दिलेली आहे. ह्या प्रदेशात, हिमाच्छादीत पर्वतरांगा, वाळवंट , विस्तीर्ण सुंदर जलाशय आहेत. पाकिस्तानात ईतकी सुंदर जागा पाहील्यावर मनात कुतुहल जागे झाले की कुठे आहे हे स्कार्डु ?
जेंव्हा शोध घेतला तेंव्हा कळल की तो भाग
पाकिस्तानने बळकावलेल्या भारताच्याच गिलगीट बाल्टीस्तानात आहे. अशी जागा आपल्याला माहिती सुद्धा नव्हती ह्या बद्दल खंत वाटली.
दुसर्या देशाच्या बळकावलेल्या भुभागा वर स्वातंत्र्य दिना दिवशी लेख लिहुन वाहवा मिळवणार्या पाकीस्तानच्या ऊच्चायुक्तातील महिला अधिकार्याची किव वाटली.
आशा करतो की भारत सरकार हा प्रदेश परत घेण्यासाठी पावले उचलेल !!

श्रीगुरुजी's picture

14 Aug 2022 - 3:52 pm | श्रीगुरुजी

मेटेंच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे ८ गट तयार केले आहेत म्हणे.

जेम्स वांड's picture

15 Aug 2022 - 7:00 am | जेम्स वांड

आणि शिवसंग्रामचे एक नेते ह्यांनी अपघातवार शंका उपस्थित केली आहे.

श्रीगुरुजी's picture

15 Aug 2022 - 8:04 am | श्रीगुरुजी

दिवसा २००+ किमी गाडी चालविल्यानंतर झोप न घेता तोच चालक रात्री ९ वाजता बीडहून मुंबईला निघतो. पहाटे ५ वाजता अपघात होतो. ज्या ट्रकला ही गाडी मागून धडकली त्या ट्रकचीही माहिती मिळाली आहे. अजिबात झोप न घेता ५००+ किमी वाहनसारथ्य केल्यानंतर पहाटे झोप येणे स्वाभाविक आहे व त्यातूनच हा अपघात झालेला दिसतो. यावर शंका घेणे हा खोडसाळपणा आहे. मुळात मेटे आमदार सुद्धा नव्हत किंवा राजकारणात त्यांना फार महत्त्व नव्हते. अश्या माणसाचा कोण व का घातपात करेल?

जेम्स वांड's picture

15 Aug 2022 - 8:16 am | जेम्स वांड

मुळात मेटे आमदार सुद्धा नव्हत किंवा राजकारणात त्यांना फार महत्त्व नव्हते. अश्या माणसाचा कोण व का घातपात करेल?

हे इथे अप्रस्तुत वाटले, विनायक मेटे ह्यांचं महत्व अती नसेल, किंवा अगदी ते आमदार नसतील पण म्हणून त्यांचा घातपात होऊ शकत नाही असे आपण हमी घेऊन म्हणू शकता काय ? नसल्यास वरील मेटेंचे उगाच अवमूल्यन करणारी वाक्य त्यांच्या मृत्यू नंतर करणे आपणांस सौजन्याला धरून वाटते काय !?

रात्रीचे चांदणे's picture

15 Aug 2022 - 8:40 am | रात्रीचे चांदणे

सहमत, राजकीय घातपताची शक्यता कमीच असली तरी सरकार चौकशी करून काहीही चूक करतेय असं वाटतं नाहीं.

श्रीगुरुजी's picture

15 Aug 2022 - 10:07 am | श्रीगुरुजी

साधारणपणे राजकीय घातपात अशांचे होतात, जे कोणाला तरी प्रतिस्पर्धी किंवा आपल्याला आव्हान वाटत असतात किंवा भविष्यात ज्यांच्याकडून धोका असतो. मेटे एकांडा शिलेदार होते. कोणत्याही पक्षात नसल्याने व आमदार सुद्धा नसल्याने ते कोणाचेही प्रतिस्पर्धी नव्हते किंवा कोणालाही आव्हान नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबतीत घातपात झाला असण्याची शक्यता शून्य आहे.

जेम्स वांड's picture

15 Aug 2022 - 10:14 am | जेम्स वांड

तुम्ही शक्यता वर्तवता आहात का निर्वाळा देता आहात ?

सामाजिक जीवनात असलेल्या माणसाला किती छुपे अन् किती उघड शत्रू असतील हे तो मनुष्य स्वतःही सांगू शकणार नाही अशी परिस्थिती असते एकंदरीत.

मेटे आज आमदार नाहीत/ नव्हते, आधी होते, त्यांची एक पार्टी नसेल पण प्रसंगानुरूप त्यांनी कैक पार्टी ना समर्थन विरोध केला आहे, मराठवाड्यातील मराठा समाजात खुप जास्त अन् महाराष्ट्रातील मराठा समाजात बऱ्यापैकी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते मेटे, त्याशिवाय त्यांची जुनी भाषणे ऐका (युट्यूब वर सापडतील) ज्यात मेटे आक्रमक भाषा वापरताना पण दिसतील (ते काही एकटे नाहीत जवळपास राजकारणी वापरतात तशी) पण त्यामुळे त्यांना शत्रू नाहीत किंवा धोका शून्य
म्हणताना आपण व्हीआयपी सिक्युरिटी ह्या विशेष पोलिसिंग शाखेतील कुठलं तत्व वापरून threat perception शून्य आहे म्हणता आहात ते तरी कळू देत की साहेब.

श्रीगुरुजी's picture

15 Aug 2022 - 10:23 am | श्रीगुरुजी

जवळपास २४ तास जागा असलेला चालक, ज्याने सलग ५००+ किमी सारथ्य केले आहे, थकून पहाटे सारथ्य करता करता काही क्षण झोपी जाणे साहजिकच आहे. त्यामुळेच अपघात झाला हे उघड आहे. घातपात असण्याची शक्यता दिसत नाही.

जेम्स वांड's picture

15 Aug 2022 - 10:29 am | जेम्स वांड

मग होऊन जाऊ दे की चौकशी, त्यात काय प्रॉब्लेम असायला हवा.

श्रीगुरुजी's picture

15 Aug 2022 - 11:29 am | श्रीगुरुजी

करा.

जेम्स वांड's picture

15 Aug 2022 - 11:54 am | जेम्स वांड

सरकार करते म्हणे बुआ. करू देत मग, आता तुमची परवानगी मिळाली म्हणजे बेस्ट काम एकंदरीत :D

श्रीगुरुजी's picture

15 Aug 2022 - 1:11 pm | श्रीगुरुजी

तुम्ही आग्रह धरल्याने आणि तुमचा मान राखण्यासाठी परवानगी दिली. तुम्ही मागणी केल्यावर नाही म्हणण्याची आमची प्राज्ञा नाही.

यावर शंका घेणे हा खोडसाळपणा आहे.
अगदी बरोबर
पण दुर्दैवाने आता याचा जातीय राजकारणासाठी भरपुर उपयोग करून घेतला जाईल .. सोशल मीडिया वॉर/ वार सुरु झाले आहेच

श्रीगुरुजी's picture

14 Aug 2022 - 5:13 pm | श्रीगुरुजी

मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झालंय. गृह, वित्त या दोन महत्त्वाच्या खात्यांसोबत गृहनिर्माण, उर्जा, विधी, जलसंपदा अशी एकूण ७ महत्त्वाची खाती एकट्या फडणवीसांकडे आहेत. नगरविकास हे महत्वाचे खाते एकनाथ शिंदेंकडे गेलंय, तर महसूल हे महत्त्वाचे खाते आयाराम राधाकृष्ण विखेंकडे गेलंय.

मागील सरकारमध्ये अर्थमंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते आलंय. मागील सरकारमध्ये चंद्रकांत पाटील महसूल खात्याबरोबर अन्य ६ खाती सांभाळत होते. मागील सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले मुनगंटीवार आता वन व सांस्कृतिक मंत्री असतील.

एकंदरीत फडणवीसांनी अनेक महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवून आपल्या जुन्या सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं दिसतंय. चंद्रकांत पाटील व मुनगंटीवार यांचं तर अवमूल्यन झालेलं दिसतंय.

श्रीगुरुजी's picture

14 Aug 2022 - 5:31 pm | श्रीगुरुजी

महिला, बालविकास ही खाती मंगल प्रभात लोढांना दिलीत. ही खाती खरं तर संजय राठोडकडे देणे योग्य ठरलं असतं.

ऊ प्रदेशातील कुशी नगर भागातील शहनाझ बेगमच्या परीवाराला घरावर पाकिस्तानी झेंडा लावल्या बद्दल, आज ऊ प्र पोलीसांनी अटक केली आहे. आज पाकिस्तानचा ७५ वा स्वातंत्र दिन आहे व त्या निमीत्त्य शहनाझ बेगमने अगोदरच तयारी सुरु केली होती. पाकिस्तानचा झेंडा बाहेर मिळत नसल्याने शहनाझ बेगमने आपल्या घरातच
पाकिस्तानचा झेंडा शिवला. मग परीवाराच्या मदतीने तो झेंडा घरावर लावला.
आजूबाजुच्या लोकांना लक्षात येताच त्यांनी व्हीडीयो काढुन पोलिसांना कळवल. पोलिसांनी कारवाई करत तो झेंडा काढुन टाकलाच वर परीवारातील पुरुषांना अटक केली.
भारतात रहाणार्या लोकांनी पाकिस्तानचा झेंडा लावणे योग्य आहे का ? पाकिस्तानचा झेंडा आपल्या घरावर लावुन अश्या लोकांना काय व्यक्त करायच असत ? अश्या लोकांना भारतात रहाणे पसंत नसेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावे, भारतीय सरकारची अडकाठी नसेल पण ....... अश्या निरुपयोगी लोकांना पाकिस्तान सरकार आपल्या देशात घुसायला देईल काय ?
https://youtu.be/c1E7beGf9zg

कपिलमुनी's picture

14 Aug 2022 - 6:43 pm | कपिलमुनी

अशा लोकांवर देशद्रोह कलम लावून घर जप्त करायला हवे

किती तास ड्राइविंग किती झोप बघायला हवे.

किती तास ड्राइविंग केल्यानंतर, किती झोप आवश्यक आहे, याचेही मापदंड असायला हवे. आपल्याबरोबर ड्रायवरचा जीव धोक्यात घालणार्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा.