प्रोफाइलवरती बाई..!!

Primary tabs

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
26 Feb 2021 - 5:41 pm

(टीप: अनाहितांची साष्टांग माफी मागून)

प्रोफाइलवरती बाई
अशि काही दिसते धासू
तो फोटो पाहुन येती
झुंडीने चावट वासू

कुणी भोजनपृच्छा करतो
कुणी थेट घालतो डोळा
बाईच्या भवती जमती
भुंगे सतराशे सोळा

बाईचे आशिक मुबलक
कुणि पुतण्या तर कुणि काका
रंगेल एकसे एक
बाईस मारिती हाका

मेसेज पटापट येती
गालात हासते बाई
पाहता गड्यांची गर्दी
तिज हसू अनावर होई

ती विचार करुनी लिहिते,
पुसते, -अन पुन्हा लिहिते
ते 'टायपिंग..' दिसताच
वासूंचे भान हरपते

डोळ्यात प्राण आणूनी
व्याकूळ पाहती वाट
कंठाशी येती प्राण
वासूंची हालत 'ताठ'

दो अशाच घटका जाती
मग 'टिंग!' वाजतो फोन
वासूंच्या टोळ्या येती
तो वाचण्यास धावून

उघडता फोनचा पडदा
बाईचे उत्तर दिसते
मितभाषी ती मुलखाची
'Hmm' इतुकेची लिहिते!

गर्दीचा पोपट होतो
पण उसने घेती हासू
आशेला नसते मरण
वासू जातीचे वासू!!

कविताप्रेमकाव्यविडंबनविनोद

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

26 Feb 2021 - 6:47 pm | टवाळ कार्टा

=))

सौंदाळा's picture

26 Feb 2021 - 7:26 pm | सौंदाळा

मस्तच जमली आहे.
आता मिपावर पाशवी शक्तींचा वावर कमी झाला आहे त्यामुळे दंगा होणार नाही. झालाच आमची सिट रिझर्व करा.
बाकी वासूंच्या (आपलं ते प्रतिसादाच्या) प्रतिक्षेत.

चलत मुसाफिर's picture

27 Feb 2021 - 12:23 am | चलत मुसाफिर

धन्यवाद :-)

उपयोजक's picture

27 Feb 2021 - 11:45 am | उपयोजक

:)))

बाजीगर's picture

28 Feb 2021 - 9:48 am | बाजीगर

वाह वाह..मस्त
आवडली.

चलत मुसाफिर's picture

1 Mar 2021 - 4:47 pm | चलत मुसाफिर

धन्यवाद