प्रोफाइलवरती बाई..!!
(टीप: अनाहितांची साष्टांग माफी मागून)
प्रोफाइलवरती बाई
अशि काही दिसते धासू
तो फोटो पाहुन येती
झुंडीने चावट वासू
कुणी भोजनपृच्छा करतो
कुणी थेट घालतो डोळा
बाईच्या भवती जमती
भुंगे सतराशे सोळा
बाईचे आशिक मुबलक
कुणि पुतण्या तर कुणि काका
रंगेल एकसे एक
बाईस मारिती हाका
मेसेज पटापट येती
गालात हासते बाई
पाहता गड्यांची गर्दी
तिज हसू अनावर होई
ती विचार करुनी लिहिते,
पुसते, -अन पुन्हा लिहिते
ते 'टायपिंग..' दिसताच
वासूंचे भान हरपते
डोळ्यात प्राण आणूनी
व्याकूळ पाहती वाट
कंठाशी येती प्राण
वासूंची हालत 'ताठ'
दो अशाच घटका जाती
मग 'टिंग!' वाजतो फोन
वासूंच्या टोळ्या येती
तो वाचण्यास धावून
उघडता फोनचा पडदा
बाईचे उत्तर दिसते
मितभाषी ती मुलखाची
'Hmm' इतुकेची लिहिते!
गर्दीचा पोपट होतो
पण उसने घेती हासू
आशेला नसते मरण
वासू जातीचे वासू!!
=))
मस्तच जमली आहे.
:-)
भारीच!
जबरदस्त !!
:-)
'आचरट' रस.
:)
टायपो
भोजनपृच्छा
J1 jhal ka
अगदी अगदी..
वा!
मस्तच कविता
धन्यवाद
हा हा हा. मिस झाली होती ही
पुनर्जन्म
कवितेचे पुनरागमन वा पुनर्जागरण कसे झाले
धन्यवाद
कविता आवडली. कशी काय मिस्
धन्यवाद
कविता आवडली. कशी काय मिस् झाली होती बुवा?
:)