मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

मी पुन्हा येईन

Primary tabs

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
11 Nov 2019 - 2:06 pm

कच्चा माल

घेतले तू उधार पैसे
आता देत नसशील
करण्यास ते वसूल
मी पुन्हा येईन

जात असले मी माहेरी
करू नका तुमची थेरं
पाहण्या ते सारं
मी पुन्हा येईन

नाही लिहीता येत पेपर
कॉपी जरी करशील
काय ते तपासण्यास
मी पुन्हा येईन

मला न दाखवता
व्हाटस अप मेसेज पाहता
काय ते पाहता ते पाहण्यास
मी पुन्हा येईन

लेख वगैरे लिहीता येथे भारी
पण या कवीतेला
प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या
मी पुन्हा येईन

- पाषाणभेद
११/११/२०१९

काहीच्या काही कविताकैच्याकैकविताकवितामुक्तकविडंबनविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Nov 2019 - 2:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी प्रतिक्रीया दिली
त्यावर तुम्ही धन्यवाद म्हणाले की नाही
हे पहायला
मी पुन्हा येईन,

पैजारबुवा,

मी पण ,, पुन्हा येईन , पुन्हा येईन

ही लाईन घेवुन मला लिहायचे होते :) पण आता तुम्ही लिहिले आहे म्हणुन ते परत परत वाचण्यास
मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन ..

श्वेता२४'s picture

11 Nov 2019 - 3:27 pm | श्वेता२४

:)

प्रचेतस's picture

12 Nov 2019 - 8:22 am | प्रचेतस

=))

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 7:20 pm | मुक्त विहारि

छान लिहिलंय

नाखु's picture

22 Nov 2019 - 12:31 pm | नाखु

वा कुणी लिहिलेले वाचले नाही तरी मी पुन्हा येईन आणि पुन्हा पुन्हा येईन.

मिपावर फेरफटका मारायला आवडणारा नाखु

पाषाणभेद's picture

23 Nov 2019 - 9:04 am | पाषाणभेद

काल पैसे कट झालेत तुमचे.
नविन फंड पण दिसायला लागला आहे.

SBI BLUE CHIP FUND - REGULAR PLAN - GROWTH
फोलीओ अकाउंट क्र. 23279415

विनिता००२'s picture

23 Nov 2019 - 9:38 am | विनिता००२

घ्या, ते परत आले :)

गामा पैलवान's picture

23 Nov 2019 - 6:48 pm | गामा पैलवान

भरली थैली खच्चं
त्यात लागलं बुच्चं
वाटे कसलं गच्चं
पोट मोकळं कराया, मी पुन्हा येईन!

-गा.पै.