Skip to main content

मी पुन्हा येईन

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/11/2019 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल घेतले तू उधार पैसे आता देत नसशील करण्यास ते वसूल मी पुन्हा येईन जात असले मी माहेरी करू नका तुमची थेरं पाहण्या ते सारं मी पुन्हा येईन नाही लिहीता येत पेपर कॉपी जरी करशील काय ते तपासण्यास मी पुन्हा येईन मला न दाखवता व्हाटस अप मेसेज पाहता काय ते पाहता ते पाहण्यास मी पुन्हा येईन लेख वगैरे लिहीता येथे भारी पण या कवीतेला प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या मी पुन्हा येईन - पाषाणभेद ११/११/२०१९

वाचने 6593
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मी प्रतिक्रीया दिली त्यावर तुम्ही धन्यवाद म्हणाले की नाही हे पहायला मी पुन्हा येईन, पैजारबुवा,

ही लाईन घेवुन मला लिहायचे होते :) पण आता तुम्ही लिहिले आहे म्हणुन ते परत परत वाचण्यास मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन ..

=))

वा कुणी लिहिलेले वाचले नाही तरी मी पुन्हा येईन आणि पुन्हा पुन्हा येईन. मिपावर फेरफटका मारायला आवडणारा नाखु

काल पैसे कट झालेत तुमचे. नविन फंड पण दिसायला लागला आहे. SBI BLUE CHIP FUND - REGULAR PLAN - GROWTH फोलीओ अकाउंट क्र. 23279415

भरली थैली खच्चं त्यात लागलं बुच्चं वाटे कसलं गच्चं पोट मोकळं कराया, मी पुन्हा येईन! -गा.पै.