चालू घडामोडी - जून २०१८

manguu@mail.com's picture
manguu@mail.com in काथ्याकूट
12 Jun 2018 - 7:03 pm
गाभा: 

भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे.

भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे.

भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.

भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती.

भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 10:14 pm | manguu@mail.com

मी भाजपाने शस्त्र संधी करू नये या संदर्भात बोललो

पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र असल्याने त्याने भारतावर केलेले सर्वच हल्ले निषेधार्हच आहेत .

पाकिस्तानचे हल्ले आणि भाजपाची चुपपी दोन्ही निषेधार्ह आहे.

चुकलं तर मान्य करायला पण मोठ काळीज लागत , आन चर्चा योग्य मार्गाने चालू ठेवायचं काम बी धगकर्त्याचच असतया .
उगीचच म्हमदवाडी च्या सरपंचा सारख वागून काय फायदा ?. जरा बाकीच्या म्येम्बर पण ऐकाच असत .

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 10:36 pm | manguu@mail.com

स्वतःचे भाजप सरकार युद्ध करत नाही आणि तुम्हाला पाकिस्तानचे शांत रहातात का युद्ध करतात , ह्याची चिंता लागून राहिली आहे .

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 10:51 pm | सोमनाथ खांदवे

भाजप युद्धखोर नाय ह्ये मान्य करून ह्ये लै ब्येस काम क्येल बगा . म्हनजे तुमच्या वाक्याचा तसाच आर्थ निघतोय बरका .

म्हणे मी पाकिस्तानचा निषेध का केला नाही ?

मी देशाचा नागरिक आहे , तुमचा नोकर नाही , तुम्हाला सांगून निषेध करायचा का ?

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 10:59 pm | सोमनाथ खांदवे

झोप !!!! आता शांत झोप !!!!!!!

ब्रिटन सरकारने देशातील विद्यापीठांमधील सुलभ व्हिसा मिळवण्यासाठीची प्रक्रिया सोपी बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या यादीमधून भारतीय विद्यार्थ्यांना आश्चर्यकारकरित्या वगळले आहे. या यादीत अमेरिका, कॅनडा आणि न्यूझीलंडसारख्या देशांचा पूर्वीपासूनच समावेश होता. मात्र एकीकडे भारताला वगळताना आता चीन, बहरीन आणि सर्बिया सारख्या देशांचा समावेश करण्यात आला आहे. व्हिसा देण्याच्या दृष्टीने 'कमी धोका' असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. या कारणामुळे भारताला यादीत स्थान मिळायला हवे होते. असे असताना भारताला वगळल्याने टीका होऊ लागली आहे.

दरम्यान, हा भारताचा अपमान असल्याचे यूके काउंसिल फॉर इंटरनॅशनल स्टूडंट अफेअर्स (UKCISA) अध्यक्ष लॉर्ड करण बिलमोरिया यांनी म्हटले आहे.
ब्रिटनच्या स्थलांतराबाबच्या धोरणातील बदल काल संसदेत सादर करण्यात आले. त्यावेळी ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने जवळजवळ २५ देशांच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी-४ व्हीसा श्रेणीत सूट देण्याची घोषणा केली.

ब्रिटन सरकारने केलेला हा बदल जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ब्रिटनमध्ये अभ्यास करणे सोपे व्हावे हाच या धोरणामागचा उद्देश आहे. नव्या यादीत भारताचा समावेश न केल्यामुळे आता समान अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना कडक तपास आणि दस्तावेजी प्रक्रियेतून जावे लागणार आहे

सोमनाथ खांदवे's picture

17 Jun 2018 - 5:28 pm | सोमनाथ खांदवे

IAS ऑफिसर अंशु प्रकाश मारहाण प्रकरण इतक्या दूर पर्यंत जाईल याची आप च्या श्री केजरीवाल ला कल्पना नव्हती , त्या मारहाणी प्रकरणात आप चा आमदार अमानतुल्ला सुध्दा आहे . आणि हा केजरीवाल पुन्हा एकदा मोदीचें नाव घेत सुटला आहे
' दिल्ली सरकारमध्ये कार्यरत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावरुन उपराज्यपालांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलनाला बसलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरलं आहे. पंतप्रधान मोदींनी हा अधिकाऱ्यांचा संप घडवून आणल्याचा अप्रत्यक्ष आरोप केजरीवालांनी मोदींवर केला. '

manguu@mail.com's picture

18 Jun 2018 - 12:31 am | manguu@mail.com

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा महाघोटाळा करून विदेशात पसार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीकडे अर्धा डझन पासपोर्ट असल्याची नवी माहिती समोर आली असून या माहितीच्या आधारे नीरव मोदीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

नीरव मोदी बेल्जियममध्ये असल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांना मिळाली असून पासपोर्ट रद्द करण्यात आला असतानाही तो तिथे कसा पोहोचला आणि त्याचा विमानप्रवास अद्याप सुरू कसा आहे, याची चौकशी केली असता महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. नीरवकडे ६ पासपोर्ट आहेत. त्यातील ४ पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत आणि २ पासपोर्ट अजून वैध आहेत, असे आढळून आले आहे. 

......

2014 पूर्वीचे किती आणि नंतरचे किती ?

सोमनाथ खांदवे's picture

18 Jun 2018 - 6:36 am | सोमनाथ खांदवे

2014 च्या आदीचेच , या काँग्रीस वाल्यानी देशाचा किती खूळखुळा क्येलाय , सगळी सिस्टीम करपटेड करून ठेवली .

भंकस बाबा's picture

18 Jun 2018 - 8:27 pm | भंकस बाबा

मंगुशेठ गायब

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 7:51 am | manguu@mail.com

नीरव मोदी गुजरातचा ना ? पोलीस व्हेरिफिकेशन गुजरात पोलीसने केले असेल ना ? आणि पासपोर्टही गुजरातमधून दिले असतील ना ? तिथे गेली 20 वर्ष कोण आहे सत्तेत ?

manguu@mail.com's picture

22 Jun 2018 - 12:05 am | manguu@mail.com

नीरव मोदिला एक पासपोर्ट असताना दुसरा पासपोर्ट 2017 साली दिला आहे म्हणे . ( म्हणजे 2014 नंतर बरं का )

अरेरे , किती हे करप्शन भाजपाच्या काळात !

https://www.news18.com/news/india/how-nirav-modi-was-issued-second-passp...

आमच्या मागच्या बिल्डिंग मध्ये काळ्या कुत्रीने चार पिल्लाना जन्म दिला आहे. त्यातील तीन काळी आहेत आणि एक ब्राऊन आहे.
आणि हे संपूर्ण भाजपच्या काळातच झालंय?
मग राजीनामा कुणा कुणाकडे मागायचा आता?

डँबिस००७'s picture

18 Jun 2018 - 10:49 pm | डँबिस००७

आँ !! २०१४ नंतरचे म्हणजे मोदीजींच्या नावाने बोंब मारायला मोकळे !!

वर ह्यांना १५ लाख पाहीजेत म्हणे ( लो, और ईनको कश्मिर चाहीये ह्या धर्तीवर ) !!

manguu@mail.com's picture

18 Jun 2018 - 11:14 pm | manguu@mail.com

?

हरवलेला's picture

19 Jun 2018 - 5:16 am | हरवलेला

१३ हजार कोटींच्या महाघोटाळयातील २०१४ पूर्वीचे किती आणि नंतरचे किती ?

आठवडाभरापासून नायब राज्यपालांच्या निवासस्थानी ठाण मांडून बसलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांना उच्च न्यायालयानं कठोर शब्दांत झापलं आहे. धरणे धरण्याआधी नायब राज्यपालांची परवानगी का घेतली नाही, असा सवाल करत न्यायालयानं त्यांचे कान उपटले.
---
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/who-authorized-them-t...
---
गेले काही महिने निद्रिस्त असलेले व उठसुट नौटंकी करणारे, केजरिवाल मधील "मर्कट" या आयएएस अधिकार्‍यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा जागे झाले असे दिसते.

सोमनाथ खांदवे's picture

18 Jun 2018 - 8:46 pm | सोमनाथ खांदवे

त्या दिल्ली मदी प्रॉपर तिथली लोक कमी आणि हरयाणा , यू पी , बिहार मधल्या बावळटांचा भरणा ज्यास्त असल्यामुळ च केजरी शेठ निवडून आले व्हते . पंजाब सुदा अतिहुशार लोकांसाठी फेमस हाये म्हणून तिथे पण थोडी सीट आली .

गम्मत तर पुढे हाये , पाच मुख्यमंत्री नीं केजरीला सपोर्ट क्येल आणि स्पेशली हिंदुत्ववादी ममता नीं काँग्रीस ला झापल की ' तुम्ही का नाही केजरीला सपोर्ट करत ? . त्यामुळ काय झालय की अजय माकन आणि शीला दीक्षित तोंडाला कुलूप लावून बसल्यात . काँग्रीस च्या आदरणीय रागा न सांगितल असल मोदीला हारवुन मला पंतप्रधान बनायचय आणि त्या मुळ केजरी ला तर्रास नका देवु .

ट्रेड मार्क's picture

19 Jun 2018 - 3:36 am | ट्रेड मार्क

ठिय्या कशासाठी देत आहेत? काही महिन्यांपूर्वी एका मीटिंग मध्ये केजरीवालांच्या सहकाऱ्यांनी अंशू प्रकाश नावाच्या मुख्य सचिवाला मारहाण केली होती. त्यानंतर गेल्या ४ महिन्यात IAS अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव केजरीवालांच्या मीटिंगला उपस्थित राहणे टाळले आहे. नौटंकीची सवय असलेल्या केजरींनी लगेच याचे भांडवल करून मोदींना लक्ष्य केले. वास्तविक केजरींनी (सवयीप्रमाणे) माफीनामा दिला असता आणि परत असा प्रकार घडणार नाही याचीही ग्वाही दिली असती तर प्रकरण शांत झाले असते. पण मग मोदींना लक्ष्य कसे करता आले असते?

पण IAS अधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या प्रकरणाचा खुलासा केला. आणि आता फक्त केजरीच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणारे ४ मुख्यमंत्रीही तोंडघशी पडले.

ट्रेड मार्क's picture

19 Jun 2018 - 3:04 am | ट्रेड मार्क

रोहित वेमुलाच्या आईने शेवटी पैसे मिळाले नाही म्हणून का होईना सत्य सांगितले. राजकीय फायदा मिळवण्यासाठी मुस्लिम लीगच्या लोकांनी २० लाख रुपये देण्याचे आणि घर बांधून देण्याचे मान्य केले होते. बहुतेक ३ लाख रुपयाचे चेक देण्यात आले ते सुद्धा बँकेकडून परत आहे. मुस्लिम लीगने तो चेक चुकीने परत गेला असं सांगितलंय, म्हणजेच आपण चेक दिला हे मान्य केलं आहे.

हळूहळू कुठल्या का मार्गाने होईना या लोकांचा पर्दाफाश होत आहे.

भाजपयांनी करोडो रु मिळवून स्वतःचे office बांधले, ह्या राजकीय पक्षांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला . जेवणावळी घालुन समरसतेचि नाटके करण्यापेक्षा हे उदात्त नाही का ?

मदतीचे चेक तर योगींचेही बाऊन्स झालेत.

https://www.ndtv.com/india-news/yogi-adityanaths-rs-1-lakh-cheque-to-up-...
Barabanki: A topper of Uttar Pradesh board exams was elated when he received a cheque from chief minister Yogi Adityanath. Soon, it turned into disappointment when the cheque bounced. Not only that, he had to pay a penalty for it.

माहितगार's picture

19 Jun 2018 - 8:09 am | माहितगार

समरसता म्हणजे नाटक, नाटक म्हणजे समरसता ! समरसतेच्या बदली पैसेवाटप अधिक योग्य !

गोंधळ होतोय का माझा कुठे ?

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 8:23 am | manguu@mail.com

नुसती जेवणावळी म्हणजे निर्जीव देवाला ताट दाखवण्यासारखे किंवा फारफार तर गोमातेला एखादे ताट देण्यागत झाले की हो.

अगदी गरजू , त्यात वृद्ध आहे , तर तिला आर्थिक मदत , घर दिले तर बिघडले कुठे ?

माहितगार's picture

19 Jun 2018 - 8:43 am | माहितगार

तेच म्हणतोय की माझा गोंधळ होतोय

सजीव निर्जीव भासताहेत, मांडीला मांडी लावून बसण्याच्या अधिकारापेक्षा मोफत दिलेली ताट आणि झोपडीच मुल्य अधिक होतय. आंबेडकरांना असेच होणे अपेक्षित होते का? मलातरी आंबेडकर (आंबेडकरांच्या नंतरचे आंबेडकर) समजणे अवघड जातात

तसे दोन्ही कृतीत राजकीय लाभ अपेक्षित असणा;र पण सामंजस्याकडे नेणारी पेक्षा सामंजस्यापासून दूर रहाण्यास प्रवृत्त करू इच्छित कृती श्रेयस्कर अस काही होतया का ? माझा तरी भारी गोंधळ होतोय अमुकच राजकीय भूमिका लावून धरण्याच्या आग्रहात .

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 8:49 am | manguu@mail.com

मी 24 वर्षाच्या तरुणाला फुकट घर द्या , असे लिहिलेले नाही.

गरजू , त्यात वृद्ध आहे , तर तिला आर्थिक मदत , घर दिले तर बिघडले कुठे ?

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 8:49 am | manguu@mail.com

नको म्हटले का मी ?

माहितगार's picture

19 Jun 2018 - 11:42 am | माहितगार

राजे अभ्यास वाढवावा लागेल, आम्ही मागे हा धागा काढला होता तेव्हा पासून हेच सांगतोय. खरे म्हणजे ऊत्तर प्रदेशात अशात जी चर्चीत भोजने झाली, ती संघाची पारंपारीक सार्वजनिक ठिकाणी केलेली समरसता भोजने नव्हती तर काँग्रेसच्या गांधी नेहरुंनी आणि थोडी सावरकरांनी अस्पृश्यता निर्मुलनार्थ आणि त्यांना आपल्या सोबत खरी समानता देण्याच्या उद्देश्याने दलितांच्या घरचा त्यांच्या हातचा पाहुणचार घेणे होते. मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे प्रतिकात्मक समानता.

नाटकाचे अंक तर गांधी नेहरुंच्या तत्कालीन कार्यकर्त्यांनीही अनेक पार पाडले. तसे नसते तर ७० वर्षांनी जातीयता शिल्लक रहाण्याचा प्रश्न नव्हता. जातीयता कदाचित जसे बरेच कथित पुरोगामी क्लेम करतात तसे राजकीय स्पेक्ट्रमच्या दुसर्‍या म्हणजे संघाच्या बाजू कडून शिल्लक राहिली असेल तर त्या बाबत जातीयता निर्मुलनात स्वतः सरसंघचालकांनी रस दाखवला आहे त्यामुळे घरोघर जाऊन रसपान चालू आहे. त्यातही नाटकाचे अंक होतील नाही असे नाही. पण १) उशिराने आणि पायाखालची राज्यसतेची वाळू सरकण्याच्या भितीने का होईना जातीयता निर्मुलनाची गरज किमान त्यांच्या वरीष्ठ नेतृत्वास जाणवते आहे हे कमी महत्वाचे नाही २) भाजप आणि काँग्रेस दोन्ही राजकीय स्पर्धेतून जातीयता निर्मुलनाची एकमेकापेक्षा अधिक सकारात्मक/रचनात्मक पाऊले उचलतील तर त्यात वावगे काही नाही.

राजे, इथे प्रश्न सामाजिक समता निर्माण करण्याचा असावा, घरे आणि जेवणाची ताटे वाटण्याचा नाही हे ध्यानी घेण्याचे टाळण्याच्या हट्टा मागेही काही कारणे असतील नाही का ? ती कारणे कळाल्यास (हे कळणे मोठे दुरापास्त असते) ज्याची त्याने दुरुस्त करावीत, त्यात आम्ही बापडे काय करणार ? असो.

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 1:14 pm | manguu@mail.com

तुम्हीही जरा अभ्यास वाढवा.

समाजातील तरुण लोकांनी एकत्र यावे , जेवावे , एकत्र कष्ट करावेत , ते तुमच्या पुस्तकात लिहिले आहे - ओम सहनाववतु ..... तसे करावे

पण यांखेरीजही आजारी व्यक्ती , लहान मुले , प्रेग्ननट स्त्रिया , निराधार व्यक्ती , सिनियर सिटीझन इ ना काही विशेष मदतही द्यावी लागेल.

बाकी , जातीयतेचे 'खाप' र काँग्रेसवर किंवा भाजपावर फोडायचे कारण नाही , त्या गोष्टी पूर्वीपासून आहेत.

माहितगार's picture

19 Jun 2018 - 1:41 pm | माहितगार

....बाकी , जातीयतेचे 'खाप' र काँग्रेसवर किंवा भाजपावर फोडायचे कारण नाही , त्या गोष्टी पूर्वीपासून आहेत.

जे मतांचे राजकारण करुन सत्तेत आहेत / होते त्यांच्यावर खापर का फोडू नये ? यातल्या एकाने तरी गेल्या ७० वर्षात अद्याप दलित पंतप्रधान घडवून दाखवला आहे का ? भारतातली अर्धी मुख्यमंत्रीपदे दलितांना दिली असे काही करून दाखवले आहे का ? कॉर्पोरेट शेअर होल्डींगमधले ५-१० टक्के दलितांना राखीव ठेवले असे काही केले आहे का ?

वेमुला आणि दलिताम्ची समस्या सामाजिक समतेची आहे स्मान वागणुक देण्याबद्दलची आहे . सामाजिक समतेशी तडजोड करुन घरे आणि जेवणे देण्याची अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली होती असे माझ्या ऐकण्यात नाही. जेवणे आणि घरे अजून काही देऊन माणसाची निष्ठा अंशतः विकत घेतल्या जाऊ शकतात पण त्याने सामाजिक प्रतिष्ठा समानता प्रस्थापनास हातभार लागतो असे नसावे.

गरीब दलितातही आहेत आणि मुस्लिमातही, मुस्लिमलीगने भारतातील सगळ्या मुस्लिम आणि दलितांना मोफत घरे देऊ केले आहे का ? कि केवळ राजकीय सोईच्या लोकांना ? ज्यांची मुले आत्महत्या करतात अशा दलितांची संख्यापण भारतात बरीच असेल त्या सर्वांना मुस्लिम लीगने घरे देऊ केलीत का ? की जिथे रोहीत वेमुलांच्या नातेवाईकांना विवीध राजकिय सभातून एक्झिबीट करण्यास ते ऊपलब्ध असावेत असा उद्देश आहे ?

विवीध राजकिय सभातून एक्झिबीट करण्यात आणि त्यासाठी घरे वाटण्यात राजकीय दृष्ट्या चुकीचे काही नाही पण त्याने व्हिलन अजून कसा व्हिलन आहे ह्याचीच जाहीरात होते . सामाजिक सामंजस्यास हातभार लागतो का ? सामाजिक सामंजस्यास समरसता भोजनाने हातभार लागतो की एक्झिबीशन्स भरवल्याने लागतो ?

माहितगार's picture

19 Jun 2018 - 1:46 pm | माहितगार

मुस्लिम राजकीय पक्ष केरळात राजकीय तडजोडीने सत्तेत होते तेव्हा किती मंत्रीपदे दलितांना दिली ? काश्मिरात किती मंत्रिपदे दलितांना मिळवून दिली ? किंवा मतपेटीचा काँग्रेसवर प्रभाव आहे आमची मते घेता तेव्हा दलितांचे आरक्षन २० टक्क्यावरून ५० टक्क्यावर वाढवावे अशी काही मागणी त्यांनी केल्याचे ऐकिवात आहे का ?

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 2:11 pm | manguu@mail.com

मी अमुक एक हॉस्पिटलात डॉक्टर म्हणून काम करतो - नोकरी , तिथे मी गरिबाला फुकट मदत देऊ शकत नाही , स्वतःच्या खिशातून 100 रु देऊ शकतो , पण हॉस्पिटलचे रिसोर्सेस फुकट नाही देऊ शकणार

राजकीय पक्षाने आरक्षण वाढवणे वगैरे कायदेशीर प्रक्रिया आहे , ती एका दिवसात पूर्ण होऊ शकत नाही . कदाचित शासकीय नियमात नसेल बसत तर ती मागणी पूर्णही होणार नाही.

पण राजकीय पक्ष स्वतःच्या अकौंटमधून हव्या त्या गरजू दलिताला मदत देऊ शकतो, इथे त्या राजकीय पक्षाने स्वतः:च्या अकौंटमधून मदत दिली आहे.

उगाच कुठल्याही गोष्टीचे हास्यअस्पद comparisn करू नये

ठिके हास्यास्पद न वाटणार्‍या गंभीर गोष्टींशी तुलना करूया (तुमच्या या उत्तराचीच अपेक्षा करत होतो) ! मुस्लीम लीग ने किती तलाक पिडीत महिलांना घरे बांधून दिली ? किती तलाक पिडीत महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचे खर्च ऊचलले ? मुस्लिम लिगने किती हलाला सारखे प्रकार बेकायदेशीर ठरवण्या साठी नेमकी कोणती राजकीय पाऊले उचलली ? मुस्लीम महिलांना काझी आणि मौलवीपदे मिळावी म्हणून काय पाऊले उचलली ? पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्षपद आणि कार्यकारी समितिच्या अर्ध्या जागा मुस्लीम महिलांना मिळाव्यात म्हणून कोणती पाऊले उचलली ? मुस्लीमांनी चालवलेल्या व्यवसाआत मुस्लिम महिलांना अर्धी पार्टनरशीप आणि वाढीव प्रॉपर्टी शेअर मिळावा म्हणून कोणती पाऊले उचलली ? मुस्लीम लिग आणि मुस्लिम राजकिय पक्षांचे अध्यक्षपद आणि कार्यकारी समितीवर अर्ध्या जागा मिळाव्यात म्हणुन कोणती
पाऊले उचलली ? मुस्लिम राजकीय पक्षांची अर्धी निवडणूक तिकिटे मुस्लिम महिलांना मिळावीत म्हणून कोणती पाऊले उचलली ? मुस्लीम समाज त्यात्या राज्यातील भाषा बोलून तिथल्या तिथल्या समाजात मिसळावा म्हणून कोणती पाऊले उचलली ?

लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण वाढवून मिळावे या मागणीसाठी काय हालचाली केल्या ?

वैचारीक दृष्ट्या प्रामाणिक असाल तर प्रत्येक प्रश्नाचे स्वतंत्र उत्तर द्यावे . एका प्रश्नाचे काहीतरी उत्तर द्यायचे आणि बाकी प्रश्न अनुत्तरीत ठेवायचे अशी चलाखी नको !

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 5:58 pm | manguu@mail.com

पुन्हा तीच तुलना

माहितगार's picture

19 Jun 2018 - 6:14 pm | माहितगार

हो अगदी, कारण तुलना रास्त आहे ! कारण जेवढी नाटकीयता शोबाजी इतर राजकीय पक्ष करतात तेवढीच मुस्लिम लीग करते आहे, त्यात वेमुला कुटूंबास मदतीपेक्शा राजकीय फायद्याचे तूप आपत्या पेक्षा पोळीवर कसे ओढता येईल या चढाओढीपेक्षा अधिक काही नाही.

रोहीत वेमुलाच्या आधी सुद्धा त्याच विद्यपीठातील दलित विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी आत्महत्या झालेल्या आहेत , वेमुला प्रकरणाच्या आधी मुस्लिम लीगला कदाचित सुचले नसेल पण वेमुला प्रकरणा सोबत नाही म्हटले तरीही त्यांचीही चर्चा झालीच त्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबांना मुस्लिम लीगने नेमकी कोणती मदत पोहोचवली ?

खरे तर आता पावेतो सोपेच प्रश्न विचारले , माझ्या कडे आणखी कठीण प्रश्नांची यादी आहे. पण एवढे आधी झेपू द्यात. ऊत्तरे देण्यास अवघड असली की प्रश्नांना अयोग्य जाहीर करणे सोपे असते . पण उत्तरे टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी प्रश्नचिन्हे संपत नाहीत हे उत्तरे टाळणारे विसरत असतात.

जेव्हा जेव्हा पुरोगामीत्वाच्या निरपेक्षतेस ग्लानी येईल तेव्हा तेव्हा पाठीमागे लागण्यासाठी आम्ही आहोतच. :)

पुरोगामीत्वाच्या निरपेक्षतेस ग्लानी

पुरोगामींची निरपेक्षता केंव्हाच हुतात्मा होऊन तिची पुण्यतिथी हि साजरी होते दरवर्षी.

तुम्ही कशाची वाट पाहता आहात

माहितगार's picture

19 Jun 2018 - 6:55 pm | माहितगार

..तुम्ही कशाची वाट पाहता आहात

कदाचित स्वतः अवतार घेण्याची (जाहीर करण्याची) :)

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 9:24 am | manguu@mail.com

https://m.maharashtratimes.com/india-news/bhayyu-maharaj-was-under-press...

इंदूर:

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत असतानाच भय्यू महाराजांवर सरकारचा दबाव होता, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने केला आहे. 'भय्यू महाराजांकडे नर्मदा घोटाळ्याचे दस्ताऐवज होते. त्यामुळेच सरकारने त्यांच्यावर दबाव वाढवला होता, परिणामी भय्यूजींनी आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी,' अशी मागणी करणी सेनेने केली आहे. करणी सेनेच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी हा दावा केला. भय्यूजींकडे नर्मदा घोटाळ्याचे कागदपत्रे होती. त्यांनी ही कागदपत्रे उघड करू नये म्हणून सरकारने त्यांच्यावर दबाव टाकला होता. तशी माहिती आम्हाला सोशल मीडिया आणि इतर स्त्रोतांकडून मिळत असल्याचं गोगामेडी यांनी सांगितलं. मात्र गोगामेडी यांनी यावेळी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत.
'सरकार खरोखरच प्रामाणिक असेल तर त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. त्यामुळे सत्यबाहेर पडेल. सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले नाही तर करणी सेना आंदोलन करेन,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भय्यू महाराज यांच्या हत्येत त्यांच्या कुटुंबियांचा, शिष्यांचा किंवा सरकारशी संबंधित व्यक्तिचा हात असू शकतो, असा संशय व्यक्त करतानाच भय्यूजींच्या अंतिमसंस्काराला कुठलाही मोठा नेता किंवा सरकारचा एकही प्रतिनिधी न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सोमनाथ खांदवे's picture

19 Jun 2018 - 11:59 am | सोमनाथ खांदवे

यांच्या कवितेच्या काही वळी त्यांची माफी मागून चिकटवत आहे

पुरोगामी पुरोगामी
कितीसा पुरोगामी आहेस ?

तुझ्यासाठी
आपले कुणीच नाही

तूला तू त्यांचा आहेस असे वाटते
तेही फसवे नसते का ?

आपल्यातल्या आपल्यांचा
होऊ शकला नाहीस

त्यांचाही होऊन रहाणे
खरेच जमेल का तूला ?

आणि तूही कुणाचाच नाहीस
हेच खरे नसते का ?

सूचना :-
आता या कवितेचा भावार्थ आणी मंगुशेठच वागणं जर सेम वाटत आसल तर तो निव्वळ योगायोग समजावा .

माहितगार's picture

19 Jun 2018 - 3:23 pm | माहितगार

कवितेच्या मर्यादीत ओळी वापरण्यास हरकत नाही पण शक्यतो सुयोग्य संदर्भ अबाधीत रहावे म्हणून पूर्ण कवितेचा मिपा दुवा सोबत जोडत जावा अशी अपेक्षा आणि विनंती आहे.

आ.न.

माहितगार

सोमनाथ खांदवे's picture

19 Jun 2018 - 3:37 pm | सोमनाथ खांदवे

पुढच्या वक्ताला नक्की लक्षात ठेवीन ,

माहितगार's picture

19 Jun 2018 - 4:09 pm | माहितगार

__/\__ अनेक आभार

राजकीय घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत भाजपा खासदार वरून गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना घरचा अहेर दिला आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांना शुभेच्छा देण्यात आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात मग्न आहे. तर दुसरीकडे त्यांचे भाऊ आणि भाजपा खासदार वरूण गांधी यांनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत त्यांना टोला लगावला आहे. राजकारणातील घराणेशाहीमुळे सामान्य माणसासाठी राजकारणाचे दरवाजे बंद होत चालले आहेत ही बाब खेदजनक आणि निषेधार्ह आहे अशी टीका वरूण गांधी यांनी केली आहे. आपण असे राजकारण केले पाहिजे ज्यामुळे सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल. मात्र प्रत्यक्षात राजकारण असे केले जाते आहे ज्यात घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते.

वरूण गांधी यांनी टीका करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. एखाद्या छोट्या गावात राहणारा तरूण ज्याच्याकडे ज्ञान आहे, प्रतिभा आहे अशा युवकाचे ज्ञान वाया जाते. मी राजकीय परिवाराचा भाग नसतो तर राजकारणात आलोच नसतो असेही वक्तव्य वरूण गांधी यांनी केले.

-------

किती ही विनोदबुद्धी !

काश्मीरमध्ये भाजप ने पाठिंबा काढला ओ.
====
भाजपच्या संगतीत राहून वाल्याचा वाल्मिकी होतो हे ब्रीद वाक्य हवेतच विरलं म्हणायचं.
====
"Terrorism, violence and radicalisation have risen and fundamental rights of the citizens are under danger in the Valley. -राम माधव

नोटबंदी ने तर हे सगळं बंद पडले होते ना ?
====
विकास का काय जन्मायचा होता काय होणार पुढे आता ?
====
http://zeenews.india.com/jammu-and-kashmir/bjp-pulls-out-of-alliance-wit...

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 5:48 pm | manguu@mail.com

धीर सुटल्याची लक्षणे दिसत आहेत

सोमनाथ खांदवे's picture

19 Jun 2018 - 5:30 pm | सोमनाथ खांदवे

काश्मीर शांत राहाव ,तुमच्या सारख्या भटक्या पर्यटकांना काश्मीर ला जाता यावं म्हणून भाजप न पी डी पी ला सपोर्ट देऊन सत्तेत सामील झाले होते .

विशुमित's picture

19 Jun 2018 - 5:47 pm | विशुमित

खांदवे साहेब भाषेवर तेवढे थोडे नियंत्रण ठेवा. गावठी बोलण्याच्या स्टाईल मध्ये सगळेच खपवून घेतले जाणार नाही, हे आधीच नमूद करतो.
====
फक्त पर्यटन करता यावे हा भाजपचा एकमेव उदात्त हेतू होता म्हणायचं.
====
बाय द वे काश्मीरला मी भटकंती करायला गेलो होतो हे तुम्हाला कसे समजले ?

ज्याला भटकण्याची आवड असते तोच खरा पर्यटक बाकी सगळे ऐतिहासिक ठिकाणी सुद्धा बाटली घेऊन बसणारे असा मला म्हणायचे होते .
काश्मीर चा प्रश्न राजकारण करण्याच्या पलीकडे गेलेला आहे व त्या परिस्थितीत पी डी पी आणि भाजप ला ज्यास्त सीट भेटले म्हणून त्यांनी राज्यात शांतता रहावी , काश्मिरी जनतेला उर्वरीत भारताशी जोडता यावे या कारणास्तव त्यांनी सरकार स्थापन केले असेल .
पी डी पी बरोबर सत्तेत राहून केंद्र सरकार ला 'ऑपरेशन ऑल आऊट ' करताना अडचणी येत असणार म्हणून भाजप ने पाठिंबा काढला असावा , आता इथून पुढच्या काळात शिपाई औरंगजेब चे मारेकरी किती दिवसात टिपले जाईल हे कळेलच .
मला वाटतंय पंजाब मध्ये सुद्धा फ्री हँड दिल्या नंतरच आतेरिकी कारवाया बंद झाल्या होत्या .
पाठिंबा काढल्यानं काय व्हईल , तुम्हाला काय वाटल त्ये बी सांगा .

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 6:26 pm | manguu@mail.com

अशा सोम(रस)नाथांचे जास्त मनावर घेऊ नये.

स्वतः कधी पाकचा निषेध करणार नाहीत , इतरांना 50 दा विचारतील , तू पाकचा का निषेध केला नाहीस ?

कुणा निराधार हिंदू म्हातारीला मुस्लिम लीगने मदत केली तर 50 दा विचारतील - तुम्ही ह्यांना मदत का नाही केली अन त्यांना मदत का नाही केली ? पण हिंदू संघटनांना नाही विचारणार की ती जर हिंदू होती तर तुम्ही कुणी का मदत केली नाही ?

...कुणा निराधार हिंदू म्हातारीला मुस्लिम लीगने मदत केली तर 50 दा विचारतील - तुम्ही ह्यांना मदत का नाही केली अन त्यांना मदत का नाही केली ? पण हिंदू संघटनांना नाही विचारणार की ती जर हिंदू होती तर तुम्ही कुणी का मदत केली नाही ?...

याची फॉल्ट दाखवल्याने त्याची आणि त्याची फॉल्ट दाखवल्याने याची कमी होत नाही. आणि प्रश्न अनुत्तरीत ठेवल्याने उत्तर दिल्यासारखे होत नाही

सुबोध खरे's picture

19 Jun 2018 - 6:53 pm | सुबोध खरे

सोम(रस)नाथांचे
अशा वैयक्तिक प्रतिसादावर आता पुरोगामी/ सेक्युलर इ इ स्वतःला म्हणवणारे लोक गळा काढून रडत नाहीत
आणि संपादक मंडळाकडे दाद मागत नाहीत यात आश्चर्य ते काय?

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 7:00 pm | manguu@mail.com

इतके माफक विनोद मिपावर चालत असावेत

तुम्हाला काय हो माहिती तुम्ही तर मिपा वर सातच महिने आहेत ना?

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 7:40 pm | manguu@mail.com

पूर्वी लिहून ठेवलेले सात महिन्यात वाचता येत नाही का ?

विशुमित's picture

19 Jun 2018 - 7:48 pm | विशुमित

ज्याला त्रास होतो त्याने आवश्य मागावी की दाद.
दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन किती दिवस गोळ्या झाडणार.?
ते भाजपवाले पण तसेच नाचता येईना पीडीपी वाकडी...!!

सुबोध खरे's picture

19 Jun 2018 - 8:09 pm | सुबोध खरे

ज्याला त्रास होतो त्याने आवश्य मागावी की दाद.

माझ्या एका (दुसऱ्याला दिलेल्या) प्रतिसादावर तुम्ही रडत संपादक मंडळाकडे गेला होतात

ते एवढ्यात विसरलात?

तेंव्हा तुझा धर्म कुठे गेला होता राधासुता

विशुमित's picture

19 Jun 2018 - 8:25 pm | विशुमित

खरे साहेब मी प्रोपर चॅनलने माझी कैफियत मांडली होती. दुसरे कोणी येऊन माझ्या साठी प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा ठेवत नाही.
एखाद्याचे नाही पटले तर थेट त्यालाच बोलतो.
===
जरा अदबीने. फोर्सची भाषा फोर्स मधे ठेवा.
येथे सिनियर जुनियर मी खपून नाही घेणार.
फक्त मुद्द्यावर बोला.

सुबोध खरे's picture

19 Jun 2018 - 8:39 pm | सुबोध खरे

प्रतिसाद तुमच्या साठी नसताना तुम्हाला मध्ये पडायला कुणी सांगितलं होतं?

इथे हे मंगू सोमनाथ मध्ये सोमरस आणून काय म्हणता आहेत ते स्पष्ट आहे.

दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन किती दिवस गोळ्या झाडणार.?

हे वाक्य आपलेच आहे ना

फोर्सचा मुद्दा/सिनियर ज्युनियर चा मुद्दा तुम्ही आणला आहे. मी नाही.

बाकी घाव वर्मी लागला आहे असे दिसत आहे.

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 8:47 pm | manguu@mail.com

गम्मतच

सोमर्सनाथ म्हटले कुणाला , तर खरेसाहेब मध्ये पडले,

आणि दुसर्याना सांगतात , मध्ये का पडताय ?
!!

सोमनाथ खांदवे's picture

19 Jun 2018 - 9:32 pm | सोमनाथ खांदवे
सोमनाथ खांदवे's picture

19 Jun 2018 - 10:10 pm | सोमनाथ खांदवे

जरा सायकल मारायला ग्येलो तवर लैच गोंधळ झालेला दीसतोय .
मंडळी , दिवस पावसापाण्याचे हायेत मंगुशेठ ला झाली आसल आठवण सोमरस ची ☺☺☺.
मीपा वर प्रबळ इरोधक असल्या शिवाय धागा हजारी पर्यंत जाणार नाय , त्या साठी मंगुशेठ आणि विषुमीत सायबा चे आभार मानले पायजेत .
नायतर लोकसभेत बगा आलिबाबा आणि त्याचे 44 चोर मंगुशेट ने भरलेल्या इन्कमटॅक्स मदून ( अस त्ये म्हणत्यात ) फुकट पगार घ्येऊन गेल्या 4 वर्ष्यात लोकसभेचे यक भी अधिवेशन पूर्ण व्हऊन नाय दिल , रोज इनाकारण गोंधळ घालून कुठंतरी लग्नाला बड्डे ला जायला मोकळे .
माहितगार, ट्रेडमार्क, खरे, म्हात्रे ,अर्धवटराव, प्रसाद ,मंगुशेट आणि विषुमीत पण तुमी सगळे मिपावर दिपस्तंभा सारख कार्यरत आहात , तुमच्या मूळ आमच्या सारख्या नवख्या लोकांना मिपावर सराईत पने वावरता येतय.

विशुमित's picture

19 Jun 2018 - 9:15 pm | विशुमित

आम्हाला मास्तर आणि फोर्सवाल्यांच्या भाषेचा घरूनच अनुभव आहे. त्यांचा मान ठेवत असूनही मास्तर लोकांना सगळे जण विद्यार्थीच वाटतात आणि फोर्सवाल्यांना रंगरूट!
नाईलाजाने मिपावर तुम्हाला असे बोलावे लागले.
====
प्रतिसादांचा क्रम कृपया पुन्हा पाहून घ्या. माझे म्हणणे कदाचित तुम्हाला पटेल.

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 6:13 pm | manguu@mail.com

किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्यानंतरच युती झाली. मुफ्ती सरकारला केंद्रसरकारने भरपूर मदत केली...

असे भाजप सांगत आहे , मग किमान कार्यक्रम जर होता तर अपयशाचे धनी भाजपही आहेत ना ?

काश्मीरबाबत

माहितगार's picture

19 Jun 2018 - 6:23 pm | माहितगार

सगळ्या राजकीय गोंधळात, काश्मिरात गुप्तचर यंत्रणा प्रभावी पणे काम करु शकल्या नाहीत याकडे दुर्लक्ष होते आहे आणि गुप्तचर यंत्रणांचे कामाचा प्रभाव कसा वाढवता येईल हे पाहिले जावयास हवे पण त्या दिशेच्या विश्लेषण आणि अंमलबजावणीचा अभाव दिसतोय हि खेदाची बाब आहे.

सोमनाथ खांदवे's picture

19 Jun 2018 - 6:35 pm | सोमनाथ खांदवे

भाजपच दोषी हे ठरवायच्या आदी चाच्या नेहरूंनी ( ह्ये जमिनी वरचे चाचे ) काश्मीरप्रश्न कसा वाढवला ह्ये बी इसरू नगा . यका मुस्लिमबहुल राज्याला आंतराष्ट्रीय पातळीवर चमकून ठ्येवायची काय गरज व्हती? . 556 का काय तरी संस्थानें देशात शामिल क्येली आणि फकस्त काश्मीरप्रश्नी **मारली , तवा पासून देशाच्या डोक्यावर ती जखम भळभळत हाये . ती जखम बरी बी व्हत नाय आन कापून पन टाकता यत नाय .
मंगुशेठ तुमी इस्पितळात आसता ( ह्ये तुमीच लै येळा सांगितलंय ) त्यामुळ तुमाला ही कंडिशन चांगलीच म्हैत असणार .

विशुमित's picture

20 Jun 2018 - 1:06 pm | विशुमित

<<<भाजपच दोषी हे ठरवायच्या आदी चाच्या नेहरूंनी ( ह्ये जमिनी वरचे चाचे ) काश्मीरप्रश्न कसा वाढवला ह्ये बी इसरू नगा >>>
==>> खांदवे जी...
मिपा सदस्य आनंद मोरे यांचे खालील अभ्यासपूर्ण लेख काश्मीरप्रश्न समजून घ्यायला उपयुक्त ठरतील, असे मला वाटते.
बऱ्याच पूर्वग्रही समजुतींना छेद जाण्याचा संभव आहे, त्यामुळे कृपया तुमच्या रिस्क वर वाचा.

https://www.misalpav.com/node/35013
https://www.misalpav.com/node/35018
https://www.misalpav.com/node/35041
https://www.misalpav.com/node/35059
https://www.misalpav.com/node/35083
https://www.misalpav.com/node/35109
https://www.misalpav.com/node/35166

प्रसाद_१९८२'s picture

19 Jun 2018 - 6:20 pm | प्रसाद_१९८२

हा माणुस अशी विधाने कोणत्या आधारावर करतो हेच कळत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव

अर्थात बारामतीच्या आधारावर.
फडणवीस सरकार बहुमत प्रस्ताव जिंकलं ते बारामतीच्या पाठिंब्यावर. पुढल्या वेळी तसं काहि सेनेबद्दल होणारच नाहि याची काय शाश्वती. सेनेची मदत पवारसाहेबांना दिल्लीत होणार आणि मुंबईत सेनेला बारामतीचा पाठिंबा मिळणार.

सोमनाथ खांदवे's picture

19 Jun 2018 - 6:46 pm | सोमनाथ खांदवे
सोमनाथ खांदवे's picture

19 Jun 2018 - 6:50 pm | सोमनाथ खांदवे

मंगुशेट ला आतेरीक्या चें कंबरडे इथून पुढ जरा ज्यास्तच मोडलं जाईल याची काळजी वाटती का काय ?

प्रसाद_१९८२'s picture

19 Jun 2018 - 7:11 pm | प्रसाद_१९८२

मंगुशेट ला आतेरीक्या चें कंबरडे इथून पुढ जरा ज्यास्तच मोडलं जाईल याची काळजी वाटती का काय ?
<<
---
खांदवे साहेब,
भाजपांने पाठींबा काढून घेतला म्हणून अतिरेक्यांचे कंबरडे वगैरे मोडले जाण्याची शक्यता शून्य आहे, निदान या केंद्रसरकार कडून तरी. मुळात घुसखोरी करणारे अतिरेकी हे वारुळातून निघणार्‍या मुंग्याप्रमाणे आहेत ह्यांना कितीही ठेचले तरी हे अतिरेकी त्यांना आश्रय देणारा पाकिस्तान व आय एस एस शाबुत आहेत तोपर्यंत येतच राहणार. अतिरेक्यांना आश्रय देणार्‍या पाकिस्तानचे कंबरडे खरे तर मोडायला हवे मगच काश्मिरमधील दहशतवादाचा काही निकाल लागेल असे वाटते.
----
तशीही आता निवडणुक लागणारच आहे. त्या निवडणुकीच्या भाषणात मोदी परत एकदा 'एक सर के बदले दस सर लायेगें', 'पाकिस्तान की ईट से ईट बजा देंगे' वगैरे भाषणे करुन पाकिस्तानचे कंबरडे नक्की मोडतील असे वाटते.

सुबोध खरे's picture

19 Jun 2018 - 7:28 pm | सुबोध खरे

प्रसाद साहेब

काश्मीर मधील पर्यटक मोसम संपत आला आहे. तेथील सामान्य माणसांचे पोट हे पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे.

सैनिक कारवाई करताना हा पण विचार करावा लागतो कि गरीब पण भारताशी निष्ठा असणाऱ्या लोकांच्या पोटावर पाय येणार नाही. तेंव्हा रमजान च्या महिन्यात सैनिकी कार्यवाही न करता खोर्रे शांत राहील हे पाहिले गेले.

रमजानच्या पवित्र महिन्यात आम्ही रक्त वाहत नाही हे दाखवताही आले आणि गरीब जनतेच्या पोटावर पाय हि आला नाही.

मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकार मधील अनेक मंत्री हे दहशवादी/ फुटीरतावादाला धार्जिणे असल्याने पकडलेल्या दहशतवाद्यांना सोडवण्यासाठी ते काश्मीर पोलिसांवर दबाव आणत होते. लष्कर आणि केंद्रीय सशस्त्र सैनिक दले आम्हाला मुक्त हस्ताने काम करू द्या हि मागणी करीत होते.

गळू हे पिकल्याशिवाय फोडले तर रुग्णाला जास्त त्रास होतो हि वस्तुस्थिती आहे. येणाऱ्या काळात तेथे राष्ट्रपती राजवट आणून काश्मीर पोलिसांवरील दबाव कमी होईल आणि सशस्त्र दलांना मुक्त हस्त देता येईल असे मला वाटते.

लाल किल्ला, गांधी मैदान, शिवतीर्थावरून जोरदार भाषण देणे हा राजकारणाचा एक भाग असतो कारण अशीच भाषणे लोकांना भावतात हे अनुभव आहेच.

बाकी जास्त लिहीत नाही. (काड्या टाकणारे फुकटच्या काड्या टाकणारच. अशा दळभद्री लोकांकडे दुर्लक्ष करतो आहे.)

सुज्ञास सांगणे न लगे

सुबोध खरे's picture

19 Jun 2018 - 7:31 pm | सुबोध खरे

A total of 220 militants were killed under the operation by the Indian security forces in 2017. The security forces were able to persuade 82 youth to abandon militancy and come back. 78 security personnel were also killed in militant related violence.
As of 19 May 2018, a total of 91 militants and 20 security personnel have been killed in operations.[107] A unilateral ceasefire was declared by the Indian Government on 14 May where the security forces were asked not launch new operations during for Ramadan
https://en.wikipedia.org/wiki/Operation_All_Out_(Kashmir)

सुबोध खरे's picture

19 Jun 2018 - 7:33 pm | सुबोध खरे

शस्त्रसंधी असूनही मे आणि जून मध्ये ३० दहशतवाद्यांना मारलेले आहेच.
तेंव्हा भाषणबाजी हि जनतेसाठी आवश्यक असतेच आणि कार्यवाही आपल्या जागी चालूही असतेच

सोमनाथ खांदवे's picture

19 Jun 2018 - 10:56 pm | सोमनाथ खांदवे

भाजप नी पाठिंबा काढण्याचा जुगार इनाकारण नाय खेळला , काश्मीर शांत होवो ना होवो पण आज आत्ता या क्षणा पासून तुमी रोज स्कोर बगा किती आतेरिकी मारले जात्यात . आणि आस करून सुदा दहशतवाद थांबणार नै ह्ये बी खर कारण पाकिस्तान च आडव शेपूट व काश्मिरी जनते ( मुस्लिम असल्या मुळे , ची भारता बरोबर 60 वर्षात कधीच नाळ जुळलेली नाय .

माहितगार's picture

20 Jun 2018 - 8:00 am | माहितगार

....आणि आस करून सुदा दहशतवाद थांबणार नै ह्ये बी खर कारण पाकिस्तान च आडव शेपूट व काश्मिरी जनते ( मुस्लिम असल्या मुळे , ची भारता बरोबर 60 वर्षात कधीच नाळ जुळलेली नाय ...

मला कळत नाही हिंदुत्ववादी मंडळी त्यांच्याही नकळत पाकिस्तानला ऊपयूक्त भूमिका कशा मांडतात ? भारतच्या सांस्कृतिक जडणघडणीत काश्मिरचे मोठे योगदान राहीले आहे तसे काश्मिरच्या सांस्कृतिक जडणघडणीत उर्वरीत भारताचे मोठे योगदान राहीले आहे. सांस्कृतिक दृष्ट्या काश्मिरी जनता भारतीय नसती तर भारतीय संस्कृती आकारास आलीच नसती, काश्मिरी जनतेची नाळ भारता सोबत जोडलेली नसती तर भारतीयांना काश्मिर आपला का वाटला असता ? भारताने काश्मिर आपले असल्याचा कशाला हकनाक दावा केला असता ?

काश्मिर मधला दहशतवाद हा १९८४ नंतरची मुख्यत्वे १९९० नंतरची देण आहे आणि तीही पाकीस्तानी गुप्तचर संस्थांनी तेथील तरुणांच्या डोक्यांवर बंदूका ठेवल्या मुळे त्यांच्यातील सुफी संस्कृती पुसून धर्मांधता भरल्यामुळे. त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम असूनही पाकीस्तानी अतिरेक्यांनी डोक्यावर बंदूका ठेवल्यावर ते व्यक्त कसे करू शकतील ?

त्यामुळे तिथला दहशतवाद निपटला कि ते भारताबद्दलचे देशप्रेम मनमोकळेपणाने व्यक्त करु शकतील . त्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणाम्नी अधिक सक्रीय होऊन दहशतवाद संपवण्यास आपल्या जवानांना मदत केली पाहीजे.

प्रतिसादाशी खूप अंशी सहमत आहे.
=====
काश्मीर प्रश्नाबाबत माझे काही अल्प आकलन आहे त्यानुसार काही मुद्दे मांडू इच्छितो. त्यात कृपया अधिकची भर घाला किंवा जिथे चुकतंय ते हटवा.

१. ३७० कलम- काश्मीर प्रश्न म्हंटलं की पहिले ३७० कलमाला पुढे केले जाते. कोणत्याही सरकारला काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी अडचणींचा ठरलेला आणि तो हटवण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची असमर्थता असेल तर त्याला बगल देऊन इतर मार्ग अवलंबण्याचा रूट मॅप बनवला पाहिजे. रस्त्यात आलेल्या मोठ्या दगडाला हटवू शकत नसेल तर त्यावर डोके आपटून फोडून घेण्यात काय हासील आहे ? यावर विचार व्हावा.
-----
२. फुटीरवादी- जेव्हा तेव्हा बघावं काश्मीरबाबत पाकिस्तानबरोबर काही चर्चा करायची म्हंटले की या फुटीरवाद्या नेत्याचे चोचले पुरवताना सगळी सरकारे दिसली आहेत. तुम्ही म्हणता तसे पाकिस्तान शत्रूराष्ट्र आहे, ते त्याच्या देशाच्या नीतिमूल्यावरच चालणार.
@प्रसाद- म्हणतात तसे अतेरिकी हे वारुळातून निघणाऱ्या मुंग्यांसारखे आहेत, मारून किती स्कोर लिहीत बसणार?
पण ह्या चर्चेत गिलानी, मलिक वगैरे हे फुटीरवादी नेते खुसपट काढून नेहमी खोडा घालत असतात. यांचे एकदा सर्जिकल स्ट्राईक करून टाका की. जास्तीत जास्त काय होईल त्यांचे समर्थक थोडा दंगा घालतील. पण एकदा मूळ आणि खोड छाटले तर बाकी फांद्या-पाने आपोआप गळून पडतील.
मग चर्चेसाठी उरतील ते फक्त अब्दुल्लाह- मुफ्ती कुटुंब जे भारतीय संविधानाच्या मूल्यांना थोडेफार मानतात तरी. संविधानाच्या चौकटीमध्ये त्यांना गुंतवून मॅनेज करून पाकिस्तान बरोबर सशक्त चर्चा करू शकतो. (काश्मीर प्रश्नात दखलंदाजी करू नये म्हणून त्रयस्थ देशांना तर आपण आधीच लांबच ठेवले आहे )
-----
३. सोशिओ- इकॉनॉमिक कॅल्स्टर-
काश्मीर मधली जनता/गावे/शहरे भौगोलिक दृष्ट्या विखुरलेली आहेत. त्यामुळे प्रशासकीय सेवा, रोजगार, दहशतवादी कारवायांपासून जनतेचे रक्षण करणे हे तेथील सरकारांसाठी जिकिरीचे ठरत असते. त्यासाठी सोशिओ- इकॉनॉमिक कॅल्स्टर असणाऱ्या स्मार्ट सिटी सदृश शहरे अशा ठिकाणी वसवावीत जेथे कमीत कमी अतिरेकी हल्ले होऊ शकतील. जम्मू-काश्मीर मध्ये अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे अशी शहरे वसवता येतील. बहुतांशी जनता त्या कॅल्स्टर मध्ये डिप्लॉय करा. त्यांना सुवातीला मोफत घरे, शिक्षण, नोकऱ्या आणि इतर सोयी सुविधा देऊ करा. ऐहिक सुखापुढे कट्टरतावाद कमी होत जाईल.
----
४. काश्मिरीचा विश्वास संपादित करणे-
सैनेचे अधिपत्य असल्याकारणाने काश्मिरी जनता दैनंदिन जीवनात खूप जखडलेल्या अवस्थेत जगते आहे. हे कोणीही मान्य करेल. (सदन कमांडच्या एरियात हेल्मेट सक्ती सुद्धा पुणेकरांना सहन होत नाही तिथे त्या काश्मिरींनी काय करावे?)
एकदा कानफाट्या म्हणून शिका बसला की तो जाता जात नाही. व्हाट्सअप युनिव्हर्सिटी मधून विद्यार्जन करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगावा. थोडे प्रेमाने बोलून तर बघा. मारक्या बैलाला जर दोन्ही शिंगाच्या मध्ये थोडे कुरवाळले तर ते पण आपला हात जिभीने चाटायला लागतंय.
ही मीडिया आणि राजकारणी उत्तरभारतीय पब्लिकला राजकीयदृष्ट्या खुश ठेवण्यासाठी काश्मीरचे प्रमाणापेक्षा भडक चित्र उभे करत आहेत. प्रत्येक्षात त्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत.
इतर राज्यातील जनतेने काश्मिरी लोकांवर सरसकट देशद्रोही म्हणून शिक्कामोर्तब करणे शक्य तितक्या टाळावे.
आपल्याला फक्त काश्मीरची जागा नकोय काश्मिरी लोक देखील हवेत...!!

मुद्दे उलट्या क्रमाने चर्चेस घेतो

...आपल्याला फक्त काश्मीरची जागा नकोय काश्मिरी लोक देखील हवेत...!!

सहमत आहे, मुस्लीम समाजही गुण्या गोविंदाने किंवा यशस्वीपणे नांदवल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदुत्ववाद्यांमधील असुरक्षीततेची भावना -ती दोन्ही समुदायात आहे- आणि कल्पकतेचा अभाव त्यांना संकुचिततेकडे घेऊन जातो. मुख्य म्हणजे आपले मुद्दे तार्कीक पणे पटवण्या एवजी -आणि तार्कीकपणे पुढे ठेवणे शक्य असूनही- भावनिक गोंधळ जास्त घातला जातो -अनुभवातून शिकतील नाही असे नाही. वास्तविक पहाता जगातल्या सर्व धर्म पंथांना काखेत घेऊन संसार करण्याची हिंदू धर्मात व्यवस्थीत क्षमता आहे आणि भारत देशातही, फक्त स्वतःवर विश्वास आणि सकारात्मक कल्पकता हवी. भारतातल्या अनेक राज्यातील अतीरेकी चळवळी आटोक्यात येऊन ती राज्ये मार्गी लागली तसे काश्मिरही एक दिवस मार्गी लागेल .

इतर राज्यातील जनतेने काश्मिरी लोकांवर सरसकट देशद्रोही म्हणून शिक्कामोर्तब करणे शक्य तितक्या टाळावे.

सहमत

..प्रत्यक्षात त्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत.

अडचणींची दखल अवश्य घ्यावी पण फुटीरता वादाची कारणे अन्यत्र आहेत त्यांचा स्वतंत्र पणे विचार व्हावा असे वाटते.

..थोडे कुरवाळले तर

कुरवाळण्यास आजीबात हरकत नाही पण त्याला मारता येणारच नाही अशा क्लृप्त्या यशस्वी करावयास हव्यात.

...सैनेचे अधिपत्य ...

प्रसंगी सेनेचे अधिपत्य असलेच पाहीजे. खरेतर इतर बहुसंख्य देशा प्रमाणे निशस्त्र गुन्हगारांना आपली सेना हातही लावत नाही , केवळ पोलीसा ंच्या स्वाधीन करते, पोलीसही स्थानिक असतात ह्याकडे वेळोवेळी लक्ष वेधले पाहीजे कारण पाकीस्तान चीन भारतीय सेनेला जाणीवपुर्वक बदनाम करत असतात. खरेतर मानवता पूर्णतेसाठी भारतीय सैन्याचे रेकॉर्ड जगातल्या इतर सेनांपेक्षा नक्कीच अधिक चांगले आहे.

एक घटनात्मक अडचण आहे, भारतीय केंद्र सरकार कडे राखीव दले असली तरी राज्यसरकारांच्या पोलीसांची जागा घेऊ शकत नाहीत ही घटनात्मक अडचण दूर केली पाहीजे म्हणजे भारतभरातील सर्वराज्यातील पोलीस आधीकारी आणि सि आयडि पात्रतेनुसार वेगाने डेप्युटेशनवर अस्थीर प्रदेशात पाठवता आली पाहीजे , ब्रिटीशांनी पोलीसदलांचे काम अशाच पद्धतीने करुन घेतले ना सेना केवळ मोठ्या सशस्त्र संघर्षात हस्तक्षेप करत होती, पण हा घटनात्मक बदल झाल्या शिवाय सेना काढणे डाव्यांना वाटते तेवढे सोपे नसावे.

सिव्हीलीअन्सशी डिल करण्यासाठी बाहेरच्या महिला पोलीस आणि सेनेतही मोठी वाढ करावयास हवी, काय अहे महिलांच्या बाबतीत एखादी अपवादात्मक खालीवर झाले की ज्यांनी खपुन चांगले कार्य केले त्या सर्व पोलीसांच्या आणि सेनेच्या कामावर हकनाक पाणी फिरते आणि फुटीरता वादी अशा अपप्रसिद्धी करण्याच्या संधी ची वाट पहातच असतात. म्हणून बाहेरील राज्यातून भरपूर महिला पोलीस/सेनादले व्यवस्थीत संरक्षण देऊन पाठवल्या पाहिजेत.

कॅल्स्टर

ईझी टू पोलिस क्लस्टर्सची आयडीया चांगली आहे. उंच टेहळ्णी मनोरे आणि कोणतीही सशस्त्र हालचाल करता येणार नाही ईलेक्ट्रॉनीक नाकाबंदी करणे आजच्या तंत्रज्ञानास अगदी शक्य आहे. मी स्वतः सिव्हीलीअन एरीआस कंट्रोल करु शकतील अशी सेक्युरीटी ईक्विपमेंटस अभ्यासली आहेत , प्रश्न पुन्हा कल्पकतेचा येतो.

...काश्मीर प्रश्नात दखलंदाजी करू नये म्हणून त्रयस्थ देशांना तर आपण आधीच लांबच ठेवले आहे

हे ठिक आहे, पाश्चात्य पॉलीटीकल सायन्सच्या विषयाच्या अभ्यासाच्या माध्यमातून धर्माध्ष्टीत राष्ट्र हि संकल्पना पसरवली गेली ती असंख्य भारतीयाम्च्याही डोक्यात आहे आणि बहुतांश युरोमेरीकन सेक्युलर देशियांच्याही डोक्यात आहे. -काय होते सौदी अरब इज्राएल ह्या देशांची धर्माधीष्ठता युएसए स्वतःच्या सोईसाठी सुरक्षीत राहू देते म्हणून युरोमेरीकन देश मिडीया अकॅडेमिक्स सगळेच त्यांच्या नागरीकांनाही त्यात काही वावगे नाही ह्या भ्रमात ठेवतात. म्हणून मग काश्मिरींना धार्मीक आधारावर बाजूला करण्याच्या मागणीत मुदलात २०-२१च्या शतकात तथ्य नाही हे पटवणे अवघड जाते पण परदेशात असलेल्या प्रत्येक भारतीय वंशाच्या व्यक्तीने हा मुदा त्यात्या देशात जोरकस पणे लावून धरला पाहीजे. सांस्कृतिक एकत्वाचे पुरावे जोरकसपणे पुढे मांडले पाह्जेत म्हणजे अ‍ॅडव्हर्स मिडीया पब्लिसिटी होणे पाकीस्तानी आणि विवीध फुटीरता वाद्यांना शस्त्रास्त्रे आर्थीक मदत मिळण्यावर बंधने येऊ शकतात.

फ्रान्समध्ये अतीरेकी हल्ला झाला की शस्त्रे कुठून आली यावर चर्चा होते, अशा वेळी भारतीयांनीही आमच्याही देशात शस्त्रास्त्रे घेऊन अतीरेकी फिरतात युरोमेरीकेतून होणार्‍या शस्त्र पुरवट्यावर रोक लावण्याची मागणी मिडीयात जोरकस लावून धरली पाहीजे.आपल्याकडेचे सिव्हीलीयन मारले गेले कि अशा घटनांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनी जगभर फिरवल्या पाहीजेत . पाकीस्तानी चीनी मिडीया पब्लिसिटीत आपल्या पुढे निघून जातात आपले लोक त्यांच्याच प्रसिद्धीला भूरळपाडून घेतात हे कमी होणे गरजेचे आहे. कतार आमेरीकेत जाऊन अल जझिरा चालवण्याचे विचार करते , आपणही परदेश स्थित भारतीय वंशाच्या लोकांना मिडीया हाऊसेस चालवण्यासाठी फायनान्स केले पाहिजे. आमेरीकी मिडीया आणि पब्लिक ओपीनीयनवर मुठभर ज्यू सत्ता गाजवतात त्याला अल जझिराच्या माध्यमातून काउंटर करण्याचा विचार कतार करते , भारतीयांचा मिडियाचा अनुभव का कमी आहे आपणही ती कला का जमवून घेऊ नये.

अब्दुल्लाह- मुफ्ती कुटुंब आणि हुरीयत

जे राजकीय नेतृत्व ऐकणार नाही त्यांना त्यांच्या प्रभाव क्षेत्रापासून दूर नेऊन व्यवस्थित पण राजकीय हालचाली करता येणार नाही अशा ठिकाणी दूर कोपर्‍यात नेऊन टाकणे ब्रह्मदेशचा सम्राट रत्नागिरीला भारताचा बादशहा टिळक मंडालेला हा सर्वोत्तम उपाय आहे. मारले तर सिंपथी मिळते पण पेंशन देऊन दूर कोपर्‍यात टाकले तर बहुतेक जण तीस चाळीस वर्षात पब्लिकच्या विस्मरणात जातात.

-३७०-
आपल्या चर्चेच्या मुद्यात न आलेली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे
* फार्सी लिपीला डोक्यावर बसवून घेणे. उर्दू भाषा ठिक पण फार्सी लिपीवचून तिचे काहीही अडत नाही देवनागरीत व्यवस्थीत चालू शकते. भारतीयांच्या वैचारीक आदान प्रदानाला लिपी भिन्नतेमुळे अडथळा येतो . या मुद्यावर २० व्या शतकाच्या पुर्वार्धात शास्त्रीय काथ्याकुट झालेला होता पण महात्मा गांधी उत्तर नेतृत्वाला त्याचे गांभीर्य कळले नाही. काश्मिरात उर्दू भाषेचे काय काम होते ? शेख अब्दुल्लांना नेहरुंनी परवानगी का दिली ? ब्रिटीशां नी येऊन त्यांची इंग्रजी लादली आम्ही काश्मिरींची त्यांची स्वतःची भाषा लादू शकलो नाही ? भारतीय लिप्या घडवण्यात तर काश्मिरीं स्वतळ्च्चे योगदान होते . कमाल आहे, हा फालतू पणा सक्तीने बंद करावयास हवा.

* शालेय पुस्तके माध्यमे यातून प्रत्येक भारत विरोधी अथवा हिंदू धर्मा बद्दल अपसमज पसरवले जाणे टिपून वगळायला हवे. याचा सेना प्रमुखांनीही उल्लेख केला आहे. केवळ काश्मिर मधल्याच नाही तर पाकीस्तान त्यांच्या शालेय पुस्तकातून जी काही भारत अथवा हिंदू धर्म विरोधी मांडणी करते ती प्रसिद्धी तंत्राच्या आधारे अभ्यासून अगदी केंब्रिज अ‍ॅनालिटीका स्टाईलने मोडून काढली पाहिजे आणि भारतीय मांडणी पुढे ठेवली पाहिजे . जे स्वतःच्या निवडणूकीसाठी जमते ते देशासाठी का जमू नये ?

* ३७० पेक्षा मतपेटीच्या स्थानिक राजकारनात जम्मु काश्मिर विधान सभेने नागरीकत्व आणि विवाह कायदे देश विरोधी केले आहेत तेवढे सक्तीनी बदलले तरी पुरेसे आहे .

* आणि उर्वरीत भारतीयांना त्यांच्या मध्ये रहाण्याची इज्राएल प्रमाणे सुरक्षीत पण सक्तीने व्यवस्था करावी. आणि त्यांच्या १४ ते ४० वर्षे वयोगटाच्या चार पिढ्यांना उर्वरीत भारतात विवीध मार्गाने सामावून टाकावे.

असो तुर्तास विराम

अर्धवटराव's picture

19 Jun 2018 - 8:01 pm | अर्धवटराव

दहशतवाद हे काश्मीरप्रश्नाचे एक अंग आहे, किंवा बायप्रॉडक्ट म्हणा हवं तर. ज्याला आपण काश्मीरप्रश्न म्हणतो/समजतो, ज्या प्रश्नावर जगातल्या अनेकांचे उखळ पांढरे झाले, ज्यामुळे असंख्यांची वस्त्रे रक्ताने लाल झाली, तो प्रश्न केंव्हाच बॅकफुटवर गेला आहे. वर्तमानातला, आणि भविष्यात अधिकाधीक गंभीर होत जाणारा काश्मीर प्रश्न म्हणजे या दलदलीत पडणारा ड्रॅगनचा भरभक्कम पाय. हा मुख्य प्रश्न अजुन मेन बोर्डावरच आलेला नाहि, त्यावर चर्चा काय डोंबलाची होणार भारतात.

माहितगार's picture

19 Jun 2018 - 8:13 pm | माहितगार

...दहशतवाद हे काश्मीरप्रश्नाचे एक अंग आहे, किंवा बायप्रॉडक्ट म्हणा हवं तर. ...

तुम्हाला पाकीस्तानी भूमिकेची मांडणी योग्य वाटते का ? कारण काहीशी अशीच मांडणी करुन पाकीस्तान आधी काश्मीर सीमा प्रश्न (त्यांच्या बाजुने ) सोडवा म्हणते.

काश्मिर मधील दहशतवाद मुख्यत्वे झिया उत्तर काळातील पाकीस्तानी आयएसा आयची देण आहे. ही भारतीय भूमिका आहे जी सीमा प्रश्नास वेगळे ठेवते. आणि सीमा प्रश्नावर चर्चा करण्यापुर्वी पाकीस्तानने दहशतवाद्यांना पाठींबा देणे बंद केला पाहीजे असे म्हणते. आणि दहशतवाद्यांना शस्त्रे आकाशातून मिळत नाहीत हा कॉमन सेन्सचा भाग आहे तेव्हा दहशतवादाची जबाबदारी पाकीस्तानची बनते याकडे डोळेझाक करता येत नाही.

अर्थात सिमेला फेंसींग रेग्यूलर गस्त असताना दहशतवाद होतो यात भारतीय गुप्तचर यंत्रणांचे अंशतः फेल्यूअर आहे. भारतीय राजकीय फेल्यूअर काश्मिरच्या सिव्हीलीअन एरीआत भारत सरकारला काश्मीरचे पोलीसदल अंशतः बाजूस ठेऊन स्वतंत्र केंद्रीय पोलीसदल घटनात्मक बदल करुन न लादता येणे हे आहे असे वाटते. असो

पाकिस्तानची भूमीका काय आहे काश्मीर प्रश्नी ? सीमावाद त्यांच्या बाजुने सोडवला जावा अशी? कमॉन सर. त्यांची भूमीका स्वच्छ आहे. जोपर्यंत प्रगतीचे इतर कुठले मापदंड स्विकारले जात नाहि तोपर्यंत शेजारी राष्ट्राचे रिसोर्सेस आपल्या कब्जात घेणे, वंश-धर्मादी बाबतीत आपलं वर्चस्व मान्य करवणे, आपली रेषा मोठी करता येत नसेल तर (इव्हन अदरवाईज) इतरांची रेषा लहान करणे... आजवर जगात विरोधी/शत्रुराष्ट्रांमधे जे काहि होत आलं आहे तीच पाकिस्तानची भूमीका आहे. आपण त्यांना काश्मीर द्यायला तयार नाहि कारण उद्या ते दिल्ली मागतील. सिंपल. काश्मीर प्रश्न आजवर असाच होता. त्यात चिनी महत्वाकांक्षेचा धागा जोडला गेला. हळुहळु तो धागा मूळ प्रश्नापेक्षा कितीतरी मोठा होईल. आपण भारतीय मात्र काश्मीरात किती सो कॉल्ड दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि कुठल्या सरकारने तो केला याचीच चर्चा करत राहु. असो.

सिंगापुर, कोरीया, युएई वगैरे देशांनी भौगोलीक सीमा वाढवण्याऐवजी प्रगतीची नवीन क्षेत्रं आजमावली (कारणं काहिही का असेनात). तसच काहितरी भारत-पाकिस्तानच्या बाबतीत झालं तर काश्मीर प्रश्न सुटेल. अन्यथा नंदनवन असच जळत राहाणार. अर्थात, भारत, पाक आणि काश्मीरमधे एकाच वेळी शहाणं आणि लोकप्रीय नेतृत्व उदयाला आलं तर ते काहि शांततापूर्ण तोडगा काढतीलही. लेट्स होप सो.

माहितगार's picture

19 Jun 2018 - 10:21 pm | माहितगार

तुमचे विधान तुमच्या न कळत पाकीस्तानची आंतरराष्ट्रीय समुदाया समोरची अधिकृत मांडणी स्विकारत होते त्या कडे मी आपले लक्ष वेधले. अनधिकृत भूमिका काय आहेत हा वेगळा भाग आहे. आपल्या आणि आपल्या शत्रुराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय समुदाया समोरच्या अधिकृत भूमिका काय आहेत हे माहित नसणे आंतरराष्त्रीय समुदायापुढे फजिती करणारे असते . आंतरराष्ट्रीय समुदाया समोर प्रत्येक शब्द मोजून मापून बोलावा लागतो याचे भान भाजपायी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अद्याप पुरेसे आलेले नाही.

सुषमा स्वराज त्यांच्या पत्रकार परिषदात शेजारी राष्ट्रांबद्दल उल्लेख करताना दोनदा गडबडल्या आहेत कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या विधानांचे अर्थ काय होतात या बद्दलची अनभिज्ञता आणि निष्काळजी. काळाच्या ओघात अनुभवातन शिकतील नाही असे नाही पण अद्याप मंजील दूर आहे.

(मी भाजपवरच टिका करतो असे नाही खाली राहूल गांधी वरही टिका केली आहे.)

पण भारतीयांचा मेन मॅटर ऑफ कन्सर्न तोच असायला हवा. आंतरराष्ट्रीय समुदायापुढे काय भाषणबाजी करायची ते डिप्लोमॅट्स बघुन घेतीलच. नेमका मुद्दा काय आहे हे भारतीयांनी विसरायला नको.

काश्मिरात संघाच्या शाखा भरतात का ?

3 दिवसात तयार होतात म्हणे.

सोमनाथ खांदवे's picture

19 Jun 2018 - 10:28 pm | सोमनाथ खांदवे

नसल भरत तर नसल !!! तुमचे हायेत ना !!! यल्गार , जे एन यू ची गॅंग , करात गॅंग (कम्युनिस्ट पार्टी )मेवानी, हार्दिक, ह्ये सगळे हायेत ना बंदुका घ्येऊन लढायला .हां पण ह्यांना शत्रू कोण ह्येच कळतच नाय हा म्येन प्रॉब्लेम हाये .

manguu@mail.com's picture

19 Jun 2018 - 10:45 pm | manguu@mail.com

ते संघवालेच बोलत होते - 3 दिवसात आरमी बनवतो म्हणून .

1925 पासून म्हणताहेत -त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयं, पण त्यांना चान्स नाय घावला , आता निदान 2020 ला तरी घावेल , या भाबड्या आशेनं म्या ईचारलं .

सुबोध खरे's picture

20 Jun 2018 - 9:42 am | सुबोध खरे

तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो म्हणाला होतात ना ?
काय झालं त्याचं?
बघा पटपट भरती व्हा बरं. तुमचं पोस्टिंग बारामुल्ला, उडी नाही तर गुरेझ मध्ये करून घेईन. माझे वर्ग मित्र आहेत DGAFMS( महासंचालक सशस्त्र सेना चिकित्सा सेवा) कार्यालयात.
देशसेवेची संधी चालून आली आहे.

विशुमित's picture

20 Jun 2018 - 10:17 am | विशुमित

असा रेफरन्स देऊन ऐच्छिक पोस्टिंग देता येते का ?

सुबोध खरे's picture

20 Jun 2018 - 11:29 am | सुबोध खरे

फिल्ड पोस्टिंग हवं आहे असा अर्ज करता येतो. कारण अशा ठिकाणी सुखासुखी जाणारी माणसं कमी असतात.

लषकरी अधिकाऱ्यांना एक फिल्ड आणि एक पीस असे आलटून पालटून पोस्टिंग मिळते.

डॉक्टरांना पण अशी दोन फिल्ड पोस्टिंग करावी लागतात.

परंतु लष्करात जेंव्हा तुम्ही फिल्ड पोस्टिंगवर जाता तेंव्हा तुमचे अगोदरच्या पोस्टिंगच्या ठिकाणी असलेले घर तुमचे फिल्ड पोस्टिंग संपेपर्यंत ठेवता येते. यामुळे लष्करी अधिकारी किंवा जवान आपल्या आठवी नववी दहावी सारख्ख्या महत्त्वाच्या वर्षात मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून फिल्ड पोस्टिंग मागून घेतात. जेणेकरून स्वतःला त्रास झाला तरी शहर, घर आई मुलांची शाळा तीच राहून मुलांच्या शिक्षणात बारावी पर्यंत सातत्य राहू शकते.
बहुतांश वेळेस असे पोस्टिंग दिले जाते.
दोन मुलांच्या दहावी बारावी होई पर्यंत सहा सात वर्षे अशी युद्धमान स्थितीत पोस्टिंग केलेले कित्येक सैनिक आणि अधिकारी माझ्या पाहण्यात आहेत.
आपल्या नोकरीपायी मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून अशा एकांतवासात वर्षानुवर्षे राहणारे बाप लष्करात मी असंख्य पाहिलेले आहेत.

विशुमित's picture

20 Jun 2018 - 11:47 am | विशुमित

उपयुक्त माहिती.
पण "माझे वर्ग मित्र आहेत DGAFMS( महासंचालक सशस्त्र सेना चिकित्सा सेवा) कार्यालयात आहेत"" हे अनावश्यक होते. कारण त्याने वेगळा संकेत जात होता. असो ...

सुबोध खरे's picture

20 Jun 2018 - 12:23 pm | सुबोध खरे

ते वाक्य मोगा खान साठी होतं. तुम्ही टेन्शन घेऊ नका.

विशुमित's picture

20 Jun 2018 - 12:40 pm | विशुमित

टेन्शन घ्यायला आम्हाला कुठे पेन्शन मिळणार आहे तेव्हा ?
====
मित्राला (रेफरन्स देऊन ?) "तुमचं पोस्टिंग बारामुल्ला, उडी नाही तर गुरेझ मध्ये करून घेईन" असे तुम्ही म्हणालात म्हणून विचारले.
(( विचारायला पैसे थोडीच पडतात. त्यामुळे तेवढ्याच ४ नवीन गोष्टी समजल्या. आजच्या दिवसाचे Value Addition !!))

manguu@mail.com's picture

20 Jun 2018 - 10:19 am | manguu@mail.com

????

गठजोडच्या राजकारणाचा भाग वेगळा, काँग्रेस आणि राहुल गांधींनी भाजपा आणि मोदींवर टिका जरुर करावी पण राहुल गांधींचे जे विधान आले आहे त्या तील अंशाच्या औचित्या बद्दल गंभीर साशंकता वाटते.

....killing many innocent people... हे मेनी इनोसंट लोक कुठून पाकीस्तानच्या आयएसाअय कडुन शोधले का ते राहूल गांधींना ठाऊक . ....The damage will continue under President’s rule.... आता या वाक्याची निसटती बाजू अशी आहे की जम्मू आणि काश्मिरचे राज्यपाल एन.एन वोरा जे राष्ट्रपती राजवटीच्या काळात कारभार पहातील ते काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंग सरकारने नियूक्त केलेले आहेत. ओमर अब्दुल्लाही त्यांच्यावर आमचा विश्वास आहे म्हणतात . एका राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व म्हणून त्यांच्या नेत्यांची प्रतिक्रीया अधिक जबाबदार राहू शकली असती का , असे प्रतिक्रीया वाचून वाटून गेले. पण व्यक्तिंच्या प्रवृत्ती जबाबदार होण्यासाठी लागणार्‍या सगळ्याच गोष्टी दुकानातून विकत आणून देता येऊ शकत नाहीत हि अडचण आहे.

माहितगार's picture

19 Jun 2018 - 7:59 pm | माहितगार

राज्यपाल एन.एन वोरांचा बायोडाटा प्रशासकीय अनुभवाने संपन्न दिसतो पण त्यांचे वय ८१ आहे, तणाव असलेल्या राज्याच्या दृष्टीने रोज दररोजच्या कामाच्या ताण झेलण्या साठी जरासे जास्त वाटते.

सुबोध खरे's picture

20 Jun 2018 - 12:10 am | सुबोध खरे

25 जून ला विद्यमान राज्यपालांचा कार्यकाळ संपतो आहे.
Centre favours an Army veteran as JandK Governor: Here are the two names https://www.oneindia.com/india/centre-favour-an-army-veteran-as-jk-gover...
सय्यद हसनेंन हे 15 कोअर चे GOC(जनरल ऑफिसर कमांडींग) होते आणि त्यांना काश्मीर प्रश्नांची सखोल जाण आहे.
:उडी बारामुल्ला श्रीनगर अशा ठिकाणी त्यांनी 15 वर्षे लष्कराचे सेनापत्य करण्यात घालवली आहेत.

manguu@mail.com's picture

20 Jun 2018 - 7:37 am | manguu@mail.com

रामदास आठवले यांची खंत

रिपब्लिकन पक्षाने २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती केल्याने भाजपची मतांची टक्केवारी वाढली, परंतु आरपीआयला सत्तेत दहा टक्केवाटा देण्याचे आश्वासन पाळण्यात आले नाही. पक्षाचे कार्यकर्ते अजूनही सत्तेतील वाटय़ापासून वंचित आहेत, अशी खंत रिब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आवठले यांनी येथे व्यक्त केली.

https://www.loksatta.com/maharashtra-news/ramdas-athawale-bjp-1699872/

सोमनाथ खांदवे's picture

20 Jun 2018 - 8:01 am | सोमनाथ खांदवे

मंगूशेठ ,सक्काळी ! सक्काळी !!पयल्या धारेचा पव्वा मारला की काय ? . पव्व्याच्या नशेत कदी आठवले तर कधी आवठले लिव्हताय .

manguu@mail.com's picture

20 Jun 2018 - 8:40 am | manguu@mail.com

खापी फेस्ट हाये ते

डँबिस००७'s picture

20 Jun 2018 - 1:42 pm | डँबिस००७

सोमनाथ,

गारबेज ईन गारबेज आऊट !!

बाकी दुसर्यांच्या नावावर जोक करणारे स्वतः सकाळी सकाळी घेतल्या शिवाय लिहु शकत नाहीत ह्याचा पुरावाच आहे हा !!

ज्यांनी मारहाण क्येली ते दोषी हायेतच पण फक्त भाजप द्वेषा पाई लहानमुलांची वळख उघड करणारे दोषी नाय का ? ह्या माणसाचा बुध्यांक कधी वाढणार ?.

जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातल्या अल्पवयीन मुलांना नग्न करून मारहाण करण्याच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगानं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, जळगाव जिल्ह्यातल्या वाकडी इथं मुलांना विहिरीत पोहल्यामुळे नग्न करुन मारहाण करण्यात आली होती.

या घटनेचा व्हीडिओ राहुल गांधींनी ट्वीटरवर पोस्ट केला होता. या व्हीडिओतून अल्पवयीन मुलांची ओळख उघड झाल्यामुळे बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झालं असल्याची तक्रार बाल हक्क आयोगाकडे करण्यात आली होती.

विशुमित's picture

20 Jun 2018 - 11:49 am | विशुमित

बाल हक्क आयोगाने हे मात्र चांगले काम केले.

manguu@mail.com's picture

20 Jun 2018 - 12:36 pm | manguu@mail.com

रोबोट मधल्या चित्तीबाबूची आठवण झाली

डँबिस००७'s picture

20 Jun 2018 - 1:35 pm | डँबिस००७

तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो म्हणाला होतात ना ?
काय झालं त्याचं?

अश्या गोष्टीची तुम्हाला आठवण रहात नाही !!

मात्र एक दशक जुन्या रोबोट सिनेमा मधल्या चित्तीबाबूची आठवण मात्र होते !!

manguu@mail.com's picture

20 Jun 2018 - 1:50 pm | manguu@mail.com

मिपावर एडीटची सोय नाही

मी जर तसे बोललो असेलच , तर ते मिपावर दिसेलच ना ?

डँबिस००७'s picture

20 Jun 2018 - 2:26 pm | डँबिस००७

Congress stung by Digvijaya Singh's 'Hindu terror' barb

AICC general secretary Digvijaya Singh’s ‘Hindu terror’ barb has triggered a row in election-bound Madhya Pradesh. RSS spreads violence, hatred and propagates terrorism, Digvijay had said.
AICC general secretary Digvijaya Singh’s ‘Hindu terror’ barb has triggered a row in election-bound Madhya Pradesh and left Congress reeling from what it sees as an own goal.

" हिंदु अतिरेकी " काँग्रेसने जगाला दिलेले एक नविन टॅग !! २०१९ च्या निवडणुकी आधी दिग्विजय सींग , मणी शंकर सारख्यांनी भाजपाचा विजय निश्चित करायला मदत करावी !

सोमनाथ खांदवे's picture

20 Jun 2018 - 4:07 pm | सोमनाथ खांदवे

खर म्हणजी सिब्बल ,दिग्विजय ,फुटक्या मनी, मनीष तिवारी ह्यांनीच 2014 मदी कुंपणावर बसलेल्या हिंदू सुशिक्षित मतदारांना भाजप च्या पारड्यात मत द्यायला लावलं व्हत.

विशुमित's picture

20 Jun 2018 - 4:25 pm | विशुमित

"""दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी आपण हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला नसल्याचे स्पष्ट केले. मी नेहमी संघ दहशतवाद हा शब्द वापरला आहे. कोणतेही दहशतवादी कृत्य हे धर्माशी जोडता येत नाही. कारण कोणताही धर्म दहशतवादाला प्रोत्साहन देत नाही, असे सप्ष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी मालेगाव, समजोता एक्स्प्रेस आणि मक्का मशीद बॉम्बस्फोट आणि संघ विचारसरणीचे कनेक्शनबाबत भाष्य केले."""
===
अर्धवट बातमी चिटकू नका ना.

सोमनाथ खांदवे's picture

20 Jun 2018 - 5:51 pm | सोमनाथ खांदवे

हिंदू दहशतवाद आणि दिग्विजय चा वाद मीच नाय तर आख्या भारतातील नागरिकांना माईत हाये .ज्या येळी देश धर्मा चा इशय असतो त्या येळी कुठल्या बी लिंक ची गरज नाय पडत . कोण , कधी , काय बोलत व्हत हे पक्क डोक्यात आसत. त्यामुळ अर्धवट बातमी चिटकवाय चा काय संबंध च नाय .
पलटी पडायची सवय राजकारण्यांना असती , याच दिग्विजय ने who killed karkare बद्दल पुस्तक आजूबाजूला दोनचार दाढी वाले बसवून प्रसिद्ध केले व्हते इसरला का ?

डँबिस००७'s picture

20 Jun 2018 - 7:48 pm | डँबिस००७

हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसच्या लोकांनीच प्रचलित केलेला आहे. आताही प्रॉब्लेम नाही.
हिंदू दहशतवाद हा शब्द वापरत बसा , आणी भाजपाला हिंदु लोकांना काँग्रेसची खरी ओळख तरी करुन देता येईल.

अर्धवट बातम्या तुम्हीच चिकटवताय !!

दिग्विजय पुढे काय म्हणतोय !!
Digvijaya, appointed head of Congress Coordination Committee recently, is on a statewide Ekta Yatra in an effort to revive the party at the grassroots before the assembly polls, due in five months. On Saturday, he stirred the hornet’s nest by saying, “I have never said ‘Hindu terrorism’, I always used the term Sangh terrorism. No terror activity can be linked to religion because no religion supports terrorism.” Explaining the term ‘Sangh terror’, he told reporters, “Those accused in the Malegaon, Samjhauta Express and Mecca Masjid bomb blasts were influenced by Sangh ideology. RSS spreads violence, hatred and propagates terrorism.”
Two days later, speaking to a television channel, he reiterated his stand, saying: “All Hindu terrorists who were caught have links with RSS. Nathuram Godse, who assassinated Mahatma Gandhi, was also an RSS functionary. Their ideology spreads hatred, rears violence and from violence, breeds terrorism.”

विशुमित's picture

20 Jun 2018 - 11:29 pm | विशुमित

Hindu Terrorist who were caught आणि Hindu Terrorism मधील फरक कृपया समजून घ्या.
वाक्य आधी नीट वाचा मग अर्थ लावा.

manguu@mail.com's picture

21 Jun 2018 - 12:37 am | manguu@mail.com

मी आर्मित जाणार , असे बोललो / लिहिले होते म्हणे , कुठे कधी त्याची पोस्ट कुणीच देत नाही आहे ,

तसेच हेही

नुसता कांगावा.

सुबोध खरे's picture

21 Jun 2018 - 1:30 am | सुबोध खरे

तुमच्या दशावतारातील कोणत्यातरी अवतारात तुम्हाला लष्करात मिळणाऱ्या सुविधांबद्दल जळजळ झाली होती तेंव्हा मी तुम्हाला दिलेले खुले आमंत्रण होते. तेंव्हा तुम्ही म्हणाला होतात. कुठल्या अवतारात(कुठल्या आयडी मध्ये) ते माहीत नाही.
मुळात तुमच्या किती आय डी बॅन झाल्या आणि का बॅन झाल्या याचा विचार तुम्हीच करा.

manguu@mail.com's picture

21 Jun 2018 - 1:42 am | manguu@mail.com

तुम्ही निमंत्रण देणे आणि मी सैन्यात जाणार , असे मी बोलणे these are two different things.

just like , Hindu terrorists and Hindu terrorism

सुबोध खरे's picture

21 Jun 2018 - 9:57 am | सुबोध खरे

आम्हाला कोणी नोकरी देत नाही आणि एवढा पगार देत नाही म्हणून रडारड केली होतीत ना? मग ती कशासाठी?
मी आमंत्रण दिलं होतं? उगाच लष्करात मिळणाऱ्या सुविधांचा दुस्वास कशाला करायचा?
त्याच्या मागे असणाऱ्या वेदनांची तुम्हाला कल्पनाहि नाही.
नंतर जेंव्हा मी आमंत्रण दिलं तेंव्हा तुम्ही शेपूट घातली आणि आता शब्दांचा किस पाडतांय?
बंदुकीच्या नळीच्या मागच्या बाजूला उभे राहणे आणि समोर उभे राहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
हिंदू देवदेवतांबद्दल अनुदार उद्गार काढणे, शिवाजी महाराजांबद्दल मानहानी कारक उद्गार काढणे इ. सगळे धंदे करून झाले.
किती वेळा सांगून झाले "थुंकी या बोटांवरून त्या बोटावर करू नका". मिपा वरून अनेक वेळेस हाकलून झाले पण तुमची शेपूट वाकडी ती वाकडीच.
इथे पण काडी घालणे चालू आहेच
असो.
लष्करात नोकरीचे आमंत्रण अजूनही खुले आहे. उगाचच टीका करण्यापेक्षा भरती होऊन पहा.

manguu@mail.com's picture

21 Jun 2018 - 10:07 am | manguu@mail.com

जसे बाकीचे लोक नोकर्या करतात , तसेच तेही करतात , निरर्थक वाद घालायची इचछा नाही.

मला एकट्याला पाठवून काय होणार ? त्यांना पाठवा

सुबोध खरे's picture

21 Jun 2018 - 10:44 am | सुबोध खरे

रडारड आणि दुस्वास तुम्ही केला होता इतरांनी नाही.

डँबिस००७'s picture

21 Jun 2018 - 1:54 am | डँबिस००७

मुळात तुमच्या किती आय डी बॅन झाल्या आणि का बॅन झाल्या याचा विचार तुम्हीच करा.

त्या अवतारांची गणती त्यांची त्यांनाच नाही मग तुम्हाला कोठुन असणार ?
अहो विष्णुच्या दहा अवतारा बद्दल कुचाळक्या करणार्याला स्वताच्या अगणीत अवताराबद्दल स्वतःलाच माहीती नाही !

हिंदुना अतिरेकी

बाकी हिंदुना अतिरेकी ठरवुन ईथल्या काही लोकांना आनंद होत असेल, पण हिंदु आता जागा होत आहे आणी हिंदुना अतिरेकी ठरवणार्यांना त्यांची जागा दाखवुन दिलीच जाणार आहे. ज्या लोकांनी नकळत ह्या हिंदुना अतिरेकी ठरवण्याच्या मोहीमेला हातभार लावला व ज्यांच जमिर अजुनही जिवंत आहे ते आता समोर येत आहेत. ज्या उच्च अधिकार्यांनी सरकारी आदेशावर छोट्या अधिकार्यांना बेकायदेशीर काम करायला लावलीत त्यांना धडा शिकवायला पाहीजे ! चिदंबरम, दिग्विजय सिंग, मणी शंकर अय्यर, सलमान खुर्शिद , पवार, सुशिलकुमार शिंदे असले लोक हिंदुना अतिरेकी ठरवण्यात आघाडीवर होते.

स्वामी असिमानंद, कर्नल पुरोहीत, साध्वी प्रग्या ह्यांना जेल मध्ये अतोनात यातना दिल्या पण शेवटी ह्या लोकांना कोर्टाने सोडून दिल, पण त्या लोकांच जिवन बरबाद केल व हिंदु अतिरेकी आहेत ह्याचा मोठा ठप्पा जगात लागला. अमेरिकेतही हिंदुंना अतिरेकी समजण्यात यायला लागले. आता कोणी हिंदुंनी, हिंदुना अतिरेकी ठरवणार्या लोकांचा बंदोबस्त करायला पाहीजे !!

डँबिस००७'s picture

21 Jun 2018 - 1:35 am | डँबिस००७

" हिंदु अतिरेकी " ?? किती लोकांना पकडलय ? किती लोकांना फाशी दिलीय ?

जरा डोक वापरा !!

समझौता एक्सप्रेस मध्ये बाँब स्फोट करणार्या पाकिस्तानी अतिरेक्याला सोडुन हिंदु लोकांना अडकवलेल सर्व श्रुत आहेच !!
ज्या ईंस्पेक्टरने ह्या पाकिस्तानी अतिरेक्याला पकडले होते त्यालाच दबाव आणुन कस्टडीतुन सोडुन दिले, दबाव आणणारे सरकारी उच्च
अधिकारी आपली ड्युटी बजावत होते.

https://www.youtube.com/watch?v=-ZU5plZAz5Y

https://www.youtube.com/watch?v=inOnMFqFAtU

विशुमित's picture

20 Jun 2018 - 3:29 pm | विशुमित

डीएसकेप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांसह सहा जणांना अटक. यात डीएसकेंचे सीए सुनील घाटपांडे, अभियंता राजीव नवासकर यांचा पण समावेश.
मालकाच्या unethical वागण्यामुळे कर्मचाऱ्यांची पण ससे होलपट झाली.
मला तर सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे खासगी नोकरीतच पाहायला मिळत आहे. सरकारी नोकर उगाचच बदनाम आहेत.
....
https://www.loksatta.com/pune-news/eow-police-arrested-the-chairman-of-b...

चौथा कोनाडा's picture

21 Jun 2018 - 10:54 am | चौथा कोनाडा

मराठी माणूस मवाळ अन त्यांच्या पाठीशी राजकिय पाठबळ नाही म्हणुन मराठी माणसांनाच टारगेट केलं जातंय का अशी शंका येतेय.

विशुमित's picture

21 Jun 2018 - 11:58 am | विशुमित

मराठी माणसाला पाठिंबा देण्यापायी संपूर्ण सिस्टीमलाच दोष देण्यात अर्थ नाही.

चौथा कोनाडा's picture

21 Jun 2018 - 5:44 pm | चौथा कोनाडा

बरोबर आहे विशुमित,
.. ... पण All are equal but ... च्या चालीवर " But some are more targetable" असं असावं ?

विशुमित's picture

20 Jun 2018 - 4:48 pm | विशुमित

कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा राजीनामा.
कौटुंबिक कारण दिल्याने त्यांच्या निर्णयाचा आदर आहे.
पण इकडे देशासाठी लग्न न करणारे, संसार अर्धवट सोडणाऱ्यांबरोबर काम करून देखील लोक असा निर्णय का घेत असतील बरं?
====
https://www.loksatta.com/desh-videsh-news/arvind-subramanian-resigns-as-...

manguu@mail.com's picture

20 Jun 2018 - 5:12 pm | manguu@mail.com

छान निर्णय

हेमंत८२'s picture

20 Jun 2018 - 5:47 pm | हेमंत८२

एखाद्या विशिष्ट प्रकारचे लोक जे अनेक वर्षे बाहेर आहेत आणि ते इथे येऊन आपल्याला शिकवतात. आपल्या देशात लोक नाहीत का? काही काम करतात आणि ते पण पैसे घेऊन फुकट नाही. परत जाताना यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्याची आठवण येते. हे मनाला पटत नाही.

गब्रिएल's picture

20 Jun 2018 - 6:14 pm | गब्रिएल

कोना आदिकार्‍याच्या राजिनाम्याबद्दल बोल्ताना पंतप्रधानांच्या संबंद नसलेल्या खाजगी जीवनाबद्दल तीरके बोल्णे तुमच्या नितिनिय्मांत फिट्ट बस्ते ह्ये पाहूण मणोरंजण झाले.

एखांद्या असावध येळेला खोटं बुरखं फाडून पोटातलं खरं जळमट भायेर येतं त्ये आसं, बर्का =)) =)) =))

पर्वाचे आनंदीबेनजींचे भाषण काढून बघा. मनामधील सगळी जळमटे निघून जातील.
===
आमचं जे पोटात असते तेच ओठात पण असते.

manguu@mail.com's picture

21 Jun 2018 - 10:28 am | manguu@mail.com

आंनदीबाई बोलल्या - मोदी अविवाहित आहेत , तर जशोदाबाईंनी मोबाईल क्लिप वायरल केली की मोदी विवाहितच आहेत

कित्येक वर्ष स्वतः मोदीच स्वतःला अविवाहित म्हणऊन घेत होते.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/narendra-modi-married-me-he-is...

विशुमित's picture

21 Jun 2018 - 11:53 am | विशुमित

इसमें राज्यपाल आनंदी बेन महिलाओं से कह रही हैं- पूरी दुनिया जानती है, आपके बच्चे के लिए, आपके लिए उन्होंने विवाह नहीं किया, यह तो पता है न आपको।
---
आपके बच्चे के लिए, आपके लिए उन्होंने विवाह नहीं किया, यह तो पता है न आपको। --- हा मोठा कहर. स्वतः त्यांच्या पक्षाने नियुक्त केलेल्या राज्यपाल सार्वजनिक ठिकाणी त्यांचे गुणगान करत आहे आणि इकडे समर्थकांना त्यांच्या वैयक्तिक जीवनावर बोललेलं तिरकस वाटतंय.
अजब आहे..!

सोमनाथ खांदवे's picture

21 Jun 2018 - 12:16 pm | सोमनाथ खांदवे

यकच इशय किती चावताय राव !!!

त्यामुळे तुम्हाला काही समस्या आहे का ?
तसे काही असेल तर कृपया खासगीत बोला. मेन बोर्डावर अशी वैक्तिक चर्चा बरोबर वाटत नाही. इतरांना त्याचा त्रास होऊ शकतो.
===
संपादक मंडळ तुम्ही पण खांदवे साहेबांना मिपाचे मार्गदर्शक तत्वे समजावून सांगावे ही विनंती !

गब्रिएल's picture

21 Jun 2018 - 7:24 pm | गब्रिएल

कायकी बा. तुमचं सारकं सारकं संपादक मंडळला, ह्ये करा त्ये करा, आसा आदेश देनं बगून तुमचं बी "१० जनपथ"वर आफिस हाय का काय आसंच वाटाया लागलं बगा ! लै भारी वट व्हती बगा त्या आफिसाची =))

सोमनाथ खांदवे's picture

21 Jun 2018 - 9:46 pm | सोमनाथ खांदवे

न्हाय ! न्हाय !!
त्यांचं जॉर्ज बुश च्या 9 / 11 च्या फ्येमस डॉयलॉग सारख आसतंय ' YOU'RE EITHER WITH US , OR AGAINST US ' .

प्रसाद_१९८२'s picture

20 Jun 2018 - 6:38 pm | प्रसाद_१९८२

तिकडे जम्मू-काश्मिर मध्ये तत्वाचा हवाला देत भाजपा, J&K सरकार मधून बाहेर पडली आता गेली तीन वर्षे राजीनामे खिषात घेऊन फिरणारी व यापुढे स्वबळावर निवडणुक लढवून पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल असे म्हणणारी शिवसेना सत्तेतून बाहेर कधी पडते ते पाहायचे.
---
मला वाटले कालच्या वर्धापन मेळाव्यात काही राजकिय भूकंप होईल कि काय, पण कसले काय. शिवसेनेच्या मेळाव्यात पुन्हा एकदा शिवाजी महारांजापासून ते औरंगजेब, अदिलशहा, अफजल खान इत्यादी सर्व आले मात्र भुकंप काही झाला नाही. हि शिवसेना इतिहासातून वर्तमानात कधी येणार तेच कळत नाही.

manguu@mail.com's picture

21 Jun 2018 - 1:10 pm | manguu@mail.com

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एका दांपत्याला पासपोर्ट देण्यासाठी धर्म बदलण्यास सांगणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. दांपत्याने या प्रकरणात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. आता परराष्ट्र मंत्रालयाने लखनऊच्या पासपोर्ट कार्यालयाला उत्तर देण्यास सांगितलं आहे. तसंच, हे प्रकरण अंगाशी येताना दिसल्यानंतर रिजनल पासपोर्ट ऑफिसरने कर्मचाऱ्याची चुकी मान्य केली असून दांपत्याला पासपोर्ट जारी केला आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत एका महिलेने पासपोर्ट कार्यालयात धर्माच्या नावाखाली अपमान केल्याचा आरोप केला होता. एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं असल्याने आपला अपमान करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला होता, त्यांनी यासंबंधी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि प्रधानमंत्री कार्यालयाला ट्विट करत तक्रारही केली होती.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/hindu-muslim-couple-gets-passp...

खरे तर त्याला नोकरीतून काढूनच टाकायला हवे.

सोमनाथ खांदवे's picture

21 Jun 2018 - 1:26 pm | सोमनाथ खांदवे

मंगुशेठ चे जिव्हाळ्याच्या इशय हाये , हिंदू मुलीचे मुस्लिमा बरोबर लग्न !

सोमनाथ खांदवे's picture

21 Jun 2018 - 5:39 pm | सोमनाथ खांदवे

मग तीने मुस्लिम धर्म लग्नाच्या वेळेस का नाही स्वीकारला ? का दोन्ही धर्माचे फायदे तीला घ्यायचे होते ? किंवा त्या अनिस सिद्दीकी ने हिंदू धर्म का नाही स्वीकारला ? पासपोर्ट अधिकाऱ्याने चौकशी केल्याने तो अडकला .

मेघपाल's picture

21 Jun 2018 - 6:03 pm | मेघपाल

असले प्रश्न विचारण्याचा कुणालाही अधिकार नाही.

सोमनाथ खांदवे's picture

21 Jun 2018 - 6:08 pm | सोमनाथ खांदवे

आधिकर नाय वो शंका ईचारल्या व्हत्या .

वर्तमानपत्रातील बातम्या वाचून आपले मत प्रदर्शित करण्याअगोदर त्यातील किमान सत्य काय हे जाणून घ्यायची कुणालाच गरज वाटत नाहीये?
परवा वाकडी गावात दोन दलित मुलांना सवर्णांनी बेदम मारहाण केली आणि नग्न करून धिंड काढली म्हणून सगळे पुरोगामी/ सेक्युलर/ बुद्धिवादी इ इ ऍट्रॉसिटी कायदा लावा म्हणून कावकाव करत होते. त्यात कोणताही सवर्ण नव्हता अनि वस्तुस्थिति संपूर्ण पणे वेगळी आहे हे नंतर लक्षात आले. त्यानंतर हे बोकड गप्प आहेत.
अर्धवट माहितिवर बोंबाबोंब करायची सवयच झाली आहे.
यानंतरही लोक शिकायला तयार नाहीत हेच आश्चर्य आहे.

सोमनाथ खांदवे's picture

21 Jun 2018 - 8:32 pm | सोमनाथ खांदवे

आपल्या भारतात आसले प्रश्न इचरायचे नाही आस तुमी म्हनता तर पाकिस्तान चा जिग्री दोस्त चीन मदी बुर्कां बंदी ,दाढी वाढवायला बंदी , देशहीतकारक वागण कम्पलसरी ह्ये चालत?

सोमनाथ खांदवे's picture

21 Jun 2018 - 8:37 pm | सोमनाथ खांदवे

ही प्रतिक्रिया मेघपाल यांना व्हती ती चुकून खरे साहेबांकडे गेली

खरे तर त्याला नोकरीतून काढूनच टाकायला हवे.

का ? तुम्ही म्हणताय म्हणुन ? काही पुरावा आहे ?

Mishra defended the questions he asked of the couple saying he was just following procedure
The passport officer denied he discriminated based on religion.
He also said the woman had a different name on her 'nikahnama' compared with her other documents

काही तरी बातम्या ईथे चिकटवुन द्यायच्या हेच काम आहे वाटतय !!

खरे तर त्याला नोकरीतून काढूनच टाकायला हवे.

काही चौकशी पुरावा इ असते कि नाही.
एका महिलेने तक्रार केली कि काढून टाकले सरकारी नोकरीतून असं नसतं इतकी मूलभूत माहिती आपल्याला नसावी इतका आंधळा द्वेष

का मोंगलाई लागून गेली आहे.

https://timesofindia.indiatimes.com/india/lucknow-passport-officer-defen...

हे असे बेताल वक्तव्य करण्यापूर्वी आपण त्याला दुसरी बाजू असू शकते वगैरे काही लक्षात घेणे आवश्यक आहे.

manguu@mail.com's picture

21 Jun 2018 - 7:23 pm | manguu@mail.com

https://www.thequint.com/news/india/married-women-never-had-to-change-na...

कुणाचे खरे अन कुणाचे खोटे .... ??? !!!

लोकसत्ता ची च ही बातमी , सकाळी त्या बातमी वर विश्वास ठेवून अधिकाऱ्याला नोकरीवरून कमी करण्याचा सल्ला तुम्ही दिला होता , आता या बातमीवरून त्या दोघांवर सरकारी कामात अडथळा सारखा सौम्य गुन्हा (देशद्रोह नाही ) नोंदवण्याचा सल्ला द्याल का ?
आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्याला द्वेषपूर्ण वागणूक दिल्याचा आरोप असलेल्या लखनौच्या पासपोर्ट अधिकाऱ्यानं आपली काहीही चूक झाली नसल्याचा व आपण केवळ नियमांची अमलबजावणी करत असल्याचा दावा केला आहे. विकास मिश्रा असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याची लखनौमधून गोरखपूरला बदली करण्यात आली आहे. हिंदू पत्नी व मुस्लीम पती असलेल्या या दांपत्याने मिश्राविरोधात तक्रार केली, ट्विट केलं आणि देशभरात यावर उलटसुलट चर्चा घडल्या. परराष्ट्र खात्यानं याची दखल घेत मिश्रांची बदली केली तसेच या दांपत्याला पासपोर्टही दिला.

मात्र आता मिश्रा यांच्या सांगण्यानुसार पत्नीचे नाव निकाहनाम्यावर वेगळे होते व अन्य कागदपत्रांमध्ये वेगळे होते त्यामुळे मी जास्त पुरावे देण्याची मागणी केली. लग्नानंतर महिलेनं नाव बदललं पाहिजे किंवा तिच्या पतीनं हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे असं आपण बोललेलोच नाही असंही मिश्रा यांनी म्हटलं आहे. तन्वी सेठ व अनास सिद्दिकी या जोडप्याच्या सांगण्यानुसार मिश्रा यांनी असं म्हटलं की, "माझ्या फाइलमध्ये मी मुस्लीम व्यक्तिशी लग्न करूनही माहेरचं नाव ठेवल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे." त्याचवेळी लग्नानंतर नाव बदलायला हवं असा सल्लाही मिश्रांनी दिल्याचं सेठ म्हणाल्या. त्यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे या घटनेची ट्लिट करून तक्रारही केली.

https://twitter.com/tanvianas/status/1009353189852958720

मिश्रा यांनी ही चुकीची माहिती असल्याचं आज सांगितलं आहे. निकाहमान्यावर शाझिया अनास असं नाव होतं, परंतु कागदपत्रं भरताना तिनं नाव बदललं नसल्याचं सांगितलं. मी तिला निकाहनाम्यावरील नाव पासपोर्टवर देण्यास सांगितलं ज्यास तिनं नकार दिला, परिणामी मी तिला वरिष्ठांकडे पाठवल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे. कुठल्याही प्रकारे धार्मिक भेदभाव आपण केला नसल्याचे ते म्हणाले. मी स्वत: आंतरजातीय विवाह केला असून सर्व धर्मीयांचा मी आदर करतो असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मिश्रा यांची बदली करण्यात आली असून त्यांना कारणे दाखवा नोटिसही बजावण्यात आली आहे. लखनौ येथील कार्यालयाकडूनही परराष्ट्र खात्याने अहवाल मागवला आहे.

हा सगळा प्रकार बुधवारी तनवी सेठ यांनी ट्विट केल्यानंतर सुरू झाला. अनासचं नाव घेऊन चारचौघांदेखत आपला अपमान केल्याचा आरोप तन्वी यांनी मिश्रा यांच्याविरोधात केला आहे. अनास यांचा पासपोर्ट नूतनीकरण करायचा असल्यास त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा असं मिश्रा म्हणाल्याचं तनवी ट्विटमध्ये म्हणाल्या.

manguu@mail.com's picture

21 Jun 2018 - 10:35 pm | manguu@mail.com

परराष्ट्र खात्यानं याची दखल घेत मिश्रांची बदली केली तसेच या दांपत्याला पासपोर्टही दिला.

मिश्राचे म्हणणे असे की - निकाह नाम्यावर नाव भिन्न होते व ती जुन्या म्हणजे हिंदू नावाने अर्ज करत होती , पासपोर्ट नाकारायला हे खरोखरच valid reason असते , तर त्याप्रमाणे अर्ज रीतसर Reject करता आला असता व लेखी rejection लेटर देता आले असते , पण त्याऐवजी हे कसली चरचा करत होते कुणास ठाऊक.

पासपोर्टच्याच हायर ओथॉरिटीने काही तासातच तीच document , त्याच अर्जावर म्हणजे हिंदू नाव स्वीकारून पासपोर्ट दिला , म्हणजे मिश्राचे reason legally valid नव्हते , तरीही मिश्रा कदाचित अज्ञानाचा बळी असू शकेल

आजकालचे cc TV ऑडिओ व्हिडीओ दोन्ही रेकॉर्ड करू शकतात , असे क्यामेरे आजकाल अगदी फडतूस कंपनीतही असू शकतात , paasport office लाही कदाचित असतील ,