चालू घडामोडी - जून २०१८

Primary tabs

manguu@mail.com's picture
manguu@mail.com in काथ्याकूट
12 Jun 2018 - 7:03 pm
गाभा: 

भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे.

भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे.

भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.

भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती.

भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया

सोमनाथ खांदवे's picture

12 Jun 2018 - 10:22 pm | सोमनाथ खांदवे

काय प्रतिक्रिया द्यायची बुवा ? असा सगळ्यांना प्रश्न पडलेला दिसतोय .
भय्युजी महाराज यांनी कला ,क्रीडा ,उदयोग आणि व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रातील गोरगरिबांना संसारातून मोक्षा कसा साधावा याबद्दल मार्गदर्शन केले . देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो .
वाद होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे .

manguu@mail.com's picture

13 Jun 2018 - 2:02 am | manguu@mail.com

शांती मुस्लिम ख्रिश्चनमध्ये असते. कारण पुन्हा जन्म नाही

हिंदूंच्यात सद्गती मिळो , असे म्हणायचे असते . म्हणजे पुन्हा नव्या गतीला सुरुवात होणार असते.

( शांती मिळो , हे इंग्रजी rest in peace चे हल्ली वापरले जाणारे भाषांतर आहे , जे हिंदू धरमाला अपेक्षित नाही. )

विशुमित's picture

13 Jun 2018 - 8:01 am | विशुमित

Value Addition.

शांती मुस्लिम मध्ये असते? मग ते ७२ काय प्रकार आहे? मुस्लिम अतिरेक्यांना मरणानंतर काय मिळते ?

मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक जेंव्हा "rest in peace" म्हणतात तिथे आपल्या थडग्यांत शांतीने राहा असे अभिप्रेत असते. कारण ख्रिस्ती धर्मांत जीजस जजमेंट डे ला परत येऊन सर्व मृतांना जिवंत करणार आहे आणि त्यांना अनंत काळ पर्यंत स्वर्गांत किंवा नरकात पाठवणार आहे. इस्लाम मध्ये तसेच होईल ज्याला ते कयामत का दिन म्हणतात.

Rest हा स्वर्गांतील किंवा नरकात रेस्ट नसून थडग्यांतील रेस्ट आहे. म्हणूनच ह्या धर्मांत पुरतात जाळत नाहीत त्याशिवाय आपले कॉफिन आरामदायक आहे कि नाही, शरीरावर व्यवस्थित कपडे वगैरे आहे कि नाही ह्याची काळजी घेतात.
आमच्यांत काय लावली आग आणि झाले मोकळे.

७२ कुमारिका ह्या कयामत के दिन के बाद. तोपर्यंत सारे टोणगे थडग्यांत.

manguu@mail.com's picture

15 Jun 2018 - 12:29 am | manguu@mail.com

हेच लिहिणार होतो

सुबोध खरे's picture

13 Jun 2018 - 9:56 am | सुबोध खरे

माझ्या मर्यादित ज्ञानानुसार आत्म्यास शांती म्हणजेच मोक्ष मिळो असा अर्थ आहे. सद्गती म्हणजे परत पुनर्जन्म.
हिंदू धर्मात आत्म्याचे अंतिम स्थान पुनर्जन्म नव्हे तर मोक्ष आहे.
या उलट ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या "शरीरास" कयामत च्या दिवसापर्यंत कोणी त्रास देऊ नये यासाठी "रेस्ट इन पीस" RIP म्हटले जाते.

इथे भय्यू महाराजांविषयी सुरस कथा सापडतील :

१. http://www.vikrantjoshi.com/2018/04/blog-post_18.html
२. भानगडबाज भय्यू : http://www.vikrantjoshi.com/2018/02/blog-post_18.html
३. विकृत भय्यू : http://www.vikrantjoshi.com/2018/02/blog-post_9.html
४. सासू - सून भांडणं : http://www.vikrantjoshi.com/2017/11/blog-post_13.html
५. लफडेबाज भय्यू : http://www.vikrantjoshi.com/2017/04/blog-post_27.html
६. (लेडीज) बारकरी भय्यू : http://www.vikrantjoshi.com/2017/04/blog-post_28.html

एकंदरीत भोंदूगिरी नडली. स्वत:ला , नातेवाईकांना आणि आजुबाजूच्यांना पण.

भय्यू महाराजांना शांती लाभो. तूर्तास बोलण्यासारखं काही नाही.

-गा.पै.

अनिरुद्ध.वैद्य's picture

13 Jun 2018 - 6:11 pm | अनिरुद्ध.वैद्य

सुरस तर काहीच नव्हतं. नेहमीचे जे बुवालोकांबद्दल ऐकु येतं त्यापेक्षा वेगळं नव्ह्त!

कपिलमुनी's picture

13 Jun 2018 - 10:23 pm | कपिलमुनी

अरेरे ! एका कोणत्याही संदर्भाविना लिहिलेले ब्लॉग संदर्भ म्हणून वापरणाऱ्याची कीव येते.

देवेंद्र फडणविसांनी श्रद्धांजली वाहतांना भय्यू महाराजांना सेवाभावी म्हंटलंय : https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/bhaiyyu-...

नाईलाज असतो नाही एकेकाचा ?

-गा.पै.

सोमनाथ खांदवे's picture

13 Jun 2018 - 9:45 am | सोमनाथ खांदवे

गा. मा .पैलवान ,
शालजोडे मस्त लावताय राव तुमी .
तुम्ही दिलेली माहिती खूप रोचक होती . बुवा , बाई आणि पुढारी एकत्र आले की कलियुग सुरु झाले म्हणून समजा . बुवा लोकांना कुठलाही पक्ष वर्ज्य नाही , हे काँग्रेस चे खंदे समर्थक होते . शिवराज सिंह यांनी त्यांना मंत्रपद ऑफर केले व भय्यु महाराजांनी नाकारले . आता त्यांनी कुठल्या नैराश्यातून आत्महत्या केली हे देवालाच माहीत पण काँग्रेस चे प्रवक्ते सुरजेवाला यांना त्यात भाजप चा हात दिसला व सुरजेवाला नीं खाल्ल्या मिठाला जागून सी बी आई चौकशी ची मागणी केली .

सुरजेवाला नीं खाल्ल्या मिठाला जागून सी बी आई चौकशीची मागणी केली .

जबरदस्त !

विशुमित's picture

13 Jun 2018 - 5:21 pm | विशुमित

https://www.loksatta.com/manoranjan-news/akshay-kumar-close-to-rekha-bre...
"खिलाडी" करून करून भागला आणि आता देव पूजेला लागलाय..!
===
भोंदू संत गुरु बाबा नंतर (संधी)साधू हिरो लोकांचं तण लय जोमाने वाढत चाललंय.

चौथा कोनाडा's picture

20 Jun 2018 - 11:48 am | चौथा कोनाडा

विषय काय ? चर्चा काय अन लिंक कसली !
विशुमित, ह्ये असलं अक्षयकुमारचं लग्न अन (संधी)साधू पणाचा काय संबंध ?

भय्यू महाराजांच्या गोतावळ्यात अनुप राजूरकर नामे घोटाळेबाज : https://www.youtube.com/watch?v=GVMKiZ1CqLA

-गा.पै.

रच्याकने भय्यू महाराज जन्माने ब्राम्हण असते तर कशा प्रतिक्रिया आल्या असत्या? मी जातीयवादी नाहीय पण काहींनी ते गेल्या वर टीका केलीय जिवंत असताना नाही .

ट्रेड मार्क's picture

13 Jun 2018 - 8:41 pm | ट्रेड मार्क

एकीकडे म्हणताय मी जातीयवादी नाही आणि मग असला प्रश्न का विचारताय? मृत्यू झाल्यावर जात, धर्म वगैरे काही तरी राहतं का?

जिवंतपणी कोणी काय केलं हे नंतर सांगितलं जातंच. एखाद्या महाराज किंवा गुरु म्हणवणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या करावी हे जरा विचित्रच आहे असं नाही वाटत?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Jun 2018 - 12:48 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

दुर्दैवी घटना. चॅनेलसवरून तरी "कौटुंबिक कलह' असे म्हंटले जातेय.
एक प्रश्न नेहमी पडतो. लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना सत्ता राबवायला निवडून दिलेले असते, त्यांना अशा काय समस्या असतात की हे गुरू सोडवू शकतात? चॅनेलसवर पाहिले ते बघता भाजपा/कॉण्ग्रेस्/शिवसेना/राष्ट्रवादी... सगळ्याच राजकीय नेत्यांची त्यांच्याकडे उठबस असायची.

कपिलमुनी's picture

13 Jun 2018 - 10:24 pm | कपिलमुनी

पुरावे ना देता चिखलफेक करण्याची सवय जात नाही.

जोपर्यन्त जातीनिहाय जनगणना, आरक्षण वगैरे गोष्टी चालू आहेत तोपर्यंत असले निर्देश हास्यास्पद आहेत.

manguu@mail.com's picture

14 Jun 2018 - 9:38 am | manguu@mail.com

जातींमुळे आरक्षण निर्माण झाले की आरक्षणामुळे जाती ?

आरक्षण नव्हते तेंव्हाही जाती होत्या ना ?

मार्मिक गोडसे's picture

14 Jun 2018 - 7:48 am | मार्मिक गोडसे

https://www.google.com/amp/s/m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDL...
महाराष्ट्र सरकारची २०० कोटीची खिरापत.

manguu@mail.com's picture

14 Jun 2018 - 10:14 am | manguu@mail.com

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक नेते मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीने आरोपींकडून एक डायरी जप्त केली आहे. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेते गिरीश कर्नाड, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिक बी. टी. ललिता नाइक, निदुमामिडी मठाचे प्रमुख वीरभद्र चन्नामल्ला स्वामी आणि सामाजिक कार्यकर्ते सी. एस. द्वारकानाथ आदींच्या नावांचा समावेश आहे. या सगळ्यांची नावे हिंदीमध्ये लिहीण्यात आली आहेत. मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर असणाऱ्या या व्यक्तींनी उघडपणे कट्टरवादी हिंदुत्वाच्याविरोधात भूमिका घेतली होती.
दरम्यान, एसआयटीने याआधी कर्नाटकातील विजयपूरा जिल्ह्यातील सिंधागीमधून २६ वर्षाच्या परशूराम वाघमारे याला अटक केली होती. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील त्याच्या भूमिकेबद्दल नंतर माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे एसआयटीने मंगळवारी सांगितले होते. वाघमारेनेच गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्याचा अंदाज आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसणारी व्यक्ती ही वाघमारेसारखी दिसणारी आहे. परशूराम वाघमारे हा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोमनाथ खांदवे's picture

14 Jun 2018 - 8:48 pm | सोमनाथ खांदवे

काही अतिउत्साही , हरामखोर कार्यकर्त्यां मूळे संपूर्ण भाजप बदनाम झाली हे ही तितकेच खरे आहे , दलितांना विवस्त्र करून मारहाण करणे , तथाकथित गोरक्षकांनी मुस्लिमांचे मुडदे पाडणे या घटनांचे कोणीही समर्थन करू शकत नाही . या असल्या वागण्यामुळे भाजप ने केलेले चांगली कामे झाकोळून गेली आहेत . भाजप चे नेते या घटना नियंत्रित करू शकले नसल्यामुळे 2019 ची निवडणूक भाजप आणि त्यांचे उधळलेले कार्यकर्ते यांना जड जाणार हे निश्चित .

जेम्स वांड's picture

15 Jun 2018 - 5:51 pm | जेम्स वांड

भाजप नेते जातीय समीकरणे ते पॉलिटिकली करेक्ट बोलणे सगळ्या कसरती नीट सांभाळतायत (कित्येक माध्यमे अन माध्यमकर्मी विरोधात असतानाच) मात्र स्वघोषित भक्त त्या सगळ्याचं मातेरे करून टाकतात.

असो.

प्रसाद_१९८२'s picture

14 Jun 2018 - 3:25 pm | प्रसाद_१९८२

भारत देशाच्या भावी पंतप्रधानांचे एक जबरदस्त भाषण. सर्वांनी जरुर ऐकावे असे.
-----

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2018 - 4:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

राहून गांधी यांनी, "व्यंगचित्रकारांना जास्तित जास्त काळ सतत व्यस्त ठेवण्याचा" जागतिक विक्रम करण्याचा विडा उचलला आहे, असे म्हणायला बराच वाव आहे. :)

manguu@mail.com's picture

14 Jun 2018 - 5:23 pm | manguu@mail.com

जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोहल्याचा राग आल्याने तीन मातंग तरुणांना विवस्त्र करून पट्ट्याने बेदम मारहाण केली गेल्याची धक्कादायक घटना तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. आता उत्तर प्रदेश-बिहार आणि महाराष्ट्रात काय फरक राहिला?

मार्कस ऑरेलियस's picture

14 Jun 2018 - 8:47 pm | मार्कस ऑरेलियस

पिण्याच्या पाण्याच्या तलावात पोहणे ही चुकच ! सदर पोहणारे कोणत्याही समाजचे असले तरी त्यांना फोकळुनच काढले पाहिजे ! इथे आपल्या पिण्याच्या पाण्यात कोणी बोटे बुडवली तर आपल्याल्ला ते पिववत नाही , मग अखंड माणुस पोहलेले पाणी पिववेल का ?

जातीचा उल्लेख अनवश्यक !

मिपाने कोणत्याच जातीचा उल्लेख मिपावर होवु नये ह्या साठी ठोस धोरण केले पाहिजे !

त्या विहिरीत तेरा मुले पोहत होती. त्यांपैकी तीन मुलांना वेगळे काढून पट्ट्याने बेदम मारहाण केली गेली. महाराष्ट्रात तीर्थात लघुशंका करणे चालते. पण कुणी विहिरीत पोहले तर चालत नाही. येथे मारहाणीची तीव्रता, धिंड काढणे, गुन्हा नोंदवू नये म्हणून दबाव आणणे इत्यादी पाहता जात्याधारीत तिरस्कारभावना अशा अत्याचारांमागे असण्याखेरीज दुसरे कुठले सबळ कारण सकृतदर्शनी सापडत नाही. मध्यंतरी हिमाचल प्रदेशात एका शिक्षकाने दलित विद्यार्थ्यांना गोठ्यात बसवले आणि बाकीच्यांना घरात. तेव्हा त्या कृतीचेही असेच समर्थन केले गेले की सर्वांना बसवण्यास पुरेशी जागा नव्हती. समाजात कुठल्याही जातीधर्माविषयी इतरांमध्ये कसलीही घृणा असणे, तिरस्काराची भावना असणे हे सर्वांगीण सामाजिक सलोख्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. एव्हढेच नव्हे तर समाजाच्या व देशाच्या आर्थिक उन्नतीकरितादेखील ते घातक आहे.

बाकी मिपावर कुठल्याही जातीचा उल्लेख न होऊ देणे हे शक्य असेल की नाही माहीत नाही, पण स्वतःपुरती ही जात नामक हीनता संपवणे हे ज्याच्यात्याच्या हातात आहे.

मार्कस ऑरेलियस's picture

14 Jun 2018 - 10:20 pm | मार्कस ऑरेलियस

त्या विहिरीत तेरा मुले पोहत होती. त्यांपैकी तीन मुलांना वेगळे काढून पट्ट्याने बेदम मारहाण केली गेली.

असे असेल तर त्या तेरा च्या तेरा पोरांना फोकळुन काढले पाहिजे , मोजक्या तिघांनाच मारत असतील तर ते चुकीचेच आहे ! पण म्हणुन मी त्याचा निषेध करणार नाही , उर्वरीत दहा जणांना का रट्टे दिले नाहीत ह्याचाच निषेध केला पाहिजे !

बाकी मुद्द्यांवर चर्चा करुन मुळ मुद्दा डायलुट करणे टाळत आहे !

ठारच मारायची होती पोरं. जिवंतच ठेवायला नव्हती पाहिजे. जगण्याचा हक्कच कशाला पाहिजे? माणूस म्हणून जगू पाहणं हे तर भलतंच! छे छे! घोर अपराध!

मार्कस ऑरेलियस's picture

14 Jun 2018 - 10:51 pm | मार्कस ऑरेलियस

हे असले पराचा कावळा करणारे प्रतिसाद देऊन तुम्ही स्वतःची बाजु अजुन कमकुवत करीत आहात !
तुम्हाला हॉटेलात वेटर ने पाण्याच्या ग्लास मध्ये बोटं बुडवुन पाणी आणुन दिले तर तुम्ही ते प्याल का ? कोणीही सुजाण मनुष्य पिणार नाही ! मग ते बोटे बुडवणार्‍याची जात कोणतीही असो !
पिण्याचा पाणवठा स्वच्छ ठेवावा , पिण्याच्या पाण्यात पोहु नये हा अत्यंत सर्वसामान्य संकेत आहे ! पाणी दुषित करणार्‍यांना शिक्षा ही झालीच पाहिजे ! पिण्याचे पाणी दुषित करणार्‍यांना तर १००% झाली पाहिजे . मग ते कोणत्या का जातीचे असेनात ! उगाच जातीपातीचा मामला त्यात मिक्स करु नका !

उगाच जातीचा अहंकार डोळ्यावर ओढुन सामान्य ज्ञानाला फाटा देणार असाल शुभेच्छा च :)

मी माझी बाजू आता केव्हाच सोडून दिली आहे हो मार्कसभौ. मी तुमचीच बाजू उचलून धरतो आहे. तुम्ही म्हणालात की अशा 'फोकलीच्यांना' मार दिला पाहिजे. मी त्यापुढे जाऊन म्हणतो की त्यांना पुन्हा तसा गुन्हा करण्याची संधीच द्यायला नको. मारूनच टाकूयात. संपला विषय. आले मुले पळवणारे की मारा. गोमांस खाल्लं, मारा. अजून काय? इकडेच कशाला, जागतिक स्तरावर प्रश्न नेऊ - केली अमुक धर्मग्रंथाची तथाकथित विटंबना, मारा. ही कारणे निमित्तमात्र असतात हो. खरे कारण हे मानसिकता आहे. कसली मानसिकता? तर द्वेषाची आणि वर्चस्वाची मानसिकता. मग ते कुठल्याही जातीधर्माचे, समाजाचे, देशाचे, प्रांताचे लोक असोत. माणसेच माणसांमधीलच इतर घटकांना परके मानत राहतात, केवळ धर्म-जात-वर्ण आणि अशाच अनेक चित्रविचित्र कारणांपायी. मूळ मुद्दा हा आहे. केवळ जातीयतेच्या चष्म्यातूनही पाहायचं म्हटलं तरी कधी उघड तर कधी छुपी अस्पृश्यता आहेच. ही किती भयानक बाब आहे आणि गावपातळीवर एकांड्या घरटी असणाऱ्या निम्न व दुर्बल घटकाला अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची साधी हिम्मत करणे हे किती भीतीदायक असू शकते हे वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळणार नाही. माझ्या फिल्डमध्ये माझा अशा आणि इतर अनेक प्रकारच्या अन्यायग्रस्तांंशी नेहमीच संबंध येतो. आपण शहरात राहतो, आपल्याला वाटतं की सगळं आलबेल आहे. तसं नाहीये.

येथे कुठेही वैयक्तिक काही वाटून घेऊ नये. पण हा प्रश्न, ही खदखद, हा असंतोष कुठेतरी व्यक्त झाला पाहिजे, समजून घेतला गेला पाहिजे. अन्यथा पुनरेकवार सांगतो की एक अखंड समाज म्हणून आणि त्यापुढे जाऊन मानवजात म्हणून आपलं भवितव्य धूसर दिसते आहे.

इत्यलम.

समीर गायकवाडची आजची पोस्ट वाचून मला या बातमीचे डिटेल्स कळले. अवघड आहे सगळंच .....

===
ही किती भयानक बाब आहे आणि गावपातळीवर एकांड्या घरटी असणाऱ्या निम्न व दुर्बल घटकाला अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची साधी हिम्मत करणे हे किती भीतीदायक असू शकते हे वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळणार नाही. >> +१.

माझ्या फिल्डमध्ये माझा अशा आणि इतर अनेक प्रकारच्या अन्यायग्रस्तांंशी नेहमीच संबंध येतो. आपण शहरात राहतो, आपल्याला वाटतं की सगळं आलबेल आहे. तसं नाहीये. >> तुमचे वर्क एथिक्स कंप्रोमाईज न करता तुम्ही याबद्दल अधिक लिहू शकता का?

मी हा प्रतिसाद कितीवेळा लिहिला आणि डिलीट केला असेल! नाही लिहू शकत. फक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा घटना घडतात आणि समाजाच्या सर्व स्तरांत पीडित असतात, असू शकतात. जास्त सांगता येणे शक्य नाही.

एमी's picture

16 Jun 2018 - 2:02 am | एमी

ठीक. समजू शकते.

मार्कस ऑरेलियस's picture

15 Jun 2018 - 9:39 pm | मार्कस ऑरेलियस

हेच ते पराचा कावळा करणे म्हणातात ना ते !

साधा मुददा आहे कि प्यायच्या पाण्याच्या विहिरित पोहुन ते प्रदुषित करावे की नाही ? जो प्रदुषित करतो त्याला गुन्हेगार मानुन काही शिक्षा व्हावी की नाही ?
आणि इथे तुमच्यासार्खी सुशिक्शित लोकं जर ह्या विषयाचा विपर्यास करुन त्याला जातीय रंग देत असतील तर खरेच ही काळजी करण्यासारखीच परिस्थीती आहे ! मारुन टाका काय अन गोमांस काय अन धर्मग्रंथांची विटंबना काय ? कुठला विषय कुठे नेता ? त्याला काही ताळतंत्र ?

आमच्या कास तलावात पुर्वी लोकं बियर पिऊन झाली की बाटल्या फेकायची , आता कोणी फेकतना दिसले तर त्याला चोपच मिळेल
महादरे तलावाचे पाणी प्याय्ला वापरतात , त्यात पोहाय्ला नगरपरिषदेनेच बंदी केली आहे , आणि ५० एक लाख खर्च करुन संपुर्ण कंपाऊंड करुन घेतले आहे , शिवाय येथे कोणी पोहतना आढळल्यास त्वरित पोलिसांना संपर्क करा असा स्पष्ट बोर्ड ही लावलेला आहे !
फुटक्या तळ्याचे पाणी प्याय्ला वापरत नसल्याने त्यात पोहाय्ला परवानगी आहे पण तिथेही साबण वापराय्ला आणि कपडे धुवायला सक्त मनाई आहे , एकदा एक जण कपडे धुताना दिसलेला तर मंदिराचा मॅनेजर हातात काठी घेवुन त्याला चोपायला पळालेला मी स्वतःच्या डोळ्याने पाहिला आहे !

इतके दिवस मी स्वतःदेखील आमच्या पवनामाई मध्ये कोणी ही काही टाकताना दिसला कि तिथल्या तिथे झाडायचो , मग तो पिंड किंवा कसलास प्रसाद टाकणारा भडजी असो कि निर्माल्य टाकणारा कोणीतरी भाविक असो कि अन्य कोणीही असो ! मी स्वतः घरच्या गणापतीचे विसर्जन घरी केले होते, तेही केवळ एकवीताचा अन १००% मातीचा गणापती असुनही !!
हे माझे गाव आहे , माझा देश आहे , माझी पवनामाई आहे , तिला प्रदुषित करायचा कोणालाही अधिकार नाही अशी ठाम श्रध्दा होती पण आता तुमचे प्रतिसाद वाचुन माझे डोळे उघडले आहेत . काही विशिष्ठ समाजाच्या लोकांना पाणी प्रदुषित अन अन्य काहीही कराय्ची परवान्गी असावी असा जो काही तुमचा अ‍ॅटीटुड आहे तो माझ्यासाठी खरेच धक्कादायक आहे ! इथुन पुढे नदीत कोणीही काहीही टाकतान दिसले तर आधी त्याचे आडनाव विचारेन अन त्या नुसार ठरवेन की त्याला आडवाय्चहे की नाही !

पाणी प्रदुषित करु नये असे सामान्य ज्ञानाचा संकेत आव्हेरुन त्याला जातीय रंग दिला जात असेल अन चक्क चक्क चुकीचे समर्थन केले जात असेल तर पुनरेकवार सांगतो की एक अखंड समाज म्हणून आणि त्यापुढे जाऊन मानवजात म्हणून आपलं भवितव्य धूसर दिसते आहे.

इत्यलम.

ट्रेड मार्क's picture

15 Jun 2018 - 10:00 pm | ट्रेड मार्क

ती विहीर ज्याची आहे त्याचं आडनाव जोशी आहे असं समजल्यावर, ब्राम्हण समजून माध्यमांनी लगेच जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न केला. पण नंतर उघडकीला आलं की जोशी म्हणजे गोसावी जोशी, जे भटक्या विमुक्त जमातीमधील आहेत.

या दोन आधीच्या बातम्या - बातमी १ आणि बातमी २ बघा. ज्यात म्हणलंय गावातील उच्चवर्णीय लोकांनी मारहाण केली

नंतर जेव्हा कळले की मारहाण करणारे गोसावी जोशी आणि त्याचा कामगार लोहार उच्चवर्णीय नाहीत तेव्हा मग मात्र समस्त पुरोगामी जमात वाळूत डोके खुपसून बसली.

बादवे, या घटनेचे इतरत्र आणि अगदी इथे मिपावर भांडवल करणाऱ्यांपैकी कोणी प. बंगाल मध्ये मारल्या गेलेल्या दलित (पण भाजप कार्यकर्ते) तरुणांसाठी एवढी सहानुभूती दाखवली नाही. अगदी पुरोगामी वृत्तपत्रांमधील बातम्यांमध्ये पण ते दलित असल्याचे सांगणे टाळले गेले.

मार्कस ऑरेलियस's picture

15 Jun 2018 - 10:15 pm | मार्कस ऑरेलियस

हा हा हा.

हे म्हणजे आगदीच हा सुर्य अन हा जयद्रथ सारखे झाले :)

पण नंतर उघडकीला आलं की जोशी म्हणजे गोसावी जोशी, जे भटक्या विमुक्त जमातीमधील आहेत.

=))))

आता बघु एस साहेब "चुकीच्या बाजुचे चुकीच्या मुद्द्याचे समर्थन केले" म्हणुन मान्य करतात की तेच स्वतःचे घोडे दामटत रहातात तें !

आता पाहु खरे पुरोगामित्व जिंकते की स्वमतांध दांभिकता !

- एस रावांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत ....

वेल, आपल्या प्रतिसादांंची घसरती भाषा पाहून वाईट वाटलं. असो.

मारहाण करणारे कोणत्या जातीचे आहेत हे पाहण्यात मला रस नाही. मी प्रतिसाद दिला तेव्हाच ते अमुक भटक्या विमुक्त जमातीचे लोक होते हे माहीत होते. तेव्हा, केवळ तथाकथित उच्चवर्णीय-दलित असा हा वाद मी निर्माण करतोय हे चित्र केवळ चुकीचेच नाही, तर अत्यंत खोडसाळ आहे. शिवाय, ज्या व्यक्तींना माझी परखड आणि संतुलित मते माहीत नाहीत त्यांनी मला अमुक एका कॅटेगरीत ढकलावे ह्याचे मला आश्चर्य अजिबात वाटत नाही.

मूळ मुद्दा पुन्हा मांडतो. समाजातील कुठल्याही घटकामध्ये इतर कुठल्याही घटकाबद्दल कसलीही असहिष्णुता निर्माण होणे हे तुम्हां व्यक्तींना समर्थनीय वाटते का? चला, आपण असता विचार करूयात की तुम्ही समजा 'क्ष' आहात, आणि अमुक 'य' प्रकारच्या व्यक्तींविषयी तुमच्या मनात केवळ ते 'क्ष' नाहीत ह्या कारणाने घृणा आहे. आणि 'य' व्यक्तींनी काहीतरी कृत्य केले ज्यामुळे तुम्हांला त्यांचा प्रचंड राग आला. इतका राग आला, की त्यांना बेदम मारहाण करण्याची तुमची इच्छा झाली व समाज, कायदा इत्यादींना न जुमानता तुम्ही अमानुष पद्धतीने त्यांना तुमच्या मर्जीप्रमाणे 'शिक्षा' केली. हे कितपत समर्थनीय आहे?

ही एक घटना, किंवा केरळमध्ये रास्वसं च्या कार्यकर्त्यांची हत्या असो वा प. बंगालमध्ये आधी डाव्या आणि सध्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांची दहशत असो, वा बिहारमध्ये रणवीरसेनेचा धुमाकूळ असो वा काश्मीरमध्ये दहशतवाद आणि त्यांना समर्थन देत दगडफेक करणारे तरुण असोत, वा पुण्यात अमुक एक भागात आडनाव पाहून खोल्या भाड्याने देणारे असोत, वा त्यांच्याविरुद्ध प्रति-द्वेषाने पछाडलेले त्यांच्या मुलींविषयी घाणेरड्या कॉमेंट करणारे लोक असोत, वा लव्ह जिहादवाले असोत, वा अन्य कोणीही असोत. या अशा घटनांमध्ये, किंवा प्रवृत्तींमागे अशा प्रकारचा द्वेष व तिरस्कार दडलेला असतो ज्याचा वैयक्तिक त्या-त्या व्यक्तींचा तसा स्वतःचा काहीच संबंध नसतो. 'क्ष' ला 'य' किंवा 'य' ला 'क्ष' केवळ तो 'क्ष' किंवा 'य' नाही ह्या कारणावरून परका, कमी दर्जाचा, शत्रू किंवा तिरस्करणीय वाटू शकते, हे वास्तव धक्कादायक का वाटत नाही कोणाला?

मी कोणाही अमुक समाजगटाचं समर्थन करत नाही किंवा त्यांच्या कुठल्याही अशा कृत्यांकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करत नाही. दलितांचा द्वेष करणारा उच्चवर्णीय किंवा उच्चवर्णीयांचा द्वेष करणारा दलित, दोन्हींना मी तेथल्या तेथे सुनावण्यास मागेपुढे पाहत नाही. आरएसएस असो वा बामसेफ, भाजप असो वा लाल बावट्यावाले, कॉंग्रेस असो वा शिवसेना, तुम्ही कल्पना करू शकत असलेल्या सर्व वर्तुळांंतल्या सर्व प्रकारच्या माणसांशी मी समानपणे वागतो. त्यातल्या कुणीही कसलाही दांभिकपणा केल्यास तो त्यांच्या तोंडावरच दाखवून देत 'आय डोन्ट हेट इन प्ल्यूरल' याचा खरा अर्थ सांगणे ह्याला म्हणतात खरा पुरोगामीपणा.

अजून कोणाला काही चिखलफेक करायची आहे का माझ्यावर?

मार्कस ऑरेलियस's picture

15 Jun 2018 - 11:44 pm | मार्कस ऑरेलियस

दोन प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत :

१) पाणी प्रदुषित करणार्‍यांना जात पाहुन कमी अधिक शिक्षा किंव्वा संपुर्ण माफी करावी का ?

२) ही पहा : पुरोगाम्यांचे महाआघाडीचे स्वयंघोषित नेते रागा ह्यांची प्रतिक्रिया : हे देखील मारहाण करणारे सवर्ण होते असे बेमालुन ठोकुन देत आहेत , ह्या विषयी तुमचे काय मत आहे ?
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/rahul-gandhis-comment...

मी कोणाही अमुक समाजगटाचं समर्थन करत नाही किंवा त्यांच्या कुठल्याही अशा कृत्यांकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करत नाही असे तुम्ही म्हणाता खरे पण सुरुवातीला दिलेला तुमचा प्रतिसाद अन त्यात कैच्याकै संबंध नसतना केलेला गोमांस वगैरे उल्लेख एका विशिष्ठ गटाला टारगेट करणाराच होता !

शिवाय सांप्रत काळ एकदम बायनरी क्लासिफिकेशन्चा असल्याने तुम्ही पुणेरी पगडी घालता कि फुले पागोटे ह्यावरुन ठरणार आहे तुम्ही कोणत्या कंपुत आहात ते , त्याला नाईलाज आहे !

तुम्ही माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. :-)

मार्कस ऑरेलियस's picture

16 Jun 2018 - 12:27 am | मार्कस ऑरेलियस

मी आधीच दिलीत उत्तरे : पाहिजे तर परत देतो :
इतका राग आला, की त्यांना बेदम मारहाण करण्याची तुमची इच्छा झाली व समाज, कायदा इत्यादींना न जुमानता तुम्ही अमानुष पद्धतीने त्यांना तुमच्या मर्जीप्रमाणे 'शिक्षा' केली. हे कितपत समर्थनीय आहे?
>>> तेरा जणां पैकी केवळ तीन जणांना जात पाहुन बाजुला काढुन मारहाण केली हे चुकीचेच आहे ! १००% चुकीचे ! तेराच्या तेरा जणांना फोकलुन काढायला हवे होते !

'क्ष' ला 'य' किंवा 'य' ला 'क्ष' केवळ तो 'क्ष' किंवा 'य' नाही ह्या कारणावरून परका, कमी दर्जाचा, शत्रू किंवा तिरस्करणीय वाटू शकते, हे वास्तव धक्कादायक का वाटत नाही कोणाला?

>>>> हे धक्कादायक आहेच . कोण्याही जीवाचा न घडो मत्सर | वर्म सर्वेश्वर पुजनचे || किंव्वा
जे जे भेटे भूत | ते ते मानिजे भगवंत | हाचि भक्तीयोग निश्चित | जाण माझा || असे म्हणणार्‍या महान संतांच्या परंपरेचा वारसा आम्ही सांगत असताना कोणी केवळ जन्मावरुन , जातीवरुन परका कमी दर्जाचा , तीरस्करणीय वाटत असेल तर ते धक्कादायकच आहे !
माणुस त्याच्या वागणुकीवरुन परका , कमी दर्जाचा अन तीरस्करणीय ठरत असतो . माझ्या लेखी माझ्या पवनामाईचे पाणी प्रदुषित करणारे परके , कमीदर्जाचे अन तीरस्करणीय आहेत ! दुसर्‍या कोणाच्या लेखी त्याच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोहणारे तिरस्करणीय असु शकतात.

अजुन काही प्रश्न आहेत का? मजा येत आहे प्रश्नोत्तरे खेळायला . आत तुम्ही उत्तरे द्या माझ्या प्रश्नांची !!

( अवांतर : बाकी ते आडनाव पाहुन खोली भाड्याने देणे किंव्वा नाकारणे मला एकदम योग्य वाटते . मला सुकट बोंबिलचा वास आवडत नाही , परतलेल्या कांद्याचा वास आवडत नाही , मासाळीचा वास आवडत नाही , मटण चिकन, चा वास घरात आवाडत नाही , दुर्दैवाने/ सुदैवाने ह्या गोष्टी नित्यनेमाने खाणार्‍या लोकांना आडनावावरुन ओळखता येते , तत्स्मात माझ्या शेजार्‍यांनी ह्यांना फ्लॅट भाड्याने देवु नये असा माझा कायम आग्रहच असेल ! दिलाच तर त्याला कोणते वास आवडत नाहीत हे शोदुन काढुन त्याच्या घरात ते वास येतील ह्याची सोय करेन !
बाकी ज्याल कोणाला वरणाचा , ईंद्रायणी भातचा , पुरणपोळीचा वास आवडत नसेल त्यांनी मला घर भाड्याने देण्यास नकार दिला तर माझी त्याला हरकत नसेल ! )

मला डाव्यांची आणि उजव्यांची सारखीच अॅलर्जी आहे ;-) तेव्हा प्रतिसाद जास्तच उजवी-उजवीकडे जाऊ लागल्यास मला टंकाळा येतो. :-) असो.

तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मीही दिले आहे. तुम्ही म्हणता मारा. मी अजून थोडे पुढे जाऊन म्हणतो की मारून टाका. तुमचीच बाजू उचलून धरतो आहे. काय म्हणता?

'दूरितांचे तिमिर जावो'. येथे दूरित हे अत्याचारित व अत्याचारी दोन्ही अर्थांनी आणि तिमिर हे अन्याय व अन्याय करण्याची मानसिकता ह्या दोन्ही अनुक्रमे अर्थांनी अधिक व्यापक. मानवजातीतील 'नॅरो डोमेस्टिक वॉल्स' गळून पडोत हेच पसायदान मागतो.

मार्कस ऑरेलियस's picture

16 Jun 2018 - 1:13 am | मार्कस ऑरेलियस

हा हा हा

मी अजून थोडे पुढे जाऊन म्हणतो की मारून टाका.

हेच ते , हाच तो अतिशयोक्तीयुक्त उपरोधिक प्रतिसाद ! कितिही झाले तरी पोरांनी पिण्याच्या पाण्यात पोहुन पाणी प्रदुषित केले अन त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी हे तुम्ही मान्यच करायला तयार नाहीये ह्यावरुनच कळायचं ते कळतं लोकांना ! आणि मग ह्या "मला डाव्यांची आणि उजव्यांची सारखीच अॅलर्जी आहे " असल्या पोकळ वाक्यांना अर्थ उरत नाही ! तुम्हाला डाव्या उजव्यांची अ‍ॅलर्जी नाही तर " पिण्याच्या पाण्यात पोहल्याने ते पाणी प्रदुषित होते , त्यातुन साथीचे रोग पसरु शकतात" ह्या सामान्य ज्ञानची अ‍ॅलर्जी आहे ! बाकी काही नाही !

आता बासच , हे घ्या , फुले पागोटे देऊन तुमचा सत्कार करण्यात येत आहे !

बादवे, राहुल गांधी हे आपल्या देशाचे नेतृत्त्व करण्यास बौद्धिकदृष्ट्या पात्र नाहीत असे माझे मत आहे. काँग्रेसची घराणेशाही आणि गांधी घराण्याव्यतिरिक्त इतर नेतृत्त्व कुजवायची काँग्रेसी प्रवृत्ती ही घातक आहे.

आणि या घटनेबाबत - या घटनेचं कुठल्याही प्रकारे राजकारण करणारे हे फक्त स्वतःची पोळी भाजून घेत असतात. त्यांचा निषेध.

पुणेरी पगडीचा वाद - शरद पवारांची एक धूर्त राजकीय खेळी. भाजपचे हिंदुत्वाचे ध्रुवीकरण आणि पवारांचे ब्राह्मणेतर जातीय ध्रुवीकरण यात काहीच फरक नाही. सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने दोन्ही वाईटच. मला व्यक्तिशः पुणेरी पगडी, शिंदेशाही पगडी, फुले-धाटणीचे मुंडासे, गांधी टोपी, फेटा, उपरणे, इत्यादी सर्व पारंपरिक वेशभूषा आवडतात. आणि त्यावरून माझी जात किंवा कंपू शोधू पाहणाऱ्याची मला कीव येते.

ट्रेड मार्क's picture

16 Jun 2018 - 1:22 am | ट्रेड मार्क

जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोहल्याचा राग आल्याने तीन मातंग तरुणांना विवस्त्र करून पट्ट्याने बेदम मारहाण केली गेल्याची धक्कादायक घटना तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. आता उत्तर प्रदेश-बिहार आणि महाराष्ट्रात काय फरक राहिला?

यात तुम्ही "मातंग" असा एकाच जातीचा उल्लेख केलात. या ऐवजी जर कोणाचीच जात पुढे न आणता फक्त `एका "क्षुल्लक" गोष्टीवरून २ व्यक्तींनी २ तरुणांना मारहाण केली' असं साधं सरळ म्हणून किंवा मार खाणाऱ्यांबरोबर मार देणाऱ्यांची पण जात "भटके विमुक्त" म्हणून लिहिली असतीत तर एवढा मोठा प्रतिसाद आणि स्वतःचे समर्थन करण्याची वेळच आली नसती नाही का? वर आणि त्यात "मारहाण करणारे कोणत्या जातीचे आहेत हे पाहण्यात मला रस नाही." असं म्हणताय! मग मार खाणाऱ्यांची जात पाहण्यात का बरं रस उत्पन्न झाला?

नंतर म्हणताय दुसऱ्या कुठल्या जमातीचा द्वेष करणाऱ्यांना तुम्ही लगेच फटकारता, रास्वसं, भाजपच्या कार्यकर्त्यांची केवळ द्वेषावरून हत्या झाली, याविरोधात मिपावर किंवा इतर कुठे तुम्ही जाहीर निषेध व्यक्त केलाय का? असल्यास माझ्या या प्रतिसादाखाली त्याचा पुरावा द्या... आणि "त्यातल्या कुणीही कसलाही दांभिकपणा केल्यास तो त्यांच्या तोंडावरच दाखवून देत 'आय डोन्ट हेट इन प्ल्यूरल' याचा खरा अर्थ सांगणे ह्याला म्हणतात खरा पुरोगामीपणा." हे जागीच सिद्ध करून टाका. काय म्हणता?

एस's picture

16 Jun 2018 - 3:32 am | एस

अवश्य.

https://www.misalpav.com/comment/959133#comment-959133

हा प्रतिसाद व त्याआधीचे प्रतिसाद जरूर पहा. कम्युनिस्ट गुंडगिरी मी फार जवळून पाहिली आहे. केवळ हेच नाही, तर इतरत्रही रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्त्यांचा मी निषेधच केला आहे. एक डॉ. म्हात्रे की आणखी कोणाचा प्रतिसाद होता. आणि त्याखाली मी अशा राजकीय हत्त्यांचा निषेध केला होता. अर्थात मिपावर किती प्रतिसाद कुठे दिलेत यावरून कुठल्या गोष्टीची सिद्धता तपासायला जाणे हेच हास्यास्पद आहे.

बादवे, पहिल्या मुद्द्याबद्दल. मार खावा लागलेल्याची जात प्रतिसादात सांगणे आणि मारणाऱ्याची जात न सांगणे हा प्रकार मुद्दामच केला नाही कारण जातीभेद हा केवळ उच्चवर्णीयांकडून दलितांवर होतो असे नाहीये. जात ही एक फार मोठी उतरंड आहे. प्रत्येक जात ही इतर कोणत्याही जातीपेक्षा खाली किंवा वर आहे. पण बरोबरीला नाही. त्यामुळेच जाती-आधारित द्वेष ही कुण्या एका समाजघटकाची मक्तेदारी नाही. हे वास्तव आहे. हे नीट समजून घ्या. वरील घटनेला चिकटपट्टी लावून टाका. आणि अशाच स्वरूपाची इतर कुठलीही घटना घ्या ज्यात कृत्रिम भेदभावांच्या आधारे तीव्र द्वेषभावनांचे दर्शन घडले आहे. आणि मग, त्या अनुषंगाने वाटल्यास माझ्या मुद्द्यावर पुन्हा विचार करून बघा.

शुभेच्छा.

ट्रेड मार्क's picture

16 Jun 2018 - 4:13 am | ट्रेड मार्क

त्या धाग्यातील तुमचा पहिला प्रतिसाद बघा.

त्याखालील इतर प्रतिसाद पण सरकारच्या (मोदी) नावाने नावे ठेवणारेच आहेत. समस्त पुरोगामी मंडळींना याची खात्री होती की मोदी, भाजप आणि रास्व संघ या सगळ्या हत्यांमध्ये आहे. आणि मग नंतर गापै चा प्रतिसाद बघा, ज्यावर तुम्ही उपरोक्त प्रतिसाद दिला आहे. अश्या प्रत्येक घटनेत पुरोगाम्यांकडून केवळ मोदी, भाजप आणि रास्व संघ हे तीन आणि हिंदू यांना दोष दिला जातो आणि मग जेव्हा सत्य समोर येते तेव्हा मग "मी नाही त्यातला" असे प्रतिसाद येतात, यात काही नवं नाही.

बादवे, सध्या आपण मिपावरच बोलतोय त्यामुळे येथील प्रतिसाद दाखवा असेच म्हणायला लागणार. तुम्हाला बाकी कुठले काही दाखवून सिद्ध करायचे असेल तर माझी हरकत नाही.

माझ्यामते सदर घटनेत जातीचा काही संबंध नसावा. त्यांच्या वैयक्तिक मालकीच्या विहिरीत, ज्याचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते, हि मुले पोहायला लागली. पोहू नका असे सांगून, दम देऊनही ऐकत नव्हती त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. आता हा वादाचा मुद्दा होऊ शकतो की किती मारहाण करावी, कपडे काढणे कसे चुकीचे आहे वगैरे. पण मुळात आपल्याला तिथे काय झालं आपल्याला माहित नाही, कशावरून त्या मुलांनी उलट उत्तरं दिली नसतील. सांगून सुद्धा ती मुलं "बघू तू काय करतो" असं म्हणून उचकवत असतील तर त्या क्षणी रागात काहीही होऊ शकतं. त्याला जातीय रंग द्यायची काहीच आवश्यकता नाही.

तुमच्या या धाग्यावरील मूळ प्रतिसादावरून तसे वाटले म्हणून इतके प्रतिसाद झाले... नाहीतर तुम्ही कुठल्या बाजूचे याने मला असा काय फरक पडणार आहे!

पिलीयन रायडर's picture

14 Jun 2018 - 10:52 pm | पिलीयन रायडर

नै तर काय.. कुणीही काहीही केलं की सगळ्या गावाला त्यांना पार विवस्त्र करून वाट्टेल तितकं मारायची मुभा मिळतेच, घटनेत लिहिलं आहे तसं. कायदा वगैरे भास आहेत. नै तरी तिथे न्याय मिळत नाहीच, मग आम्ही केला न्याय तर बिघडलं कुठे?? आणि जातीयता वगैरे क्षुल्लक मुद्दे मध्ये आणू नका. तसं काही नसतंच आणि असलं तरी पिण्याच्या पाण्यात पोहणे ह्या घनघोर गुन्ह्याहून मोठं नसतं.

प्यायच्या पाण्याच्या विहीरीत हि मुलं पोहायला जायची. कित्येकदा हटकलं तरी ऐकायची नाहि. शेवटी त्यांना चोप मिळाला. हि सरळ सरळ मारहाणीची केस आहे. त्याला जातीयवादाचा रंग दिला मिडीयाने. दुर्दैवाने भारतात अजुनही बर्‍याच वेळा अशाच मार्गाने समस्या सोडवल्या जातात... मग ते रस्त्यावरचे अपघात असो, बेकायदा वीज/पाणी जोडणी असो, किंवा दान-धर्माचं बक्षीस आपल्या पदरात पाडणं असो.

दिवसेंदीवस ३६इंची छाती सरकारला घेरण्याचं तंत्र आहे हे.. आणि सरकार त्याला बळी पडतय.

अर्धवटराव's picture

15 Jun 2018 - 8:34 pm | अर्धवटराव

प्रॉस्टीट्युशनचं नाहि बे.. प्रेस्टीट्युशन म्हणतात त्याला

हरवलेला's picture

18 Jun 2018 - 8:39 am | हरवलेला

३६ नाही हो, ५६!

आर्य व वैदिक संस्कृती अस्सल भारतीयच – पुरातत्व खात्याचं नवं संशोधन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/arya-and-vedic-era-is-indigeno...

असले संशोधन पुण्याच्या कुठल्या गल्लीबोळात तयार होते आणि नागपूरमार्फत दिल्लीला कसे पोचते हे आम्हाला ठाऊक आहे. लवकरच मूलनिवासी संघटना याचा पर्दाफाश करेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2018 - 11:31 am | डॉ सुहास म्हात्रे

आर्य व वैदिक संस्कृती अस्सल भारतीयच – पुरातत्व खात्याचं नवं संशोधन हे संशोधन नवीन नसून बरेच जुने आहे. तरीही वैयक्तिक व राजकिय स्वार्थासाठी "आर्यन इन्व्हेजन थियरी" जिवित ठेवण्याचा काही पाश्च्यात्य आणि भारतिय डाव्यांचा प्रयत्न आहे... हे सुद्धा काही गुपित नाही, कारण त्यांनीचे ते बर्‍याचदा अनवधानाने मान्य केलेले आहे.

मात्र, त्यासंबंधी नवनवीन पुरावे हाती येत असल्याने "आर्यन इन्व्हेजन थियरी" वाले सतत तोंडावर आपटत आहेत. जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या पुरातत्व शास्त्रज्ञांचे खालील व्हिडिओ वानगीदाखल देत आहे.

या पहिल्या व्हिडिओत "आर्यन इन्व्हेजन थियरी" ही एक कवीकल्पना होती आणि तिचे निर्माण व पुरस्कार का केला गेला याबाबत सखोल विश्लेशण आहे. सर्वच व्हिडिओ शांतपणे पाहणे रोचक होईल. गडबडीत असल्यास सुरुवातीला नुसती शेवटची १५ मिनिटे तर पहायलाच हवी...

ही दुसरी छोटी क्लिपसुद्धा बरेच काही सांगून जाते...

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2018 - 11:39 am | डॉ सुहास म्हात्रे

"आर्यन इन्व्हेजन थियरी डिबंक्ड" अशी जालावर आणि यु ट्युबवर विचारणा केल्यास, आर्य हे मूळ भारतिय लोकच होते, हे सिद्ध करणारी (जनुकशास्त्रासह ) शास्त्रिय संशोधनांची बरीच माहिती मिळेल.

सोमनाथ खांदवे's picture

14 Jun 2018 - 8:51 pm | सोमनाथ खांदवे

हा धागा भय्युजी महाराज बद्दल होता !

मार्कस ऑरेलियस's picture

14 Jun 2018 - 8:58 pm | मार्कस ऑरेलियस

धाग्याचे शीर्षक :

चालू घडामोडी - जून २०१८

च च ला काना चा , ल ल ला दुसरा ऊकार लू चालू म्हणजे current .
घ ड ला काना डा म म ला एक काना एक मात्रा मो, ड ड ला दुसरी वेलांटी डी , घडामोडी म्हणजे affairs
ज ज ला दुसरा ऊकार जू न नळातला न , जून - म्हणजे जून महिना
२०१८ म्हणजे ईसवी सन २०१८ , येशु ख्रिस्ताच्या जन्मानंतर २०१८ वर्षे झाली ते वर्ष !

अर्थात चालू घडामोडी - जून २०१८ म्हणाजे जुन २०१८ मधील करंट अफेयर्स !

=))))

सतिश गावडे's picture

15 Jun 2018 - 8:20 pm | सतिश गावडे

श्री (सोमनाथ खांदवे) गुरुजींचे मला बरोबर वाटते.

सोमनाथ खांदवे's picture

15 Jun 2018 - 8:56 pm | सोमनाथ खांदवे

ख्या ! ख्या !! ख्या !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2018 - 9:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

काडीबाज सगा ! पण सोखांपण भारी मुरलेले दिसत आहेत, त्यामुळे एक तीर (पक्षी समीधा) वाया गेला ! =))

manguu@mail.com's picture

14 Jun 2018 - 10:23 pm | manguu@mail.com

सुरुवातीच्या पोस्टमध्ये काहीतरी लिहावे लागते, नंतर इतर लोक इतर घडामोडी लिहितात

विशुमित's picture

15 Jun 2018 - 11:00 am | विशुमित

चालू घडामोडी - जून २०१८ हे नाव दिले ते बरे झाले. महिना निहाय घडामोडी शोधायला सोपे जाईल.
पूर्वीचे १ २ ३ आकड्यांमुळे प्रतिसाद लिहताना खूप गफलत होयची.

manguu@mail.com's picture

14 Jun 2018 - 11:38 pm | manguu@mail.com

स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा मिळणार; ६ महिन्यात प्रक्रिया पूर्ण होणार; अभ्यास करण्यासाठी उपसमिती
मुंबई:- देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीत तुरुंगात गेलेल्या बंदींना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा मिळणार असून त्यांना १० हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार असल्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला असताना मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल असे सांगितले. त्या पार्शवभूमीवर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून त्या कैद्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देऊन मानधन देण्याचा निर्णय झाला असल्याचे बापट यांनी सांगितले.
या विषयावर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
आणीबाणीत कैदी असलेल्या मिसाबंदीच्या संदर्भात मानधन देण्याचा निर्णय झाला असून उपसमिती नेमलीअसल्याचे बापट यांनी सांगितले. 2 महिन्यात या समितीचे काम पूर्ण होईल असे ते म्हणाले. तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात कमिटी याबाबत सर्वे करणार असल्याचे ते म्हणाले. याबाबत सगळे कामकाज 6 महिन्यात पूर्ण होईल तसेच यासाठी राज्याची एक कमिटी करणार असल्याचे बापट यांनी सांगितले.
या काळात जे लोक कैद किंवा मिसाबंदी होते ते जर मृत झाले असतील तर त्यांच्या पत्नींना मानधन देणार असल्याचे बापट म्हणाले. १९९५ साली त्यांना सन्मानपत्र दिले होते. 10 हजारापर्यंत मानधन देणार असून वर्षातून एकदा मेडिकल सुविधा देण्यासाठी एकदा 10 हजार देणार असल्याचे ते म्हणाले. राज्यभरात अडीच ते तीन हजार असे स्वातंत्र्यसैनिक असतील असे ते यावेळी म्हणाले.
मी आणीबाणीच्या काळात 19 महिने जेलमध्ये होतो. त्यावेळी मी टेलको कंपनीत काम करत होतो. मला हा लाभ मिळाला तर मी सामाजिक कामासाठी देणार आहे. या निर्णयासाठी उशीर झाला असला तरी चांगला निर्णय आहे.
गिरीश बापट, संसदीय कार्यमंत्री
मी स्वतः 13 महिन्यांचा बंदीवास भोगला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये आणीबाणीच्या काळात बंदीवास भोगलेल्यांना सन्माननिधी देण्यात येतो. महाराष्ट्रातील अनेक जणांनी 1975 ते 77 याकाळात आणिबाणी कालावधीमध्ये तुरुंगवास भोगला आहे. अशा व्यक्तींचा यथोचित सन्मान व गौरव करण्याचा निर्णय 40 वर्षांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री

आनन्दा's picture

15 Jun 2018 - 5:43 am | आनन्दा

आयला हे स्वर्गातून काम बघातायत की काय?

नको यार. असले काही तरी फालतू निर्णय घेऊ नका. भाजपवाल्यांनो बंद करा असले प्रकार. स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन म्हणजे केवढा मोठा घोटाळा आहे हे सर्वश्रूत आहे. अक्षरशः स्वातंत्र्य मिळताना ३-४ वर्षांचे असणारे काही काही तर महाभाग जन्मेअले नव्हते तेव्हासुद्धा स्वातंत्र्यसैनिक होते. हे असले फुकट वाटण्याचे धंदे म्हणजे भ्रष्टाचाराला आणखी एक कुरण उपलब्ध करून देणे आहे. आणि मुळातच, आपल्या देशाच्या घटनेच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी, हुकुमशाही प्रवृत्तीच्या सत्ताधार्‍यांच्या विरोधात आवाज उठवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, त्यासाठी बक्षिशी कसली वाटताय. आजिबात आवडला नाही हा प्रकार. :(

manguu@mail.com's picture

15 Jun 2018 - 10:10 am | manguu@mail.com

शिक्षण विभागाने काढले परिपत्रक (GR)_
६ मे २०१८ ते २० जुन २०१८ पर्यत सुट्टी ,
२१ June पासुन शाळा चालु.
रमजान ईद निमित्त केलेले बदल .

सर्वाना ईदच्या शुभेच्छा. मुलांना भरपूर ईदी मिळो

आज काढले का? आज तर पोरं शाळेत गेलीत.

manguu@mail.com's picture

15 Jun 2018 - 10:53 am | manguu@mail.com

अ

माहितगार's picture

15 Jun 2018 - 4:30 pm | माहितगार

( आपण म्हणता तसा स्वतंत्र जी आर असू शकेल नाही असे नाही) पण आपण उपलब्ध केलेले छायाचित्र बहुधा विनंती निवेदन असावे, शासन निर्णय म्हणजे जी. आर नसावा. असे प्रथमदर्शनी वाटते. चुभूदेघे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2018 - 11:42 am | डॉ सुहास म्हात्रे

रोचक माहिती : ब्रिटिश राजपुत्र विलियमचे पुर्वज भारतिय असल्याचा जनुकशास्त्रिय पुरावा...

manguu@mail.com's picture

15 Jun 2018 - 1:42 pm | manguu@mail.com

अतिक्रमणधारकांना सरकारी जमिनीवरुन हटवण्यासाठी तसंच महत्वाच्या प्रकल्पांना उशीर होऊ नये यासाठी राज्य सरकारने अतिक्रमण करणाऱ्या कुटुंबांना मोफत घर देण्याचा निर्णय घेतला आहे. जागा रिकामी व्हावी यासाठी त्यांना २६९ चौरस फुटांचं घर देण्यात येणार आहे. तसंच ज्या कुटुंबांना घर नको असेल त्यांना रोख रकमेचाही पर्याय उपलब्ध असणार आहे. घराची जितकी किंमत असेल तेवढे पैसे त्यांना देण्यात येतील.

जमीन लवकरात लवकर रिक्त व्हावी यासाठी ज्यांनी महापालिका क्षेत्रातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलं आहे, तसंच सरकारी नियमाप्रमाणे पुनर्वसनासाठी पात्र असतील त्यांना मोफत २६९ चौरस फुटांचं घर देण्यात येईल किंवा घराच्या किंमतीचे पैसे देण्यात येतील.

https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-governemnt-to-give-hous...

सोमनाथ खांदवे's picture

15 Jun 2018 - 3:47 pm | सोमनाथ खांदवे

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी (23 एप्रिल) रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये 'संविधान बचाव रॅली'ला संबोधित केलं. या रॅलीविषयी लोकांना माहिती देताना राहुल गांधींकडून चूक झाली. 'संविधान बचाव रॅली' विषयी ट्विट करून लोकांना माहिती देताना राहुल गांधी यांनी चुकीने 'संसद घेराव रॅली' असं ट्विट केलं. ट्विट करताना झालेली चूक लक्षात येताच राहुल गांधी यांनी काही वेळात ते ट्विट डिलीट केलं. व त्यानंतर 'संविधान बचाव रॅली'चं दुसरं ट्विट केलं.

सोमनाथ खांदवे's picture

15 Jun 2018 - 4:02 pm | सोमनाथ खांदवे

May 19, 2018
पंतप्रधानांचे राज्य असलेल्या गुजरातमधील हिंदू हे धर्मांधांच्या उद्दामपणामुळे असुरक्षित असतील, तर इतर ठिकाणच्या हिंदूंचा विचारही न केलेला बरा !

वडोदरा (गुजरात) – शहरापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या वाघोडिया येथे धर्मांधांनी रमझानच्या पहिल्याच दिवशी क्षुल्लक कारणावरून हिंदूंवर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून त्यात हिंदू आणि मुसलमान यांचा समावेश आहे. (धर्मांधांनी आक्रमण केल्यावर हिंदूंनी प्रतिकार करायचा नाही का ? ‘आम्ही हिंदूंचे रक्षण करणार नाही आणि त्यांनाही स्वतःचे रक्षण करू देणार नाही’, या वृत्तीचे हिंदुद्वेषी पोलीस ! – संपादक) त्यांच्यावर संपत्तीची हानी करणे आणि हिंसाचार करणे, हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

येथील वाघोडिया भागात सुट्या पैशांवरून हिंदु युवकांचा मुसलमान सोडा विक्रेत्याशी वाद झाला. रमझानचा पहिला दिवस असल्याने येथे मोठ्या प्रमाणात मुसलमान उपस्थित होते. त्यामुळे येथील वादानंतर धर्मांधांनी हिंसाचार चालू केला आणि त्याला हिंदूंनी विरोध केला. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

manguu@mail.com's picture

15 Jun 2018 - 8:27 pm | manguu@mail.com

पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारेनेच केल्याचा दावा आज याप्रकरणी चौकशी करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केला. गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी या तिघांची हत्या करण्यासाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आला होता, अशी महत्त्वपूर्ण माहितीही एसआयटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उजव्या विचारधारेसाठी काम करणारी एक कट्टरपंथी टोळी सक्रिय आहे. या टोळीकडूनच या तिन्ही हत्या घडवून आणण्यात आल्या. सुजीतकुमार उर्फ प्रवीण हा या टोळीसाठी भरती करायचा. त्याच्या चौकशीतच या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीत किमान ६० सदस्य सक्रिय आहेत. यातील अनेक जण सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत, असे या अधिकाऱ्याने नमूद केले. 
या टोळीत सनातन आणि हिंदू जनजागृतीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असला तरी या दोन संस्थांचा या हत्यांशी थेट संबंध आहे का, याबाबत अजूनतरी कोणतेही पुरावे आमच्या हाती लागलेले नाहीत, असे या अधिकाऱ्याने पुढे स्पष्ट केले. ही टोळी कोणत्याही नावाशिवाय सक्रिय असून उत्तर प्रदेशातही या टोळीचे जाळे पसरलेले आहे का, याचा तपास आम्ही करत आहोत, असे या अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. 

- गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येत साम्य असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या तिन्ही हत्यांसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल आणि त्यातील गोळ्या एकसारख्या होत्या, असे फॉरेन्सिक चाचणीत आढळून आले. तिन्ही हत्यांसाठी ज्या गोळ्या झाडण्यात आल्या त्याच्या मागील बाजूस एकाच प्रकारची खूण असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले. 

- गौरी यांच्यावर हल्ला करण्यात आला तेव्हा आणखी तीन जण तिथे मुख्य हल्लेखोरासोबत आले होते. 

- कोणालाही मागमूस लागणार नाही, अशा पद्धतीने ही टोळी हत्येचा कट रचते. हल्ल्याआधी रेकी करायची, ज्याची हत्या घडवून आणायची आहे त्याच्याबाबत संपूर्ण माहिती गोळा करायची आणि नंतर नियोजनबद्धपणे हत्या घडवायची, अशाप्रकारे या टोळीचे काम चालते. सहा महिने ते एक वर्ष आधी कट रचून त्यावर काम केले जाते, अशीही माहिती तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. 

- कन्नड लेखक प्रा. एस. भगवान यांची हत्या घडवून आणण्याची योजना या टोळीने आखली होती. मात्र, हा कट उधळला गेला. याप्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींनी त्याची कबुली दिली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

- गौरी लंकेश हत्येप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असून परशुराम वाघमारेची अटक निर्णायक ठरल्याचे सांगण्यात आले. 

https://m.maharashtratimes.com/india-news/parashuram-waghmare-killed-lan...

गामा पैलवान's picture

15 Jun 2018 - 11:17 pm | गामा पैलवान

च्यायला म्हणे गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी या तिघांची हत्या करण्यासाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आला होता.

कोणे एके काळी पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी हत्येतील पिस्तूल व गोळ्या समान होत्या.

गौरी लंकेश ची नव्याने हत्या झाल्यावर दाभोलकर सुटले आणि त्यांची जागा गौरी लंकेशांनी घेतली. बोंबला तिच्यायला. मस्त मनोरंजक संगीत खुर्ची चाललीये. (संपादित)

फक्त हे मनोरंजन हिंदुत्ववादी संघटनांवर शेकायला नको ! बस्सं, इतकंच !!

-गा.पै.

manguu@mail.com's picture

15 Jun 2018 - 11:29 pm | manguu@mail.com

सध्या काँग्रेस नाही , मोदीजींचे सरकार आहे

गामा पैलवान's picture

15 Jun 2018 - 11:31 pm | गामा पैलवान

कायदा व सुव्यवस्था राज्य सरकारची म्हणजे काँग्रेसची जबाबदारी असते.

-गा.पै.

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 12:24 am | manguu@mail.com

2 खून महाराष्ट्रात
2 खून कर्नाटकात

मारेकरी तेच असतील कदाचित

पण एकीकडे भाजपा राज्यसरकार , एकीकडे कोंग्रेस राज्यसरकार

कट्टरपंथी अडकले तर आता दोष कोणच्या सरकारला द्यायचा ?

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 12:29 am | manguu@mail.com

त्या गायकवाडचे काय झाले ?

आता हा वाघमारे आला . परशुराम वाघमारे , नावात परशु आणि आडनावात मारे , नाव आडनाव दोन्ही हिंसक आहे . !!!!

एकेक धर्मद्रोही मरू घातलेत हेच खरे अच्छे दिन.

इथे हा आयडी सरळसरळ धर्माधारीत दहशतवादाचे समर्थन करतो आहे. संपादकांनी नोंद घ्यावी. हेट स्पीचेसना आवर घालण्यासाठी मिपावर संपादकांनी आणखी सजग राहण्याची गरज आहे असे मला वाटते.
मी गामा पैलवान ह्या दहशतवादाला समर्थन करणार्‍या आयडीचा तीव्र निषेध करतो.

गामा पैलवान's picture

18 Jun 2018 - 12:42 pm | गामा पैलवान

पुंबा,

माझं वाक्य थोडं दुरुस्त करून परत सांगतो. ठळक शब्द दुरुस्तीचे :

एकेक धर्मद्रोही माफिया आपसांत मारामारी करून मरू घातलेत हेच खरे अच्छे दिन.

चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

सोमनाथ खांदवे's picture

15 Jun 2018 - 9:45 pm | सोमनाथ खांदवे

चालू घडामोडी मध्ये फक्त केंद्रीय सरकार विरोधातील बातम्या कॉपी पेस्ट करत बसणे यात कसलं आलंय ज्ञान ? भडकलेली काही डोकी हिंसाचार करत आहेत त्या मारहाणी मुळे हिरव्या गॉगल्स वाल्यानां आनंद झालाय . जो तो हिरव्या नजरेतून भाजपचं चुकाचं कुसळ शोधतोय आणि हेतुपुरस्सर काँग्रेस च मुसळ विसरतोय . त्यामुळे भाजप ने केलेली चांगली कामे दिसत नाहीत . 60 वर्ष ओरबाडून खाल्लेलं सोयीस्कर रित्या विसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दलितांना मारहाण करणारे चाबकाने फोडून काढून फासावर लटकवले पाहिजेत , त्या शिवाय हिरव्या गॉगल्स गॅंग जिलब्या घालायची बंद होणार नाही .

खांदवेसाहेब, केवळ मोदी सरकार हे दलितद्वेष्टे आहे हा शुद्ध दांभिक प्रचार आहे. काँग्रेसनेही काही वेगळे केलेले नाही. डाव्यांनीही नाही. तृणमूलसारख्यांनी नाही. बसपवगैरेंनीही नाही. दलित असो वा कुठल्याही समाजघटकांची स्थिती असो. ती तशीच राहण्यात सर्वच राजकीय पक्षांचा खरा स्वार्थ असतो. अन्यथा यांची दुकाने चालणार नाहीत. ध्रुवीकरण आणि संकुचित विचारसरणी हीच राजकीय पक्षांची खरी हत्यारे असतात.

ट्रेड मार्क's picture

16 Jun 2018 - 2:24 am | ट्रेड मार्क

मागे एकदा मिपावर "विशेष सूचना" जाहीर केली होती. त्या सूचनेचा परिणाम असा झाला की श्रीगुरुजी आणि अरुण जोशी यांसारख्या मोदी सरकार/ हिंदुत्व या बाजूने बोलणाऱ्यांनी मिपासन्यास घेतला. कारण त्यातून तसा अर्थ ध्वनित होत होता हे मी निदर्शनास आणून दिलं होतं. तेव्हा काही सन्माननीय सदस्यांनी मी कसा चुकीचा आहे हे दाखवायचा प्रयत्न केला होता आणि वर संमं विरोधात बोलतो म्हणून कांगावा सुद्धा केला होता.

अर्थात त्यानंतरच्या बऱ्याच धाग्यांमध्ये सरकारविरोधी म्हणा किंवा भाजप/ रास्वसं यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी आक्षेपार्ह म्हणता येतील असे बरेच प्रतिसाद दिले. परंतु आता त्यांचा दणकून प्रतिवाद करणारे कोणी उरले नाही. आणि परत कुठली "विशेष सूचना"ही आली नाही! असो.

हा लेख वाचा.

शतकानोशतके घडलेल्या घटनांवरून हे सिद्ध झालेले आहे की हिंदूच, किंबहुना हिंदूंमधलेच बहुसंख्य, स्वतःवर होणाऱ्या अत्याचारांसाठी कारणीभूत आहेत. हिंदूंना सहिष्णुतेचा आणि सेक्युलर असण्याचा इतका पुळका आहे की त्यांना इतर धर्मांकडून असलेला धोका लक्षातच येत नाही. बहुतांशी हिंदू मी कसा निधर्मी आणि पुरोगामी आहे हे दाखवण्यात इतके गुंग होतात की आपण विरोध कोणाचा आणि समर्थन कोणाचे करतोय हेच त्यांच्या लक्षात येत नाही.

एखादा देश लढाईशिवाय आपल्या अमलाखाली आणायचा असेल तर तिथल्या शिक्षणव्यवस्थेला अमलाखाली आणलं तर काम होतं. हा उपाय दीर्घ कालावधीचा आहे, पण कुठल्याही लढाईशिवाय १००% यशाची खात्री आहे. त्या जोडीला त्या देशातील वृत्तपत्र आणि न्यूज चॅनेल पण घेतले की मग कामच झालं.

आपल्याला शाळेपासूनच अकबर कसा महान होता आणि टिपू सुलतान कसा शूर होता हे शिकवलं जातं. औरंगजेब स्वतःच्या हाताने टोप्या (?) शिवून विकायचा म्हणजे तो किती साधा होता हे सांगितलं जातं. पण तेवढं चांगलं हिंदू राजांबद्दल शिकवलं जात नाही. सोशल मेडिया, वृत्तपत्र यामधून सुद्धा फक्त हिंदू इतर धर्मियांवर कसे अत्याचार करतात हेच गुऱ्हाळ चालू असतं. नाहीतर केवळ रेल्वेमध्ये सीटवरून झालेल्या मारामारीला जातीय रंग देऊन मुसलमान लोकांवर कसा अत्याचार होतो हेच दाखवत बसले नसते. दुसऱ्या बाजूला जेव्हा प्रशांत पुजारीची हत्या भर बाजारात मुस्लिम लोकांकडून केली जाते तेव्हा एक छोटीशी बातमी देऊन पुढे मौन पाळलं जातं.

जनगणनेप्रमाणे आत्ता जरी ७०% च्या वर हिंदू आणि ३०% च्या आसपास इतर धर्मीय म्हणले, तरी ७०% हिंदूंमधले ५०-६०% जरी स्वतःला निधर्मि/ पुरोगामी समजत असतील तर त्यांना या ३०% मुळे होत असलेला धोका दिसतच नाही. मग ते उर्वरित ४०-५०% हिंदूंना लोकांना नावे ठेवून गप्प बसायला भाग पाडतात. हे ३०% कधी डोईजड होऊन जातील हे आपल्याला कळणार पण नाही कारण ३०% चे ५०% व्हायला फार वर्ष लागत नाहीत.

याचे जिवंत उदाहरण म्हणजे युरोपातील देश आहेत. अमेरिकेतही काही फार बरी परिस्थिती नाही, बुरखाधारी आणि नुसती दाढीधारी (मिशी नसलेले) यांची संख्या वेगाने वाढते आहे. कॅनडा सारख्या देशात बऱ्याच दुकानात/ रेस्टॉरंट मध्ये आम्ही हलाल फूड विकतो असे बोर्ड लावलेले असतात. शाळांमध्ये पोर्क विकू नका एवढंच नव्हे तर इतर मुलांना डब्यातून आणायला पण बंदी करा अशी मागणी होते. एखाद्या भागात स्थलांतरित मुस्लिम लोकसंख्या वाढायला लागली की तिथून तिथले स्थानिक लोक तो भाग सोडून जातात. मग त्या भागात दुसऱ्या कुठल्या धर्माचा माणूस जाऊच शकत नाही.

जाऊद्या. काय बोलणार. जे जे होईल ते बघत राहावे, पण त्यांचा संपूर्ण कब्जा होईपर्यंत आपण काही जगणार नाही याचे समाधान मानावे का आपल्या मुलाबाळांचे कसे होणार याची काळजी करावी हाच गोंधळ सध्या आहे.

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 8:12 am | सोमनाथ खांदवे

च्यायला , मुस्कटदाबी लईच जोरात चाल्लीय म्हणायच . पंचाचा निर्णय अंतिम ह्ये मान्य पण कुस्ती स्परधा नीकोप झाली तर मजा येति नायतर आपला पैलवान पडायला लागला की गुणवान पैलवान ला सारख फाऊल द्यायचा आस मीपा च्या पंचांना शोभत का ?

हरवलेला's picture

19 Jun 2018 - 4:56 am | हरवलेला

+1

आनन्दा's picture

19 Jun 2018 - 2:59 pm | आनन्दा

खरे आहे. त्या सुचनेनंतर मिपावर लिहिण्यात रस उरला नाही. आता वेगळी चूल मांडावी की काय असे वाटू लागले आहे.

विशुमित's picture

19 Jun 2018 - 3:14 pm | विशुमित

नुसता द्वेषाने कोणतीच लढाई जिंकू शकत नाही. प्रेमाने जग जिंकलेली लाखो उदाहरणे सापडतील.
===
काल आमच्या येथील सोमेश्वर मंदिरात मामाच्या पोराने भंडारा ठेवला होता. पर्वा शिरखुमयाची किटल्या घरी येऊन देणारी त्याचे मित्र झाडून उपस्थित होते.
प्रेम वाटल्याने प्रेम मिळते आणि द्वेष वाटल्याने काय मिळणार ते प्रत्येकाने ठरवा.
===
भविष्याचा बागुलबुवा दाखवण्यापेखा भावी पिढीतील मुलाबाळांना प्रेम वाटायला शिकवा, त्यांचे आयुष्य सुखकर जाईल.
===
बाकी सगळ्या थेऱ्या प्रॅक्टिकली तंतोतंत शक्य होतातच असे नाही.

उजवीकडे गेलेली चर्चा वाचनाच्या सोयीसाठी डावीकडे आणत आहे.

पोरांनी पिण्याच्या पाण्यात पोहुन पाणी प्रदुषित केले अन त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी

अगदी बरोबर. शिक्षा व्हायला 'च' हवी. कुठली शिक्षा व्हायला हवी? आणि ती कोणी द्यायची?

बाकीच्या प्रतिसादास फाट्यावर मारण्यात येत आहे.

मार्कस ऑरेलियस's picture

16 Jun 2018 - 1:49 am | मार्कस ऑरेलियस

अगदी बरोबर. शिक्षा व्हायला 'च' हवी.

हुश्श ! येवढे मान्य केलेत ते ही खुप झाले :) पहिल्यांदा कोणत्या तरी स्वयंघोषित पुरोगामी माणसाला स्वतःचे म्हणणे बदलुन योग्य ते म्हणणे स्विकारताना पाहिले आहे , एकदम हायसं वाटलं !

कुठली शिक्षा व्हायला हवी? आणि ती कोणी द्यायची?

खाजगी पाण्याची विहीर असल्यास मालकानेच चार रट्टे द्यावेत , शिवाय पोरांचा कान पकडुन त्यांच्या पालकांकडे न्यावे , अन झालेला प्रकार सांगावा , अन मग पालकांनी पोरांची उत्तरपुजा बांधावी !
सार्वजनिक तलाव विहीर मालमत्ता असल्यास आपण केवळ चार शव्द सुनाऊ शकतो असे मी म्हणणार होतो पण एकुणच तुमचे प्रतिसाद पाहुन मत बदलले आहे ते असे : आपण १००% दुर्लक्ष करावे , तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे || हा अभंग आठवावा . केले प्रदुषित पाणी तर करु दे , आपलं काय जातंय असा विचार करुन अलिप्त रहावे ! चुकुनही चार शब्द समजावयाल जाऊ नये , पोलिस कंपलेंटचा तर विचारही करु नये , सदर पाणी प्रदुषित करणारी व्यक्ती कोणत्या तरी विशिष्ठ समाजाची असली तर आपल्यावरच केस दाखल करुन आपल्यालाच भोगायला लागु शकते ! सार्वजनिक पाणवठे विहिरी नद्या प्रदुषित झाल्या तर बिनधास्त होऊ द्यावे , आपण आपला हाय क्वालिटी वॉटर प्युरीफायर घरात लाऊन घेतला की विषय खलास !!

:)

ट्रेड मार्क's picture

16 Jun 2018 - 2:28 am | ट्रेड मार्क

एस भाऊंनी या प्रतिसादात पण बरोबर भूमिका घेतली आहे. तळ्यात मळ्यात चालू आहे की काय? कृहघ्या.

:-) मी कुठल्याही एका संकुचित विचारधारेला बांधील नाही हे पाहून मला बळेच त्यांची आवडती पगडी चढवून माझा सत्कार करत आपले आवडते/नावडते बनवू पाहणारे असेच अचंबित होतात. हे पाहून मजा येते.

बादवे, सत्कार म्हटलं की मला 'सरकारनामा' आठवतो. बाप रे! सांभाळून राहिलं पाहिजे. :-) :-) :-)

खाजगी पाण्याची विहीर असल्यास मालकानेच चार रट्टे द्यावेत , शिवाय पोरांचा कान पकडुन त्यांच्या पालकांकडे न्यावे , अन झालेला प्रकार सांगावा , अन मग पालकांनी पोरांची उत्तरपुजा बांधावी !

'चार रट्ट्यांची' तुमची व्याख्या नेमकी काय आहे? ह्या घटनेत नागवं करून पट्ट्याने बेदम मारहाण करून वर व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला गेला. ह्याला तुम्ही 'चार रट्टे देणं' म्हणाल का?

विचार करा, त्या पोरांचं वय कितीसं आहे. अशा कोवळ्या वयात झालेली मानहानी ते जन्मभर विसरू शकतील का? मानसशास्त्राचा तुमचा अभ्यास किती आहे ह्याची मला कल्पना नाही. पण ऐन तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांना आपल्या बहरू पाहणाऱ्या पौरुषत्वाची व आत्मसन्मानाची सर्वांदेखत इतकी मानखंडना होणं हे किती 'डिव्हास्टेटिंग' असू शकतं आणि त्याचा त्यांच्यावर होणार असलेला आयुष्यभराचा परिणाम फार भयानक असेल.

बाकी माझया प्रतिसादांचा वाट्टेल तसा अर्थ काढण्याच्या तुमच्या सवयीला सलाम!

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 8:23 am | सोमनाथ खांदवे

मंडळी वार जाग्यावर सोडा , आता स्पश्ट झालय त्या मारहाणीत मराठी व ब्राह्मण या पैकी कुणीच नाय . राहुल गांधी ( आदर दिला पायजे बाबा ! कदाचित व्हईल सुदा पंतपरधान ) नेहमी परमाणे तोंडावर पडले त्यांना बी वाटल व्हत या केस मदी ब्राह्मण हायेत .

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 9:47 am | manguu@mail.com

ते खोटे बोलताहेत, मग पाण्यात उतरलेले अनेक्जण असताना केवळ तीघानाच का मारले ?

शाम भागवत's picture

16 Jun 2018 - 8:52 pm | शाम भागवत

जागता पहारा यामधे आलेलि प्रतिक्रिया

"आम्ही पाणी पितोय आणि तुम्ही नागड्याने यात आंघोळ करताय व्हय रे भाड्यानो, बाहेर या, तुम्हाला दाखवतो हिसका," असे म्हणून राहुल आणि सचिन या नागव्याने आंघोळ करत असलेल्या पोरांना जसे आहेत तसे विहिरीतून बाहेर काढले. त्यांना तसेच रागाने शेजारच्या शेडमध्ये नेण्यात आले. तेव्हा जाताना त्यांनी झाडाच्या फांद्या तोडून लज्जारक्षण केले. "नालायकांनो, तुम्हाला हजारदा सांगून तुम्ही ऐकायला तयार नाही, माजलाय रे !!" असे म्हणून सुती पट्ट्याने त्यांना चार फटके देण्यात आले व सोडण्यात आले. नंतर त्यांनी आंघोळीस उतरण्यापूर्वी विहिरीच्या काठावर दगड ठेवून ठेवलेले कपडे घालून पळ काढला.

जामनेर मधील वाकडी गावातील ही तसे पाहायला गेले तर तशी अत्यंत सामान्य घटना आहे पण सध्या या घटनेला देशावर काहीतरी फार मोठे संकट आले आहे ..महाराष्ट्र खूप वर्षे पाठीमागे गेला ...अशा पद्धतीने घेतले जातेय आणि पराचा कावळा केला जातोय !!

विहिरीचा मालक ईश्वर जोशी हा मुळात कोणी ब्राम्हण नव्हे. 'जोशी हा जातीने ब्राह्मण असता तर मजा आली असती' असे वाटणाऱ्यांचा हिरमोड झाला, हे खरे. त्यांचे जातीय दंगल घडवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले पण त्याला इलाज नाही!

भिक्षा मागत फिरणाऱ्या कुडमुडे जोशी समाजाच्या भटक्या विमुक्तातील ईश्वर जोशी याची ही विहीर आहे आणि राहुल व सचिन ही मातंग समाजाची पोरे आहेत.

ईश्वर जोशीने अनेक वेळा सांगितले की "बाबांनो, आम्ही हे पाणी पितो. आमच्या बरोबर अनेक लोक हे पाणी पितात. त्यामुळे तुम्हाला अंघोळ करायची असली तर पाणी बाहेर काढून आंघोळ करत चला. आत उतरून करू नका. पुन्हा सांगितले नाही म्हणू नका." असे अनेकदा समजावून सांगितलं. त्याचबरोबर अती झाल्यावर "तंगडे तोडीन" असे धमकावून सांगून सुद्धा पाहिले पण ऐकतील ती पोरे कसली..!!

गुरं - शेळ्या घेऊन जायचं आणि कोणी नाही असे बघून धडाधड विहिरीत उड्या टाकायच्या. कुणी आलं, असे दिसले की, पळून जायचं.. या सर्वाला ईश्वर वैतागला होता. त्याने या दोघांच्या घरी जाऊन त्यांना व त्यांच्या पालकांना समजावले होते... पालकांची अगदी रडक्या स्वरात अजीजी केली होती. "जरा तुमच्या पोरांस्नी समजावून सांगा. नागड्यानं अंगुळ करत्यात. त्यात मुतत्यात. तेच पानी आमी पितावय !"
तेव्हा
"हिकडं यारं" म्हणून पालकांनी पोरांना समजावले होते. "जाऊ नका रं, तिकडं आन गेल्यासात तर हीरीत उतरू नगासा बगा. आज्याबाद पवायचं न्हाई. कळत नाही काय रे, तुम्हासनी !!"

पण पोरांनी ऐकलं नाही !!

एका मातंग व्यक्तीने पोरांच्या आईला उभा करून केस केली. मग पोलिसांनीही व्हिडिओ पाहिला व प्रथमदर्शी 323, 405, 506 व अट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल केला.

त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत राहुल व सचिनने आपली चूक झाल्याचे पटकन मान्य केले !! तसेच त्यांच्या पालकांनीही 'आमची कोणतीही तक्रार नाही. पोरच harami हाईती. आमचं दिकाल ऐकत न्हाईती' असं पोलीस स्टेशनला स्पष्टपणे सांगितले आहे.

मार्कस ऑरेलियस's picture

16 Jun 2018 - 10:34 pm | मार्कस ऑरेलियस

वाह !

हे वाचुन एकदम मनाला हायसं वाटलं !

आता पाहुया वृत्तपत्रे ही बातमी कधी देतात ते अन मिपावरील स्वयं घोषित पुरोगामी कधी स्वतःची चुक कबुल करतात ते !!

मार्कस ऑरेलियस's picture

16 Jun 2018 - 9:16 am | मार्कस ऑरेलियस

ह्या घटनेत नागवं करून पट्ट्याने बेदम मारहाण करून वर व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला गेला. ह्याला तुम्ही 'चार रट्टे देणं' म्हणाल का?

>>> चार रट्टे म्हणजे मोजून चार रट्टे !
सदर प्रकरणात मोजक्याच तिघांना बाजूला काढून मारणं हा प्रकार झालाय तो चुकीचाच आहे हे मी किमान 3 वेळा म्हणालो आहे वर !
त्यातून नागव करून मारणे अन त्याचा विडिओ काढून वायरल करणे हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाहीयेच ! चुकीचेच आहे ! मी त्याचे कदापि समर्थन करणार नाही , कोणताच सुज्ञ मनुष्य झाल्या प्रकाराचे समर्थन करणार नाही .
कृपया गैरसमज करून घेऊ नका, मी कोणत्याही प्रकारे झालेल्या घटनेचे समर्थन करत नाहीये, पण झालेल्या घटनेला विहिरीचा मालक " जोशी" आहे म्हणून जो जातीय रंग द्यायचा प्रयत्न केवळ मिपावरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर झाला त्याचा मी निषेध करत आहे आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे ह्या जातीपातीच्या राजकारणात सुशिक्षित लोकं सामान्यज्ञान फाट्यावर मारत आहेत त्याचा अजून जोरदार निषेध करत आहे !

बाकी गैरसमज नको . लहानग्या पोरांना नागव करून मारण्याचा जो झाला प्रकार चुकीचाच झालाय, ती पोरं कोणत्या का जातीची असेनात, मला त्यांच्या बाबत वाईटच वाटते आहे, आणि सदर प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी ह्यात काहीही दुमत नाही .

आता बास.

एस's picture

16 Jun 2018 - 11:40 am | एस

ओके.

चार रट्टे देऊन पोरांना सज्जड दम भरून हाकलून लावणे योग्य ठरले असते. प्रसंगी त्यांच्या आईवडिलांकडे त्यांची तक्रार केली असती, योग्यच झाले असते. एक म्हणजे विहीरमालकाची ती विहीर खासगी मालमत्ता आहे. तिथे कुणाही आगंतुकाला पोहू देण्यात बराच धोकाही आहे. कुणाच्या जीवाचं काही बरेवाईट झालं तर मालकाच्याच डोक्याला ताप होणार. त्यापेक्षा विहिरीत मुलांना पोचण्यास मज्जाव करणं योग्यच आहे. गावाकडे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतही पोहतात. पण आरोग्यदृष्ट्या तो मुद्दाही योग्य धरू. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोहू नये. अंघोळ करू नये. पण हे सगळं टाळण्यासाठी, मुलांना भीती बसावी व परत आपल्या विहिरीत ती उतरू नयेत हे करण्यासाठी मालकाने जी अमानुष पद्धत वापरली आहे ती मानवतेला कलंक फासणारी आहे.

असो. माझ्याकडूनही चर्चेला पूर्णविराम.

माहितगार's picture

16 Jun 2018 - 8:01 am | माहितगार

गेल्या आठवड्याभरात राखीगढीतील मृतावशेषांच्या जेनेटीक अभ्यासा बद्दलची बातमी आणि चर्चा इंग्रजी वृत्त माध्यमातून प्रामुख्याने दिसते आहे. त्या प्रमाणेच नागपूरजवळील नगरधन येथील वाकाटक कालीन अवशेषांचे उत्खनना बाबत इंडींयन एक्सप्रेस मध्ये हे वृत्त आले आहे.

माहितगार's picture

16 Jun 2018 - 11:19 am | माहितगार

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या पुजार्‍यांच्या नेमणूकी बाबत बातमी आहे. सर्वजातीच्या पुजार्‍यांना समान संधी असेल असे या बातमी वरुन दिसते. पौरोहीत्यात समान संधींचे स्वागत केले पाहीजे. आणि अशा सकारात्मक बातम्या असल्या म्हणजे समाजातील भेदाभेदही मिटण्यास मदत होईल आणि समाजातील परस्पर विश्वासास चालना मिळेल.

गामा पैलवान's picture

16 Jun 2018 - 11:38 am | गामा पैलवान

माहितगार,

माझ्या मते पौरोहित्य हे वाट्टेल त्याने करायची गोष्ट नाही. वंशपरंपरेने पुरोहित होत असेल तर कुणाच्या पोटात दुखायचं कारणंच काय मुळातून? पुरोहिताने फक्त धर्म पाळला म्हणजे झालं. दर वेळेस वेगळा पुरोहित नेमला तर पौरोहित्याच्या प्रशिक्षणासाठी अतिरिक्त संसाधनं खर्ची घालावी लागतील.

आ.न.,
-गा.पै.

प्रश्न उलटा आहे समान संधीने कुणाच्या पोटात का दुखावे ? थोडक्यात ज्या परंपरा सर्वजनांच्या आहेत त्या सर्व परंपरात समान संधी असणे नक्कीच गरजेचे आहे, आणि हिंदू धर्माच्या उदात्ततेच्या तत्वांना हे पाऊल साजेसेच आहे. इन एनी केस समाज बदलाची प्रागतिक प्रक्रीयेची ईश्वरेच्छा थांबवणे तुमच्या आणि आमच्या हातात नाही. या विषयावर सविस्तर भूमिका आधीच्या विवीध धागाचर्चांमधून मांडून झाली आहे. त्याची पुर्नावृत्ती करत नाही. शरदजींच्या एका धागा चर्चेत वंशपरंपरे बाबत आपणास विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर (आपण स्वतची समजूत नेमकी कशी काढता ? ) आपणाकडून अद्याप तरी आले नाही -कि आपण देऊ शकला नाही - त्यामुळे आपली वैचारीक प्रक्रीया अपुर्ण रहात असावी, याचे या निमीत्ताने स्मरण झाले. असो.

गामा पैलवान's picture

16 Jun 2018 - 8:28 pm | गामा पैलवान

माहितगार,

माझ्या माहितीप्रमाणे समान संधी पोटभरू व्यवसायार्थ उचित आहे. पौरोहित्य ही पोट भरायची विद्या नाही. त्यामुळे इथे समान संधीचं सूत्र लावण्यात येऊ नये.

आ.न.,
-गा.पै.

सतिश गावडे's picture

17 Jun 2018 - 7:54 am | सतिश गावडे

पौरोहित्य ही पोट भरायची विद्या नाही.

पौरोहित्य करणारे लोक पौरोहित्य करण्याचे पैसे घेत नाहीत काय?

अर्धवटराव's picture

17 Jun 2018 - 8:31 am | अर्धवटराव

पण सैध्यांतीकरित्या ति मजुरी किंवा कष्टाचे दाम नसुन पुरोहिताप्रती यजमानाने कृतज्ञना व्यक्त करण्याची पद्धत म्हणुन आहे.
(पुरोहीतवर्ग सर्रास आपला 'रेट' सांगुन सेवा देतात हे खरं आहे, पण निरालसपणे आपली नित्य साधना करुन पौरोहित्य करणारे एक महाराज मी स्वतः बघितले आहेत. पुरोहीत वर्गाप्रती असणारी माझी चीड त्यांच्या संपर्कात आल्यावर बरीच कमी झाली)

स्वधर्म's picture

18 Jun 2018 - 5:26 pm | स्वधर्म

तुमच्याप्रमाणेच मीही त्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची वाट पहात होतो. तसेच श्री. शरद यांना विचारलेल्या मनुस्मृतीबाबतच्या प्रश्नाचेही, उत्तर मिळाले नाही. त्यांनी ‘प्रिय श्री स्वधर्म’ असा नविन धागाही काढला, पण उत्तर दिलेले नाही. त्यामुळेच मी त्या धाग्यावर काहीच लिहू शकलो नाही. एकदा भूमिका घेतलेलीच असेल, तर अशा प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत की काय, असे वाटते.

माहितगार's picture

19 Jun 2018 - 8:33 am | माहितगार

टागोरांचा भारत अजून जागा व्हायचाय; sand of dead habit मध्ये reason has lost its way चालू आहे,

काश्मीरमधील पत्रकार शुजात बुखारी यांची गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली. तसेच ड्युटीवरून गावी परतत असलेला निशस्त्र पोलीस औरंगजेब याचे अपहरण करून निर्घृण हत्त्या केली गेली. या दोन्ही घटनांमधून दहशतवाद्यांचा भ्याडपणा सिद्ध होतो आहे.

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 1:29 pm | सोमनाथ खांदवे

आस काय करताय ?
काश्मिर प्रश्न , आतेरिकी कारवाया , ह्ये असल इथ चघळत बसायला आमाला येळ हाये का ? . इथ फकस्त दलित मुस्लिम इरुद्ध सवर्ण ह्यानच्या मारामाऱ्या आणि भाजप इरोध या वर वाद घालत बसायच त्यो देश गेला खड्ड्यात . आमच्या मॅगुं बाबा ने तर त्या ईशयाच कापीराईट च घेतलय , जवा पासून धागा काडलय तवा पासून रोज रतीब च घालताय .

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 3:19 pm | manguu@mail.com

भाजपये विरोधी पक्षात होते तेमव्हा तेही असेच करायचे. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत ना ?

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 4:36 pm | सोमनाथ खांदवे

आर तस नव्ह !
काश्मीर मध्ये शांतते साठी ज्यांनी जीव दिला शुजात बुखारी , पोलिसदलातील शिपाई औरंगजेब यांच्या बद्दल सवताच्या मनाने धा वीस वळी लिव की , तुज बी मन हलक व्हईल . सारख सारख भाजप इरोधात लिवल्या मूळ अजीर्ण व्हईल रे बाबा .

डँबिस००७'s picture

16 Jun 2018 - 3:46 pm | डँबिस००७

आमच्या मॅगुं बाबा ने तर त्या ईशयाच कापीराईट च घेतलय , जवा पासून धागा काडलय तवा पासून रोज रतीब च घालताय .

तस करुन मंगु बाबा ला वाटतय की २०२८ मध्ये तरी कॉंग्रेस येईल !

माहितगार's picture

16 Jun 2018 - 2:05 pm | माहितगार

शुजात बुखारींना शासनाने व्यक्तीगत सुरक्षा का दिलेली नव्हती , पोलीस दलाचा शिपाई औरंगजेब बहुधा बस मध्ये होता (चुभूदेघे) त्या बसला सुद्धा संरक्षण नव्हते का ?

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 3:12 pm | manguu@mail.com

गुटख्याची गाडी सोडली नाही म्हणून संतापलेल्या भाजपा आमदाराने पोलीस निरीक्षकाला दमबाजी केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. गंगापूर- खुलताबादचे आमदार प्रकाश बंब यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

गंगापूर पोलिसांनी गुटख्याची एक गाडी पकडली होती. ती गाडी आमदार प्रकाश बंब यांच्या कार्यकर्त्याची होती, अशी चर्चा आहे. ती गाडी सोडण्यासाठी आमदार बंब यांनी पोलिसांना फोन केला. मात्र, पोलीस ऐकत नसल्याने आमदार बंब थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘मला कळतं कुठे काय चालतं ते. याबाबत लोकप्रतिनिधींनी पोलिसांना सांगू नये आणि पोलिसांनी लोकप्रतिनिधींना शिकवू नये. आजपासून विभागात कुठेही अवैध धंदे चालणार नाही. सीएम साहेबांकडून मुंबईतून बदली करायला लावेन’, अशी धमकी देताना ते व्हिडिओत दिसत आहेत. आमदाराचा फोन आल्यावर कुठलीही गाडी सोडलीच पाहिजे आणि माझे म्हणणे ऐकत नसाल तर बदली करुन टाकेन, असा धमकीवजा इशाराच त्यांनी पोलिसाला दिला.

https://www.loksatta.com/maharashtra-news/will-transfer-you-bjp-mla-pras...

उगा काहितरीच's picture

17 Jun 2018 - 10:55 am | उगा काहितरीच

सतत , विना थकता , भाजपा विरोधी बातम्या मग त्या गल्लीतल्या भाजपा कार्यकर्त्यांशी संबंधित असोत वा राष्ट्रीय पातळीवरील नेत्याशी संबंधित असोत शेअर करण्याच्या तुमच्या अथक परीश्रमाला सलाम ! जगभरात भाजपा संबंधित जरा कुठे खुट्ट झालं की लगेच तुमच्या JIRA Heat map मध्ये दिसत असणार बहुतेक ;-)

प्रत्येक पोस्ट शेअर करण्यासाठी ठराविक पैसे जरी मिळाले तरी पण मला माझे रोजचे काम सोडून होणे अवघड आहे. म्हणून जरा जास्तच आदर वाटतोय तुमचा.

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 4:50 pm | सोमनाथ खांदवे

दोन दिवस बाजूला ठेवून या देशाचा इचार करून बग ,या रमजान च्या पवित्र महिन्यात लष्करान पाकिस्तान बरुबर एकतर्फी शस्त्रसंधी क्येली व्हती ,पण ती बेनी कुत्री गोळीबार करायची कै थांबली नाय . आन ती काश्मिरी पब्लिक मस्जिद मदी नमाज पडून आल्या बरुबर कशापायी लष्करावर दगडफेक करत व्हती ? कंच्याच धर्मात आस शिकवल नाय . तूंच काय मत हाये याबद्दल ? जबरदस्ती नाय पण इग्नोर मारू नगस .

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 6:00 pm | manguu@mail.com

रमजानच्या वेळी अतिरेक्यांनी गोळी का मारली , याचे उत्तर मी द्यायचे.

मग अधिक मासाच्या मुहूर्तावर अनारसे खात हरिहरी करण्याऐवजी विहिरीवरून बडवाबडवी केली , तर त्याचे उत्तर तुम्ही देणार का ?

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 6:47 pm | सोमनाथ खांदवे

आहो मंगु बाबा ,
देशा बद्दल , नमाज नंतर दगडफेक करणाऱ्या काश्मिरी जंते बद्दल , पत्रकार शुजात बुखारी बद्दल आणि देशासाठी वीरगती प्राप्त झालेल्या शिपाई औरंगजेब बद्दल आपली काय तरी मत मांडा ना आस मी म्हणल्यालो .तुमी फिरून फिरून त्याच चौकात येताय मला काय समजना .

शाइस्तेखान प्रकरण रमजान महिन्यात झाले.

पानिपत संक्रांतीला झाले.

हिंदु पौराणिक लढाया - रावण , नरकासुर वगैरे कोणत्या ना कोणत्या सणालाच झालेत ना ?

राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेब याच्या हत्येनंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. निवृत्त लष्करी अधिकारी असलेल्या औरंगजेबच्या वडिलांनी मुलाच्या हौतात्म्यानंतर केंद्र सरकारला अल्टिमेटम दिला आहे. औरंगजेबच्या मारेकऱ्यांना ७२ तासांत संपवा, अन्यथा मी स्वत: त्याच्या हत्येचा बदला घेईन,' असं त्यांनी म्हटलं आहे.

ईदच्या सुट्टीसाठी घरी परतणाऱ्या औरंगजेबचं पुलवामा इथं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. अपहरणानंतर या जवानाची निर्घृण हत्या करण्यात आली. मुलाच्या हत्येमुळं औरंगजेबचे वडील हनीफ यांना मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीतही देशासाठी लढण्याची व मरण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. 'औरंगजेबच्या मारेकऱ्यांना ७२ तासांत संपवा', असं आवाहन त्यांनी मोदी सरकारला केलं आहे. 'सरकारनं ७२ तासांत माझ्या मुलाच्या हल्लेखोरांना मारलं नाही तर मी स्वत: दहशतवाद्यांशी दोन हात करून सूड घेईन,' असं त्यांनी म्हटलं आहे.

सुबोध खरे's picture

16 Jun 2018 - 7:45 pm | सुबोध खरे

हिंदु पौराणिक लढाया - रावण , नरकासुर वगैरे कोणत्या ना कोणत्या सणालाच झालेत ना ?

तुमचे डोकं नेहेमी तिरपंच चालतं म्हणून सगळा बेसिकमध्येच लोच्या आहे.

असे

चांगल्याचे वाईटावर विजय

म्हणूनच सण साजरे होतात.

उदा. विजयादशमी साजरी केली जाते ते श्री रामानी रावणावर विजय मिळवला म्हणून

त्यांनी(श्री रामानी) काही विजयादशमीचा मुहूर्त पाहून लढाई नव्हती केली.

काहीही हा मोगा

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 8:04 pm | manguu@mail.com

ह्या सणांची पौराणिक महत्वे त्याहीपूर्वीपासून आहेत. नंतर रामायण महाभारत कालीन काही घटनाही त्याच दिवशी घडल्या , ज्यांचा पगडा लोकांवर जास्त असल्याने त्या घटना त्या सणाशी अधिक निगडीत झाल्या आहेत.

उदा. विजयादशमी ला तुम्ही राम रावणाचा संदर्भ देताय , पण या सणाला कौत्स गुरुदक्शिणा - मोहरांचा पाऊस, पांडवानी शस्त्र घेतले, महिषासुर वध असे अनेक संदर्भ आहेत , त्यातले काही रामायणाच्याही पूर्वीही आहेत. उदा - कौत्स गुरुदक्शिणा - मोहरांचा पाऊस

मीही तेच म्हणतोय - त्यांनी(श्री रामानी) काही विजयादशमीचा मुहूर्त पाहून लढाई नव्हती केली. इतकेच नव्हे तर विजयादशमी अन दिवाळी आहे, सण आहे, म्हणून लढाई करायचे कुणी पुढेही ढकलले नव्हते.

सुबोध खरे's picture

16 Jun 2018 - 8:20 pm | सुबोध खरे

तेंव्हा तुमच्या सारखे पुरोगामी, सेक्युलर, बुद्धिवादी, निधर्मांध लोक नव्हते ना त्यामुळे श्रीरामाना अशा चिंता कराव्या लागत नव्हत्या.

बाकी रामायण अगोदर होते का महाभारत याचा हि नीट अभ्यास करून सांगा बरं आम्हाला काय काय कसं कसं आणि केंव्हा झालं ते

बाकी महिषासुराला शहिद म्हणणारी मंडळी ज ने यु मध्ये आहेतच काड्या घालायला.

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 8:42 pm | manguu@mail.com

निधर्मि लोक सत्तेत आहेत का हो सध्या ? पूर्ण बहुमतात भाजपाजी सत्तेत आहेत ना ? युद्ध करायचे की तह हे सरकार ठरवते ना ?

विजया दशमीचे संदर्भ

1. कौत्स , महिषासुर , ह्यातले 1, 2 मला माहीत नाही

2. राम रावण

3. पांडव शस्त्र

https://www.speakingtree.in/blog/vijayadashami/m-lite

इथे अजून संदर्भ आहेत .

भंकस बाबा's picture

17 Jun 2018 - 9:35 am | भंकस बाबा

मंगूखानला म्हणायचे आहे की शाइस्तेखानाची बिनपाण्याची हजामत करायला शिवाजी महाराज ( इथे ह च्या जागी ग ची भाषा वापरणार होतो , पण मंगुच्या भावना.... असो) रमजान संपण्याची वाट बघत बसले नाही, तर संधि मिळाल्यावर वार केला . असेच ना मोगाभाई?

manguu@mail.com's picture

17 Jun 2018 - 10:11 am | manguu@mail.com

मला काय म्हणायचे आहे हे कुणाला तरी समजले,

( या विषयापुरता , आता मी सुखाने मरतो. )

भंकस बाबा's picture

17 Jun 2018 - 2:12 pm | भंकस बाबा

ते मगासच्याला टायम नव्हता म्हनून अर्धच टायपलं.
थोरल्या महाराजाच्या वक्ताला ते तुमचं मानवाधिकार का क़ाय ते नव्हतं, आणि असत तरी महाराजांनी पैलादाँ त्यांना टकमक टोक दावलं असतं आणि मग स्वराज्य उभारल असत

manguu@mail.com's picture

17 Jun 2018 - 2:39 pm | manguu@mail.com

मानवाधिकारवाल्यांपुढे कोंगेसवाले लोटांगण घालत होते म्हणून तर श्री मोदीजीना निवडून दिलेत ना ? आता तेही तेच कारण देणार ?

धोबीपछाड झाली तरी पैलवानांन हार मानायचं नसत , मर्दा सारख पुढच्या कुस्तीला तयार व्हायच . शाब्बास र पठ्ठ्या ! .
आपल्या गव्हर्नमेंट ने रमजान महिन्या साठी मोठ्या मनानं एकतर्फी शस्त्रसंधी क्येली आन त्यात बी तू मानवाधिकार च राजकारण करतोय व्हय र ? रमजान महिन्यात आपल्या सैन्याने उलटा गोळीबार क्येला असता तर तुमच्या सारख्यानी मोदी सरकार ला घेरलं असत "रमजान महिन्यात गोळीबार करता ?" . आर !! त्या अफगाणिस्तान मधी सुदा तीन दिवस गोळीबार बंद व्हता .
आज आपली बुलट बंद हाय का ?
चालू कर बुलट , आन सुरवात कर गावच्या ह्या गल्लीतून त्या गल्लीत फिरायला , फटार !!!!!! ठो !! ठो ! ठो !!!! फटार !!!!! दुपार व्हत आली तरी भाजप च्या उण्या दुण्या नाय काढल्या याला काय आर्थ हाये का ?.

भंकस बाबा's picture

17 Jun 2018 - 6:22 pm | भंकस बाबा

मोदी सरकारने काढलेल्या विकेट या कोंग्रेसच्या काळातील विकेटपेक्षा भरपूर जास्त आहेत, मानवाधिकार्वारल्यांना तेव्हाच फाट्यावर मारायला पाहिजे होते जेव्हा काश्मीरात पंडित बेघर झाले होते, मताच्या बेगमीसाठी लांगुलचलन केले आणि काश्मीर जवळ जवळ हातातून गेले

manguu@mail.com's picture

17 Jun 2018 - 7:04 pm | manguu@mail.com

तेंव्हा हे करायला हवे होते, अन ते नको करायला हवे होते. आता तुम्हाला का निवडून दिलय ?

शिवाजी महाराज असते तर - मानवाधिकारवाल्याना जुमानले नसते , हे भक्त लोक स्वतःच लिहितात .

शिवरायांचे आशिर्वाद देऊ , मोदीना निवडून देऊ , असे म्हणून त्याना निवडूनही दिले.

आणि आता विसंगत आचरण ? भक्तांची फसगत झाल्याचे आता तरी लक्शात येते आहे का ?

सोमनाथ खांदवे's picture

17 Jun 2018 - 8:20 pm | सोमनाथ खांदवे

आताशी कुठ 4 वर्ष झाल्यात , आर !! पॉर्ऱ्ह सुद्धा नऊ माहिन्यानीच व्हत्यात , लै प्रश्न सोडवायच हायेत बाबा . 40 वर्ष्यात जर भाजप न काँग्रेस ने तयार क्येलेल्या अडचणी नाय सोडवल्या तरच म्हणता येईल फसगत झाली . जगातील सीरिया ,येमेन या आणि काही आफ्रिकेतल्या मुस्लिम कन्ट्री सोडल्या तर गेल्या साठ सत्तर वर्ष्यात सगळ्या द्येशानी प्रगती क्येलेली हाये . मंगु बाबा तुमाला नै वाटत का आपण पण अशीच प्रगती क्येली पायजे ?.
सोच भला व्होगा भला !!!!

manguu@mail.com's picture

17 Jun 2018 - 8:30 pm | manguu@mail.com

नेपाळ तर हिंदुराष्ट्र आहे ना ? pure hindu राष्ट्र ? त्यांनी काय उजेड पडलाय ?

मुस्लिम अन ख्रिश्चनांच्या नावाने कोकलून शेवटी नोकर्या करायला त्यांच्याच देशात जातात , नेपाळला का जात नाहीत ?

सोमनाथ खांदवे's picture

17 Jun 2018 - 10:21 pm | सोमनाथ खांदवे

परत गाडी घसरली वाटत !!
नीट वाचा मंगु भाई ! ' सीरिया , येमेन आणि आफ्रिकेतील मुस्लिम कन्ट्री सोडून बाकी सगळ्यांची प्रगती झाली ' आस म्या म्हणलो . आपल्याला पण बाकी च्या सारखी प्रगती करायची का नाय ?.
फटार !!!!! फट !!फट !! ठो !! ठो !!!!! तुमची बुलट नेपाळ ख्रिश्चन कन्ट्री ला काशी काय पोचली ? डायरेक्ट टट्रॅक चैन्ज .

manguu@mail.com's picture

18 Jun 2018 - 1:42 am | manguu@mail.com

जगातील सीरिया ,येमेन या आणि काही आफ्रिकेतल्या मुस्लिम कन्ट्री सोडल्या तर गेल्या साठ सत्तर वर्ष्यात सगळ्या द्येशानी प्रगती क्येलेली हाये .

त्या सगळ्यात 2014 पूर्वी भारत नव्हता का ?

manguu@mail.com's picture

17 Jun 2018 - 8:32 pm | manguu@mail.com

आणि भाजपेयींची 5 कुणाची ?

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 6:59 pm | सोमनाथ खांदवे

पवित्र म्हैन्यात ह्ये आस कस वागत्यात मला ह्येच कळत न्हाय ,
तुमचा काय अभ्यास आसल तर आमाला बी सांगा येवढी च ईनंती हाये
' रमजान चा महिना असल्याने भारताने महिनाभर शस्त्रसंधी पाळली. मात्र पाकिस्तानचे नापाक इरादे जसेच्या तसेच आहेत हेच दिसून येते आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तानने केलेच शिवाय जम्मू काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे आज रमजान ईद असूनही या ठिकाणचे वातावरण काहीसे धुमसतेच राहिले आहे. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग भागातही सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करण्यात आली.

यावेळी पाकिस्तान आणि आयसिसचे झेंडेही फकडवण्यात आले. तसेच जमावही मोठ्या प्रमाणात जमला होता आणि घोषणाबाजी करू लागला होता. त्यामुळे या जमावाला पांगवण्यातठी सुरक्षा दलांनी अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या. दोन दिवसांपूर्वीच जामा मशिद भागातही असाच प्रकार घडला होता. गेल्या 4 आठवड्यांपासून दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरीही गेल्या काही दिवसांपासून दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या या नापाक हरकतीचे परिणाम अटारी आणि वाघा बॉर्डरवरही बघायला मिळाले या ठिकाणी बीएसएफच्या जवानांनी आणि पाकिस्तानच्या रेंजर्सनी ईदची मिठाईही दिली नाही. '

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 7:08 pm | सोमनाथ खांदवे

च्याक ! च्याक !!आदीच सांगितलं व्हत ना भाजप कांग्रेस बाजूला ठ्येवायची म्हणून ? मोदीच्या इतिहास आब्यास चा सबंद च न्हाई .

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 7:58 pm | सोमनाथ खांदवे

ह्ये काय मंगु बाबा,
पाकिस्तान च्या गोळीबार ला आन जनते च्या दगडफेकी ला तुमी समर्थन च द्येताय की त्यांचा निषेध करायचं सोडून .
काय आर्थ त्या निसत्या कापी पेस्ट ला . कुठली तुलना कुठ करताय , येवढी पुराणातील वांगी दाखवून काय उपयोग .तुमाला देशप्रेमच नाय गाड्या .

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 8:45 pm | manguu@mail.com

मी भाजपाने शस्त्र संधी करू नये या संदर्भात बोललो

पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र असल्याने त्याने भारतावर केलेले सर्वच हल्ले निषेधार्हच आहेत .

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 9:07 pm | सोमनाथ खांदवे

मंगु बाबा ,
ज्याच्या डोक्यात आन मनात असत त्येचं लेखणी द्वारे प्रतिबिंबित व्हत असत .ताकाला जाऊन भांड कशाला लपवताय ?
पाकिस्तान चा निषेध करायचा सोडून पुराणातील लढाया चा उल्लेख जो तुमी केला
" शाहिस्तेखान च प्रकरण रमजान महिन्यात झाले.

पानिपत संक्रांतीला झाले.

हिंदु पौराणिक लढाया - रावण , नरकासुर वगैरे कोणत्या ना कोणत्या सणालाच झालेत ना ? " यातून तुम्ही कक्लीअर सिध्द करताय की पाकिस्तान ने रमजान महिन्यात केलेला गोळीबार बरोबर हाये .याच्या पुढ तुमी याच इशयावर शब्दा चा अजून किस पाडत आसाल तर तुमीच डोक तपासून घ्या .

manguu@mail.com's picture

16 Jun 2018 - 10:27 pm | manguu@mail.com

सण अन कामबंदी हेही आम्हाला अप्रुपच आहे . माझ्या 13 वर्षाच्या मेडिकल प्रोफेशनात मी हार्डली 4-5 दिवाळ्या घरी राहिलो असेन , त्यातले 2 अपघातामुळे घरीच होतो म्हणून

सणाचे निमित्त करून युद्ध बनद करणारे भारत सरकार , ते काँग्रेसचे असो की भाजपाचे , हा विचार मला acceptable नाहीच