Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by manguu@mail.com on Tue, 06/12/2018 - 19:03
भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे. भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती. भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.
  • Log in or register to post comments
  • 118034 views

प्रतिक्रिया

Submitted by सोमनाथ खांदवे on Wed, 06/20/2018 - 10:27

Permalink

कांग्रीस चे सर्वात यशस्वी आणि हुश्शार अध्यक्ष !!!!

ज्यांनी मारहाण क्येली ते दोषी हायेतच पण फक्त भाजप द्वेषा पाई लहानमुलांची वळख उघड करणारे दोषी नाय का ? ह्या माणसाचा बुध्यांक कधी वाढणार ?. जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातल्या अल्पवयीन मुलांना नग्न करून मारहाण करण्याच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगानं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, जळगाव जिल्ह्यातल्या वाकडी इथं मुलांना विहिरीत पोहल्यामुळे नग्न करुन मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हीडिओ राहुल गांधींनी ट्वीटरवर पोस्ट केला होता. या व्हीडिओतून अल्पवयीन मुलांची ओळख उघड झाल्यामुळे बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झालं असल्याची तक्रार बाल हक्क आयोगाकडे करण्यात आली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 06/20/2018 - 11:49

In reply to कांग्रीस चे सर्वात यशस्वी आणि हुश्शार अध्यक्ष !!!! by सोमनाथ खांदवे

Permalink

बाल हक्क आयोगाने हे मात्र

बाल हक्क आयोगाने हे मात्र चांगले काम केले.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Wed, 06/20/2018 - 12:36

In reply to कांग्रीस चे सर्वात यशस्वी आणि हुश्शार अध्यक्ष !!!! by सोमनाथ खांदवे

Permalink

रोबोट

रोबोट मधल्या चित्तीबाबूची आठवण झाली
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Wed, 06/20/2018 - 13:35

In reply to रोबोट by manguu@mail.com

Permalink

तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो

तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो म्हणाला होतात ना ? काय झालं त्याचं? अश्या गोष्टीची तुम्हाला आठवण रहात नाही !! मात्र एक दशक जुन्या रोबोट सिनेमा मधल्या चित्तीबाबूची आठवण मात्र होते !!
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Wed, 06/20/2018 - 13:50

In reply to तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो by डँबिस००७

Permalink

छान. सुंदर

मिपावर एडीटची सोय नाही मी जर तसे बोललो असेलच , तर ते मिपावर दिसेलच ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Wed, 06/20/2018 - 14:26

Permalink

Congress stung by Digvijaya

Congress stung by Digvijaya Singh's 'Hindu terror' barb AICC general secretary Digvijaya Singh’s ‘Hindu terror’ barb has triggered a row in election-bound Madhya Pradesh. RSS spreads violence, hatred and propagates terrorism, Digvijay had said. AICC general secretary Digvijaya Singh’s ‘Hindu terror’ barb has triggered a row in election-bound Madhya Pradesh and left Congress reeling from what it sees as an own goal. " हिंदु अतिरेकी " काँग्रेसने जगाला दिलेले एक नविन टॅग !! २०१९ च्या निवडणुकी आधी दिग्विजय सींग , मणी शंकर सारख्यांनी भाजपाचा विजय निश्चित करायला मदत करावी !
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Wed, 06/20/2018 - 16:07

In reply to Congress stung by Digvijaya by डँबिस००७

Permalink

ती सुप्रीमो ची बी ( भाजप ) टीम हाये

खर म्हणजी सिब्बल ,दिग्विजय ,फुटक्या मनी, मनीष तिवारी ह्यांनीच 2014 मदी कुंपणावर बसलेल्या हिंदू सुशिक्षित मतदारांना भाजप च्या पारड्यात मत द्यायला लावलं व्हत.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 06/20/2018 - 16:25

In reply to Congress stung by Digvijaya by डँबिस००७

Permalink

"""दरम्यान, दिग्विजय सिंह

"""दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी आपण हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला नसल्याचे स्पष्ट केले. मी नेहमी संघ दहशतवाद हा शब्द वापरला आहे. कोणतेही दहशतवादी कृत्य हे धर्माशी जोडता येत नाही. कारण कोणताही धर्म दहशतवादाला प्रोत्साहन देत नाही, असे सप्ष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी मालेगाव, समजोता एक्स्प्रेस आणि मक्का मशीद बॉम्बस्फोट आणि संघ विचारसरणीचे कनेक्शनबाबत भाष्य केले.""" === अर्धवट बातमी चिटकू नका ना.
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Wed, 06/20/2018 - 17:51

In reply to """दरम्यान, दिग्विजय सिंह by विशुमित

Permalink

हिंदू दहशतवाद आणि दिग्विजय

हिंदू दहशतवाद आणि दिग्विजय चा वाद मीच नाय तर आख्या भारतातील नागरिकांना माईत हाये .ज्या येळी देश धर्मा चा इशय असतो त्या येळी कुठल्या बी लिंक ची गरज नाय पडत . कोण , कधी , काय बोलत व्हत हे पक्क डोक्यात आसत. त्यामुळ अर्धवट बातमी चिटकवाय चा काय संबंध च नाय . पलटी पडायची सवय राजकारण्यांना असती , याच दिग्विजय ने who killed karkare बद्दल पुस्तक आजूबाजूला दोनचार दाढी वाले बसवून प्रसिद्ध केले व्हते इसरला का ?
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Wed, 06/20/2018 - 19:48

In reply to """दरम्यान, दिग्विजय सिंह by विशुमित

Permalink

हिंदू दहशतवाद हा शब्द

हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसच्या लोकांनीच प्रचलित केलेला आहे. आताही प्रॉब्लेम नाही. हिंदू दहशतवाद हा शब्द वापरत बसा , आणी भाजपाला हिंदु लोकांना काँग्रेसची खरी ओळख तरी करुन देता येईल. अर्धवट बातम्या तुम्हीच चिकटवताय !! दिग्विजय पुढे काय म्हणतोय !! Digvijaya, appointed head of Congress Coordination Committee recently, is on a statewide Ekta Yatra in an effort to revive the party at the grassroots before the assembly polls, due in five months. On Saturday, he stirred the hornet’s nest by saying, “I have never said ‘Hindu terrorism’, I always used the term Sangh terrorism. No terror activity can be linked to religion because no religion supports terrorism.” Explaining the term ‘Sangh terror’, he told reporters, “Those accused in the Malegaon, Samjhauta Express and Mecca Masjid bomb blasts were influenced by Sangh ideology. RSS spreads violence, hatred and propagates terrorism.” Two days later, speaking to a television channel, he reiterated his stand, saying: “All Hindu terrorists who were caught have links with RSS. Nathuram Godse, who assassinated Mahatma Gandhi, was also an RSS functionary. Their ideology spreads hatred, rears violence and from violence, breeds terrorism.”
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 06/20/2018 - 23:29

In reply to हिंदू दहशतवाद हा शब्द by डँबिस००७

Permalink

Hindu Terrorist who were

Hindu Terrorist who were caught आणि Hindu Terrorism मधील फरक कृपया समजून घ्या. वाक्य आधी नीट वाचा मग अर्थ लावा.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 06/21/2018 - 00:37

In reply to Hindu Terrorist who were by विशुमित

Permalink

सांगून उपेग नाही

मी आर्मित जाणार , असे बोललो / लिहिले होते म्हणे , कुठे कधी त्याची पोस्ट कुणीच देत नाही आहे , तसेच हेही नुसता कांगावा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/21/2018 - 01:30

In reply to सांगून उपेग नाही by manguu@mail.com

Permalink

तुमच्या दशावतारातील

तुमच्या दशावतारातील कोणत्यातरी अवतारात तुम्हाला लष्करात मिळणाऱ्या सुविधांबद्दल जळजळ झाली होती तेंव्हा मी तुम्हाला दिलेले खुले आमंत्रण होते. तेंव्हा तुम्ही म्हणाला होतात. कुठल्या अवतारात(कुठल्या आयडी मध्ये) ते माहीत नाही. मुळात तुमच्या किती आय डी बॅन झाल्या आणि का बॅन झाल्या याचा विचार तुम्हीच करा.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 06/21/2018 - 01:42

In reply to तुमच्या दशावतारातील by सुबोध खरे

Permalink

छान

तुम्ही निमंत्रण देणे आणि मी सैन्यात जाणार , असे मी बोलणे these are two different things. just like , Hindu terrorists and Hindu terrorism ☺
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/21/2018 - 09:57

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

आम्हाला कोणी नोकरी देत नाही

आम्हाला कोणी नोकरी देत नाही आणि एवढा पगार देत नाही म्हणून रडारड केली होतीत ना? मग ती कशासाठी? मी आमंत्रण दिलं होतं? उगाच लष्करात मिळणाऱ्या सुविधांचा दुस्वास कशाला करायचा? त्याच्या मागे असणाऱ्या वेदनांची तुम्हाला कल्पनाहि नाही. नंतर जेंव्हा मी आमंत्रण दिलं तेंव्हा तुम्ही शेपूट घातली आणि आता शब्दांचा किस पाडतांय? बंदुकीच्या नळीच्या मागच्या बाजूला उभे राहणे आणि समोर उभे राहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हिंदू देवदेवतांबद्दल अनुदार उद्गार काढणे, शिवाजी महाराजांबद्दल मानहानी कारक उद्गार काढणे इ. सगळे धंदे करून झाले. किती वेळा सांगून झाले "थुंकी या बोटांवरून त्या बोटावर करू नका". मिपा वरून अनेक वेळेस हाकलून झाले पण तुमची शेपूट वाकडी ती वाकडीच. इथे पण काडी घालणे चालू आहेच असो. लष्करात नोकरीचे आमंत्रण अजूनही खुले आहे. उगाचच टीका करण्यापेक्षा भरती होऊन पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 06/21/2018 - 10:07

In reply to आम्हाला कोणी नोकरी देत नाही by सुबोध खरे

Permalink

जसे

जसे बाकीचे लोक नोकर्या करतात , तसेच तेही करतात , निरर्थक वाद घालायची इचछा नाही. मला एकट्याला पाठवून काय होणार ? त्यांना पाठवा
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/21/2018 - 10:44

In reply to जसे by manguu@mail.com

Permalink

रडारड आणि दुस्वास तुम्ही केला

रडारड आणि दुस्वास तुम्ही केला होता इतरांनी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on गुरुवार, 06/21/2018 - 01:54

In reply to तुमच्या दशावतारातील by सुबोध खरे

Permalink

मुळात तुमच्या किती आय डी बॅन

मुळात तुमच्या किती आय डी बॅन झाल्या आणि का बॅन झाल्या याचा विचार तुम्हीच करा. त्या अवतारांची गणती त्यांची त्यांनाच नाही मग तुम्हाला कोठुन असणार ? अहो विष्णुच्या दहा अवतारा बद्दल कुचाळक्या करणार्याला स्वताच्या अगणीत अवताराबद्दल स्वतःलाच माहीती नाही ! हिंदुना अतिरेकी बाकी हिंदुना अतिरेकी ठरवुन ईथल्या काही लोकांना आनंद होत असेल, पण हिंदु आता जागा होत आहे आणी हिंदुना अतिरेकी ठरवणार्यांना त्यांची जागा दाखवुन दिलीच जाणार आहे. ज्या लोकांनी नकळत ह्या हिंदुना अतिरेकी ठरवण्याच्या मोहीमेला हातभार लावला व ज्यांच जमिर अजुनही जिवंत आहे ते आता समोर येत आहेत. ज्या उच्च अधिकार्यांनी सरकारी आदेशावर छोट्या अधिकार्यांना बेकायदेशीर काम करायला लावलीत त्यांना धडा शिकवायला पाहीजे ! चिदंबरम, दिग्विजय सिंग, मणी शंकर अय्यर, सलमान खुर्शिद , पवार, सुशिलकुमार शिंदे असले लोक हिंदुना अतिरेकी ठरवण्यात आघाडीवर होते. स्वामी असिमानंद, कर्नल पुरोहीत, साध्वी प्रग्या ह्यांना जेल मध्ये अतोनात यातना दिल्या पण शेवटी ह्या लोकांना कोर्टाने सोडून दिल, पण त्या लोकांच जिवन बरबाद केल व हिंदु अतिरेकी आहेत ह्याचा मोठा ठप्पा जगात लागला. अमेरिकेतही हिंदुंना अतिरेकी समजण्यात यायला लागले. आता कोणी हिंदुंनी, हिंदुना अतिरेकी ठरवणार्या लोकांचा बंदोबस्त करायला पाहीजे !!
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on गुरुवार, 06/21/2018 - 01:35

In reply to Hindu Terrorist who were by विशुमित

Permalink

" हिंदु अतिरेकी " ?? किती

" हिंदु अतिरेकी " ?? किती लोकांना पकडलय ? किती लोकांना फाशी दिलीय ? जरा डोक वापरा !! समझौता एक्सप्रेस मध्ये बाँब स्फोट करणार्या पाकिस्तानी अतिरेक्याला सोडुन हिंदु लोकांना अडकवलेल सर्व श्रुत आहेच !! ज्या ईंस्पेक्टरने ह्या पाकिस्तानी अतिरेक्याला पकडले होते त्यालाच दबाव आणुन कस्टडीतुन सोडुन दिले, दबाव आणणारे सरकारी उच्च अधिकारी आपली ड्युटी बजावत होते. https://www.youtube.com/watch?v=-ZU5plZAz5Y https://www.youtube.com/watch?v=inOnMFqFAtU
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 06/20/2018 - 15:29

Permalink

डीएसकेप्रकरणी बँक ऑफ

डीएसकेप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांसह सहा जणांना अटक. यात डीएसकेंचे सीए सुनील घाटपांडे, अभियंता राजीव नवासकर यांचा पण समावेश. मालकाच्या unethical वागण्यामुळे कर्मचाऱ्यांची पण ससे होलपट झाली. मला तर सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे खासगी नोकरीतच पाहायला मिळत आहे. सरकारी नोकर उगाचच बदनाम आहेत. .... https://www.loksatta.com/pune-news/eow-police-arrested-the-chairman-of-bank-of-maharashtra-and-other-official-for-dsk-matter-1700236/
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 06/21/2018 - 10:54

In reply to डीएसकेप्रकरणी बँक ऑफ by विशुमित

Permalink

मराठी माणूस मवाळ अन त्यांच्या

मराठी माणूस मवाळ अन त्यांच्या पाठीशी राजकिय पाठबळ नाही म्हणुन मराठी माणसांनाच टारगेट केलं जातंय का अशी शंका येतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 06/21/2018 - 11:58

In reply to मराठी माणूस मवाळ अन त्यांच्या by चौथा कोनाडा

Permalink

मराठी माणसाला पाठिंबा

मराठी माणसाला पाठिंबा देण्यापायी संपूर्ण सिस्टीमलाच दोष देण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 06/21/2018 - 17:44

In reply to मराठी माणसाला पाठिंबा by विशुमित

Permalink

बरोबर आहे विशुमित,

बरोबर आहे विशुमित, .. ... पण All are equal but ... च्या चालीवर " But some are more targetable" असं असावं ?
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 06/20/2018 - 16:48

Permalink

कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी

कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा राजीनामा. कौटुंबिक कारण दिल्याने त्यांच्या निर्णयाचा आदर आहे. पण इकडे देशासाठी लग्न न करणारे, संसार अर्धवट सोडणाऱ्यांबरोबर काम करून देखील लोक असा निर्णय का घेत असतील बरं? ==== https://www.loksatta.com/desh-videsh-news/arvind-subramanian-resigns-as-chief-economic-advisor-1700335/
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Wed, 06/20/2018 - 17:12

In reply to कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी by विशुमित

Permalink

छान

छान निर्णय
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत८२ on Wed, 06/20/2018 - 17:47

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

बर वाटल

एखाद्या विशिष्ट प्रकारचे लोक जे अनेक वर्षे बाहेर आहेत आणि ते इथे येऊन आपल्याला शिकवतात. आपल्या देशात लोक नाहीत का? काही काम करतात आणि ते पण पैसे घेऊन फुकट नाही. परत जाताना यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्याची आठवण येते. हे मनाला पटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गब्रिएल on Wed, 06/20/2018 - 18:14

In reply to कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी by विशुमित

Permalink

कोना आदिकार्‍याच्या

कोना आदिकार्‍याच्या राजिनाम्याबद्दल बोल्ताना पंतप्रधानांच्या संबंद नसलेल्या खाजगी जीवनाबद्दल तीरके बोल्णे तुमच्या नितिनिय्मांत फिट्ट बस्ते ह्ये पाहूण मणोरंजण झाले. एखांद्या असावध येळेला खोटं बुरखं फाडून पोटातलं खरं जळमट भायेर येतं त्ये आसं, बर्का =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 06/20/2018 - 19:12

In reply to कोना आदिकार्‍याच्या by गब्रिएल

Permalink

पर्वाचे आनंदीबेनजींचे भाषण

पर्वाचे आनंदीबेनजींचे भाषण काढून बघा. मनामधील सगळी जळमटे निघून जातील. === आमचं जे पोटात असते तेच ओठात पण असते.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 06/20/2018 - 19:20

In reply to पर्वाचे आनंदीबेनजींचे भाषण by विशुमित

Permalink

https://www.amarujala.com

https://www.amarujala.com/bhopal/pm-modi-is-not-married-says-madhya-pradesh-governor-anandiben-patel
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 06/21/2018 - 10:28

In reply to पर्वाचे आनंदीबेनजींचे भाषण by विशुमित

Permalink

छान

आंनदीबाई बोलल्या - मोदी अविवाहित आहेत , तर जशोदाबाईंनी मोबाईल क्लिप वायरल केली की मोदी विवाहितच आहेत कित्येक वर्ष स्वतः मोदीच स्वतःला अविवाहित म्हणऊन घेत होते. https://www.loksatta.com/desh-videsh-news/narendra-modi-married-me-he-is-ram-for-me-jashodaben-reaction-on-anandiben-patels-statement-1700585/
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 06/21/2018 - 11:53

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

इसमें राज्यपाल आनंदी बेन

इसमें राज्यपाल आनंदी बेन महिलाओं से कह रही हैं- पूरी दुनिया जानती है, आपके बच्चे के लिए, आपके लिए उन्होंने विवाह नहीं किया, यह तो पता है न आपको। --- आपके बच्चे के लिए, आपके लिए उन्होंने विवाह नहीं किया, यह तो पता है न आपको। --- हा मोठा कहर. स्वतः त्यांच्या पक्षाने नियुक्त केलेल्या राज्यपाल सार्वजनिक ठिकाणी त्यांचे गुणगान करत आहे आणि इकडे समर्थकांना त्यांच्या वैयक्तिक जीवनावर बोललेलं तिरकस वाटतंय. अजब आहे..!
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on गुरुवार, 06/21/2018 - 12:16

In reply to इसमें राज्यपाल आनंदी बेन by विशुमित

Permalink

यकच इशय किती चावताय राव !!!

यकच इशय किती चावताय राव !!!
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 06/21/2018 - 14:19

In reply to यकच इशय किती चावताय राव !!! by सोमनाथ खांदवे

Permalink

त्यामुळे तुम्हाला काही समस्या

त्यामुळे तुम्हाला काही समस्या आहे का ? तसे काही असेल तर कृपया खासगीत बोला. मेन बोर्डावर अशी वैक्तिक चर्चा बरोबर वाटत नाही. इतरांना त्याचा त्रास होऊ शकतो. === संपादक मंडळ तुम्ही पण खांदवे साहेबांना मिपाचे मार्गदर्शक तत्वे समजावून सांगावे ही विनंती !
  • Log in or register to post comments

Submitted by गब्रिएल on गुरुवार, 06/21/2018 - 19:24

In reply to त्यामुळे तुम्हाला काही समस्या by विशुमित

Permalink

कायकी बा. तुमचं सारकं सारकं

कायकी बा. तुमचं सारकं सारकं संपादक मंडळला, ह्ये करा त्ये करा, आसा आदेश देनं बगून तुमचं बी "१० जनपथ"वर आफिस हाय का काय आसंच वाटाया लागलं बगा ! लै भारी वट व्हती बगा त्या आफिसाची =))
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on गुरुवार, 06/21/2018 - 21:46

In reply to कायकी बा. तुमचं सारकं सारकं by गब्रिएल

Permalink

न्हाय ! न्हाय !!

न्हाय ! न्हाय !! त्यांचं जॉर्ज बुश च्या 9 / 11 च्या फ्येमस डॉयलॉग सारख आसतंय ' YOU'RE EITHER WITH US , OR AGAINST US ' .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Wed, 06/20/2018 - 18:38

Permalink

तिकडे जम्मू-काश्मिर मध्ये

तिकडे जम्मू-काश्मिर मध्ये तत्वाचा हवाला देत भाजपा, J&K सरकार मधून बाहेर पडली आता गेली तीन वर्षे राजीनामे खिषात घेऊन फिरणारी व यापुढे स्वबळावर निवडणुक लढवून पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल असे म्हणणारी शिवसेना सत्तेतून बाहेर कधी पडते ते पाहायचे. --- मला वाटले कालच्या वर्धापन मेळाव्यात काही राजकिय भूकंप होईल कि काय, पण कसले काय. शिवसेनेच्या मेळाव्यात पुन्हा एकदा शिवाजी महारांजापासून ते औरंगजेब, अदिलशहा, अफजल खान इत्यादी सर्व आले मात्र भुकंप काही झाला नाही. हि शिवसेना इतिहासातून वर्तमानात कधी येणार तेच कळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 06/21/2018 - 13:10

Permalink

धक्कादायक

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एका दांपत्याला पासपोर्ट देण्यासाठी धर्म बदलण्यास सांगणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. दांपत्याने या प्रकरणात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. आता परराष्ट्र मंत्रालयाने लखनऊच्या पासपोर्ट कार्यालयाला उत्तर देण्यास सांगितलं आहे. तसंच, हे प्रकरण अंगाशी येताना दिसल्यानंतर रिजनल पासपोर्ट ऑफिसरने कर्मचाऱ्याची चुकी मान्य केली असून दांपत्याला पासपोर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत एका महिलेने पासपोर्ट कार्यालयात धर्माच्या नावाखाली अपमान केल्याचा आरोप केला होता. एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं असल्याने आपला अपमान करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला होता, त्यांनी यासंबंधी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि प्रधानमंत्री कार्यालयाला ट्विट करत तक्रारही केली होती. https://www.loksatta.com/desh-videsh-news/hindu-muslim-couple-gets-passport-after-being-harassed-at-passport-office-1700899/ खरे तर त्याला नोकरीतून काढूनच टाकायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on गुरुवार, 06/21/2018 - 13:26

In reply to धक्कादायक by manguu@mail.com

Permalink

मंगुशेठ चे जिव्हाळ्याच्या इशय

मंगुशेठ चे जिव्हाळ्याच्या इशय हाये , हिंदू मुलीचे मुस्लिमा बरोबर लग्न !
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on गुरुवार, 06/21/2018 - 17:39

In reply to धक्कादायक by manguu@mail.com

Permalink

मग तीने मुस्लिम धर्म

मग तीने मुस्लिम धर्म लग्नाच्या वेळेस का नाही स्वीकारला ? का दोन्ही धर्माचे फायदे तीला घ्यायचे होते ? किंवा त्या अनिस सिद्दीकी ने हिंदू धर्म का नाही स्वीकारला ? पासपोर्ट अधिकाऱ्याने चौकशी केल्याने तो अडकला .
  • Log in or register to post comments

Submitted by मेघपाल on गुरुवार, 06/21/2018 - 18:03

In reply to मग तीने मुस्लिम धर्म by सोमनाथ खांदवे

Permalink

असले प्रश्न विचारण्याचा

असले प्रश्न विचारण्याचा कुणालाही अधिकार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on गुरुवार, 06/21/2018 - 18:08

In reply to असले प्रश्न विचारण्याचा by मेघपाल

Permalink

आधिकर नाय वो शंका ईचारल्या

आधिकर नाय वो शंका ईचारल्या व्हत्या .
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 06/21/2018 - 19:25

In reply to आधिकर नाय वो शंका ईचारल्या by सोमनाथ खांदवे

Permalink

आधिकार नाय तर शंका कसल्या इचारायच्या ?

https://www.thequint.com/news/india/married-women-never-had-to-change-names-for-passport-modi
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/21/2018 - 18:21

In reply to असले प्रश्न विचारण्याचा by मेघपाल

Permalink

वर्तमानपत्रातील बातम्या वाचून

वर्तमानपत्रातील बातम्या वाचून आपले मत प्रदर्शित करण्याअगोदर त्यातील किमान सत्य काय हे जाणून घ्यायची कुणालाच गरज वाटत नाहीये? परवा वाकडी गावात दोन दलित मुलांना सवर्णांनी बेदम मारहाण केली आणि नग्न करून धिंड काढली म्हणून सगळे पुरोगामी/ सेक्युलर/ बुद्धिवादी इ इ ऍट्रॉसिटी कायदा लावा म्हणून कावकाव करत होते. त्यात कोणताही सवर्ण नव्हता अनि वस्तुस्थिति संपूर्ण पणे वेगळी आहे हे नंतर लक्षात आले. त्यानंतर हे बोकड गप्प आहेत. अर्धवट माहितिवर बोंबाबोंब करायची सवयच झाली आहे. यानंतरही लोक शिकायला तयार नाहीत हेच आश्चर्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on गुरुवार, 06/21/2018 - 20:32

In reply to असले प्रश्न विचारण्याचा by मेघपाल

Permalink

आपल्या भारतात आसले प्रश्न

आपल्या भारतात आसले प्रश्न इचरायचे नाही आस तुमी म्हनता तर पाकिस्तान चा जिग्री दोस्त चीन मदी बुर्कां बंदी ,दाढी वाढवायला बंदी , देशहीतकारक वागण कम्पलसरी ह्ये चालत?
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on गुरुवार, 06/21/2018 - 20:37

In reply to आपल्या भारतात आसले प्रश्न by सोमनाथ खांदवे

Permalink

दुरूस्ती

ही प्रतिक्रिया मेघपाल यांना व्हती ती चुकून खरे साहेबांकडे गेली
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on गुरुवार, 06/21/2018 - 18:11

In reply to धक्कादायक by manguu@mail.com

Permalink

खरे तर त्याला नोकरीतून काढूनच

खरे तर त्याला नोकरीतून काढूनच टाकायला हवे. का ? तुम्ही म्हणताय म्हणुन ? काही पुरावा आहे ? Mishra defended the questions he asked of the couple saying he was just following procedure The passport officer denied he discriminated based on religion. He also said the woman had a different name on her 'nikahnama' compared with her other documents काही तरी बातम्या ईथे चिकटवुन द्यायच्या हेच काम आहे वाटतय !!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/21/2018 - 18:13

In reply to धक्कादायक by manguu@mail.com

Permalink

खरे तर त्याला नोकरीतून काढूनच

खरे तर त्याला नोकरीतून काढूनच टाकायला हवे. काही चौकशी पुरावा इ असते कि नाही. एका महिलेने तक्रार केली कि काढून टाकले सरकारी नोकरीतून असं नसतं इतकी मूलभूत माहिती आपल्याला नसावी इतका आंधळा द्वेष का मोंगलाई लागून गेली आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/lucknow-passport-officer-defends-questions-to-interfaith-couple/articleshow/64680206.cms हे असे बेताल वक्तव्य करण्यापूर्वी आपण त्याला दुसरी बाजू असू शकते वगैरे काही लक्षात घेणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 06/21/2018 - 19:23

In reply to खरे तर त्याला नोकरीतून काढूनच by सुबोध खरे

Permalink

छान

https://www.thequint.com/news/india/married-women-never-had-to-change-names-for-passport-modi कुणाचे खरे अन कुणाचे खोटे .... ??? !!!
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on गुरुवार, 06/21/2018 - 21:07

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

मंगु शेठ , हिंदुधर्मियांच्या कायम सतत पाया पडणाऱ्या

लोकसत्ता ची च ही बातमी , सकाळी त्या बातमी वर विश्वास ठेवून अधिकाऱ्याला नोकरीवरून कमी करण्याचा सल्ला तुम्ही दिला होता , आता या बातमीवरून त्या दोघांवर सरकारी कामात अडथळा सारखा सौम्य गुन्हा (देशद्रोह नाही ) नोंदवण्याचा सल्ला द्याल का ? आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्याला द्वेषपूर्ण वागणूक दिल्याचा आरोप असलेल्या लखनौच्या पासपोर्ट अधिकाऱ्यानं आपली काहीही चूक झाली नसल्याचा व आपण केवळ नियमांची अमलबजावणी करत असल्याचा दावा केला आहे. विकास मिश्रा असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याची लखनौमधून गोरखपूरला बदली करण्यात आली आहे. हिंदू पत्नी व मुस्लीम पती असलेल्या या दांपत्याने मिश्राविरोधात तक्रार केली, ट्विट केलं आणि देशभरात यावर उलटसुलट चर्चा घडल्या. परराष्ट्र खात्यानं याची दखल घेत मिश्रांची बदली केली तसेच या दांपत्याला पासपोर्टही दिला. मात्र आता मिश्रा यांच्या सांगण्यानुसार पत्नीचे नाव निकाहनाम्यावर वेगळे होते व अन्य कागदपत्रांमध्ये वेगळे होते त्यामुळे मी जास्त पुरावे देण्याची मागणी केली. लग्नानंतर महिलेनं नाव बदललं पाहिजे किंवा तिच्या पतीनं हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे असं आपण बोललेलोच नाही असंही मिश्रा यांनी म्हटलं आहे. तन्वी सेठ व अनास सिद्दिकी या जोडप्याच्या सांगण्यानुसार मिश्रा यांनी असं म्हटलं की, "माझ्या फाइलमध्ये मी मुस्लीम व्यक्तिशी लग्न करूनही माहेरचं नाव ठेवल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे." त्याचवेळी लग्नानंतर नाव बदलायला हवं असा सल्लाही मिश्रांनी दिल्याचं सेठ म्हणाल्या. त्यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे या घटनेची ट्लिट करून तक्रारही केली. https://twitter.com/tanvianas/status/1009353189852958720 मिश्रा यांनी ही चुकीची माहिती असल्याचं आज सांगितलं आहे. निकाहमान्यावर शाझिया अनास असं नाव होतं, परंतु कागदपत्रं भरताना तिनं नाव बदललं नसल्याचं सांगितलं. मी तिला निकाहनाम्यावरील नाव पासपोर्टवर देण्यास सांगितलं ज्यास तिनं नकार दिला, परिणामी मी तिला वरिष्ठांकडे पाठवल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे. कुठल्याही प्रकारे धार्मिक भेदभाव आपण केला नसल्याचे ते म्हणाले. मी स्वत: आंतरजातीय विवाह केला असून सर्व धर्मीयांचा मी आदर करतो असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मिश्रा यांची बदली करण्यात आली असून त्यांना कारणे दाखवा नोटिसही बजावण्यात आली आहे. लखनौ येथील कार्यालयाकडूनही परराष्ट्र खात्याने अहवाल मागवला आहे. हा सगळा प्रकार बुधवारी तनवी सेठ यांनी ट्विट केल्यानंतर सुरू झाला. अनासचं नाव घेऊन चारचौघांदेखत आपला अपमान केल्याचा आरोप तन्वी यांनी मिश्रा यांच्याविरोधात केला आहे. अनास यांचा पासपोर्ट नूतनीकरण करायचा असल्यास त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा असं मिश्रा म्हणाल्याचं तनवी ट्विटमध्ये म्हणाल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 06/21/2018 - 22:35

In reply to मंगु शेठ , हिंदुधर्मियांच्या कायम सतत पाया पडणाऱ्या by सोमनाथ खांदवे

Permalink

हातभर उगाचच लिहिलेत

परराष्ट्र खात्यानं याची दखल घेत मिश्रांची बदली केली तसेच या दांपत्याला पासपोर्टही दिला. मिश्राचे म्हणणे असे की - निकाह नाम्यावर नाव भिन्न होते व ती जुन्या म्हणजे हिंदू नावाने अर्ज करत होती , पासपोर्ट नाकारायला हे खरोखरच valid reason असते , तर त्याप्रमाणे अर्ज रीतसर Reject करता आला असता व लेखी rejection लेटर देता आले असते , पण त्याऐवजी हे कसली चरचा करत होते कुणास ठाऊक. पासपोर्टच्याच हायर ओथॉरिटीने काही तासातच तीच document , त्याच अर्जावर म्हणजे हिंदू नाव स्वीकारून पासपोर्ट दिला , म्हणजे मिश्राचे reason legally valid नव्हते , तरीही मिश्रा कदाचित अज्ञानाचा बळी असू शकेल आजकालचे cc TV ऑडिओ व्हिडीओ दोन्ही रेकॉर्ड करू शकतात , असे क्यामेरे आजकाल अगदी फडतूस कंपनीतही असू शकतात , paasport office लाही कदाचित असतील ,
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com