Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by manguu@mail.com on Tue, 06/12/2018 - 19:03
भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे. भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती. भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.
  • Log in or register to post comments
  • 118034 views

प्रतिक्रिया

Submitted by सुबोध खरे on Tue, 06/19/2018 - 18:53

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

सोम(रस)नाथांचे

सोम(रस)नाथांचे

अशा वैयक्तिक प्रतिसादावर आता पुरोगामी/ सेक्युलर इ इ स्वतःला म्हणवणारे लोक गळा काढून रडत नाहीत आणि संपादक मंडळाकडे दाद मागत नाहीत यात आश्चर्य ते काय?
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 19:00

In reply to सोम(रस)नाथांचे by सुबोध खरे

Permalink

छान

इतके माफक विनोद मिपावर चालत असावेत
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 06/19/2018 - 19:15

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

तुम्हाला काय हो माहिती तुम्ही

तुम्हाला काय हो माहिती तुम्ही तर मिपा वर सातच महिने आहेत ना?
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 19:40

In reply to तुम्हाला काय हो माहिती तुम्ही by सुबोध खरे

Permalink

का ?

पूर्वी लिहून ठेवलेले सात महिन्यात वाचता येत नाही का ?
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Tue, 06/19/2018 - 19:48

In reply to सोम(रस)नाथांचे by सुबोध खरे

Permalink

ज्याला त्रास होतो त्याने

ज्याला त्रास होतो त्याने आवश्य मागावी की दाद. दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन किती दिवस गोळ्या झाडणार.? ते भाजपवाले पण तसेच नाचता येईना पीडीपी वाकडी...!!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 06/19/2018 - 20:09

In reply to ज्याला त्रास होतो त्याने by विशुमित

Permalink

ज्याला त्रास होतो त्याने

ज्याला त्रास होतो त्याने आवश्य मागावी की दाद. माझ्या एका (दुसऱ्याला दिलेल्या) प्रतिसादावर तुम्ही रडत संपादक मंडळाकडे गेला होतात ते एवढ्यात विसरलात? तेंव्हा तुझा धर्म कुठे गेला होता राधासुता
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Tue, 06/19/2018 - 20:25

In reply to ज्याला त्रास होतो त्याने by सुबोध खरे

Permalink

रडत??

खरे साहेब मी प्रोपर चॅनलने माझी कैफियत मांडली होती. दुसरे कोणी येऊन माझ्या साठी प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा ठेवत नाही. एखाद्याचे नाही पटले तर थेट त्यालाच बोलतो. === जरा अदबीने. फोर्सची भाषा फोर्स मधे ठेवा. येथे सिनियर जुनियर मी खपून नाही घेणार. फक्त मुद्द्यावर बोला.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 06/19/2018 - 20:39

In reply to रडत?? by विशुमित

Permalink

प्रतिसाद तुमच्या साठी नसताना

प्रतिसाद तुमच्या साठी नसताना तुम्हाला मध्ये पडायला कुणी सांगितलं होतं? इथे हे मंगू सोमनाथ मध्ये सोमरस आणून काय म्हणता आहेत ते स्पष्ट आहे. दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन किती दिवस गोळ्या झाडणार.? हे वाक्य आपलेच आहे ना फोर्सचा मुद्दा/सिनियर ज्युनियर चा मुद्दा तुम्ही आणला आहे. मी नाही. बाकी घाव वर्मी लागला आहे असे दिसत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 20:47

In reply to प्रतिसाद तुमच्या साठी नसताना by सुबोध खरे

Permalink

हायला

गम्मतच सोमर्सनाथ म्हटले कुणाला , तर खरेसाहेब मध्ये पडले, आणि दुसर्याना सांगतात , मध्ये का पडताय ? !!
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Tue, 06/19/2018 - 21:32

In reply to हायला by manguu@mail.com

Permalink

मंगु शेठ आणि सोमरस .

  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Tue, 06/19/2018 - 22:10

In reply to हायला by manguu@mail.com

Permalink

मंगु शेठ आणि सोमरस .

जरा सायकल मारायला ग्येलो तवर लैच गोंधळ झालेला दीसतोय . मंडळी , दिवस पावसापाण्याचे हायेत मंगुशेठ ला झाली आसल आठवण सोमरस ची ☺☺☺. मीपा वर प्रबळ इरोधक असल्या शिवाय धागा हजारी पर्यंत जाणार नाय , त्या साठी मंगुशेठ आणि विषुमीत सायबा चे आभार मानले पायजेत . नायतर लोकसभेत बगा आलिबाबा आणि त्याचे 44 चोर मंगुशेट ने भरलेल्या इन्कमटॅक्स मदून ( अस त्ये म्हणत्यात ) फुकट पगार घ्येऊन गेल्या 4 वर्ष्यात लोकसभेचे यक भी अधिवेशन पूर्ण व्हऊन नाय दिल , रोज इनाकारण गोंधळ घालून कुठंतरी लग्नाला बड्डे ला जायला मोकळे . माहितगार, ट्रेडमार्क, खरे, म्हात्रे ,अर्धवटराव, प्रसाद ,मंगुशेट आणि विषुमीत पण तुमी सगळे मिपावर दिपस्तंभा सारख कार्यरत आहात , तुमच्या मूळ आमच्या सारख्या नवख्या लोकांना मिपावर सराईत पने वावरता येतय.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Tue, 06/19/2018 - 21:15

In reply to प्रतिसाद तुमच्या साठी नसताना by सुबोध खरे

Permalink

आम्हाला मास्तर आणि

आम्हाला मास्तर आणि फोर्सवाल्यांच्या भाषेचा घरूनच अनुभव आहे. त्यांचा मान ठेवत असूनही मास्तर लोकांना सगळे जण विद्यार्थीच वाटतात आणि फोर्सवाल्यांना रंगरूट! नाईलाजाने मिपावर तुम्हाला असे बोलावे लागले. ==== प्रतिसादांचा क्रम कृपया पुन्हा पाहून घ्या. माझे म्हणणे कदाचित तुम्हाला पटेल.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 18:13

Permalink

काश्मिर राजकीय भूकंप

किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्यानंतरच युती झाली. मुफ्ती सरकारला केंद्रसरकारने भरपूर मदत केली... असे भाजप सांगत आहे , मग किमान कार्यक्रम जर होता तर अपयशाचे धनी भाजपही आहेत ना ? काश्मीरबाबत
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 18:23

In reply to काश्मिर राजकीय भूकंप by manguu@mail.com

Permalink

सगळ्या राजकीय गोंधळात,

सगळ्या राजकीय गोंधळात, काश्मिरात गुप्तचर यंत्रणा प्रभावी पणे काम करु शकल्या नाहीत याकडे दुर्लक्ष होते आहे आणि गुप्तचर यंत्रणांचे कामाचा प्रभाव कसा वाढवता येईल हे पाहिले जावयास हवे पण त्या दिशेच्या विश्लेषण आणि अंमलबजावणीचा अभाव दिसतोय हि खेदाची बाब आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Tue, 06/19/2018 - 18:35

In reply to काश्मिर राजकीय भूकंप by manguu@mail.com

Permalink

भाजपच दोषी हे ठरवायच्या आदी

भाजपच दोषी हे ठरवायच्या आदी चाच्या नेहरूंनी ( ह्ये जमिनी वरचे चाचे ) काश्मीरप्रश्न कसा वाढवला ह्ये बी इसरू नगा . यका मुस्लिमबहुल राज्याला आंतराष्ट्रीय पातळीवर चमकून ठ्येवायची काय गरज व्हती? . 556 का काय तरी संस्थानें देशात शामिल क्येली आणि फकस्त काश्मीरप्रश्नी **मारली , तवा पासून देशाच्या डोक्यावर ती जखम भळभळत हाये . ती जखम बरी बी व्हत नाय आन कापून पन टाकता यत नाय . मंगुशेठ तुमी इस्पितळात आसता ( ह्ये तुमीच लै येळा सांगितलंय ) त्यामुळ तुमाला ही कंडिशन चांगलीच म्हैत असणार .
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 06/20/2018 - 13:06

In reply to भाजपच दोषी हे ठरवायच्या आदी by सोमनाथ खांदवे

Permalink

खांदवे जी ..

<<<भाजपच दोषी हे ठरवायच्या आदी चाच्या नेहरूंनी ( ह्ये जमिनी वरचे चाचे ) काश्मीरप्रश्न कसा वाढवला ह्ये बी इसरू नगा >>> ==>> खांदवे जी... मिपा सदस्य आनंद मोरे यांचे खालील अभ्यासपूर्ण लेख काश्मीरप्रश्न समजून घ्यायला उपयुक्त ठरतील, असे मला वाटते. बऱ्याच पूर्वग्रही समजुतींना छेद जाण्याचा संभव आहे, त्यामुळे कृपया तुमच्या रिस्क वर वाचा. https://www.misalpav.com/node/35013 https://www.misalpav.com/node/35018 https://www.misalpav.com/node/35041 https://www.misalpav.com/node/35059 https://www.misalpav.com/node/35083 https://www.misalpav.com/node/35109 https://www.misalpav.com/node/35166
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 06/19/2018 - 18:20

Permalink

हा माणुस अशी विधाने कोणत्या

हा माणुस अशी विधाने कोणत्या आधारावर करतो हेच कळत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार: उद्धव
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 06/19/2018 - 18:34

In reply to हा माणुस अशी विधाने कोणत्या by प्रसाद_१९८२

Permalink

हा माणुस अशी विधाने कोणत्या आधारावर करतो हेच कळत नाही.

अर्थात बारामतीच्या आधारावर. फडणवीस सरकार बहुमत प्रस्ताव जिंकलं ते बारामतीच्या पाठिंब्यावर. पुढल्या वेळी तसं काहि सेनेबद्दल होणारच नाहि याची काय शाश्वती. सेनेची मदत पवारसाहेबांना दिल्लीत होणार आणि मुंबईत सेनेला बारामतीचा पाठिंबा मिळणार.
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Tue, 06/19/2018 - 18:46

Permalink

पावसापाण्याच्या दिवसात सोमरस

  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Tue, 06/19/2018 - 18:50

Permalink

मंगुशेट ला आतेरीक्या चें

मंगुशेट ला आतेरीक्या चें कंबरडे इथून पुढ जरा ज्यास्तच मोडलं जाईल याची काळजी वाटती का काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 06/19/2018 - 19:11

In reply to मंगुशेट ला आतेरीक्या चें by सोमनाथ खांदवे

Permalink

मंगुशेट ला आतेरीक्या चें

मंगुशेट ला आतेरीक्या चें कंबरडे इथून पुढ जरा ज्यास्तच मोडलं जाईल याची काळजी वाटती का काय ? << --- खांदवे साहेब, भाजपांने पाठींबा काढून घेतला म्हणून अतिरेक्यांचे कंबरडे वगैरे मोडले जाण्याची शक्यता शून्य आहे, निदान या केंद्रसरकार कडून तरी. मुळात घुसखोरी करणारे अतिरेकी हे वारुळातून निघणार्‍या मुंग्याप्रमाणे आहेत ह्यांना कितीही ठेचले तरी हे अतिरेकी त्यांना आश्रय देणारा पाकिस्तान व आय एस एस शाबुत आहेत तोपर्यंत येतच राहणार. अतिरेक्यांना आश्रय देणार्‍या पाकिस्तानचे कंबरडे खरे तर मोडायला हवे मगच काश्मिरमधील दहशतवादाचा काही निकाल लागेल असे वाटते. ---- तशीही आता निवडणुक लागणारच आहे. त्या निवडणुकीच्या भाषणात मोदी परत एकदा 'एक सर के बदले दस सर लायेगें', 'पाकिस्तान की ईट से ईट बजा देंगे' वगैरे भाषणे करुन पाकिस्तानचे कंबरडे नक्की मोडतील असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 06/19/2018 - 19:28

In reply to मंगुशेट ला आतेरीक्या चें by प्रसाद_१९८२

Permalink

प्रसाद साहेब

प्रसाद साहेब काश्मीर मधील पर्यटक मोसम संपत आला आहे. तेथील सामान्य माणसांचे पोट हे पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. सैनिक कारवाई करताना हा पण विचार करावा लागतो कि गरीब पण भारताशी निष्ठा असणाऱ्या लोकांच्या पोटावर पाय येणार नाही. तेंव्हा रमजान च्या महिन्यात सैनिकी कार्यवाही न करता खोर्रे शांत राहील हे पाहिले गेले. रमजानच्या पवित्र महिन्यात आम्ही रक्त वाहत नाही हे दाखवताही आले आणि गरीब जनतेच्या पोटावर पाय हि आला नाही. मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकार मधील अनेक मंत्री हे दहशवादी/ फुटीरतावादाला धार्जिणे असल्याने पकडलेल्या दहशतवाद्यांना सोडवण्यासाठी ते काश्मीर पोलिसांवर दबाव आणत होते. लष्कर आणि केंद्रीय सशस्त्र सैनिक दले आम्हाला मुक्त हस्ताने काम करू द्या हि मागणी करीत होते. गळू हे पिकल्याशिवाय फोडले तर रुग्णाला जास्त त्रास होतो हि वस्तुस्थिती आहे. येणाऱ्या काळात तेथे राष्ट्रपती राजवट आणून काश्मीर पोलिसांवरील दबाव कमी होईल आणि सशस्त्र दलांना मुक्त हस्त देता येईल असे मला वाटते. लाल किल्ला, गांधी मैदान, शिवतीर्थावरून जोरदार भाषण देणे हा राजकारणाचा एक भाग असतो कारण अशीच भाषणे लोकांना भावतात हे अनुभव आहेच. बाकी जास्त लिहीत नाही. (काड्या टाकणारे फुकटच्या काड्या टाकणारच. अशा दळभद्री लोकांकडे दुर्लक्ष करतो आहे.) सुज्ञास सांगणे न लगे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 06/19/2018 - 19:31

In reply to प्रसाद साहेब by सुबोध खरे

Permalink

A total of 220 militants were

A total of 220 militants were killed under the operation by the Indian security forces in 2017. The security forces were able to persuade 82 youth to abandon militancy and come back. 78 security personnel were also killed in militant related violence. As of 19 May 2018, a total of 91 militants and 20 security personnel have been killed in operations.[107] A unilateral ceasefire was declared by the Indian Government on 14 May where the security forces were asked not launch new operations during for Ramadan https://en.wikipedia.org/wiki/Operation_All_Out_(Kashmir)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 06/19/2018 - 19:33

In reply to A total of 220 militants were by सुबोध खरे

Permalink

शस्त्रसंधी असूनही मे आणि जून

शस्त्रसंधी असूनही मे आणि जून मध्ये ३० दहशतवाद्यांना मारलेले आहेच. तेंव्हा भाषणबाजी हि जनतेसाठी आवश्यक असतेच आणि कार्यवाही आपल्या जागी चालूही असतेच
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Tue, 06/19/2018 - 22:56

In reply to मंगुशेट ला आतेरीक्या चें by प्रसाद_१९८२

Permalink

माईंड इट ऍण्ड नोट इट !!!!

भाजप नी पाठिंबा काढण्याचा जुगार इनाकारण नाय खेळला , काश्मीर शांत होवो ना होवो पण आज आत्ता या क्षणा पासून तुमी रोज स्कोर बगा किती आतेरिकी मारले जात्यात . आणि आस करून सुदा दहशतवाद थांबणार नै ह्ये बी खर कारण पाकिस्तान च आडव शेपूट व काश्मिरी जनते ( मुस्लिम असल्या मुळे , ची भारता बरोबर 60 वर्षात कधीच नाळ जुळलेली नाय .
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 06/20/2018 - 08:00

In reply to माईंड इट ऍण्ड नोट इट !!!! by सोमनाथ खांदवे

Permalink

....आणि आस करून सुदा दहशतवाद

....आणि आस करून सुदा दहशतवाद थांबणार नै ह्ये बी खर कारण पाकिस्तान च आडव शेपूट व काश्मिरी जनते ( मुस्लिम असल्या मुळे , ची भारता बरोबर 60 वर्षात कधीच नाळ जुळलेली नाय ...
मला कळत नाही हिंदुत्ववादी मंडळी त्यांच्याही नकळत पाकिस्तानला ऊपयूक्त भूमिका कशा मांडतात ? भारतच्या सांस्कृतिक जडणघडणीत काश्मिरचे मोठे योगदान राहीले आहे तसे काश्मिरच्या सांस्कृतिक जडणघडणीत उर्वरीत भारताचे मोठे योगदान राहीले आहे. सांस्कृतिक दृष्ट्या काश्मिरी जनता भारतीय नसती तर भारतीय संस्कृती आकारास आलीच नसती, काश्मिरी जनतेची नाळ भारता सोबत जोडलेली नसती तर भारतीयांना काश्मिर आपला का वाटला असता ? भारताने काश्मिर आपले असल्याचा कशाला हकनाक दावा केला असता ? काश्मिर मधला दहशतवाद हा १९८४ नंतरची मुख्यत्वे १९९० नंतरची देण आहे आणि तीही पाकीस्तानी गुप्तचर संस्थांनी तेथील तरुणांच्या डोक्यांवर बंदूका ठेवल्या मुळे त्यांच्यातील सुफी संस्कृती पुसून धर्मांधता भरल्यामुळे. त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम असूनही पाकीस्तानी अतिरेक्यांनी डोक्यावर बंदूका ठेवल्यावर ते व्यक्त कसे करू शकतील ? त्यामुळे तिथला दहशतवाद निपटला कि ते भारताबद्दलचे देशप्रेम मनमोकळेपणाने व्यक्त करु शकतील . त्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणाम्नी अधिक सक्रीय होऊन दहशतवाद संपवण्यास आपल्या जवानांना मदत केली पाहीजे.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 06/20/2018 - 15:01

In reply to ....आणि आस करून सुदा दहशतवाद by माहितगार

Permalink

प्रतिसादाशी खूप अंशी सहमत आहे

प्रतिसादाशी खूप अंशी सहमत आहे. ===== काश्मीर प्रश्नाबाबत माझे काही अल्प आकलन आहे त्यानुसार काही मुद्दे मांडू इच्छितो. त्यात कृपया अधिकची भर घाला किंवा जिथे चुकतंय ते हटवा. १. ३७० कलम- काश्मीर प्रश्न म्हंटलं की पहिले ३७० कलमाला पुढे केले जाते. कोणत्याही सरकारला काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी अडचणींचा ठरलेला आणि तो हटवण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची असमर्थता असेल तर त्याला बगल देऊन इतर मार्ग अवलंबण्याचा रूट मॅप बनवला पाहिजे. रस्त्यात आलेल्या मोठ्या दगडाला हटवू शकत नसेल तर त्यावर डोके आपटून फोडून घेण्यात काय हासील आहे ? यावर विचार व्हावा. ----- २. फुटीरवादी- जेव्हा तेव्हा बघावं काश्मीरबाबत पाकिस्तानबरोबर काही चर्चा करायची म्हंटले की या फुटीरवाद्या नेत्याचे चोचले पुरवताना सगळी सरकारे दिसली आहेत. तुम्ही म्हणता तसे पाकिस्तान शत्रूराष्ट्र आहे, ते त्याच्या देशाच्या नीतिमूल्यावरच चालणार. @प्रसाद- म्हणतात तसे अतेरिकी हे वारुळातून निघणाऱ्या मुंग्यांसारखे आहेत, मारून किती स्कोर लिहीत बसणार? पण ह्या चर्चेत गिलानी, मलिक वगैरे हे फुटीरवादी नेते खुसपट काढून नेहमी खोडा घालत असतात. यांचे एकदा सर्जिकल स्ट्राईक करून टाका की. जास्तीत जास्त काय होईल त्यांचे समर्थक थोडा दंगा घालतील. पण एकदा मूळ आणि खोड छाटले तर बाकी फांद्या-पाने आपोआप गळून पडतील. मग चर्चेसाठी उरतील ते फक्त अब्दुल्लाह- मुफ्ती कुटुंब जे भारतीय संविधानाच्या मूल्यांना थोडेफार मानतात तरी. संविधानाच्या चौकटीमध्ये त्यांना गुंतवून मॅनेज करून पाकिस्तान बरोबर सशक्त चर्चा करू शकतो. (काश्मीर प्रश्नात दखलंदाजी करू नये म्हणून त्रयस्थ देशांना तर आपण आधीच लांबच ठेवले आहे ) ----- ३. सोशिओ- इकॉनॉमिक कॅल्स्टर- काश्मीर मधली जनता/गावे/शहरे भौगोलिक दृष्ट्या विखुरलेली आहेत. त्यामुळे प्रशासकीय सेवा, रोजगार, दहशतवादी कारवायांपासून जनतेचे रक्षण करणे हे तेथील सरकारांसाठी जिकिरीचे ठरत असते. त्यासाठी सोशिओ- इकॉनॉमिक कॅल्स्टर असणाऱ्या स्मार्ट सिटी सदृश शहरे अशा ठिकाणी वसवावीत जेथे कमीत कमी अतिरेकी हल्ले होऊ शकतील. जम्मू-काश्मीर मध्ये अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे अशी शहरे वसवता येतील. बहुतांशी जनता त्या कॅल्स्टर मध्ये डिप्लॉय करा. त्यांना सुवातीला मोफत घरे, शिक्षण, नोकऱ्या आणि इतर सोयी सुविधा देऊ करा. ऐहिक सुखापुढे कट्टरतावाद कमी होत जाईल. ---- ४. काश्मिरीचा विश्वास संपादित करणे- सैनेचे अधिपत्य असल्याकारणाने काश्मिरी जनता दैनंदिन जीवनात खूप जखडलेल्या अवस्थेत जगते आहे. हे कोणीही मान्य करेल. (सदन कमांडच्या एरियात हेल्मेट सक्ती सुद्धा पुणेकरांना सहन होत नाही तिथे त्या काश्मिरींनी काय करावे?) एकदा कानफाट्या म्हणून शिका बसला की तो जाता जात नाही. व्हाट्सअप युनिव्हर्सिटी मधून विद्यार्जन करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगावा. थोडे प्रेमाने बोलून तर बघा. मारक्या बैलाला जर दोन्ही शिंगाच्या मध्ये थोडे कुरवाळले तर ते पण आपला हात जिभीने चाटायला लागतंय. ही मीडिया आणि राजकारणी उत्तरभारतीय पब्लिकला राजकीयदृष्ट्या खुश ठेवण्यासाठी काश्मीरचे प्रमाणापेक्षा भडक चित्र उभे करत आहेत. प्रत्येक्षात त्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत. इतर राज्यातील जनतेने काश्मिरी लोकांवर सरसकट देशद्रोही म्हणून शिक्कामोर्तब करणे शक्य तितक्या टाळावे. आपल्याला फक्त काश्मीरची जागा नकोय काश्मिरी लोक देखील हवेत...!!
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 06/20/2018 - 17:34

In reply to प्रतिसादाशी खूप अंशी सहमत आहे by विशुमित

Permalink

मुद्दे उलट्या क्रमाने चर्चेस

मुद्दे उलट्या क्रमाने चर्चेस घेतो
...आपल्याला फक्त काश्मीरची जागा नकोय काश्मिरी लोक देखील हवेत...!!
सहमत आहे, मुस्लीम समाजही गुण्या गोविंदाने किंवा यशस्वीपणे नांदवल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदुत्ववाद्यांमधील असुरक्षीततेची भावना -ती दोन्ही समुदायात आहे- आणि कल्पकतेचा अभाव त्यांना संकुचिततेकडे घेऊन जातो. मुख्य म्हणजे आपले मुद्दे तार्कीक पणे पटवण्या एवजी -आणि तार्कीकपणे पुढे ठेवणे शक्य असूनही- भावनिक गोंधळ जास्त घातला जातो -अनुभवातून शिकतील नाही असे नाही. वास्तविक पहाता जगातल्या सर्व धर्म पंथांना काखेत घेऊन संसार करण्याची हिंदू धर्मात व्यवस्थीत क्षमता आहे आणि भारत देशातही, फक्त स्वतःवर विश्वास आणि सकारात्मक कल्पकता हवी. भारतातल्या अनेक राज्यातील अतीरेकी चळवळी आटोक्यात येऊन ती राज्ये मार्गी लागली तसे काश्मिरही एक दिवस मार्गी लागेल .
इतर राज्यातील जनतेने काश्मिरी लोकांवर सरसकट देशद्रोही म्हणून शिक्कामोर्तब करणे शक्य तितक्या टाळावे.
सहमत
..प्रत्यक्षात त्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत.
अडचणींची दखल अवश्य घ्यावी पण फुटीरता वादाची कारणे अन्यत्र आहेत त्यांचा स्वतंत्र पणे विचार व्हावा असे वाटते.
..थोडे कुरवाळले तर
कुरवाळण्यास आजीबात हरकत नाही पण त्याला मारता येणारच नाही अशा क्लृप्त्या यशस्वी करावयास हव्यात.
...सैनेचे अधिपत्य ...
प्रसंगी सेनेचे अधिपत्य असलेच पाहीजे. खरेतर इतर बहुसंख्य देशा प्रमाणे निशस्त्र गुन्हगारांना आपली सेना हातही लावत नाही , केवळ पोलीसा ंच्या स्वाधीन करते, पोलीसही स्थानिक असतात ह्याकडे वेळोवेळी लक्ष वेधले पाहीजे कारण पाकीस्तान चीन भारतीय सेनेला जाणीवपुर्वक बदनाम करत असतात. खरेतर मानवता पूर्णतेसाठी भारतीय सैन्याचे रेकॉर्ड जगातल्या इतर सेनांपेक्षा नक्कीच अधिक चांगले आहे. एक घटनात्मक अडचण आहे, भारतीय केंद्र सरकार कडे राखीव दले असली तरी राज्यसरकारांच्या पोलीसांची जागा घेऊ शकत नाहीत ही घटनात्मक अडचण दूर केली पाहीजे म्हणजे भारतभरातील सर्वराज्यातील पोलीस आधीकारी आणि सि आयडि पात्रतेनुसार वेगाने डेप्युटेशनवर अस्थीर प्रदेशात पाठवता आली पाहीजे , ब्रिटीशांनी पोलीसदलांचे काम अशाच पद्धतीने करुन घेतले ना सेना केवळ मोठ्या सशस्त्र संघर्षात हस्तक्षेप करत होती, पण हा घटनात्मक बदल झाल्या शिवाय सेना काढणे डाव्यांना वाटते तेवढे सोपे नसावे. सिव्हीलीअन्सशी डिल करण्यासाठी बाहेरच्या महिला पोलीस आणि सेनेतही मोठी वाढ करावयास हवी, काय अहे महिलांच्या बाबतीत एखादी अपवादात्मक खालीवर झाले की ज्यांनी खपुन चांगले कार्य केले त्या सर्व पोलीसांच्या आणि सेनेच्या कामावर हकनाक पाणी फिरते आणि फुटीरता वादी अशा अपप्रसिद्धी करण्याच्या संधी ची वाट पहातच असतात. म्हणून बाहेरील राज्यातून भरपूर महिला पोलीस/सेनादले व्यवस्थीत संरक्षण देऊन पाठवल्या पाहिजेत.
कॅल्स्टर
ईझी टू पोलिस क्लस्टर्सची आयडीया चांगली आहे. उंच टेहळ्णी मनोरे आणि कोणतीही सशस्त्र हालचाल करता येणार नाही ईलेक्ट्रॉनीक नाकाबंदी करणे आजच्या तंत्रज्ञानास अगदी शक्य आहे. मी स्वतः सिव्हीलीअन एरीआस कंट्रोल करु शकतील अशी सेक्युरीटी ईक्विपमेंटस अभ्यासली आहेत , प्रश्न पुन्हा कल्पकतेचा येतो.
...काश्मीर प्रश्नात दखलंदाजी करू नये म्हणून त्रयस्थ देशांना तर आपण आधीच लांबच ठेवले आहे
हे ठिक आहे, पाश्चात्य पॉलीटीकल सायन्सच्या विषयाच्या अभ्यासाच्या माध्यमातून धर्माध्ष्टीत राष्ट्र हि संकल्पना पसरवली गेली ती असंख्य भारतीयाम्च्याही डोक्यात आहे आणि बहुतांश युरोमेरीकन सेक्युलर देशियांच्याही डोक्यात आहे. -काय होते सौदी अरब इज्राएल ह्या देशांची धर्माधीष्ठता युएसए स्वतःच्या सोईसाठी सुरक्षीत राहू देते म्हणून युरोमेरीकन देश मिडीया अकॅडेमिक्स सगळेच त्यांच्या नागरीकांनाही त्यात काही वावगे नाही ह्या भ्रमात ठेवतात. म्हणून मग काश्मिरींना धार्मीक आधारावर बाजूला करण्याच्या मागणीत मुदलात २०-२१च्या शतकात तथ्य नाही हे पटवणे अवघड जाते पण परदेशात असलेल्या प्रत्येक भारतीय वंशाच्या व्यक्तीने हा मुदा त्यात्या देशात जोरकस पणे लावून धरला पाहीजे. सांस्कृतिक एकत्वाचे पुरावे जोरकसपणे पुढे मांडले पाह्जेत म्हणजे अ‍ॅडव्हर्स मिडीया पब्लिसिटी होणे पाकीस्तानी आणि विवीध फुटीरता वाद्यांना शस्त्रास्त्रे आर्थीक मदत मिळण्यावर बंधने येऊ शकतात. फ्रान्समध्ये अतीरेकी हल्ला झाला की शस्त्रे कुठून आली यावर चर्चा होते, अशा वेळी भारतीयांनीही आमच्याही देशात शस्त्रास्त्रे घेऊन अतीरेकी फिरतात युरोमेरीकेतून होणार्‍या शस्त्र पुरवट्यावर रोक लावण्याची मागणी मिडीयात जोरकस लावून धरली पाहीजे.आपल्याकडेचे सिव्हीलीयन मारले गेले कि अशा घटनांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनी जगभर फिरवल्या पाहीजेत . पाकीस्तानी चीनी मिडीया पब्लिसिटीत आपल्या पुढे निघून जातात आपले लोक त्यांच्याच प्रसिद्धीला भूरळपाडून घेतात हे कमी होणे गरजेचे आहे. कतार आमेरीकेत जाऊन अल जझिरा चालवण्याचे विचार करते , आपणही परदेश स्थित भारतीय वंशाच्या लोकांना मिडीया हाऊसेस चालवण्यासाठी फायनान्स केले पाहिजे. आमेरीकी मिडीया आणि पब्लिक ओपीनीयनवर मुठभर ज्यू सत्ता गाजवतात त्याला अल जझिराच्या माध्यमातून काउंटर करण्याचा विचार कतार करते , भारतीयांचा मिडियाचा अनुभव का कमी आहे आपणही ती कला का जमवून घेऊ नये.
अब्दुल्लाह- मुफ्ती कुटुंब आणि हुरीयत
जे राजकीय नेतृत्व ऐकणार नाही त्यांना त्यांच्या प्रभाव क्षेत्रापासून दूर नेऊन व्यवस्थित पण राजकीय हालचाली करता येणार नाही अशा ठिकाणी दूर कोपर्‍यात नेऊन टाकणे ब्रह्मदेशचा सम्राट रत्नागिरीला भारताचा बादशहा टिळक मंडालेला हा सर्वोत्तम उपाय आहे. मारले तर सिंपथी मिळते पण पेंशन देऊन दूर कोपर्‍यात टाकले तर बहुतेक जण तीस चाळीस वर्षात पब्लिकच्या विस्मरणात जातात. -३७०- आपल्या चर्चेच्या मुद्यात न आलेली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे * फार्सी लिपीला डोक्यावर बसवून घेणे. उर्दू भाषा ठिक पण फार्सी लिपीवचून तिचे काहीही अडत नाही देवनागरीत व्यवस्थीत चालू शकते. भारतीयांच्या वैचारीक आदान प्रदानाला लिपी भिन्नतेमुळे अडथळा येतो . या मुद्यावर २० व्या शतकाच्या पुर्वार्धात शास्त्रीय काथ्याकुट झालेला होता पण महात्मा गांधी उत्तर नेतृत्वाला त्याचे गांभीर्य कळले नाही. काश्मिरात उर्दू भाषेचे काय काम होते ? शेख अब्दुल्लांना नेहरुंनी परवानगी का दिली ? ब्रिटीशां नी येऊन त्यांची इंग्रजी लादली आम्ही काश्मिरींची त्यांची स्वतःची भाषा लादू शकलो नाही ? भारतीय लिप्या घडवण्यात तर काश्मिरीं स्वतळ्च्चे योगदान होते . कमाल आहे, हा फालतू पणा सक्तीने बंद करावयास हवा. * शालेय पुस्तके माध्यमे यातून प्रत्येक भारत विरोधी अथवा हिंदू धर्मा बद्दल अपसमज पसरवले जाणे टिपून वगळायला हवे. याचा सेना प्रमुखांनीही उल्लेख केला आहे. केवळ काश्मिर मधल्याच नाही तर पाकीस्तान त्यांच्या शालेय पुस्तकातून जी काही भारत अथवा हिंदू धर्म विरोधी मांडणी करते ती प्रसिद्धी तंत्राच्या आधारे अभ्यासून अगदी केंब्रिज अ‍ॅनालिटीका स्टाईलने मोडून काढली पाहिजे आणि भारतीय मांडणी पुढे ठेवली पाहिजे . जे स्वतःच्या निवडणूकीसाठी जमते ते देशासाठी का जमू नये ? * ३७० पेक्षा मतपेटीच्या स्थानिक राजकारनात जम्मु काश्मिर विधान सभेने नागरीकत्व आणि विवाह कायदे देश विरोधी केले आहेत तेवढे सक्तीनी बदलले तरी पुरेसे आहे . * आणि उर्वरीत भारतीयांना त्यांच्या मध्ये रहाण्याची इज्राएल प्रमाणे सुरक्षीत पण सक्तीने व्यवस्था करावी. आणि त्यांच्या १४ ते ४० वर्षे वयोगटाच्या चार पिढ्यांना उर्वरीत भारतात विवीध मार्गाने सामावून टाकावे. असो तुर्तास विराम
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 06/19/2018 - 20:01

In reply to मंगुशेट ला आतेरीक्या चें by सोमनाथ खांदवे

Permalink

आतंकवाद आणि काश्मीरप्रश्न.

दहशतवाद हे काश्मीरप्रश्नाचे एक अंग आहे, किंवा बायप्रॉडक्ट म्हणा हवं तर. ज्याला आपण काश्मीरप्रश्न म्हणतो/समजतो, ज्या प्रश्नावर जगातल्या अनेकांचे उखळ पांढरे झाले, ज्यामुळे असंख्यांची वस्त्रे रक्ताने लाल झाली, तो प्रश्न केंव्हाच बॅकफुटवर गेला आहे. वर्तमानातला, आणि भविष्यात अधिकाधीक गंभीर होत जाणारा काश्मीर प्रश्न म्हणजे या दलदलीत पडणारा ड्रॅगनचा भरभक्कम पाय. हा मुख्य प्रश्न अजुन मेन बोर्डावरच आलेला नाहि, त्यावर चर्चा काय डोंबलाची होणार भारतात.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 20:13

In reply to आतंकवाद आणि काश्मीरप्रश्न. by अर्धवटराव

Permalink

?

...दहशतवाद हे काश्मीरप्रश्नाचे एक अंग आहे, किंवा बायप्रॉडक्ट म्हणा हवं तर. ...
तुम्हाला पाकीस्तानी भूमिकेची मांडणी योग्य वाटते का ? कारण काहीशी अशीच मांडणी करुन पाकीस्तान आधी काश्मीर सीमा प्रश्न (त्यांच्या बाजुने ) सोडवा म्हणते. काश्मिर मधील दहशतवाद मुख्यत्वे झिया उत्तर काळातील पाकीस्तानी आयएसा आयची देण आहे. ही भारतीय भूमिका आहे जी सीमा प्रश्नास वेगळे ठेवते. आणि सीमा प्रश्नावर चर्चा करण्यापुर्वी पाकीस्तानने दहशतवाद्यांना पाठींबा देणे बंद केला पाहीजे असे म्हणते. आणि दहशतवाद्यांना शस्त्रे आकाशातून मिळत नाहीत हा कॉमन सेन्सचा भाग आहे तेव्हा दहशतवादाची जबाबदारी पाकीस्तानची बनते याकडे डोळेझाक करता येत नाही. अर्थात सिमेला फेंसींग रेग्यूलर गस्त असताना दहशतवाद होतो यात भारतीय गुप्तचर यंत्रणांचे अंशतः फेल्यूअर आहे. भारतीय राजकीय फेल्यूअर काश्मिरच्या सिव्हीलीअन एरीआत भारत सरकारला काश्मीरचे पोलीसदल अंशतः बाजूस ठेऊन स्वतंत्र केंद्रीय पोलीसदल घटनात्मक बदल करुन न लादता येणे हे आहे असे वाटते. असो
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 06/19/2018 - 21:54

In reply to ? by माहितगार

Permalink

पाकिस्तानची नेमकी भूमीका काय आहे ?

पाकिस्तानची भूमीका काय आहे काश्मीर प्रश्नी ? सीमावाद त्यांच्या बाजुने सोडवला जावा अशी? कमॉन सर. त्यांची भूमीका स्वच्छ आहे. जोपर्यंत प्रगतीचे इतर कुठले मापदंड स्विकारले जात नाहि तोपर्यंत शेजारी राष्ट्राचे रिसोर्सेस आपल्या कब्जात घेणे, वंश-धर्मादी बाबतीत आपलं वर्चस्व मान्य करवणे, आपली रेषा मोठी करता येत नसेल तर (इव्हन अदरवाईज) इतरांची रेषा लहान करणे... आजवर जगात विरोधी/शत्रुराष्ट्रांमधे जे काहि होत आलं आहे तीच पाकिस्तानची भूमीका आहे. आपण त्यांना काश्मीर द्यायला तयार नाहि कारण उद्या ते दिल्ली मागतील. सिंपल. काश्मीर प्रश्न आजवर असाच होता. त्यात चिनी महत्वाकांक्षेचा धागा जोडला गेला. हळुहळु तो धागा मूळ प्रश्नापेक्षा कितीतरी मोठा होईल. आपण भारतीय मात्र काश्मीरात किती सो कॉल्ड दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि कुठल्या सरकारने तो केला याचीच चर्चा करत राहु. असो. सिंगापुर, कोरीया, युएई वगैरे देशांनी भौगोलीक सीमा वाढवण्याऐवजी प्रगतीची नवीन क्षेत्रं आजमावली (कारणं काहिही का असेनात). तसच काहितरी भारत-पाकिस्तानच्या बाबतीत झालं तर काश्मीर प्रश्न सुटेल. अन्यथा नंदनवन असच जळत राहाणार. अर्थात, भारत, पाक आणि काश्मीरमधे एकाच वेळी शहाणं आणि लोकप्रीय नेतृत्व उदयाला आलं तर ते काहि शांततापूर्ण तोडगा काढतीलही. लेट्स होप सो.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 22:21

In reply to पाकिस्तानची नेमकी भूमीका काय आहे ? by अर्धवटराव

Permalink

तुमचे विधान तुमच्या न कळत

तुमचे विधान तुमच्या न कळत पाकीस्तानची आंतरराष्ट्रीय समुदाया समोरची अधिकृत मांडणी स्विकारत होते त्या कडे मी आपले लक्ष वेधले. अनधिकृत भूमिका काय आहेत हा वेगळा भाग आहे. आपल्या आणि आपल्या शत्रुराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय समुदाया समोरच्या अधिकृत भूमिका काय आहेत हे माहित नसणे आंतरराष्त्रीय समुदायापुढे फजिती करणारे असते . आंतरराष्ट्रीय समुदाया समोर प्रत्येक शब्द मोजून मापून बोलावा लागतो याचे भान भाजपायी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अद्याप पुरेसे आलेले नाही. सुषमा स्वराज त्यांच्या पत्रकार परिषदात शेजारी राष्ट्रांबद्दल उल्लेख करताना दोनदा गडबडल्या आहेत कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या विधानांचे अर्थ काय होतात या बद्दलची अनभिज्ञता आणि निष्काळजी. काळाच्या ओघात अनुभवातन शिकतील नाही असे नाही पण अद्याप मंजील दूर आहे. (मी भाजपवरच टिका करतो असे नाही खाली राहूल गांधी वरही टिका केली आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 06/20/2018 - 17:58

In reply to तुमचे विधान तुमच्या न कळत by माहितगार

Permalink

अनधिकृत भूमिका काय आहेत हा वेगळा भाग आहे.

पण भारतीयांचा मेन मॅटर ऑफ कन्सर्न तोच असायला हवा. आंतरराष्ट्रीय समुदायापुढे काय भाषणबाजी करायची ते डिप्लोमॅट्स बघुन घेतीलच. नेमका मुद्दा काय आहे हे भारतीयांनी विसरायला नको.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 21:09

In reply to मंगुशेट ला आतेरीक्या चें by सोमनाथ खांदवे

Permalink

काश्मिरात संघाच्या शाखा भरतात का ?

काश्मिरात संघाच्या शाखा भरतात का ? 3 दिवसात तयार होतात म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Tue, 06/19/2018 - 22:28

In reply to काश्मिरात संघाच्या शाखा भरतात का ? by manguu@mail.com

Permalink

मंगु शेठ

नसल भरत तर नसल !!! तुमचे हायेत ना !!! यल्गार , जे एन यू ची गॅंग , करात गॅंग (कम्युनिस्ट पार्टी )मेवानी, हार्दिक, ह्ये सगळे हायेत ना बंदुका घ्येऊन लढायला .हां पण ह्यांना शत्रू कोण ह्येच कळतच नाय हा म्येन प्रॉब्लेम हाये .
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 06/19/2018 - 22:45

In reply to मंगु शेठ by सोमनाथ खांदवे

Permalink

ते

ते संघवालेच बोलत होते - 3 दिवसात आरमी बनवतो म्हणून . 1925 पासून म्हणताहेत -त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयं, पण त्यांना चान्स नाय घावला , आता निदान 2020 ला तरी घावेल , या भाबड्या आशेनं म्या ईचारलं .
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 06/20/2018 - 09:42

In reply to ते by manguu@mail.com

Permalink

तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो

तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो म्हणाला होतात ना ? काय झालं त्याचं? बघा पटपट भरती व्हा बरं. तुमचं पोस्टिंग बारामुल्ला, उडी नाही तर गुरेझ मध्ये करून घेईन. माझे वर्ग मित्र आहेत DGAFMS( महासंचालक सशस्त्र सेना चिकित्सा सेवा) कार्यालयात. देशसेवेची संधी चालून आली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 06/20/2018 - 10:17

In reply to तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो by सुबोध खरे

Permalink

असा रेफरन्स देऊन ऐच्छिक

असा रेफरन्स देऊन ऐच्छिक पोस्टिंग देता येते का ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 06/20/2018 - 11:29

In reply to असा रेफरन्स देऊन ऐच्छिक by विशुमित

Permalink

फिल्ड पोस्टिंग हवं आहे असा

फिल्ड पोस्टिंग हवं आहे असा अर्ज करता येतो. कारण अशा ठिकाणी सुखासुखी जाणारी माणसं कमी असतात. लषकरी अधिकाऱ्यांना एक फिल्ड आणि एक पीस असे आलटून पालटून पोस्टिंग मिळते. डॉक्टरांना पण अशी दोन फिल्ड पोस्टिंग करावी लागतात. परंतु लष्करात जेंव्हा तुम्ही फिल्ड पोस्टिंगवर जाता तेंव्हा तुमचे अगोदरच्या पोस्टिंगच्या ठिकाणी असलेले घर तुमचे फिल्ड पोस्टिंग संपेपर्यंत ठेवता येते. यामुळे लष्करी अधिकारी किंवा जवान आपल्या आठवी नववी दहावी सारख्ख्या महत्त्वाच्या वर्षात मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून फिल्ड पोस्टिंग मागून घेतात. जेणेकरून स्वतःला त्रास झाला तरी शहर, घर आई मुलांची शाळा तीच राहून मुलांच्या शिक्षणात बारावी पर्यंत सातत्य राहू शकते. बहुतांश वेळेस असे पोस्टिंग दिले जाते. दोन मुलांच्या दहावी बारावी होई पर्यंत सहा सात वर्षे अशी युद्धमान स्थितीत पोस्टिंग केलेले कित्येक सैनिक आणि अधिकारी माझ्या पाहण्यात आहेत. आपल्या नोकरीपायी मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून अशा एकांतवासात वर्षानुवर्षे राहणारे बाप लष्करात मी असंख्य पाहिलेले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 06/20/2018 - 11:47

In reply to फिल्ड पोस्टिंग हवं आहे असा by सुबोध खरे

Permalink

उपयुक्त माहिती.

उपयुक्त माहिती. पण "माझे वर्ग मित्र आहेत DGAFMS( महासंचालक सशस्त्र सेना चिकित्सा सेवा) कार्यालयात आहेत"" हे अनावश्यक होते. कारण त्याने वेगळा संकेत जात होता. असो ...
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 06/20/2018 - 12:23

In reply to उपयुक्त माहिती. by विशुमित

Permalink

ते वाक्य मोगा खान साठी होतं.

ते वाक्य मोगा खान साठी होतं. तुम्ही टेन्शन घेऊ नका.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 06/20/2018 - 12:40

In reply to ते वाक्य मोगा खान साठी होतं. by सुबोध खरे

Permalink

ओके

टेन्शन घ्यायला आम्हाला कुठे पेन्शन मिळणार आहे तेव्हा ? ==== मित्राला (रेफरन्स देऊन ?) "तुमचं पोस्टिंग बारामुल्ला, उडी नाही तर गुरेझ मध्ये करून घेईन" असे तुम्ही म्हणालात म्हणून विचारले. (( विचारायला पैसे थोडीच पडतात. त्यामुळे तेवढ्याच ४ नवीन गोष्टी समजल्या. आजच्या दिवसाचे Value Addition !!))
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Wed, 06/20/2018 - 10:19

In reply to तुम्ही पण "आर्मी जॉईन" करतो by सुबोध खरे

Permalink

मी कधी बोललो होतो ?

????
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 19:55

Permalink

काही गोष्टी दुकानात मिळत नाहीत :(

गठजोडच्या राजकारणाचा भाग वेगळा, काँग्रेस आणि राहुल गांधींनी भाजपा आणि मोदींवर टिका जरुर करावी पण राहुल गांधींचे जे विधान आले आहे त्या तील अंशाच्या औचित्या बद्दल गंभीर साशंकता वाटते. ....killing many innocent people... हे मेनी इनोसंट लोक कुठून पाकीस्तानच्या आयएसाअय कडुन शोधले का ते राहूल गांधींना ठाऊक . ....The damage will continue under President’s rule.... आता या वाक्याची निसटती बाजू अशी आहे की जम्मू आणि काश्मिरचे राज्यपाल एन.एन वोरा जे राष्ट्रपती राजवटीच्या काळात कारभार पहातील ते काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंग सरकारने नियूक्त केलेले आहेत. ओमर अब्दुल्लाही त्यांच्यावर आमचा विश्वास आहे म्हणतात . एका राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व म्हणून त्यांच्या नेत्यांची प्रतिक्रीया अधिक जबाबदार राहू शकली असती का , असे प्रतिक्रीया वाचून वाटून गेले. पण व्यक्तिंच्या प्रवृत्ती जबाबदार होण्यासाठी लागणार्‍या सगळ्याच गोष्टी दुकानातून विकत आणून देता येऊ शकत नाहीत हि अडचण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 06/19/2018 - 19:59

Permalink

राज्यपाल एन.एन वोरांचा

राज्यपाल एन.एन वोरांचा बायोडाटा प्रशासकीय अनुभवाने संपन्न दिसतो पण त्यांचे वय ८१ आहे, तणाव असलेल्या राज्याच्या दृष्टीने रोज दररोजच्या कामाच्या ताण झेलण्या साठी जरासे जास्त वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 06/20/2018 - 00:10

Permalink

25 जून ला विद्यमान

25 जून ला विद्यमान राज्यपालांचा कार्यकाळ संपतो आहे. Centre favours an Army veteran as JandK Governor: Here are the two names https://www.oneindia.com/india/centre-favour-an-army-veteran-as-jk-governor-here-are-the-two-names-2718682.html सय्यद हसनेंन हे 15 कोअर चे GOC(जनरल ऑफिसर कमांडींग) होते आणि त्यांना काश्मीर प्रश्नांची सखोल जाण आहे. :उडी बारामुल्ला श्रीनगर अशा ठिकाणी त्यांनी 15 वर्षे लष्कराचे सेनापत्य करण्यात घालवली आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Wed, 06/20/2018 - 07:37

Permalink

भाजप्यांची सोमरसता

रामदास आठवले यांची खंत रिपब्लिकन पक्षाने २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती केल्याने भाजपची मतांची टक्केवारी वाढली, परंतु आरपीआयला सत्तेत दहा टक्केवाटा देण्याचे आश्वासन पाळण्यात आले नाही. पक्षाचे कार्यकर्ते अजूनही सत्तेतील वाटय़ापासून वंचित आहेत, अशी खंत रिब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आवठले यांनी येथे व्यक्त केली. https://www.loksatta.com/maharashtra-news/ramdas-athawale-bjp-1699872/
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Wed, 06/20/2018 - 08:01

In reply to भाजप्यांची सोमरसता by manguu@mail.com

Permalink

मंगूशेठ ,सक्काळी ! सक्काळी !

मंगूशेठ ,सक्काळी ! सक्काळी !!पयल्या धारेचा पव्वा मारला की काय ? . पव्व्याच्या नशेत कदी आठवले तर कधी आवठले लिव्हताय .
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Wed, 06/20/2018 - 08:40

In reply to मंगूशेठ ,सक्काळी ! सक्काळी ! by सोमनाथ खांदवे

Permalink

खापी फेस्ट हाये ते

खापी फेस्ट हाये ते
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Wed, 06/20/2018 - 13:42

In reply to मंगूशेठ ,सक्काळी ! सक्काळी ! by सोमनाथ खांदवे

Permalink

सोमनाथ,

सोमनाथ, गारबेज ईन गारबेज आऊट !! बाकी दुसर्यांच्या नावावर जोक करणारे स्वतः सकाळी सकाळी घेतल्या शिवाय लिहु शकत नाहीत ह्याचा पुरावाच आहे हा !!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com