देव आणि धर्माचे चेताविज्ञान

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
26 Aug 2025 - 11:25 am

देव आणि धर्माचे चेताविज्ञान
===============

-राजीव उपाध्ये

"देवदानवा नरे निर्मिले हे मत कळवू द्या
काठोकाठ भरूनी द्या पेला फेस भराभर उसळूं द्या"

- केशवसुत, स्फूर्ति


एका नव्या चेता शास्त्रीय अभ्यासा नुसार लोक देव-देव का करतात या वर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अभ्यासानुसार periaqueductal grey नावाचा एक विशिष्ट मेंदूचा भाग (brain region) या देव आणि धार्मिक भावनांशी (feelings) संबंधित आहे.

हा भाग भीती, वेदना आणि परोपकार (altruism) यांसारख्या भावनांवर प्रक्रिया करतो. यामुळे असे सुचवले आहे की धार्मिक श्रद्धा (capacity for religious belief) कदाचित जगण्यासाठी एक मार्ग म्हणून विकसित झाली असावी.

तसेच मेंदूतील एक विशिष्ट भाग, ज्याला **ventromedial prefrontal cortex (vmPFC)** म्हणतात, तो भाग धार्मिक विश्वास आणि देवावरील श्रद्धा राखण्यासाठी जबाबदार आहे.

अभ्यासात असे आढळून आले की ज्या लोकांच्या मेंदूच्या या भागाला इजा झाली किंवा त्यात lesion आहे (उदा. brain tumor किंवा stroke मुळे), त्यांच्यात धार्मिक श्रद्धा आणि आधिभौतिक शक्ती (देव, अदृश्य शक्ती) मध्ये विश्वास ठेवण्याची शक्यता खूपच कमी होते. अशा लोकांना, असे म्हणतात की त्यांना मग त्या गोष्टींमध्ये तथ्य वाटत नाहीत.

जगभरातील 80% पेक्षा जास्त लोक स्वतःला धार्मिक किंवा आध्यात्मिक (spiritual) मानतात. न्यूरोथियोलॉजी (neurotheology) नावाच्या वेगाने विकसित होणार्‍या क्षेत्रात fMRI आणि EEG सारखी प्रगत तंत्रज्ञाने वापरून आध्यात्मिक कर्मकांडातील मेंदूच्या रचनेचा अभ्यास केला जातो. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की आध्यात्मिक अनुभवांमध्ये अनेक मेंदूचे भाग सक्रिय होतात.

उत्क्रांतीवादी दृष्टीकोनानुसार मेंदूच्या या भागांच्या सक्रियतेमुळे आपल्या पूर्वजांना कळपातमध्ये एकत्र राहणे, सहकार्य करणे आणि common beliefs (समान श्रद्धा) देवाणघेवाण करणे शक्य झाले. यामुळे त्यांना अस्तित्वाच्या लढाई मध्ये मदत झाली. असे म्हणता येईल की देवाची कल्पना ही मेंदूच्या या क्षमतेची एक सहनिर्मिती ('by-product') होती.

कट्टर नास्तिक, अंधश्रद्धा निर्मूलनवाले, तसेच ज्यांना या विषयात अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी ॲण्ड्र्यु न्युबर्गचे "व्हाय गॉड वोण्ट गो अवे" हे पुस्तक अवश्य वाचावे.(https://www.amazon.in/Why-God-Wont-Go-Away/dp/034544034X)

तात्पर्य - अध्यात्माचा न्यूरोलॉजिकल आधार (neurological basis) समजून घेतल्याने श्रद्धालुंसाठी त्याचे महत्त्व कमी होत नाही, तर मानवी मानसशास्त्राला एक नवीन आयाम मिळतो.

संदर्भ-
https://neurosciencenews.com/spirituality-brain-neurotheology-18845/

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

नास्तिक वर्तुळात या विषयावर सामान्यपणे चर्चा केली जाते. जर सामान्य मानवी लोकसंख्या श्रद्धेशिवाय जगू शकत नसेल, तर मग विरुद्ध दृष्टिकोन मांडणे आणि त्याचा प्रचार करणे योग्य आहे का - की जग देवाशिवाय आहे? मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.

युयुत्सु's picture

27 Aug 2025 - 7:08 am | युयुत्सु

श्री० निपा

<मला वाटते की लोकांना अजूनही किमान हे दाखवून देण्याची गरज आहे की जगात देव नसण्याची शक्यता आहे आणि श्रद्धा अतार्किक आहेत.>

"जगात देव नाही" हे कितीही सत्य असले तरी श्रद्धाळूंचा जगण्याचा आधार काढून घेण्याने समस्या गंभीर व्हायची शक्यताच जास्त. लोकांच्या श्रद्धांमुळे त्यांचे शोषण होत असेल तर त्याची जाणीव करून देणे फक्त योग्य आहे, असे मला वाटते. श्रद्धा अतार्किक आहेत, हे गळी उतरवल्याने एखादी व्यक्ती मुक्त किंवा ताकदवान (एम्पॉवर्ड) होइलच असे नाही कारण विवेकाचे वाटप निसर्ग सर्वाना समान करत नाही.

मूकवाचक's picture

27 Aug 2025 - 5:47 pm | मूकवाचक

स्थळ, काळ आणि परिस्थितीचा ज्यांच्या श्रद्धावान किंवा अश्रद्ध असण्यावर मुळीच परिणाम होत नाही असे लोक विरळेच असतात.

तळ्यात मळ्यात करणारे/ संभ्रमित वृत्तीचे/ गतानुगतिक असल्याने वरवर पाहता सश्रद्ध भासणारे किंवा जातीयवाद/ व्यक्तिगत वैफल्य/ धार्मिक बुरख्याआडून जवळच्या नातलगांकडून छळवाद सहन करावा लागल्याने विद्रोही वृत्तीला कवटाळून बसलेले बहुसंख्येने आहेत. भलेही अशा प्रयत्नांना कुणी कवडीची किंमत देत नसेल, तरीही यातली सश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांना आपल्या फेव्हरिट बुवा, बापू किंवा पंथाच्या नादी लावण्यात तर अश्रद्ध मंडळी विरोधी मताच्या लोकांचे प्रबोधन(!) करण्यात आपले समाधान शोधत राहतात.

गतानुगतिक असल्याने श्रद्धेला कवटाळून बसलेले विवेकहीन असतात आणि उपरोक्त कारणामुळे अश्रद्ध झालेले मात्र विवेकी असतात असे मानण्याची गरज नाही.

विपरीत परिस्थितीला तोंड देताना कितीही विवेकहीन असला तरीही वैचारीक कडवेपणा (मग तो श्रद्धा असो, तथाकथित विद्रोह असो, आणखी काही असो) एखाद्याच्या कामी येत असेल, तर त्याचे समर्थन करू नये, विरोध देखील करू नये, परिस्थिती निवळून त्या व्यक्तीचा विवेक जागा व्हावा अशी प्रार्थना करावी असे माझे मत झाले आहे. असो.

स्वधर्म's picture

27 Aug 2025 - 7:02 pm | स्वधर्म

देव ही उपयुक्त संकल्पना असून ज्याच्या त्याच्या परिपक्वतेप्रमाणे, विचारक्षमतेप्रमाणे तिचा उपयोग ठरतो. तथापि ती सत्य आहे किंवा कसे ते अज्ञात आहे.

ही बातमी या बाबतीत रोचक आहे.

8 सितंबर को देह त्याग कर वैकुंठ जाएंगे… 20 लोगों के फैसले से हड़कंप! पुलिस और तहसीलदार ने लगाई दौड़