जे न देखे रवी...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
11 Jun 2019 - 12:25

जागरण....

काल झोपता झोपता, वेळ बाराची आली.
आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली.

अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग
त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग!

बागडू लागलं,खेळू लागलं,
माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!

बरच खेळल्यावर मग, त्यालाही पेंग आली.
पण तोपर्यंत आमची ,पहाट लाले लाल झाली.

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 Jun 2019 - 11:11

अज्ञाताच्या काठावर

अज्ञाताच्या काठावर
शब्द होताना धूसर
अर्थ निरर्थाचे द्वैत
कल्लोळून झाले शांत

अदृष्टाच्या नजरेला
दिठी भिडविण्या आलो
अज्ञेयाच्या अनुल्लंघ्य
उंबर्‍याशी थबकलो

अथांगाच्या डोहावर
अनाहताचे तरंग
नश्वराच्या ओठावर
चिरंतनाचे अभंग

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
9 Jun 2019 - 23:38

वळीव

समजतो वळवाला पावसाळा,
शहराला गावाचे दुःख ठाव नाही

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
5 Jun 2019 - 18:13

सिग्नल .....!

सिग्नल ......

आज लाल दिव्याने नाममात्र
थांबलेत काही गोंगाट ,
नाहीतर कोण इथे थांबतं ......
सगळेच घाईच्या लयीत !

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
5 Jun 2019 - 16:36

सांग ना,सख्या

मोकळ्या कुंतलात माळतोस स्वप्नांची सुमने..
सांग ना,सख्या कुठुन आणतोस ती सुमने?
*
निद्रेत अनावृत देहावर कसा माळतोस तो चंद्र्मा
सांग ना? जागेपणी कशी उमटते नखक्षतांची रांगोळी?
*
अरे धसमुसळ्या..मीठीत घेत चुरगाळतोस देह माझा
सांग ना..उरात कसे भरतोस? ते टिपुर चांदणे
*
मिलनाची अधीर ती रात्र सावळी .कळी कोवळी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
5 Jun 2019 - 16:36

सांग ना,सख्या

मोकळ्या कुंतलात माळतोस स्वप्नांची सुमने..
सांग ना,सख्या कुठुन आणतोस ती सुमने?
*
निद्रेत अनावृत देहावर कसा माळतोस तो चंद्र्मा
सांग ना? जागेपणी कशी उमटते नखक्षतांची रांगोळी?
*
अरे धसमुसळ्या..मीठीत घेत चुरगाळतोस देह माझा
सांग ना..उरात कसे भरतोस? ते टिपुर चांदणे
*
मिलनाची अधीर ती रात्र सावळी .कळी कोवळी

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
4 Jun 2019 - 16:52

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

पण आपल्याला रोलच कधी मिळाला न्हाय

" अय साला " करून, डिट्टो करतो हाणामारी

स्टाईल आपली बघून येड्या होतात साऱ्या पोरी

बिग बी ची ऍक्टिंग म्हणजे खाऊ वाटलं काय

उंची सोडली तर बाकी इथं सर्व ठीक हाय

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

पण साला तसा रोलंच मिळाला न्हाय

शहेनशहा बनुन बाहेर पडलो एका काळ्याभोर रात्री

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
4 Jun 2019 - 14:56

जिलब्या

का म्हणून दिवसेंदिवस जिलब्या टाकत राहावे ?

का म्हणून आपणच समूहा पाकमय करावे ?

थोडं जागं होऊन बघा , मोठ्ठी कढई नि झारा दिसेल

तो हातात घेऊन बसलेला एक साधा खादाड दिसेल

एक दिवस तरी बुभुक्षित बनून बघावे

भुभुकार करून पाहावे

न पटेल तिथे फाट्यावर मारून बसावे

रुसेल त्याचे फुगवे निपटावे

शांत निवांत राहून जिलब्या धागे वाचावे

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
31 May 2019 - 22:30

तोल

विहिरीच्या बाहेर असतो आपण..
आजूबाजूचा परिसर..
उत्तुंग पर्वत, विशाल सागर,
वारे, फुलं, गवत, नद्या..
अगदी वाळवंट अन बर्फाळ प्रदेशही..
या साऱ्याचा विस्तीर्ण पसारा..
त्या तुलनेत असलेलं
विहिरीचं छोटेपण..

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in जे न देखे रवी...
30 May 2019 - 14:02

कवित्व इथले संपत नाही

कवित्व इथले संपत नाही
रोज गळवं ठणकत राहते
प्रोवक्ता अजुनही गातो
पाठशाळेत शिकवीली गिते

ते झरे भक्तीउमाळ्याचे
ती उधारीची भगवी माया
यांच्यात खपलो आपण
फुकां पुन्हा उगवाया

जोरात इंद्रिये अवघी
भुणभुणायची दुःख सैनिकांचे
आठवणार नाही आता
स्मरण त्यांच्या त्यागाचे

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
29 May 2019 - 13:53

वदनी कवळ.....

वदनी कवळ घेता
फोटो काढा प्लेटचे
सहज हवन होते
अपलोडता स्टेटसे
व्हायरलं न होता नेटवरी
अन्न हे अपूर्णब्रम्ह
खाण्याआधी पोस्टणे
जाणिजे आद्यकर्म

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
28 May 2019 - 18:48

नाद ब्रम्ह होई अंगी , चढे चढे भक्तिज्वर

नाद ब्रम्ह होई अंगी

चढे चढे भक्तिज्वर

अरे तोच रे ईश्वर

तोच तोच रे ईश्वर

तुझ्या मायेची सावली

आम्हा सर्व चरावर

देई पर्वत ताकद

जशी दुधात साखर

स्वामी स्वामी राया तुम्ही

तुमच्या पडतो पाया आम्ही

देगा आशीर्वाद आम्हा

तूच स्वामी सर्व ब्रम्हा

उघडा ज्ञान दार सर्वा

तुमच्या सर्वार्थ शक्तीने

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
27 May 2019 - 20:09

(गफ)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
25 May 2019 - 12:04

आभाळ पक्षी

आभाळानं द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी
धरतीनं जागा द्यावी
झाडांची आई व्हावी
झाडांनी सावली द्यावी
पक्षांची घरटी ल्यावी
पक्षांनी पंख पसरावे
आभाळात विहरावे
आभाळाने द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी

पाषाणभेद ( त्रंबकेश्वर मुक्काम)
२५/०५/२०१९

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
20 May 2019 - 08:41

...पत्र...

...पत्र ...
काय मायना घ्यावा?
कल्लोळ कसा लपवावा?
सारेच जाणते पत्र.
...पत्र...
मजकूर रिकामा होता.
पत्ताही लिहिला नव्हता.
पोचले तरीही पत्र.
...पत्र...
जीर्ण शीर्ण झालेले,
कोपरेही दुमडून गेले,
तरीही जपले पत्र!
..पत्र...
खरेच लिहिले होते?
काहीच कसेना स्मरते?
प्रश्न पाडते पत्र!
...पत्र...

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
20 May 2019 - 05:43

" कशी आहेस ? "

" कशी आहेस ? "

वेशीमधून बाहेर पडताना
उरले सुरले बळ एकवटून
त्याने शेवटी विचारलेच

" कशी आहेस ? "

निर्विकार डोळ्यांनी
निर्विचार मनाने मग
मीही फक्त मान हलवली .

Sumant Juvekar's picture
Sumant Juvekar in जे न देखे रवी...
17 May 2019 - 15:03

शूर वैमानिक श्रीमान अभिनंदन वर्धमान

आपला शूर वैमानिक श्रीमान अभिनंदन वर्धमान याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरू दादासाहेब दापोलीकर यांनी लिहिलेले ११४ ओळींचे खंडकाव्य!

(हे लिहिण्यास दादासाहेबांना अडिच महिने लागले. तस्मात् वाचकांनी १५ मिनिटे तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व 9967840005 वर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!)

मनमेघ's picture
मनमेघ in जे न देखे रवी...
14 May 2019 - 19:20

गुलमोहर मोहरतो तेव्हा

गुलमोहर मोहरतो तेव्हा
सखे तुझे हसणे आठवते
उन्हातही मग चंद्र उगवतो
माझे असणे-नसणे नुरते

छोट्या गोष्टींनाही येथे
अस्तित्वाचा प्रश्न बनवतो
खोड जुनी ती नकळत माझ्या
जितेपणीही क्षणिक मोडते.
गुलमोहर मोहरतो तेव्हा...!

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 May 2019 - 17:16

रियल रियल

बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या....
मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या
लिक़्विड जमान्यात
प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत
ओहो....ते काय असते आणि?
आठवण बिठवण वेड्यांचा बाजार...
एक कॉल मारायचा
नाहीतर मेसेज धाडायचा
बात करनेका मामला खतम.

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in जे न देखे रवी...
13 May 2019 - 18:36

(प्रार्थना!)

(मनमेघ यांची क्षमा मागून)
स्वामि भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता
आतला मराठी माणूस माझ्या नित्य राहो जागता ।

लिहितो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी
एक ही साधी कसोटी नं आठवो लिहिताक्षणी
दुःख वाचका देउनी सुख नं लाभे लेखका।।

हासता यावे मला पाहून मिपाकरांना सुखी
भावना माझी नसो सहवेदनेला पारखी
या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।।