जे न देखे रवी...
(काय करून आलो)
वाचायला(च) गेलो,
लिहून काय आलो?
आमंत्रण नव्हते तरी
ज्ञान पाजळून आलो ..
ना अर्थ आशयाचा
बोली.. लावून आलो .
कावलेल्या समयी
भडास काढून आलो ..
होते कोण न कोण
बघतोच मी कशाला ?
बिना वातीचेच (मुद्दाम)
कंदील लावून आलो ?
धागे जरी भिकार
डोके फिरवून आलो..
जाऊ मुळी न देता
संधी साधून आलो .
(चहा पिऊन आलो..)
पेरणा
अर्थात प्राची ताईंची मनातल्या मनात क्षमा मागून
भेटायला गेलो,
गप्पा मारून आलो?
माझ्याच घरुन मी
चहा पिऊन आलो..
ना थेंब दिलास पाण्याचा
पण बोध फुकट दिलास.
आपापल्या घरून आपण
चहा पिऊन आलो..
काॅफी पिऊन आले...
ऐकावयास गेले,
बोलून काय आले?
बोलावलेस तू, मी
काॅफी पिऊन आले..
ना थेंब पावसाचा
ओली.. भिजून आले.
भांबावल्या दुपारी
काॅफी पिऊन आले..
होते कुणी न कोणी
नव्हतोच एकटे ना?
लोकां कसे पटावे
काॅफी पिऊन आले?
पेले जरी रिकामे
डोळे भरून आले..
वाहू मुळी न देता
काॅफी पिऊन आले.
वजनदार!
(याच प्रेरणास्थानाला उद्देशून लिवलेली आधीची कविता "बिज्जी लेखिकेची आळवणी" )
हरपता ती लेखनस्फूर्ती
हाटेले घालुनी पालथी
ओरपी लेखिका मिसळ
वर घेई मिठाई सुरती
भिववितो तिला तनुभार
स्वप्नि ते आकडे दिसती
निर्धार प्रतिदिनी करिते
'करु उद्याच सुरु भटकंती'
(मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे)
जेष्ठ कविवर्य "अवधुत दादांना " विनम्र अभिवादन, आणि आमचे पेरणा स्थान श्री श्री श्री चामुंडराय यांना सादर प्रणाम, त्यांच्या काव्यप्रतिभेमुळेच आम्ही हे काव्यपुशप प्रसवू शकलो.
टिप :- क्रूपया अक्षरास हसू नये
डोह-१
घनतमात पसरला ऐसा
कभिन्न काळा देही
आ वासून गगना पाही ...
डोहकाळीमा
डोहकाळिमा
श्रांत क्लांत पांथस्थाला
दो घोट जलाचे देई
आयुष्य मागुनि घेई .....
डोहकाळीमा
डोहकाळिमा
किती प्रश्न चिरंतन साचे
घेऊन उरावर जगणे
निरखत हा तगमगणे...
डोहकाळीमा
डोहकाळीमा
डोह
पल्याड-
एखादा कभिन्नकाळा राक्षस निवांत पहुडलेला असावा
आणि केवळ त्याच्या अस्तित्वाच्या भीतीने कुणीही त्याच्या आसपास फिरकू नये
असा तो गूढगर्भ डोह निवांत पसरला होता.
वाटसरू ... वाटसरूच तो अनंत अंतर पायदळी तुडवून श्रांत झालेला
पुढे तोडायच्या अंतराची कितिक गणती असेल या विचाराने विद्धसा, हळू-हळू डोहाच्या काठी आला.
कुरबुर झाली
कुरबुर झाली
(काल रात्री साडे तीन वाजता पाणी बचतीवर एक पथनाट्य लिहीले. एका व्हाट्सअॅप गृपमध्ये येथील सदस्य दुर्गविहारी अन दीपक११७७ यांनी झोप घेत चला अन काही कुरबुर झाली असेल असे विनोदाने लिहीले. सकाळी मी ते वाचले अन मग त्यांना देण्याचे उत्तर या गीतलेखनातून लिहीले.)
धागा चालेना, धागा पळेना... धागा संथ चाली, काही केल्या पेटेना
कवी " बी " यांना विनम्र अभिवादन
धागा चालेना, धागा पळेना
धागा संथ चाली, काही केल्या पेटेना
गेलो ट्यार्पीच्या बनी
म्हंटली ट्रोलांसवे गाणी
आम्ही सुरात सूर मिळवून रे
गेलो डू-आयडीच्या बनी
डूख धरला मी मनी
ट्रोलांसवे गळाले आयडीभान रे
चल ये रे, ये रे ट्रोल्या
टोचू उचकवू घालु काड्या
टाकू पिंका पिंक पोरी पिंक पोरी पिंक
मळभ..!
कुठेतरि बरच दाटलेलं असतं
आणि खरच हमसुन बरसायचं असतं
उगाच नाहि , तर अगदि मनापासुन
डोळ्यातलं पाणि न लपवता
जमेल तितकं सांडायचं असतं
आत दाटलेलं , मळभ साठलेलं
कुठेतरि हमसुन बरसायचच असतं
किती विचार करुन प्रत्येकवेळी
आलच जरी भरुन भलत्यावेळी
सारखं सारखं बाजुला सारायचं नसतं
परक्याजवळ नाहि तर आपल्याच कुशीत
हळुवार डोक खुपसायचं असतं
दे दे दे दे दे दे
दे दे दे दे दे दे दे
अगं दे दे दे दे दे दे
जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे
जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे
किती वेळ झाला सारखा हातात घेते
तु जशी मालकीण मी पण मालक आहे
माझ्याच घरात मला चोरी झाली
मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे
दे दे दे दे दे दे दे
सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते
आज मी पुन्हा नापास झालो
आज मी पुन्हा नापास झालो
पुढल्या वेळेस नक्की पास होईन
हीच अशा मनी बाळगून
पुन्हा जोमात तयारीला लागलो
मम्मी पप्पा दोघेही घरी
चिंतातुर असतील
मला वाईट वाटू नये
म्हणून हळूच रडत असतील
मी ठरवलंय मनाशी घट्ट
हार मानायची नाही
देत जायचं असेच पेपरवर पेपर
जोपर्यंत नीट कळत नाही
कधीतरी उगवेल सूर्य माझाही
गझल : पुन्हा एकदा...
माझ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग
संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा
शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत
निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा
स्वप्नांची लचके तोडली मी स्वत:
पराभवाने दिली मात पुन्हा एकदा
कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण
अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा
प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च
नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा
शोधत होतो पुन्हा स्वत:ला
शोधत होतो पुन्हा स्वत:ला
उपसत होतो पुन्हा पुन्हा मी
पुरातनाची प्रचंड पडझड
परंपरांची अपार अडगळ
शोधत होतो अथक स्वत:ला
ऐकत होतो पुन्हा पुन्हा मी
वर्तमान हतबल करणाऱ्या
भवितव्याचे भीषण पडघम
ऐकत होतो अधीरपणाने
माझीच अनोळखीशी चाहूल
कळून चुकला पुन्हा, स्वतःचा
शोध विफल ठरण्याचा संभव
ती म्हणाली " चिमणी " , मी म्हणालो भुर्रर्रर्र
ती म्हणाली " चिमणी "
मी म्हणालो भुर्रर्रर्र
ती म्हणाली " कावळा "
पुन्हा उत्तरलो भुर्रर्रर्र
आलतूफालतू उत्तरं देऊन
आमचं प्रेम झालं सूर्रर्रर्रर्र
लक्षात ठेवून होतो चांगलंच
गुढघ्यात असते अक्कल
डोकं बाजूला ठेऊन काम होतंय
थोडीच पाहिजे शक्कल
कशाला करावा अभ्यास ?
कशाला हवी ती नोकरी ?
वटवटसावित्री
हे देवी वटसावित्री
मी पण पूजेन तुला
लपून छपून फेरे घेईन
उद्या पौर्णिमेच्या रात्री
माझे सर्व काळे धंदे
अव्याहतपणे चालू देत सदैव
कधी नजरेत येऊ नको देउ तिच्या
नाहीतर होतील माझे वांदे
मी साधाभोळाच राहू देत तिच्यासाठी
फार कठीण गं , झेलणं तिला
ती आहे एक सुशील गृहकृत्यदक्ष
पण दुर्दैवाने वटवटसावित्री
मी तुझा विचार करते
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते....
माझे खळाळणारे हसू
अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून
सुशांत जलाशयातल्या
शांत स्मितासारखे
तुझ्या ओठांशी येऊन थांबेल......
स्व - राष्ट्र..!!
बर्याच दिवसांपासून घोळत असलेल्या काही ओळी, पूर्ण होऊनही आता महिना उलटत आला.. आणिक काही सुचतंय का हे बघत होतो.. पण नाही सुचले. म्हणून मग आता प्रकाशित करतोय.
बालमित्रांची सुट्टी....
करू थोडा हट्ट, करू थोडी मस्ती
करू थोडा दंगा, लागली आहे सुट्टी
करू थोडा खेळ, बसला आता मेळ
करू थोडी मज्जा, लागली आहे सुट्टी
भावा सोबत दंगा, मामा सोबत पंगा
दादा सोबत कुस्ती, लागली आहे सुट्टी
दीदीची काढली खोड, कॉर्टूनला नाही तोड
जाईल सर्व सुस्ती, लागली आहे सुट्टी
आज्जी करते थाट, आजोबा म्हणतात माठ
मावशी सोबत गट्टी, लागली आहे सुट्टी
"फार काय"
=======
कुत्र्यांसाठी कपडे आले.
फार काय,
बो, टाय, टीशर्ट घालुन
बड्डे पार्टीसाठी श्वान सजले.
कुत्र्यांसाठी न्हावी आले,
तसेच ॲण्ड्रोईड गेम्स आले.
फार काय;
"जुजबी" प्रियराधनासाठी
पेट्स-पार्क्स आले.
- ‹ previous
- 55 of 468
- next ›