लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in जनातलं, मनातलं
13 Jun 2009 - 3:36 pm

प्रेमप्रकरणात हातपाय मारुनही यश हाती आले नाही मग घरचे बघुन देतिल त्याच्याशी लग्न करण्य़ाचे मान्य केले, इलाजच नव्ह्ता ना.
आणी असेच एक स्थळ आलेही. मुलगा वसईचा होता. घरी येउन रित्सर चहा पोहे पार पड्ले, होकारही आला. मला होकार द्यावा लागला कारण नकार देण्यासारखे काही असेल असे वाट्ले नाही. साखरपुडा कधी करायचा, तारखा, मुहुर्त शोधणे सुरु झाले. त्याच दरम्यान मुलाच्या आईचा फ़ोन आला कि मुलीला व मुलीच्या बहिणीला रविवारी असेच जेवायला पाठ्वा. आई व काकुने आम्हा दोघीना "तिकडॆ जरा कमी बोला" असे बजावुन पाठ्वले.

वसईत पोहोचलो, मुलगा म्हणे स्टेशनवर आणाय़ला येणार होता. मला तर त्याचा चेहराच आठ्वेना =)) एकदाच पाहिला होता जेमतेम. आता ऒळ्खायचे कसे? बहिण म्हणाली चुचे तुच बघ आता काय ते. पण मुलाने आम्हाला ऒळ्ख्ले व समोर आला. घरी पोहोचलो, घर म्हणजे जुना वाडा होता. घरात गेलो, मुलाची आई किचनमध्ये होती. आम्ही दोघी तिकडेच जाउन बसलो. कुकर झालेला दिसत होता. काकु (मुलाची आई) पोळ्या करीत होत्या. काका मधेच येउन गेले, म्हणाले, घर जुने आहे, तु आलीस कि तुझ्या आवडीने इन्टिरियर करु. बहिण माझ्याकडे पाहुन हसली. काकु मात्र पोळ्याच करीत होत्या, त्याना काकान्चे हे बोलणे आवड्ले नसल्याचे मला वाट्ले. मी मधेच म्हणाले मी काही मद्त करु का? तर त्या म्हणाल्या आमटी कर तु. आणी मुलगा फ़ोन घेवुन आत आला, त्याच्या बहिणीचा फ़ोन होता. काकु उत्साहात फ़ोन घेवुन बाहेर गेल्या. काका आत आले, त्यानी चिन्च, गुळ तत्सम ड्बे शोधुन दिले व एकदाची आमटी पार पडली.

जेवायला बसलो, काका व मुलाने आमटी भुरके मारत खाल्ली. काकुना तेहि फ़ारसे आवडलेले दिसले नाही. जेवताना गप्पा सुरु होत्या. काकुन्चे मी नोकरी साम्भाळुन घर व मुलाना कसे वाढविले हे प्रवचन सुरु होते. मुलीला डॉ़क्टर व मुलाला एम्टेक केल्याचा काकुना अभिमान होता आणी असावा पण. जेवण झाले, सिन्क भान्ड्यानी भरुन गेले होते, मी विचारले, मोलकरीण कधी येते, तर त्या म्हणाल्या, मीच सगळे काम करते. मी उगाचच बोलायचे म्हणुन बोलले "मी घासु का?" आणी काकु चक्क "हो चालेल म्हणजे नन्तर आपल्याला गप्पा मारता येतील" म्हणाल्या. बहीणीने माझ्याकडे पाहिले आणी मी भान्डी घासायला सुरुवात केली :( . एवढा कन्टाळा आला होता पण इलाज नव्ह्ता. अर्धा तास तरी मी भान्डी घासत होते. बाई एका शब्दाने बोल्ली नाहि कि राहु दे आता :(. काम आटोपुन बाहेर आलो, मुलगा आईला म्हणाला आम्ही जरा नविन घरी जाउन येतो. त्याने जागा बुक केली होती. आई म्हणाली कुठे तिला त्या पसा्रर्यात नेतोस काम पुर्ण होउ तर दे. बहीणीने माझ्याकडे पाहिले. बाहेर स्कुटी उभी होती, बहिण म्हणाली चला राउण्ड मारुन येउ, तर काकु म्हणाल्या त्याला सवय़ नाहिये नविन आहे ना अजुन, आम्ही कसे म्हणणार मग कि आम्हिच मारुन येतो, परत बहीणीने माझ्याकडे पाहिले. मुलाला कळले असावे आम्हि बोअर होतोय ते, त्याने बहिणीच्या लग्नाचा आल्बम काद्ध्ला. आम्ही जरा वेळ फोटो चाळुन छान आहेत असे म्हट्ले. जिला कधिच पाहिली नाहि तिच्या लग्नाचा आल्बम काय पाहाणार. मग मी बहिणीला म्हट्ले चल ग ह्यान्ची बाग पहुन येउ. मुलगा लगेच जायच्या आवीर्भावात उभा राहिला तोच काकु म्हणाल्या तु तोवर आइस्क्रिम घेवुन ये. आम्ही बाहेर आलो. बहिण म्हणाली चुचे काय तो विचार कर, सासुचे राज्य आहे, मुलाचे काहिच चालत नाहिये, असला बुळ्चट नवरा चालेल का तुला? आणी अन्तर हि ५ वर्शाचे आहे, तुला समवयस्क हवा होता ना?

तोवर ५ वाजले, आम्ही निघालो. मुलगा सोडाय़ला स्टेशनवर आला. रिक्शेतुन उतरलो, बहिण जरा पुढे गेली. तो म्हणाला परत भेटुच. मी म्हणाले तुझ्या एक लक्शात नाहि आले का मी तुज़्यापेक्शा उन्च वाटते. जोडीने पाहिले कि नाहि जाणवत पण वेगवेग्ळे पहिले कि वाट्ते. तु परत विचार कर, उगाच नन्तर तुझे मित्र वैग्रे हसायचे तुला. त्याच्या डोक्यात पिल्लु सोडुन आम्ही ट्रेन मधे चढलो.

घरी आलो. घडलेला व्रुतान्त आईला सान्गितला. आईलाही भान्डी घासायला लावणॆ फ़ारसे पटलेले दिसले नाही. साखरपुडा झाल्यावर ठिक होते असेच तिच्याही बोल्ण्यात आले. पण बाकि सगळे ठिक (मुलगा एम्टेक) अस्ल्याने तिने फ़ारसे मनावर घेतले नाही. आम्ही पाणीपुरी खायला बाहेर पडलो.

घरी आलो तो हन्गामा झाला होता, वसईहुन फ़ोन येउन गेला होता, आणी नकार आला होता. साखर पुडय़ापर्यन्त जाउन आता मागे येता हे बरे नव्हे असे म्हणुन माझ्या काकुने त्या काकुना झापले असे मग कळले. आणी मी परत लग्नाच्या बाजारातला अजुन एक अनुभव घेण्यास सज्ज झाले होते.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

अवलिया's picture

13 Jun 2009 - 3:40 pm | अवलिया

वा! मस्त अनुभव कथन !!
अजुन येवुद्या पूर्ण कथानक...
किती घरातील भांडी घासली, धुणी धुतली, ;)
आणि नंतर मग कायमस्वरुपी एका घरात तुम्हाला ठेवुन घेतले वगैरे येवु द्या पटापट :)

आणि हो, फटु वगैरे असतील तर ते ही येवु द्या!!
छान लिहिले आहे. लिहित्या रहा :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

निखिल देशपांडे's picture

13 Jun 2009 - 3:54 pm | निखिल देशपांडे

वा मस्तच अनुभव कथन....
असेच येवु दे ग अनुभव कथन...
मराठे काकांच्या घरी पण काय काय अनुभव आले ते एखाद्या लेखात येवु द्या..
लेख आवडला
लेखिका पर्नल नेने मराठे काकुंचे अभिनंदन

==निखिल

बाकरवडी's picture

13 Jun 2009 - 7:45 pm | बाकरवडी

मराठे काकांच्या घरी पण काय काय अनुभव आले ते एखाद्या लेखात येवु द्या..
असेच म्हणतो.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

पर्नल नेने मराठे's picture

13 Jun 2009 - 3:41 pm | पर्नल नेने मराठे

:S ह्म्म

चुचु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2009 - 3:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:S
चुचु

-दिलीप बिरुटे
(चुचु)

अनंता's picture

13 Jun 2009 - 3:49 pm | अनंता

सर्वप्रथम एवढा दीर्घ लेख लिहिल्याबद्दल मी चुचुच्या अभिनंदनाचा एक ओळीचा ठराव मांडत आहे.

अवांतर : छान लेख.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2009 - 3:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>सर्वप्रथम एवढा दीर्घ लेख लिहिल्याबद्दल मी चुचुच्या अभिनंदनाचा एक ओळीचा ठराव मांडत आहे.
खर्रर्रच खूप आनंद झाला ! :S चुचु

-दिलीप बिरुटे
(अनुमोदक)

अवलिया's picture

13 Jun 2009 - 5:54 pm | अवलिया

अनुमोदन आहे :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

प्राजु's picture

14 Jun 2009 - 5:43 am | प्राजु

नीट वाचता येण्याजोगा आणि चांगला लेख लिहिल्याबद्दल चुचु चे अभिनंदन! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

13 Jun 2009 - 3:54 pm | मदनबाण

/:)

(चीची)

मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

पर्नल नेने मराठे's picture

13 Jun 2009 - 5:24 pm | पर्नल नेने मराठे


घ्या.........
चुचु

मदनबाण's picture

13 Jun 2009 - 5:29 pm | मदनबाण

धन्यवाद...
अजुन लिहावे आपण...वाचावयास आवडेल.

मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jun 2009 - 3:56 pm | परिकथेतील राजकुमार

फारच कष्टकरी अनुभव होता काय ?

अवलिया म्हणतात तसे बाकीच्या घरातही तुम्हाला आलेले वेगवेगळे अनुभव येउ द्या अजुन.

येव्हड्या अनुभवातुन गेल्यानंतर मिळालेला नवरा कसा आहे ? सासु कशी आहे ? सध्या घरात धुणी भांडी, आमटी , पोळ्या कोण करते ?

सगळे कसे विस्ताराने येउ दे.

अवांतर :- चुचुवाणी अथवा चुचुभाषेत लेख न लिहिल्याबद्दल धन्यवाद.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

निखिल देशपांडे's picture

13 Jun 2009 - 3:57 pm | निखिल देशपांडे

चुचुवाणी अथवा चुचुभाषेत लेख न लिहिल्याबद्दल धन्यवाद.

==निखिल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2009 - 3:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>चुचुवाणी अथवा चुचुभाषेत लेख न लिहिल्याबद्दल धन्यवाद.

चुचु :S

दशानन's picture

13 Jun 2009 - 5:18 pm | दशानन

=))

अनुमोदन.

* चुचु मस्त लिहले आहेस, आवडले !

थोडेसं नवीन !

अवलिया's picture

13 Jun 2009 - 5:56 pm | अवलिया

पुढचा लेख चुचुवाणीत चुचुव्याकरणात येवु द्या !!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

नितिन थत्ते's picture

14 Jun 2009 - 11:32 am | नितिन थत्ते

>>चुचुवाणी अथवा चुचुभाषेत लेख न लिहिल्याबद्दल धन्यवाद.

चुचुवाणीला हसताय सगळे. २०० वर्षांनी हीच भाषा 'शुद्ध भाषा' होईल. आणि तात्यांना पुन्हा तिला (भाषेला) फाट्यावर मारायला लागेल. :)

खराटा
(रंग माझा वेगळा)

मस्त कलंदर's picture

13 Jun 2009 - 6:12 pm | मस्त कलंदर

लेखाचं नाव पाहून तो किमान दहाएक ओळींचा तरी असेल असे वाटले होते.. नि तो चुचुवाणीत असेल.. तर तो समजायला किती वेळ लागेल.. असा विचार करतच शीर्षकावर टिचकी मारली.. पान उघडले.. नि हुश्श झालं.. 8}

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निशिगंध's picture

13 Jun 2009 - 3:56 pm | निशिगंध

मस्त आहे..
अनुभव आवडला..

____ नि शि गं ध ____

शार्दुल's picture

13 Jun 2009 - 4:35 pm | शार्दुल

वा मस्तच अनुभव कथन.... लेख आवडला,,,,, अजुन येवुदेत,,, :)

नेहा

नितिन थत्ते's picture

13 Jun 2009 - 4:36 pm | नितिन थत्ते

छान लेख. मुलींना गृहीत धरण्याची प्रवृत्ती अजुनही आहेच.
अवांतरः हा लेख चुचु काकूंनी वाचता येणार्‍या भाषेत टंकला आहे. नेहमी काय होते?

खराटा
(रंग माझा वेगळा)

सहज's picture

13 Jun 2009 - 5:15 pm | सहज

चुचु लेख भारी आहे. आवडला.

अजुन येउ दे.

माधुरी दिक्षित's picture

13 Jun 2009 - 5:23 pm | माधुरी दिक्षित

आता धुण-भांडी कोण करत ग ?
तु का नवरा ? :?

(मस्त लिहिल आहेस ग :)

आणि तो अनुभव तुम्ही खुप छान लिहला आहे. पुढचा अनुभव येवुदे लवकर.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

विनायक प्रभू's picture

13 Jun 2009 - 5:40 pm | विनायक प्रभू

नेहमी लिहिताना घासलेली भांडी आथवतात.
चान लेक

टारझन's picture

13 Jun 2009 - 6:50 pm | टारझन

मास्तर प्रमाणे चुचु ने लिहीण्याचं आउटसोर्सिंग णाणा&नाना कंपनी ला नाही ना दिलं ? च्यायला ..अंमळ छाण लिहीलंय म्हणून म्हंटलं !!

बाकी थोर विचारवंत प्रा.डॉ. डिलीट बिरूटे साहेब सुद्धा आज पेटलेत की ;)
खवाट चिमटे काढलेत

- कर्नल टार्झन पराठे

पर्नल नेने मराठे's picture

13 Jun 2009 - 6:57 pm | पर्नल नेने मराठे

:O नाना :( सान्ग ना ह्या लोकाना मिच लिहिलेय ते

चुचु

अवलिया's picture

13 Jun 2009 - 7:02 pm | अवलिया

का रे टा-या उगाच त्या चुचुला रडवत आहेस ?

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2009 - 7:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>बाकी थोर विचारवंत प्रा.डॉ. डिलीट बिरूटे साहेब सुद्धा आज पेटलेत की
हम्म :S

चुचु

अनामिक's picture

13 Jun 2009 - 5:40 pm | अनामिक

म्स्तं अनुभ्व कथ्न क्लेसं चुचु. प्ण आज एव्ढं असुद कं लिव्ल्स? नित वाच्ता नै अलं.

-अन्मिक

सायली पानसे's picture

13 Jun 2009 - 5:57 pm | सायली पानसे

सहिच लिहिल आहे चुचु .. अजुन येउदे खुप ...

यन्ना _रास्कला's picture

13 Jun 2009 - 5:58 pm | यन्ना _रास्कला

सध्या घरात धुणी भांडी, आमटी , पोळ्या कोण करते ?

दस्तूरखुद मराठसाह्येब. त्याना सोयीच पडाव म्हनुन चान्ग्ला साबन कोन्ता त्याच कव्ल काड्तात चुचुबाय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

पर्नल नेने मराठे's picture

13 Jun 2009 - 7:35 pm | पर्नल नेने मराठे

धन्यवाद :D
चुचु

तिमा's picture

13 Jun 2009 - 7:43 pm | तिमा

हा लेख लिहून आपण 'मराठी' साठी काय केलेत ?
ति. लोणचांबा मा.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

अरुण मनोहर's picture

15 Jun 2009 - 2:10 am | अरुण मनोहर

""""हा लेख लिहून आपण 'मराठी' साठी काय केलेत ?""""
आपल्या प्रतिसादाने जे केलं त्यापेक्षा नक्कीच जास्त काही केलं!

अनिल हटेला's picture

13 Jun 2009 - 8:30 pm | अनिल हटेला

खुसखुशीत लेखन आवडले...
चुचुवाणीत न लिहील्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे...
त्याबद्दल फुटाणे टाकुन केलेले गुलाबजामुन आपणास भेट देण्यात येत आहेत्,ते आपण स्विकारावेत आणी आम्हाला उपकॄत करावे ही नम्र विनंती...;-)

:S (हं घेशीलच ) :S

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

समिधा's picture

13 Jun 2009 - 8:47 pm | समिधा

खुपच मस्त लिहीला आहेस अनुभव. काय पण एक एक लोक भेटतात नाही...:)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

पिवळा डांबिस's picture

13 Jun 2009 - 9:17 pm | पिवळा डांबिस

चुचुताई, तुमचा लेख खूप आवडला.
सर्वप्रथम, हा लेख तुमच्या नेहमीच्या मोडी लिपीत न लिहिता देवनागरीतून लिहिल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!!!:)
तुमचं मोडी वाचतांना मला नेहमी आपल्याला डिस्लेक्सिया होईल की काय अशीच भीती वाटते! असो!!
तुम्ही तुमचा अनुभव सुरेख वर्णन केला आहे.
मला तर त्याचा चेहराच आठ्वेना एकदाच पाहिला होता जेमतेम. आता ऒळ्खायचे कसे? बहिण म्हणाली चुचे तुच बघ आता काय ते.
बहिणीचं बरोबर आहे! अहो लग्न तुमचं, मग तिने का उगीच अनोळ्खी पोरांच्या तोंडाकडे पहात बसायचं? आणि ते ही वसई टेशनवर!!! अरे सियावर रामा!!!!:)
वसईहुन फ़ोन येउन गेला होता, आणी नकार आला होता.
म्हणजे एव्हढी घासलेली भांडी फुकटच गेली म्हणा की!!!:)

एनिवे, ही मालिका क्रमशः करून असेच तुमचे लग्नाच्या बाजारातले अनुभव लिहीत जा. त्याचं काय आहे, आम्ही लग्नाच्या वयाचे व्हायच्या आधीच एका पोरीने आम्हाला पटवल्यामुळे आम्हाला हे चहा-पोहे वगैरे कधी अनुभवताच आले नाहीत हो!!! (एकदम गडगनेराचं मटणच मिळालं!!!)
पुढील भागांसाठी शुभेच्छा!!!
-पिडांकाका

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2009 - 10:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वप्रथम, हा लेख तुमच्या नेहमीच्या मोडी लिपीत न लिहिता देवनागरीतून लिहिल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!!!Smile
तुमचं मोडी वाचतांना मला नेहमी आपल्याला डिस्लेक्सिया होईल की काय अशीच भीती वाटते! असो!!
=)) मेलो !

स्वाती दिनेश's picture

14 Jun 2009 - 11:48 am | स्वाती दिनेश

चुचु , अनुभव चांगला रंगवला आहेस, लेख आवडला.
स्वाती

मराठमोळा's picture

14 Jun 2009 - 12:11 pm | मराठमोळा

वा! मस्त अनुभवकथन.

म्हणजे एव्हढी घासलेली भांडी फुकटच गेली म्हणा की!!!
हेच म्हणतो.

बहिण म्हणाली चुचे काय तो विचार कर, सासुचे राज्य आहे, मुलाचे काहिच चालत नाहिये, असला बुळ्चट नवरा चालेल का तुला?

घ्या म्हणजे पुरुषांनी आईचे ऐकले कि ते बुळ्चट, आणी बायकोचे ऐकले कि येडपट. चांग्ला न्य्यय आहे.

चुचु :S

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

रेवती's picture

14 Jun 2009 - 8:07 pm | रेवती

काय पण ती मुलाची आई!
पहिल्यांदा घरी आल्यावर अशी कामं करायला लावायची म्हणजे जरा......:(
"तिकडॆ जरा कमी बोला" असे बजावुन पाठ्वले.
हे बहुतेक सगळ्या आया सांगतात. =)) ते लग्नं झालं नाही हे बरच झालं.

रेवती

यन्ना _रास्कला's picture

14 Jun 2009 - 8:15 pm | यन्ना _रास्कला

प्रेमप्रकरणात हातपाय मारुनही यश हाती आले नाही

इशयी पन लिवा आक्शी डिटेलम्धी.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

नीधप's picture

14 Jun 2009 - 8:21 pm | नीधप

हा हा मस्त..
त्या मुलाला टाळायची आयडिया तर लई झ्याक..
म्हणजे केवळ बायको आपल्यापेक्षा उंच वाटेल का ह्या शंकेने ग्रस्त होऊन जो लग्न मोडतो त्याची लायकीच नव्हती...

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रसाद लेले's picture

14 Jun 2009 - 10:02 pm | प्रसाद लेले

हा वसईकर कोण कळल्ल तर बर ? मी वसईकर आहे म्हणून विचारल्.........हाहाहाहा

पर्नल नेने मराठे's picture

15 Jun 2009 - 11:39 am | पर्नल नेने मराठे

वसई, पापडीला राहात होता रे तो =))
चुचु

आपला अभिजित's picture

14 Jun 2009 - 11:06 pm | आपला अभिजित

चुचू,

तुमच्या हलक्याफुलक्या शैलीतील लेख आवडला. लेखावर बर्‍याच जणांनी तशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे माझ्या जरा गंभीर प्रतिक्रियेने त्या वातावरणावर कदाचित विरजण पडेल.

तरीही, लिहिल्याशिवाय राहवत नाही.

कपडे, परफ्युम, चप्पल खरेदीतही आपण जेवढी विचक्षण आणि उत्साही व्रुती दाखवतो, पारखून घेतो, त्याच्या १० टक्केही आपला आयुष्याचा जोडीदार निवडताना दाखवत नाही, हा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. एकविसाव्या शतकातही ही परिस्थिती बदललेली नाही. म्हणून तर अमेरिकेतून ८ दिवसांसाठी भारतात आलेला मुलगा दिवसाला तीन या वेगाने (आईने आधीच शोर्ट-लिस्ट करून ठेवलेल्या)वीस-पंचवीस मुली पाहतो आणि त्यातली एक पसंत करून परदेशी रवानाही होतो. मग पुन्हा लग्नासाठी ८ दिवस भारतात येतो. परदेशी गेल्यावरच मुलीला कळतं, तिथलं वातावरण, त्याचा स्वभाव, तिथे आपण राहू शकतो की नाही ते!

आता तुमचंच उदाहरण घ्या.
तुम्हीच म्हणता, साखरपुड्यापर्यंत निर्णय आला होता. पण तुम्ही ज्या घरी राहायला जाणार, ते घर तुम्ही पाहिलेलं नाही. घरातल्या माणसांच्या स्वभावांचा अंदाज घेतलेला नाही. त्याच्या आईचं `डॉमिनेशन' तुम्हाला जाणवलेलं नाही. त्याबाबत मुलाशी तुम्ही बोललेला नाही आणि मुलानंही घरच्यांविषयी तुम्हाला काही सांगितलेलं नाही.

उद्देश तुमच्या किंवा अन्य कुणाच्या त्रुटी दाखवण्याचा नाही.
अजूनही लग्न हा विषय एकतर चेष्टेचा किंवा कॅज्युअली घेण्याचाच आहे. मुला-मुलींना एकमेकांची पूर्ण ओ़ळख करून घेऊन, पारखून निर्णय घेऊ देण्याची संधी पालकही देत नाहीत, हे दुर्दैव आहे. `आमचेही संसार झालेच की' म्हणून पालक त्यांच्या पुढच्या पिढीलाही अंधार्‍या विहिरीतच उडी मारायला लावतात!!
त्यामुळेच मुले-मुलींना परिचयातून साथीदार निवडण्याची संधी देणार्‍या `साथ-साथ'सारख्या संस्था ओस पडतात आणि वधु-वर सूचक केंद्रांची कार्यालयं गर्दीने (ती देखील पालकांच्या. विवाहेच्छू मुला-मुलींच्या गर्दीने नव्हे!) दुथडी भरून वाहतात!!!

पिवळा डांबिस's picture

14 Jun 2009 - 11:46 pm | पिवळा डांबिस

माझ्या जरा गंभीर प्रतिक्रियेने त्या वातावरणावर कदाचित विरजण पडेल.
कदाचित? तुम्हाला संदेह वाटतो त्यात?:)

अमेरिकेतून ८ दिवसांसाठी भारतात आलेला मुलगा दिवसाला तीन या वेगाने (आईने आधीच शोर्ट-लिस्ट करून ठेवलेल्या)वीस-पंचवीस मुली पाहतो आणि त्यातली एक पसंत करून परदेशी रवानाही होतो. मग पुन्हा लग्नासाठी ८ दिवस भारतात येतो. परदेशी गेल्यावरच मुलीला कळतं, तिथलं वातावरण, त्याचा स्वभाव, तिथे आपण राहू शकतो की नाही ते!
आता बघा, चुचुताईच्या लेखातला मुलगा वसईचा!
त्याच्या घरी चुचुताईंना आणि बहिणीला एकट्यानंच जायची त्यांच्या आईने परवानगी दिली त्याअर्थी त्या सुद्धा त्यावेळेस भारतातच रहात असाव्यात (बहुदा मुंबईत!)
इथे परदेशातल्या मुलाचा संबंध येतोय कुठे?
तरी तुम्ही देशी वडाची साल अमेरिकन पिंपळाला चिकटवल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!

नीधप's picture

15 Jun 2009 - 12:18 am | नीधप

टू गुड सिनीयर डॉग! ;)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अवलिया's picture

15 Jun 2009 - 6:32 am | अवलिया

वा! मस्त !!
पिडाकाकाशी (चक्क) सहमत ;)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

अरुण मनोहर's picture

15 Jun 2009 - 11:06 am | अरुण मनोहर

खाली प्रतिसाद लिहीला आहे.

पक्या's picture

15 Jun 2009 - 6:54 am | पक्या

अनुभव छान मांडलात.
बरे झाले तुमचे लग्न त्या मुलाशी झाले नाही ते. काय बाई होती ती ..चक्क तुम्हाला भांडी घासायला लावली.
अजून अनुभव कथन येऊ द्यात.

चित्रादेव's picture

15 Jun 2009 - 10:06 am | चित्रादेव

एवढी रगडून रगडून भांडी घासायचीच नाहीत ना............ जेवण होइपर्यन्त अंदाज आला होता ना.. की पाणी कितना खोल है.
:)
इथे कामवाल्या बाया पण पगार नक्की ठरवल्याशिवाय काम करत नाही. आणि बेसीनभर भांडी १५ मिनीटात उरकतात. छे!
:)
ह. घ्या.
पण मजा आली वाचताना.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jun 2009 - 12:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चुचुतइ चन्गल्म लिहिल अहेत.

अजुन लिहित र्‍हा! :S :S :S :S

कवितानागेश's picture

2 Feb 2011 - 6:02 pm | कवितानागेश

सुंदर फोटु.

अरुण मनोहर's picture

15 Jun 2009 - 10:29 am | अरुण मनोहर

साध्या सोप्या शब्दातले मनमोकळे लिखाण.

सुधीर काळे's picture

15 Jun 2009 - 10:38 am | सुधीर काळे

Your article is really "Wondergood"! Keep writing.
Sudhir Kale

क्रान्ति's picture

15 Jun 2009 - 9:28 pm | क्रान्ति

भारी अनुभव! नक्की काय शोधत होती ती बाई? भांडीवाली की सून?
;)

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

धनंजय's picture

15 Jun 2009 - 9:43 pm | धनंजय

खुसखुशीत अनुभवकथन आवडले.

चैत्रपालवी's picture

19 Jun 2009 - 11:29 am | चैत्रपालवी

लेख खूप आवडला. मस्त लिहिलय... कै डेन्जर बाई आहे... भान्डी घासायला लावली..... टू मच!

जय - गणेश's picture

16 Jun 2011 - 2:38 pm | जय - गणेश

भान्डी घासायला लावली तर त्यात काय झाले, कदाचीत मुलाच्या आईला लेखीकेला भान्डी घासता येतात की नाही ते पहायचे आसेल,

तुम्हाला तुमच घोड नाचवायला कोण्त्या गाडवान सांगीतले ???

ऋषिकेश's picture

19 Jun 2009 - 1:33 pm | ऋषिकेश

हा हा हा!
लग्नाच्या बाजारी.. लेक धुणी भांडी करी ;)

मस्त .. खुसखुशीत.. अजून येऊ द्या!

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

चुचु,
आतापर्यंत वसई म्हटले कीं चिमाजी अप्पा व गोविंदा यांचीच आठवण यायची. तुझा सुंदर लेख वाचल्यावर यापुढे वसईचा उल्लेख झाल्यावर तुझी आठवण त्यांच्याही आधी येईल :)!
लिहीत रहा. तुझी वहाती शैली आवडली.
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

नेहमी आनंदी's picture

16 Nov 2009 - 11:55 am | नेहमी आनंदी

फार चानगल्या भाधेत उत्तम कथन केलस बाई त्या बाई च. अजुन अनुभव असतिल तर लिहुन मनातील गरळ इथे ओकुन टाक.

काजुकतली's picture

2 Feb 2011 - 3:37 pm | काजुकतली

मला होकार द्यावा लागला कारण नकार देण्यासारखे काही असेल असे वाट्ले नाही.

लग्नाला होकार देताना एवढा लाईटली विचार करु नका. आयुष्यात UNDO बटण नाहीये आणि असले तरी ते वापरणे तितकेसे सोपे नाहीय. पुढे जाण्याआधीच प्रकरण संपले याबद्दल देवाचे आभार माना.

मनराव's picture

2 Feb 2011 - 3:51 pm | मनराव

मस्त लेख काकू.......... पुढचे किस्से येउ द्यात अता.........

कवितानागेश's picture

2 Feb 2011 - 5:45 pm | कवितानागेश

असे अनुभव कमीजास्त प्रमाणात सगळ्यानांच येतात.
मुलीना आणि मुलांनादेखिल.
आधीच तू जास्त उंच आहेस ;) हे कळले ते बरे झाले!
एकदा उंच असले की बुटके होता येत नाही परत.

प्राजक्ता पवार's picture

2 Feb 2011 - 5:46 pm | प्राजक्ता पवार

मस्तं अनुभव कथन .... आवडलं.
लिहीत रहा .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Feb 2011 - 6:18 pm | निनाद मुक्काम प...

@येव्हड्या अनुभवातुन गेल्यानंतर मिळालेला नवरा कसा आहे ? सासु कशी आहे ? सध्या घरात धुणी भांडी, आमटी , पोळ्या कोण करते ?

सगळे कसे विस्ताराने येउ दे.
हे म्हणणे मात्र पराचे आवडले .

ह्या बाबतीत माझा आदर्श घे .(कुणी निंदा /कुणी वंदा )
तुझा वाळवंटातील अनुभव लिही बर सविस्तर पणे
बाकी आपल्या कडे लग्न हे दोन जीवांचे मिलन नसते .तर दोन कुटुंबांचे असते .त्यात एकेमेकाच्या घरचे संस्कार /रीतभात /वळण
अश्या सगळ्यास गोष्टींचा कस लागतो .
लग्नाच्या बाजारात स्थळाची माहिती काढणे ( ह्यासाठी त्याच्या कार्यालयात किंवा एरियात राहणाऱ्या कुठल्याश्या लांबच्या नातेवाईक किंव आप्त स्वकियांकडून माहिती काढली जाते .(उदा आधी काही भानगडी /व्यसन / )भन्नाट प्रकार असतो .तो गरजेचा असतो .
सध्या माझा एक कटिंग चाय मारणारा मित्र लग्नाच्या बाजारात पत्रिका जुळली कि पवित्र विवाह किंवा जीवनसाथी डॉट कॉम मधील उपवर वधू जेव्हा त्याला सी सी डी मध्ये बोलावतात तेव्हा तो उखडतो
.एवढे करून जमल नाही कि च्यायला पैसे फुकट गेले म्हणून शिव्या घालतो .
त्याला'' बिल शेअर करूया''
असे म्हणणाऱ्या स्वाभिमानी मुली आवडतात .

शाहिर's picture

16 Jun 2011 - 2:11 pm | शाहिर

त्याला'' बिल शेअर करूया''
असे म्हणणाऱ्या स्वाभिमानी मुली आवडतात .
लै भारी!!

इंटरनेटस्नेही's picture

15 Jun 2011 - 2:23 pm | इंटरनेटस्नेही

अप्रतिम.

हॅ हॅ हॅ .... छान लीहलय हो, पण त्याच त्याच छापाच्या प्रतीक्रीया वाचून कंटाळा आला असावा असं एकतर्फी वाटलं, म्हणूनच माझ्या प्रतीक्रीयेचं टायटल मूद्दाम चूकीच लीहलय. :) .. खर तर लेख वाचताना खूप मज्या आली वाचताना. विशेषतः सासूबाइ तर फारच खाश्ट वाटल्या... बरं झालं त्यांची खरडपट्टी निघाली ते.... बाकी लेखन छानच. अजून येऊ द्यात....

राजेश घासकडवी's picture

15 Jun 2011 - 9:40 pm | राजेश घासकडवी

अतिशय सहज लेखनाची भट्टी छान साधलेली आहे.

'बहिणीने माझ्याकडे बघितलं.' हे सरळसाधं वाक्य पुन्हापुन्हा येतं. आणि काहीही न सांगता बहिणीच्या चेहेऱ्यावरचे भाव डोळ्यासमोर उभे रहातात.

मस्त. अजून तुम्ही लिहीत का नाही असा प्रश्न पडतो.

आशु जोग's picture

28 Sep 2011 - 11:05 pm | आशु जोग

ज्याला नाकारतो तो वाईट नसतो

ज्याला स्वीकारतो तो फार चांगला नसतो

संत जोग

सविता's picture

29 Sep 2011 - 12:19 pm | सविता

चुचु,

कुठे आहे सध्या? काय संन्यास घेतला की काय?

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2011 - 1:27 am | बिपिन कार्यकर्ते

एवढे कुठले आमचे भाग्य! ;)