लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - २

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in जनातलं, मनातलं
15 Nov 2009 - 7:01 pm

लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - १
लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - २

वसईचा किल्ला हातुन गेला आणी चवताळुन आई व काकुने ह्या वर्षात लग्न पार पाड्लेच जाईल असा ठराव मान्ड्ला. मी बाबाना व काकाला मधे टाकण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघेही हतबल झालेले दिसले. लोक सुचवतिल तिकडे माझी पत्रिका जात असे पण ती जमत नसे हा भाग वेगळा =)). असेच एका ठिकाणी आई व बहीण दोघिहि एका ठिकाणी पत्रिका घेवुन गेल्या. मुलाच्या आईने उन्ची जमत नसल्याचे सान्गितले त्यांमुळे पुढे पत्रिका पहाण्याचा काही प्रश्नच उरत नव्ह्ता. पण त्या बाईनी त्याच ईमारतीतील त्यान्च्या एका मैत्रिणीच्या मुलाचे स्थळ सुचविले. त्यानी लगेच २रर्या मजल्यावरुन १ल्या मजल्यावर त्या मैत्रिणीला फ़ोन केला व त्याना ह्या पत्रिका घेवुन येत आहेत असे कळविले. ह्या दोघी लगेच १ल्या मज्ल्यावर आल्या. मुलाच्या आईला जुजबी पत्रिका पाहाता येत असल्य़ाने त्यानी लगेच पत्रिका जमत नाही असे सान्गितले. आणी त्या बाईनी आईला विचारले ह्या मुलीचे म्हणजे बरोबर असलेल्या बहीणीचे पण बघताय का, तसे आई म्हणाली नाही नाही, आधी मोठीचे मग हिचे. आणी दोघी बाहेर पडल्या.

मला जरा बरे नव्हते म्हणुन मी त्या दिवशी ऒफ़िसला गेले नव्हते. तोच एक ऒळ्खीच्या बाई घरी आल्या. आई कुठेय वैगरे विचारुन झाले. मग मलाच म्हणाल्या कि त्यान्च्या बहीणीचा नातु परदेशातुन आलाय आणी तुझी पत्रिका तिकडे जमलिये. मी म्हणाले, आई येउ दे मग काय ते तिच्याशी बोला, तर त्या म्हणाल्या तिच्याशी बोलुन झालय़. मला म्हणाल्या कि मुलगा शिकलॆला आहे, त्याच्या घरि काम्पुटर का काय ते पण आहे न त्या गोल क्यासेट तो ऎकतो =)) =)) आणी बाई गेल्या. तोवर ह्या दोघी घरी आल्या. तोच एक फ़ोन आला, आईनेच घेतला. मग कळ्ले त्या १ल्या मजल्यावरच्या बाईना बहिण खुप आवड्ली होती न तिला चक्क मागणीच घातली गेली होती, जुजबी पत्रिका पाहुन पुढे जायचे होते. आईने फ़ोन बाबाना दिला, मुलाचे वडिल बोलत होते त्यावर माझे बाबा म्हणाले कि नाही हो, मग माझ्या मोठ्या मुलीला वाईट वाटेल, त्यावर ते म्हणाले कि अहो काळ्जी करु नका, मी तुम्च्या मोठ्या मुलीकरिता स्थळ शोधेन. आई बाबा दोघेही कात्रित सापडल्य़ासारखे झाले होते. मग मीच त्याना म्हणाले कि व्हा पुढे. आणी दुसर्याच दिवशी बहिणीची पत्रिका पाठवली, जमली म्हणुन फ़ोन पण आला. आता दोघीन्च्या पत्रिका जुळ्ल्या होत्या, फ़क्त मुलगा पहाणे बाकी होते.

काय योगायोग असतात, दोघीना एकाच दिवशी दोन्ही घरी बोलावले गेले. नाही पण म्हणता येत नव्ह्ते मुलाना वेळ होता तसा कार्यक्रम आखला गेला होता. मी आईला म्ह्ट्ले बरे झाले, आप्ल्या घरी पसारा नाहि तो चहा पोह्यान्चा ते. ती त्यावर म्हणाली गप्प बस, कळ्ली तुझी अक्कल. ति बिचारी तणावाखाली असावी, असले २ नमुने वट्वायचे म्हणुन. सकाळी बहिणीला घेवुन आई बाबा मुलाच्या ओफ़िसला गेले, रविवार अस्ल्याने स्टाफ़ला सुट्टी होती. घर तर बघुन झाले होते म्हणुन आज ओफ़्फ़िस. पणशीकरान्क्डुन साबुदाणे वडे, पियुश वैग्रे मागवले गेले. कार्यक्रम आटोपला आणी हे लोक घरी आले. मी बहिणीला विचारले, मुल्गा कसा दिस्तो वैग्रे, तर हि बाव्ळी बरा दिस्तो एव्धेच म्हणे. मी म्हणाले होकार आला तर ही म्हणाली मग मिहि होकार देइन. मला मेलीला अन्दाज्च लागत नव्ह्ता. आईला विचार्ण्याची हिम्मत नव्ह्ती, ती परत तणावाखाली कारण मेन किल्ला तर सन्ध्याकाळी लढवायचा होता. मुलाच्या आईचा फ़ोन आला, मुलगी पसन्त होती तर आई म्हणाली पण तुम्चा मुल्गा कमी बोलला, समोरुन उत्तर आले कि तो निरिक्शण खुप करतो =)) व कमी बोलतो. आई बहिणीला म्हणाली बघ बाइ मुलगा सावळा आहे मग कट्कट चालणार नाही, तसा हिचा होकार ठाम होता.

सन्ध्याकाळ झाली, मी, काकु, आई व बाबा पोहोचलो. मुलाचे घर छान होते, एका बेडरुम मधे मस्त झोपाळा होता. मुलाची आई म्हणजे चक्क मनिमाउ, घार्या डोळ्यान्ची. बहिण दिसायला सुरेख, लग्न झालेली. मुलगा बाहेर गेलेला होता. मी झोपाळ्यावर बसले, हे सग्ळे बोलत होते. मुलगा आला व मला काकु बोलवायला आली. मुलगा मला जरा पात्रच वाट्ला, गचाळ टी शर्ट घालुन होता. त्याच्या बहिणीचा नवरा व हा सारखा हसे, त्यामुळे बाबाना पण तो पोरकटच वाट्ला. मग मला व त्याला बोलायला बेडरुमात पाठ्वले, मी त्याला मला झोका द्यायला लावला व मी मनोसोक्त झोपाळ्यावर बसुन घेतले. मी त्याला विचारले, काही व्यसन वैग्रे नहि न? तसा म्हणाला कि सुपारीच ही नाही. मग मुलाच्या आईने मुलाला आत बोलावले. आणी बाहेर येउन मनिमाउ म्हणाली, मुल्गी पसन्त.

आता लग्नाची तयारी सुरु झाली. जवळच राहाते म्हणुन बहीणीचे होणारे सासु सासरे माझ्या आजीला भेटायला गेले होते. ती त्याना म्हणाली कि हे बघा, तुम्ही म्हणाल कि १०००-१२०० लोकाना जेवायला घाला तर ते मुळीच जमणार नाही. आम्ही मुलीना भरपुर शिकवलेय न ब्ला ब्ला ब्ला. ते म्हणाले अहो आमच्या काहीच अटी नाहित आम्ही सहजच तुम्हाला भेटायला आलोय. माझ्या बहिणीचा नवरा तिला भेटायला बोलवायचा. नविन नविन ड्रेस घेवुन द्यायचा. आमच्या ध्यानाने काहिहि दिले नाहि मला. उलट बावळट मला एकदा गाडीवरुन पाडणार होता. म्हणजे मी मागे बसायच्या आत ह्याने गाडी सुरु करुन पुढे नेली, नशिब मी बसले नव्हते नाहितर रस्त्यात फ़तकल मारले असते. लग्नानतर हा बियर का काय ते पितो हे कळ्ले तेव्हा मी विचारले काय रे तु तर म्हणाला होतास सुपारीच ही व्यसन नाही, तर म्हणाला होय मुळी मला सुपारीच व्यसन नहिच आहे बियर पितो अधेमधे..... आता बोला.

दोन्ही लग्न ठरुन ६ महिन्यात आटोपली सुद्ध्धा. आणी पुढील ६ महिन्यात माझे बाबा अचानक गेले, कन्यादानाचे पुण्य मिळ्वुन. हेच लग्न न होता गेले असते तर आई वर केव्ढी जबाबेदारी आली अस्ती. स्वामी समर्थान्ची क्रुपा दुसरे काय.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

प्रसन्न केसकर's picture

15 Nov 2009 - 7:06 pm | प्रसन्न केसकर

आवडलं.

दोन्ही लग्न ठरुन ६ महिन्यात आटोपली सुद्ध्धा. आणी पुढील ६ महिन्यात माझे बाबा अचानक गेले, कन्यादानाचे पुण्य मिळ्वुन. हेच लग्न न होता गेले असते तर आई वर केव्ढी जबाबेदारी आली अस्ती. स्वामी समर्थान्ची क्रुपा दुसरे काय.

हे काळजाला भिडलं.

अवलिया's picture

15 Nov 2009 - 7:06 pm | अवलिया

हसवता हसवता गंभीर केलेस.
छान प्रकटन.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

वल्लरी's picture

15 Nov 2009 - 7:17 pm | वल्लरी

हसवता हसवता गंभीर केलेस.

असेच म्हणते,,,
बाकी छान लिहीतेस हां पर्नल..

---वल्लरी

लवंगी's picture

15 Nov 2009 - 8:22 pm | लवंगी

हसवता हसवता गंभीर केलस असच म्हणते..

बाकी झोपाळ्याचा अनुभव मस्त.. :)

टारझन's picture

15 Nov 2009 - 9:09 pm | टारझन

=)) "वैग्रे" हा शब्द काळजाला भिडला =)) बरा "ग्रे" चा "ग्रा" नाही केलास
=)) =)) =))
बाकी चुचे .. विरामचिन्हांचा जरा वापर वाढव गं .. ती वापरण्यासाठीच असतात.

- जर्नल

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2009 - 7:13 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =))

बेडरुम मधे मस्त झोपाळा

सो रोमँटिक !!! :D

बिपिन कार्यकर्ते

संदीप चित्रे's picture

17 Nov 2009 - 3:10 am | संदीप चित्रे

लग्न ठरण्याआधीच झोका द्यायला सांगणं म्हणजे तर अजूनच रोमँटिक :)

चतुरंग's picture

17 Nov 2009 - 3:14 am | चतुरंग

अशा रीतीने तुमचा संसार एकंदरित 'झोकात' सुरु झाला असं म्हणायला काही हरकत नाही! ;)

('ध्यान'स्थ)चतुरंग

टारझन's picture

17 Nov 2009 - 10:16 am | टारझन

मी तर झोपाळ्याचीच बेडरूम बणवायचा विचार करत होतो ... पण ते उगा अरबी समुद्रात शिवाजीपुतळा उभारण्यासारखं होईल ... सबब विचार सोडला ;(

बेडरूम मधे झोपाळ्याबरोबर एक घसरगुंडी पण हवी असं वाटतं ;)

-(ध्यान'विर) टारझन

JAGOMOHANPYARE's picture

17 Nov 2009 - 11:38 am | JAGOMOHANPYARE

शाहू महाराज ..?

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

हा प्रतिसाद वाचुन लोळल्या गेले आहे......

मागे आम्ही एकदा कोल्हापूरला मित्राकडे गेलो असता त्या मित्राने महालक्ष्मी मंदीर, रंकाळा वगैरे दाखवून झाल्यावर शाहू महाराज किती थोर होते हे ही सांगितलं. :)

बॅटमॅन's picture

9 Apr 2012 - 6:29 pm | बॅटमॅन

हाहाहाहाहा :D :D

शार्दुल's picture

15 Nov 2009 - 7:17 pm | शार्दुल

हसवता हसवता गंभीर केलेस,,,,, असच म्हणते,,,

नेहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Nov 2009 - 7:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन एकदम खुसखुशीत. वाचतांना मजा आली.

>>मी त्याला मला झोका द्यायला लावला व मी मनोसोक्त झोपाळ्यावर बसुन घेतले.

शाब्बास...!
>>आई म्हणाली पण तुम्चा मुल्गा कमी बोलला, समोरुन उत्तर आले कि तो निरिक्शण खुप करतो

हा हा हा हे तर लैच भारी.

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

15 Nov 2009 - 11:19 pm | चित्रा

>मी त्याला मला झोका द्यायला लावला व मी मनोसोक्त झोपाळ्यावर बसुन घेतले.

>>शाब्बास...!

असेच म्हणते. :)

चुचुताईंच्या हुषारीची कमाल आहे. ध्यान "आपलेच" आहे हे लागलीच ओळखलेले दिसते. ;)

मस्त कलंदर's picture

15 Nov 2009 - 7:36 pm | मस्त कलंदर

नि नाना म्हणतो तसे हसता हसता खरंच गंभीर केलंस!!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

प्रकाश घाटपांडे's picture

15 Nov 2009 - 7:41 pm | प्रकाश घाटपांडे

लग्नानतर हा बियर का काय ते पितो हे कळ्ले तेव्हा मी विचारले काय रे तु तर म्हणाला होतास सुपारीच ही व्यसन नाही, तर म्हणाला होय मुळी मला सुपारीच व्यसन नहिच आहे बियर पितो अधेमधे..... आता बोला

.
हॅहॅहॅ ! बरुबर हाय. खर बोल्ल त्यो. आमाला बायकोन इचारायच्या आदुगरच आमी सम्द सांगुन टाकल. हाय हे आस हाय पटत आसन तर पघा आस म्हनुन मोकळ झालो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

माधुरी दिक्षित's picture

15 Nov 2009 - 7:45 pm | माधुरी दिक्षित

पण शेवटी डोळ्यात पाणी आणलस :(

मदनबाण's picture

15 Nov 2009 - 8:18 pm | मदनबाण

@) @) @) @) @)

ह्म्म...

/:) /:) /:) /:) /:)

(चीची)
मदनबाण.....

The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

परिणीता's picture

15 Nov 2009 - 8:55 pm | परिणीता

आपल ते नेहमी बावळटच वाटात नेहमी सुरुवातीला,बेडरुम मधला पालना मस्त आयडीया आहे.:)

sujay's picture

15 Nov 2009 - 9:55 pm | sujay

त्याच्या घरि काम्पुटर का काय ते पण आहे न त्या गोल क्यासेट तो ऎकतो

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))

लेख नेहमी प्रमाणे भारीच.

सुजय

प्रभो's picture

15 Nov 2009 - 9:59 pm | प्रभो

चुचे, मस्त लिहिलयस गं....ह्यालापण एक क्रमशः जोडून टाक... =))

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Nov 2009 - 10:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि तुझ्या लग्नाची गोष्ट लिहायची का? अरे प्राण्या, लग्नं ठरल्यावर कसलं क्रमश:??

चुचुतै, चांगलं लिहीलं आहेत. पण (अ)शुद्धलेखनामुळे वाचायला अंमळ त्रास झाला!

अदिती

प्रभो's picture

15 Nov 2009 - 10:12 pm | प्रभो

अवखळकरतै, माझ्या लग्नाची गोष्ट मी लिहीन की(आधी आमच्या हिला हो तरी म्हणू दे...नाही म्हणाली तर दुसरी हुडकाला वेळ जाणार...)......
चुचुला लग्नानंतरचे वैवाहिक जिवनाचे अनुभव लिहायला सांगत होतो...जेणेकरून त्याचा फायदा समस्त होतकरू विवाहीतांना व्हावा.. :)

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Nov 2009 - 10:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कैच्याकैच? लग्नानंतरचे दुसर्‍याचे अनुभव आणि स्वतःचे अनुभव यांच्यातलं साम्य शोधत बसशील तर दुसरी बायडी शोधायची वेळ येईल ... हा एवढा एकच अनुभव पुरे ठरावा!!

अदिती

प्रभो's picture

15 Nov 2009 - 10:22 pm | प्रभो

हे स्वानुभवाचे बोल काय??
(असो..बाकीची चर्चा खरडवहीत करू...तुझे अनुभव सांग...)
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Nov 2009 - 10:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"व्यक्तीगत प्रश्न, पास" असं म्हणायचा मोह होत आहे, पण तरीही ... मी पहिल्यांदाही बायडी शोधली नाही. (मी माझा जॉन अब्राहम शोधला!)

असो. बाकी चर्चा आपण तिकडे करू या!! उगाच, व्यक्तीगत गफ्फांसाठी का मिपाची ब्यांडविड्थ खायची नाही का?

अदिती

परिकथेतील राजकुमार's picture

16 Nov 2009 - 2:58 pm | परिकथेतील राजकुमार

आणि तुझ्या लग्नाची गोष्ट लिहायची का? अरे प्राण्या, लग्नं ठरल्यावर कसलं क्रमश:??

तो स्वतःच्या लग्नाची पण गोष्ट लिहिल आणी तळटीप देईल की 'हा भाग आवडला तर पुढचा भाग, हा भाग नाही आवडला तर दुसरे लग्न करुन पुन्हा पहिला भाग लिहिन.'

चुचु मावशी छान लिहिले आहेत हो तुमचे अनुभव. तुम्हाला गाडीवर 'वैग्रे' बसता येते हे ऐकुन आनंद झाला.

नेहमीप्रमाणेच 'ध्यान' हा शब्द काळजाला भिडला आणी रुतुन बसला.

©º°¨¨°º© पराबाण ©º°¨¨°º©
आमचे राज्य

भडकमकर मास्तर's picture

15 Nov 2009 - 10:36 pm | भडकमकर मास्तर

अगायायाया...
लै भारी झालाय लेख..
...
विशेषतः
गोल क्यासेटी
आणि कमी बोल्तो आणि निरीक्षण जास्त करतो..
=))
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

मी-सौरभ's picture

15 Nov 2009 - 11:34 pm | मी-सौरभ

=)) =)) =))

:(

सौरभ

प्रमोद देव's picture

15 Nov 2009 - 11:40 pm | प्रमोद देव

वा! चुचुताई,मस्त लेखन.
आवडलं!

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

ऋषिकेश's picture

16 Nov 2009 - 1:11 am | ऋषिकेश

विनोदी शब्दापुढील प्रश्नचिन्ह सार्थ आहे. अचानक कथा सिरीयस होते.
लेखन आवडले..

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

स्वाती२'s picture

16 Nov 2009 - 1:24 am | स्वाती२

मस्त लिहिलय! शेवट वाचून डोळे पाणावले.

रेवती's picture

16 Nov 2009 - 4:49 am | रेवती

लेखन आवडले. खरच तुझ्या आईवरची मोठी जबाबदारी बाबा असतानाच पार पडली. पण नवर्‍याला ध्यान काय म्हणतीयेस? असं सगळं लिहिल्यावर आक्षेप घेत नाहीयेत म्हणजे खेळकर स्वभावाचे असणार भावोजी!:)

रेवती

विंजिनेर's picture

16 Nov 2009 - 9:31 am | विंजिनेर

पण नवर्‍याला ध्यान काय म्हणतीयेस?

मेरकुभी वहिच प्रश्न पड्या है.
आख्ख्या मिपासमोर नवर्‍याला ध्यान, गबाळा इ. 'लाडिक' संबोधने म्हणजे अंमळ अस्थानी वाटतंय. एकेकाची नवर्‍यावरचे प्रेम व्यक्त करायची पद्धत जगावेगळी असतेय ;)

सहज's picture

16 Nov 2009 - 8:33 am | सहज

लै लै भारी लेखन चुचुतै!

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Nov 2009 - 9:18 am | llपुण्याचे पेशवेll

छान. म्हणजेच दोनही लेकी सुस्थळी पडल्या तर. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

सुधीर काळे's picture

16 Nov 2009 - 9:29 am | सुधीर काळे

चुचु,
भाग-२ ही छान आहे. शेवट खरंच आवडला. रेवती-मॅडमनी लिहिल्याप्रमाणे आमचे जावईबापू खूप मनमिळाऊ दिसताहेत! त्यांना सलाम सांग!
तुझ्या भाग-१ ची २५००हून जास्त पारायणे झालेली पाहिली. हा एक 'मिपा-विक्रम' आहे का? जाणत्यांनी/तात्यासाहेबांनी जरूर तपासून जाहीर करावे.
पण नसला तरी अगदी "डेब्यूला डबलसेंचूरी" हाही एक विक्रमच!
जीते रहो!
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

टारझन's picture

16 Nov 2009 - 12:04 pm | टारझन

तुझ्या भाग-१ ची २५००हून जास्त पारायणे झालेली पाहिली.

सामंत अजोबा -> पाचलग राव --> काळे साहेब ---> ?????

-(पारायण रेकॉर्डर) टारझन

सामंत आजोबा विपुल लिखाण करतात हे माहीत आहे, पण त्यांच्या प्रत्येक लेखाची किती पारायणे झाली आहेत ते माहीत नाहीं.
पाचलग हे तर मी इथे जॉईन झाल्यापासून मी पाहिलेलेच नाहींत. परवा परीकथेतील राजकुमार यांच्या एका शेर्‍यात कोदा हा उल्लेख आला, त्याबद्दलची चौकशी केली तेंव्हा पाचलगांचं नाव ऐकलं. माझ्या लिखाणाची सर्वात जास्त पारायणे २००० पेक्षा कमीच झाली आहेत. म्हणून चुचुचा डेब्यू खूपच आनंद देऊन गेला.
म्हणून आपल्यासारख्या जुन्या-जाणत्यांमध्ये कुणी "आनंदजी दोसा" असेल त्यांना विचारले.
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Nov 2009 - 10:02 am | ब्रिटिश टिंग्या

:)

धमाल मुलगा's picture

16 Nov 2009 - 10:17 am | धमाल मुलगा

लग्नानतर हा बियर का काय ते पितो हे कळ्ले तेव्हा मी विचारले काय रे तु तर म्हणाला होतास सुपारीच ही व्यसन नाही, तर म्हणाला होय मुळी मला सुपारीच व्यसन नहिच आहे बियर पितो अधेमधे..... आता बोला.

=)) =))
काय बोला? ज्यांना तु ध्यान ध्यान म्हणतेस त्यांनी तुलाच ध्यान करुन ठेवलं! हॅहॅहॅ.... कसं गंडवलं कसं गंडवलं! !!!!!!

मुलाचे घर छान होते, एका बेडरुम मधे मस्त झोपाळा होता.

:O अरे व्वा! भलतीच हौशी आणि रसिक दिसत्ये स्वारी! :D

छान लिहिलंयस... आवडलं, पण शेवट मात्र.... :(
असो, चालायचंच!

निखिल देशपांडे's picture

16 Nov 2009 - 11:42 am | निखिल देशपांडे

ज्यांना तु ध्यान ध्यान म्हणतेस त्यांनी तुलाच ध्यान करुन ठेवलं! हॅहॅहॅ.... कसं गंडवलं कसं गंडवलं! !!!!!!

हॅ हॅ हॅ असेच म्हणतो गं...
बाकी हसता हसता रडवलेस गं...
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

ज्ञानेश...'s picture

16 Nov 2009 - 10:45 am | ज्ञानेश...

लिखाणाची प्रांजळ, नर्मविनोदी शैली आवडली.. नेहमीप्रमाणेच.

sneharani's picture

16 Nov 2009 - 11:51 am | sneharani

लेखन एकदम खुसखुशीत.
छान...!

नेहमी आनंदी's picture

16 Nov 2009 - 12:09 pm | नेहमी आनंदी

हा लेख सुद्धा आवडला ग चुचु.
शेवट जरा डोळ्यात पाणी आणुन गेला. पण बाकी प्रसंग फारच छअन. तो बेडरूम मधला झोपाळा तर खासा रोमंटिकच.

श्रावण मोडक's picture

16 Nov 2009 - 12:36 pm | श्रावण मोडक

छान...
मी त्याला मला झोका द्यायला लावला व मी मनोसोक्त झोपाळ्यावर बसुन घेतले.
या वाक्यावरून ध्यानचा खुलासा झाला बाकी!!!

वेताळ's picture

16 Nov 2009 - 1:04 pm | वेताळ

अभिनंदन...शेवटी तु गचाळ व पोरकट नवरा निवडल्या बद्दल. =))
हा लेख तु मिस्टराना दाखवला आहेस काय?
वेताळ

पर्नल नेने मराठे's picture

16 Nov 2009 - 1:13 pm | पर्नल नेने मराठे

गचाळ टी शर्ट होता >:P नवरा नाही, नवरा हॅन्डसम आहे .
लग्नाआधी मुले पोरकटच असतात मग मॅच्युअर्ड होतात.
लग्नाआधी मॅच्युअर्ड असणारा नवरा मला नकोच होता. :D

चुचु

टारझन's picture

16 Nov 2009 - 2:32 pm | टारझन

गचाळ टी शर्ट होता नवरा नाही, नवरा हॅन्डसम आहे .
लग्नाआधी मुले पोरकटच असतात मग मॅच्युअर्ड होतात.
लग्नाआधी मॅच्युअर्ड असणारा नवरा मला नकोच होता.

खुलाश्याबद्दल धन्यवात ... :)

--(इम्मॅच्युअर्ड पोरींच्या शोधात) अफ्रिकन पोर्कटिंग्या

JAGOMOHANPYARE's picture

16 Nov 2009 - 1:23 pm | JAGOMOHANPYARE

लग्न ठरताना नवरा सारखा हसत होता.... आता अजून हसतो का?
:)

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

भाग्यश्री कुलकर्णी's picture

16 Nov 2009 - 1:28 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खुपच छान ग चुचु.

दिपक's picture

16 Nov 2009 - 1:30 pm | दिपक

दोन्ही भाग वाचुन काढले. एकदम खुशखुशीत अनुभवकथन. आवडलं.
शेवटच्या दोन ओळींन मात्र गंभीर केलं.

गणपा's picture

16 Nov 2009 - 2:08 pm | गणपा

:) छान. पहिला भाग पण आत्ताच वाचला. मस्त आहेत दोन्ही.
एकदम खुसखुशीत झालाय..पण शेवटी अंमळ हळवा झालो.

बाकरवडी's picture

16 Nov 2009 - 7:46 pm | बाकरवडी

ध्यान =)) =))
बाकी लेखन अप्रतिम.

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

अवलिया's picture

16 Nov 2009 - 7:51 pm | अवलिया

५० वा प्रतिसाद.

चालु द्या !!

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

बाकरवडी's picture

16 Nov 2009 - 8:01 pm | बाकरवडी

५१ वा प्रतिसाद.
पळू द्या
======बाकरवडी

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

विनायक प्रभू's picture

17 Nov 2009 - 8:55 am | विनायक प्रभू

बेडरुमधे झोपाळा का?
वा वा वा.
जरा ध्यानाला माझा नंबर द्या बघु तै.
भावोजींना काही व्यक्तिगत प्रश्न विचारीन म्हणतो.
काय?

श्रद्धा.'s picture

25 Nov 2009 - 10:08 am | श्रद्धा.

व्वा दोन्ही भाग मस्तच....

मृगनयनी's picture

29 Sep 2011 - 2:10 pm | मृगनयनी

चुचु, मस्त आहे गं...

बादवे, मराठेकाकांनी उर्फ तुझ्या ध्यानाने वाचलं आहे का हे लिखाण!!...... ? ;)

जर वाचूनही तो तुझ्याशी नॉर्मल वागत असेल.. तर तू खरंच भाग्यवान आहेस बै!!! ;) ;) ;)