एका लग्न समारंभाची सफर (भाग ४ अंतिम)

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
30 May 2009 - 10:51 am

एका लग्न समारंभाची सफर (भाग १) http://www.misalpav.com/node/7933
एका लग्न समारंभाची सफर (भाग २) http://www.misalpav.com/node/7950
एका लग्न समारंभाची सफर (भाग ३) http://www.misalpav.com/node/7962

आमचे जेवण झाले आणि आम्ही हात धुवण्याची जागा विचारली. बाहेर पायरीवर ठेवलेल्या बालदीकडे त्यांनी आम्हाला हात धुवण्यास सांगितले. आम्ही पायरीवर चढलो आणि हात न धुवताच पायांना चटके बसल्यामुळे परत खालू उतरलो आणि अंगणाच्या एका कोपर्‍यात हात धुतले. ती जाग आधीच ओली होती म्हणजे आधीच्या पंगतीनेही तिथेच हात धुतले असणार.

आमच्या सोबतच्या मंडळींची निघण्याची घाई चालु होती. कारण तिथे थांबणे सहन होत नव्हते. ना हवा ना माणुसकी, कशाच्या आधारावर थांबणार ? निघण्यापुर्वी आम्ही नवर्‍यामुलाचा निरोप घेतला आणि निघालो पण कोणीही आम्हाला लगेच का चाललात , थोड थांबा हे बोलण्याची तसदी घेतली नाही. घेतली असती तरी आमचे थांबणे अशक्यच होते.

डोक्यावर रुमाल ठेउन २.४५ ला आम्ही गाडीत जाऊन बसलो. फक्त पाऊण तास आम्ही तिथे थांबलो नात्यातले लग्न असुन पण. परत तोच खडतर प्रवास आणि तोंडाचा चालु पट्टा. लग्नाला आलो काय ? जेवलो काय ? आणि निघालो काय ? केवळ जेवणासाठी (तेही झगडून) आपण इतक्या लांब हाल सहन करत आलो असे वाटू लागले. आमच्या ४ गाडया आणि आधीच्या वर्‍हाडापैकी १ गाडी त्यात २ सांगकामे मामा जाऊन बसले, म्हणजे ही गाडी कोणाची असेल ते तुम्हाला सांगायला नको.

परतताना आम्हाला बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायचे होते. आम्हेई परत त्या सरबत-गोळ्याच्या गाडीवर जमलो. परत २-३ ग्लास सरबत पिऊन आम्ही बल्लाळेश्वराच्या दर्शनाला गेलो. खुप सुंदर दर्शन झाले. तेवढेच एक समाधान लाभले.

दर्शन घेऊन निघाल्यावर पुढे आम्हाला एक नदी दिसली. तडफदार्-तरूण मंडळी आणि युवक युवतींची गाडी आमच्या पुढे होती. आता दोन्हीही गाड्या नदीच्या पात्राच्या दिशेन जाऊ लागल्या. इतक्यात आम्हाला फोन आला की तुम्हीही गाडी नदीच्या पात्राकडे वळवा.

आम्ही नदीवर जाऊन उतर नाही तर तेवढ्यात सगळे तरूण, युवक शर्ट काढून नदीत पोहायला उतरले. त्यांचे बघून लहान मुल पण किनार्‍याजवळ जाऊन पाण्यात डुंबू लागली. मग आम्हीही मुलांच्या बरोबर पाण्यात पाय टाकून दगडावर बसलो आणि हात पाय ओले केले. कामसांगे मामा कंपनीने एका झाडाच्या पाठीमागे मैफील बसवली आणि घडलेल्या परीस्थितीचा ज्वलंत विषय त्या मैफीलीत जोरदार रंगला. जवळ जवळ अर्धा तास आम्ही इथे घालवला आणि आम्ही निघालो.

येताना आमच्या ड्राईव्हरने व्यवस्थित गाडी आणली पण आता त्याला कुठेतरी जायची घाई होती बहुधा, त्यामुळे तो वेगाने गाडी चालवायला लागला. गाड्यांना ओव्हरटेक करायला लागला. आम्ही त्याला ओरडू लागलो तो मधे हळू चालवायचा परत जोरात चालवायचा. परत आम्ही आमचे जीव मुठीत धरले.

अर्ध्या रस्त्यावर येऊन त्याने पेट्रोल पंपावर गाडी थांबवली. १५० रु. च तोंडातल्या तोंडात बोलून पेट्रोल भरायला सांगितले. हळूच बोलल्याने त्याने देडसो च तिनसौ ऐकल. ह्याने १५० रु. पुढे केल्यावर तो म्हणाला की पेट्रोल तुम्ही ३०० रु. च भरायला सांगितल सांगितले. आता ड्रायव्हर भडकून म्हणाला की मी फक्त १५० रुपयांच पेट्रोल भरायला सांगितल होत. एवढ का भरलस ? मला मालकाने १५० रु. च दिले आहेत. तो मला जास्त झालेले पैसे देणार नाही. झाल परत इथे नविन चटके सुरू झाले. दोघांमध्ये वाद चालू झाला पण पेट्रोलपंपावरील इसम समजुतदारपणे त्याला सांगत होता. पण ड्राईव्हर पेट्रोल गाडीतुन काढून घ्यायला सांगत होता. पण ते शक्य नसल्याचे जमलेल्या सगळ्याच पेट्रोलपंपावरील इसमांनी सांगितले. खर तर चुक ड्राईव्हरचीच होती त्याने पेट्रोल भरताना आकडा बघायला पाहीजे होता.

अस वाटत होत की खाली उतराव आणि त्याचे १५० रु. टाकून एकदाची गाडी सुरू करावी. पण गाडीत एक तरूण आणि एक युवक असताना असे करणे आगाऊपणाचे ठरले असते. आमच्या गाडीतील तरूण त्या ड्राईव्हरला सांगत होता की त्याच्याकडून बिल घे आणि मालकाला दाखव तो देईल तुझे पैसे. तेंव्हा ड्राईव्हर म्हाणाला पण मालकाचा त्यावर विश्वास बसणार नाही, तो म्हणेल की मिच पैसे खाल्ले.

शेवटी कंटाळून आमच्यातल्या एकीनी तरूण तडफदार मंडळींना फोन केला. आमची गाडी वेगाने आल्याने त्यांची गाडी खुप मागे पडली होती. ती ५ मिनीटांनी तिथे पोहोचली आणि घडला प्रकार समजाऊन घेऊन त्यांनी पंपवाल्यांचे पैसे देऊन टाकले आणि आमची सुटका झाली.

आता निघालो ते थेट घरी पोहोचलो. इतके दमलो होतो की वरातीलाही जाण्याची इच्छा नव्हती. सगळे जागच्या जागी बसुन होते. हालचालही करायला नको वाटत होत. दुसर्‍या दिवशी काही जणांना ताप भरला होता तर काहींना पित्ताचा त्रास झाला होता.

अशी हि आमची लग्नाची सफर अतित्रासदायक, कधीही न विसरता येणारी. आम्ही आता कुठेही एकत्र जमलो तरी आम्ही हाच विषय आवडीने चघळत असतो.

प्रवासविरंगुळा

प्रतिक्रिया

अनंता's picture

30 May 2009 - 11:32 am | अनंता

काय दिव्यातून गेलात!

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2009 - 1:39 pm | परिकथेतील राजकुमार

दु:खात सहभागी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

जागु's picture

30 May 2009 - 1:42 pm | जागु

आहो प्रवासात सहभागी व्हायला पाहीजे होतत.

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2009 - 1:54 pm | परिकथेतील राजकुमार

मी फार माणुसघाणा आहे हो, त्यामुळे समारंभाला वगैरे आमची उपस्थीती कायम शुन्य.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

Nile's picture

30 May 2009 - 2:01 pm | Nile

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत.

हे वाक्य पाहील म्हणुन आहेराच्या भितिनं नाही आले सफरीला. ;)

जागु's picture

30 May 2009 - 2:13 pm | जागु

बर झाल तुम्ही कोणी नाही आलात ते, फार बेकार अवस्था झाली होती आमची तशी कोणावर पाळी न येवो.

रेवती's picture

30 May 2009 - 5:13 pm | रेवती

किती हाल झाले तुमचे!
लग्नं ठरण्याआधी वधूवरांची चौकशी केली जाते......
यापुढे वर्‍हाडी मंडळींनी लग्न कुठे आहे? कसे आहे? रस्त्याची अवस्था याबाबत चौकशी केली पाहिजे.

रेवती

क्रान्ति's picture

30 May 2009 - 6:14 pm | क्रान्ति

अनुभव आहे ग हा जागु! वाचताना त्रास होत होता, तर प्रत्यक्ष तुमची काय अवस्था झाली असेल!
यापुढे लग्नाला जाताना विचार करायला हवा!

क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

जागु's picture

1 Jun 2009 - 11:12 am | जागु

अनंता, राजकुमार,निल, रेवती क्रांती प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

पर्नल नेने मराठे's picture

1 Jun 2009 - 1:44 pm | पर्नल नेने मराठे

मी पळुन आले अस्ते =))
तु कसे सहन केलस ग जागु :(

चुचु

जागु's picture

1 Jun 2009 - 1:46 pm | जागु

अग पळून यायला पण साधन पाहीजे ना ?

सँडी's picture

1 Jun 2009 - 3:25 pm | सँडी

प्रवासवर्णन छान!

कामसांगे मामांनी एवढा त्रासदायक प्रवास चांगलाच एन्जॉय केला. :)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Jun 2009 - 3:38 pm | घाशीराम कोतवाल १.२

अरे चार घोट पोटात गेल्यावर मामा काय
कोणी हि असा प्रवास एन्जॉय करेल
फुल टुन झाल्यावर काय फरक पडला त्यांना ?

*************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

प्राजु's picture

1 Jun 2009 - 9:01 pm | प्राजु

दिव्यातून पार पडलात!!
आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी जेव्हा आपण एखाद्याला आमंत्रण देतो तेव्हा त्याला आपल्या आनंद सहभागी होताना कष्ट पडून नयेत.. दु:ख होऊ नये हे ही पहायला हवं ना.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जागु's picture

2 Jun 2009 - 11:02 am | जागु

मराठे, सँडी, कोतवाल, प्राजू धन्यवाद.