एका लग्न समारंभाची सफर (भाग ४ अंतिम)
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एका लग्न समारंभाची सफर (भाग १) http://www.misalpav.com/node/7933
एका लग्न समारंभाची सफर (भाग २) http://www.misalpav.com/node/7950
एका लग्न समारंभाची सफर (भाग ३) http://www.misalpav.com/node/7962
आमचे जेवण झाले आणि आम्ही हात धुवण्याची जागा विचारली. बाहेर पायरीवर ठेवलेल्या बालदीकडे त्यांनी आम्हाला हात धुवण्यास सांगितले. आम्ही पायरीवर चढलो आणि हात न धुवताच पायांना चटके बसल्यामुळे परत खालू उतरलो आणि अंगणाच्या एका कोपर्यात हात धुतले. ती जाग आधीच ओली होती म्हणजे आधीच्या पंगतीनेही तिथेच हात धुतले असणार.
आमच्या सोबतच्या मंडळींची निघण्याची घाई चालु होती. कारण तिथे थांबणे सहन होत नव्हते. ना हवा ना माणुसकी, कशाच्या आधारावर थांबणार ? निघण्यापुर्वी आम्ही नवर्यामुलाचा निरोप घेतला आणि निघालो पण कोणीही आम्हाला लगेच का चाललात , थोड थांबा हे बोलण्याची तसदी घेतली नाही. घेतली असती तरी आमचे थांबणे अशक्यच होते.
डोक्यावर रुमाल ठेउन २.४५ ला आम्ही गाडीत जाऊन बसलो. फक्त पाऊण तास आम्ही तिथे थांबलो नात्यातले लग्न असुन पण. परत तोच खडतर प्रवास आणि तोंडाचा चालु पट्टा. लग्नाला आलो काय ? जेवलो काय ? आणि निघालो काय ? केवळ जेवणासाठी (तेही झगडून) आपण इतक्या लांब हाल सहन करत आलो असे वाटू लागले. आमच्या ४ गाडया आणि आधीच्या वर्हाडापैकी १ गाडी त्यात २ सांगकामे मामा जाऊन बसले, म्हणजे ही गाडी कोणाची असेल ते तुम्हाला सांगायला नको.
परतताना आम्हाला बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायचे होते. आम्हेई परत त्या सरबत-गोळ्याच्या गाडीवर जमलो. परत २-३ ग्लास सरबत पिऊन आम्ही बल्लाळेश्वराच्या दर्शनाला गेलो. खुप सुंदर दर्शन झाले. तेवढेच एक समाधान लाभले.
दर्शन घेऊन निघाल्यावर पुढे आम्हाला एक नदी दिसली. तडफदार्-तरूण मंडळी आणि युवक युवतींची गाडी आमच्या पुढे होती. आता दोन्हीही गाड्या नदीच्या पात्राच्या दिशेन जाऊ लागल्या. इतक्यात आम्हाला फोन आला की तुम्हीही गाडी नदीच्या पात्राकडे वळवा.
आम्ही नदीवर जाऊन उतर नाही तर तेवढ्यात सगळे तरूण, युवक शर्ट काढून नदीत पोहायला उतरले. त्यांचे बघून लहान मुल पण किनार्याजवळ जाऊन पाण्यात डुंबू लागली. मग आम्हीही मुलांच्या बरोबर पाण्यात पाय टाकून दगडावर बसलो आणि हात पाय ओले केले. कामसांगे मामा कंपनीने एका झाडाच्या पाठीमागे मैफील बसवली आणि घडलेल्या परीस्थितीचा ज्वलंत विषय त्या मैफीलीत जोरदार रंगला. जवळ जवळ अर्धा तास आम्ही इथे घालवला आणि आम्ही निघालो.
येताना आमच्या ड्राईव्हरने व्यवस्थित गाडी आणली पण आता त्याला कुठेतरी जायची घाई होती बहुधा, त्यामुळे तो वेगाने गाडी चालवायला लागला. गाड्यांना ओव्हरटेक करायला लागला. आम्ही त्याला ओरडू लागलो तो मधे हळू चालवायचा परत जोरात चालवायचा. परत आम्ही आमचे जीव मुठीत धरले.
अर्ध्या रस्त्यावर येऊन त्याने पेट्रोल पंपावर गाडी थांबवली. १५० रु. च तोंडातल्या तोंडात बोलून पेट्रोल भरायला सांगितले. हळूच बोलल्याने त्याने देडसो च तिनसौ ऐकल. ह्याने १५० रु. पुढे केल्यावर तो म्हणाला की पेट्रोल तुम्ही ३०० रु. च भरायला सांगितल सांगितले. आता ड्रायव्हर भडकून म्हणाला की मी फक्त १५० रुपयांच पेट्रोल भरायला सांगितल होत. एवढ का भरलस ? मला मालकाने १५० रु. च दिले आहेत. तो मला जास्त झालेले पैसे देणार नाही. झाल परत इथे नविन चटके सुरू झाले. दोघांमध्ये वाद चालू झाला पण पेट्रोलपंपावरील इसम समजुतदारपणे त्याला सांगत होता. पण ड्राईव्हर पेट्रोल गाडीतुन काढून घ्यायला सांगत होता. पण ते शक्य नसल्याचे जमलेल्या सगळ्याच पेट्रोलपंपावरील इसमांनी सांगितले. खर तर चुक ड्राईव्हरचीच होती त्याने पेट्रोल भरताना आकडा बघायला पाहीजे होता.
अस वाटत होत की खाली उतराव आणि त्याचे १५० रु. टाकून एकदाची गाडी सुरू करावी. पण गाडीत एक तरूण आणि एक युवक असताना असे करणे आगाऊपणाचे ठरले असते. आमच्या गाडीतील तरूण त्या ड्राईव्हरला सांगत होता की त्याच्याकडून बिल घे आणि मालकाला दाखव तो देईल तुझे पैसे. तेंव्हा ड्राईव्हर म्हाणाला पण मालकाचा त्यावर विश्वास बसणार नाही, तो म्हणेल की मिच पैसे खाल्ले.
शेवटी कंटाळून आमच्यातल्या एकीनी तरूण तडफदार मंडळींना फोन केला. आमची गाडी वेगाने आल्याने त्यांची गाडी खुप मागे पडली होती. ती ५ मिनीटांनी तिथे पोहोचली आणि घडला प्रकार समजाऊन घेऊन त्यांनी पंपवाल्यांचे पैसे देऊन टाकले आणि आमची सुटका झाली.
आता निघालो ते थेट घरी पोहोचलो. इतके दमलो होतो की वरातीलाही जाण्याची इच्छा नव्हती. सगळे जागच्या जागी बसुन होते. हालचालही करायला नको वाटत होत. दुसर्या दिवशी काही जणांना ताप भरला होता तर काहींना पित्ताचा त्रास झाला होता.
अशी हि आमची लग्नाची सफर अतित्रासदायक, कधीही न विसरता येणारी. आम्ही आता कुठेही एकत्र जमलो तरी आम्ही हाच विषय आवडीने चघळत असतो.
वाचने
5441
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
बाप रे!!
दु:खात
आहो
In reply to आहो by जागु
मी फार
In reply to मी फार by परिकथेतील राजकुमार
काही नाही
बर झाल
किती हाल
विचित्रच
धन्यवाद.
मी पळुन
अग पळून
प्रवासवर्
In reply to प्रवासवर् by सँडी
सॅडी
दिव्यातून
धन्यवाद.