<फोन बिल>

दशानन's picture
दशानन in जे न देखे रवी...
16 Apr 2009 - 10:41 pm

फोन बिल
!*****!
अरे हलो -
फोन करत नाहीस ...
म्हणजे बिल भरले नाही आहेस.
अजून?

उशीर झाला नाही
खिसा हलका कर.
नाहीतर राहशील तसाच
नेहमीसारखा -
अवलंबून माझ्या फोनवर
का सोडा मिळतय फुकट म्हणून...
!*****!

प्रेरणा

विनोदविडंबनमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

नाटक्या's picture

16 Apr 2009 - 10:45 pm | नाटक्या

मेलो.. काय राजे? एकदम फॉर्मात. सुटलात अगदी ;-)

- नाटक्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2009 - 10:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण शेवटची ओळ काही सूट होत नाही राव !
तिथे काहीतरी अनपेक्षीत पाहिजे असे होते, आता ते काय नेमके सांगता येयना.

दशानन's picture

16 Apr 2009 - 10:50 pm | दशानन

भरतोय बील मी म्हणून...

चालेल का :?

छोटा डॉन's picture

16 Apr 2009 - 10:52 pm | छोटा डॉन

नेहमीसारखा -
अवलंबून माझ्या फोनवर
इन-कमिंग फ्री आहे म्हणून...

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

दशानन's picture

16 Apr 2009 - 11:01 pm | दशानन

तुम्ही जरा शेवटी ओळ ह्यावर विचार करा मी जरा वाईच डुलकी काढतो आता ;)

रात्रीचे १२:०० झाले आहेत अश्याच जर कविता करत बसलो तर मिपा सर्वर वर लोड येईल , हा उच्च विचार करुन मी आता गमन करतो.
शुभ रात्री (जर सकाळ झाली असेल तर तुम्हाला सु-प्रभात )

प्राजु's picture

16 Apr 2009 - 10:52 pm | प्राजु

भरने मी म्हणून!
हे जरा बरे वाटेल!

किंवा..
फोन आपोआप बंद पडेल म्हणून
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

16 Apr 2009 - 11:26 pm | धनंजय

वेगळाच विषय घेऊन विडंबन! छान!

पाषाणभेद's picture

17 Apr 2009 - 7:39 am | पाषाणभेद

सकाळी सकाळी फोन बिलाची काळजी करायला लावली.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

विनायक प्रभू's picture

17 Apr 2009 - 7:54 am | विनायक प्रभू

ह्या राजेच्या