<फोडणी पाककलेची>

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
12 Mar 2009 - 3:20 pm

प्रेरणा जयवीताईंची साधी, सोपी आणि मस्त कविता लज्जत सुखाची.
(कविता वाचून त्याचा माझ्या खर्‍या आयुष्याशी संबंध लावल्यास मी जबाबदार नाही. ;-) )

लेवून तवंग तेलाचा
भाजी होती गुळमट
भरपूर तूप लावूनही
पोळी झाली चामट
होती मनात प्रचंड भिती
न कुठे होता दूधाचा थेंबही
खिडकी होती उघडी सताड
शेजार्‍यांचा बोकाही कुंपणाच्या पल्याड
झालं ते भरीत असं
बेचव आणि अळणी
जरी स्वयंपाक सोपा,
मला कधी तो जमणेच नाही.
कढीला हवी खरी, फोडणी खमंग हिंगाची
हिंग थोडा ताजा अन्‌ मोहरी हवी शेजार्‍यांची
तडतडलेली मोहरी आणते आगळीच खुमारी
दुसर्‍याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

12 Mar 2009 - 3:24 pm | अवलिया

वा!!!

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2009 - 10:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा !!! :)

दशानन's picture

12 Mar 2009 - 3:25 pm | दशानन

>>दुसर्‍याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.

=))

सही है !

म्या बी हेच म्हणतो.. मायला आम्ही जेवण करायला जाणार व आम्हाला फुड पॉयझनिंग होणार ;)

शेखर's picture

12 Mar 2009 - 4:57 pm | शेखर

>>दुसर्‍याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.

१००% सहमत

प्राजु's picture

12 Mar 2009 - 9:01 pm | प्राजु

खरंच दुसर्‍याने बनवलेलं जेवण छानच लागतं. :)
आदिती बाई.. मस्त आहे हे विडंबन.
आपणही विडंबकांच्या मेळ्यात सामिल झालेल्या पाहून बरं वाटलं. झोक्कात झालंय विडंबन हे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

12 Mar 2009 - 11:06 pm | शितल

सहमत.

सहज's picture

12 Mar 2009 - 3:26 pm | सहज

मस्त!!!

आणी वर जेवायला बोलवत होता? भले शाबास :-)

मदनबाण's picture

12 Mar 2009 - 3:28 pm | मदनबाण

इडंबन आवडले...

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

शाल्मली's picture

12 Mar 2009 - 4:01 pm | शाल्मली

मस्त विडंबन!
मजेदार.

--शाल्मली.

चतुरंग's picture

12 Mar 2009 - 4:05 pm | चतुरंग

खिडकी होती उघडी सताड
शेजार्‍यांचा बोकाही कुंपणाच्या पल्याड

आणि

तडतडलेली मोहरी आणते आगळीच खुमारी
दुसर्‍याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी

दोन्ही मस्तच! आवडलं.

(खुद के साथ बातां : रंगा, परग्रहावरुनही विडंबनात कांपीटीशन येईल असं कधी वाटलं होतं का रे? :W :? )

चतुरंग

मैत्र's picture

12 Mar 2009 - 4:09 pm | मैत्र

मस्त विडंबन...
पल्सार, लहरी सोडून एकदम हिंग मोहरी :)
आता साहित्यातलं कुठलंही क्षेत्र सोडायचं नाही असं दिसतंय!!
अजून येऊ दे...

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Mar 2009 - 4:37 pm | ब्रिटिश टिंग्या

>>दुसर्‍याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.

व्हेरी ट्रु!

लिखाळ's picture

12 Mar 2009 - 4:45 pm | लिखाळ

मूळ कवितेतल्या काही यमकाच्या चांगल्या जागा जसे गुळमट, चामट वापरुन केलेले विडंबन विडंबनाच्या माझ्या निकषांना बर्‍यापैकी अनुसरणारे आहे. मूळ कविता, त्यात मांडलेल्या कल्पनांचा ओघ, एका विशिष्ट बिंदूकडे घेऊन जाणारा प्रवाह तसाच शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न आपल्या विडंबनातसुद्धा थोडा बहुत दिसतो. गंडलेल्या पाकाकृती आणि नंतर आलेली तयार जेवणाची मागणी मजेदार वाटली.

अन्नाचा विषय निघाला की मुक्या प्राण्यांची आठवण व्हावी ही आपली संस्कृती. ती या कवितेच्या प्रवाहात एखाद्या पाचूच्या बेटासारखी चमकून उठली आहे. आपली संस्कृती बुडाली नाही किंवा चहाच्या पातेल्यात दूध तापल्याने दूध फाटेल तशी चोथा-पाणी झाली नाही हेच कवयित्रीने आज सिद्ध केले आहे. आपले अभिनंदन.
-- लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 4:49 pm | बिपिन कार्यकर्ते

आपलं भविष्य उज्ज्वल आहे!!!

बिपिन कार्यकर्ते

चन्द्रशेखर गोखले's picture

12 Mar 2009 - 5:08 pm | चन्द्रशेखर गोखले

एकदम सहि....!!!

चतुरंग's picture

12 Mar 2009 - 5:15 pm | चतुरंग

परीक्षक संप्रदायात शिरकाव करुन घेऊन वेगवेगळ्या साहित्यप्रकारांवर जाणीवपूर्वक विचारमंथन करुन, आपण ह्या संप्रदायाची धुरा चांगली सांभाळू शकाल ह्याची मिपाकरांना जणू ग्वाहीच देत आहात असे आपल्या गेल्या काही प्रतिसादातून प्रकर्षाने जाणवते!
समीक्षेच्या निमित्ताने पांढर्‍यावर काळे करण्याचे जे कार्य आपण अंगिकारले आहेत त्याने अनेक कवीकिरडू आणि नवलेखक, नवविडंबक हे तोंड काळे करुन घेतील ह्यात मला तरी शंका वाटत नाही!
तुमच्या समीक्षेत मला वारंवार भडकमकर मास्तरांच्या शिकवणीचा भास होतोय असे जरी असले तरी लवकरच तुम्ही ह्यापासून दूर जाऊन स्वतःची अशी खास लिखाळशैली विकसित कराल हे नक्की!
पुसशु! :)

चतुरंग

लिखाळ's picture

12 Mar 2009 - 5:24 pm | लिखाळ

जीवनातल्या तोचतोचपणाने कंटाळलेल्या जीवाला साहित्यिक विरंगुळ्याचे चार क्षण देउन जीवनाच्या रहाट गाडग्याला जुंपून घेण्याची नव-उमेद त्यांना मिळावी या सद्हेतूने प्रेरित होऊन केलेला हा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता. असे क्षण देउन आपल्या चेहर्‍यावर आनंदाच्या दोन-चार रेषा उमटवण्यात जरी मी यशस्वी झालो असेन तरी मी स्वतःला धन्य समजेन. सरस्वतीच्या पायावर वाहिलेली ही शब्दफुले अशीच सुगंधीत राहोत हीच प्रार्थना !
-- लिखाळ.

मुक्तसुनीत's picture

12 Mar 2009 - 5:36 pm | मुक्तसुनीत

डॅम दिज लिखाळस् ऍन्ड रंगाज् आर गोन्ना पुट मी आउट ऑफ बिझनेस ! ;-)

वाहीदा's picture

12 Mar 2009 - 7:59 pm | वाहीदा

जीवनातल्या तोचतोचपणाने कंटाळलेल्या जीवाला साहित्यिक विरंगुळ्याचे चार क्षण देउन जीवनाच्या रहाट गाडग्याला जुंपून घेण्याची नव-उमेद त्यांना मिळावी या सद्हेतूने प्रेरित होऊन केलेला हा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता
हुश्या !! :-) कायच्या काय लांब लचक !! कुठेही स्वल्प विराम नाही ?? :?
आदी माऊ ... या साहेबां कडून ईतके छान प्रतिसाद मिळाल्यावर आणखीन काय हवे ?? ;-)
~ वाहीदा

जयवी's picture

12 Mar 2009 - 5:09 pm | जयवी

भरपूर तूप लावूनही
पोळी झाली चामट

खिडकी होती उघडी सताड
शेजार्‍यांचा बोकाही कुंपणाच्या पल्याड.......... हे झकास :)

दुसर्‍याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी........हे मात्र मनापासून पटलं :)

आनंदयात्री's picture

12 Mar 2009 - 5:12 pm | आनंदयात्री

मस्त विडंबन. खुसखुशीत :)

छोटा डॉन's picture

12 Mar 2009 - 5:36 pm | छोटा डॉन

हम्म्, चांगले चालु आहे.
उत्तम विडंबन ...!!!

काय स्वयंपाक करताना केले काय ?
नाही, त्यात फोडणीचा ठसका जाणवतोय ;)

अवांतर : "पुरणाची पोळी .... उर्फ अदितीचा सल्ला" कधी लिहताय ?

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

धमाल मुलगा's picture

12 Mar 2009 - 6:36 pm | धमाल मुलगा

डान्याशी आणि इतर सर्व मंडळींशी सहमत.

पुविशु!

बाकी आम्हाला काय तिच्याआयला ना काव्यातलं काही कळतं ना स्वयंपाकातलं...बोंबलायला आम्ही काय बोलाणार ह्या कवितेवर????

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

परिकथेतील राजकुमार's picture

12 Mar 2009 - 6:40 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत !
पुरणपोळीची पाकृ येउद्यात !
दुर्बिणवाली बाई एकदम विडंबनावर विडंबने पाडणे चालु आहे की. जमलय झ्याक पण !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

निखिल देशपांडे's picture

12 Mar 2009 - 7:36 pm | निखिल देशपांडे

पुरणपोळीची पाकृ येउद्यात !
असेच म्हणतो....

विजुभाऊ's picture

15 Mar 2009 - 6:50 pm | विजुभाऊ

पुरणपोळीचे विडम्बन ?
निखील भौ काय काय पचवायची ताकद आहे तुमच्यात?

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

नंदन's picture

12 Mar 2009 - 11:02 pm | नंदन

झकास विडंबन. पुरणपोळीच्या रेसिपीची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

निखिल देशपांडे's picture

12 Mar 2009 - 5:19 pm | निखिल देशपांडे

दुसर्‍याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.
खासच विडंबन....

अनामिक's picture

12 Mar 2009 - 5:53 pm | अनामिक

विडंबन झक्कास!

अनामिक

स्वाती दिनेश's picture

12 Mar 2009 - 5:55 pm | स्वाती दिनेश

दुसर्‍याने बनवलेल्या जेवणाची तर लज्जतच न्यारी.
हे लय भारी!
स्वाती

कुंदन's picture

12 Mar 2009 - 5:57 pm | कुंदन

दुसर्‍याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.

एकदम सहमत !!!!

रेवती's picture

12 Mar 2009 - 7:14 pm | रेवती

तू विडंबनप्रांती आल्यापासून धुमाकुळ घालायला लागलीयेस.
नुकताच तू केलेल्या पु.पो. चा फोटू पाहिला.
छान झालीये पोळी पण तुपाच्या फोटूने वजन अंमळ वाढलेच.
वजनवाढीला फाट्यावर मारून कसं चालेल?
हे कवितेचं विडंबन वाटत नसून स्वयंपाकाचं विडंबन वाटतय.

रेवती

वाहीदा's picture

12 Mar 2009 - 7:32 pm | वाहीदा

फोडणी मस्तच देतेस तु !!
खिडकी होती उघडी सताड
शेजार्‍यांचा बोकाही कुंपणाच्या पल्याड

माऊ तुझ्या कडे यायला काय कोणा बोक्याची मजाल ?? घाबरला बोका ! ;-)
बाकी
दुसर्‍याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.

हे तंतोतंत पटते ;-)
मग नवोदीत कवियत्री साहेबीण आता कविता फुलटू काय ?? गुड यार !! :-)

~ वाहीदा

विनायक प्रभू's picture

12 Mar 2009 - 7:34 pm | विनायक प्रभू

आळशी पणाचे व्यवच्छेदक लक्षण.

याला आळशी पणा नव्हे , अंगभूत हुशारी म्हणतात !! :-)
~ वाहीदा

विनायक प्रभू's picture

12 Mar 2009 - 7:57 pm | विनायक प्रभू

हुशारी?
खीक खीक खीक खीक

अमोल खरे's picture

12 Mar 2009 - 7:37 pm | अमोल खरे

अदिती सही लिहिलं आहेस. पु.क.शु. ( असा शॉर्ट फॉर्म आहे का ? नाहीतर फुलफॉर्म वाच. पुढील कवितेस शुभेच्छा. :) )

मेघना भुस्कुटे's picture

12 Mar 2009 - 7:51 pm | मेघना भुस्कुटे

माझ्याकडून ब्वॉ पु.वि.शु. उर्फ पुढील विडंबनास शुभेच्छा.
तू सुटलीच आहेस...

>>दुसर्‍याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.

हे तर आवडलंच.

पण लिखाळांची प्रतिक्रिया वाचल्यानंतर माझे हातपायच गळाले आहेत. आता यावर आणि कोण काय बोलणार? भडकमकर मास्तरही त्यांच्या शिष्याकडे रिफ्रेशर कोर्ससाठी येतात की काय, अशी मला दाट शंका येते आहे, तिथे आपण कोण बापडे?

(अवांतरः तुला विज्ञानप्रतिभेला एकाएकी हा विडंबन-प्रतिभेचा धुमारा नक्की कधी आणि कसा काय फुटला ते जाणून घेण्याची जिज्ञासा बाळगून आहे. सवडीनं दे हो उत्तर...)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 8:03 pm | बिपिन कार्यकर्ते

ठीक आहे.

पण कवयित्रीला जीवनाच्या नाट्यमंचावर अजून बरेच काही पदार्थ करून दाखवायचे असल्यामुळे विडंबन हे एका तरल अवस्थेकडे जाता जाता थबकते. पण तरी सुद्धा, विडंबन या प्रकाराचं एकंदर उर्ध्वगामित्व बघितलं तर नविन नविन वाटा चोखाळण्यात आजचे विडंबक यशस्वी ठरत आहेत असे म्हणायला प्रत्यवाय नसावा, किंबहुना तसे म्हणावेच लागेल. प्रस्तुत कवयित्री आणि तिचा हा नविनतम प्रयत्न त्याचाच एक भाग ठरावा. तसेच, मागून आणले असले तरी प्रतिसाद पण बरे मिळाले आहेत. तरी बर्‍याच रसिकांना विडंबनापेक्षा पुपोच्या आठवणींनी जास्त त्रास झाला हे या विडंबनाचे एक प्रकारे यशच म्हणावे लागेल.

असो. कवयित्रीला पुविशु. आणि पुढच्या वेळी उत्स्फूर्त प्रतिसाद येऊ दे अश्या शुभेच्छा देतो.

बिपिन कार्यकर्ते

विडंबन या प्रकाराचं एकंदर उर्ध्वगामित्व बघितलं तर नविन नविन वाटा चोखाळण्यात आजचे विडंबक यशस्वी ठरत आहेत असे म्हणायला प्रत्यवाय नसावा,
अहो जरा सर्वसामान्यांना समजेल असे बोला साहेब !!

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 8:11 pm | बिपिन कार्यकर्ते

सर्वसामान्य आहात ना? मग साहित्याच्या वाटेला जाऊ नका.

बिपिन कार्यकर्ते

सर्वसामान्य आहात ना? मग साहित्याच्या वाटेला जाऊ नका.
साहीत्य हे सर्वसामान्यासाठी नाही ?? असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?? अहो महामानव , सर्वासाठी कळेल असे लिहावे असेच आम्हा पामराचे म्हणणे आहे ! का उगाच ??? :-)

मुक्तसुनीत's picture

12 Mar 2009 - 8:24 pm | मुक्तसुनीत

बिका हे सर्वसामान्य महामानव आहेत (असे त्यानाच म्हणायाचे आहे ;-) )

आनंदयात्री's picture

12 Mar 2009 - 11:43 pm | आनंदयात्री

बिकाकाका हे महापुरुष आहेत.
:D

चतुरंग's picture

13 Mar 2009 - 12:43 am | चतुरंग

बिकाकाकांच्या समीक्षेला असे फाट्यावर मारलेले बघून अंमळ वाईट वाटले!! :S

चतुरंग

अवलिया's picture

12 Mar 2009 - 8:16 pm | अवलिया

हे कट पेस्ट करुन ठेवा... बाई लैच फार्मात आहेत...
त्यामुळे आम्ही सध्या रस्ता मोकळा करुन दिला आहे.

--अवलिया

प्रमोद देव's picture

12 Mar 2009 - 8:20 pm | प्रमोद देव

अदिती ,आता तुही ऐकत नाहीस तर!
सराईत विडंबिका (विडंबन करणारी ह्या अर्थी बरं का!) झालीस!

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

चतुरंग's picture

12 Mar 2009 - 8:25 pm | चतुरंग

सराईत विडंबिका (विडंबन करणारी ह्या अर्थी बरं का!) झालीस!

सहमत आहे!

(खुद के साथ बातां : प्रमोदकाकांनी म्हटलेलं 'सराईत विडंबिका' हे 'सराईत गुन्हेगार' म्हटल्यासारखं का बरं वाटतंय मला? :T :O )

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2009 - 8:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बोला बोला, बोलून घ्या मला बिचारीला! :-D

असो. प्रतिसाद देणार्‍या सर्व 'कंपूबाजां'चे, कंपूबाहेरच्यांचे, कंपूतीत, शिरू पहाणार्‍यांचेच, विडंबन वाचणार्‍यांचे आणि मुख्य म्हणजे (रडीचा डाव खेळून का होईना, शेवटी प्रतिसाद देणार्‍या) बिपिन कार्यकर्तेंचे आभार.
त्याशिवाय विडंबन वाचूनही "फाल्तू वाटलं" असं न लिहिणार्‍या सर्वांचे फारच जास्त आभार. ;-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 8:57 pm | बिपिन कार्यकर्ते

विडंबिका या शब्दातच बिका आहे याची अंमळ मौज वाटली. बाकी चालुद्या.

बिपिन कार्यकर्ते

स्नेहश्री's picture

12 Mar 2009 - 8:29 pm | स्नेहश्री

आदिती मस्तच आहे.
"लेवून तवंग तेलाचा
भाजी होती गुळमट
भरपूर तूप लावूनही
पोळी झाली चामट"

ह्या ओळी वाचुन दोन दिवसापुर्वी झालेली माझी अवस्था आठवली.

खुप छान......

चालू द्या

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

टिउ's picture

12 Mar 2009 - 8:30 pm | टिउ

लेवून तवंग तेलाचा
भाजी होती गुळमट
भरपूर तूप लावूनही
पोळी झाली चामट

आमची पाककला तुमच्यापर्यंत कशी काय पोहोचली?

विडंबन मस्तच...

स्वाती राजेश's picture

12 Mar 2009 - 8:36 pm | स्वाती राजेश

लेखनाबरोबर विडंबनामधे सुद्धा नंबर मारलास..
मस्तच केले आहेस...
तु हे बहुतेक स्वत:च्या किचनमधे काम करत, समोरील राहणार्‍या काकुंच्या किचनमधे डोकावत विडंबन केले आहेस....:)
ह.घे.

नाटक्या's picture

12 Mar 2009 - 9:01 pm | नाटक्या

आदिती,

दुसर्‍याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.

आमच्या सौ. पण असेच म्हणतात, फक्त जरा आणखी जास्त गुळ लाऊन आणि दुसर्‍याने च्या ऐवजी 'तू' हा शब्द घालून ;-)

- नाटक्या

एक's picture

12 Mar 2009 - 10:32 pm | एक

पा. कॄ. चुकल्याचं वाईट वाटलं ..

यावरूनच..

"कभी कभी अदिती जिंदगी मैं..."

गाणं सुचलं असेल का? :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2009 - 10:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"कभी कभी अदिती जिंदगी मैं..."
=))

मस्तच! :-D

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Mar 2009 - 10:36 pm | ब्रिटिश टिंग्या

आकडा पुर्ण करण्यासाठी!

क्रान्ति's picture

12 Mar 2009 - 11:18 pm | क्रान्ति

दुस-याने बनविलेल्या जेवणाची लज्जतच न्यारी! म्हंजे विडंबनासारखा छानसा सैपाक पण करत असणार तू! मग कधी येऊ तुझ्या हातच जेवायला? [चामट पोळीही चालेल! ]
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

भडकमकर मास्तर's picture

13 Mar 2009 - 1:43 am | भडकमकर मास्तर

शेवटी नुसतं स्वयंपाक करून, जेवून तरी काय होणार आहे?.. आज मानवाच्या जगात येणार्‍या पुढच्या पिढीला तरी हा मानव काय सोडून जाणार आहे? ..नुसते जेवण? संपत्ती? अणुबाँब? ए के ४७? नव्हे तर त्याचबरोबरीने पुढच्या पिढीला साहित्य संगीत कला यांचा विशेष वारसा मानवाला द्यायचा आहे... या विडंबिकेतून कवयित्रीने हे खचितच साध्य केले आहे, असेच म्हणावे लागेल... .

क्रीएटिव गोष्टीत बान्धेसूद नियम लावणे मुश्किल असते....कलाकाराला आपली कला एकदम उच्च आहे असेच वाटत असते...माणूस तरी का लिहितो? ..कवि असो की कवयित्री शेवटी माणूसच ना? आजूबाजूला घडणार्‍या प्रसंगातून,कडू-गोड अनुभवातून कवयित्रीच्या भावना उचंबळून आल्या असणार;त्या भावना योग्य शब्दरूप घेईपर्यंत कवयित्रीची तगमग,तड्फ़ड झाली असणार आणि जसे समुद्रमंथनातून अमृत बाहेर आले तसे तिच्या मनातल्या भावमंथनातून या कवितेचे शब्द उमटले असणार ....झरझर ते कागदावर आले असणार...

इतकी गुंतागुंतीची प्रोसेस आहे गं ही , या समीक्षकांना मात्र हे कळत नाही... ...
..तू लिही गं...कदाचित आज नाही लोकांना या कवितेचे महत्त्व कळणार,नंतर नक्की कळेल.. या प्रक्रियेला कदाचित युगंन् युगं लागतील, पण हे नक्कीच घडेल.. मी आशावादी आहे......कदाचित तुझ्या विडंबिकांच्या वह्या जर्मनीस्थित (!) लोक डोक्यावर घेऊन नाचतील... या विडंबिकांवर लोक नाटकं लिहितील, विक्रमी खपाच्या कादंबर्‍या तयार होतील, पुरस्कारांची रांग लागेल, एखादं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद तुला मिळून जाईल...पण त्या वेळी या आस्वादकांना विसरणं तुला शक्य होणार नाही...
या सार्‍या विडंबनवीरांची छोटीशी आठवण नक्कीच तुझ्या डोळ्यांच्या कडा ओलावून नेईल...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग's picture

13 Mar 2009 - 1:52 am | चतुरंग

समीक्षक पंथाच्या अध्वर्यूंकडून अशाच सडेतोड प्रतिसादाची अपेक्षा होती आणि ती तुम्ही हजार टक्के पूर्ण केलीत!
'मास्तर' ही मिपाच्या गुणिजनांनी तुम्हाला दिलेली पदवी अशा रीतीने सार्थ होताना बघून मन हेलावले!! धन्य आहात!!!
__||__ :)

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2009 - 3:33 am | बिपिन कार्यकर्ते

हेच म्हन्तो........ __||__

आणि हो, कसे आहात?

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2009 - 10:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तर, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत, मन भरून आलं. आता मी नक्कीच पुरणपोळीची रेसिपी, फोटोंसकट टाकेन.
तुमच्या या उस्साह उत्साहवर्धक प्रतिक्रियारूपी समीक्षणाबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

=)) माणसांच्या भाषेत सांगायचं तर, या विडंबनाला ६० प्रतिसाद येतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.