<फोडणी पाककलेची>
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रेरणा जयवीताईंची साधी, सोपी आणि मस्त कविता लज्जत सुखाची.
(कविता वाचून त्याचा माझ्या खर्या आयुष्याशी संबंध लावल्यास मी जबाबदार नाही. ;-) )
लेवून तवंग तेलाचा
भाजी होती गुळमट
भरपूर तूप लावूनही
पोळी झाली चामट
होती मनात प्रचंड भिती
न कुठे होता दूधाचा थेंबही
खिडकी होती उघडी सताड
शेजार्यांचा बोकाही कुंपणाच्या पल्याड
झालं ते भरीत असं
बेचव आणि अळणी
जरी स्वयंपाक सोपा,
मला कधी तो जमणेच नाही.
कढीला हवी खरी, फोडणी खमंग हिंगाची
हिंग थोडा ताजा अन् मोहरी हवी शेजार्यांची
तडतडलेली मोहरी आणते आगळीच खुमारी
दुसर्याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.
वाचन
10750
प्रतिक्रिया
62