!! केयर टेकर !!

अनिल हटेला's picture
अनिल हटेला in जनातलं, मनातलं
2 Jan 2009 - 5:38 pm

ट्रींग ट्रींग !!
सकाळची १०.०० ची वेळ !
इन्सपेक्टर प्रधानांची केबीन!
हातातला चहाचा कप खाली ठेवत त्यानी फोन रीसीव्ह केला..
"नमस्कार!इन्सपेक्टर प्रधान बोलतोये"
"नमस्कार साहेब ,मी कोमठेकर ! थोडं काम होत..४ दिवस झालेत आमचा केयर टेकर चंदु पवार गायब आहे..नाही मिसींगची कंप्लेंट केलीये .आणी सर्व नातेवाइक ,ओळखीचे ,मित्र-परीवार सर्वाना फोन झालेत.'
"काळजी करु नका कोमठेकर ..मी बघतो..ठीकाये ...येतोये मी तासाभरात बंगल्यावर...धन्यवाद'

कोमठेकर !!
साधारन पन्नाशीचा ग्रुहस्थ ! तसा सिंगापूर लाच स्थायीक ..स्वतःचा बीजनेस...नवरा -बायको आणी एक कन्यारत्न..तेसुद्धा उच्चशिक्षणासाठी अमेरीकेत... लोणावळ्यात स्वतःचा आलीशान बंगला....वर्षाकाठी ८-१० दिवस येणार ...आणी परतणार..

प्रधानानी आपल्या बुलेट ला कीक मारली आणी निघाले .डोक्यात हेच विचारचक्र की साला हा चंदु पवार किती लाखाला चुना लाउन गेला असेल कुणास ठाउक.एवढ्या मोठ्या बंगल्यात काय -काय लंपास केलं असेल देव जाणे..विचार करता -करता पोचले देखील.

'बसेरा 'बंगला..
गाडी स्टँडवर लावत त्यानी एक नजर बंगल्यावरून फिरवली.सगळ कसं व्यवस्थीत दिसत होतं.पण का कुणास ठाउक गेटमधुन आत प्रवेश केला तेव्हापासून त्याना काहीतरी चुकतये असं वाटत होतं.त्यांच्या पोलीसी नजरेला जाणवत होतं ,पण नेमकं काय ते कळायला मार्ग नव्हता.डोरबेल वाजवायला त्यानी हात पूढे केला ,पण त्या आधीच दरवाजा उघडला..दारात मोलकरीण उभी होती.. "या!!आत या" म्हणत एका बाजुला झाली. बंगल्याचं निरीक्षण करत प्रधान साहेब आत आले.खुर्च्या ,सोफा,एकुणच आतील भाग आकर्षक होता..सगळ कसं जिथल्या-तीथं . आलीशान घर आणी महागड्या पेंटींग्ज,झुंबरं,काचेची ऍक्सेसरीज, कालीन एक- एक गोष्ट श्रीमंतीची ,ऐश्वर्याची साक्ष देत आहेत असं वाटत होतं. प्रधान साहेब काही क्षण भारवल्या सारखेच बघत होते.
"नमस्कार ! मी कोमठेकर..बसा प्लीज!"कोमठेकराना शेकहँड करून प्रधान साहेब एका सोफ्यात बसले "..हं बोला!" -- प्रधान..
"३ दिवसापूर्वी मी इथे आलोये .आदल्या दिवशीच फोन करून तसं कळवलं होतं चंदुला .पण मी अलोये तेव्हा दरवाजा आतुन लॉक नव्हता.सर्व लाइट्स बंद आणी ह्याचा तपास नाही .फारच जबाबदार आहे चंदु .मला वाटलं गेला असेल कुठेतरी येइल परत.पण त्याचा मोबाइल सुद्धा बंद आहे .शिवाय जिथे कुठे जाण्याची शक्यता आहे ,तीकडे सगळीकडे फोन वर बोलून झालये .पण हा गेलाये कुठे समजायला मार्ग नाही.अखेरीस काल आम्ही तशी लेखी कंप्लेंट केली.आणी म्हणुनच तुम्हाला ही कळवलं." कोमठेकर सांगत होते..
"ह्या चंदु पवारचे नातेवाइक कुणी ?कुठला आहे हा ?आणी घरातुन काही गहाळ झालये का? किंवा चोरी वगैरे ?"
"नाही हो साहेब !चोरी वगैरे काहीही नाही .सारं जिथल्या तीथं आहे .आणी अनाथालयात वाढलेला चंदु फार साधा आणी सरळ आहे .तसं काही त्याच्याकडुन होउच शकणार नाहीये.४ वर्षे झाली तो आहे इथे पण कधी कुठली तक्रार करण्याची संधी नाय दिलेली.१-१ रुपयाचा हिशोब लिहुन ठेवलाये त्याने ."-कोमठकर
"हम्म! रहायचा कुठे ? आय मीन त्याची खोली, कपाट ,त्याच्या वस्तु ?"
"हो या इकडे रूम आहे त्याची "कोमठेकरानी चंदुची रूम दाखवली .
अगदीच व्यवस्थीत आणी सुटसुटीत खोली होती ती.एका बाजुला बाथरूम अटॅच्ड.कुमठेकरानी टेबलावर पडलेला फोटो दाखवला.साधारण २५-२६ वर्षाचा तरुण .प्रधाना नी फ्रेम मधुन फोटो काढला. त्यांची नजर सा-या घरावरून फीरत -फिरत शेवटी एका डायरीवर स्थीरावली.पहीली काही पाने चाळल्यावर लक्षात आले की ह्या पट्ठ्याला दैनंदीनी लिहायची सवय होती तर.प्रधान साहेबानी एकदा सारी खोली तपासून पाह्यली ,पण काहीही आक्षेपार्ह दिसले नाही.
"ठीकाये बाकीचे स्वयंपाकी ,ड्रायव्हर आणी मोलकरीण माळी ई. शी बोलायचये"
सर्व जण आले .सा-याशी बोलून झाले.डायरी आणी फोटो सोबत घेउन प्रधान साहेबानी निरोप घेतला.चहा वगैरे ऑनड्युटी घेणे त्याना पसंत नव्हते.पून्हा एकदा सा-या बंगल्यावर नजर फिरवत त्यानी बुलेट ला मेनगेटातुन बाहेर काढली.
पोलीस स्टेशनात परतताच प्रधान साहेब पून्हा एकदा आपली दैनंदीन कामात गढुन गेले.चोरीच्या केसेस आज-काल फारच वाढल्याएत.शिवाय रेल्वे भरती दरम्यान झालेल्या मारामा-या नी घेतलेला राजकीय रंग ,पर्यटक म्हणुन येउन आणी दारू पिउन धांगड-धींगा करणा-यावर कसा काय लगाम घालाव, ई बाबीवर ते सिनीयर सोबत सल्ला मसलत करत होते..ह्या सगळ्या गदारोळात लंच घ्यायची सुद्धा आठवण नाय राह्यली.तातडीची कामे संपवता -संपवता संध्याकाळ झालेली.आता कुठेशी त्याना थकल्या सारखं वाटायला लागला.बेल मारून त्यानी गरमा गरम कॉफी आणायला सांगीतले.सीगारेट शीलगाउन थोडसं निवांत होत ते कोमठेकरांच्या केसचा विचार करत बसले 'चोरी नाही.काही नाही मग हा केयर टेकर नावाचा प्राणी गेला कुठे?' इतक्यात पो-या कॉफी घेउन आला.कॉफीच्या झुरक्याबरोबर त्यांना तरतरी आल्यासारखे झले.आणी आठवलं की त्या केयर टेकरची डायरी आपल्याकडेच आहे .त्यानी सीगारेट विझवत डायरी उघडली...

२५ डीसेंबर..
ह्या ड्रातव्हरनी वैताग आणलाये .नेमकं ज्यादिवशी माझं काम असत,त्याच वेळी ह्याला आजारी पडायला होतं काय ?आज नाताळ .मला अनाथालयात जाउन सर्वाना भेटायचये,सर्वा सोबत थोड्या गप्पा माराव्यात आणी क्षणभर का असेना स्वतःच्या नातेवाइकात मिसळण्याचा आनंद घ्यावा म्हटलं तर ह्या नालायका चा फोन आज नाय येउ शकनार..आता झक मारत स्वतः ड्राइव्ह करत जावं लागणार!! च्यायला ! तसा लोणावळा -पुणे लोकलने सुद्धा जाउ शकलो असतो ,पण पोराना चार चाकी दिसली की खुश होउन जातात .त्यांच्या साठीच का होइना, एवढा त्रास घ्यावाच लागेल...

२६ डीसेंबर
काय धमाल झाली काल ? सारे अगदी उतत्सुकतेने वाट पहात होते.सर्वासाठी मस्त पैकी मिठाई आणी केक नेणे म्हणजे फार जीवाला समाधान वाटते.आयुष्यात हेच काही क्षण असतात ज्यात जगण्याला काही तरी अर्थ आहे असं वाटते.शिवाय देशपांडे सर सुद्धा किती आनंदाने आणी अभिमानाने माझी सर्व पाहुण्याशी ओळख करून देत होते.फार फार बरं वाटलं .जीवाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.निरोप घेताना पावलं जड झालेली.पण शेवटी इकडे परतनं सुद्धा महत्त्वाचं नायतर कुणी लक्ष मुळी देणार नाहीत.आपलीच जबाबदारी आहे सारी.परतीच्या वाटेवर असताना सोमाटन्यापाशी एका कुत्र्याच्या पीलाला गाडी खाली येता -येता वाचवलं ,नायतर एक पाप अंगी लागलं असतं .ते पण बीचारे माझ्या सारखंच सा-या जगाला पारख.शेवटी त्याला आधार देण आपलं काम आहे .म्हणुन घेतलं सोबत.किती विश्वासानी आणी समाधानानी शेजारी पहुडलेलं .बिचारं बरच उपाशी असावं .चला कुणाची तर चांगली सोबत होइन ,तेवढाच जीवाला विरंगुळा.घरी परतल्यावर मस्त पैस्की दुध प्यायला दिलं तर किती आनंदुन दूध पीत होतं .त्याच्या डोळ्यातली कॄतज्ञता स्पष्ट दिसुन येत होती....चला! नाताळच्या दिवशी देवाने माझं एकटेपण दूर करण्याचं प्रयोजन केलये ,नाय का?

२७ डीसेंबर
ह्या पीलाला नाव काय बरं ठेवावं ?पांढरा रंग आणी अंगभर काळे ठीपके ह्याला आपलं मराठमोळ च नाव ठेवाव.वाघ्या ..अहम. त्यापेक्षा शे-या कसं वाटतये..फीक्स शे-याच फीक्स!!पण ह्या शे-याचा प्रॉब्लेम काय आहे काय कळायला मार्ग नाय ..सालं कुत्र्याच्या नावाला कलंक च आहे की काय .एकदा पण भूंकलं नाय .कसं शक्य आहे .ह्याने आवाज करावा म्हणुन .ह्याला पाण्यात घुसळू घुसळू धुतला.पाय ओढ ,शेपूट ओट सारे त्रास देउन झाले पण एकदमच शामळू आहे .तोंडातुन आवाज काढीन तर शपथ..काय करावं बरं...आयला ह्याच्यात काय तरी केमीकल लोच्या झालेला दिसतोये.असं तर नाय हे जन्मजात मुकं असायचं किंवा ऍक्सीडेंट मधुन वाचलं पन मुका मार बसला असावा त्यामुळे ह्याचा आवाज बा्हेर येत नसावा.असं असेन तर माझ्या कडून फारच मोठा अपराध झालाये .न भूंकणारं कुत्र कसं शक्य आहे राव ...काय करावं ह्याला जनावराच्या डॉक्टर कडे न्यावं का?

२८ डीसेंबर..
आज विचित्रच घटना घडली .शे-याला दूध देत होतो .प्रेमाने त्याच्या मानेवरून ,डोक्यावरून हात फिरवत असतानाच शे-याचे डोळे चमकले..अगदी नीळ्या -हिरव्या रंगाचे असंख्य काजवे एका वेळी त्याच्या डोळ्यात चकाकले.आणी असं वाटलं ,त्याने मला हाक मारली...पण बाहेर जोरात काय तरी पडल्याचा आवाज झाला आणी मी ताळ्यावर आलो.बहुधा भासच असावा..नायतर काय !!..कसं शक्य आहे राव .हे कुतारडं .सालं न भूंकणार कुत्र्याची नवी जात..आणी म्हणे माणसा सारखे ह्याने चंदु म्हणुन हाक मारलेली..न पीता असले उद्योग पील्यावर काय -काय करशील चंद्या...
पण ते चमकणारे -चकाकणारेडोळे ...त्याचं काय...सालं !भासंच असावा......
पण जेव्हा मी कामात असतो हे कुतारडं मागे किंवा पूढे पण सोबतच असतं आणी लक्ष्य देउन मी काय करतोये बघत बसलेलं असतं ..कुणास ठाउक काय गोटमॅट आहे ...चला २ दिवसात साहेब येणार आहेत .पून्हा एकदा सगळी साफ सफाइ करून ठेवावी लागेल..तसं फार काय काम नाय पण ह्या माळ्याला सांगुन सगळी बाग आणी पोर्च क्लीन करून घेतो..ड्रायव्हर सुद्धा गाडी सर्वीसींग ला घेउन गेलाये.मोलकरणीला कीचन आणी हॉल वगैरे साफ करून घ्यावं लागेल.आयला हे शे-या एका जागी बस .उगाच पायात येउ नकोस नाय तर पाडशील मला .तुला वाचवण्याच्या नादात राँग साइडला गाडी घातली आणी ती नीळी सफारी झाडावर आदळलेली. सारी माझीच चुक होती .उगाच केल्या पापाचं पूण्य म्हणुन तुला आणलाये..चल हो बाजु ...सालं न भूंकणार कुत्तरड्याची जात.सगळ्या कुत्र्यांच्या नावावर काळा डाग आहेस ...हो बाजु...बघावं तेव्हा मागे मागे...काय गाठोडं आहे..

२९ डीसेंबर ....
चला एकेक करत सारी कामं झली.वाटलं नव्हतं इतक्या लवकर होतील पण झाली एकदाची .आता येउ देत कोमठेकराला बघ म्हणावं तुझ्या महालाला कसा एकदम जिवंत ठेवलाये.सालं म्हातारं ! आयुष्यात कधी स्वतःच्या हातानी स्वतःच्या बुटाला पॉलीश नसेन केली .त्या वरच्या गॉड ला सुद्धा असलेच लोक दिसतात.श्रीमंत करण्यासाठी .आमचे सालं नशीब च गांडू.पैदा झालो,आई-बापानी अनाथाश्रमाच्या पाय-यावर सोडून जबाबदारी झटकली .कसं बसं करत रडत-कढत ,लोकाच्या दयेवर ,भीकेवर शिक्षण पूर्ण केलं .आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मन मारून जगणे म्हणजे काय .आम्हाला माहीत नायतर गल्लीतल्या कुत्र्याला ...नायतर काय!! साला, कुत्र्याची लाइफ चांगली आमच्या सारख्यापेक्षा.जीथं तीथं अपमान ,प्रत्येक ठीकाणी आपल्या इच्छा आकांक्षा मारून जगणे ..ह्यापेक्षा ते कुत्र झालेलं काय वाइट! कुणाच एक नाय दोन नाय ४ घरी फिरलं तर भाकर तुकडा भेटूनच जातो ना...सालं २ दिवसावर ३१ तारीख आहे .ह्या वर्षाचा शेवटचा दिवस !!
सारी दुनीया मस्त एंजॉय करणार ,पीणार -खाणार आणी आपण बसायचं लोकाची घरं सांभळत.देवा असली जिंदगी देण्यापेक्षा पूढचा जन्म कुत्र्याचा दे.कुणीच नाय समजु शकणार आम्हाला .आणी आपल्याला आरडून -ओरडून स्वतःच्या दु:खाची मार्केटींग करायला नाय जमणार.नाय तरी बरेच महाभाग आपली दु:ख सुद्धा कॅश करतात पब्लीक कडून .आत्मचरीत्र काय! चित्रपट काय! ह्या लोकाना स्वतः चा असा बाजार मांडायला कसा जमतो बुवा? . आरे हे काय ?माझ्या मनातल्या भावना ह्या शे-याला समजतात की काय ?जेव्हा सुद्धा मी असे विचार करत असतो ,हे एखाद्या मनकवड्या सारखा माझ्या कडे बघत असतो.सालं भूंकत नाय ना काय करत नाय .उगाच आपलं माझ्या मागे मागे ..दिवसातुन २-३ दा तरी पायात येणारच.. काय कराव बॉ ह्याचं ?

३० डिसेंबर ....
रात्र होत आलीये काय कराव कळेना झालये..सकाळपासून शे-याने ३ वेळा मला त्याचे जबडे दाखवलेत.का कुणास ठाउक पण त्याच्यात बदल होतोये.कारण नसताना जबडे दाखवतच गुरगुरतोये असं वाटतंये.काल -काल पर्यंत माझ्या बरोबरीने लाडाने माझ्या पायात घुटमळणा-या शे-याला अचानकच काय झालं कळत नाहीए.दोन वेळा जाणुन बुजुण माझ्या पायात येउन मला पाडल.वरून रागात जबडा दाखवणे ह्याचा अर्थ कायतरी होतये, होणार आहे. आज ड्रायव्हर ,माळी सारे लवकरच गेलेत आणी एवढ्या मोठ्या घरात मी एकटाच!! आजपर्यंत एकटेपणा कधी जाणवला नाही .सोबत म्हणुन आणलेलं हे कुत्र्याचं पीलू आज मी एकटा आहे, असं मला भासवून देतये.काल पर्यंत एका पीला सारखा वाटणारा शे-या आज अचानकच मोठ्या लांडग्या सारखा वाटू लागलाये. नेमक काय झालंये कळेना. त्याचे जबडे आणी गुरगुर छातीत धस्स करून गेली.त्याला सोबत म्हणुन आणण्याची चुक झालीये की काय माझ्या कडून असं वाटायला लागलये. आत्तासुद्द्धा दरवाजा आतुन बंद करून बसलोये. रात्रीचा काळोख होतोये, तसं माझ्या मनावरचं दडपण वाढत चाललये .मागे दरवाज्या बाहेरच तो माझी वाट पहात बसलाये, असं वाटतये .आणी असा विचार सुद्धा अंगावरून शीरशीरी आणतोये. ह्याला वाचवण्याच्या नादात मी गाडी राँग साइडला घातलेली,आणी त्यामुळे समोरून येणारी नीळी सफारी झाडावर जाउन आदळलेली. त्या गाडीच्या आतुन कुणाचाच आवाज किंवा कसलीच हालचाल झाली नाही.आणी घाबरून काय करावं मला सुद्धा कळालं नाही. शेवटी हीय्या करून गाडी बाहेर उतरलो तर हे पीलू माझ्या चाका पाशी बसलेलं .पण जर हे माझ्या चाकापाशी बसलेलं असेल ,तर आधी ऍक्सीडेंट होण्याआधी मला दिसलेलं पीलू हे नक्कीच नाहीय.ब्रेक दाबून गाडी थांबेपर्यंत ते पीलू फार मागे असायला हव.. आणी हे तर अगदी समोर होतं. . जसं की गाडी थांबण्याचीच प्रतीक्षा करतये. देवा ,परमेश्वरा ह्याचा अर्थ काय ? हा नक्की आहे तरी काय प्रकार ? त्यादिवशी गडबडीत माझ्या हे सारं लक्ष्यातच नाय आलं. सोमाटण्याच्या त्याच पॉइंट्ला जास्तीत जास्त अपघात का होतात ,हेच तर कारण नसावं ?
शे-याच्या डोळ्यातील चमक वाढण्या मागचं कारण सुद्धा ..........

प्रधान खाडकन भानवर आले. प्रकरण निराळच दिसतये. डायरीत मोजुन सहा दिवसाचा आढावा होता. बाकीचं लिखाण वाचता येउ शकत नव्हतं. सारं अंधुकसं दिसत होतं. १० वर्षे सर्व्हीस मध्ये काढलेल्या इन्स्पेक्टर ला सुद्धा दरदरून घाम फुटल्यासारख वाटायला लागले. घड्याळात पाह्यलं. रात्रीचे ८.०० वाजलेले .. त्यानी कोमठेकराना फोन केला. बराच वेळ बेल वाजत राह्यली. पण नो रीप्लाय. शेवटी काहीतरी ठरवुन त्यानी स्वतः जाउन बघायचा निश्चय केला. आणी निघाले देखील.

'बसेरा' बंगला अंधारात बुडून गेलेला. गेट बंद होतं. प्रधानानी गाडी बाहेरच बंद केली आणी मेनगेट ढकलून आत प्रवेश केला. सारं जग काळ्यामिट्ट अंधारात बुडाल्यासारख वाटत होतं.सकाळी त्याना झालेली फीलींग पून्हा होउ लागलेली..काहीतरी अघटीत घटतये असं मन त्यांना वारंवार बजावत होतं.पण शेवटी पोलीसाची जिद्द आणी उत्सुकता त्यांची पावले आतच जात राह्यली. दरवाजा उघडाच होता. थोडासा ढकलल्या बरोबर उघडत गेला. आत जाउन त्यानी मेन स्वीच ऑन केला..आणी आतील दॄष्य पाहुन त्यांची वाचाच गेली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं कोमठेकराच कलेवर आणी बाजुला बसलेली दोन लांडगासदृष्य कुत्री...
दोघाची नजर प्रधानावर रोखलेली......
आणी त्यात नीळ्या -हिरव्या रंगाचे चमकणारे-चकाकणारे डोळे......

कथावाङ्मयप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

रामदास's picture

2 Jan 2009 - 5:45 pm | रामदास

काय मस्त झाली आहे कथा. गेल्या आठवड्याच्या तारखा असल्यामुळे भिती वाटली बाबा !

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Jan 2009 - 5:52 pm | बिपिन कार्यकर्ते

का समदे भ्या दावायला लागले आजकाल? :(

कथा छान बरं का.

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

2 Jan 2009 - 5:54 pm | अवलिया

कथा छान बरं का अनिल शेठ !!!

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

झेल्या's picture

2 Jan 2009 - 6:14 pm | झेल्या

येकदम डेंजरस..

एखाद्या रहस्यमय कादंबरीचा भाग वाट्तोय...!

भन्नाट..!
-झेल्या

अनामिक's picture

2 Jan 2009 - 7:15 pm | अनामिक

छान झाली आहे कथा...

अनामिक

कपिल काळे's picture

2 Jan 2009 - 8:40 pm | कपिल काळे

हटेल्या, एकदम हटके लिहिलंय. मस्त जमली आहे.

चतुरंग's picture

2 Jan 2009 - 9:13 pm | चतुरंग

एकदम हटेली कथा! :)

चतुरंग

रेवती's picture

2 Jan 2009 - 9:33 pm | रेवती

तारखा जसजश्या पुढे सरकत होत्या, तशी भीतीही वाढत होती.
कथा छानच.

रेवती

नन्या's picture

2 Jan 2009 - 10:16 pm | नन्या

अरे, अश्या कथा तर सुहास शिरवळकर लीहीत. आता कोण लीहीतो? आणी कोण वाचतो?

टुकुल's picture

2 Jan 2009 - 10:18 pm | टुकुल

खुपच मस्त लिहल आहे, भिती वाटली वाचताना.....
हा सोमाटणा फाटा बर्‍याच कथांमधे डोकावतोय... पुढच्या वेळी तिथुन गाडी चालवताना या कथा आठवतील. :SS :SS

घाबरलेला, टुकुल.

प्राजु's picture

2 Jan 2009 - 10:27 pm | प्राजु

मस्तच. हटेले भाय.. ष्टोरी भी हटेली है आपकी..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

3 Jan 2009 - 8:10 am | विसोबा खेचर

हेच बोल्तो..! ष्टोरी मस्तच..:)

तात्या.

लवंगी's picture

2 Jan 2009 - 11:03 pm | लवंगी

आवडली कथा.

योगी९००'s picture

3 Jan 2009 - 12:31 am | योगी९००

विषेशतः डायरी चा भाग तर खुपच थरारक...

खादाडमाऊ

घाटावरचे भट's picture

3 Jan 2009 - 3:28 am | घाटावरचे भट

मस्तच रे अनिलभौ!!!

मदनबाण's picture

3 Jan 2009 - 4:40 am | मदनबाण

अन्या मस्तं लिवलया तु.. :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

शितल's picture

3 Jan 2009 - 5:10 am | शितल

भयकथा एकदम फक्कड जमली आहे.
:)

संजय अभ्यंकर's picture

3 Jan 2009 - 9:57 am | संजय अभ्यंकर

अनिलशेठ!

मानलं!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

अनिल हटेला's picture

3 Jan 2009 - 1:27 pm | अनिल हटेला

वरील सर्वाचे मनापासुन आभार !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विनायक प्रभू's picture

3 Jan 2009 - 1:30 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो;

ब्रिटिश's picture

3 Jan 2009 - 1:38 pm | ब्रिटिश

क बोल्तो आनीलभाव ?
यकदम हटेली स्टोरी
लय भारी लय भारी

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

वेताळ's picture

3 Jan 2009 - 9:53 pm | वेताळ

खुपच थरारक...लगेरहो
वेताळ

नितिन थत्ते's picture

4 Jan 2009 - 11:33 am | नितिन थत्ते

कथा छान झाली आहे ......

पण सगळे मरणाच्या गोष्टी का लिहायला लागले आहेत?

सगळ्यांची जगायची इच्छा संपली काय?
की सगळ्यांना मरण दिसायला लागले आहे?

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jan 2009 - 2:51 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तच कथा आहे अनिलभौ.
एकदम सु.शीं. ची आठवण आली :) शेवट तर छानच.
सु.शीं. चा निस्सिम भक्त
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

केवळ_विशेष's picture

5 Jan 2009 - 11:55 am | केवळ_विशेष

पावरबाझ रे!...च्यायला सुसाट वाचत सुटलो ष्टार्टिंग पासून्...शेवटपर्यंत्...मस्त रंगवली आहेस गोष्ट!
पुलेशु

मैत्र's picture

5 Jan 2009 - 12:28 pm | मैत्र

स्टाइल मस्त आहे ... उत्कंठा वाढवत नेली आहे...
पण शेवटी कळलं नाही :(

मनीषा's picture

5 Jan 2009 - 1:05 pm | मनीषा

आवडली ..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jan 2009 - 3:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हटके एकदम ... आवडली कथा.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

आकाशी नीळा's picture

29 Feb 2012 - 9:12 am | आकाशी नीळा

मस्तच जमलीये कथा....

आकाशी नीळा's picture

29 Feb 2012 - 6:46 am | आकाशी नीळा

मस्तच जमलीये कथा....

मजा आली वाचून.....

:-)

पप्पु's picture

6 Jan 2009 - 5:36 pm | पप्पु

लै भारी लिहिलय राव...

पात्र's picture

6 Jan 2009 - 8:54 pm | पात्र

लै भारि अनिल्भौ

अनिल हटेला's picture

7 Jan 2009 - 6:13 pm | अनिल हटेला

पून्हा एकदा धन्यु दोस्त हो!!!
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

पिवळा डांबिस's picture

8 Jan 2009 - 3:42 am | पिवळा डांबिस

मस्त आहे कथा, अनिलभाऊ!
एकदम आवडली...
-पिडां

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Jan 2009 - 9:55 am | घाशीराम कोतवाल १.२

काय भो मला भ्या वाटला ना एकदम फर्मास स्टोरी लिवलिया येउ देत आजुन मस्त हाय एकदम झकास हाय
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

खूपच थरारक.आयला तो एक ३डि सिनेमा बघून वाटली नव्हती एवढी भीती एकदम वाटली.

शिल्पा ब's picture

29 Feb 2012 - 11:10 pm | शिल्पा ब

कथा एकदम भारी ए...आवडली.

वपाडाव's picture

1 Mar 2012 - 4:00 pm | वपाडाव

आमाला पण आवडली बर्का !!!