स्वामि धागे घेऊन येतात

Primary tabs

सोन्या बागलाणकर's picture
सोन्या बागलाणकर in जे न देखे रवी...
8 May 2019 - 11:55 am

स्वामि धागे घेऊन (का) येतात
एकएक हट्टी जिलबी
जिद्दीने पाडून ठेवतात,
प्रत्येक जिलबीमध्ये
अनेक बिनबुडाचे मुद्दे
मनोरंजन म्हणून ठेवून जातात...

स्वामि धागे घेऊन येतात
अलंकारिक वाक्ये भिरकावून
केवळ डोकेदुखी देऊन
मिपाकरांच्या डोक्यात जातात
ट्रोलबाजी करून
मजा बघत अज्ञाताच्या अंधारात
गुडूप होतात......

(दुसऱ्या दिवशी परत) स्वामि धागे घेऊन येतात....

- हे काव्यपुष्प स्वामिचरणी अर्पण

आता मला वाटते भितीमुक्त कवितासोन्या म्हणेकवितामुक्तकविडंबनव्यक्तिचित्रण

प्रतिक्रिया

सोन्या बागलाणकर's picture

8 May 2019 - 11:57 am | सोन्या बागलाणकर

तेवढी प्रेरणा लिहायची राहिली - आय माय स्वारी शिवकन्या ताई!

भंकस बाबा's picture

8 May 2019 - 12:13 pm | भंकस बाबा

स्वामींची दखल वेगळा धागा काढून घेतली जात आहे.

सोन्या बागलाणकर's picture

9 May 2019 - 3:15 am | सोन्या बागलाणकर

आम्ही कोण दखल घेणारे? स्वामिच आमच्या हातून सगळं करवून घेतात. =))

अभ्या..'s picture

9 May 2019 - 10:56 am | अभ्या..

हे घे सोन्या थंडगार.
.
स्वामिना कोला
बिनबुडाचे बोला
.
स्वामिना फंटा
अभ्यासाची घंटा
.
स्वामिना माझा
घाणा ताजा ताजा
.
स्वामिना पेप्सी
चर्चा होई सेक्सी
.
स्वामिना मिरिंडा
राजाभाईचा गंडा
.
स्वामिना गोल्डस्पॉट
प्रतिसादाचा जॅकपॉट
.
स्वामिना थमसप
कापू भैय्ये सपसप
.
स्वामिना लिम्का
मराठीच्या टीमका
.
स्वामिना रेडबुल
लॉजीकची बत्तीगुल
.
मिपागावात होई गवगवा
स्वामिना अक्खा फ्रिज हवा

सोन्या बागलाणकर's picture

9 May 2019 - 4:30 pm | सोन्या बागलाणकर

झक्कास जमलाय अभ्याराव. झालच तर...

स्वामिना क्वार्टर
परप्रांतीयांची टूरटूर

स्वामिना खम्बा
युपी बिहारी करा लंबा

स्वामिना नारंगी
धाग्यांची खेळू सूरपारंबी

स्वामिना चखणा
भय्यांना पाठवू पाटणा

भंकस बाबा's picture

9 May 2019 - 5:03 pm | भंकस बाबा

तुम्हाला प्रतिभेचे पंख फुटायला उद्दुक्त करण्यास कारणीभूत ठरलेल्या स्वामींचे आभार तरी माना हो.
मिपामधे जान फुंकली हो त्यांनी!

चौथा कोनाडा's picture

9 May 2019 - 5:24 pm | चौथा कोनाडा

आमची पण जिलेबी : गोड मानून घ्या.

स्वामिना चड्डी
धागाबाते बड्डीबड्डी

स्वामिना बनियन
चर्चेला ना-कसला नियम

स्वामिना कुरता
जिलेब्यांनी दमला पुरता

स्वामिना शरट
धागा तरट-तरट

स्वामिना विजार
मिपाकर बेजार

स्वामिना पायजमा
कॉमनसेन्स इतिहासजमा

स्वामिना कोट
प्रतिसाद्क अडाणचोट

स्वामिना टाय
जिलेब्या खायखाय

स्वामिना जाकीट
राफेलचं उडवलं राकीट

स्वामिना मळमळ
जिथंतिथं कमळ

--

अभ्या..'s picture

9 May 2019 - 6:17 pm | अभ्या..

लैच बेक्कार शॉपिंग केलय स्वामिसाठी.
चौकोसर आणि सोन्याभाव, तोडलाव तुम्ही.

भंकस बाबा's picture

9 May 2019 - 6:52 pm | भंकस बाबा

वाचून स्वामि कोनाड्यात जाऊन बसायचे.
मग परत ते अभ्यासू आणि नीरस धागे, आणि त्यावर रटाळ चर्चा !

सोन्या बागलाणकर's picture

10 May 2019 - 6:14 am | सोन्या बागलाणकर

जबरा!
असल्या कविता पाहून स्वामिची प्रतिभा की काय म्हणतात ती अजून बहरायला नको.

अभ्या..'s picture

8 May 2019 - 12:14 pm | अभ्या..

;)

सोन्या बागलाणकर's picture

9 May 2019 - 3:16 am | सोन्या बागलाणकर

धन्स!

नाखु's picture

8 May 2019 - 12:38 pm | नाखु

नकोस (मी) तुझ्यापण पाठीशी आहे !!!!

इति सद्य स्वामि

मस्त प्रतिसाद

सोन्या बागलाणकर's picture

9 May 2019 - 3:13 am | सोन्या बागलाणकर

।। हा धागा सिद्धीस नेण्यास स्वामि समर्थ आहेत ।।

आता ह्या वरून प्रेरणा घेऊन कोणी स्वामि चालीसा, स्वामि चरित्रामृत वगैरे लिहिण्यास घेतले असेल तर ते प्रकाशित होण्याची वाट पाहतोय :)
असो... त्या निमित्ताने प्रेरणा पण वाचली, मूळ कविता आणि विडंबन दोन्ही आवडलं!

सोन्या बागलाणकर's picture

9 May 2019 - 3:14 am | सोन्या बागलाणकर

स्वामिंचे कर्तृत्वच असं महान आहे. =)))

जालिम लोशन's picture

8 May 2019 - 11:33 pm | जालिम लोशन

जय हरी.

जालिम लोशन's picture

8 May 2019 - 11:33 pm | जालिम लोशन

जय हरी.

उगा काहितरीच's picture

9 May 2019 - 9:12 am | उगा काहितरीच

फक्त स्वामी स्वामि नाव वाचुन डोकावलो इकडे. :)

सोन्या बागलाणकर's picture

9 May 2019 - 4:21 pm | सोन्या बागलाणकर

आजकाल देशात मोदी आणि मिपावर स्वामि ही दोनच नावं गाजतायत. =)))

जालिम लोशन's picture

10 May 2019 - 12:02 am | जालिम लोशन

शेळ्या झाडाची पाने खातात. हा (?) काय खातो काय माहित?

स्बामि मधला मि र्‍हस्व का? दिर्घ का नाही? शेवटचे अक्षर आहे ना ते. भेजा फाय्र बद्दल काही ऐकल आहे? ऊत्तर भारतीय पदार्थ आहे ना तो महाराष्टात चालतो?

सोन्या बागलाणकर's picture

10 May 2019 - 6:16 am | सोन्या बागलाणकर

ते सुद्दलेखन आणि असुद्दलेखन असले भेद मानत नाही.

सोन्या बागलाणकर's picture

10 May 2019 - 6:15 am | सोन्या बागलाणकर

हा डोकं खातो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 May 2019 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार

श्री स्वामि समर्थ जययय स्वामि समर्थ,
सदगुरु स्वामि समर्थ जय जय स्मिमि समर्थ,

पैजारबुवा,

हे तर स्वामि आयडी का हवंय तेच होतंय.
" वो हैं नामवाला, वो ही जो बदनाम हैं.." टाईपमध्ये चाललंय सगळं. वैताग.
कोणीही, अगदी एकही प्रतिसाद दिला नाही तर उत्तम होईल. कदाचित धागे येणं सुद्धा बंद होईल. इथे मिपाकर समजावायला जातात आणि चेव आल्यासारखं दोन आयडी काहीही लिहीत राहतात.

यशोधरा's picture

9 May 2019 - 5:43 pm | यशोधरा

आयडी ला *

स्वामि १'s picture

9 May 2019 - 9:55 pm | स्वामि १

शेकडो धागे अजून लिहिले जातील मिपावरती

सोन्या का झालास घायाळ एकाच धाग्या वरती

संभाजी राजगुरू टिळकांचा वारसा जपतो मनावरील

शिवबा चे आशीर्वाद असती आम्हा मर्दा वरती

सोन्या तुझ्या सारखे हजार नाचवीन एका बोटावरती

खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या... च्या धर्तीवर चालुदे तुमचे...
किती निगरगट्टपणा करावा एखाद्यानी ह्याचे ज्वलंत उदाहरण आहात तुम्ही....
चांगल्या भाषेत काही जणांनी समजावलं.... कोणी सडेतोड सुनवलं....पण ऐकाल तर शपथ...
काढा धागे तुम्ही .... चिरफाड करायला बसलेच आहेत प्रतिसादक....
किती फालतूपणा करावा ह्यालाही काही मर्यादा असते हो!
फार वर्षांपुर्वी सोनी वाहिनीवर एक मालिका होती ....ये शादी नही हो सकती नावाची....त्यात एक भोंदू स्वामि असतो जो सिनेमातली गाणी पण श्लोक म्हणून भक्तांना ऐकवायचा... तसे तुम्हाला काही करायचे आहे का? चावून चघळून चोथा झालेले विषय घेऊन [आशुद्ध भाषेत] धागे काढायचे आणि विरोधी प्रतिक्रिया आल्या तर त्याबद्दल अजून नवीन धागे काढायचे? जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा....चांगले मुद्दे आणि विषय घेऊन या तुमचे स्वागत होईल....अन्यथा भोगा आपल्या कर्माची फळे !
तुमचे धागे वाचताना असे होते...
1

Rajesh188's picture

10 May 2019 - 12:30 am | Rajesh188

स्वामी आणि 14 भामटे असा 1 धागा काढा स्वामी तुम्ही असतं

तुम्हीच काढा कि... तुमचाच डूआयडी आहे तो हे चाणाक्ष मिपाकरांनी ओळखलं आहेच कि....

Rajesh188's picture

10 May 2019 - 1:44 am | Rajesh188

Mipa कर चाणाक्ष आहेत खरे आहे .
मी खूप धागे वाचले ह्या संकेत
स्थळावर.
अतिशय उत्तम लिखान केलेले आहे खूप जणांनी
पण इथे कविता करणाऱ्यांची प्रतिभा ना कोणत्या धाग्यात दिसली ना कोणाला दिलेल्या कंमेंट मध्ये।
आणि जे खरीखर प्रतिभावंत असतात ते नवीन लोकांच्या लिखाणावर तुटून पडत नाहीत
कोण्ही कोणता धागा काढावा हे बाकी लोक कोण ठरवणारे
फक्त धाग्यात कोणा विषयी शिवराळ भाषा नसावी किंवा चारित्र्य वर शिंतोडे उडवणारे धागे नसावेत ।
स्वामी च्या कोणत्याच धाग्यात ह्या दोन्ही गोष्टी नाहीत
पटत नसेल तर वाचू नका
टीप। : स्वामी ना ओळखत पण नाही
पण पटलं नाही म्हणून कंमेंट लिहली

सोन्या बागलाणकर's picture

10 May 2019 - 6:23 am | सोन्या बागलाणकर

पटत नसेल तर वाचू नका

याच धर्तीवर म्हणतो - जमत नसेल तर लिहू नका. दर दिवसाला रतीब घातल्याप्रमाणे धागे काढणे काही आवश्यक नाही. मिपा हे दर्जेदार लेखनासाठी प्रसिद्ध आहे, धाग्यांच्या धुळवडीसाठी नाही. तुम्हाला धुळवड करायची असेल तर खुशाल एकमेकांच्या खरडवहीत करा, बाकीच्यांना कशाला त्रास?

मिसळपाव वर मराठी भाषा, संस्कृती व महाराष्ट्राचा विकस ह्या वर अनेक धागे टाकले जातील, राजेश १८८ म्हणाले ते योग्यच आहे, आपल्याला पटत नसेल तर वाचू नका. आपले वेगळे विचार असतील तर त्या वर लिहू शकता, चर्चा करू शकता.
मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी आम्ही कुठेच हार मानणारा नाही.

भंकस बाबा's picture

10 May 2019 - 8:28 am | भंकस बाबा

जिल्ब्या टाकून महाराष्ट्राची व मराठीची प्रगति कशी होणार हे समजवून द्याल क़ाय? ( नवीन धागा न काढता)

चौथा कोनाडा's picture

10 May 2019 - 1:37 pm | चौथा कोनाडा

विकस ?

अहो, विक्स असेल ते . हे असले धागे वाचून वाचून डोक्याला विक्स चोळून झोपायची वेळ आणलीत !

भंकस बाबा's picture

12 May 2019 - 8:11 pm | भंकस बाबा

हा मोबाइलच जाळुन टाकतो.

Rajesh188's picture

12 May 2019 - 8:20 pm | Rajesh188

जाळू नका मोबाइलला हवा प्रदूषित होईल त्या peksha मोबाइलला फोडून टाका

भंकस बाबा's picture

12 May 2019 - 8:29 pm | भंकस बाबा

नक्की फोड़तो.
त्याआधी दोन आयडि कसे जाळता येईल ते बघतो.

जीवन कडे खेळकर पणे बघा
जाळपोळ करू नका ,
मनशांती साठी ध्यानस्थ बसत जा
मन विचलित होऊन देऊ नका,
काही ही कंमेंट ,पोस्ट करणारे मूर्ख आहेत असे समजून त्यांना मोठया मनानी माफ करा

अभ्या..'s picture

12 May 2019 - 9:03 pm | अभ्या..

व्हय, ऐकले तुमचे,
केले तुम्हाला माफ.
या आता

भंकस बाबा's picture

12 May 2019 - 9:44 pm | भंकस बाबा

या आताचा अर्थ अजुन धागे येउद्या असा समझायचा का?
पण काही म्हणा, तुमच्या धाकाने शुद्धलेखनाच्या चुका कमी झाल्या आहेत.
आता फकस्त येकच लक्ष्य ' गिनीज रेकॉर्ड बुक'
आ ह्या ते मिपाकरांचे रेकॉर्ड कधीच डब्यात गेले.

भंकस बाबा's picture

12 May 2019 - 9:50 pm | भंकस बाबा

आम्ही खेळकरपणे बघतो.
आमची ही दररोज भाज्या वेगवेगळ्या बनवते पण मसाला तोच बेडेकराचा गरम मसाला वापरते. खेळकरपणाने खावे लागते हो!
पण प्रत्येक मिनिटाला खेळकरपणा कुठून आणायचा?

अभ्या..'s picture

14 May 2019 - 1:29 pm | अभ्या..

अंतर्धान पावले वाटते स्वामि,
चला, आता कुणाचा लंबर?
राजेशवनएटएट कुठे गायबले?

मिसळपाव भिऊ नकोस
स्वामि तुझा मेम्बर आहे

अभ्या..'s picture

10 May 2019 - 7:32 am | अभ्या..

अरे मेम्बर कुठला,
वाचकछळाचे गॅस चेंबर आहे.

चौथा कोनाडा's picture

13 May 2019 - 11:10 pm | चौथा कोनाडा

लोल ...... ख्या ... ख्या ... ख्या ..

शुद्धलेखन फेम अभ्या..गुरजी _/\_

स्वामि जी तुम्हि हार मनू नका,
महाराष्ट्र ची वाट लागली आहे ह्या भय्या मुले,
पण काही लोक गंभीरपणे विचार करत नाही,
ते एनराय आहेत,