मराठी दिन २०१८: टापा (मावळी)

भीडस्त's picture
भीडस्त in जनातलं, मनातलं
1 Mar 2018 - 1:35 am

टापा

सांगायचं म्हनश्यान तं गोश्टि जव्हा आम्हि सम्दि नयतर्नी व्हतो कनि ना त्या टायमाला तव्हाच्या ह्येत. रोज सवसान्चं भाकर खाउन्सनी आम्हि सम्दि गाबडी त्या बाळुनानाच्या बिरडिण्गीमो-हं जमुनसनी टापा झोडित बसायचो. तव्हर आम्च्या आइबापानि काय आम्हा खयसान्ना हाडळि आनुन धिल्या नव्ह्त्या. मंग आम्हाला काय राच्च्याला टायिमच टायिम घावायचा. राच्च्या येकदोन वाजेपोहत टापा चालु र्ह्यायच्या. कुढं याचंच माप काढ , कुढं त्याचीच रेवडि उडव. म्या कॉन्हची जिरावली, मपलि कोन्ह्या जिरावली ह्येच सान्गायच आन आयकायचं काम. निर्हा धिंगुड्शा आसाय्चा. पॉट पार कळा हानित र्हायचं हासुहासू.

तं आसंच त्ये सर्पन्चाचं संज्ये आन नामाबी कव्हा कव्हा आम्च्यात बसाया यायाची. सर्पन्चाचि आई म्हयि... आगं बया बया... सत्तर कव्हाच पार झाल्तं पर आज्जीची जीभ आझुकयबी चाण्गलिच वाखी व्हति. म्हातारिच्या नादाला लागनं म्हयी आप्ल्या नाकातली क्यासं जाळुन घ्येयाचं काम ..... आम्हि त्या सण्जु आन नामाकून फरमायीशी करुकरु आज्जिचं किस्सं आयकत आसु....

त्यच्यातलंच ह्ये इथाल्ल्या नेमात बस्तिन आशी येक श्टोरी
कारन ष्टोर्या मस हायेत पन काहिकाहि जरा चावनाट टायपातल्या ह्येत. इथं टाखायच्या म्हण्गालं तं इथुल्लं कार्भारि रागं भर​ऽत्यात आन आयडिचा बाबू गेनू व्हतो ... तव्हा जरा दमानी घ्याया लागत आस्तंय .

कधि बस्लोच आपन भाकर खाऊन यखान्दिशी सवंसान्चं तं त्येयबी साण्गत अस्तोय वले मी तुम्हाला. समदी गानी वाजु, आपन कनी त्या टायमाला. काळजि करायच कामच नाय ब्वॉ तुम्ह्या.

तं आता आज्जिचा ख्येळ चालू.

आज्जिचा बारदाना मोक्कार मोठाच्या मोठा व्हता. वावरं, जित्रापं,हुंडेकरी, मारकीटात तर्कारिचा गाळा. चेतुन धिलं तं हप्ताभर इझलं नस्तं आशी त-हा. चार ल्योक व्हतं. सम्दे चाण्ग्ले कामधन्दं करुन्सनी आम्च्या इथं नाव आणिक पयसा पाळुन व्हते... त्यच्यानी आज्जिचासुदिक आवाजच व्हता मळ्यात. दापून र्हायचि आज्जि सम्द्यान्ना..जाग्च्या जागी खरं न जाग्च्या जागी खॉटं आसा खाक्या. तुप्ला रुपाया मला नको नं मप्ला रुपाया तु घ्ययाचं काम नाय.चुक त्ये चूकच आन बराबर त्ये बराबरच ह्ये आज्जिचं गनित

तं आज्जिच्या शेजार्ल्या घरात न​ईन​ई सून लगीन करुन्सनि आल्ह्ती. आता आम्च्याकं कसं र्हातंय तं आज तुम्ची पोर आम्च्याकं आन्हू. ऊन्द्याच्याला आम्चि पोर तुम्हि करुन न्ह्या. आसं पिढ्यादरपिढ्या चालत आलिलं. त्याकार्नी नवरा नवरि याच्याबद्दल कार्भारि , कार्भारिन यान्न्हा सम्दि माह्यति र्हातंय. आन ह्ये माव्हं आन त्ये तुव्हं ही बातच नच्छं . समदं सम्द्यान्ना माहित आसायचं, मुद्दामुन सान्गातलं जायाचं. मळ्यातले सम्देच ल्येक न ल्येकी. आन सुना न जावाई. तव्हा चुकलिल्याला दापायला घरातलाच वडिल पाह्य्जे आस्ला बिनकामाचा लाड नसं.

तं ह्या नया पोरिनं चार्सहा मह्यनं शिस्तित काल्ढं. आन झाला कनी ख्येळ चालु बाइचा माह्या.. "ह्ये पघा सान्गुन ठुते मला कुन्ही कायि बोलश्यान तं मी ईर्हित ऊडी खाईन". काही झालं का बाईनि काल्ढाच पाह्येन पानातला एक्का बाह्येर. "मी ईर्हित ऊडी खाईन''. आज्जिनी दोन्च्यार बार्या समजुन सान्गातलं. "बाई भर्ल्या घरात आसं काह्याला काहिबाहि वाईटवंगाळ बोलऽत राह्ती. एकुनारासण्गं बैदवार राव्हा तुम्हापले नवराबायकु.

"कधि आम्हि चुकत आसू कव्हा तु चुकत आसशीन. ह्ये चालुच आस्तंय. भान्ड्यालं भान्डं लागातं तव्हा आवाज आल्याबिगार र्हातो का, मन्ग आपुन आवाजाचा तरास व्हतो म्हनुन भान्डि फेकुन्सनि द्याय्चि का बाळा". तं मण्ग बाळ काहि दी जाग्यावं याय्ची, काहि दिस ग्येलं का झालाच पोरीचा उजुन ख्योळ सुरु "मला कुन्हि कायि बोलश्यान मी ईर्हित ऊडी खाईन". ह्ये कदमंच आइकुन आइकुन घरात्लियबि व​ईताग्ली.. आन त्यान्नी तो इशय आप्ला कानामाघं सोडुन धिला. बाई म्हण्गालि "मी ईर्हित ऊडी खाईन" का त्यी सम्दी ना आयीकल्यासार्खी करित नं आप्ल्या कामाला निघुनसनि जात.

आता ह्ये व्हाया लागलं तसा वाल्ढा कनि बाईचा तर्फाडा इकडं. तिलाय्बी सुधरानी काय करावा त्ये. लै दि तिन्ह्या इचार क्येला क्येला न यका दुपार्च्याला धिला कनी बार उडुन्सनि. खालि कनी पोरिनि खरचंच ईर्हित आबगिच ऊडी. आता ऊडी खाताना मप्ल्या बाइनी, आपन उडी खायाच्या वक्ती दोन्च्यार आयाबायान्च्या बराबर नज्रं पडू याची पकि काळ्जी घिउन ठुल्ती... जशि या आयाबायान्नी पोर ईर्हित पल्डि ह्ये पघात्लं तसा झाला कनी हारिपाठ सुरू 'पोर पल्डि पोर पल्डि. आरं पळा पळा. पोर पल्डि ईर्हित पळा पळा कनी'.. आन आसं आरडत आरडत त्या थारूळ्यावं यिउन्सनि जमा झाल्या.. तव्हर हा आर्डा आयकुन्सनी दोन्च्यार बाप्येबी ईर्हिच्या काठाकं धावली. ह्यी समदि गर्बड आय्कुन आज्जि बी घराच्या दरुज्यात यिउन यवढया उन्हाच्या पा-ही काय गोन्धळ चालु ह्ये त्ये पघु लाग्ली.सम्दा ख्योळ जोखाया आज्जिला पाच शेकन्द लयी झालं. तसं आज्जि चाल्ताचाल्ता जरशिक मोर्हं आलि.आज्जिनि काहिसुदिल न बोल्ता समद्यान्नाच नज्रंनीच काय ह्ये आसं इचारलं. तशे गोळा झाल्ते त्ये बाया न बाप्ये गप्चित आस्ति आस्ति माघं निसाट्ली. आज्जि आन ती सम्दे घरापशी यिउनसनि जमा झालि. आज्जि काहिबी बोल्लि नाय. आजिच्या तोन्डात त जसं क्काय ल​ईच मोठाला गुळणा धरलाय जनू.

पाच मिन्टं झाली आज्जि गपच धा मिन्टं झाली आज्जि आझुकय गपच. त्याच्यानि बाकिच्यान्नाबि काहि हाल्चाल कर्ता येइनि.. पन्ध्रा मिन्टं उलाट्ली आज्जि आप्लि न्याहार बसुनच. बाकिचिबी तशिच. आज्जी जनु काय काह्याचि तरी वाट पघऽति आसा सम्दा शीन.

इकडं ह्ये आसं तं तिक्डं ईर्हित त्ये तसं. तिक्डंबी काह्याचा आवाजच नाय .जनु पोरय्ऽबी काह्याचि तर वाट पघती.. का तळाला गेली ईर्हिच्या. काय सुधरानिच कॉन्हलायबि..

आशीच आझुक दाहा मिन्टं पास झाली आन ईर्हितून आला कनी हाम्बारडा येक्दाचा "ये आज्जे मला वाचव गं आज्जे. काढ ना मला ईर्हितुन बाहेर. ये आज्जे ये ना गं बाई लौकर.. ये आयव ये बाबव काढा ना रे मला इथुन बाहेर्. घ्या कनि कोन्ह्यातरी मला वर वढुन्सनिऽऽ".

ह्ये आईकल्यासनी आज्जि हास्ली कनि गालातल्या गालात​. आन सबागती डाफार्ली कनी समद्यान्वं "ये चला भाडखावाहो इथं काय करित्याय? तिक्डं पोर पल्डि माही पान्यात न तुम्हि इथं आयि घालित बस्ले काय .. व्हा तिक्डं इर्हिवं".. तशि सम्दि सुट्ली कनि ढुन्गाला पाय लाईत इर्हिच्या आंगाला. आज्जिपन पोह्चलिच लगुलाग. आन धिला ना आज्जिनि बाईला आवाज

"काय झालं गं मप्ल्या बाईला आशी कशि क्काय पल्डि ग माही बाय पान्यात? काय झालं ग बायी; आगं सान्ग तरी मला".
"काय नाय ग आज्जे. म्या आप्ली ह्ये आशिच आल्थे थारूळ्यावं. तं येकदम्च आन्भुल आल्यागत झालं नं पल्डे ना ग मी पान्यात.
"घ्ये ना गं आज्जि मला वर वढुन्. लयी भ्याव वाटातंय मला ह्या खब्दाडात.. घ्ये ना आज्जि मला बाहेर्. साण्ग ना कोन्हलातरी"..

तशी आज्जि काय म्हन्ती,
"आसं झालं काय मह्या बाये. मी हायी ना आता, समदं बैदवार व्ह​ईन . काहिबी काळ्जी करायचं काम नाय आता".
आसं म्हनत आज्जि जरा माघं वळली.

तिथं तिचं कायम्चंच काम कर्नार्हे दोघंजन तयारच उभ्ये व्हते. आज्जिचा त्यान्ना आवाज सुट्ला
"जारे तो बराखीतला पाळना आन्हा पघु. आन त्या पाळन्याचं कासरं मज्बुत ह्येत का पघुन घ्येशान जरा येवस्तेशीर. नाह्यतं सुट्श्यान तसंच पळत​. सोन्यासार्खी पोर ह्ये माह्यी.काही बरंवाईट घल्डं तं मप्ली हावंय जायाची न धावंय जायाची. तव्हा जरा न्याहार काम कर्श्यान".

त्ये गडी माना डोलित डोलित बराखिकं पळालं. ग्येलं तसं आलंऽय्बी पाळना घिउनसनि. आज्जिनि बिन्चुक्ता पाळना च्येक करुन घ्यतला. आन म्हंगाली "सोडा आता पाळ्ना ईर्हित चला. आन ये बाकिच्यान्नो सरा कनि माघं तिथं ईर्हित काय बाया नाचंऽत्याय काय्.व्हा बाजुला".

तशि काठावर्ह्ली बिन्कामाचि गर्दी जरा तिथाल्ल्या तिथंच माघं सर्ल्यासार्खि झाली. आज्जि काठापशी यिउन उभी र्हायलि. तव्हर दोन्च्यार गड्यान्नि दोन आण्गाला उभं राहुन्सनि पाळ्ना खालि सोडलासुधिक.

आज्जि बाइला कशी म्हन्ती
"बस गं बाई नीट पाळन्यात्. जरा ज्याम पकडशीन कासरा. नाह्य्तं आबगिच हात निफ्टंन पघ".

पोर खालुन मान हालित हा म्हंगालि.आन पाळन्यात जाउन कशितरी बस्ली. छातीत धदधड चालुच व्हति बाईच्या शिस्तीत तिन्ही कासरा धरुन ठुला .. आज्जिनि गड्यांकं पघुन मान हालावली . तसं इकुन दोघंतिघं आन तिकुन दोघंतिघं लागलं कासरा वर वढाया.

"हा आलिच गं माही बया आता बाहेर. पहिली तिची द्रिष्ट काढनार ह्ये मी, ती वर आल्याआल्या. नीट बैदवार वढा रे कासरा वर. इकडंतिकडं ढळून नका दिउ'' आज्जिचि बडबड चालुच व्हती..

गडी पार दातवठ खाऊखाऊ कासरं वढित व्हती.पोर जवळजवळ निम्म्यापोह्त वर आलिबि. समदी टाळ्या वाजवीत व्हती.

आज्जि कासरा वढनार्या गड्यान्कं एक्दा उज्या बाजुला एक्दा डाया बाजुला मान वळुवळु पघत व्हती. त्ये गडिबी एक्दा पाळ्न्याकं तं एक्दा आज्जिकं पघत व्हते. आन आसंच ही पघापघी चालु अस्ता आज्जिचि मान डाया बाजूच्या गड्यांकं बघुन सबागती हाल्लि तसं काय झालं कॉन्ह्ला ठावकी त्या गड्यांच्या हातातला कासरा निफाट्ला नं क्काय, तसा पाळना परत पोरिसहित पान्यात. नुस्ता गोन्धळ उल्डा वर. आज्जिने जे गड्यान्ना घानघान श्या द्याया सुर्वात क्येलि कनि. तिकडं खाली पोर पाळन्यातुन निश्टुन पान्यात. आरडु आरडु पोरिनि पार आवदान क्यालं.

आज्जि तिला गप करित म्हंगाली "नको गं माह्या बाई भिऊ. मी हाये कनीं आता" .

परत समदा खेळ तसाच पार पल्डा. पोर पाळन्यात बस्ली. गडि कास्रं वढु लागलि. पाळना उजुक निम्म्या वाटंपोह्त आल्था. आज्जिचि न गड्यांचि एकुनाराकं पघापघी तशीच सुरु व्ह्ती. ह्या बारिला आज्जिचि मान उज्या बाजुला वळुन आपॉक हाल्लि तसा उज्या बाजुच्या गड्यांच्या हातातुन कस्स्क्कायनु कासरा सुटला त्यांचं त्यान्न्हाच कळ्लं नाय. पोर धबाक्कन उजुक पान्यात. आज्जिच्या परत श्या चालु झाल्या ह्या आंगच्या गड्यान्ना. पोरिला बि कळानि काय व्हतंय आन आज्जिला बि कळानि. पार चिनभिन झाली म्हतारी. गड्यान्चि तं अक्कालंच गुल झाल्ति.

आज्जिनि आत्ता परत समद्यान्ना नीट साण्गुन ठुलं. सम्दे गडि आता पक्के सावध व्हऊनसनी कामाला लाग्ले. पाळना परत वर याया लागला.
निम्म्याच्या वर पाळना आलथा. आता ह्या वक्ती कायसुधिल आडसन न यता पाळना वर येत व्हता. आता दोन परासऽच आन्तर पार व्ह्यायाचं व्हतं. परत यक्दा आज्जिला ना कळत्या दोन्ही आन्ग्च्या गड्यांकं पघ्ता पघ्ता आज्जिचि मान आपापच हाल्लि. मान हल्लि तसा कास्रा वर जायचा आपाक बन्द पल्डा.

इकडं पाळना थामला, तिक्डं पोरिनि खालुन बोम्ब माराया सुरु क्येलि.
"चुक्लं गं आज्जे माहा. मी पाया पडते तुपल्या. परत नाय कर्नार कव्हाच आसं. आयरक्ताचि शप्पत ह्ये ग आज्जे. एवढ्या बारिनि मला माफ कर ग आज्जे' ए आयवग ए बाबवरे ".

आज्जिला तं काहिच कळत नव्ह्तं काय चाल्लंय्. तिच्या तोन्डून आवाजच फुटायचा बन्द पल्डा व्हता. पर तिक्डं इर्हित पोर आसं म्हन्ल्या म्हन्ल्या पाळना आपाप वर याया सुरुवात झालि...आता वर परासभरच आन्तर बाकि व्हतं. आत्त्याह्यला मिव्ह एवढ्यात परत झालीच ना भानामती. पाळना उजूक आपाकच खाली जात जात, पान्याच्या परासभर वर आस्तानी आपाप थान्बला.

आता कुठं आज्जि जरा जाग्यावर आल्ती ती ईर्हित डोकित डोकित पोरिला इचारती झालि
"खाशिन का माह्या बाये उजुन इर्हित उडि. का र्हाती आपलि ईरहितच "

तशि पोर हात जोडूनसनी फुन्दत फुन्दत मान हालित 'नाय' म्हंगाली .. तसा च्यमतकार झाल्यागत कनि पाळना उजुक आपाप वर लांघाया सुरुवात झालि. ह्या टायमाला मात्र काहिच इघ्न आल्याबिगार पाळना पार शेवटापोह्त श्याबुत वर आला. आन गड्यान्नि पोर पाळ्न्यातुन काढुन आल्हाद भुईवं ठुली. तशी हातानी भुईचा आधार घेऊन्सनी पोर उठुन उभी राह्यली. उभी राहूनसनी तिन्हया आपली मान यक्दा ह्या आन्गाला आन यक्दा त्या आन्गाला फिरावलि आन धुमचकाट घराकं पळत सुट्ली.
.
.
1

वाङ्मयकथाभाषाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Mar 2018 - 8:55 am | प्रचेतस

मस्त लिहिलंय

एस's picture

1 Mar 2018 - 10:03 am | एस

येक लंबर आज्जी. =))

पैसा's picture

1 Mar 2018 - 10:05 am | पैसा

=)) भारी किस्सा!

आयडीचा बाबू गेनू होईल म्हणून लै काळजी घ्येतायसा जनू!

भीडस्त's picture

1 Mar 2018 - 10:57 am | भीडस्त

इथाल्ला सम्द्यात वडिल आयडि ह्ये हा.जरा ज्येदाच माया ह्ये त्यच्यावं. ;)

प्राची अश्विनी's picture

1 Mar 2018 - 10:11 am | प्राची अश्विनी

:). मस्तच. मजा आली वाचायला.
हाडळी म्हणजे?

पैसा's picture

1 Mar 2018 - 10:14 am | पैसा

हडळी. या खवीसांच्या हडळी.

प्रचेतस's picture

1 Mar 2018 - 10:23 am | प्रचेतस

=))

हाडळीला नाय नवरा आन खयसाला नाय बायको

अजया's picture

1 Mar 2018 - 10:51 am | अजया

=)))
मस्त!

अभिजीत अवलिया's picture

1 Mar 2018 - 11:07 am | अभिजीत अवलिया

मस्त...

दुर्गविहारी's picture

1 Mar 2018 - 11:38 am | दुर्गविहारी

हा हा हा ! मस्त लिवलय. केव्हापासून लिहा असे सांगत होतो. आता अजिबात थांबायचे नाही. जाउ द्या गाडी भुंगाट.

सस्नेह's picture

1 Mar 2018 - 11:41 am | सस्नेह

=)) =)) =))
बरा दणका दिला आज्जीनं हडळीला !

सुधीर कांदळकर's picture

4 Mar 2018 - 8:08 pm | सुधीर कांदळकर

भाषेच्या अस्सल गावरान बाजामुळे नाट्य मस्त रंगले आहे. या बोलीच्या जवळ जाणारी पुणे जिल्ह्यातली बोली मी भरपूर ऐकली आहे. त्यामुळे जास्त मजा आली. एकदा एक मूल रांगत जिन्याकडे चालले होते तेव्हा शेजारून एक बाई ओरडली होती आरंऽऽ आरंऽऽ पल्डऽऽपल्डऽऽ पल्डऽऽ, मेलं की ते प्वार, धरा त्याला लौकर.

मस्त कथा, अवडली.

सुधीर कांदळकर's picture

4 Mar 2018 - 8:22 pm | सुधीर कांदळकर

तव्हर आम्च्या आइबापानि काय आम्हा खयसान्ना हाडळि आनुन धिल्या नव्ह्त्या.

हे काय? हाडळीनं वाचलं तर जिवानिशी मराल की!

भीडस्त's picture

5 Mar 2018 - 12:23 pm | भीडस्त

आसं कुढं -हात आस्तंय का सर .
यकोनीस सालापुन
"म्येल्या
"मुडद्या
"पळ रे
"गेलास ऊडत "
ह्ये सम्दं काय खैस फुकाटच आयकत्याय का काय?

भीडस्त's picture

5 Mar 2018 - 12:12 pm | भीडस्त

प्रचेतस
एस
पैसातै
अभिजित अवलिया
दुर्गविहारी
स्नेहांकिता
आणि
कांदळकर सर

भीडस्त's picture

5 Mar 2018 - 12:16 pm | भीडस्त

डॉ प्राची आणि डॉ अजया
तुमचे तर खास आभार

चक चकाचक चकचक
चक चकाचक चकचक

अजया's picture

5 Mar 2018 - 1:34 pm | अजया

:)
Who are we ...!

भीडस्त's picture

5 Mar 2018 - 2:00 pm | भीडस्त

:)

प्राची अश्विनी's picture

5 Mar 2018 - 10:32 pm | प्राची अश्विनी

:)

बबन ताम्बे's picture

5 Mar 2018 - 6:08 pm | बबन ताम्बे

आज्जीनं फिंद्रीच्या चांगल्या दोन चार द्यायाच्या व्हत्या ठिवूनसनी :-)

आमचीच भाषा की हो ही !
मस्त लिहिलेय.

भीडस्त's picture

5 Mar 2018 - 7:10 pm | भीडस्त

लई दि झाल्त आयकून.. आन मोर्हलं बी आठावलं कनी समदं .. बारक्यापनात आयिकलिलि बायान्ची सम्दी भान्डनं तुम्ह्या आठ्वाया लाव्लि.
आन आज्जीनी आता यावढं हिंदळूहिंदळू काल्ढ्याव आझुक काह्याला वाय्ल्या ठिऊनसनि द्यायाच्या त्या पोरिला..

बबन ताम्बे's picture

5 Mar 2018 - 10:28 pm | बबन ताम्बे

मुम्बईचा बस्ता
http://www.misalpav.com/node/38930