'कोणीतरी आहे तिथं!'

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
19 Sep 2017 - 4:26 pm
गाभा: 

आज सर्वपित्री! सर्वपित्री म्हटलं की आत्मे भूत यांचा विषय निघतोच! याच विषयावर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घनघोर चर्चा झाली.अनेकांनी त्यांना तसे आलेले अनुभवही सांगितले.देवाधर्माची अावड असणार्‍यांना असे अनुभव बर्‍याचदा येतात पण देवाधर्माची फारशी आवड नसणार्‍या काही लोकांनाही असे अनुभव सांगितले.
काहीजणांनी असं काही नसतं.मनाचे खेळ असतात असंही म्हटलं.अर्थात प्रत्येकाचा अनुभव आणि तो सांगण्याची पध्दत निराळी! एखाद्या देववादी माणसाला तो आत्मा वाटेल.एखादा विज्ञानवादी माणूस यामागचं वैज्ञानिक कारणही सांगेल.तर्कहीन म्हणेल.
तुम्हालाही आलेत का असे काही अनुभव?किंवा असंही झालं असेल की अनुभव तर आलाय पण त्याचं विश्लेषण मात्र करता आलं नाही.खरंच पितर आजच्या दिवशी खाली येतात का? आले तर ते फक्त कावळा या पक्षाला आणि काही ठराविक लोकांनाच का दिसतात? सगळ्यांना का नाही दिसू शकत?
ट्रेकींगच्या निमित्याने गड किल्ल्यांवर बरेच जण जातात.काही वेळा रात्री तिथेच मुक्काम करणं भाग पडतं अशा वेळी अालेले अनुभव हे सर्वाधिक आहेत.हे आत्मे किंवा ज्या काही शक्ती असतील त्या खास करुन गड किल्ल्यांवर का येत असाव्यात? या शक्तींची वावरण्याच्या विशिष्ट अशा काही जागा असतात का?
कावळ्याला म्हणे चौथ्या मितीत पाहता येतं.म्हणून त्याला आत्मे दिसतात म्हणे! खरंच असं असतं का?
हे मानवानेच निर्माण केलेले मनाचे खेळ की खरंच 'कोणीतरी आहे तिथं?'

संदर्भ म्हणून मिपावरचेच हे काही 'तंतरवणारे धागे'

भुतेखेते-हडळी अनुभव
http://www.misalpav.com/node/3945

कोकणी भुते
http://www.misalpav.com/node/31225

भूतांचे प्रकार
http://www.misalpav.com/node/36139

भूत कसे बनते?। सर्वपित्री पेश्शल
http://www.misalpav.com/node/19247

जगात खरंच भुते आहेत काय?
http://www.misalpav.com/node/26246

तुम्ही कोण म्हणून काय पुसता? हिम्मत असेल तर वळा मागे
http://www.misalpav.com/node/28439

भुते
http://www.misalpav.com/node/5654

मी भूत पाहिले आहे (विश्वास नाही बसत?... माझा पण नाही बसत)
http://www.misalpav.com/node/5180

करणी/भानामती खरे की खोटे?
http://www.misalpav.com/node/20719

वारं येणे,भूत काढणे वगैरे वगैरे
http://www.misalpav.com/node/17167

एक भुताचा अनुभव
http://www.misalpav.com/node/39976

कोकणातली भुतं
http://www.misalpav.com/node/28780

चकवा
http://www.misalpav.com/node/8223

गूढ...थरारक....भीती वाटेल अशी भुताटकी
http://www.misalpav.com/node/5166

एक पिल्लू तिचं आणि आमचं
http://www.misalpav.com/node/33501

प्रतापगड अनुभव
http://www.misalpav.com/node/35718

भयकारक भानगड
http://www.misalpav.com/node/27190

अशीच एक गोष्ट... | मिसळपाव
www.misalpav.com/node/9100

सुधागड एक 'नाईट ट्रेक'
http://www.misalpav.com/node/35466

प्रतिक्रिया

वा वा.. बऱ्याच दिवसांनी असा धागा आला. माबो वरच्या अमानावीयची आठवण झाली.

आनंदयात्री's picture

19 Sep 2017 - 8:20 pm | आनंदयात्री

आंबोळीच्या कंदील शिवाय वरची लिस्ट पूर्ण नाही.

Ranapratap's picture

19 Sep 2017 - 8:59 pm | Ranapratap

अरे येऊ दया अजुन काही अनुभव, भूतांचे

शब्दानुज's picture

19 Sep 2017 - 9:20 pm | शब्दानुज

मला एक अनुभव माहिती आहे

माझा एक मित्र एका तिस-याच मित्र्ाला घेऊन रात्र्ीचा गाडीवर निघाला होता. त्या रोडवरच्या एका ठराविक ठिकाणी भुते असतात हे ह्याला टाऊक होते तरीही त्याने गाडी नेण्याचे ठरवले.

नेमक्या त्याच भागात आल्यावर गाडी बंद पडली. किक मारून दोघे थकले पण गाडी चालु होण्याचे नाव घेईना

थोड्यावेळाने तिथे एक माणुस आला. तो दोघांना म्हणाला की या भागात ही गाडी चालु होणार नाही गाडी थोडी पुढे नेऊन चालू करा.

त्यांनी हातानी थोडी गाडी ढकलत नेली आणि पहिल्याच किकला गाडी चालु झाली

हा सगळा प्रकार सरळसोट रस्त्यावरच होत होता जिथे वळण वगैरे काही नव्हते

तरीही गाडी सुरु झाल्यावर जेव्हा मित्र्ाने मागे वळून पाहिले तेव्हा तो माणुस तिथे नव्हता.

हा प्रकार भुताताच आहे असा कोणताही दावा मी करत नाही. याचे तार्किक स्पष्टिकरण दिल्यास आवडेल. माणुस आजूबाजूला जाणे आपण समजु शकतो पण १०-१२ किमी प्रवासात गाडी फक्त एकदाच बंद पडणे तिही त्याच ठिकाणि बंद होऊन पुढे चालु होणे यास योगायोग म्हणावे का ?

Some questions

भुत किती अंतर कापु शकते ? अर्थात त्यांचे प्रभावक्ष्ेत्र बाहेर ते जाऊ शकतात का ..

ज्यांना अवकाशात मरण आले आहे त्यांचे प्रभावक्ष्ेत्र कुठे असेल ?

मेल्यानंतर एखादा माणूस ठरवून भुत होऊ शकतो का ?

एवढी चांगली माणसे इथे असतात तर चांगली भुते जास्त असतात का ? समाजसेवा म्हणून ती आपणास टरबाईन फिरवून देऊन फुकटात मदत करु शकतील का ?
अतिरेक्यांविरुद्ध ते मदत करतील का ?

भुतांवर कपडे कुठून येतात ?

भुत जर अचाट वेगाने प्रवास करू शकत असेल तर आईस्टाईनच्या सिद्धांताप्रमाणे ते भुतकाळात जाऊ शकते का ? भुतकाळात जाऊन स्वताःच स्वताःचे मरण टाळता येऊ शकते का ?

एखाद्या वस्तुत भुत अडकल्याचे आपण ऍकले असेल. कोणकोणत्या वस्तुमसदधे भुत शिरू शकत नाहित ?

दुर्गविहारी's picture

20 Sep 2017 - 10:49 am | दुर्गविहारी

अतिशय उत्तम धागा. जे मि.पा.चे सदस्य नाहीत आणि ज्यांना या विषयात रस आहे त्यांच्यासाठी या सगळ्या कथा एकत्रित वाचायला मिळणे म्हणजे पर्वणीच.
आधी मायबोलीवर या संदर्भात असणारे धागे देतो.
अमानवीय...?
आणि
अमानवीय...? - १
या शिवाय ईथेच मि.पा.वर बरेच लिखाणं झाले आहे. स्पार्टाकस यांच्या "थोडे अदभुत थोडे गुढ" या मालिकेच्या शेवटच्या भागाची लिंक देतो. त्यात ईतर भागाच्या लिंक आहेतच.
थोडे अद्भुत थोडे गूढ - १० (अंतिम)
भयकथा आणि स्पा यांचे नाते अतुट, हि घ्या त्यांच्या "ते" ची लिंक
"ते" - ७
त्यांच्याच सकस लेखणीतून उतरलेली आणखी एक भयकथा
सायबानू मीच त्यो .... अंतिम
मि.पा.वरची हि प्राचीन भयकथा. दिवाळी जवळ आली आहे तेव्हा जपुनच वाचा. ;-)
कंदील
आणि हि
कंदील २
या शिवाय बिपीन कार्यकर्ते यांच्या या कथा
फेड...
भेट...
या!!!
अजुनही भयकथांच्या धाग्याच्या लिंक जुणे जाणते मि.पा.कर घालतीलच.

दुर्गविहारी's picture

20 Sep 2017 - 12:33 pm | दुर्गविहारी

वर धाग्यात ट्रेकच्या अनुभवाविषयी लिहीले आहे म्हणून माझे दोन शब्द. खरे तर किल्ले हे तसे पाहिले तर रणक्षेत्र, साहजिकच अनेक मृत्यु ईथे झालेले असतात. तेव्हा भुताखेतांचे अनेक अनुभव सर्वाधिक ईथेच यायला हवेत.पण मला आज अखेर एकही वेडावाकडा अनुभव आलेला नाही. माझे काही मित्र दुर्ग ढाकोबा ट्रेकला गेले असताना त्यांना एक गुढ अनुभव आला होता. पुढच्या महिन्यात दुर्ग ढाकोबाविषयी धागा टाकणार आहे त्यात याविषयी लिहीनच.
पण ट्रेकर्समधे काही जागा फेमस आहेत जिथे असे अनुभव येतात.
उदा.- कांदाट खोर्‍यातील महिमंडणगड- या ठिकाणी कुत्र्याची जत्रा पहायला मिळते.
सुधागड- या ठिकाणी रहायच्या वाड्यामागे दाट झाडी असल्यामुळे बर्याचदा भास होत असावा.
तोरणा- याबाबतीत सर्वात बदनाम. इथे ब्रम्हपिश्चाच आहे असे म्हणतात.
आणखीही सांगता येतील
आता काही लिंक देतो. अर्थात यातील मताशी मी सहमत नाही आणि या लिंक स्वजबाबदारीवर उघडाव्या हि विनंती.
सुधागडचा गडपुरुष

भूतांचे अस्तित्व मिटत नाही !

The Haunted Encounter on Sudhagad Fort

हरिश्चंद्रगडावरचा हा अनुभव
अमानवीय.....?

या शिवाय प्रा. प्र. के. घाणेकर लिखीत " साद सह्याद्रीची भटकन्ती किल्ल्यान्ची" या पुस्तकात तोरण्या वरच्या लेखात असेच दोन अनुभव दिलेले आहेत. इच्छुकांनी ते वाचावेत.
"सह्याद्रीच्या दर्याखोर्यात " लेखक वसंत चिंचाळकर, या पुस्तकात विशाळगडाचा विचित्र अनुभव दिलेला आहे. पुस्तक कदाचित उपलब्ध होणार नाही म्हणून थोडक्यात लिहीतो. सदर लेखक नागपुरचे असून विजयराव देशमुखांबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील किल्ले पहण्यासाठी आले होते. विशाळगडावरती लेखक थोडे एकटेच बाजुला गेले असताना एका हिरवी साडी आणि चुडा घातलेल्या बाईने त्यांना बोलावून हनुमान मंदिरपरिसराकडे ट्कमक टोकाकडे नेण्यास सुरवात केली. त्यांना आपण काहीतरी चुकतोय हि जाणीव असूनसुध्दा त्यातून बाहेर पडता येत नव्हते. अखेरीस त्यांच्या ग्रुपमधील कोणीतरी त्यांना शोधत त्यांच्या मागे येउन त्यांना परत घेउन गेले.
खोदमान चालु असताना मि.पा.वरच्या दोन कथा सापडल्या त्यांच्या लिंक टाकतो.
भूतकथा - किल्लेदार

भूतकथा - "दुराई"

सिरुसेरि's picture

20 Sep 2017 - 2:41 pm | सिरुसेरि

http://www.misalpav.com/node/35961 - विखार

http://www.misalpav.com/node/34780 - अ‍ॅडमिट किडा

http://www.misalpav.com/node/33688 - पाश - भाग २

ज्योति अळवणी's picture

20 Sep 2017 - 5:25 pm | ज्योति अळवणी

खरे अनुभव?

उपयोजक's picture

21 Sep 2017 - 3:31 pm | उपयोजक

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण!

रामपुरी's picture

21 Sep 2017 - 10:59 pm | रामपुरी

सहज दिसलं म्हणून..

"ते फक्त कावळा या पक्षाला"

पक्षाला नव्हे पक्ष्याला...

:-)

-छिद्रान्वेषी