मी भुत पहिले आहे...(विश्वास नाही बसत...? माझा पण विश्वास नाही बसत)

रविवार होता....आई सोमवारी गावी जाणार होती. आक्काकडे ..माझी बहिण ( आक्का)..आक्काने चटणी आणायला सांगितली होती येताना. घरच्या मिरच्या होत्या. चटणीचा डंक (चटणी बनवायचे यंत्र) २ ते ३ किलोमिटर दुर होता..माझ्या गावी वीज बारा बारा तास गायब असते अजुनही गायब होणे चालु आहे...सकाळी सहाला लाईट गेली होती..ती संध्याकाळी नेमापरमाणे सहा ला आली.मग बापु (माझे वडिल) चटणी चे सामान घेऊन डंकाकडे गेले..पण लाईट सात ला गायब..निम्म्या मिर्च्या डंकात अन् निम्म्या मिर्च्या बाहेर्...तास भर वाट बघुन बापु घरि परत आले...सगळ्याना वाटले रात्री सात ला गेलेली लाईट सकाळी सात ला येणार्..जेवण झाले आणि सगळेजन झोपलो होतो..तेवढ्यात लाईट आली.घड्याळात बघतो तर काय ९.३० वाजले होते..मग बापु अनि मी दोघे डंकाकडे जायचे ठरले..मी त्यावेळी सातवीला होतो..डंक तसा दोन ते तीन किलोमिटर लांब होता..आम्ही चालत गेलो..पायवाट असल्यामुळे आणी सायकल वरुन जायचे असेल तर वड्याकडच्या वाटेने जायला लागायचे ..आणी ती वाट लय भयानक होती रात्री जाण्यासाठी ...कोणी सहसा जात नसे..आम्ही मधनं जायचे ठरवले. जाताना मध्ये खोताची वस्ती लागली..त्याच्या पुढे मध्येच विठोबाचा माळ होता...त्याठिकाणी एक मोठे तळे होते पाणी नसलेले...काटेरी बाभळीची झाडे त्या तळ्यात राहत होती..तिथेच जवळ एक ओघळ होती .(छोटा ओढा). त्या ओढ्यात मेलेल्या माणसांना जाळले जात असे..जास्तीत जास्त अंतर माळावरुन चालण्यात जात असे....आणि पुढे गेल्यावर नंदिवाल्याची वस्ती...आम्ही साधारण ४५ मिनिटात डंकाजवळ पोहोचलो...दादु नंदीवाल्या डंक चालवत होता..त्याने जेवण आटपले होते..मग लगेच त्याने डंक चालु केला आणि सुमारे दीड ते दोन तास गेला पुर्ण चटणी बणवायला.....

शेवटी चटणी तयार झाली

आम्ही चटणी घेऊन परत निघालो..बापुनी चटणी गटुळ्यात बांधुन डोक्यावर घेतली. विशेष म्हणजे त्यादिवशी पौर्णीमा होती. त्यामुळे चंद्राचा पुर्ण उजेड पडला होता..(दिवसासारखा)..२५ फुटापर्यत चा माणुस स्पष्ट दिसु शकत होता...नंदिवाल्याच्या वस्तीतुन बाहेर पडायला आम्हाला सुमारे १२ वाजुन गेले होते. मग काय बापु पुढे आणी मी मागे पण जरा जवळुन (चिकटुन ) चालत होतो.निम्मा माळ चालुन मागे टाकला होता.अनि तळयाजवळ आलो ..वाट उताराची होती..मी मनातल्या मनात जरा घाबरत चालत होतो . पण चांदोमामाचा उजेड मस्त पडला होता. त्यामुळे मला जास्त भिती वाटत नव्हती...बापु आणी मी त्या वगळीजवळ (छोटा ओढा) आलो..त्या ठिकाणी प्रेते जाळली जात होती ...खरे म्हणजे हे मला महित नव्हते...मी लहान होतो..म्हणुन मी सगळे ठीक असल्याप्रमाणे बापुबरोबर चालत होतो..पण माझ्या लक्षात आले नाही कि आतापर्यंत बापु माझ्या बरोबर गप्पा मारत आले मग ईथे आल्यावर मुकाटयाने न बोलता गप्प का चालत होते...मी जास्त काही बोललो नाही ..बापुबरोबर शांत चालत राहिलो..तेवढ्यात पुढे म्हणजे माझ्या डाव्या बाजुला एक मोठी काळीकुट्ट माणसाच्या आकाराची आक्रुती मला दिसली.साधारण अंतर एक २५ फुट लांब असेल्..मी लगेच बापुकडे पाहिले ..बघतो तर काय बापु माझ्यापासुन पाच फुट पुढे सरकले होते आणि मला समजलेच नाही ..काही बोलत पण नव्हते..मीच बापुला हाक मारली ..बापु सरळ पुढे बघुन चालता चालता मला म्हणाले काय रे!!!..प्रेमाने बोलले..मी म्हणालो ते बघा कोण आहे...बापुनी डोक्यावरचे गाठोडे सावरत मान डाव्या बाजुला वळवली आनि मी पण ..बघतो तर काय काळाकुट्ट माणुस आमच्याकडे चालत येत आहे..उंची साधारण ६ ते ७ फूट ..आणी तो पण उजेडात स्पष्ट दिसत होता....आनी तो २५ फुटा वरुन १५ फुटावर जवळ आला होता..म्हणजे लयचं जवळ...मी घाबरलो..बापुच्या दुसर्या बाजुला गेलो..बापु म्हणाले काही नाही चल तु सरळ्..आणि बापु मोठ्याने राम हरी क्रुष्ण ..राम राम ..विठ्ठल विठ्ठल ...असे जोरात म्हणु लागले...आमचा चालण्याचा वेग वाढला...तो माणुस आमच्या मागे मागे येत होता..मी त्या काळ्या कुट्ट आक्रुती कडे पाहत चालत होतो..आणि अचानक तो माणुस जागीच जमिनीत खाली गेला ..मग मी सरळ बापु बरोवर चालु लागलो..बापु जोरात राम राम ..करतच होते..पुढे गेल्यावर गप्प झाले ...मी विचारले बापु काय होते..काही नाही रे चल्...काय नाय...मी पण न बोलता चालु लागलो....पण ती गोष्ट माझ्या मनात राहुन गेली होती..सात आठ दिवस निघुन गेले...आणि मी अचानक विचारले बापु ते काय होते....बापु म्हणाले अरे ते त्या माळावरचे भुत होते..आंपल्याला दिसले...असे तु भविष्यात कधी पाहिलेस तर देवाचे नाव धे ..काही होणार नाही..मग मी आईला पण सांगितले..आई म्हणाली बाळा नशिबवानालाच भुत दिसते बरं का!...तु घाबरु नकोस्..त्यानंतर मी भुत तर कधीच पाहिले नाही...पण ही सत्य घटणा मी माझ्या मित्रांना सुमारे दोन वर्षानंतर सांगितली..आणी त्यानंतर आता ईथे सांगतोय्...बापु आणी मी अजुन ती आठवण कधी कधी काढतो.....आता यावर तुम्ही किति विश्वास ठेवणार हा तुमचा प्रष्न आहे..माझा भुतावर विश्वास नाही पण ह्या घटनेवर पुर्ण विश्वास आहे..कारण बापु हे या घटनेचे साक्षीदार आहेत्..

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

अंमळ खड्डा दिसला नसेल. त्यामुळे ते भूत जमिनीत खाली गेलं असेल. त्याला मदत करायला पाहिजे होती राव. उगीच पायबिय मोडले असतील त्याचे.

भुताचे पाय उलटे असतात असं ऐकुन आहे. ते जर खड्ड्यात पडलं असेल तर ट्विस्ट होऊन पाय सुलटे झाले असतील कदाचित....

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

हासायला आले रांव्....पाय सुलटे. हाहाहा!!

राम दादा.

माहिती नाही.. पण ते नक्की भूतच होतं का? की काही भास??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

>>पण ते नक्की भूतच होतं का? की काही भास??
भास असेल तर दोघांनाही एकाच वेळी एकाच समान व्यक्तीचा भास कसा होईल?

भास

राम दादा... खरच लै नशिबवान तुमी... आमाला तं सपनातबी नाय दिसलं बा भूत कदी.... !

कथा आवडली. :)
जगात जशा चांगल्या शक्ती आहेत तशा वाईट शक्ती ही अस्तित्वात आहेत ह्यावर मा़झा विश्वास आहे.

........जगात जशा चांगल्या शक्ती आहेत तशा वाईट शक्ती ही अस्तित्वात आहेत ह्यावर मा़झा विश्वास आहे.

स ह मत

ह्म्म्..च्यामारी म्हणुनच तुम्ही राम दादा हे नाव घेतलत का ?नाय म्हणजे नावातच राम हाय म्हणुनशान इचारतोय्..तशी इथं पण काही तशीच मंडळी आहेत्...वेताळ,,कवटी इ..त्यांच्या पासुन सावध रावा काय.. ;) आणि व्हय तुम्हांसनी जास्त भ्यां वाटत असेल तर या व्यक्तीशी संपर्क करा http://www.misalpav.com/user/401 ह्यांचा या विषयातील अनुभव गाढा असावा कारण आम्ही त्यांची व्यावसायिक माहिती वाचुनच हे तुम्हांसनी खात्रीने सांगत आहोत !!!!
तशी माझी आणि भुताची डायरेक्ट अशी मिटींग झालेली नाही !!! पण काही मदत करणारी भुत सुध्दा असत्यात असे ऐकुन आहोत...

इशेश सुचना:-- वरती उल्लेखलेल्या व्यक्तींनी कृ.ह.घे.
(ब्रम्हसंमंधाच्या शोधात)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

बाणाचा निशेद! माझ्या नातवाला इसरलास होय?

बाकी गोष्ट वाचून करमणूक झाली.

अदिती
भूताखेतांवर माझा बिल्कूल विश्वास नव्हता, जोपर्यंत स्वत:ची ओळख झाली नव्हती.

मस्तच,
अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात.

फुले शु

----
सखाराम गटणे

तुझी ड्युटी रात्रीची असते रे बाबा.. बघ कधीतरी चुकुन भूताशीच गाठ पडायची.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ड्युटी ..एक आठवडा रात्रीची आणि एक आठवडा दिवसाची असते...

बाकी ..प्रतिसाद वाचुन तर जास्तच करमणुक होतेय..

राम दादा.

बंगलोरला आल्या पासून मी ३-४ वेळा भुतं पाहिली आहेत. माझ्याच घरी.

पहिल्यवेळी २ भुतं आली होती. त्यातं एक जरा धडधाकट होतं नी दुसरं अंमळ रोडावल्या सारखं. भूत असल्याने ते दोघे अर्थातच काही खात नव्हते. नुस्ता टिचर्स चा फडशा पाडत होते. मला वाटलं स्वप्न असेल पण सकाळी खरंच बाटली रिकामी झाली होती म्हणून विश्वास बसला.

दुसर्‍यावेळी पण अशीच २ भुतं माझ्या घरी आली होती. ही सिनीयर भुतं असावीत. त्यातलं एक भूत दुसर्‍या भुताचं लक्ष नाही असं बघून त्याचा ग्लास संपवत होतं. आणि स्वतःचा ग्लास रिकामा झाल्यावर ग्लासात ओतण्याऐवजी कुणाचं लक्ष नाही असं बघून डायरेक्ट घशात ओतत होतं. मला वाटलं स्वप्न असेल पण सकाळी खरंच बाटली रिकामी झाली होती म्हणून विश्वास बसला.

आता ह्या कंपूतलं पाचवं भूत (हे अंमळ खाते पिते घर का आणि व्यायाम करते जीम का आहे) लवकरच परदेशातल्या भूत भगाव मंडळींची यथेच्छ मारून भारतात आपला वचक बसवायला येतंय असं कळलंय. त्याला दाखवायला बाटली आणि डंबेल्स आणून ठेवली आहेत.

आता ह्या कंपूतलं पाचवं भूत (हे अंमळ खाते पिते घर का आणि व्यायाम करते जीम का आहे) लवकरच परदेशातल्या भूत भगाव मंडळींची यथेच्छ मारून भारतात आपला वचक बसवायला येतंय असं कळलंय. त्याला दाखवायला बाटली आणि डंबेल्स आणून ठेवली आहेत.

मी पण भूत पाहिलं ... पहायचं का ? प्रूफ आहे आपल्या कडे
सुचना : खालिल भुत पाहून आपले माणसिक संतुलन जाऊ शकते .... आपल्या जबाबदारीवर पहावे, कळावे
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`
`

अरे बापरे द्च्कायलाच झाल अशि माण्स॑ असतात?


|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

भुते घाबरतील ह्यांना बघुन..

छान कथा.
भूताचा अनुभव मला आला नाही. पण इतरकुणाला असा अनुभव येऊसुद्धा शकतो असे मी मानतो.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

मित्रा,
त्या दिवशी पौर्णीमा होती. त्यामुळे चंद्राचा पुर्ण उजेड पडला होता. परिणामी तुमचीच सावली तुम्हाला दिसत होती
>>विशेष म्हणजे त्यादिवशी पौर्णीमा होती. त्यामुळे चंद्राचा पुर्ण उजेड पडला होता..(दिवसासारखा)..२५ फुटापर्यत चा माणुस स्पष्ट दिसु शकत होता..

मला यावर काहीही बोलायचे नाही...मी आधिच सांगितले आहे..कि विश्वास ठेवायचा कि नाही हे तुम्ही ठरवायचे...तरि पण शेवटचे बोलतो..सावली असती तर...तीन सावल्या कश्या होऊ शकतात्..आमची सावली आमच्या बरोबर होती...आणि ती मग सावली शेवटपर्यंत आमच्या बरोबर का आली नाही...दोघांनाही तिसरी सावली दिसत नसुन स्पष्ट काळा माणुस दिसत होता...त्याचे चालणे सरळ दिसत होते..सावली माझ्या पेक्षा मोठी होती...मग माझी नाही असे समजले तर ..बापुंची असु शकते पण बापुंच्या डोक्यावर गाठोडे होते...ती आक्रुती तर स्पष्ट हात हालवत आमच्याकडे येत होती...

मी तुम्हाला विनंती करतो...पचत असेल तर घ्या नाही तर सरळ सोडुन द्या...तसा मी हा प्रसाद कुणाला कधी सांगत नाही..

आप्ला कंप्लीट विश्वास आहे भुत दिसण्यावर. रामदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है| लै भारी.

नाही घाबरलं तर भुताखेताच्या गोष्टी ऐकण्याची मजाच निघून जाईल ना.
रामदादा आगे बढो ,हम भाग जाते है !

अप्रतिम वाचतानाच भिति वाट्ते प्रत्य्क्शात माझ्च भुत होइल [हार्ट एटेक मुळे]

खुप छान लिहिले आहे.....वाचताना मजा आलि.........

इथे एक एक जबरदस्त प्रतिसाद देणार्‍यांना पाहून घाबरलो.