Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्पा on Sat, 12/18/2010 - 21:48
भाग १ http://www.misalpav.com/node/15817 भाग २ http://www.misalpav.com/node/15840 भ्रष्टाचार करून, किसन आणी त्याच्या कुटुंबाचा जीव घेतलेल्या, शेळ्क्यांवर त्यांचाच डाव उलटलेला असतो.... हळू हळू बदल्याचा अघोरी खेळ त्या बंगल्यात सुरु झालेला असतो.. आता पुढे ...... हातातल्या मांजराच्या 'केसांकडे'पाहून 'शेळक्यांच्या छातीतून तीव्र कळ उमटून जाते, ते तसेच धडपडत, खोकत उठतात आणि फोन कडे धावतात, नंबर फिरवणार तेवढ्यात मांजरी कुरतडलेली वायर त्यांना लोंबकळताना दिसते, ते मागे फिरतात, तो त्यांना एक भयानक मांजर टेबलावर उभं असलेलं दिसतं, ते दात-ओठ खाऊन, बाजूला असलेली पितळ्याची वजनदार फुलदाणी उचलून त्या मांजरावर हाणतात, पण अघटीत होतं, ती फुलदाणी मांजराच्या शरीरातून आरपार जाते, आणि मागे असलेल्या 'मेनस्वीच' आदळते, मेनस्वीचमधून मोठा जाळ बाहेर येतो, आणि लाईट जातात, त्या भयाण पठारावर ती बंगली आधारात गुडूप होते...... शेळक्यांच अवसानच गळत. ते थरथरत.. कडेकडेने बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात, पण काहीच कळत नसतं... तेवढ्यात त्यांना बंगल्यात पाणी साचल्यासारखं वाटत... काही कळायच्या आत मांडीपर्यंत पाणी येत... काय घडतंय याचा अर्थ शेळ्क्यांना लागू लागलेला असतो... त्यांची वाईट कर्म समोर उभी ठाकलेली असतात.. पाण्यातून पुढेपुढे जात असतानाच, अचानक समोर तरंगत काहीतरी येत, पोर्णिमा असल्याने बाहेरचा चंद्रप्रकाश आता बंगल्यात येत असतो , त्या निळ्या प्रकाशात.... शेळ्क्यांना ते भयानक दृश्य दिसतं, गंगीच प्रेत तरंगत असतं, टरटरुन फुगलेलं, पांधरफटक पडलेलं.. हे असलं बघून शेळके बोंब ठोकतात, तेवढ्यात प्रेताचे डोळे उघडतात, डोळे नसतातच, नुसताच हिरवा पापुद्रा... शेळके किंचाळ्या मारत बाजूला होतात, तेवढ्यात पाण्यात दोन मुलीसुद्धा तरंगताना दिसतात.. दोघींची मुंडकी अर्धी चेचलेली.. फक्त एकच डोळा दिसतोय हिरवा गार... झपाट्याने त्या तीन सावल्या शेळ्क्यांकडे सरकायला लागतात.. वाकड्या तिकड्या .. घशातून विचित्रच आवाज काढत.... शेळके जीव घेऊन जिन्याने वरच्या खोलीकडे धावतात, खोलीत शिरून धडकन दरवाजा लावून घेतात... आणि एका कोपर्यात थरथरत बसतात, पोटात प्रचंड गोळा आलेला असतो. त्यांचं हृदय तिप्पट वेगाने धडधडत असतं.. आपण हे काय करून बसलो... त्यांच्या मनात येत.. आता कोण थांबवणार हा जीवघेणा प्रकार...... ते डोके भिंतीला टेकवून डोळे मिटतात.. तेवढ्यात डोक्यावर एक चिकट द्रव पडायला लागतो. ते घाबरून वर बघतात.. आणि काय.. खिडकीत दादासाहेबांच फक्त 'धडच' असतं, त्यांचे ते लांब भयानक हात, शेळक्यांच्या दिशेने येतात.. शेळके रडत पळायला बघतात, आणि काय....... खोलीत दुसऱ्या बाजूने 'दादासाहेबांच्या धडाचा खालचा भाग त्यांच्या जवळ सरकत असतो... ते कसेबसे दरवाजा उघडून गच्चीत येतात.... बाहेर 'भणाण वारा' सुटलेला असतो.. त्यांच्या आरोळ्या कोणालाही आईकू जात नसतात... चिंचेचा वृक्ष त्याच्या भयानक फांद्या पसरून उभा असतो.... तेवढ्यात फरशीवर काही आकृत्या आकार घ्यायला लागतात.... बर्याच रेषा, वर्तुळ, त्रिकोण.. सगळंच विचित्र... अघोरी रांगोळीच असते ती एखादं दिवाळीचं तोरण चमकावं त्याप्रमाणे चमचमणारी ..... तेवढ्यात खाड.. असा आवाज होऊन, फरशी उचकटते.. कट कट आवाज करून.. हळू हळू खालून 'गंगीच' प्रेत वर यायला लागतं.. शेळके ते बघून भयानक आरोळी ठोकतात. रांगोळीत ते प्रेत गरागरा फिरत असतं.. गंगीच्या झिंझ्या वाऱ्यावर उडत असतात.... शेळके आजूबाजूला बघतात , तर दोन्ही बाजूंनी , गंगीच्या मुलींची मुंडकी नसलेली शरीर सरपटत. फरशी खरवडत, त्यांच्या दिशेने सरकत असतात.. हे बघून शेळक्यांच अवसानच गळत, ते जीवाची पर्वा न करता गच्चीवरून खाली उडीच मारतात, पण त्यांच्या सुदैवाने खाली रचून ठेवलेल्या गवताच्या गन्जीवरच ते पडतात. पडल्यावर ते उठून 'गेट' कडे धावायला लागतात.. तर समोर झोपाळ्यावर दोन सडलेली प्रेत जोरजोरात झोके घेत असतात आणी बाजूने एक आकृती त्यांच्याकडे त्याच वेगाने पळत येत असते.. शेळ्क्याना तीव्र झटका येतो , आणि ते खाली कोसळतात ******************************************************************************************************** साहेब साहेब उठा. म्या हनम्या... शेळके डोळे उघडतात, ते परत आतमध्ये आलेले असतात, कंदिलाच्या प्रकाशात त्यांना समोर हणम्या दिसतो.. "हणम्या मला वाचव.. गंगी माझा जीव घेईल.. बघ तिचं आणि दादासाहेबांच प्रेत इथेच फिरतंय" दादासाहेब छाती बडवत ओरडत असतात.. "साहेब हिथ कोणीच नाय . आणि . लाईट चा बोर्ड कोनी तोडला? " हणम्या उत्तर देतो. दादासाहेब घाबरत घाबरत इकडे तिकडे नजर फिरवतात... घर जसच्या तसं असतं व्यवस्थित लावलेलं.. फरशीवर पाण्याचा एक थेंबही नाही.. ना धूर, ना कुठलं प्रेत, अपवाद फक्त तुटलेल्या मेन स्वीच चा.. आपण स्वप्नात होतो कि जागे .. त्यांना काहीच कळेनासं होतं.. "तू कसा काय इकडे आलास?" साहेब म्या घरला गेलो, आणि जेवून झोपणार तेवढ्यात माळावर लय कुत्री रडाया लागली.... मला भ्या वाटली तुम्ही इकडं एकटे.. आणि गावात घडणाऱ्या लय वंगाळ गोष्टी .. त्यात तुम्ही आजारी.. म्हणून एक चक्कर टाकू ,असा विचार करून आलो.. तर लांबूनच तुमच्या ओरडण्याचा आवाज आला.. हिकडं येऊन बघतो तर काय तुम्ही गच्चीवरून उडीच टाकलीत... काय झालाय काय मालक ? शेळके त त प प.. करत त्याला सगळं सांगतात.. हनम्या ते ऐकून गोंधळतो आणि घाबरतो पण.. साहेब म्या जाऊन येतो गच्चीवर..... बघ्तु कोन हाय का तिकडं.. माझी कुर्हाड हाय बरुबर.. कोन मध्ये आलाच तर खान्डोलीच करीन एकेकाच्ची .. शेळके त्याला विरोध करतात, पण सध्या हनम्या हाच एक आधार असतो.. "थांब हनम्या मी सुद्धा येतो, मला एकट्याला नको टाकुस" .. दोघे परत वर जातात ... गच्चीवर गार वर सुटलेलं असतं... मगासच्या घटनेचा लवलेश सुद्धा नसतो. न कुठली आकृती, न, तुटलेली फरशी.. "साहेब हिते तर कायच नाय.. हनम्या पुटपुटत. गच्चीच्या टोकापर्यंत जातो.. शेळके सुद्धा मधोमध उभे राहून विचारात पडतात. तेवढ्यात घोगरा आवाज येतो... " तुम्ही लय वंगाळ काम केला हाय.. तुम्हाला हितच समदा हिशेब चुकवावा लागणार, आधी दादासाहेब, आनी आता तू" शेळके 'हन्म्याच्या' पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून किंचाळतात , कोन आहेस तू........ ती आकृती उत्तर देते "साय्बानु मीच त्यो" तो हनम्या नसतोच.. तो असतो. 'किसान गणपत शेलार' ... शेळके खाली कोसळतात.... आता खाली परत ती रांगोळी उमटलेली असते.... परत ते भेसूर रडणं सुरु झालेलं असतं आणी आजूबाजूने 'किसन' , गंगी, तिच्या दोन मुली आनी दादासाहेब शेळ्क्यांकडे सरकत असतात ... माथ्यावरचा चंद्रमा तसाच चमकत असतो.....आणी चिंचेच्या झाडाच्या फांदीवर.. चार काळी मांजरं जिभल्या चाटत असतात
  • Log in or register to post comments
  • 12132 views

Book traversal links for सायबानू मीच त्यो .... अंतिम

  • ‹ सायबानू मीच त्यो .... भाग २
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by यकु on Sat, 12/18/2010 - 22:25

Permalink

काय भयानक लिवलयस रे स्पा...

काय भयानक लिवलयस रे स्पा...J) J-) :crazy: J) J-) :crazy: J) J-) :crazy: च्यायला एवढ्या थंडीत माझ्या रूममध्ये एकटाच झोपणार आहे.. झोप नाही येणार आज रात्री ह्या: ह्या: ह्या: :D :-D :lol: :D :-D :lol: :D :-D :lol:
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sat, 12/18/2010 - 22:36

Permalink

मस्त लिहिलंय .व कथेचा शेवट

मस्त लिहिलंय .व कथेचा शेवट चांगला .आहे . जसे पेरावे तसे उगवते .(हि म्हण आपल्या राजकीय नेत्यांना लागू पडत नाही ) बाकी कथेची मांडणी लक्षात घेता भविष्यात अजून सकस भय कथा येऊ दे .
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on Sat, 12/18/2010 - 22:59

Permalink

सहिच!

सहिच!
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Sat, 12/18/2010 - 23:12

Permalink

वा रे बोक्या! आहटचे एपिसोड्स

वा रे बोक्या! आहटचे एपिसोड्स आता तू लिहायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 12/20/2010 - 09:53

In reply to वा रे बोक्या! आहटचे एपिसोड्स by नगरीनिरंजन

Permalink

वा रे बोक्या!

+१ आह्ट पाहिल्यासारखेच वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 12/18/2010 - 23:17

Permalink

शेवट काहीसा अपेक्षित होता. पण

शेवट काहीसा अपेक्षित होता. पण लिहिण्याची पद्धत खूप आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 12/19/2010 - 00:00

Permalink

शेवट अपेक्षित होता पण गोष्ट

शेवट अपेक्षित होता पण गोष्ट रंगलीये. बरं झालं मी दुपारी वाचली.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sun, 12/19/2010 - 01:18

Permalink

झकास... बरेच दीवसानी ठाव घेनारे लेखन दिसले

शेवट काहीसा अपेक्षित होता, पण हनम्याच किसन दीसतो हे नाय गेस करता आले.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Sun, 12/19/2010 - 08:26

Permalink

चान चान

चान चान
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Sun, 12/19/2010 - 08:40

Permalink

नारायण धारप, द.पां. खांबेटे,

नारायण धारप, द.पां. खांबेटे, रत्नाकर मतकरी यांची आठवण झाली. झकासच.. पाठीवर थंड घामाचा ओघळ गेला.
  • Log in or register to post comments

Submitted by शहराजाद on Sun, 12/19/2010 - 08:45

In reply to नारायण धारप, द.पां. खांबेटे, by गवि

Permalink

असेच म्हणते

छान. नारायण धारप, रत्नाकर मतकरी आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Sun, 12/19/2010 - 14:19

Permalink

जबरदस्त कथा.. स्पा हे एखाद्या

जबरदस्त कथा.. स्पा हे एखाद्या कसलेल्या लेखकासारखं लिहिण्यात यशस्वी झाले आहेत! विरामचिन्हांचा सुकाळ हा एकमेव फ्लॉ वगळता कथा अतिशय उत्तम!
  • Log in or register to post comments

Submitted by चांगभलं on Mon, 12/20/2010 - 09:05

In reply to जबरदस्त कथा.. स्पा हे एखाद्या by इंटरनेटस्नेही

Permalink

+१

अनुमोदन......... अतिशय प्रभावशाली गोष्ट... स्पा.. तुझ्या लिखाणात अजून भरपूर चुका आहेत, पण 'जे निखळ मनोरंजन व्हायला हवं होतं' ते झालंय. थोडक्यात काय, भरपूर मसाला, आणि पैसावसूल गोष्ट नारायण धारपांची आठवण झाली... किसन हन्म्याच रूप घेऊन आलेला असतो... हा एकदम सोलिड ट्विस्ट. पुढील लिखाणास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Sun, 12/19/2010 - 17:51

Permalink

मस्त भयकथा. सलग वाचल्याने

मस्त भयकथा. सलग वाचल्याने अजुनच मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Mon, 12/20/2010 - 13:23

Permalink

छान गोष्ट !!! असेच लिहित

छान गोष्ट !!! असेच लिहित राहा.
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Mon, 12/20/2010 - 13:31

Permalink

निवांतपणा...!

तिसरा भाग (अकारण) दिवसाढवळ्या वाचल्याची चूक केली असे आत्ता वाटू लागले आहे. काही कथा (तसेच अशा तर्‍हेच्या वातावरणावर आधारित चित्रपटही) रात्रीच्या निवांत क्षणीच वाचण्यासाठी असतात त्यापैकी श्री.स्पा यांची 'सायबानू....' कथा आहे हे निश्चित. तिन्ही भाग एकत्रित पुन्हा एकदा वाचणार आहेच. वर कित्येक सदस्यांनी म्हटल्याप्रमाणे श्री.धारप, मतकरी यांच्या मुशीतील कथा वाटत्येय. श्री.स्पा यांची कथा फुलविण्याची हातोटी स्पृहणीय आहे. कथेचा शेवट पहिल्याच भागात अधोरेखीत झाला होताच, पण शेलार आत्मा 'हनम्या' च्या रूपात येतील हा अंदाज आला नव्हता. असो. एक पकड घेणारी कथा दिल्याबद्दल श्री.स्पा यांचे अभिनंदन तसेच पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा ! इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 12/20/2010 - 13:39

Permalink

मस्त कथा ! लिहित रहा !!

मस्त कथा ! लिहित रहा !!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 12/20/2010 - 13:41

Permalink

मस्त रे भावड्या. कथा एकदम

मस्त रे भावड्या. कथा एकदम वेगवान आहे आणि तीन भागात लिहिली असुनही कुठेही लिंक तुटली नाही. मस्त एकदम.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 12/20/2010 - 23:26

In reply to मस्त रे भावड्या. कथा एकदम by परिकथेतील राजकुमार

Permalink

मस्त रे भावड्या. भावड्या

मस्त रे भावड्या. भावड्या नव्हे 'स्पावड्या'!;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 12/20/2010 - 23:49

In reply to मस्त रे भावड्या. भावड्या by रेवती

Permalink

भावड्या हा शब्द माझ्याकडुन

भावड्या हा शब्द माझ्याकडुन नेहमी चुकीचा वाचला जातो न अनर्थ होतो =))
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 12/20/2010 - 23:57

In reply to भावड्या हा शब्द माझ्याकडुन by टारझन

Permalink

अनर्थ होतो आपल्याकडून

अनर्थ होतो आपल्याकडून कोणत्या शब्दाचा अनर्थ होत नाही ते सांगा हो महाराज.;) आपण शब्दांना, सह्यांना, लेखांना, काव्याला.....कोणालाही सोडत नाही.;)
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Mon, 12/20/2010 - 13:45

Permalink

मस्त

मस्त कथा! तीनही भाग छान जमलेत!
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 12/20/2010 - 15:22

Permalink

छान लिहिलंय...पण रात्री

छान लिहिलंय...पण रात्री वाचताना जम टरकली...आधी खफ वर उपाशी बोक्याने दिलेली लिंक आणि आता हे...:( :Sp :-S) :sick:
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Mon, 12/20/2010 - 23:20

Permalink

म्यांव...

आयला, मी हे वाचत असतांनाच बाहेर एक मांजर रडल्यासारखी म्यांवली, नी फाटली ना भौ... मस्त जमीश, स्पाशेठ... फाडू आहे येकदम.
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Tue, 12/21/2010 - 00:08

Permalink

मस्त कथा, तिन्ही भाग एकत्र

मस्त कथा, तिन्ही भाग एकत्र वाचले. अगदी आहट / झी हॉरर शो बघितल्या सारखं वाटलं. आज सकाळी मी ऑफिसला जाताना रस्त्यावर एक काळी मांजर माझ्याकडे बघून म्याँव म्हणाली ... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Tue, 12/21/2010 - 18:42

In reply to मस्त कथा, तिन्ही भाग एकत्र by पुष्करिणी

Permalink

+ १

>> अगदी आहट / झी हॉरर शो बघितल्या सारखं वाटलं अगदी अगदी. झकास रे स्पावड्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 03/04/2011 - 13:49

Permalink

सुरेख लिहिलेय रे

एकदम छान लिहिलियेस कथा. आज तिन्ही भाग सलग वाचून काढले. एकदम जबरा.....
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Fri, 03/04/2011 - 14:17

Permalink

अतिशय उत्तम कथा.. आवडली, हे

अतिशय उत्तम कथा.. आवडली, हे पुन्हा एकदा नमुद करतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on Fri, 08/07/2015 - 17:24

Permalink

मस्त . नारायण धारपांची शैली

मस्त . नारायण धारपांची शैली वाटली . रत्नाकर मतकरींच्या कथेत असं काही नसतं . त्या भयकथांपेक्षा गुढकथा जास्त असतात .
  • Log in or register to post comments

Submitted by Rahul D on Fri, 04/29/2016 - 00:23

Permalink

जबराट

जबराट
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com