(तुम्ही कोण म्हणून काय पुसता ? हिम्मत असेल तर वळा मागे?)

स्पा's picture
स्पा in काथ्याकूट
31 Jul 2014 - 2:19 pm
गाभा: 

"भुते आहेत की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही.

हे जग " भूत आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "भूत नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे...

जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत.
नारायण धारप, रत्नाकर मतकरी, संत रामसे ह्यांनी अनेक ग्रंथातून ,चित्रपटातून भूतांचे अस्तित्व रेखाटले आहे, पण अर्थात हे सगळे काल्पनिकच असे नास्तिक म्हणतात.
पण एकाकी टेकडावर, कुठल्या पडीक किल्ल्यावर, कोकणातल्या जुनाट घरात किंवा कोणाच्या घरात अनेक मित्र जमलेले असताना अशा गप्पा रंगल्या कि अट्टल नास्तिक पण वाद ण घालता त्या एन्जोय करतो

मीही एखा दोन कथा लिहिल्या पण काल्पनिकच अनुभव शून्य !!
त्यामुळे नास्तिक ह्याच क्याटेगरीत मोडणारा, पण काही दिवसांपूर्वी एक अनुभव असा आला कि मला ह्यावर विचार करणे भाग पडले
तर झाले असे

प्रोजेक्ट चा वर्कलोड असल्याने जवळपास महिनाभर रात्री मी करी रोड वरून शेवटची ट्रेन पकडतो.
करी रोड स्टेशन वरून बाहेर यायचे असेल तर पूल चढून फ्लाय ओवर वरून चालावे लागते. सध्या मोनो रेल चे काम चालू असल्याने तो फ्लाय ओवर वाहनांसाठी बंद केलेला आहे
रात्री तर तिथे कोणीच नसतं, तर असाच wats app वर चॅट करत मी फ्लाय ओवर वरून स्टेशन कडे जायला निघालो, आजूबाजूला लक्ष नव्हतच. अचानक समोर एक नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती आणि तिने मला विचारलं ल्येकरा ...टाईम काय झाला ?
मी बावचळून घड्याळात पाहिलं आणि सांगितलं तशी मान हलवत ती बाजूने निघून गेली, दोन पावले पुढे गेल्यावर मी सहजच मागे पहिले तर अक्खा फ्लाय ओवर रिकामा होता, कोणीच नव्हतं. एक दोन सेकंदात हि घटना घडली. इतकी फास्ट कि मला नक्की अशा कोणा बाईने वेळ विचारलेली का कि भास झाला वाटावी इतपत. खाली आलो बाकड्यावर बसलो .. एकदम डोकं हललेल .. दिवसभराची झोप उडलेली :)

तर नंतरही मी तीच ट्रेन अनेकवेळा पकडली , पण ती बाई काही मला दिसली नाही. ह्या अनुभवला कुठल्या क्याटेगरीत टाकायचे ते समजलेले नाही
तुम्हालाही असे आस्तिक नास्तिक च्या लेवल पेक्षा वेगळे अमानवीय अनुभव आले असतीलच
वाचायला आवडेल

प्रतिक्रिया

वर्णपट भूताने गायब केले काय?

तुमच्या या अनुभवावरुन माझी खात्री पटली आहे की जगात भूते आहेत.

स्पावड्या म्हणतोय तर भुते असणारच.

स्पावड्या इथे तर जमतील भुते.

स्पावड्या इथे तर जमतील भुते.

त्या म्हातारीचं जाऊदया. स्पावडयालाच कुणी एकटयाने रात्रीच्या निरव शांततेत पाहीला तर तो भूत भूत म्हणत ओरडत सुटेल. ;)

स्पा's picture

31 Jul 2014 - 2:34 pm | स्पा

:D

निरवच कशाला, सरव शांतता असली तरीही हेच म्हणू हाकानाका ;)

पायजे तर फॉर अ चेञ्ज वर्तमानही म्हणू ;)

मुक्त विहारि's picture

31 Jul 2014 - 2:33 pm | मुक्त विहारि

?

मुविकाका, इतक्या प्रामाणिक अनुभव कथनांवर आपल्यासारख्या जेष्ठ सदस्याने प्रश्नचिन्ह उभे करावे ही खचितच चांगली गोष्ट नाही.

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 2:38 pm | बॅटमॅन

नैतर काय! एक मिपाकर म्हणून शरम इ.इ. वाटल्या गेली आहे.

स्पा's picture

31 Jul 2014 - 2:41 pm | स्पा

अगदी अगदी , नास्तिक कुठचे :D

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 2:45 pm | बॅटमॅन

नास्तिक कुठचे? अर्थात मध्यवर्ती ठिकाणाकडचे. :D

(च्यायला स्मायल्या लौकर सुरू करा राव.)

मी लहानपणी जे काही भूतांबद्दल ऐकले आहे त्यावरुन भूते नास्तिकांना सुद्धा झपाटत असावेत असे मला वाटते.

शहरातून आमच्या गावाला जाणारा रस्ता एका वापरात नसलेल्या एका विहीरीच्या बाजूने जातो. या रस्त्यावर विहिरीला चिकटून एक ओढा जातो. पावसाळ्यात जरा पाऊस जास्त झाला की आमच्या काळ नदीला पूर येतो आणि मग हा रस्ता बंद होतो. एकदा पूरात एक प्रेत वाहत आले आणि ते विहिरीला अडकून तिथेच राहीले.

गावकरी म्हणतात की त्या विहीरीत आधी जीव दिलेल्या दोन बायांनीच त्या व्यक्तीचा जीव घेतला.

खरं खोटं माहिती नाही. मात्र अंधार पडल्यानंतर मी अगदी मोटारसायकलवर असलो तरीही राम राम राम राम म्हणत मोटारसायकल जोरात पळवतो. मोटारसायकल आता इथे बंद पडली तर काय करायचे या भीतीने ती दोन तीन मिनिटे जीव घाबरा होतो.

एरव्ही सगळीकडे "देव नाही" असं बेंबीच्या देठापासून बोंबलत फीरणारा मी त्या विहीरीच्या बाजूने जाताना मात्र राम नामाचा जप करतो. राम असेल नसेल, "रामाचे नांव घेतले की भूते दूर पळतात" ही लहानपणाची शिकवण खुप आधार देते तेव्हा.

अजूनही दिवा आणि ठाणे यामधला पारसिक चा बोगदा हा झपाटलेला म्हणून ओळखला जातो
बोगद्यात गाडी शिरली कि दरवाजात उभी असलेली लोक "जय भवानी जय अंबे " असं भोगदा संपेपर्यंत बेंबीच्या देठापासून कोकलत असतात

प्रचेतस's picture

31 Jul 2014 - 3:04 pm | प्रचेतस

'मंदा पाटणकरचे हात' आठौली.

भिंगरी's picture

2 Aug 2014 - 12:23 am | भिंगरी

खरोखरचं मंदा पाटणकर प्रकरणाने घाबरवलेच होते.
आता त्याहून भयंकर प्रकार होतात पण मन कोडगे झाल्याने त्याचे काहीच वाटत नाही.

सतीश कुडतरकर's picture

9 Jun 2015 - 5:48 pm | सतीश कुडतरकर

अजूनही दिवा आणि ठाणे यामधला पारसिक चा बोगदा हा झपाटलेला म्हणून ओळखला जातो
बोगद्यात गाडी शिरली कि दरवाजात उभी असलेली लोक "जय भवानी जय अंबे " असं भोगदा संपेपर्यंत बेंबीच्या देठापासून कोकलत असतात>>>>>>>

त्यासाठी नाही. वर मुब्रादेवीच देऊळ आहे म्हणून ओरडत असतात.

प्रश्नचिन्ह उभं करायचा अधिकार काय तुम्हाला?? कधी अनुभव घेतलाय का अमावस्येच्या रात्री करी रोडच्या रस्त्यावर??
उगाच घेतला कळंफलक लागले बडवायला!!

सूड's picture

31 Jul 2014 - 2:42 pm | सूड

अरे देवा !!

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 2:45 pm | प्यारे१

अरे भुता!

कंपूबाजांनी कंपूबाजांकरीता काढलेला धागा. ;)

(पळा...नाहीतर भुतं मागे लागतील)

नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती
काय पण स्साला नशीब आहे.. अंधेरी रातोमें, सुनसान सडकोपर आणी म्हातारी बाई?
चिकनी हडळ असती तर मजा केली असती की. :))

>>चिकनी हडळ असती तर मजा केली असती की. :))

चिकनी हडळ? लॉल्स !!

केदार-मिसळपाव's picture

31 Jul 2014 - 3:04 pm | केदार-मिसळपाव

नेहमी भुतिण म्हणुन एखादी नउवार नेसलेलीच बाई का दिसते? आय मीन एखादी मिनी स्कर्ट घातलेली, शॉर्ट घातलेली अथवा बिकिनीवाली नवयौवना का दिसत नाही? तेच भुतबाबा बाबद. नेहमीच पांढरी आकृती, अरे बर्मुडा वाला किंवा स्युट वाला भुत का दिसत नाही कोणाला?
पाहायला पाहिजे.

यसवायजी's picture

31 Jul 2014 - 3:58 pm | यसवायजी

पुणे-मुंबैपण 'सेफ' राहिलं नाही आजकाल. असले स्कर्ट वगैरे घालून हडळी फिरायला लागल्या तर, इथल्या 'पाशवी शक्ती' जीव नकोसा करुन सोडतील की त्यांचा.
त्या घाबरतात ह्या भुत्यांना.

यावरुन आमच्या आवडत्या गायक बंधूंचे एक गाणे आठवले:

सांगवी गावात, बामन ढवात, बयाला धरलंय भूतानी
बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी

नदीकाठाची गरम वाळू, भूत खुशाल लागलं खेळू
किंचाळी फोडली, तिथंच पडली, खबर दिलिया शीतानी

बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी

पांडया वाचलास रे बाबा. त्या म्हातारीने तुला करीरोडच्या पुलावर उताणी पाडलं असतं तर रे.

म्हातारी भुताने वेळेवरतीच निभावले म्हणतो मी .तरण्या भुताने शेवटची ट्रेन विचारली असती तर काय झाले असते अशी 'कल्पना' सुध्दा करवत नाही .आणि स्टेशनच्या पाट्यांवर छोकरी रोड कसे काय येते ?रात्री असे प्रसंग कुण्या एकट्या तरुणावर येवू नयेत अशी 'आशा' करूया सर्व आस्तिक आणि नास्तिकजनहो .स्पावर तरी नकोच नको .बिचाऱ्याचे चित्त विचलित व्हायचे (टैबमधून हो)एखाद्या रात्री .
तसं आम्ही आख्खं रेल्वेटाईमटेबल सांगायच्या तयारीत आहोत कुणी तरूण भूतीणीने रात्री माटुंग्याच्या झेड ब्रिजवर गाठून विचारलं तर .आणि नंतर मागेवळूनही सांगू उद्या वेस्टन झोनचं शिकवेन .

रायगडावर रात्री १२ च्या पुढे फिरताना आमचे एक मित्र ' ए मला मध्ये येऊ द्या रे, बाजूने जाताना भीती वाटते' असे भेदरलेल्या चेहर्‍याने आम्हास म्हणत होते.

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 3:59 pm | कवितानागेश

अशा वेळेसच नविन मित्र भेटतात. कम्पू वाढतो. :)
पण, १२च्या आधीदेखिल असे मित्र जवळपास येउ शकतात. फक्त आपल्या या अश्या १२वाजलेल्या अन्धश्रद्धांमुळे आपण त्यांना ओळखत नाही.

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 4:08 pm | प्यारे१

लोक काय काय लक्षात ठेवतात ब्वा! =))
(खरी वाटली ना अ‍ॅक्टींग? ;) )

बाकी हल्ली त्या राणीवशातून येऊ शकणार्‍या भुतांपेक्षा 'ह्या' माणसांचीच भीती जास्त वाटायला लागलीय.

येकदा बघा असं झालं, रातीचं दिड वाजलं व्हतं. धोंडूबाबांचं किरतान व्हतं लांब मित्राच्या वस्तीवर ते आयकून आमच्या वस्तीवर परत येत हुतो सायकल दामटत दामटत, अशी मस्त हवा सुटल्याली व्हती, लय रोमन्टेक वाटत व्हतं. म्या बी तोंडानं एक झ्याक गाणं गुणगुणत चाललो व्हतो. थोडा रस्ता कापल्यावर पुढं आलो, तर काय बघतो. एक तरणी पोरगी सायकलच्या दिशेनं बघून हात करत होती, थांबण्यासाठी. आजपत्तूर कुठल्या पोरीनं माझ्याकडं ढुकुन्बी बघितलं नव्हतं आन हि चक्क मला लिफ्ट मागत व्हती! म्या लय म्हणजे लय खुश झालो. तिच्यापर्यंत लवकर पोचण्यासाठी सायकलचा वेग वाढवला. पन बाबौ, जसजसा तिच्याजवळ जायला लागलो तसतशी हवा लईच गार वाटाया लागली आन तिचं रूप बी येगळचं दिसाया लागलं. तिचं तोंड पांढरं फटक दिसत व्हतं, आन हे लांब सुळ्यागत दात भायेर आलेलं. डोळ्यातून हिरवा लाईट येत होता. तेवढ्यात तिच्या पायाकडं लक्ष गेलं तर त्ये बी उलटे ना वो! म्या मनात म्हटलं ह्ये काय साधं परकरण नाय गडया, चला सटका इथनं पटकन. माझी तंतरली व्हती, पन कसचं काय ,सायकल आता लय जड झाली व्हती, पायडल मारायला लई तरास होत व्हता.
तिच्यासाठी मी सायकल थांबवत नाय बघून ती लय चिडली आन मला पकडायला सायकलबरुबर पळू लागली.
ती लैच भेसूर हासत व्हती. मग मला काय बुद्धी झाली आन मी मनातल्या मनात धोंडूबाबाचा धावा चालू केला, मग ती तशीच हवेत गायब झाली हाळूहाळू. तसाच घरला आलो,त्दोन दिवस तापानं फनफनलो व्हतो. आई म्हनत व्हती बाळा आता तरी शाना हो, पोरी बाळीच्या मागं नगं जात जाऊ.

भुताच्या गोष्टी सांगायचा तास सुरू झाला काय ?हैत दोन चार . माझी बी येक हाय .
बेवडे आणि वेडे यांना भुतं तरास देत न्हाईत .

साहेब तुमच्याकडे तर पोतडीत भरभरून किस्से असतील, येउंद्यात

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 4:03 pm | कवितानागेश

भूताला असा मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा जड अस्वल बनवता येईल का की जो भूताला स्वतःलाही घाबरवेल?

भूत कशालाबी घाबरत नाय, त्ये फक्त देवगनाच्या मानसाला घाबरतं.

धन्या's picture

31 Jul 2014 - 4:36 pm | धन्या

म्हणजे अजय देवगणच्या कुटुंबाच्या वाटेला भूते जात नाहीत का?

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 4:56 pm | प्यारे१

राजूचाचा बघायला हवा. :)

शिद's picture

1 Aug 2014 - 3:04 pm | शिद

देवगणांच्या अजयला येथे भुत प्रत्यक्ष दिसलं होतं.

ओ, देवगणाच्या माणसाला दिसत नाय.
राक्षस गणाच्या माणसाला दिसलं तरी भ्या दाखवत नाय आणि माणूस गणाच्या माणसाला भ्या दाखवतं!!!

अधिराज's picture

1 Aug 2014 - 2:59 pm | अधिराज

तसं नै ओ तै, देवगनाच्या मानसाला घाबरतं, म्हनून एखाद्या मनुश गनाच्या मानसाच्या बरुबर देवगनाचा मानूस असल तर त्यालाबी काही धोका नस्तो, भूतापासून.

पण मनुष्यगणाच्या माणसाला भूत दिसतं म्हणतात, त्याचं काय?

अधिराज's picture

1 Aug 2014 - 4:14 pm | अधिराज

आवो मनुश गनाला दिसतंच कि, दिसतय आन तरास बी देतय. पन जर त्याच्या बरुबर देवगनवाल्याची शिकुरिटी आसल तर त्याला भूत दिसू शकल, ,पन तरास नाय देवू शकनार.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 4:05 pm | अत्रुप्त आत्मा

कोण म्हणतं आंम्ही नाही म्हणून.......?????????????? ;) थांबा दावितोच चिमित्कार आता!http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif
http://www.sherv.net/cm/emoticons/halloween/halloween-rip.gif

स्पा's picture

31 Jul 2014 - 4:06 pm | स्पा

धौती आत्मा

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 4:16 pm | अत्रुप्त आत्मा

गवती पांडू! LLLLLLLLLLLLLLuuuuuuuuu http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-a-raspberry-smiley-emoticon.gif

संत्रस्त आत्मा !! ळॉळ्स

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 4:35 pm | अत्रुप्त आत्मा

सुडुक खात्मा... ! http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/axe-murderer.gif

बोल्स्....... http://www.sherv.net/cm/emoticons/playful/angry-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 4:13 pm | कवितानागेश

स्पाकाकांना पण TRP ची भुल पडली तर.
येउ द्या!

प्रचेतस's picture

31 Jul 2014 - 4:42 pm | प्रचेतस

त्यांना ट्यार्पी नाय तर वाहव्वा लागते (चार लोकांची).

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 4:44 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

सूड's picture

31 Jul 2014 - 4:46 pm | सूड

वाचतांय हां मी !!

स्पा's picture

31 Jul 2014 - 4:50 pm | स्पा

खिक्क

पैसा's picture

31 Jul 2014 - 4:55 pm | पैसा

हा लेख पण टॅबवर टाईप केलास का? असो. ज्यांना भुते घाबरतात अशा लोकांची क्याटेगरी कोणती?

दंगा करायला नवा धागा? मी पण, मी पण!

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 5:14 pm | अत्रुप्त आत्मा

*clapping* आल्या रे आल्या स्मायल्या आल्या! *dirol*

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा

केला की नै चिमित्कार! ;) स्मायल्या मेल्यावत्या..मी त्यांना आत्म-लोकातून उद्धरिले! =))

यशोधरा's picture

31 Jul 2014 - 5:17 pm | यशोधरा

भूते उद्धरु शकतात का? *unknw*

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 5:21 pm | कवितानागेश

ते 'होली घोस्ट' असतील. ;)

नायतर आत्ता कलियुगात उद्धार करायचं काम आउटसोर्स झालं असावं!

काय तरी मेलं, आयजीच्या जीवावर बायजी उदार नि सासूच्या जीवावर जावई सुभेदार !! *boredom*

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 5:25 pm | अत्रुप्त आत्मा

कळ्ळं!!! :-/
lllllllllllllllllluuuuuuullllllllllllllllllluuuuuuulllllllllllllllluuuuuuullllllllllllllllllluuuuuuu
https://lh5.googleusercontent.com/-tvsAlxbbNeQ/T5l8pj8YKPI/AAAAAAAABOc/-GfzcaEs-XQ/w419-h314-no/baali%2Bkshetrapaal%2B%3B-%29%29%29.jpg

इथे स्मायलीवाल्यांना रजा .दोन हाडके आडवी वरती ४४०वोल्ट खोपडीवाले पुढे या .

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 7:26 pm | बॅटमॅन

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2014 - 9:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे सूक्ष्मरूपातले भूत आहे काय ?

बॅटमॅन's picture

1 Aug 2014 - 12:32 pm | बॅटमॅन

हम्म...शक्यता नाकारता येत नाही ;)

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा

@दोन हाडके आडवी वरती ४४०वोल्ट खोपडीवाले पुढे या.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-134.gif हे घ्या! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-134.gif

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2014 - 7:39 pm | प्रसाद गोडबोले

ह्म्म. आजकाल मला दांभिकतेच्या भुताने झपाटले :ड

अवांतर : ह्यावरुन आठवले

जेव्हा रानदास स्वामी तब्बल ३६-४० वर्षांच्या साधने नंतर त्यांच्या वृध्द आईला भेटायला आहे , तेव्हा त्यांचे बलदंद शरीरयष्टी तेजस्वी रुपडे पाहुन त्यांची आई अत्यंत आनंदित झाली व त्यांनी विचारले "नारायणा , तुला काही भूत वगैरे वश झाले की काय ?" त्यावर रामदासस्वामींनी उत्तर दिले "हो , मला एक मोठ्ठेच भूतच वश झाले आहे " आणि खालील अभंग रचला


होते वैंकुंठीचे कोनी । शिरले अयोध्याभुवनी ।
लागे कौसल्येचे स्तनी । तेचि भूत गे माये ॥
जाता कौशिक राऊळी । अवलोकिली तये काळी ।
ताटिका ते छळूनि मेली । तेचि भूत गे माये ॥
मार्गी जाता वनांतरी । पाय पडला दगडावरी ।
पाषाणाची जाली नारी । तेचि भूत गे माये ॥
जनकाचे अगंणी गेले । शिवाचे धनु भंगिले ।
वैदेही अंगे संचारले । तेचि भूत गे माये ॥
जेणे सहस्त्रार्जुन वधिला । तोहि तत्काळचि भ्याला ।
धनु देऊनि देह रक्षिला । तेचि भूत गे माये ॥
पितयाचे भाकेशी । कैकयीचे वचनासी ।
मानुनी गेले अरण्यासी । तेचि भूत गे माये ॥
चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी ।
सांगाते भुजंग पोसी । तेचि भूत गे माये ॥
सुग्रीवाचे पालन । वालीचे निर्दालन ।
तारी पाण्यावरी पाषाण । तेचि भूत गे माये ॥
रक्षी भक्त बिभीषण । मारी रावण कुंभकर्ण ।
तोडी अमरांचे बंधन । तेचि भूत गे माये ॥
सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय ।
रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥

अहाहा *i-m_so_happy*

यशोधरा's picture

31 Jul 2014 - 7:48 pm | यशोधरा

हे भूत मात्र खरेच गोड आहे! :)

यसवायजी's picture

31 Jul 2014 - 8:10 pm | यसवायजी

अहाहा *ok*

स्पा's picture

31 Jul 2014 - 10:30 pm | स्पा

गोप्रो

सुधीर's picture

1 Aug 2014 - 10:07 am | सुधीर

हे भूत आवडलं!

आता मात्र भुते इथून पळ काढणार दुसऱ्या धाग्यावर .मला वाटलं ४४० वेळा घुंगरुं वाजवणार खविस (भुताचा एक प्रकार .अंगावर मोठे केस असतात ,हातातली घुंगरूवाली काठी आपटत जातो ,जाण्यायेण्याच्या वाटेत झोपल्यास उठवतो .बाकी त्रास देत नाही ).

भूताचे एकुण प्रकार किती व कोनते? भूताच्या प्रत्येक प्रकाराबद्दल थोडक्यात माहिती दया.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 8:58 pm | अत्रुप्त आत्मा

@भूताच्या प्रत्येक प्रकाराबद्दल थोडक्यात माहिती दया.>>> टनाटन परभात च्या साइटवर जा.. ना! =))

किती मार्कांचा प्रश्न आहे सांगा, त्यानुसार प्रतिसाद लिहिता येईल. *biggrin*

काहीका असेना पण एकदा जस्ट फॉर द सेक ऑफ डॉक्युमेन्टेशन , ही लिस्ट काढलीच पाहिजे !

आपल्या पुर्वजांची कल्पना शक्ती किती भन्नाट होती ते पाहु !!

बाकी माझी आवडती २ भुते - वेताळ आणि चेटुक ह्यापैकी वेताळ म्हणजे झाँबी सेम टु सेम लूक्स , आणि चेटुक म्हणजे हॅरीपॉटर मधील डॉबी सेम !

बाकी मी लोकांना सांगुन थकलो की हे दोघे मला वश आहेत पण लोक विष्वासच ठेवायला यतार नाहीत , आता अशा सगळ्या अविश्वासु माणसांवरच एकेक करुन सोदावे म्हणतो ह्यांना ! *biggrin*

१)कोणाची काही इच्छा बाकी राहिल्यावर ती पुरी करण्यासाठी प्रासंगिक करार भुते होतात .मृत्यूच्या जागी कधीकधी इतरांना दिसतात असे म्हणतात .पण त्यांच्या असण्यामुळे युअरोपात काही वाडे (कासल) आणि राजस्थानातले एक गाव ओस पडले आहे .दिसण्यापलीकडे त्रास नसतो .
इतर प्रकार :
२)मुंजा .
३)ब्रह्मराक्षस .
४)खवीस .
५)हडळ
६)डाकिण .
७)जखिण .
८)पिराचे भूत
९)वेताळ .
हे सर्व ऐकिव प्रकार आहेत आणि असणे आणि मानणे यात नेहमीच शंका निघतात .परंतू वास्तुशास्त्राच्या झटक्याने घरे विकली जात नाहीत तसेच या भुतांच्या झटक्याचे आहे .जनप्रवादापुढे हार मानावी लागते हे मात्र खरे आहे .

धनु लग्न ,धनु राशींच्या लोकांस कधीकधी भूत दिसू शकते पण यांना त्रास देत नाही असे म्हणतात . संतमंडळी .
पिराच्या जागा रानात कुठे असल्यास आजुबाजूस करंगळी वर करायला जाऊ नये .
भूत दिसणे ही देव दिसण्याची अगोदरची पायरी आहे असाही आध्यात्मिक समज आहे .असो .
उगाचच बाऊ नको .हलकेच घ्या .:-)

पिराची जागा असलेले रान कसे ओळखावे?
मी लहानपणी ज्या रानात गुरे वळायचो, त्या रानात बहूतेक पिराची जागा नसावी. नाही तर वर केलेली करंगळीच काय उरलेली बोटेही देव आणि धर्म यावर वाद घालायला उरली नसती.

स्वप्नांची राणी's picture

31 Jul 2014 - 10:19 pm | स्वप्नांची राणी

पिरा चे भूत....हाहाहा

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 10:23 pm | प्यारे१

आयला, भूत'पण'??????????

संमंध नावाचे पण भूत असते असे ऐकले आहे ? (कोकणात)

बाळ सप्रे's picture

1 Aug 2014 - 1:55 pm | बाळ सप्रे

भूतांचे आणखी काही प्रकार (विशेषतः सिंधुदुर्गातले)

  • देवचार
  • चकवा
  • राष्ट्रोळी
  • आग्यावेताळ (वेताळाचा उपप्रकार)
अत्रुप्त आत्मा's picture

1 Aug 2014 - 6:02 pm | अत्रुप्त आत्मा

@आग्यावेताळ >>> *lol*

बॅटमॅन's picture

1 Aug 2014 - 6:52 pm | बॅटमॅन

दु दु राहिलं काय ;)

आज नागपंचमी आहे, दुदु नागोबा पिऊन गेला असेल आणि अगोबासाठी शिल्लक राह्यलं नसेल. *lol*

पैसा's picture

1 Aug 2014 - 10:32 pm | पैसा

वेताळ आणि अग्यावेताळ असे दोन आयडी आहेत. येऊन तुमच्या मानगुटीवर बसतील हां!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2014 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा

@दुदु नागोबा पिऊन गेला असेल आणि अगोबासाठी शिल्लक राह्यलं नसेल.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> =)) यमकात मारले..की मारण्यात यमक आले!? *blum3*

>>भूत दिसणे ही देव दिसण्याची अगोदरची पायरी आहे असाही आध्यात्मिक समज आहे .

म्हणजे स्पावड्याला आता देव दिसणार? *shok*

स्पा's picture

1 Aug 2014 - 2:42 pm | स्पा

आजी म्या धन्य झाहलो
मला आता देव दिसणार

किंवा ती बाईच देवी नसेल कशावरून

प्रसाद गोडबोले's picture

1 Aug 2014 - 6:21 pm | प्रसाद गोडबोले

बाई देवी आणि हडळबाई ह्यांच्या वर आपल्याला विशेष क्रश आहे हे जाता जाता नोंदवतो *man_in_love*

घ्या, स्पाची कथा मूळ पदावर! *biggrin*

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 10:07 pm | कवितानागेश

भूतावळीच्या मागोव्यावर
सोनेरी हाडं आणि म्हातारा
झोंबी कुणा म्हणावे
जारण-मारण-८
फेर्‍यात अडकलेला....
भूतबाधा- एक गंडवणे
महाराष्ट्रातील भूतांबद्दल माहिती हवी
मी केलेली काही प्लॅन्चेट- मधुबाला
......

माझा आवडता भुताचा इडियो देवुन जावा म्हणतो ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... ;) { Dil }

भुतांनी भुतांचा भुतांसाठी काढलेला धागा...

रेल्वेच्या लांबच्या प्रवासात १)भुताच्या गोष्टी ,२)स्वप्ने ,३)लहानपणच्या फजिती हे चांगले गप्पांचे विषय आहेत .

हाकामारी म्हणून एक प्रकार असतो. हाकामारी गोड व प्रेमळ आवाजात एखाद्याला ३ वेळा हाक मारते. त्याला भुलून जर कोणी त्या हाकेला ओ दिली तर झालं मग त्याचं कल्याण. कोणाला आहे का अनुभव हाकामारीचा??

कवितानागेश's picture

2 Aug 2014 - 1:09 am | कवितानागेश

मला पुषकळ्वेळा आलाय. माझ्या बर्‍याच मित्रमैत्रिणींना पण आलाय.
अर्धवट झोपेत असताना अशा हाका ऐकू येतात.

शिद's picture

1 Aug 2014 - 3:18 pm | शिद

कोणाला आहे का अनुभव हाकामारीचा??

प्रत्येक विवाहीत पुरूषाला असेल हा अनुभव.

(पळा.......)

स्पा's picture

1 Aug 2014 - 3:20 pm | स्पा

ख्याक

अ‍ॅक्च्युअली बरोबरे. कारण 'कल्याण' चा अर्थ कन्नड/तमिळादि भाषांत लगीन असाही होतो ;)

केदार-मिसळपाव's picture

1 Aug 2014 - 3:53 pm | केदार-मिसळपाव

घारी चा डोळा

ह्यावरुन , भारतभ्रमणाच्या वेळेस , रामदास स्वामी नक्कीच साऊथ इंडीयात फिरुन आले नसणार असे एक अनुमान काढत आहे *biggrin*

अधिराज's picture

1 Aug 2014 - 4:16 pm | अधिराज

*lol* :))

लग्नाच्या वेळी चकवा असतो .एक चांगलं भूत मागून हाका मारतं "सावधान ,सावधान !"पण गडी आपला फुडंच धावतो .ही आयुष्यात एकच बरोबर वेळ येते मागे वळून मागेच धावण्याची .मग बसतो टैब बडवत नाही चुकलो कप्पाळ बडवत .

बाकी स्पा भूत दिसल्यानंतर येते सिध्दी .तिथे फुरंगटून बसला नाहीस तर दिसतो देव .

कवितानागेश's picture

3 Aug 2014 - 9:34 am | कवितानागेश

माझा सगळ्यात आवडता भूताचा पिच्चर. :)
b

स्पा's picture

4 Aug 2014 - 3:30 pm | स्पा

हा एक किस्सा
मित्र कसार्याला राहणारा , एके रात्री अचानक त्याचे जवळचे नातेवाईक अपघातात दगावल्याने त्याला नाशिक ला जावे लागले.
कसारा घाटातून जाताना ,त्याला काहीतरी साईड मिरर मध्ये हलताना दिसले, त्याने निट पहिले तर एक मळकट कपडे घातलेली व्यक्ती डोकं वेंगावत जवळ जवळ गाडीच्या स्पीड ला (साधारण ६० च्या) धावत येत होती, थोडा वेळाने तो म्हातारा अगदी त्याच्या बाजूला आला , ह्याने गाडी तशी दामटवली ... बराच वेळ तो म्हातारा त्याला दिसत होता , आणि नंतर गायब झाला :)

खटपट्या's picture

6 Aug 2014 - 10:06 pm | खटपट्या

बाप्रे !!!!

आमचे एक गुरुजी कसारा -इगतपुरी भागातले .त्यांच्याकडे भुतांच्या छान छान ! गोष्टींची पोतडी होती स्पा.त्या सांगण्यावरून एक मजेदार किस्सा झालेला पाचवीत असतांना .सांगेन कधीतरी .कसारा घाटात बरेच अपघात होऊन त्यातली काहींची भुते वाट पाहत असतात आपली वळणावळणावर .त्यांना काहीतरी सांगायचं असतं पण ऐकून कोण घेतोय ?
मी जेव्हा गडावरच्या गुहेतून सकाळी खाली गावात येतो तेव्हा गाववाले मला वरपासून खाली पाहतात पाय उलटे वगैरे नाहीत ना ?