उदय कॉर्लिग्झम्सचा भाग २

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
14 Sep 2017 - 5:52 pm

भाग 1( http://www.misalpav.com/node/40857)

आपल्या परिवाराला आपण धर्मामुळेच गमवावे लागले अशी भावना मायकलमदधे मुळ धरु लागली होती. त्या दिवशी आपण त्या धर्मस्थळी जायला नको होते हा विचार त्याला पोखरुन टाके.

मायकलची अशीच विचारांची तंद्र्ी लागली होती.
धर्मस्थळावरच का हल्ला झाला ? कारण त्यांना धर्मावर हल्ला करायचा होता .मुळात धर्मावर हल्ला होतो म्हणजे नक्की काय होत? तर धार्मिक प्रतिकांवर हल्ला होतो. जर ही धार्मिक प्रतिकेच नसतिल तर ? जर असा एक धर्म असेल की ज्याची नक्की परिभाषाच नसेल , धर्मस्थळ नसेल , धर्मग्रंथ नसेल. असा धर्म नष्ट केलाच जाऊ शकणार नाही. पण मग या धर्माच अस्तित्व कसे टिकेल ? या धर्माच आचरण लोकांच्या विचारात असेल. ह्या धर्माला मानणारे लोक आपल्या तर्कानुसार आयुष्य जगत असतील. अशी एक मुलभुत रचना मायकलच्या डोक्यात चमकली.

मायकल चक्क नव्या धर्मस्थापनेचा विचार करत होता. एक असा धर्म जो मुळचा बॅस्टेनिझमच आधारित असेल आणि काहीश्या बंदिस्त स्वरुपातील धार्मिक कर्मकाडांपासुन मुक्त असेल.

मायकलचे संपुर्ण आयुष्य कर्मकाडांनी भरलेले होते. त्यातील फोलपणा काही वर्षातच त्याच्या लक्ष्ात आला होता. मात्र समाजाने त्याला अशा पदावर नेऊन पोहचवले होते की त्या पदावरुन अशा कर्मकाडांची अवहेलना शक्य नव्हती. मुळातच ज्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्यांनी हे सहजासहजी स्विकारले नसतेच.
त्यासाठी त्याला बॅस्टेनिझममधला धार्मिक आधार हवा होता.

स्वताः धर्मगुरु असल्याने बॅस्टेनिझमच्या सगळ्या धर्मग्रथांचा त्याचा खोल अभ्यास होता. याबाबतीत त्याचा कोण हात धरू शकणे शक्य नव्हते. धर्मग्रथातली एक अोळ मायकलच्या डोक्यात घुमू लागली ." काही वर्षानंतर आमच्या या धर्मात अचाट बदल होतील. ती काळाची गरज असेल. सिडोनाच्या मुलाच्या हातुन हे कार्य सिद्दिस जाईल. अचानक मायकलच्या डोक्यात विचार आला , आपणच तर तो महापुरुष नाही ?
मायकल धावत आपल्या घरी आला.

मायकलचा जन्म ईवाकडून झाला होता. ईवास स्वर्गवासी होवुन कैक वर्ष लोटली होती. आपले वर्णन त्या महापुरुषाशी जुळते का हे मायकल हरत-हेने ताडून पहात होता. त्या महापुरुषाचे कोणतेही वर्णन मायकलशी काही केल्या जुळत नव्हते.आपण तो महापुरुष नाही याची बोचणी मायकलला झाली आणि त्याने तो धर्मग्रंथ रागाने बंद केला.

निराश होऊन मायकलने पलंगावर डोके टेकवले आणि काही क्षणातच त्याचा डोळा लागला. स्वप्नामद्धे त्याची बायको त्यास त्याच्या नवीन धर्माच्या संकल्पनेबददल जाब विचारत होती. ही बॅस्टेनिझमशी प्रतारणा आहे असे ती बोलू लागली. त्यावर हा आधुनिक धर्माचा पाया आहे असे बाणेदार उत्तर मायकलने दिले. मायकलची बायको जोरजोरात हसत म्हणाली तुम्ही तर अजुनही बॅस्टेनिझममद्देच अडकला आहता. त्यासाठी तर तुम्ही महापुरूष आहात की नाही हे बघण्यासाठी धर्मग्रंथ उघडुन बघितलात. मायकल खाडकन जागा झाला.

आधुनिक विचाराचे एक मन त्याला नव धर्मनिर्मीतीसाठी सांगत होते. ते मन म्हणायचे की या क्षणी जर धर्मरक्षण करण्यात गुंतलो तर देश राहणार नाही. पुढे धर्म तर नाहिच नाही

तर दुसरे मन आजपर्यंतच्या झालेल्या धार्मिक संस्कारामुळे ह्या बॅस्टेनिझमशी होणा-या प्रतारणेशी संमत होत नव्हता. या अशाच गोंधळलेल्या मनस्थितीत काही दिवस गेले आणि मायकलच्या कानी एक भयानक बातमी पडली. बॅस्टेनिझमच्या धर्मग्रंथासहित २०० लोकांना आगिच्या भक्षस्थानी देण्यात आले होते. या बातमीने धक्का खाऊन मायकलने शेवटी नवीन धर्म स्थापनेचा निर्णय घेतला.

यासाठी कोणतीही घोषणा करण्याआधी मायकलने सगळ्याच आघाड्यावर तयारी करण्याचे ठरवले होते. कार्लिगच्या उद्योजकांसोबत मायकलची बैठक होऊ लागली. या उद्योजकांना जरी धार्मिक बाबींशी तेवढी आपुलकी नसली तरी त्यांच्या उद्योगासाठी कार्लिग शांत राहणे आवश्यक होते. मायकलचे वजन पाहता त्याला लगेच आर्थिक मदत होऊ लागली.

पैसा येताच मायकलने आपल्या कागदपत्र्ात फेरफार करण्यास चालू केले. आपले आईचे बोलीभाषेचे नाव इवा असले तरी तिचे मुळ जन्मनाव सिडोना असल्याचे मायकलकने सिद्ध केले. हळूहळू प्रसारमाध्यमांना जमेशि धरून तथाकथित महापुरुषाची कथा कार्लिगमदधे पसरु लागली. अर्थात यात मायकल उघड पडद्यावर जरी वावरत नसला तरी पडद्यामागुन त्याने निर्माण केलेली साखळी आपले काम करू लागली.

दुसरीकडे काही महिन्यातच मायकल गुपचुपणे काही पैशांसहित अॉस्टिनामदधे आला. ऑस्टिनमधल्या या उच्चस्तरिय बैठकीत मायकलच्या डोळ्यात एक वेगळीच छटा दिसत होती. शेवटी तो उत्तरला," आपल्या नियोजनाप्रमाणे बॅस्टेनिझमचा अंत जवळ आला आहे "

क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

रूपककथा रंगत चालली आहे. पुभाप्र.

शब्दानुज's picture

15 Sep 2017 - 2:10 pm | शब्दानुज

धन्यवाद..

खूप उत्कंठावर्धक!मलाही सर्व धर्म एक धर्मात विलीन व्हावेत असे नेहमी वाटतं.

शब्दानुज's picture

15 Sep 2017 - 2:12 pm | शब्दानुज

अहो इथे धर्माचे विघटन होत आहे.

पुंबा's picture

15 Sep 2017 - 3:26 pm | पुंबा

पुभालटा..