मायकलने जस्टिनचा हात धरून त्याला अंगणात आणले. अंगणातील एका लहानश्या कारंज्याशेजारी बसायची सोय होती. महत्वाच्या चर्चेसाठीची मायकलची ही आवडीची जागा होती. काही व्यवसाइकांनी मायकलसाठी पुरवलेले अंगरक्षक वगळता तिथे कुणीही नव्हते.
जस्टिनने बोलायला सुरवात केली. " तू एवढा हरामखोर असशील याचा विचार मी कथी केलाच नव्हता. तूला त्या महापुरुषाची जागा घेताना तुझ्या गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे ठेवायचा नव्हता. त्यासाठी माझ्या आईला मारलस. मला तरी का मागे सोडलस? की मीच तुला महापुरुष आहे यामुळे घाबरलास मला मारायला ? तुला मी तुझे बिंग न फोडण्याचे वचन देऊन माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चुक केली. जो माणूस एका आईचा जिव घेऊ शकतो तो कोणताही धर्म स्थापनेसाठी लायक असु शकत नाही."
मायकलकडे याची उत्तरे नव्हती. पण पुढचा प्रश्न मायकलच्या ह्रदयात बाणासारखा घुसला," तू केवळ धर्मबुडव्या नाही तर देशद्रोही आहेस. अोस्टेनामधे तुझी एक गुप्त मिटींग झाली हे काय मला टाऊक नसेल ? तिथून पैशाची बंडले आणून तू कोणते धार्मिक काम पार पाडलेस ? "
मायकल अजुनही मुकाच होता. तेवढ्यात काही लोकांचा जमाव मायकलच्या घराकडे आला. मायकलच्या अंगरक्षकांनी ताबडतोब मायकलभोवती सुरक्षेचे कडे केले. तो जमाव मायकलच्या नावाने जयघोष करत होता. "आमच्या महापुरुषा आम्हास तारुन ने .." मायकलने सुरक्षाकडे तोडेले आणि तो जमावात सामिल झाला. लोक त्याला खांद्यावर घेऊन नाचत असताना त्याने आपण राजकारणात उतरणार असल्याचे जाहिर केले.
या सर्व गर्दित जस्टिन कुठे हरवला हे मायकलला कळालेच नाही. तरीही आता जस्टिन आपले काहीच बिघडवू शकणार नाही याची खात्री त्याला होती.
त्याच दिवशी त्यानी विराट सभा आयोजित केली. महापुरुष मायकलच्या नावाने जयजयकार होत होता. मायकलने आपले बोलणे सुरु केले. " काल आपल्या स्वर्गिय देवांचा मला साक्षात्कार झाला. आपल्या धर्मरक्षसाठी त्यानी माझी निवड केल्याचे सांगितले. मी तो आदेश मानण्याचे ठरवून सक्रीय राजकारणात उतरण्याचे ठरवले. तुम्ही या धर्मयुद्धात मला साथ द्याल का ? " सभेतुन होकाराचा आवाज आतमंतात घुमला. मायकलने आपले बोलणे पुढे चालू ठेवले ,"मात्र यासाठी आपल्याला आपल्या धर्मग्रथात अमुलाग्र बदल करावे लागतील. आपल्य जुन्या धर्मग्रथांचाच तो आदेश आहे. त्यास अनुसरुन मी सिडोनाचा मुलगा, महापुरुष मायकल आज जाहिर करतो की बॅस्टेनिझमचे आधुनिक रुप कॉर्लिझम्स असेल. ह्या सद्यपरिस्थीतीसाठी हा धर्म अंगिकारने आपले धर्मकर्तव्यच आहे. आणि तसा मी आदेश देत आहे. "
यानंतर या कॉर्लिझम्सची मुलतत्वे मायकलने स्पष्ट केली. या धर्माच्या पुढच्या दिशा लवकरच ठरतील असा आशावद व्यक्त केला. दहा महिन्यानंतर देशात धर्मांतर सुरू होईल असे त्याने जाहिर केले. या दहा महिन्यात मायकलची माणसे गावोगावी फिरत या कॉर्लिग्झम्सचा प्रचार करणार होती.
पुढच्या दिवसात या धर्मांतरावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. बराचसा समाज ह्यास धार्मिक आज्ञा मानून तयार झाला. तरीही मायकलवर शंका घेणारे काही कर्मठ लोकही होतेच. पण मायकल विरुद्ध बोलण्याची ताकद त्यांना मिळत नव्हती.
ही उणीव जस्टिनने जाणली होती. मायकलविरुद्ध दुस-या बाजुस पुरातन बॅस्टेनिझमचा पुरस्कार करत नवी आघाडी उघडली होती. कट्टर बॅस्टेनिझमचे पुरस्कर्ते त्यास येऊन मिळत होते. मात्र निवडणुका केवळ तिन महिन्याच्या अंतरावर असताना मायकलने हा जुगार खेळला होता. मायकलचा प्रभाव पाहता त्याला निवडणुकित हरवणे अशक्य असल्याचे जस्टिनने जाणले. राजकिय क्षेत्रात उडी न घेता केवळ धार्मिक बाबींवर लक्ष करण्यास जस्टिनने त्याच्या गटास सुचवले. जस्टिनचा हा गटही गावोगावी फिरू लागला.
मायकलच्या राजकीय विरोधकांची प्रतिमा अगोदरच मलिन झाली होती. अपेक्षेप्रमाणे मायकलने निवडणुकित प्रचंड बहुमत मिळवले. राहिलेल्या काही महिन्यात कॉर्लिग्झम्सचा प्रचार मायकलने राजकिय मंचावरुन होऊ लागला. जस्टिनचा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय साफ चुकला होता. धर्माची घोषणा करण्याआधी जी आर्थिक , सामाजिक तयारी मायकलने केली होती तेवढी तयारी करण्यास जस्टिनला वेळच मिळाला नाही. धर्मांतरापासुन लोकांना रोखण्यात आपण अपयशी ठरत आहोत हे जस्टिनला जाणवू लागले होते.
त्याचे पुढचे मार्ग बंद होत चालले होते. शेवटी राजकिय नाही तर सशस्त्र गट उभा करण्याच्या निर्णयापर्यंत जस्टिन येऊन पोहचला. त्या दिशेने जस्टिनची वाटचाल चालू झाली.
इकडे निवडणुकीनंतर कॉर्लिगची सुत्रे हातात घेतल्यानंतर मायकलची खरी परिक्षा चालु होणार होती.अॉस्टिन देशाने आजवर जसेजसे हल्ले केले त्याची खोलवर माहिती मायकल घेऊ लागला. आजपर्यंत माहित नसलेले खाचखळगे त्याला कळू लागले. अॉस्टिनाचे हल्लेखोर हे पारंपारिक आत्मघाती पद्धतीने हल्ला करणारे नव्हते. अॉस्टिना आणि कॉर्लिग यांच्या रहिवाश्यांत फरक करणे अवघड काम होते. जेव्हा सैनिकी तुकडी हल्याच्या ठिकाणी येत असे तेंव्हा हल्लेखोर प्रतिकार न करता, स्वताःचा बळी न देता सामान्य लोकात मिसळुन जात आणि तिथुन सहज निसटुन जात. यासाठी कॉर्लिगच्या सगळ्या रहिवाश्यांच्या रहिवासी दाखल्याची तपासणी होऊ लागली . यात ऑस्टिनाचे काही लोक पकडण्यात आले. पण हे लोग केवळ अवैध्यरित्या इथे रहात आहेत एवढाच अर्थ त्यातून निघत होता. त्यांना आंतरराष्टीय स्तरावर उघडे पाडायचे असेल तर आणखी पुराव्यांची गरज भासणार होती.
तिकडे सिमेवरच्या सैनिकांचे मनोधैर्य मायकलने कैकपटीने वाढवले. आपण चक्क महापुरुषांच्या युगात त्यांच्यासाठी काम करत आहोत ही भावनाच त्यांच्यासाठी पुरेशी होती. यामुळे सिमेवरून होणारी घुसपेठ कमी झाली आणि आधीपासुन देशात असलेले दहशतवादी तर आधीच पकडण्यात आले होते. नवल म्हणजे मायकल सत्तेत आल्यापासुन अॉस्टिनकडूनही खुसखोरी कमी झाल्याचे निरीक्षण सैनिक नोंदवत होते.
या कामांमुळे मायकलच्या प्रतिमेला अधिकच पुष्टी मिळत गेली. अखेरीस धर्मांतराचा दिवस उजाडला. आपल्या असंख्य पाठराख्यांसोबत मायकलने धर्मांतराची सगळी तयारी केली. अचानक एक स्फोटाचा आवाज आकाश भेदून गेला. मात्र हा हल्ला अश्या ठिकाणी करण्यात आला होता की यातून कोणतिही जिवीतहानी झाली नाही. होणारी संभाव्य धावपळ लक्षात घेऊन मायकलनने बाहेर जाणारे रस्ते बंद करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले.
दुस-या बाजुला सैनिकांची एक तुकडी उभी होती. तिकडे काही गोंधळ माजला होता. मायकल तिकडे गेल्यावर कळले की हल्लेखोरांना सैनिकांनी पकडले आहे.
मायकलने त्यांना ताब्यात घेणाचे आदेश देऊन धर्मांतराचा कार्यक्रम पुढे चालू ठेवला. एवढा मोठा हल्ला होऊनही कोणी मरण पावले नाही ह्याचा अर्थ मायकलने आपल्याला वाचवले असा लोकांचा समज झाला. जे थोडे लोक धर्मांतराबद्दल द्विधा मनस्थितीत होते त्यांवर या गोष्टीचा फार खोल भावनिक परिणाम झाला. आणि तेथे उपस्थित असलेल्या एकूण एक व्यक्तिने अखेरीस कॉर्लिग्झम्सचा स्विकार केला.
पण हल्यात कोण का मरण पावले नाही हे मायकलला ठाऊक होते. जस्टिनच्या अतिरेकी गटाबद्दल त्याला माहिती मिळाली होतीच. जस्टिनला आपलेच स्वकीय न मारता केवळ धर्मांतर रोखायचे होते. त्यासाठी कोणतीही जिवितहानी होणार नाही याची काळजी त्याने घेतली होती.
धर्मांतराचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मायकलने ऑस्टिन देशात उच्चस्तरिय फोन केला. ,"सर मी माझे काम केले आहे. आजच धर्मांतर घडून आल्याचे तुम्हाला माहिती असेलच. आज हे लोक धर्म विसरलेत उद्या इतिहासही विसरतील. मी त्यांची धार्मिक प्रतिकेच काढून घेतली आहेत. आता संरक्षण करण्यासाठी काहीच राहिले नाही. अशा कणाहिन लोकांना पुढे धर्माची गरज नक्कीच भासेल. तेव्हा तुम्ही तुमच्या धर्माच्या छत्रछायेखाली त्यांना अोढा. .. माझे राहिलेले पैसे तेवढे द्या म्हणजे माझे काम संपवायला मी मोकळा.. " मायकलने फोन ठेऊन दिला.
इकडे त्या जस्टिनच्या गटातील हल्लेखोरांची माहिती काढण्यात आली. आणि पुढच्या काही महिन्यात संपुर्ण गटाला मायकलने पिंजुन पिंजुन शोधले आणि संपुर्ण गट जेरबंद झाला.
हा गट जेरबंद होतात दुस-याच दिवशी आंतरराष्ट्ीय लवाद्यापुढे मायकलने आपला अॉस्टिन देशाविरुद्ध दावा दाखल केला. या दाव्यात मायकलने आजपर्यंतच्या सगळ्या हल्यांचे पुरावे सादर केले. जगभरातून अॉस्टेनावर टिका झाली. अनेक आर्थिक निर्बंध लागु करण्यात आले. अॉस्टेनासाठी हा फार मोठा धक्का होता.
इकडे कॉर्लिगमद्धे आनंदउत्सव चालू झाला. मायकलच्या नावाचा जयजयकर सर्वत्र ऐकू येत होता. मात्र त्यावेळीही धक्क्यांची मालिका अजुन संपलेली नसल्याचे लोकांनी पाहिले.
समोर मायकलसोबत जस्टिनही बसलेला होता. !!
मायकलने बोलायला सुरवात केली. ," मित्रांनो आपल्या सगळ्यांसमोर आज एक रहस्य उघडीस आणण्याची वेळ आली आहे ते म्हणजे आपले खरे महापुरुष मी नसुन जस्टिन आहेत. यावेळी मायकलने आपले मूळ कागदपत्र दाखवले त्यावर आपल्या आईचे नाव ईवा असल्याचे दाखवले आणि नंतर जस्टिनची मुळ कागदपत्र सादर केली. मायकल पुढे बोलु लागला ," ह्यांचे नाव जस्टिन. यांच्यामुळेच मला अॉस्टिनाविरुद्ध पुरावे गोळा करता आले. मात्र जर हे महापुरूष म्हणून जगासमोर आले असते तर त्यांच्या जिवाला धोका संभवत होता. त्यासाठी त्यांच्या प्रत्येक आदेशानुसार मी वागत गेलो आणि आपणास यश मिळत गेले. मी तुमचा गुन्हेगार आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.."
संपुर्ण कॉर्लिगला संकटातुन बाहेर काढण्या-या मायकलला जनता शिक्षा देणे अर्थातच शक्य नव्हते. जस्टिनच्या ज्या दहशती गटाला मायकलने पकडले होते त्यांना सोडुन देण्यात आले. याच गटाने अॉस्टिनमदधे घुसुन हल्ल्यांचे पुरावे मिळवले होते. जरी त्यांनी कॉर्लिग्झम्सचा स्विकार केला नसला तरी संपुर्ण कॉर्लिगसाठी ते गळ्यातले ताईत बनले होते. मायकल आणि जस्टिनने सगळ्याच पातळ्यांवर विजय मिळवला होता.
अॉस्टिनामद्धे आपल्या पराभवाशी मिमांसा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या सर्व छुप्या युदधाचे करता करविते रुदरफोर्ड बोलू लागले. "मायकलने आपल्याला पुर्णतः हरवले आहे. आपण सुरवातीपासुनच्या घटनाक्रमाकडे पाहु. मायकलची मुळ प्रेरणा ही धर्मसुधारण्याची होती. कॉर्लिगला धार्मिक बंधनातून मुक्त करणे हे त्याचे मुख्य उद्यिष्टय होते . यासाठी त्याने प्रथम स्थानिक उद्योजकांचा आधार घेतला. तो कमी पडताच तो आपल्याकडे आला. आपल्यासमोर त्याने बॅस्टेनिझमचा विनाश करण्यासाठी धर्मांतराचा मार्ग सांगितला. दुर्दैवाने मला तो भावला आणि मी त्यास संमती दिली. मात्र धर्मांतरातून तो धार्मिक सुधारणा करेल हे मला तेव्हा पटले नाही . आपल्याकडून त्याला पैशाचा स्त्रोत मिळाला.
त्याला पाठबळ देणा-या एका उदयोजकाला आपण फितवले होते. त्या उद्योजकाचा अंगरक्षक मायकल सोबत असे. त्याकडून त्याच्या बातम्या आपल्याला कळत. मात्र तो अंगरक्षक फितूर आहे हे मायकलला कळाले. त्यानंतर मायकलने जस्टिनला शोधून काढले. सोबत अंगरक्षक नसताना त्याने त्यासोबत पुढचा सगळा मार्ग जस्टिनला सांगितला.
त्यानंतर अंगरक्षकासमोर त्याने जस्टिनशी भांडण काढले आणि जस्टिनच्या आईचा खुनाचा बनावही रचला. प्रत्यक्षात जस्टिनने आईला परदेशी पाठवले आणि दुसरेच शरीर आईचे म्हणून दाखवले. मायकलने आपले वजन वापरून ही केस पुढे बंद केली.
आपल्याला मात्र सगळी चुकीची माहिती मिळत गेली. मायकल आणि जस्टिन एकमेकांविरुद्ध आहेत ते त्याने आपल्यासमोर मांडले.
मुळात धर्मांतर होताना काही लोक विरोध करणार हे मायकलने ताडले होते. जर तिथुन दुसरे नेते तयार झाले असते तर मायकलला ते जड झाले असते. त्यासाठी त्यांचा नेता त्याने जस्टिनलला बनवले.
जस्टिनकडे येणारे लोक अर्थात पक्के कट्टर लोक होते. त्यांचा मायकलने खुबीने वापर करून घेतला. त्यांना विशेष सैनिकी प्रशिक्षण देण्यात आले. मायकलकडुन गोपनिय माहिती जस्टिनला मिळत गेली त्याप्रमाणे हा गट आपल्या देशात घुसला आणि कागदपत्र मिळवण्यात यशस्वी ठरला. इथे मायकलने सैनिकी बळासोबत आपल्याच पैसा आपल्याविरुद्ध वापरुन काही लोकांना फितवले.
जसे मायकलने आपले नाव बदलले तसे जस्टिनने आपल्या आईचे नाव आधिच सिडोना करुन घेतले असले पाहिजे. शेवटी ती कागदे दाखवून जस्टिन आणि त्याच्या गटाला योग्य तो सन्मान मिळवुन दिला.
असो.. या पराभवची नैतिक जबाबदारी स्विकारुन मी माझा राजनामा देतो." एवढे बोलून रुदरफोर्ड थांबले.
रुदरफोर्डची पुढे बरीच वर्ष रिकामीच गेली. एके दिवशी त्याच्या कानी बातमी आली की वयोमानानुसार मायकल आणि जस्टिनचे निधन झाले आहे. सद्दयाचे सरकार त्यांचे स्मारक बनवणार आहे. रुदरफोर्डने कुतूहलाने त्या स्मारकाचे संकल्पचित्र बघितले. त्यात जस्टिन समाजाला वाट दाखवत असून त्याच्या पायाशी मायकल नतमस्तक होताना दाखवले होते. ते पाहून रुदरफोर्ड खळखळून हसु लागले...
आज कॉर्लिग्झम काही देशात पसरला आहे. त्यास मानणारे लोक आजही जस्टिन- मायकलच्या स्मारकास भेट देतात. इथे मागितलेली कोणतीही इच्छा अपुर्ण रहात नाही हा सगळ्यांचा ठाम विश्वास आहे...
समाप्त...
प्रतिक्रिया
30 Sep 2017 - 9:08 pm | एस
रोचक. खऱ्या विरोधकांना दाबण्यासाठी आपणच खोटे विरोधक निर्माण करणं राजकारणात नेहमीच चालतं.
1 Oct 2017 - 5:48 pm | विचित्रा
रोचक.
निधर्मी म्हणवणार्या कम्युनिस्टांनी माओ, लेनिन, किम जॉंग इल यांचं दैवतीकरण केलंच.
2 Oct 2017 - 8:30 pm | पगला गजोधर
मायकल ने जस्टीन ला बोट धरून राजकारण शिकवलं ???
रोचक...
जस्टीन गांडा थै ग्या छे !